दोन भिकारी भीक मागती, पुलाखाली करिती वस्ती

Primary tabs

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
21 Apr 2018 - 7:27 pm

दोन भिकारी भीक मागती

पुलाखाली करिती वस्ती

नेहेमी नेहेमी करुन याचना

भुलवी फसवी पांथस्थांना

एके दिवशी सांज वेळी

अशीच होती रीती झोळी

कोसुनी त्या चंद्रमौळी

करिती याचना भरण्या झोळी

धूर प्रकटला, डोळे दिपले

शिवशंभोने दर्शन दिधले

दोघांसी तीन अंडे दिले

इच्छा धरुनी फोड तयासी

इप्सित मिळेल त्वरित तुम्हांसी

दोघेही ते खुश जाहले

परतीच्या प्रवासा निघाले

दोघांच्याही दोन वेगळ्या वाटा

जाण्यापूर्वी गळाभेटा

वर्षानंतर भेटू पुन्हा आपण

देऊ यथेच्छ एकमेका आलिंगन

काळ लोटला एक वर्षाचा

शोधत शोधत पहिला आला

त्याच जागेवर दुसरा नव्हता

पुलाखाली तो उभा सापडला

तीच याचना तीच झोळी

तोच भिकारी पुन्हा पुलाखाली

त्याला पाहता धक्का बसला

पुन्हा पुन्हा डोळा चोळला

पुसता त्याला रडवेला झाला

सांगून टाकली व्यथा त्याला

अंडी घेऊनि तिथून निघालो

कशाला फोडा ? म्हणून बसमध्येच चढलो

चढता चढता तोल गेला

एका अंड्याचा जीव गेला

फुटताक्षणी तोंडून शब्द निघाले

" च्यामायला _ वडे लागले "

क्षणभर काही सुचेनासे झाले

बघता बघता अंग भरून गेले

पर्याय नव्हता उरला काही

दुसरं अंड मग फोडून पाही

इच्छा धरली मनात सत्वर

चिकटलेत ते सारेच दूर

बघता बघता गोंधळ उडाला

सार्यांबरोबर माझापण गेला

बिनबुडाचा काय तो तंबू ?

तिसरं फोडून परत घेतलं बांबू

असा सारा प्रवास घडला

सालं डोक्याचं झालंय दही

जीव परत या पुलाखाली गाडला

देवाने दिल होत , मित्रा सारं काही

पण या लोभाने पछाडला

सिद्धेश्वर विलास पाटणकर

अविश्वसनीयइशाराकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडछावाजिलबीमाझी कवितामार्गदर्शनमुक्त कवितारतीबाच्या कविताधोरणमांडणी

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Apr 2018 - 2:50 pm | राजेंद्र मेहेंदळे

लहानपणी च्या विनोदावर बेतलेली भन्नाट कविता

अवांतर-- छंद, मात्रा वृत्ते सगळयाचे आयझेड केली आहे. सुरुवातीला दुरुस्त्ती करता येईल का बघत होतो पण नंतर च्या ओळींमध्ये प्रकरण हाताबहेर जात चालले म्हणुन नाद सोडुन दिला.

मार्मिक गोडसे's picture

22 Apr 2018 - 2:58 pm | मार्मिक गोडसे

इतकं सशक्त लिखाण मिपावर पहिल्यांदाच बघितले. अजुन पंख लागले नाही ह्यातच सर्व काही आलं.

अजुन पंख लागले नाही ह्यातच सर्व काही आलं.

हा ना,
चांदण्या टाकून शिव्या घालायच्या, डॅश टाकून काहीहि लिहायचे हे राजमान्य झालेय वाट्ते आता.
साहित्यात बोलीभाषेचे उल्लेख टाकताना काही अपरिहार्य शिव्या वगैरे ठिकाय पण जुने जोक असे डॅश टाकून मिपावर टाकलेले चालतात काय?

गामा पैलवान's picture

23 Apr 2018 - 5:41 pm | गामा पैलवान

सिद्धेश्वर विलास पाटणकर,

अहाहा! काय कविता आहे. प्रज्ञा व प्रतिभा पिचकारीसारखी नुसती फसफसून वाहत आहे. फक्त ते नावाचं जरा मनावर घ्या हो. ते कवितेचाच भाग वाटतं. अलगत्वनिदर्शक पाचर ठोकाच.

बाकी, काव्यास्वाद घेताघेता विसंगतीमुळे किंचित रसभंग झाला. हेच ते विसंगत कडवं :

फुटताक्षणी तोंडून शब्द निघाले
" च्यामायला _ वडे लागले "
क्षणभर काही सुचेनासे झाले
बघता बघता अंग भरून गेले

भिकाऱ्यास _वडे कसे लागले? त्याच्या मायला लागायला हवेत ना?

पण असो. बाकी कविता (अगदी विसंगतीसहित) चिंतनीय आहे.

आ.न.,
-गा.पै.

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Apr 2018 - 6:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

नीट वाचा (रिडिंग बिटवीन द लाईन्स किवा गाळलेल्या जागा भरा) उलट तुम्ही सुचवताय त्यातच विसंगती आहे.

जेम्स वांड's picture

23 Apr 2018 - 6:14 pm | जेम्स वांड

पाटणकर लैच जोरात आहेत, लहानपणीचा एक अश्लील विनोद सांगायला किती तो अघोरी आटापिटा.

मार्मिक गोडसे's picture

24 Apr 2018 - 1:21 am | मार्मिक गोडसे

राजकीय धाग्यांवर श

मार्मिक गोडसे's picture

24 Apr 2018 - 1:24 am | मार्मिक गोडसे

राजकीय धाग्यांवर ,अहाहा काय ती भाषा म्हणणाऱ्यांना ही भाषा चालते का? आम्हालाही मुभा द्या ,मग बघा हावडा एक्सप्रेस कशी सुसाट पळेल ती.

गामा पैलवान's picture

24 Apr 2018 - 11:55 am | गामा पैलवान

खरं सांगा मा.गो., तुम्हाला _वडा एक्सप्रेस म्हणायचं होतं नं? आम्ही कसं ओळखलं!!

-गा.पै.

मार्मिक गोडसे's picture

24 Apr 2018 - 2:04 pm | मार्मिक गोडसे

खरं सांगा मा.गो., तुम्हाला _वडा एक्सप्रेस म्हणायचं होतं नं? आम्ही कसं ओळखलं!!
तुमच्या तोंडातलं बाहेर काढायची काय गरज होती?

गामा पैलवान's picture

24 Apr 2018 - 8:19 pm | गामा पैलवान

मा.गो.,

आता मात्र हद्द झाली. माझ्याच नायतर काय इतरांच्या तोंडातलं काढीत बसू म्हणता? ते महत्कार्य करणारी माणसे वेगळी आहेत. स्वत:स पुरोगामी म्हणवून घेतात ती.

आ.न.,
-गा.पै.

जाऊ द्या हि कल्पना .. सोडून द्या गंगेला .. चूभूद्याघ्या .. कृपा करून आता अभिप्रायांची देणी घेणी थांबवा इथे .. दुसरी मजेदार कल्पना सादर होत आहे ... ती वाचावी हि वाचकांना नम्र विनंती ...

सिद्धेश्वर विलास पाटणकर

बिटाकाका's picture

24 Apr 2018 - 2:05 pm | बिटाकाका

माफ करा खिलजी साहेब, अजिबात आवडली नाही कविता. मुळात अश्लील विनोदाला ओढूनताणून कवितेत बसवायची गरजच काय? तुमची कल्पनाशक्ती चांगलीय, पण हे काहीही आहे असे वाटते. फक्त फुल्या लाईनी टाकून अश्लील शब्द नाचवावेत असे तुम्हाला खरेच वाटते?

मार्मिक गोडसे's picture

24 Apr 2018 - 2:17 pm | मार्मिक गोडसे

सहमत

मिपावर 'मराठीत सकस' लेखन करण्याची संकल्पना आहे असे आम्हाला वाटत असे, सकस काही सुचत नाही तोवर गप बसावे हे आम्ही पाळत आलोय. पण हे असले थिल्लर प्रकार चालणार असतील तर आम्ही साक्षात कामदेव लाजेल असलं 'लिखाण'(?) करावं काय? लेखन करा टॅब आम्हालाही मिळालाय सभासदत्व घेतल्यावर!

मार्मिक गोडसे's picture

24 Apr 2018 - 3:36 pm | मार्मिक गोडसे

संमं ला नम्र विनंती कृपया ही कविता शिफारसमध्ये हलवावी, म्हणजे अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचेल,मिपाचे नाव रोशन करेल.