मातृभाषा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
22 Feb 2018 - 12:19 am

तू
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
हळूहळू लिहित जातोस,
तेव्हा
मी तुझे
राजस हात
लोभस डोळे
पहात राहते.

तुझ्यात इतका जीव का गुंतावा?

तू माझ्या हातांचे
देवनागरी चुंबन
घेऊन म्हणावे,
मातृभाषा कि काय
तिच्यातच जीव अडकतो बघ,
आई गंssss म्हटल्याशिवाय
प्राणसुद्धा जात नाही....

शाईचे बोट धरुन
तू परत रात्रीच्या
शांतप्रहरी
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
तुझेमाझे हितगुज
हळूहळू लिहित राहतोस...

शिवकन्या

कविता माझीभावकवितामाझी कवितामुक्त कविताधोरणमांडणीसंस्कृतीवाङ्मयकविताभाषासाहित्यिकसमाज

प्रतिक्रिया

पैसा's picture

22 Feb 2018 - 9:04 am | पैसा

छान कविता

पुंबा's picture

22 Feb 2018 - 1:41 pm | पुंबा

सुरेख काव्य

किसन शिंदे's picture

22 Feb 2018 - 1:59 pm | किसन शिंदे

छान कविता.

पद्मावति's picture

22 Feb 2018 - 2:19 pm | पद्मावति

आहा...मस्तच.

नाखु's picture

22 Feb 2018 - 3:31 pm | नाखु

आवडली

माहितगार's picture

22 Feb 2018 - 5:47 pm | माहितगार

रोचक , पण प्रांजळपणे सांगायचे झाल्यास वही नेमकी कुणाची असा अनाहुत प्रश्न येऊन अर्धाक्षणभर अडखळल्यासारखे झाले. वही कुणाचीही असो प्राण कंठाशी आल्यावर आई गंssss ची हाक पोहोचते पण तो पर्यंत तिचा विसर पडणार्‍यांचे काय ?
सारखे नसते प्रश्न पडणार्‍या माहितगाराचे काय करायचे असा प्रश्न कुणास पडल्यास मनमोकळे क्षमस्व.

शिव कन्या's picture

22 Feb 2018 - 11:42 pm | शिव कन्या

प्रश्न माहितगारालाच जास्त पडतात....
विचारात चला.... उत्तर मिळेल न मिळेल, वेगळा भाग...

जव्हेरगंज's picture

22 Feb 2018 - 8:06 pm | जव्हेरगंज

आहा...! मस्तच!!!

शिव कन्या's picture

22 Feb 2018 - 11:40 pm | शिव कन्या

सर्व रसिक वाचकांचे आभार.

अभ्या..'s picture

22 Feb 2018 - 11:56 pm | अभ्या..

छान लिहिलेय
पण आम्ही वेलांटीत व ला वेलांटी देत नाही हो.

शिव कन्या's picture

23 Feb 2018 - 12:07 am | शिव कन्या

वेलांटी हे शब्द रूप एकदम बरोबर.
पण विलांटी हे ध्वनी रूप एकदम चूक नाही.

आम्ही आपलं ते व ला टोपपदर दिला..... कलाकार आहात, कळेल.