अस्तित्व

मयुरMK's picture
मयुरMK in जे न देखे रवी...
25 Dec 2015 - 1:35 pm

.
अस्तितत्वता नसते जिथे या जगाची
दूर-दूर....अशा निवांत निश्चल एकांती
रम्य निर्मळशा सरिते काठी
शांत-शांत ... अन हिरवी जेथे वनराई

निर्झराचे वाही चम् -चम् पाणी
गाई खळखळ मंजूळ गाणी
धुंद धावतो पवनही रानोरानी
शीळ मधुर वाजवीत पानोपानी

किलबील-किलबील करोनिया नाद
रानपाखरे मना घालिती साद
राहत नाही मग मजला भान
अल्लड वासरपरि मन धावे बेभान

पाण्याचा खळखळाट ....
वार्याचा थयथयाट ...
पाखरांचा चिवचिवाट...
जिथे, तिथेच असते रूजत
माझे चिरंजीव -
अस्तित्व .

कविता माझीप्रवास

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

25 Dec 2015 - 1:40 pm | एक एकटा एकटाच

छान आहे

जव्हेरगंज's picture

25 Dec 2015 - 2:58 pm | जव्हेरगंज

mast!

photo konacha aahe?

मयुरMK's picture

25 Dec 2015 - 3:03 pm | मयुरMK

माझाच आहे फोटो

धन्यवाद एक एकटा , जव्हेरगंज

पद्मावति's picture

25 Dec 2015 - 3:56 pm | पद्मावति

मस्तं!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Dec 2015 - 4:51 pm | अत्रुप्त आत्मा

थोडा चचा ,थोडा लीला धर! ;)

मयुरMK's picture

25 Dec 2015 - 5:30 pm | मयुरMK

चचा म्हणजे हो

अभ्या..'s picture

25 Dec 2015 - 5:54 pm | अभ्या..

इथे होते एक महाकवि.
आमचे भास अन आमचे भारवि
.
नाव त्याचे चतुर चाणक्य
प्रत्येक कविता त्याची अशक्य
.
म्हणती त्यास प्रेमाने सारे चच्या
जणू वनडेमधला आपला सच्या
.
जाचास कंटाळून त्याने नाव घेतले लीलाधर
नवा मंत्र शिकविला आम्हा साय लीला धर
.
अता येते दाटून अठवण बुवाच्या त्या भावाची
त्याच्या सुलभ कवितांची अन बदललेल्या नावाची.
.

(यमक जुळलेले आहे. कुठलाही फाऊल चलणार नै)

प्रचेतस's picture

25 Dec 2015 - 6:35 pm | प्रचेतस

=))

प्रचेतस's picture

25 Dec 2015 - 6:35 pm | प्रचेतस

=))

जव्हेरगंज's picture

25 Dec 2015 - 6:40 pm | जव्हेरगंज

=))

एक एकटा एकटाच's picture

25 Dec 2015 - 8:10 pm | एक एकटा एकटाच

वाह अभ्या राव

मस्त !!!!!!!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Dec 2015 - 8:36 pm | अत्रुप्त आत्मा

@म्हणती त्यास प्रेमाने सारे चच्या
जणू वनडेमधला आपला सच्या --- http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif

दू दू दू ! http://freesmileyface.net/smiley/cool/cool04.gif

मयुरMK's picture

25 Dec 2015 - 5:39 pm | मयुरMK

धन्यवाद प्र. बद्दल

:) यमक जुळायलाच पाहिजे आस नाही