सालं, आज जीव कासावीस झालाय
सालं, आज जीव कासावीस झालाय
तिकडं अकरा कळ्यांचा विनाकारण बळी गेलाय
आज मी पण एक बाप आहे
पण खरं सांगू मित्रानो
या देशात बाप होणं , श्राप आहे
केलं असेल त्यांनीही त्यांच्या मुलांना टाटा बाय बाय
त्यांना थोडंच ठाऊक होतं
पुढे होणार आहे काय ?
त्या माउलींचा तीळतीळ तुटला असेल जीव
पण इथे कोणालाच पडली नाही आहे त्याची जाणीव
आजूबाजूच्या लोकांनी केली असेल चौकशी
आपली मुलं कुठे आणि आहेत कशी ?
जो तो आपापलं बघून सांत्वनाला गेला असेल
थोडा वेळ रडेल तिथं आणि परत कामाला लागेल