गॅलरीतला [तिसरा] पालापाचोळा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
11 Dec 2015 - 3:50 pm

घरात माणसे कमी
अन लोक वाढतात
तेव्हा गॅलरीची 'एक्स्ट्रा रूम' होते!

घरात नव्याला सूज येते
अन जुन्याचे कुपोषण होते
तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो!

घरात वाचणारे कमी
अन वाचाळ जास्त होतात
तेव्हा गॅलरीचा रद्दीखाना होतो!

घरात आवाज कमी
अन गोंगाट जास्त होतो
तेव्हा गॅलरीत 'सायलेंट झोन' येतो!

घरात हवे ते कमी
अन नको ते जास्त येते
तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते!

घरात दिवस कमी
अन रात्री जास्त होतात
तेव्हा गॅलरीत बोन्साय वाढतात (?)

घरात, घर कमी
अन भिंती वाढतात
तेव्हा गॅलरीला काचा बसतात,

फक्त स्वतः चीच प्रतिमा दाखवणाऱ्या !

.

अनर्थशास्त्रइशाराकविता माझीवावरकविताविडंबनसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीराहती जागा

प्रतिक्रिया

नाखु's picture

11 Dec 2015 - 3:54 pm | नाखु

घरात हवे ते कमी
अन नको ते जास्त येते
तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते

!

आम्चा प्रयत्न इथे

जातवेद's picture

11 Dec 2015 - 7:56 pm | जातवेद

खुपच सुंदर!

एक एकटा एकटाच's picture

13 Dec 2015 - 9:09 am | एक एकटा एकटाच

जबरदस्त लिहिलय

नगरीनिरंजन's picture

13 Dec 2015 - 9:18 am | नगरीनिरंजन

दुसरं आणि पाचवं कडवं मार्मिक!

मित्रहो's picture

13 Dec 2015 - 4:22 pm | मित्रहो

घरात नव्याला सूज येते
अन जुन्याचे कुपोषण होते
तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो!

आवडले

मितान's picture

13 Dec 2015 - 4:35 pm | मितान

छान कविता !

चाणक्य's picture

13 Dec 2015 - 7:31 pm | चाणक्य

सुटलीये तुमची गाडी. आवडली ही पण.

पद्मावति's picture

14 Dec 2015 - 1:04 am | पद्मावति

खूप सुंदर लिहिलंय.