मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(पितृभाषा)

ज्ञानोबाचे पैजार · · जे न देखे रवी...
पेरणा अर्थातच तूम्ही भकार, मकार, गकाराने सुरु होणारे शब्द उच्चारत माझ्या एक सणकन कानफाटीत मारता, तेव्हा मी तुमचे राकट् हात लालसर डोळे पहात राहतो. तुम्हाला पाहुन जीव इतका का घाबराघुबरा व्हावा? तुम्ही माझे मनगट कचकन पिरगळून पाठीत दणका घालता, पितृभाषा कि काय तिच्यातच जीव जातो बघा, बापाचा माल आहे का? म्हटल्याशिवाय वाक्य सुध्दा पूर्ण होत नाही.... प्रगतिपुस्तक हातात धरुन तूम्ही रात्रीच्या शांतप्रहरी भकार, मकार, गकाराने सुरु होणारे शब्द उच्चारत माझ्या सात पिढ्यांचा उध्दार करत त्यावर एकदांची सही करता आणि मी पुढच्या परिक्षेपर्यंत सुटतो... शिव्यापुत्र

वाचने 10208 वाचनखूण प्रतिक्रिया 19

नाखु गुरुवार, 02/22/2018 - 15:34
बाप भलताच ताप !!!! प्रायजोक " आता घरोघरी अंबारी"

शिव कन्या गुरुवार, 02/22/2018 - 23:37
पैजारबुवा साक्षात बाप आणला कि !! :))))) आवडले विडंबन.... पण विडंबन कवितेपाशीच थांबले असते तर बरे वाटले. नावा पाशी घेऊन आलात, आवडले नाही.

In reply to by शिव कन्या

नावाचे विडंबन करताना कोणा व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. कवितेच्या विषयाला अनुसरुन सही सूचली म्हणुन ती तशी केली. लिहिण्याच्या जोशात अनावधानाने माझ्या कडून तुमच्या भावना दुखावल्या गेल्या त्या बद्दल मी तुमची माफी मागतो, मला क्षमा करा. तसेच या आधी सुध्दा मी बर्‍याच जणांच्या नावांची मोडतोड केली. त्या वेळी सुध्दा काही जण कदाचित दुखावले गेले असतील. त्या सर्वांनी देखिल मन मोठे करुन मला माफ करावे अशी मी त्यांना विनंती करतो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शिव कन्या Fri, 02/23/2018 - 10:52
समजू शकते तुमचा जोश पण राहू द्या कि जरा होश. जा पैजारा जा, जा लिखते रै अपना विडंबन :)))))) माफ मागण्या इतके निर्मल मन असलेलाच उत्तम विडम्बन करू शकतो. शुभेच्छा.

Jayant Naik Tue, 02/27/2018 - 11:23
खूप सुरेख जमलय. पण या जमान्यात असा बाप ? बाप रे बाप !