मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ

आजानुकर्ण ·

विकास Wed, 05/28/2008 - 22:28
मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. आपल्याला गेल्या शतकाच्या असे म्हणायचे आहे का? (हे भाषाशुद्धीसाठी सुचवले नाही बरकां! :-) )

In reply to by विकास

आजानुकर्ण Wed, 05/28/2008 - 22:30
मपलं न्हाई ह्ये. ( म्ह. इदं न मम. ;) ) पुस्तकप्रकाशन/लेखन १९९० व्या दशकात. त्यामुळे तुमची दुरुस्ती बरोबर. (स्पष्टीकरणोत्सुक!) आजानुकर्ण

मन Wed, 05/28/2008 - 22:38
ह्या लेखाचा. सही. पण एक नाही समजलं.भौगोलिक सलगता पाहिल्यास, तामिळ प्रांत कुठे महाराष्ट्राला लागुन आहे? मुख्यतः त्या काळात तरी, संस्कृती आणि भाषा ह्यांचं आदान-प्रदान व्हायचं ते सलग भु-भागातुन. त्ये "कानडाउ विट्टलु..." वगैरे ऐकुन होतो. म्हणजे मराठी-कन्नड नातं वगैरे.पण थेट तमिळ म्हंजे कमाल आहे बुवा. त्या काळात इतका संपर्क तरी कुठं होता एकमेकांशी? बरं मग संस्कृत्-मराठी-हिंदी ह्यांची एक्मेकांच्या अत्यंत जवळ जाणारी देवनागरी लिपी तरी कशी शिल्लक राहिली? मराठी लिहिताना त्या तामिळ लिपीचा वापर का होत नाही? (जर मराठी-तमिळ भाषा संबंध इतका दृढ असेल तर त्याच लिपीत मराठी लिहिणं जास्त नैसर्गिक्/सोयीचं राहील. नाही का?) (स्वगतः- तरिच म्हटलं, त्या चर्चेतुन हिरिरिनं बोलताना अचानक आ'कर्ण राव गायब कुठं झाले? ह्यांनी तर सरळ नवा लेखच टाकला की राव) आपलाच, मनोबा

चतुरंग Wed, 05/28/2008 - 23:27
ह्यातली जवळजवळ सगळीच मला नवीन होती. मराठी आणि तमिळ ह्या इतक्या मिळून मिसळून असतील असे माहीत नव्हते. ;) धन्यवाद आ.कर्णा! चतुरंग

अभिज्ञ Wed, 05/28/2008 - 23:51
आजानुकर्ण साहेब, मनोबांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या लेखाचा आवाका खरोखर खुप मोठा आहे. त्यावर काहि लिहावे एवढी आमची पात्रताही नाही.तरीहि काही मुलभुत प्रश्न मनात आले, त्याचे निराकरण आपण केल्यास उत्तम होइल. खैरे ह्यांनी मराठी-तमिळ संबंधांचा बराच अभ्यास केलेला दिसतोय.परंतु त्यांनी मांडलेले विचार हे एकांगी वाटतात.अहो गेल्या हजारो वर्षात तमिळ भाषेत काहीच फ़रक पडला नाही काय? मराठी भाषेचेच पहा ना. ज्ञानेश्वरीच्या काळातील मराठी व आत्ताची मराठी ह्यात केवढा फ़रक जाणवतो. खुद्द तमिळ भाषेत बरेच संस्क्रृत शब्द आढळ्तात.तमिळ भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे. अहो तमिळच कशाला, मराठी व बंगाली भाषेत सुध्दा तोंडात बोटे घालावीत (कोणीहि कोणाच्या) अशी साम्य स्थळे आहेत. उदा.सकाळ,वाटी,भातवाढी,डाव,पाडा,.......... पण माझ्या माहीति प्रमाणे हेच शब्द इतर भाषांत जसेच्या तसे वापरले जात नाहीत.(काहि प्रमाणात ओडिया,व आसामी भाषेत) किंबहुना,समस्त कोंकण पट्टय़ात बोलल्या जाणा-या भाषेत आणि मराठीत तसेच बंगालीत कमालीचे साम्य आढळते. ते हि कसे काय? असे बरेच प्रश्न आहेत.त्यामूळॆ काहि शब्दात साम्य आढळले म्हणुन तेच मराठी भाषेचे मुळ मानणे पटत नाही. थोडे सविस्तर लिहिल्यास उत्तम. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

आजानुकर्ण गुरुवार, 05/29/2008 - 07:39
भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे.
बहुधा संस्कृत भाषा ही इतकी यमनियमांनी बांधलेली आहे की तिला श्वास घेण्यापुरतीही जागा मिळाली नाही आणि शुद्धाशुद्धतेच्या कल्पनांपायी ती गुदमरून मृतप्राय झाली असे काही लोक म्हणतात ते खरे असावे! याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. आपला, (पिंडावरचा कावळा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर गुरुवार, 05/29/2008 - 08:09
याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. सहमत आहे... ;) तात्या.

विसोबा खेचर Wed, 05/28/2008 - 23:54
क्रुपया हे वाचावे! हे लेखन इथून उडवले जाण्याची शक्यता आहे, हे जाणूनच पुढील प्रतिसाद द्यावेत! भाषा, भाषा शुद्धी, व्याकरण, शुद्धलेखन, संस्कृत भाषेची सो कॉल्ड महती या विषयावर चर्चा करावयास माझे मित्र शशांक जोशी यांचे उपक्रम हे संस्थळ फार छान आहे! मिसळपाववर वरील विषय सहसा एन्करेज केले जात नाहीत याची नोंद घ्यावी..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण गुरुवार, 05/29/2008 - 07:24
हाती घ्याल ते तडीस न्या असे आमचे गुरूदेव म्हणतात. एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. आपला, (अवलंबनपर्णोद्गमसूत्रोत्सुक!) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर गुरुवार, 05/29/2008 - 08:09
एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. ठीक आहे! मिपावरील एक्स पंचायत समिती सदस्य हा आपला रुतबा ध्यानात घेऊन आम्ही तूर्तास काहीच बोलत नाही. चालू द्यात चर्चा..! परंतु या पुढे कृपया कुणीही भाषा, भाषेचा विकास, भाषेचं यांव, भाषेचं त्यांव, शुद्धलेखन, व्याकरण या विषयांवरील चर्चा मिपावर करून मिपाचं वातावरण घाण करू नये अशी सर्वांना हात जोडून, नम्र व कळकळीची विनंती! मिपा जसं आहे तसंच राहू द्या! त्याला विद्वान संकेतस्थळांच्या रांगेत नेऊन बसवायचा प्रयत्न करू नका एवढीच विनंती! :) तात्या.

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/29/2008 - 00:07
वरील उतार्‍याच्या संदर्भात एक लेख जालावर सापडला आहे. जो खैरे साहेबांच्या दाव्याच्या विरोधी आहे. http://groups.google.com/group/alt.language.hindi/browse_thread/thread/cfc7d78c964dd86b कदाचित वरील तामिळ शब्द महाराष्ट्री प्राकृतामधून दक्षिणेत गेले असण्याचा संभव आहे. कारण महाराष्ट्री पा़कृताबद्द्ल ख्रिस्तपूर्व ५व्या शतकापासून उल्लेख आढळतात. अधिक माहीती इथे वाचता येईल http://en.wikipedia.org/wiki/Maharashtri पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण गुरुवार, 05/29/2008 - 07:36
पुणेकर पेशवेसाहेब, खैरे साहेबांनी मराठी ही फक्त तमिळकडून आली असा कुठेही दावा केलेला नाही. मात्र शुद्धिकरणचळवळे लोक मराठीचा संबंध फक्त संस्कॄताशी जोडू इच्छितात आणि इतर भाषा अस्पृश्य असल्याप्रमाणे त्यांचा विटाळ मानला जातो. खैरे साहेबांच्या लेखात शास्त्रीय प्रयोग केल्यानंतर मराठी व तमिळचा संबंध कसा आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे. मात्र मराठीचा संबंध फक्त संस्कृताशी आहे अशीएकांगी भूमिका मांडणार्‍यांनी पुन्हा (शक्य असल्यास) विचार करावा यासाठीच तो प्रतिसाद. मराठी ही फक्त तमिळ किंवा फॉर दॅट मॅटर संस्कृताशीच संबंधित आहे व इतर (फारसी, अरबी, इंग्रजी, कन्नड) भाषांचा तिला विटाळ होतो असे मानू नये! अवांतरः जय महाराज या लेखकाचा 'आवाका' गुगल ग्रुप्सवर वावरणार्‍या अनेकांना माहिती आहे. केवळ भावनिक उद्दीपन करून इतरांच्या नावाखाली भूमिका मांडणे असा त्यांचा खाक्या केवळ ह्याच समुदायावर नसून. या व अशा इतर समुदायांवरही लोकप्रिय आहे. सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. मात्र त्यांनी दिलेले रामायणाचे पुरावे हास्यास्पद आहेत. हे लेखही वाचा यापेक्षा अधिक काय सांगू शकतो? दुवा १ दुवा २ दुवा ३ आपला, (गारदी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास गुरुवार, 05/29/2008 - 09:10
सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. http://www.gisdevelopment.net/application/archaeology/site/archs0001.htm http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/2073159.stm आणि हा विकीचा http://en.wikipedia.org/wiki/Sarasvati_River

In reply to by विकास

आजानुकर्ण गुरुवार, 05/29/2008 - 09:15
सरस्वती नदीचा पुरावा नको. ही नदी आणि भाषा यांचा संबंध जो सुब्रम्हण्यम यांना अपेक्षित आहे त्याबाबतचा पुरावा.

In reply to by आजानुकर्ण

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 10:19
हा लेख बराचसा एकतर्फी वाटला. संस्कृतावरं टिका करायची म्हणुन कहिहि... तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे.... (माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.) असो अधिक माहितिसाठी कदचीत हा दुवा उपयोगी पडेल http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_India#Classical_languages_of_India अजुन एक प्रश्न म.टा.मध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यापैकी बहुतेक बरेच शब्द नेहमीच वापरले जातात. जर एकदा नीट पहावे http://www.misalpav.com/node/1897 चुकभुल द्यावी घ्यावी (हे कुठल्या भाषेतुन आले बां? कायं करायचयं B) सुसंस्कृत चेतन

In reply to by चेतन

आजानुकर्ण गुरुवार, 05/29/2008 - 10:32
माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.)
तुम्हाला खैरे यांच्या तुलनेत बरीच माहिती दिसते (किती तरी पटींनी जास्त) . तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? आपला, (तौलनिक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 10:58
एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? तेलुगू-कन्नड या भाषांबद्दल आपण थोडं आधिक वाचावं आणी मगचं हे विचारावं http://en.wikipedia.org/wiki/Telugu_language माझ्यामते तुम्हाला ह्या दुव्याची देखिल गरज आहे http://en.wikipedia.org/wiki/Sanskrit अवांतरः तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. १५३४३६७ संस्कृत ५३४९ तमिळ २३८९ कन्नड १२३४ तेलगु हा अकबरासारखा प्रश्न झाला राजधानीत कावळे किती? ह. घ्या. स्वगतः भाषा हा शब्द कोठुन आला बरं?

In reply to by अमोल केळकर

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 12:24
जरा हा दुवा पहावा http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language#cite_note-bhasha-9 येथे एक वाक्य आहे Marathi has taken words from and given words to Sanskrit, Kannada, Hindi, Urdu, Arabic, Persian, and Portuguese. At least 50% of the words in Marathi are either taken or derived from Sansrit. हे आणखिन काही Literature in all Dravidian languages owes a great deal to Sanskrit, the magic wand whose touch raised each of the languages from a level of patois to that of a literary idiom". (Sastri 1955, p309) सर्वज्ञानी गूगल आणी en.wikipedia.org च्या सहाय्याने अज्ञानी चेतनमार्फत ज्ञानीलोकांकरिता अवांतरः ज्ञानेश्वर, अम्रुतानुभव हे शब्द कोठुन आले बरं? अतिअवांतरः महाराष्ट्र हा शब्द कोठुन आला बरं...? मी मराठीचं पण संस्कृत थोडफार कळणारा चेतन

In reply to by चेतन

आजानुकर्ण गुरुवार, 05/29/2008 - 13:05
संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही! मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठीला संस्कृतची झेरॉक्स कॉपी करायची असेल तर करा. मग मराठीही संस्कृताप्रमाणेच चोपड्यांमध्ये बंद राहील. सुदैवाने आमच्यासारखी सामान्य जनता अशा प्रयत्नांची खिल्ली उडवेल यात शंका नाही. सोबत हे देखील वाचा. आपला, (स्पष्टवक्ता) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 14:32
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे. भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे या लेखात मलातरी हा प्रकार थोडासा जाणवला. आपण दिलेला दुवा वाचनिय आहे पण इथे तुलना कोठेहि नाहि आणी ती होउ नये असे मला वाटते संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही हे म्हणुनसुद्धा लेखात तरी सुर नाकरण्याचाच दिसतोयं असो तुम्हि हे नाकारत नाही ह्यातच समाधान. मी तरी मराठीप्रमाणे संस्कृतलाही आपलीच मानतो त्यामुळे कदाचित माझा सुर कडवटही असेल. कडवट चेतन

In reply to by चेतन

कोलबेर गुरुवार, 05/29/2008 - 20:59
चेतनरावांनी आकडेवारी देऊन संस्कृतातुन किती शब्द आले आणि इतर भाषांमधून किती ह्याची तौलनिक माहिती देऊन अजानुकर्ण ह्यांच्या मुद्द्याचे खंडन केले आहे. श्री.अजानुकर्ण ह्यांनी त्याची कसलीही नोंद न घेता संस्कृत विरोधाचा सुर लावला आहे तो एकांगी वाटतो.
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे.
ह्या चेतनरावांच्या भुमिकेशी आम्ही देखिल सहमत आहोत. आंधळी भक्ती आणि विरोधासाठी विरोध हे दोन्हीही अयोग्य!

In reply to by कोलबेर

विकास गुरुवार, 05/29/2008 - 22:30
कोलबेर ने योग्य आणि थोडक्यात मांडले असल्याने "+१" व्यतिरीक्त अजून काही नाही!

In reply to by विकास

आजानुकर्ण Fri, 05/30/2008 - 07:32
कोलबेरशेठ आणि तुम्ही दोघांनीही मी दिलेला दुवा न वाचताच ही प्रतिक्रिया दिली आहे हे खेदाने म्हणावे लागत आहे. आपला, (सखेद) आजानुकर्ण

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण Fri, 05/30/2008 - 07:29
अहो संस्कृतविरोधाचा आणि एकांगी सूर कोणी लावला आहे येथे? चेतनरावांनी दिलेल्या आकडेवारीतील ह.घ्या. हे वाचले का? समजा चेतनरावांनी गंभीरपणे ती आकडेवारी दिली आहे असे मानू. मग मी दिलेल्या दुव्यावर दाते कर्वे यांच्या कोशानुसार मराठीतील एकूण शब्द 1,12,189 आहेत हे स्पष्ट लिहिले आहे. मग चेतनरावांनी दीड लाखाहून जास्त शब्द संस्कृतातून आलेत याचा पुरावा देणे आवश्यक नाही का? मी विरोधासाठी विरोध करत असल्याचा एकही पुरावा द्यावा मी सपशेल माफी मागण्यास तयार आहे! आपला, (सहसदस्य) आजानुकर्ण अवांतरः श्री. जनरलपंत डायर यांच्या वटहुकूमाची अंमलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र आमचे मित्र कोलबेर शेठ यांच्या प्रतिसादात 'आजानुकर्ण' या आमच्या नावाचा वैयक्तिक उल्लेख झाल्याने प्रतिसाद देत आहोत याची जनरलपंतांनी नोंद घ्यावी ही विनंती. आपला, (स्पष्ट) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 07:37
आता सर्वांनी हा विषय इथेच थांबवावा! काही चर्चा करायची असेल तर ती खरडवहीतून किंवा व्य नि तून करावी. अन्यथा हा संपूर्ण थ्रेडच अप्रकाशित करण्यात येईल.. तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2008 - 09:01
मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, आणि मराठी तामिळीचे भाषिक नातेसंबध एका माहितीपूर्ण लेखनात वाचायला मिळाले, आणि ते आवडले. अवांतर : मिसळपाव मराठी संकेतस्थळावर सर्व लेखन संवाद हे मराठी भाषेतून होत असतांना भाषिक लेखांना संस्थळाच्या मालकाचा विरोध होतो, ही गोष्ट मराठी भाषाप्रेमी म्हणुन दुखः देणारी वाटते. ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर गुरुवार, 05/29/2008 - 09:46
मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, हा हा हा! हे शब्द वाचूनच करमणूक झाली! :) नथ नाकानं साजिरवानी, गला भरून सोन्याचे मनी कोलीवार्‍याची मी गं रानी रात पुनवेला नाचून करतंय मौजा! काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) काय रे बाला, हिर्‍याच्या कुडाचे तुज्या कुल्ल्यावर पोकल बांबूचे फटके मारू का दोन? रांडच्या, हिकू का तुला?! :) काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) मराठी भाषा ही अठरापगड जातीजमातीत बोलली जात असताना आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे! :) आपला, (आग्र्या-कोळ्यात लहानाचा मोठा झालेला) दर्याचा राजा -तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर गुरुवार, 05/29/2008 - 09:59
तात्या शाळेत असताना तुमचा व्याकरणाचा मास्तर लैच मारकुटा होता का हो? नाही.. भाषाशास्त्र ह्याविषयी कुणीही काहीही बोलले की त्यामधुन 'शुदद्धलेखनाची सक्ती लादली जाते आहे' ह्या एकमेव निष्कर्षावर तुम्ही कायम येताना पाहुन मनात आलेली ही शंका वाढत जाते.

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर गुरुवार, 05/29/2008 - 10:09
हम्म! कोलबेरा, प्रत्यक्षात भेटू तेव्हा या विषयावर तुझ्याशी बोलीन सवडीने! अगदी नक्की...! :) तूर्तास, गोमू संगतीनं माज्या तू येशील काय आरं संगतीनं तुज्या मी येनार नाय ह्या ओळी भाषेच्या आणि भाषाशास्त्राच्या दृष्टीनं चूक की अचूक, ह्या विचारात मी अडकलो आहे आणि बाप खपल्यासारखा चेहेरा करून त्यावर गहन विचार करतो आहे! तेव्हा, प्लीज डोन्ट डिष्टर्ब मी! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2008 - 16:27
आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे सोकॊल्ड, भाषा शुद्धीचे आग्रही, शुद्धलेखनाचे पुरस्कर्ते, बोजड भाषेचे महागुरु, संस्कृतप्रेमी, फुगीर सुशिक्षित, म्हणजे आम्ही की काय ? च्यायला आमची प्रतिमा इतकी कशी उंचावली !!! ;) आपल्याप्रमाणेच, अठरापगड जातीजमातीची बोलल्या जाणारी बोली ही आमची जीव का प्राण आहे, आम्ही त्यावर नुसते प्रेम करत नाही तर, रहाटगाड्यात ती भाषा लिहितो, बोलतो आणि जगतोही !!! :) -दिलीप बिरुटे (बोली भाषा लेखनात वापरणारा )

विजुभाऊ गुरुवार, 05/29/2008 - 13:14
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. यातच काय ते समजावे. सामान्यांच्या या भाषेला पुन्हा एकदा उच्चेतरांची भाषा बनवण्याचा घाट कशासाठी घालत आहोत? हा पुन्हा द्रावीडी प्राणायामाचा हट्ट कशासाठी.

In reply to by विजुभाऊ

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 15:03
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. आता ज्ञानेश्वरीतली बोली भाषा ही कळत नाही म्हणुन आपण त्याचाही अनुवाद करुन वर बोलीला शब्दबंबाळ म्हणणार का? (आपल्याच शब्दात उच्चेतरांची भाषा वगैरे वगैरे ठरवणार का?) संस्कृतला खाली दाखवण्याचा हा अट्टाहास कशापायी? कडवट चेतन अवांतरः अनेक उत्तम साहित्याचे मराठित अनुवाद झाले आहेत म्हणुन मुळ भाषेला नावे ठेवावी का? संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन (ह. घ्या.)

In reply to by चेतन

विजुभाऊ गुरुवार, 05/29/2008 - 15:19
संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन
चेतन भौ म्या संथ न्हाय पन ज्ञानेश्वरी लिव्हुन बी काही शतके उलटली. ती बोली बी आता मागं र्‍हायली. म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण. जिवंत भाषा जिवंत नदी सारखी असते. ती वाहती रहायला तिला छोट्या नद्या/ ओढे/ प्रसंगी नालेही मिळतात. कल्पना करा उद्या गंगा किंवा कृष्ण नदीच्या सर्व उपनद्या शुद्धीच्या नावाखाली अडवल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल. उगमाजवळ असेल तेवढेच राहील. उरल समुद्राबाबतीत असे झाले आणि आता उरल समुद्र आटुन त्याचे आस्तित्व एक मोठे डबके म्हणुन राहीले आहे

limbutimbu गुरुवार, 05/29/2008 - 15:06
सन्स्कृत राहुदे बाजुला, ज्ञानेश्वरी तरी नीट समजते का आपल्याला? (आणि मुळात कितीक जण वाचतात्/वाचणारेत?) इकडे पुढच्या पिढ्या इन्ग्रजी माध्यमातून शिकवुन "देशी इन्ग्रज" तयार करण्याचे कारखाने सुरू असताना स्वातन्त्रवीरान्नी भाषा शुद्धीबाबत जे केल ते योग्य की अयोग्य हा वाद आता हवाचे कशाला? कोण बोलणार लिहिणार वाचणार तुमची ती दरिद्री दळभद्री मराठी जिच्यात म्हणे ज्ञानाचे काहीही कण नाहीत म्हणुन तर इन्ग्रजी माध्यमातून लहानग्यान्ना शिक्षाण देतात ना हल्ली? अन जन्तेच्या पुढल्या पिढ्या जर मराठी शिकणारच नसतील तर हवित कशाला म्हणतो मी ही थेर? त्यापेक्षा एमटीव्ही बघा, ऐश करा! :D (जे खानदानी(?), उच्चवर्णीय(?), मराठीप्रेमी असतील ते टिकवतीलच मराठी, ती ही शुद्ध स्वरुपात! नाहीतर शेवटी "पुणे" आहेच!:D ) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

प्रियाली गुरुवार, 05/29/2008 - 15:20
अजानुचा लेख चांगला आहे, बरीच नवी माहिती मिळाली. मराठी भाषा ही जशी फक्त संस्कृतापासून बनली नाही तशी ती फक्त तमिळपासूनही बनलेली नाही. (तसे अजानुने लिहिल्याचा दावाही नाही) संस्कृती आणि भाषा यांच्यात कालानुसार होत जाणारी सरमिसळ जुनी आहे. उद्वेग तेव्हा येतो जेव्हा संस्कृत आम्हाला आवडते (हे म्हणणार्‍या लोकांना संस्कृतात चार वाक्ये लिहिता येतात का देवजाणे! उगीच इथून तिथून पाठ केलेले श्लोक देणे म्हणजे आपल्याला संस्कृत येते अशी काहीजणांची समजूत असावी) म्हणून आम्ही संस्कृतातले शब्द प्रतिशब्द म्हणून घेणार हा पोरकटपणा वाटतो. संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. संस्कृतात सर्व काही आहे हा आणखी एक पोरकट ग्रह लोकांनी काहीही माहित नसताना करून ठेवलेला असतो. जी भाषा एका विशिष्ट गटाच्या बाहेर पडलीच नाही, जिच्यात काळानुसार फारसा (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) बदल झाला नाही तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. असाच एक ग्रह की संस्कृतात सर्व उच्चार आहेत. संस्कृत बोलल्याने वाणी शुद्ध होते. यावर अनेक स्थळांवर झालेल्या चर्चांमध्ये हा दावा किती फोल आहे यावर चर्चा झाली आहेच. मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. मराठीत संस्कृतातील बरेचसे शब्द रूळल्याने बरेचदा अभियांत्रिकी (अभिवादन, अभिमान, अभिनंदन हे शब्द मराठीत आधीच आहेत) आणि यंत्र हा शब्दही मराठीत रूळलेला आहे तेव्हा अभियांत्रिकी हा शब्द मराठी प्रतिशब्द नसून संस्कृत प्रतिशब्द ठरतो आणि "म्हणजे काय आहेत का तुमच्याकडे पर्याय संस्कृताशिवाय?" असे पोरकट प्रश्न विचारले जातात. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? कारण ते उत्तर पोरासोराला आले असते की अभियांत्रिकी= इंजिनिअरींग पण भाषा पोरासोरांना येऊ नये हीच या मंडळींची इच्छा असते का काय कोणास ठाऊक. हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून का द्यावेत तर कोणीतरी उठून भाषाशुद्धीचं खूळ निर्माण करतो. रूळलेल्या शब्दांची भाषाशुद्धी आणि भाषेत येणार्‍या नव्या शब्दाला प्रतिशब्द शोधणे यातला फरक काही श्रेष्ठींना जाणवला नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. असो.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर गुरुवार, 05/29/2008 - 15:53
असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हा हा हा! :) तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. अगदी १०० टक्के सहमत आहे.. ! :) आपला, (प्रियालीचा मित्र) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आंबोळी गुरुवार, 05/29/2008 - 17:16
संस्कृतचा आग्रह धरणारे जे कोण पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक आहेत त्यापैकी कुणीही हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून द्या आणि संस्कृतोत्भवच शब्द घ्या असा आग्रह धरल्याचे मिसळपाववरील तिनही चर्चेत दिसला नाही. (असल्यास ते मुर्ख आहेत असे माझे वैयक्तीक मत आहे.). जर दुसर्‍याकुठल्या संस्थळावर असा अग्रह त्यानी धरला असेल तर ती धुणी मिसळपाववर का धुतली जात आहेत? संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हे कस बरोब्बर बोललात प्रियालीताई.... अहो एकदा भाषा वाहत्या नदीसारखी म्हटली की जड धोंडे अपोआपच तळाला जाणार. चांगले आसेल ते तुकारामाच्या गाथेप्रमाणे आपोआप वरती येइल त्यासाठी मुद्दामहून कष्ट घ्यायची सुध्धा गरज पडणार नाही. त्यामुळे ज्याना कोणाला असले जड शब्द वापरायचेत त्याना वापरुदे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाकीचे पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतील. अवांतर : मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. कुठल्या चित्रपटात त्या मराठी माणसाची वाणी संस्कृतमुळे शुध्ध होती तरी त्याचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे दाखवले आहे. असली उदाहरणे देउन संस्कृतमुळे मराठी लोकांचे हिंदी-इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे म्हणायचे आहे का तुम्हाला? यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.

In reply to by आंबोळी

प्रियाली गुरुवार, 05/29/2008 - 17:48
दिनांक (तारीख) मूल्य (किंमत) उपस्थित (हजर) वेतन (पगार) निर्बंध (कायदा) झरणी(फाउंटनपेन) मी केवळ काही वेगळी उदाहरणे दिली, मूळ उदाहरणे मटात आणि मिपावर आली आहेतच. माझ्या उदाहरणात वरील उदाहरणेही टाका कारण मी दिलेली उदाहरणे आणि वरील उदाहरणे ही मराठीतील प्रचलीत शब्द आहेत. तेव्हा ज्यांना मूर्ख म्हणालात :SS त्यांचे प्रेमी धावत येतीलच असे मानू. =)) (खरे म्हणजे नाही येणार कारण त्यांना आपला फोलपणा कळला आहे तेव्हा ते सध्या इकडची वाक्ये तिकडच्यांच्या नावावर खपवायच्या मागे आहेत.) आणि हो! मूळ लेख मटावरचा ना मग ती धुणी चालतात का भौ तुम्हाला की इथे तुमच्या मर्जीची धुणी धुवावी लागतात?
यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.
अजिबात नाही. हास्यास्पद दावे जसे की संस्कृताची भरणा केल्याने आमची वाणी शुद्ध होते असे दावे करणार्‍यांवर ती टिप्पणी आहे, अर्थात ते तुम्हाला मानवेल असे वाटत नाही. उलट जेव्हा आपली नाणी खोटी ठरू लागतात तेव्हा मग इतरांवर संस्कृत द्वेष्टे असल्याचे, भट-बामनांना बोलणी लावल्याचे दावे केले जातात.

In reply to by प्रियाली

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 16:58
गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. हाच प्रश्न तुम्हाला... संस्कृतची ऍलर्जी का? गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का? म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच. हे मात्र खरे... असो चुकभुल दयावीघ्यावी सावरकर आणि संस्कृतप्रेमी मराठी चेतन

In reply to by चेतन

प्रियाली गुरुवार, 05/29/2008 - 17:11
हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे. मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. संस्कृताचा मराठीवर प्रभाव कोणी नाकारत नाही.
संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का?
हाहाहाहा!!!! नाही याला मी हास्यास्पद विधान म्हणते, माझा प्रतिसाद नीट वाचला असता तर कळले असते. हल्ली सुसंस्कृतांची भाषा इंग्रजी. संस्कृताचा काही संबंध नाही. म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले.
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की
भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे
. ती खरी मराठी नाहीच.
हे वाक्य माझे नाही. मी असे काही सांगणारे भाष्यही केलेले नाही. संस्कृतही ब्राह्मणांनी आपल्यापुरती मर्यादीत ठेवली होती असे काहीसे म्हटले आहे. तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे!

In reply to by प्रियाली

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 18:07
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे १००%खरं फक्त कोणाबाबतं...... (क्षमस्व) म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले मला वाटतं इंजिनिअरींगला अभियांत्रिकी हा प्रतिशब्द दिला होता.... त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे ती खरी मराठी नाहीच. हे वाक्य माझे नाही. हे मलाही माहीते तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे! तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?) असो राग नसावा... क्षमोत्सुक चेतन (दुसरा शब्द आठवला नाही)

In reply to by प्रियाली

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 18:32
हा "अभिज्ञ " यांचा शेवटचा प्रतिसाद फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- सिप्पस्तथ्य स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हे शब्द दिल्या बद्दल श्री मनोबा व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना धन्यवाद. हे शब्द "कर्णाला" (कानाला) अवघड वाटतायत की अभियांत्रिकी अवघड वाटतोय? =)) धन्यवाद क्षमाशील प्रियाली ताई हे थोडेसे कुठुन तरी forward आलेले लढत मूर्ख कोठेही 'खुट्ट' काही | संताप यास येई | आंदोलनास जाई | तो लढत मूर्ख | पिळत मूर्ख तोंडी भिजे न तीळ | मारे अफाट पीळ | ऐकून 'दातखीळ' | तो पिळत मूर्ख| मूर्ख चावट (विशेषण चिकटवलेला) चेतन

In reply to by चेतन

प्रियाली Fri, 05/30/2008 - 03:46
आपल्याला कारण नसताना मूर्ख म्हटल्याबद्दल क्षमस्व! परंतु, मी न लिहिलेले शब्द दुसर्‍यांच्या प्रतिसादातून उचलून मला चिकटवण्याचा प्रकार पसंत नाही.
तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?)
याला मी हो असे उत्तर देईन परंतु तुम्हाला पटावा असा अट्टहास नाही.

In reply to by प्रियाली

विकास गुरुवार, 05/29/2008 - 20:32
मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. हे मी सतत वाचतोय तुमच्याकडून अजानूकर्णाकडून म्हणून हा प्रश्नः कृपया "फक्त संस्कृत" वापरा असे नक्की या चर्चांमधे कोण म्हणाले? संदर्भ मिळाले तर बरे वाटेल. वास्तवीक चर्चा सावरकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त चालली होती. त्यात त्यांनी तयार केलेले प्रतिशब्द लिहीले. त्या माझ्या लिहीण्यात मी काही संस्क्रूतचा उल्लेख देखील केला नव्हता. (त्यांच्या हिंदूत्व आणि क्रांतिकार्याबद्दल बरेच बोलले जाते त्यामानाने भाषाशुद्धीबद्दल कमी बोलले जाते. म.टा. मधील या बातमीत सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे ती स्वातंत्र्यवीरांना नम्र अभिवादन करत येथे देत आहे) त्यांनी संस्कृत लिहीले त्यांना तसे वाटले, त्यांना सुचले आणि तुम्हि वापरत असा अथवा नसा पण एक झरणीचा अपवाद सोडल्यास दिनांक, मूल्य, उपस्थित, वेतन, निर्बंध, हे शब्द आजही वापरात आहेत आणि मला नाही वाटत ते कोणी संस्कॄतच्या अभिमानाने वापरतात. पण मूळ विषय बाजूला जाऊन "मराठीचे अतोनात नुकसान झाले असे म्हणले गेले.." पुढे जेंव्हा "संस्कृत मधले शब्द असले तर काय बिघडले" असे काही जण म्हणायला लागले. तेंव्हा, त्यात नको इतका ओंकार नी म्हणल्याप्रमाणे हा विषय चघळायला सुरवात झाली आणि जणू काही हे सर्वजण फाक्त संस्कृतचेच शब्द वापरा असे म्हणतात अशी हवा केली गेली. त्यात परत "बहूजन समाज" वगैरे शब्द आणायचे. त्यातून नकळत जातीय चष्मे तयार होतात आणि ते चालू शकतात... असो. माझ्या पुरते बोलाल तर मी काही फक्त संस्कॄत असा कधी आग्रह धरलेला नाही पण त्याचा अथवा इतर भाषेतून मराठीत रूळलेल्या शब्दांना पण विरोध केलेला नाही. माझा विरोध असेलच तर कुठल्याही पद्धतीने जातीचे चष्मे वापरण्याला आहे. आपल्या देशाचा त्यामुळे आत्तापर्यंत झालेला विचका आपण पाहून त्यावरून या काळात पण काही शिकणार नसलो तर आपल्याला भारत म्हणून आणि जगात कुठेही असलात तरी भारतीय म्हणून काही भविष्य नाही. मुकी बिचारी कुणीही हाका अशी मेंढरेच आपण बनणार कधी राजकीय दास्याने तर कधी वैचारीक....म्हणून अस्ल्या चष्म्यांचा मला तिरस्कार येतो. नळाच्या पाण्यावर भांडल्यासारख्या या चर्चा चालू आहेत असे वाटायला लागले आहे. हे सांगण्याचे कारण इतकेच की हा सर्व गहजब (कुठल्या भाषेतला शब्द?) मी चालू केलेल्या लेखातून चालू झाला. माझ्या पुरता हा विषय मी बंद करतो.

In reply to by प्रियाली

विकास गुरुवार, 05/29/2008 - 20:51
प्रश्न विचारून विषय बंद करताय यातच सगळं आलं. ह्यात पण आपण उत्तर दिले नाहीत यात पण सगळ आले का? :-( मी वाद घालण्यासाठी विषय बंद केला आहे. उत्तर मिळाले तर त्याला उत्तर देईन. अजून ही उत्तराची वाट बघत आहे.

In reply to by चेतन

विसोबा खेचर गुरुवार, 05/29/2008 - 17:31
संस्कृतची ऍलर्जी का? कारण ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे. शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! :)

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली गुरुवार, 05/29/2008 - 17:37
त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात
मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे. :))

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर गुरुवार, 05/29/2008 - 18:13
मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे. अजून मिपावर आणिबाणी सुरू आहे त्यामुळे ह्या संदर्भात लवकरच एक वटहुकूम जारी केला जाईल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ऋषिकेश गुरुवार, 05/29/2008 - 18:17
हे ऐकुन आता कसं मोकळं मोकळं वाटतय :) वाट पाहतोय तात्या! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by विसोबा खेचर

मन गुरुवार, 05/29/2008 - 18:04
.... शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! १००% सहमत. अहो ते लोक (समोरच्याला संस्कृत फारसे समजत नाही ह्याची खात्री झाली की )तसले उच्चार ऐकवुन समोरच्याला घाबरवुन टाकतात. आपलेच, असल्या विद्वानांना टरकलेले जन सामान्यांचे मन.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर गुरुवार, 05/29/2008 - 21:07
किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे!
ह्यातुन तुम्हाला त्या *** लोकांची ऍलर्जी पाहिजे संस्कृतची कशाला? संस्कृतच्या ऍलर्जीसाठी ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे इतके पुरेसे आहे. शाणपट्टी करणार्‍या लोकांची लोकांची जगात ददात नाही पण म्हणून कशाकशाची ऍलर्जी लावून घेणार?

In reply to by प्रियाली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2008 - 17:59
अट्टाहास, आग्रह आणि संस्कृतप्रेम..........सुरेख प्रतिसाद !!! (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) खल्लास !!! :)

विजुभाऊ गुरुवार, 05/29/2008 - 15:31
बायको सोडुन द्यायची? ते किमान या जन्मी तरी शक्य नाही. तिच्या बरोबर सात जन्माची नातीचरामी अशी शपथ घेतली आहे (बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या :) ) )

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2008 - 16:07
बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या ) काय वाट्टेल ते काय विजुभाऊ? गेला जन्म सातवा होता. हा बोनस जन्म आहे. (सात जन्म बायकोशी नीट वागल्या बद्दल.)

मुक्तसुनीत गुरुवार, 05/29/2008 - 15:53
एक चांगला गोषवारा दिल्याबद्दल अजानुकर्णाचे अनेक आभार. एक सामान्य मराठी भाषिक , वाचक नि नागरिक म्हणून मला असे दिसते की, कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत लागू होणारे "अति सर्वत्र वर्जयेत्" हे सूत्र भाषेच्या बाबतीतही लागू पडतेच. भाषाशुद्धीकरणाच्या नावाखाली बोजड संस्कृत शब्द माथी मारणे हे जसे चुकीचे , तसेच ऊर्दु, फारसी, इंग्रजी, या पैकी कुठल्याही भाषेची शिरजोरी/प्राबल्य होऊ देणेही चुकीचेच. शेवटी भाषेच्या शुद्धीचा प्रश्न दुय्यम ठरतो. महत्त्वाचा प्रश्न हा की लोकशाही व्यवस्थेमधला जो महत्त्वाचा घटक - सामान्य जनता - त्यांना डोळ्यासमोर ठेवून भाषेची धोरणे अमलात यायला हवीत. गावाकडचा शेतकरी , इतर व्यावसायिक या लोकांना सरकारी कागदपत्रे भरायची असतील , शरी असो की ग्रामीण , अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. बस्स. मग त्यात ऊर्दु, फारसी, इंग्रजी, संस्कृत या भाषेतले शब्द येवोत - न येवोत. एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच.

In reply to by मुक्तसुनीत

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2008 - 16:18
ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. ....एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच. .... आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल? म्हणजे शासकिय वेगळी आणि अशासकिय वेगळी अशा दोन मराठी भाषा प्रत्येकाला आल्या पाहिजेत. शाळे पासूनच सर्वांना 'खेडवळ' भाषा शिकवावी. त्यात पुन्हा, कोकणातील खेडं वेगळं, विदर्भातील खेडं वेगळं आणि देशावरील खेडं वेगळं. कोळ्या-आगर्‍यांची मराठी वेगळी, बाल्यांची मराठी वेगळी, वसईच्या ख्रिश्चनांची मराठी वेगळी. शाळेपासून ह्या सर्व मराठी भाषा प्रत्येकाने शिकल्या पाहीजेत. त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.

In reply to by प्रभाकर पेठकर

limbutimbu गुरुवार, 05/29/2008 - 16:31
ह ह पु वा झाली प्रभाकरपन्त! अचूक निशाणा! >>>>> त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे ग्यानबाची खरी मेख तिथच हे प्रभाकरपन्त! भाषा (शुद्ध वा अशुद्ध) हे केवळ निमित्त! आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

In reply to by प्रभाकर पेठकर

विकेड बनी गुरुवार, 05/29/2008 - 16:36
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.
जळतंय पण वळत नाही!!! =))

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्तसुनीत गुरुवार, 05/29/2008 - 18:09
आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल? मिसळपाववर लिहीलेले प्रत्येक वाक्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक खेडुताला समजावे असा तुमचा इशारा दिसतोय. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो .

In reply to by मुक्तसुनीत

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2008 - 23:27
अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. ह्या तुमच्याच मागणीनुसार सरकारी (शासकिय की शासकीय?) आणि मिपावरील भाषा वेगवेगळी असावी असे सूचित केले आहे. मला व्यक्तिशः मराठी भाषेत आजपर्यंत रुळलेल्या इतरभाषांतील शब्दांबद्दलही तिव्र आक्षेप नाही आणि संस्कृतातून आलेल्या शब्दाबद्दलही आक्षेप नाही. माझ्याकडून जमेल तेंव्हा जमेल तितके (मला समजणारे)शुद्ध मी लिहीतो/बोलतो. कधी 'मूड' नसला तर इतर भाषिक शब्दही वापरतो. पण तो माझा भाषिक स्वभाव नाही. हे म्हणजे रोज घरी 'सात्विक' जेवण जेवल्यावर कधी कधी कंटाळा येऊन बाहेर हॉटेलातील 'तामसी' जेवणही जेवतो. पण रोजच्या जीवनात 'सात्विक'तेचा आग्रह धरतो, पुरस्कार करतो. ही सर्व चर्चा मला तरी रुचली नाही. मुद्यांना मुद्यांनी उत्तरे देण्यापेक्षा चर्चा वैयक्तिक पातळीवर भरकटली. संबंधितांनी तशी भरकटवू दिली ह्याचे दु:ख आहे. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो . माझे मराठी १००% शुद्ध आहे असा मी दावा कधीच केलेला नाही. मिपावर 'शुद्धते'चा बाऊ केला जात नाही, शुद्धीचिकित्सक मला सापडला नाही, त्यामुळे र्‍हस्व-दीर्घच्या चुका जशा माझ्या होतात तशा इतरांच्याही होतातच. पण त्यालाही मी आक्षेप घेतलेला नाही. ह्म्म! कोणी मुद्दामहून चुकीचे मराठी लिहून वाचकांच्या वेळेचा अपव्यय करीत असेल तर त्याला जरूर आक्षेप घेतला आहे. मिपावर शुद्धिचिकित्सक सुरू केला तर तो मी आनंदाने आवर्जून वापरेन. माझे लेखन र्‍हर्स्व-दीर्ध चुकांविरहीत असेल तर मला स्वतःलाच वाचायला आवडेल. स्वान्तसुखाय म्हणतात तसे. मुद्दाम जड-जड संस्कृत शब्द जोडून मराठीला पर्यायी शब्द बनविणारे एक गंमत म्हणून असे शब्द बनवित असतात. सर्वांनी ते वापरावेच असा आग्रह नसतो. जे संस्कृतोद्भव मराठी शब्द आहेत ते समजायला, वापरायला कठीण असतील तर कोणी कितीही जंग जंग पछाडले तरीही ते शब्द वापरात येणार नाहीत. 'शासकीय' भाषेत कॉरिडरला 'छन्न विभाग' असा शब्द आहे. 'लिफ्ट' ला 'उद्वाहक' असा शब्द आहे. कोण वापरतो? पण 'वेतन' हा समजायला, वापरायला सोपा शब्द असेल तर तो फक्त संस्कृतोद्भव शब्द आहे (अस मी वरील चर्चेतून अर्थ काढला आहे) म्हणून वापरायचा नाही का? माझ्या माहिती नुसार, 'पगार' हा शब्द 'आश्रीताला खर्चासाठी दिलेली रक्कम' अशा अर्थी आहे. आपण नोकर्‍या करून वेतन मिळवितो त्याला 'पगार' म्हणून स्वतःला आश्रीत घोषित करायचे का? आपण आश्रीत असतो का? त्या पेक्षा 'वेतन' शब्दात सन्मानही आहे. असो. भाषा विषयावर माझा अभ्यास तरी बराच उथळ आहे. त्यांमुळे भाषा शास्त्रातले मोठमोठ्या संशोधकांचे दाखले मी देऊ शकत नाही. ह्याहून जास्त वाद मी घालू शकणार नाही, माझी इच्छाही नाही. लाथाळ्यांपेक्षा चांगले विचार, चांगले साहित्य वाचायला मिळावे म्हणून मी मिपावर येतो. असेच चालणार असेल तर मिपा उघडून बसण्यापेक्षा दुसरे कांही महत्त्वाचे काम करणे मी पसंद करीन. धन्यवाद.

ऋषिकेश गुरुवार, 05/29/2008 - 17:38
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच
:P हा हा हा हा :))) =)) -('मिसळ'लेला भट बामन) ऋषिकेश

भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे. मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले :) म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते.

(नको)

चतुरंग ·

विसोबा खेचर गुरुवार, 05/29/2008 - 23:17
निरख मला, गिळू नको सोडा ओत! पाणी नको वा! विडंबन छान आहे! :) अवांतर : जयन्ता५२ हे आमचे एकेकाळचे मनोगती मित्र. ते मिपावरही सभासद आहेत पण जयन्ता५२ या नावाने ते इथे प्रकट होत नाहीत! बिचार्‍या आमच्या जयन्तरावांच्या श्रद्धा मालकांच्या पायावर वाहिलेल्या असल्यामुळे मालकांना कळेल की काय या भितीने जयन्ता५२ य नावाने इथेही वावरायची त्यांची हिंमत होत नाही! :) तात्या.

पिवळा डांबिस Fri, 05/30/2008 - 00:14
निरख मला, गिळू नको सोडा ओत! पाणी नको गात्रात शिरशिरी येता चषक असा टाळू नको बाकी, "ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या.........." :)

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जयन्ता५२ ह्यांचे 'नको' वाचून आमच्या मनात नकोनकोते विचार तरळून गेले! ;) निरख मला, गिळू नको सोडा ओत! पाणी नको गात्रात शिरशिरी येता चषक असा टाळू नको घेतोस का शपथा अशा? टाळून मला पळू नको! अशक्य नाहीच, पण 'ऑन द रॉक्स' घेऊ नको चेतविले आहेस मला जिवा त्या का जाळू नको? -------------------------------- चतुरंग

नियमांस धरून... (२)

श्रावण मोडक ·

प्रभाकर पेठकर Wed, 05/28/2008 - 21:39
क्लिष्ट राजकारण आहे. विषयाच व्याप बराच मोठा आहे. पण दोन भागांत थोडक्यात आटोपला आहे. राजकिय भाषा, शासकिय भाषा, शासकिय कार्यपद्धती आणि नोकरशाहीतील 'जीवघेणी' दिरंगाई ह्याने अंगावर काटा येतो. ह्यालाच मुत्सदेगिरी म्हणतात का? तसे असेल तर, आग लागो अशा मुत्सदेगिरीला. त्याच बरोबर भारतासारख्या भरमसाठ लोकवस्तीच्या देशात असे अनेक नामवंत, अस्सल 'गरजू' असतील त्या सर्वांनाच कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवून देणे शक्य असेल का? असाही प्रश्न मनात उभा ठाकतो. म्हणूनच कदाचित सरकारला 'शासन' असा समर्पक प्रतिशब्द असावा. लेखन सुंदर आहे. विषयाला व्यवस्थित बांधले आहे. अभिनंदन.

यशोधरा Wed, 05/28/2008 - 21:54
आवडलं अतिशय. सुरेखच जमलंय हे लिखाण. शासकीय नोकरशाही आणि दिरंगाई यांचे नातेच आहे बहुतेक!!

सुमीत गुरुवार, 05/29/2008 - 11:00
श्रावण काका, धरण विस्थापितांच्या समस्येला तुमच्या लेखनीने हात घालून तुम्ही त्यांचे विश्व प्रभावी पणे मांडले होते. आणि आता ही कथा तुमच्यातल्या प्रतिभेला वेगळ्या उंची वर घेऊन गेली आहे. कथे तले भाष्य, पात्रे, त्यांच्या वागण्याची तर्‍हा अगदी आस पास घडते असेच वाटते, थोड्क्यात लेखनीतून जिंवत पणा तुम्ही यशस्वी पणे मांडला आहे.

स्वाती दिनेश गुरुवार, 05/29/2008 - 13:12
राजकारणाची गोष्ट अतिशय प्रभावीपणे आणि विषयाचा पसारा मोठा असूनही दोन भागात नीटसपणे बांधली आहे. कथा आवडली, स्वाती

सन्जोप राव गुरुवार, 05/29/2008 - 22:20
हे असे तंतोतंत कुणाच्या तरी बाबतीत झाल्याचे आठवते आहे. दळवी? कथा जबरदस्त आहे. पात्रांच्या तोंडचे इंग्रजी संवाद तसेच ठेवल्याबद्दल - त्यांचे ओढूनताणून मराठीकरण करण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल विशेष अभिनंदन. सन्जोप राव

बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 05/29/2008 - 23:25
सुंदर कथा. तिमचे पूर्वीचे लेखही वाचले होते. छान लिहिता. भाषा सहज वाटली आणि म्हणूनच वाचताना मजा आली. बिपिन.

विसुनाना Sat, 05/31/2008 - 12:12
'दात असणे' या वाक्प्रचाराचे उत्कृष्ट उदाहरण. कथानक व्यवहारातले. आवडले. तांत्रिक बाबीतही अत्यंत सरस कथा.

In reply to by प्रशांतकवळे

राजे Sun, 06/01/2008 - 13:26
खुप सुंदर! अवघड विषय, सहजतेने मांडलात हेच म्हणतो ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by श्रावण मोडक

भडकमकर मास्तर Mon, 06/02/2008 - 17:44
छान कथा... १.परदेशी संस्थेत परदेशी चलनातून पगार आणि पेन्शन... २. डायलिसिस... ३. नाटककार , कादंबरीकार ...दळवीच वाटताहेत.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लेखनप्रकार
3

गोपाला मेरी करूना...

विसोबा खेचर ·

धोंडोपंत Wed, 05/28/2008 - 18:58
अप्रतिम तात्या, फार सुंदर लेख झालाय. आम्हाला गाण्यातलं फारसं कळत नाही पण पं. फिरोज दस्तूर हे फार मोठे गायक होते असे ऐकून आहोत. ते किती महान माणूस होते हे तुमचा लेख वाचून कळलं. पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख. आपला, (भारावलेला) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

ऍडीजोशी Wed, 05/28/2008 - 19:11
तुमच्यामुळे आमचीही अशा देवतुल्य माणसाशी ओळख झाली तात्या. मनापासून आभारी आहे. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

चतुरंग Wed, 05/28/2008 - 19:21
मुलाची शिकवणी होईस्तोवर त्या माऊलीने सवाईंच्या चपला स्वच्छ धुऊन, तव्यावर वाळवून कोरड्या करून ठेवल्या होत्या!! क्या बात है! काय गुरुभक्ती ही!! ही माणसे आतून बाहेरुन सोन्यासारखी तावून सुलाखून निघालेली होती की त्यांना बाहेरच्या कोणत्या दागिन्यांची गरज पडली नाही हेच खरं. (दस्तूर बुवांची एखादी ध्वनिफीत असेल तर दुवा देऊ शकाल का तात्या?) चतुरंग

In reply to by चतुरंग

प्राजु गुरुवार, 05/29/2008 - 10:56
क्या बात है! काय गुरुभक्ती ही!! ही माणसे आतून बाहेरुन सोन्यासारखी तावून सुलाखून निघालेली होती की त्यांना बाहेरच्या कोणत्या दागिन्यांची गरज पडली नाही हेच खरं. तात्या, एका अतिशय प्रतिभावान , प्रेमळ कलाकाराची ओळख करून दिलीत. आम्हाला हि ओळख त्यांच्या जाण्यानंतर व्हावी यासारख दुर्दैव नाही. असो. लेख अतिशय छान उतरला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्रियाली Wed, 05/28/2008 - 19:31
वाह! लेख अप्रतिम उतरला आहे. आठवण फारच हृद्य आहे, आवडली. व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही अवांतरः
दस्तुरसाहेब, विडी चांगली नाही बरं प्रकृतीला! जास्त ओढायची नाही!"
काय फेकताय? हे तुम्ही सांगितलंत? आतापर्यंत मला वाटायचं की तुमची व्यक्तिचित्रे सेंट्-परसेंट सत्याधारित असतात. आता शंका वाटते. ;) ह. घ्या.

सुमीत Wed, 05/28/2008 - 19:53
दस्तूर साहेबांची आठवण तुमच्या लेखनी तून वाचायला मिळाली, फार आवडले तुमचे च्यक्ती चित्रण. प्रियाली ताई लिहिते तिच्या प्रतिसादात, व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही अजून मी काय सांगणार. तात्या भक्त (मिसळ प्रेमी) सुमीत

मन Wed, 05/28/2008 - 19:59
व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही आणखी काय म्हणणार. खरच, मस्त जमलाय लेख्.अगदि समोर घडणारी गोष्ट सांगितल्यासारखं वाटतयं. आपलाच, मनोबा

प्रभाकर पेठकर Wed, 05/28/2008 - 21:10
शास्त्रीय संगिताच्या वार्‍यालाही मी उभा राहात नाही. (हो!आपल्या जांभईने बिचार्‍या गायकाचा हिरमोड होऊ नये, हा उदात्त हेतू). पण व्यक्तीचित्रणे आवडतात. कोणी मोठा गायक किंवा एखादा कलाकार माणूस म्हणून कसा असतो हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. तात्या, तुमच्या लेखनातून ही भूक काही अंशी भागते. आवडले तुमचे लेखन. अभिनंदन.

सहज Wed, 05/28/2008 - 22:10
विडी, उंदीर, गुरुंची एक आठवण, मृदू आवाज .... अतिशय जिवंत व हृद्य तुमच्या आठवणींचे चित्रण शब्दरुपाने आमच्या समोर केलेत. >आठवण फारच हृद्य आहे, आवडली. असेच म्हणतो.

बेसनलाडू Wed, 05/28/2008 - 22:18
हृद्य ओळख आणि प्रभावी व्यक्तिचित्र. आवडले. (वाचक)बेसनलाडू

संदीप चित्रे Wed, 05/28/2008 - 23:21
तात्या -- मनापासून धन्स .. लेख लिहिल्याबद्दल सुदैवाने मी पुण्यात लहानाचा मोठा झालो ... कॉलेजमधे असताना आणि नंतरही पुण्यात असेपर्यंत गंगूबाई, दस्तुरजी आणि भीमेसेनजी हा क्रम चुकवला नाही :) सवाईमध्ये प्रत्यक्ष 'गोपाला...' ऐकणं फारच उत्कट अनुभव असतो ना ! ------ अवांतरः माझ्या मनात अण्णांचाही एक 'कोमल रिषभ आसावरी तोडी' अजूनही घुमतोय !!! -----

पिवळा डांबिस Wed, 05/28/2008 - 23:40
सुरेख व्यक्तिचित्र!! हे दोन बावाजी, पं. फिरोझ दस्तूर भारतीय संगीतात आणि झुबिन मेहता पाश्चात्य, काय श्रेष्ठ योगदान आहे! व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही पूर्णपणे सहमत!! -पिवळा डांबिस

विकास Wed, 05/28/2008 - 23:50
तात्या, हे पारशीबाबाचे व्यक्तीचित्र खूपच आवडले. दस्तुरांची आठवण दस्तुरखुद्द तात्यांच्या शब्दात! आमच्या सारख्यांना माहीती नसलेली बरीच माहीती त्यानिमित्त कळली. त्यांना संगीताची ते ही शास्त्रीय संगीताची आवड कशी लागली? सवाई गंधर्वांची भेट कशी झाली? अधिक वाचायला आवडेल. अवांतरः बाकी "गोपाला मेरी करूना" असे शिर्षक वाचले आणि क्षणभर समजले नाही की गोपाला बरोबर राधे ऐवजी मेरी काय करतेय? का आता काही नवीन पूर्व पश्चिम वाद! मग तुमचे नाव वाचले आणि आठवले की हे गाणे आहे म्हणून :-)

शितल गुरुवार, 05/29/2008 - 00:04
तात्या , तुम्हाला प॑. फिरोज दस्तूर या॑च्या बद्दल वाटणारी आपुलकी, प्रेम हे या लेखातुन छान व्यक्त झाले आहे, आणि आम्हाला ते गायक म्हणुन जेवढे मोठे होते त्याहुन ही त्याच्यातील देवपणाची आम्हाला आज तुमच्या मुळे ओळख झाली. धन्यवाद.

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 00:12
हृद्य ओळख आणि प्रभावी व्यक्तिचित्र. आवडले. हेच म्हणते...

मदनबाण गुरुवार, 05/29/2008 - 04:07
व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही १००% सहमत!!!!! मदनबाण.....

ईश्वरी गुरुवार, 05/29/2008 - 07:11
>> व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही १०० % सहमत!! फारच छान झाला आहे लेख. पं. द्स्तूरांबद्द्ल बरीच माहिती त्यानिमित्त मिळाली. धन्यवाद. ईश्वरी

अमिगो गुरुवार, 05/29/2008 - 10:48
फारच छान ले़ख, तात्या.... ७-८ वर्षा मागचा प्रसंग... मि तेंव्हा सवाईगंधर्व महोत्सवाची वेबसाईट केली होती, फिरोज जी इतके खुष झाले होते की त्यांनी मला आवर्जुन बोलावुन घेतले आणि प्रोत्साहन दिले, तो सर्व सवाई (३हि दिवस) मी त्यांच्या बरोबर ऐकला आणि फिरोज जी त्यांना जे जे भेटायला येत त्यांना माझी आवर्जुन माझी ओळख करुन देत... लेख वाचुन आठवण जागी झाली. अनेक वेळा सवाईमध्ये प्रत्यक्ष 'गोपाला...' अनुभवलेला, अमिगो

स्वाती दिनेश गुरुवार, 05/29/2008 - 12:58
सुंदर व्यक्तिचित्र तात्या..भावस्पर्शी आठवणीतून दस्तूरजींना छान उलगडत नेले आहेस. सवाईला कधीकाळी जात होते,त्या आठवणी जाग्या झाल्या.. स्वाती

अजिंक्य गुरुवार, 05/29/2008 - 13:11
अतिशय छान लेख!! मी लेख वाचून इतका भारावून गेलो, की असं वाटलं.... दस्तुरबुवांची भेट आपल्यालाही घेता आली असती तर! (पण एक गडबड झाली...! सर्व प्रतिक्रियाकारांनी आपापल्या प्रतिक्रियांमधे सगळेच चांगले शब्द वापरून घेतले की हो! मला वेगळा शब्द वापरायचा होता.... एकदम निशब्द झालो की हो!!!)

ऋषिकेश गुरुवार, 05/29/2008 - 18:08
सुरेख व्यक्तीचित्र तात्या! या अतिशय सुंदर ओळखीबद्दल धन्यु! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 05/29/2008 - 23:31
अप्रतिम व्यक्तिचित्र तात्या. मागे एका दस्तुरांच्या एका शिष्यांची कुठे तरी अशीच भेट झाली होती, त्यांनी सुद्धा असेच त्यांच्याबद्दल भरभरून सांगितले होते. बिपिन.

चित्रा Fri, 05/30/2008 - 09:07
लेखन आवडण्यासारखेच. फिरोज दस्तुरांबद्दल विशेष माहिती नव्हती.

प्रगती Fri, 05/30/2008 - 14:16
अशीच छान छान माहीती देत रहा आम्ही वाचत राहू. पं. दस्तुर यांच्या बद्द्ल ऐकून होते त्यांची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद!

तात्या, पं. दस्तूर हे एक खूप मोठे पण तसे सर्वसामान्यांसमोर फारसे न आलेले कलावंत. वरती चतुरंग आणि विकास यांनी लिहिल्याप्रमाणे त्यांच्या गाण्याचा एखादा दुवा दिलात आणि त्यांच्या बद्दल अधिक माहिती लिहिता आली तर पहा. मुख्य म्हणजे पारशी समाजात 'आंग्ल' प्रभाव जास्त असून सुद्धा ते अभिजात हिंदुस्तानी संगिता कडे कसे वळले, त्यांना ही आवड कशी लागली, गुरूंची भेट कशी झाली, त्यांची साधना इ. जाणून घ्यायला आवडेल. बिपिन.

प्रमोद देव Mon, 06/02/2008 - 08:56
गोपाला मेरी करुना..इथे ऐकता येईल. फिरोज दस्तुर ह्यांच्याबद्दल मलाही अपार उत्सुकता आहे . उस्ताद अब्दुल करीमखां ह्या त्यांच्या (किराणा)घराण्याच्या अध्वर्युची आठवण व्हावी असेच फिरोजजींचे गायन आहे. डोळे मिटून ऐकले तर त्याची प्रचिती नक्कीच येते. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

बहुगुणी गुरुवार, 06/12/2008 - 01:42
esakal/06122008/Mumbai7548B37E8F.htm मुंबई, ता. ११ - किराणा घराण्याचे गायक पं. फिरोज दस्तूर यांचे ध्वनिमुद्रित गायन ऐकण्याची संधी पु. ल. देशपांडे कला अकादमीने रसिकांसाठी दिली आहे. हा कार्यक्रम येत्या बुधवारी (ता. १८) सायंकाळी ६.३० वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी सभागृहात होणार आहे. रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे. किराणा घराण्याचे बुजुर्ग गायक पं. भीमसेन जोशी आणि डॉ. गंगूबाई हनगळ यांचे गुरुबंधू असलेले पं. फिरोज दस्तूर यांचे नुकतेक निधन झाले. त्यांनी गायलेली दुर्मिळ गीते या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत; शिवाय पं. अजय पोहनकर, पं. श्रीकांत देशपांडे, धनश्री पंडित हे पं. दस्तुरांविषयींच्या आठवणी सांगणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरेंद्र धनेश्‍वर करणार आहेत.

१९९३/९४ सालचा सुमार असेल, तेव्हाची गोष्ट. "ग्रँटरोडचा नॉव्हेल्टी सिनेमा माहीत आहे ना? त्याच्याजवळच रेल्वे हॉटेल म्हणून आहे आणि त्याच्याजवळ एस पी सेन्टर म्हणून साड्यांचं दुकान आहे. तीच बिल्डिंग! ये हां नक्की, मी घरीच आहे!" दस्तुरसाहेब मला फोनवरून पत्ता सांगत होते! पं फिरोज दस्तूर आणि त्यांच सुंदर गाणं! या माणसाच्या मी गेली अनेक वर्ष प्रेमात होतो. त्यांना एकदा भेटावं असं मला खूप वाटत होतं. आणि एके दिवशी तो योग आला. त्यांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार मी ग्रँटरोडला त्यांच्या घरी पोहोचलो. लाकडी गोलाकार जिने असलेल्या त्या बिल्डिंगमधलं त्यांचं ते टिपिकल पारशी पद्धतीचं घर.

भाषाशुद्धी, शुद्धलेखन, मते-मतांतरे वगैरे वगैरे...

ॐकार ·

मन Wed, 05/28/2008 - 15:01
केले आहेत साहेब आपण. म्या पामराची यथाशक्ती उत्तरे:- १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? "केवळ" शब्द खटकतो.संस्कृतचा प्रभाव नक्किच आहे. त्याशिवाय अतिप्रचंड प्रमाणात तत्सम आणि तद्भव (संस्कृत मधुन आलेले) शब्द दिसले नसते. उदा:- "केवळ्,शब्द्,प्रभाव्,आहे, दिसणे,प्रचंड्,अति" हे सगळेच संस्कृतातुन आलेले शब्द आहेत. २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? नाय बुवा. नेहमीच्या वापरातील खिडकी,कुर्ता ह्या आणी अशा अनेक शब्दांचा काय बी तरास होत नाय. पण रझिया-सुलतान चित्रपटासरखं "शहीद्-ए-उल्फत, उल्फत -ई- अमानत" वगैरे सरळ बाउन्सर जातात राव. मम्हंजे असल हाय फंडु उर्दु येत नाय. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? अजिबात नाही.खुशाल बोलत सुटतो. मनाला वाआटेल ते, मनाला पटेल ते. भावना अचुक व्यक्त होणं महत्वाचं. ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? हो.पण क्वचितच. उबळ येते भाषा-शुद्धी वगैरेची;पण ती तात्कालिक असते. ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? अजुन तरी असले शब्द सुचवण्याची भरीव कामगिरी केली नाय. ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) ही लेखी भाषा वाटते.मी तासन्तास टी व्ही वर कार्यक्रम पाहतो. (मराठि शब्द वापरणे म्हण्जे अवघडच वापरावेत असं काही नाही.) ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? जन्मात नाय. ते "पंक्चर"च झाले आहे. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? नक्की कळ्ळं नाय. ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? हो. १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? हो. फोन केला होता. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? हो. १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' व्यवहारचतुर मराठी प्राध्यापकांनी नाव मोठं होण्याची हौस म्हणुन जगासमोर आपले विचार कळकळ म्हणुन मांडले आणि त्यांची मौज जाहली. "स्वान्त सुखाय" कळ्ळ नाय. ह्ये "स्वांत सुखाय" अस नाय लिवता येनार का? का म्हणुन नाही लिहिता येणार? आपलेच, जन सामान्यांचे मन

In reply to by मन

राजे Wed, 05/28/2008 - 16:49
अजिबात नाही.खुशाल बोलत सुटतो. मनाला वाआटेल ते, मनाला पटेल ते. भावना अचुक व्यक्त होणं महत्वाचं. हेच म्हणतो व असाच विचार करतो :) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विजुभाऊ Wed, 05/28/2008 - 15:11
बर्‍याच फारसी शब्दांचा अर्थ मराठीत येताना अर्थ बदललेला असतो. उदा : हौस /हौशी हे शब्द फारसी हवस या शब्दावरुन आले आहेत. ("आता हा अर्थ माहीत झाल्यावर अमुकतमुक बाई फार हौशी आहेत हो .........") धमु किंवा अन्द्या याना फार हौस आहे. ही वाक्ये कशी वाटतील. असे अनेक शब्द आहेत . उदा "वकुब" हा ही अर्थ बदलुन आलेला शब्द मूळ अर्थ :शिक्षण. "विलायत" मुळ अर्थ :स्वतःचा देश. अशा शब्दांचे काय करायचे?

ऋचा Wed, 05/28/2008 - 15:27
कागद हा शब्द अरबी आहे तो "कागज" ह्या शब्दावरुन आलाय

हर्षद बर्वे Wed, 05/28/2008 - 16:47
आत्मपरीक्षण करून प्रश्न्नांची उत्तरे देउच...पण तात्काळ द्यावेसे वाटलेले प्रश्न रूपी ऊत्तर.... १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? ऊ.: कोणाच्या ? हे १०) तुम्ही काल तुमच्या स्वतःच्या घरी फोन केला होता का?....असे विचारावयास पाहीजे होते....!!!

१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? नाही २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? नाही ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? नाही ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? नाही ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?होय ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) तीन वेळेस ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? पंक्चरच होते. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? होय ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? होय १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? दुरध्वनी करत नाही, शक्यतो फोनच करतो. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? तिकीटच काढावे लागते. १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' = व्यवहारचातुर्य यावरुन आपण कोणत्या निष्कर्षावर पोहचणार आहात याची आम्हाला प्रचंड उत्सुकता आहे. :) -दिलीप बिरुटे

प्रियाली Wed, 05/28/2008 - 17:52
शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो.
स्स्सही!! आपला तो बाब्या आणि दुसर्‍यांचे ते कार्टे हा मराठी बाणा येथेही दिसला. १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? मुद्दा पहिला: केवळ संस्कृत भाषेचा आहे असे वाटत नाही. मराठी भाषा हे अनेक संस्कृत, प्राकृत आणि परदेशी भाषांचे मिश्रण असावे. तसे म्हणायला गेले तर संस्कृत भाषा तरी स्वदेशी का म्हणावी? अफगाणिस्तान आणि त्याही पलीकडील प्रदेशातून अवेस्तासदृश भाषा तथाकथित आर्यांनी भारतात आणली असावी. तिला संस्कृत म्हणण्याचे धाडस करणे मला अयोग्य वाटते. आता, या भटक्या लोकांची मानसिकता बघू किंवा त्या आधी तिथून पुढे वसलेल्या लोकांची मानसिकता बघा. द. आशियात आणि भारताच्या पूर्व किनार्‍यावर येथिल लोक वसल्याचे सांगितले जाते. उदा. ख्मेर घराणे किंवा पल्लव राजघराणे. दोघांचा इतिहास असा की येथे स्थलांतरित झालेले हे तथाकथित आर्य/ ब्राह्मण इ. मूळ लोकांत मिसळून गेले. त्यांनी स्थानिक बायकांशी लग्न केले आणि स्थानिक राजकारणात-समाजकारणात भाग घेऊ लागले. भाषा, कला, साहित्य यांना त्यांनी आपलेसे केले. त्यानंतर हजारो वर्षांनी आलेल्या पारशांनी स्थानिक बायकांशी लग्न केले नसले तरी ते येथील संस्कृतीत मिसळून गेले. भाषा शिकले. याच प्रमाणे आर्यांच्या टोळ्याही भारतात येऊन वसल्या आणि येथील लोकांत मिसळल्या. कोठेही घनघोर युद्ध इ. झालेले दिसत नाही. दौपदी, तात्यांचे लाडके कृष्णद्वैपायन व्यास ;), कृष्ण इ. यामुळेच रंगाने सावळे आहेत. हा फाफटपसारा सोडून पुढे पाहिले तर त्यांनी आणलेली भाषा येथील स्थानिक भाषेशी मिळून संस्कृत भाषेची निर्मिती झाली असावी असे मला वाटते आणि हा निष्कर्ष खरा मानला तर संस्कृत ही भाषा स्वदेशी म्हणता यावी पण मग प्राकृत तिची आई असे म्हणणे अयोग्य ठरू नये. असो, मला मराठी ही भाषा केवळ संस्कृत भाषेतून जन्मली हे पटत नाही. प्राकृत भाषांचा प्रभाव मराठी आणि संस्कृत दोहोंवर असावा. मुद्दा दुसरा: मध्ययुगीन काळात सैन्यात असणे ही एक महत्त्वाची नोकरी गणली जाई. भाषांचे संकर सैन्याच्या छावणीत झाले असे म्हणणे अयोग्य ठरू नये. मराठी भाषेत फारसी, उर्दू, अरबी शब्द येण्यास येथे सुरूवात झाली असावी. मुद्दा तिसरा: ब्रिटिश येऊन काही शे वर्षे झाली. परंतु, मराठी भाषेत मिसळलेले इंग्रजी शब्द पाहता आणखी हजार वर्षांनी मराठी भाषा ही आंग्लोत्भव आहे असा आडाखा बांधणे अशक्य ठरणार नाही आणि जर कोणी तसा आडाखा बांधू इच्छित नसेल त्यांनी संस्कृत आपली आपली म्हणून घोष का करावा? २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? हो असे जाणवते. उदा. परवाच एका स्नेह्यांनी प्रत्युत्त्पन्नमती या (मराठी?) शब्दाचा अर्थ विचारला. वाक्य वाचले असता त्याचा अर्थ मला हजरजबाबी असा वाटला. माझ्यामते प्रत्युत्त्पन्नमती या टंगट्विस्टरपेक्षा हजरजबाबी हा शब्द वापरणे मला आवडेल. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? नेहमीच नाही आणि बोलताना नाही पण कधीतरी लिहिताना ध्यानात येते. ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? अजिबात नाही आणि तसे करणार्‍या महाभागांवर मला नेहमी हसू येते. जो शब्द मुळात भाषेत नाहीच, तो संस्कृतातून हुडकून आणण्याची कला मला नाही आणि शिकायचीही नाही. ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? जर ते शब्द सोपे सुटसुटीत असतील तर हो. मागे एका महाशयांनी सिगरेटला श्वेतवर्णीधूम्रकंडिका असा शब्द सुचवला होता, तर दुसर्‍या एका ठिकाणी कॉजवे साठी काजवाट हा शब्द सुचवला होता. मला काजवाट हा शब्द आवडला. ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) एकदाच वाचला. कुडोस टू मराठी वेबसाईट्स! मी टीव्हीवर अर्ध्या तासाची सिरिअल पाहते. ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? हो! मागच्या हिवाळ्यात बाहेर ४ डी फॅ. असताना टायर बदलले आहे. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही. ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? नाही पण माझ्या डॉक्टर भाचीला जी इथे टुरिस्ट विसावर आली आहे तिला सेलफोन वरून लॉग डिस्टन्स कॉल केला होता. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? नाही आता मी स्वत्:ची कार वापरते. १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' स्वतःच्या करमणुकीसाठी अवांतरः माझ्या उत्तरांत जे मराठी आहे तेच मराठी मी ही चार संकेतस्थळे सोडून सहसा बोलते.

In reply to by प्रियाली

विकास Wed, 05/28/2008 - 21:13
याच प्रमाणे आर्यांच्या टोळ्याही भारतात येऊन वसल्या आणि येथील लोकांत मिसळल्या. कोठेही घनघोर युद्ध इ. झालेले दिसत नाही. या संदर्भात दोन बाजूने बोलणारे आहेत - आर्य भारतात बाहेरून आले असे आणि ते खोटे असे. बाहेरून आलेल्यांचा मूळ मुद्दा हा मॅक्समुल्लरच्या मूट तत्वावर आधारीत आहे - भारतीय भाषा ह्या स्वतःच्या जीवावर नेटीव्ह लोकं समृद्ध करू शकणार नाहीत असा. मग त्यात द्वारका, "नसलेल्या" सरस्वती नदीचा उल्लेख वगैरे घातले. पण आता उपग्रहांनी(का मी सॅटेलाईट म्हणले पाहीजे?:-)) घेतलेल्या छायाचित्रांप्रमाणे बरेच काही सांगीतले गेले आहे. त्यामुळे आधी "आर्यन इन्व्हेजन" (त्यामुळे आर्य/अनार्य अशी भिंत तयार करणे - त्यातून इतर राजकारण) होते ते आता, "आर्यन मायग्रेशन" झाले. मग त्याला "थियरी" असे म्हणू लागले. थोडक्यात आर्य भारतात बाहेरून आले हा केवळ एक तात्विक सिद्धांत मानला जाऊ लागला, निरीक्षण नाही.

In reply to by विकास

प्रियाली Wed, 05/28/2008 - 21:25
मॅक्समुल्लरला सध्या बाजूला ठेवू. मध्य आशियातून अनेक ठीकाणी, तुर्कस्थान, आफ्रिका, द. आशिया इ. कडे स्थलांतर झाले हा इतिहास आहे, त्या अनुषंगाने त्यांचे भारतात स्थलांतर करणे मला शक्य वाटते. अर्थातच, भूकंप झाला किंवा पूर आला म्हणून झालेले हे स्थलांतर नव्हे. टप्प्याटप्प्याने झालेले स्थलांतर आहे. थिअरी का निरिक्षण का सिद्धांत हे ज्याने त्याने ठरवावे.

In reply to by प्रियाली

विकास Wed, 05/28/2008 - 21:55
थिअरी का निरिक्षण का सिद्धांत हे ज्याने त्याने ठरवावे. इतकेच मला म्हणावेसे वाटत होते. आपली लिहीण्याच्या ओघात त्या संदर्भात केलेली विधाने होती, ज्याचा अर्थ, तसेच नक्की आहे असा होऊ शकतो पण "नाण्याची दुसरी बाजू"असू शकते असे दाखवले, इतकेच..

मन Wed, 05/28/2008 - 17:27
आणखी एक नव्या (शुद्ध?) मराठी शब्दाची आम्हाला उबळ आलिये. स्चूटरचं टायर पंक्चर होतं. = वाहनाचं चाक छिद्रित झालं. कसा काय वाटला हा वापर? आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by प्रियाली

मनस्वी Wed, 05/28/2008 - 18:12
चाकनळी / चाकनलिका / चाकथर / चाकाच्छादन ...?? चाकथर / चाकाच्छादन योग्य वाटते म्हणजे टायर ट्युबला चाकथर-नळी म्हणता येईल. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

टायर = वायूयुक्त धाव कसे वाटते? कारण बैलगाडीच्या चाकावर नाही का लोखंडी धाव बसवत? तशी ही वायूयुक्त धाव. :) पुण्याचे पेशवे

मन Wed, 05/28/2008 - 18:08
व्हायला काय हरकत आहे? आपल्या सोयीनं इंग्लिश मध्ये नाय का जुन्या शब्दाचे नवे अर्थ बनतात.(जुन्या अर्थाच्या जवळ जाणारे) जसे की "I'll fly tommorrow" म्हणजे " मी उद्या पंख लावुन पक्ष्याप्रमाणे उडेन" असा शब्दशः अर्थ न घेता "मी उद्या विमानात चढेन्/बसेन आणि ते विमान उडेल." असा अर्थ घेणं अपेक्षित आहे. असे अनेकानेक उपयोग इम्ग्लिश मध्ये आहेत, नवनवीन रोज पडताहेत, म्हणुनच तर तिचा तथाकथित झपाट्याने प्रसार वगैरे होतोय. केलं तसच मराठित बिघडलं कुठं बॉस? आपलेच, जनसामान्यांचे मन,

आर्य Wed, 05/28/2008 - 18:08
१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? - नाही हे पृथःकरण केवळ कठीणच २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? नाही - आपण त्यांना आपल्या प्रमाणे बदलून घेतो. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? नाही ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? फारसा नाही ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? प्रयत्न करतो पण जमतेच असे नाही ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? नाही ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? होय, सांगाना काय पाहिजे ते सरळ असं १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? हो रोज १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' दृक/ श्राव्य /भाष्य किंवा लिखीत स्वरुपातील दुसर्‍याला समजावण्या साठी वापलेली ऐक सांकेतीक पद्धत आहे भाषा म्हणजे. हे माध्यम सर्वजण आपली मते / भावना / विचार प्रभावी पणे दुसर्‍या पर्यंत पोहचवण्या करीता वापरात, मग यात अन्य भाषेतील शब्द आल्यास बिधडलं कुठे. समजा समोरचाच जर दुसरी भाषा जणत (चांभाराच्या देवाला चपलीची पुजा) असेल तर आपण आपली भाषा बदलतोच ना ? शेवटी गरज आपल्याला पण आहे, आणि बर्‍याच लोकांना भाषेचा अडसर नसतोच. आता बोली भाषेत प्रांत, समाज, व्यवसाय, व्यवहार, काळ, आणि विचार याप्रमाणे भाषेत फरक पडणारच. अन्या भाषेतील शब्द, आपले भाषा ज्ञान संमृद्ध करायला आणि वाङमय सौंदर्य वाढवायला केले पाहीजे. भाषा शास्त्राचा तांत्रिक आणि तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास, प्रथम संस्कृत भाषेत पाणीनीने - अष्टाध्यायी मधे केला. आता मला सांगा कॉम्पुटरचा शोधच आत्त लागला मग हा शब्द तुमच्या जुन्या कोशात कसा असेल? ईतिहासात जाऊन अकबरा विचारा बोर्डींग पास / लॉग ईन म्हणजे काय? बहुभाषीक (आर्य)

विजुभाऊ Wed, 05/28/2008 - 18:19
कोणतिही भाषा ही इतर भाषांतील शब्द आत्मसात करुन समृद्ध बनते. आज इंग्रजीतही बरेचसे परभाषीक शब्द आहेत. फिनीश भाषेत बर्फाला २३ प्रकारचे शब्द आहेत. तेव्हढे मराठीत असणे शक्य नाही. कारण भौगोलीक आहे. तसेच नव्या तंत्रज्ञानामुळे नवे शब्द जसे च्या तसे येतात उदा : बिट्स / बाईट्स / हर्ट्झ /व्होल्टेज गिग्या मेग्या ई. यासाठी योग्य प्रतिशब्द असणार नाही. फ्रिजर फ्रिज आणि शितकपाट हे वेगवेगळे आहेत. मराठी भाषेत मिसळलेले इंग्रजी शब्द पाहता आणखी हजार वर्षांनी मराठी भाषा ही आंग्लोत्भव आहे असा आडाखा बांधणे अशक्य ठरणार हेच इंग्रजीबद्दल ही म्हणता येईल तसेच इतर कोणत्याही भाषेबद्दल म्हणता येईल. हिंदी भाषेत तर कितितरी शब्द इतर भाशेतील आहेत. तकनीक / त्रासदी (टेक्नीक / ट्रॅजेडी ) हे शब्द हिंदी वाटत नाहीत हे म्हणणे अवघड आहे. कोनतीही भाषा ही केवळ एक दोन भाषासंकरातुन जन्म घेत नाही. भाषा ही जिवंत रहावी म्हणुन ती प्रवाही असावी लागते.नवे शब्द येणे, नवे संस्कार आले नाहीत तर ती मृत होते. कपाट हा मराठी शब्द नाही ( कबर्ड) त्या ऐवजी फडताळ हा शब्द कोण वापरतो आता. भाषेत नवे शब्द येत रहाणार जुने शब्द कालबाह्य होत रहणार. आजच्या जागतीक खेड्याच्या जमान्यात स्थलकालाच्या मर्यादा / भाषेच्या मर्यादा रहाणार नाहीत. मध्ययुगीन काळात सैन्यात असणे ही एक महत्त्वाची नोकरी गणली जाई. भाषांचे संकर सैन्याच्या छावणीत झाले असे म्हणणे अयोग्य ठरू नये. मराठी भाषेत फारसी, उर्दू, अरबी शब्द येण्यास येथे सुरूवात झाली असावी. हे अर्ध सत्य आहे. समाज भाषेची गरज ही राज्यकर्त्यांवरुन ठरवतो. इंग्रजी ही चलनी भाषा आहे म्हणुन आपण इंग्रजी शिकतो. दुसर्‍या महायुद्धात हिटलरची सरशी झाली असती तर आज आपल्या मराठीवर जर्मन भाषेच पगडा असता. जयंत नारळीकरांच्या म्हणण्यानुसार पानिपताच्या महायुद्धात जर विश्वासराव भाऊ मारला/बेपत्ता झाला नसता तर इतिहासाला कलाटणी मिळुन इंग्रजीवर आज मराठीचा पगडा असता. ( अवांतर :एके काळी इंग्रजी भाषेवर फ्रेंच चे आक्रमण होतेय म्हणुन इंग्रज रडत असत)

In reply to by विजुभाऊ

मन Wed, 05/28/2008 - 18:55
उत्तिर्ण आणि अनुत्तिर्ण वापरा. स्वगतः- पन शिंच त्ये तर लैच पुस्तकी भाषेतलं वाटायलय. आपलाच, मनोबा

धनंजय Wed, 05/28/2008 - 20:00
१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? "केवळ" नाही. अनेक भाषांचा प्रभाव आहे, आणि स्वतःचे बदल करण्याची अंगची लकब मराठीत आहे. २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? जाणवत नाही. रुळलेले शब्द सहज समजले, उच्चारले तरच त्यांना "रुळलेले" म्हणतो. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? ९९% असा विचार करत नाही. क्वचित करतो. काव्यात एकापाठोपाठ एक उच्चार एकाच स्रोतातले असल्यास जिभेला सोपे जाते. "हावभावातला डौल" (दोन्ही मराठमोळे शब्द); "हरकतीतली नजाकत" (दोन्ही अरबीतून आलेलेसंस्कृत)"कटाक्षातील कमनीयता" (दोन्ही जवळजवळ संस्कृत) असे वापरतो. "हरकतीतील कमनीयता" किंवा "कटाक्षातील नजाकत" असे मिश्रण कानाला खटकते, म्हणून वापरत नाही. असे प्रसंग क्वचितच येतात. ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? माझ्या मते रुळलेला कुठलाच शब्द अशुद्ध नसतो. न रुळलेल्या शब्दाला प्रतिशब्द सुचवायचा मोह कधीकधी होतो. परंतु चपखल प्रतिशब्द सुचवायची माझी प्रतिभा नसल्यामुळे मी तो मोह टाळतो. ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? मी सहसा असे शब्द सुचवत नाही. पण लोकांनी सुचवलेले शब्द आवडल्यास ते वापरतो. उदाहरणार्थ : "संकेतस्थळ" आणि "विदागार". ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) ० तास. (एकदा वाचला.) ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? माझ्या गाडीचे टायर "पंचर" होते ("पंक्चर" नव्हे) इतकाच फरक. "टायर"चा "वाल" बदलताना कधीकधी "पान्ह्या"चा उपयोग करतो. (ठायर, व्हॅल्व्ह आणि स्पॅनर नव्हे.) जर एखाद्या इंग्रजी शब्दाचा मराठमोळा उच्चार रुळलेला असेल, तर मराठी बोलताना तो मराठमोळा उच्चार मी वापरतो, इंग्रजीत बोलताना इंग्रजी उच्चार वापरतो. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही. ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही. "शुद्ध"लेखन नामक काही कल्पनाच मला मान्य नाही. "शुद्ध"लेखन हा शब्द "प्रमाणलेखन" या अर्थी काही लोक वापरतात."व्यापारात आणि वर्तमानपत्रांत प्रमाणलेखन सोयीचे आहे," अशा प्रकारात मी मोडतो. पण हा पर्याय दिलेला नाही. १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? होय. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? होय. (पण टिकेट काढले नाही.) १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' व्यवहारचातुर्य.

विकास Wed, 05/28/2008 - 21:52
मला एक मूलभूत प्रश्न आहे: आपण बर्‍याचदा भाषाशुद्धी करत असतो का भाषाविकास? जर भाषाविकास करायच नसता तर "गमभन" सारखी टंकलेखन व्यवस्था का बरं तयार करावीशी वाटली असती? संकेतस्थळपरवलीचा शब्द, खरडवही , वगैरे शब्द तयार करताना तुम्ही आम्ही काय सकाळी शुचिर्भूत होऊन सोवळ्यात बसून शब्द तयार करत असतो का आणि मग पाणि शिंपडून म्हणतो की हां आता भाषेचा हा भाग शुद्ध केला! मग तेंव्हा आपण म्हणतो का की नेट म्हणले तर काय बिघडले? व्य. नि. काय प्रकार आहे? वगैरे? आपण "नेटा"ने मराठी लिहीण्याचा प्रयत्न करतो. सुचले नाहीत तर येथील मित्रमंडळींना प्रतिशब्द सुचवायला सांगतो. हे सर्व आपण म्हणता त्यात म्हणजे, "'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ"" यातील कशात धराल? आपण वरील शब्दात वर्गीकरण करत असताना एक वर्गीकरण करायला विसरलात - ते म्हणजे "प्रेमापोटी" (जे कळकळीपेक्षा वेगळे असू शकते). मला माझी भाषा आवडते. त्या भाषेचा विकास व्हावा असे मला वाटते. त्या अर्थाने नित्यनूतन शब्द जर तयार झाले तर कुठे बिघडले? आज जर "गुगल" हा शब्द इंग्रजीत तयार झाला असे समजून ऑक्सफर्ड डिक्शनरीत (शब्दकोशात) घातला जातो तर आपण नवीन शब्द केले आणि हो ते संस्कृतप्रचूर अथवा संस्कृतोद्भव असले म्हणून बिघडले कोठे? शेवटी भाषा ही वापरण्याने मोठी होते.
विलक्षणः शब्दकोशः विद्यते तव भारती | व्ययेन वर्धते नित्यम क्षयं गच्छती संग्रहात || हे सरस्वती देवी तुझा शब्दकोश हा (धनकोशापेक्षा) वेगळाच आहे! कारण तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्‍ह्सा स होतो.
थोडक्यात जे काही शब्द आहेत ते जर लोकांना आवडले तर ते तगतील नाहीतर दुसरे आहेतच. आता शब्दाच्या इष्टाईल मुळे मला "दुग्धशर्करायुक्तघनघट्टगोल" खायला आवडतो असे म्हणायला आवडते. पण काय करणार लोकांना नुसतेच "पेढा" म्हणलेले आवडते म्हणून तोच शब्द रूढ झाला! असो. बाकी भाषा, संस्कृती ह्यातील नाविन्य विचित्र वाटणे हा कधीकधी सवयीचा परीणाम असतो. अमेरिकेत (कुठल्याही परभागात) येतो तेंव्हा अनेक गोष्टी/शब्द (अर्थात इंग्रजी) नवीन वाटायच्या, विचित्र वाटायच्या, पण नंतर त्यातील अर्थ समजणे आणि पचनी पडणे सहज होऊन जाते. पण त्याच बरोबर काही गोष्टी भारताळलेल्या ह्या अमेरीकेत जास्त करू लागलो (मुद्दाम नाही, पण सवयीने). उ.दा: मराठी माणसाशी फोनवर बोलताना आपोआप "नमस्कार मी विकास बोलतोय" असेच तोंडातून बाहेर येते. (आणि बोलणार्‍याला पण आश्चर्य वाटत नाही). तर अमराठी भारतीय माणसांशी बोलताना आपसूक "नमस्ते" येते. येथे अनेक विद्यापिठातील तरूण भारतीय पिढी (अमेरिकेत जन्मलेली) अनुभवली - ते लगेच नमस्ते म्हणतात. मधे एकदा बॉस्टनला उतरल्यावर कस्टमचा अधिकारी पण सुअहास्यवदनाने हात जोडून "नमस्ते, वेलकम होम" असे म्हणाला आणि समजले की बघता बघता "नमस्ते" किती सहज सर्वत्र पसरलेला शब्द झाला ते!

In reply to by विकास

प्रियाली Wed, 05/28/2008 - 21:56
शेवटी भाषा ही वापरण्याने मोठी होते.
हेच सत्य असेल आणि इंग्रजी भाषा इतर भाषीक शब्द सामावून घेत असेल तर ते नवे शब्द आपणही सामावून न घेता संस्कृतप्रचूर आणि संस्कृतोद्भव शब्द "नव्याने" तयार करण्याचा अट्टहास का ते कळेल का?

In reply to by प्रियाली

कोलबेर Wed, 05/28/2008 - 21:59
'आमचा सन इन लॉ येत्या विकेंडला स्टेट्स ला फ्याय करणार आहे'. असले धेडगुजरी मराठी कानाला खटकते उच्छाद आणते हे नक्की. पण हे सुधारण्यासाठी प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द सुचवत राहणे हा उपाय मलाही पटत नाही. इतर भाषांमधुन (इंग्रजी,संस्कृत,अरबी,फारसी,पाली, इ.इ.)आलेले जे शब्द बर्‍यापै़की रुळले आहेत त्यांच्यासाठी प्रतिशब्द नको असे मला वाटते. अवांतर : प्रतिशब्द वाले जसे 'प्रतिशब्द सुचवा' अश्या याद्या तयार करतात तशीच एक 'प्रतिशब्द नको' अशी यादी देखिल बनवावी आणि त्यात खालील शब्द टाकत जावे उदा. पेन टेबल सिगरेट टायर

In reply to by प्रियाली

विकास Wed, 05/28/2008 - 22:23
हेच सत्य असेल आणि इंग्रजी भाषा इतर भाषीक शब्द सामावून घेत असेल तर ते नवे शब्द आपणही सामावून न घेता संस्कृतप्रचूर आणि संस्कृतोद्भव शब्द "नव्याने" तयार करण्याचा अट्टहास का ते कळेल का? अट्टहास कुठूनही होऊ शकतो. जर संस्कृतप्रचूर शब्दच वापरावे हा कोणी अट्टहास धरला (मी तसा धरत नाही, पण!) तर जसे अयोग्य तसे केवळ संस्कॄतप्रचूर शब्द म्हणून सातत्याने विरोध करणे हा पण अट्टहासच आणि म्हणून अयोग्यच असतो, असे वाटत नाही का? बाकी प्रश्नाचे (नवीन शब्दांची गरज) उत्तर माझ्याच वरील प्रतिसादात मिळेलः आपण वरील शब्दात वर्गीकरण करत असताना एक वर्गीकरण करायला विसरलात - ते म्हणजे "प्रेमापोटी" (जे कळकळीपेक्षा वेगळे असू शकते). संस्कृतप्रचूर शब्द हे मुद्दामून संस्कृत म्हणून केले जात नाहीत तर तो तुम्हाला आवडो-न-आवडो, पटो - न पटो, मराठी आणि भारतीय भाषांतील मूळ भाग आहे. मग ते आपल्या नावात आहे आणि इतरत्रही आहे. जेंव्हा वेबसाईटला संकेतस्थळ शब्द ज्याने कोणी सुचवला त्याला काही मुद्दाम संस्कॄत आठवावे लागले नाही. त्याचबरोबर व्यक्तिगत निरोप म्हणताना त्यात संस्कृतप्रचूर असावे असा अट्टहासपण कोणी धरला नाही... म्हणून वाटते की संस्कृत असण्याच्या अट्टहासापेक्षा (तो करणारे आहेतच पण) उगाच नसण्याचाच जास्त अट्टहास होत असल्यासारखे दिसते.

In reply to by विकास

कोलबेर Wed, 05/28/2008 - 22:31
संस्कृत हवे/नको असा दोन्हीही अट्टहास नको हे मान्य पण,
संस्कृत असण्याच्या अट्टहासापेक्षा (तो करणारे आहेतच पण) उगाच नसण्याचाच जास्त अट्टहास होत असल्यासारखे दिसते.
हे मात्र पटले नाही. मूळ मुद्दा आहे इतर भाषेतील शब्द मराठीत येण्याचा. ते शब्द इतर संस्कृत सोडून इतर कुठल्याही भाषेतील असले तर लगेच बर्‍याच जणांचा झिनोफोबीया बळावतो आणि तेच जर संस्कृतमधले असले तर मात्र लगेच 'संस्कृत ही मराठीची जननी' असा युक्तिवाद करुन स्विकारण्याकडे कल असतो. त्यामूळे 'संस्कृत हवे' हा अट्टहास (मला तरी) अधिक वाटतो.

In reply to by विकास

प्रियाली Wed, 05/28/2008 - 22:32
जर संस्कृतप्रचूर शब्दच वापरावे हा कोणी अट्टहास धरला (मी तसा धरत नाही, पण!) तर जसे अयोग्य तसे केवळ संस्कॄतप्रचूर शब्द म्हणून सातत्याने विरोध करणे हा पण अट्टहासच आणि म्हणून अयोग्यच असतो, असे वाटत नाही का? जर कोणी प्रतिशब्द द्या म्हटल्यावर लगेच संस्कृतप्रचुर शब्द पोतडीतून काढत असेल तर त्याला विरोध अजिबात अयोग्य नाही. वरील उदाहरण पहा, टायरला चाकनळी पासून सर्व शब्द सुचवले आहेत त्यात मराठी भाषेत वापरले जाणारे नळीपासून वायूपर्यंत अनेक शब्द आहेत. जेव्हा प्रतिशब्द दिला जातो आणि तो संस्कृतातून चटकन काढला जातो तेव्हा मायमराठीवर अन्याय करताय असे वाटत नाही का? मराठमोळ्या भाषेत तसा पर्याय नसावा असे का वाटते. सिगरेटला धूरकांडी शब्द न सुचता श्वेतवर्णीधूर्मकंडिका का सुचतो?
संस्कृतप्रचूर शब्द हे मुद्दामून संस्कृत म्हणून केले जात नाहीत तर तो तुम्हाला आवडो-न-आवडो, पटो - न पटो, मराठी आणि भारतीय भाषांतील मूळ भाग आहे.
हे शब्द का आले? लक्षात घ्या, संस्कृताशी आणि संस्कृत शब्दांशी मला काहीही वाकडे नाही परंतु साधे मराठी शब्द मिळत असता संस्कृतातून अवजड शब्द शोधणे, प्रचलीत आणि नव्याने आलेल्या इंग्रजी शब्दांना संस्कृतच वाचवू शकते असा ग्रह करणे (करून ठेवणे) हे अयोग्य वाटते.
म्हणून वाटते की संस्कृत असण्याच्या अट्टहासापेक्षा (तो करणारे आहेतच पण) उगाच नसण्याचाच जास्त अट्टहास होत असल्यासारखे दिसते.
दुर्दैवाने, आपल्याला असे वाटते म्हणजे इतर काय म्हणतात याकडे आपले दुर्लक्ष होऊन फक्त चर्चा भरकटली, इतरांनी विरोध केला याकडेच आपले लक्ष केंद्रित झालेले वाटले.

In reply to by प्रियाली

विजुभाऊ गुरुवार, 05/29/2008 - 09:47
सिगारेट ला विडी हा शब्द आहे. उगाच नवे शब्द करण्याच्या उत्साहात पर्यायी (जुने) शब्द नाहीतच असे समजणे योग्य नव्हे

In reply to by विजुभाऊ

कोलबेर गुरुवार, 05/29/2008 - 09:52
विडी आणि सिगरेट मधला फरक कळत नसेल तर जवळच्या पानटपरीला भेट द्या एकदा. तिथला मालक तुम्हाला सोदाहरण स्पष्ट करुन सांगेल.

In reply to by कोलबेर

विजुभाऊ गुरुवार, 05/29/2008 - 10:36
विडी आणि सिगरेट मधला फरक खाकी प्यान्ट आणी सफेद पायजम्यातील फरका इतका स्वच्छ आहे. फार तर सिगारेटला इंग्रजी विडी म्हणुयात.बाकी सफेद घोळदार प्यान्ट ही पायजम्यासारखीच दिसते.

In reply to by विकास

प्रभाकर पेठकर Wed, 05/28/2008 - 22:09
वरील प्रतिसादाशी सहमत आहे. शब्द शुद्ध मराठी आहे, संस्कृतोद्भव आहे की फारसी, अरबीतून आलेला आहे ह्या पेक्षा बोलण्यास सोपा आहे हाच निकष टीकून राहतो. 'भय' हा शब्द साहित्यात आहे. कथा कादंबर्‍यांमधून, कविता, गाण्यातून वाचनात येतो तो जितका आपला वाटतो तितकाच 'भिती' हा बोली शब्दही जास्त वापरला जातो. पण म्हणून पर्यायी मराठी शब्द शोधूच नये का? तर उत्तर आहे, 'नाही, जरूर शोधावेत. सहज, सोपे असतील तर आवर्जून वापरावेत.' विजार, सदरा आदी शब्द उच्चारायला, समजायला कठीण होते म्हणून मागे नाही पडले. 'पँट्-शर्ट' हे शब्द वापरण्याची 'फॅशन' आली, हे शब्द 'पुढारलेपणाचे' द्योतक बनले म्हणून विजार, सदरा हे मराठी शब्द मागे पडले. ठीक आहे. काहीही कारणाने मागे पडले तर पडू देत. आता एवढीच काळजी घ्यायची की अशा प्रकार हळूहळू जास्तीतजास्त मराठी शब्द मागे पडून 'इंग्रजी' किंवा इतर शब्द विनाकारण आपल्या भाषेत लुडबुड करणार नाहीत.

विसोबा खेचर गुरुवार, 05/29/2008 - 00:43
अरे काय रे ही भाषेची ट्यांव ट्यांव लावली आहे रे तुम्ही लोकांनी! कसल्या रे लेको वांझोट्या चर्चा करत बसता? :) अरे काही उतम कथा, काव्य, रसग्रहण, व्यक्तिचित्रण, एखादा उत्तम अनुवाद असं काहीतरी लिहा रे! का उगाच मिपाची जागा फुकट घालवताय? :)) नायतर जा वेलणकरकडे! तिथे सगळे तुटून पडतील भाषा व व्याकरणविषयक चर्चांवर! 'आम्हाला तात्याने तुझ्याकडे पाठवलंय!' असं सांगा हवं तर वेलणकरला! :)) साला ज्याला ज्या भाषेत बोलायचं असेल, जसं बोलायचं असेल तसं तो बोलेल!! भाषा ही कुणाच्या मालकीची नाही! ती प्रत्येकाची आहे! च्यामारी आमच्या बहिणाबाईं जळ्ळ्या कुठे गेल्या होत्या हो भाषाविषयक भसाभसा चर्चा करायला? भाषाविषयक आणि शुद्धलेखनाबाबत त्या वाळिंब्यासारख्या वांझोट्या चर्चा न करता किती सुंदर काव्यनिर्मिती केली त्यांनी! :) आमची भांडीवाली बाई सीताबाई, दारुड्या नवर्‍याच्या कथाकहाण्या आणि कप्प्लेन्टी आमच्या मातोश्रीस अगदी चोख व खणखणीत भाषेत कथन करत असते! त्या बिचारीला लिहिता-वाचता येत नसून ती पक्की आंगठेबहाद्दर आहे. पण कुठलिही चर्चा न करता तिचंदेखील मराठी भाषेवर अगदी उत्तम प्रभूत्व आहे असं मी म्हणेन! आणि तुम्ही लेको लांब चेहेरे करून कसल्या चर्चा करत बसलाहात रे?! छ्या! :) असो, आज बुधवार असल्यामुळे मी अंमळ कलम १८५ च्या अमलाखाली आहे. उद्या बघतो एकेकाला! :)) आपला, (भाषाप्रभू) तात्या वाळिंबे.

In reply to by विसोबा खेचर

विकास गुरुवार, 05/29/2008 - 00:55
:T अरे काही उतम कथा, काव्य, रसग्रहण, व्यक्तिचित्रण, एखादा उत्तम अनुवाद असं काहीतरी लिहा रे! L) एकदा कुठल्या भाषेत, कुठले शब्द वापरून, व्याकरण नावाचे प्रकरण कसे वापरावे, संस्कृत प्रचूर शब्द की फारसे नसलेले फार्सी शब्द वापरून अथवा त्यांची पाळेमुळे ठरवून कसे लिहावे हे ठरले की मग आपण सुचवत असलेल्या संदर्भात लिहू... ;)

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली गुरुवार, 05/29/2008 - 01:11
नायतर जा वेलणकरकडे! तिथे सगळे तुटून पडतील भाषा व व्याकरणविषयक चर्चांवर! 'आम्हाला तात्याने तुझ्याकडे पाठवलंय!' असं सांगा हवं तर वेलणकरला
अहो मिसळपावावरचे छुपे मनोगती कोण हे शोधण्यासाठीच अशा चर्चा करत होतो =)) कधी हाकलपट्टी करायची सांगा.
साला ज्याला ज्या भाषेत बोलायचं असेल, जसं बोलायचं असेल तसं तो बोलेल!! भाषा ही कुणाच्या मालकीची नाही! ती प्रत्येकाची आहे! च्यामारी आमच्या बहिणाबाईं जळ्ळ्या कुठे गेल्या होत्या हो भाषाविषयक भसाभसा चर्चा करायला?
हो ना आणि कधी संस्कृतप्रचुर प्रतिशब्द शोधत होत्या असेही ऐकलेले नाही :P :))

विसोबा खेचर गुरुवार, 05/29/2008 - 10:56
एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. अहो मालक! हे कदाचित आपणही कबूल कराल की इथे मंडळींनी आपल्या नेहमीच्या सहजसोप्या मराठी भाषेत(मग त्यात काही रुळलेले विंग्रजी शब्द आले तरी चालतील), भाषाशास्त्र, भाषाशुद्धी, व्याकरणाचा कुठलाही आव न आणता, मराठी भाषेची काय ती जबाबदारी आपल्याच डोक्यावर आहे या भ्रमात न राहता लेखन करावं हेच धोरंण पहिल्यापासून अवलंबलं गेलं आहे. यात आपल्याला कुठलाही विरोधाभास दिसत असेल तर ती इतर संस्थळांची लागण समजावी. कृपया मिसळपावच्या माथी असे आरोप करू नयेत..! १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? छ्या! मुळीच नाही! २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? नाही. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? नाही, ही मला वेडझवेगिरी वाटते आणि मी ती करत नाही! :) ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? आज्याबात नाय! ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? मी कुठलेही मराठी शब्द सुचवत नाही. जे लहानपणापासून शाळेत, आईबापाकडून, व इतरत्र ऐकत आलेलो आहे तेच मीही वापरतो. ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) एखाद तास. हा प्रश्न मी एकदाच वाचला. ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? नाही! :) ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? शुद्धलेखन? ते काय असतं बॉ? :) ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? शुद्धलेखन? ते काय असतं बॉ? :) १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? हो! :) ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? हो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (म्हण्जे आपली येष्टी हो!) माझ्या 'बा'ची नाही! :) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - भाषाशुद्धी आणि शुद्धलेखन? ते काय असतं बॉ? :) आपला, (कातकरी समाजाच्या भाषेत रमणारा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ॐकार गुरुवार, 05/29/2008 - 13:20
उपहासात्मक प्रश्न आपल्याला कळले नसतील असे मला वाटत नाही. मराठी शब्द सुचवा अथवा सावरकरांनी सुचवले म्हणून डोळे बंद करून ते मराठी शब्द वापरा हे दोन्ही उपद्व्याप माझ्या दृष्टीने हास्यास्पदच आहेत. केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते हो! काय म्हणणं आहे मग? तात्या. ह्या तुमच्या विधानात तुम्ही आत्ता मांडलेल्या मतांशी सुसंगती आहे काय? पूर्वग्रहदूषित वृत्ती आणि नजर सगळ्याच वेबसाईट्स वरच्या सदस्यांत आहे. मिपाही त्याला अपवाद नाही. इतर ठिकाणी विरोधाभास नाही तर अट्टाहास आहे इतकाच काय तो फरक. पूर्वग्रहदूषित वृत्ती नाकारता येत नाही. पण किमान त्यात सुधारणा तरी करता येऊ शकते. मला सावरकरांबद्दल आदर नसता तर मी हे सारे प्रतिसाद तिथेच देऊन विचका करू शकलो असतो. दिलेल्या प्रश्नांतून किमान प्रत्येकाने स्वतःचे मत काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला तरी फार आहे. बिनबुडाचे आरोप करायची मला हौस नाही.

In reply to by ॐकार

विकास गुरुवार, 05/29/2008 - 16:49
मला सावरकरांबद्दल आदर नसता तर मी हे सारे प्रतिसाद तिथेच देऊन विचका करू शकलो असतो. हे वाक्य एकदम भावले. :-)

चित्रा Fri, 05/30/2008 - 17:23
बराच धुरळा उडून गेलेला दिसतोय. तरी मत नोंदवते! १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? - नाही, फारसी शब्द अनेक आहेत (कदाचित शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीच्या सुमारास वापरात आले असावेत). २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? - नाही. जे शब्द माहिती आहेत त्यामुळे नाही. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? - कधीतरी करते. आवड म्हणून. एकदा बसवर लिहीलेला ___ साबण वापरो असा वाक्यप्रयोग वाचून दचकायला झाले होते! ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? - नाही. पण एखाद्या अर्थाच्या जवळपास जाणारे दोन तीन शब्द माहिती असावेत असे वाटते. ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? - हो, वापरते. ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) " शून्य तास". एकदाच वाचला. ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? नाही, पण त्याचे विशेष काही वाटतही नाही. पण दुसर्‍या संदर्भात टायर फुटला असा शब्दप्रयोग ऐकलेला आहे. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? शीतकपाट हा शब्द फ्रीजला प्रतिशब्द म्हणून योग्य नाही . मला इथे सर्किट यांनी सोप्या प्रतिशब्दांचे गुणधर्म सांगणारा एक मस्त लेख लिहीला होता त्याची आठवण झाली. (हल्ली सर्किट कुठे असतात?). ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही . शुद्धलेखनाला "शुद्ध" म्हणण्याची गरज नाही, पण काही एक प्रमाण असावे या मताची मी आहे. नियम तोडणे हा स्थायीभाव बनू नये. आणि एकदा नियम तोडणे मान्य केले की मग कुठचेही नियम तोडले तरी चालले पाहिजेत. मग हे चालेल आणि ते नाही असा दुजाभाव नको. १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? होय. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? होय. १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' व्यवहारचातुर्य. मी असे समजते की मी लिहीलेले लोकांना त्रास न होता वाचता आले पाहिजे. तसे झाल्यास मला जे सांगायचे आहे ते ज्यांना वाचता येते अशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहज पोचेल.

In reply to by चित्रा

७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? नाही, पण त्याचे विशेष काही वाटतही नाही. पण दुसर्‍या संदर्भात टायर फुटला असा शब्दप्रयोग ऐकलेला आहे. मी देखील एकदा या संदर्भात टायर भ्रष्ट झाला असे ऐकले होते. त्यावर त्या पोर्‍याला मालकाने सांगितले भ्रष्ट नाही बरष्ट झाला असे म्हणतात. =)) पुण्याचे पेशवे

गणा मास्तर Mon, 06/02/2008 - 11:50
खुप चर्चा झालीये पण राहवत नाही. शब्द शुद्ध मराठी आहे, संस्कृतोद्भव आहे की फारसी, अरबीतून आलेला आहे ह्या पेक्षा बोलण्यास सोपा आहे हाच निकष टीकून राहतो. 'भय' हा शब्द साहित्यात आहे. कथा कादंबर्‍यांमधून, कविता, गाण्यातून वाचनात येतो तो जितका आपला वाटतो तितकाच 'भिती' हा बोली शब्दही जास्त वापरला जातो. पण म्हणून पर्यायी मराठी शब्द शोधूच नये का? तर उत्तर आहे, 'नाही, जरूर शोधावेत. सहज, सोपे असतील तर आवर्जून वापरावेत.' विजार, सदरा आदी शब्द उच्चारायला, समजायला कठीण होते म्हणून मागे नाही पडले. 'पँट्-शर्ट' हे शब्द वापरण्याची 'फॅशन' आली, हे शब्द 'पुढारलेपणाचे' द्योतक बनले म्हणून विजार, सदरा हे मराठी शब्द मागे पडले. ठीक आहे. काहीही कारणाने मागे पडले तर पडू देत. आता एवढीच काळजी घ्यायची की अशा प्रकार हळूहळू जास्तीतजास्त मराठी शब्द मागे पडून 'इंग्रजी' किंवा इतर शब्द विनाकारण आपल्या भाषेत लुडबुड करणार नाहीत. या पेठकर काकांच्या मताशी सहमत. मी पायरीवर बसलो होतो. नशिबानी इथपर्यंत आलो. असे सहज बोलता येत असताना उगीच मी स्टेअरवर बसलो होतो. डेस्टिनीने इथपर्यंत आलो. असली विचित्र भाषा वापरणे चुकीचे वाटते.

In reply to by तळेकर

चतुरंग Mon, 06/02/2008 - 15:40
आणि तेही मूळ लेखक/कवी ह्यांच्या नावाचा उल्लेख न करता देणे मिपाच्या धोरणात बसत नाही. सदरहू लिखाण काढून टाकण्यात येत आहे. चतुरंग

शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून खालील काही प्रश्न्नांची उत्तरे स्वतःशी पडताळून पहावीत. १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का?

महाराष्ट्राची जिवनरेखा........

अमोल केळकर ·

मनस्वी Wed, 05/28/2008 - 12:49
६० वर्षांच्या एस्. टी. ला वाढदिवसाच्या शुभेच्छा! एस्. टी. चिरायु होवो तसेच अधिक कार्यक्षम बनो, स्वच्छ-टापटीप राहो आणि खेडोपाडी पोहोचो. ज्या खेडी-वस्त्यांनी अजून एस्. टी. चे तोंडही पाहिले नाही तिथे एस्. टी. पोहोचो. जिथे गावातून शहरांना दिवसातून फक्त एकदाच एस्. टी. जाते तिथे तिची फ्रीक्वेन्सी वाढो. एस्. टी. कामगारांची वेतनश्रेणी वाढो आणि कामातील हेक्टीकपणा कमी होवो. जय एस्. टी. महामंडळ. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by आनंदयात्री

मनस्वी Wed, 05/28/2008 - 12:54
ताम्हीणी घाटातील एस्. टी... गुगलवर मिळाला! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

कुंदन Wed, 05/28/2008 - 13:19
असेच म्हणतो ... >> ह्या वर्शी एस्. टी ला चक्क नफा झाला आहे राजकारणी लोक जर महामंडळापासून दूर राहिले तर नफा होत राहिल. तोट्याला कारणीभूत आहे ती राजकारणी लोकांची ढवळा ढवळ.... ( येष्टी प्रेमी...) ...कुंदन

In reply to by कुंदन

छोटा डॉन Wed, 05/28/2008 - 13:23
आहे असेच म्हणतो ... अवांतर : ह्या वर्षी एस्. टी ला चक्क नफा झाला आहे ह्याबद्दल आमच्या भागाचे "आमदार व एस टी महमंडळाचे अध्यक्ष श्री. सुधाकरपंत परिचारक " यांचे अभिनंदन छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भडकमकर मास्तर Wed, 05/28/2008 - 14:29
जय एसटी महामंडळ... ... फायद्यात आले पाहून आनंद वाटला... आणि मनस्वी, फोटो अप्रतिम... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आर्य Wed, 05/28/2008 - 18:24
मी पायी, सायकल, बस, रेल्वे अगदी विमान प्रवासही केलेत. पण हे सगळे दुरवर नेतात च्यायला. पण एस.टी नेच माणसे खर्‍या अर्थाने जवळ येतात. हात दखवा बस थांबवा =; एसटी चा प्रवासी (आर्य)

विकास गुरुवार, 05/29/2008 - 00:21
प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी हे ब्रिदवाक्य बर्‍यापैकी पाळलेली ही एक संस्था आहे. लहानपणापासून अनेकदा अनुभव घेतला आहे. प्रत्येक ठिकाणचे एसटी स्टँड हा एक बघणीय प्रकार असतो. प्रत्येक ठिकाणचे विविध अनुभव. रात्रीच्या एस्ट्यांना रातराणि हा शब्द पाहून खूप गंमत वाटायची! ड्रायव्हर-कंडक्टरचे पण बर्‍याचदा चांगले अनुभव आले आहेत. बाकी एसटीतील प्रवास वर्णन म्हणल्यावर हमखास आठवते ती पुलंची म्हैस आणि महाराष्ट्रातील एसटी नसेल, पण -बाँबे टू गोवा मधील एस टी आणि त्यातील अमिताभ, केस्टो, ललीता पवार इत्यादी...

मराठी_माणूस गुरुवार, 05/29/2008 - 16:40
हे बव्हंशी खरे आहे. महाराष्ट्रात कानाकोपर्‍यात एसटि जाते. खाजगी वहतुक हि फक्त जिथे पैसा आहे तिथेच चालवलि जाते . चालकसाठी मात्र काहितरी शीस्ती चे बंधन असावे. कारण आपल्या खाजगी गाडी ने एका गावाहुन दुसर्‍या गावि जाताना एसटी पासुन सावध रहावे लागते. ओव्हरटेक करताना ते काहि बघत नाहित , तुंबलेल्या रहदारीत बस तशिच दामटुन पुढे नेउन अधिक अडथळा निर्माण करतात.

भोचक गुरुवार, 05/29/2008 - 17:37
एरवी महाराष्ट्रातल्या एसटी ला लोक नावं ठेवतात. तिच्या खाजगीकरणाची आरोळी ठोकतात. पण आपली 'यष्टी' किती चांगली आहे हे इतर राज्यांत गेल्याशिवाय कळत नाही. मध्य प्रदेशात रहाताना येणारा इथल्या 'ट्रेवल्स'चा अनुभव नक्की वाचा. मग तुम्हाला 'गड्या आपली यष्टीच बरी असे वाटल्याशिवाय रहाणार नाही. http://www.misalpav.com/node/1542

अवन Sat, 05/31/2008 - 10:48
आज एस टी साठाव्या वर्षात गेली , हे कळले तेव्हा वाट्ले, आपल्याच कुटुंबातल्या कोणीतरी साठी गाठली आहे. लहानपणापासून केलेल्या एस टी प्रवासामुळे, मला तर महाराष्ट्राची ओळख झाली. कोणत्याही एस टी स्टँडवर गेल्यावर येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांच्या पाट्या वाचणे हे शिक्षण फार मोठे. पुणे-भोर, मुंबई-आटपाडी (पुणे, सातारा, कराड, विटा, भिवघाट मार्गे), परळ-भूम. त्यातून सर्वात इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे पाटीवरचे व्हायामार्गे. किंवा एकाच नावाची दोन-दोन गावे कळणे. कर्जत एक रायगडात, एक अहमदनगरात. हे शिक्षण पुस्तकातलं नाही, एस टी स्टँडवरचं. कोणत्याही गावात आज एस टी पोचलीये. आजही खेडोपाडी मुलांना मोठ्या गावातल्या शाळांच्या वेळा सांभाळता येतील अशा एस टी च्या फेर्‍या आखल्या आहेत. (पूर्वी आठवडाबाजाराची जादा गाडी असायची.) "गाव तिथे एसटी", "हात दाखवा गाडी थांबवा", "जनता गाडी" यातूनच एस टी ची सामान्य लोकांशी जवळीक जपतं, एस टी SMS वर वेळापत्रक देण्याची उडी मारतेय. आज व्यावसायिक गणितात, एस टी नफा दाखवतेयं, याचे श्रेय एस टी च्या कर्मचार्‍यांचेसुध्दा आहे. एकीकडे शहरांमधून स्पर्धात्मक व्यावसायिक सेवा देणे आणि दुसरीकडे सामाजिक बांधिलकीतून सेवा देणे, या तारेवरच्या कसरतीत एस टी ची आगेकूच चालू राहो. अधिक http://msrtc.maharashtra.gov.in/ http://www.loksatta.com/daily/20080531/rajay.htm

In reply to by अवन

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 18:39
आज एस टी साठाव्या वर्षात गेली , हे कळले तेव्हा वाट्ले, आपल्याच कुटुंबातल्या कोणीतरी साठी गाठली आहे. अगदी खरं! आम्हा को़कणवासीयांचं आणि यष्टीचं फार जिव्हाळ्याचं नातं आहे. गेली अनेक वर्ष यष्टीबाई आमची सेवा करते आहे! :) माझ्याही यष्टी महामंडळास लाख लाख शुभेच्छा! आपला, (परळहून सुटणार्‍या 'मुंबई-देवगड' लाल डब्याचा प्रेमी) तात्या.

अमोल केळकर Sat, 05/31/2008 - 11:00
आजही खेडोपाडी मुलांना मोठ्या गावातल्या शाळांच्या वेळा सांभाळता येतील अशा एस टी च्या फेर्‍या आखल्या आहेत. काही ठिकाणी ( मुख्यतः कोकणात) गावात येणार्‍या एस टी वरुन वेळेचा अंदाज बांधला जातो.

चतुरंग Mon, 06/02/2008 - 18:45
पूर्वी भरपूर प्रवास केलाय. माणसे - माणसे आणि गावे-गावे जोडणार्‍या यश्टीला आमचा सलाम आणि शंभरीच्या वाटचालीला शुभेच्छा! एक आठवण - माझा एक शाळूसोबती झक्कपैकी कंडक्टर (वाहक - काय छान शब्द आहे ना!) झाला तेव्हा आम्ही अचंबित झालो होतो (कारण वर्गमित्रांपैकी कोणी कंडक्टर वगैरे होऊ शकतो असे वाटलेच नव्हते. आपली नोकरीबाबत विचार करण्याची परिमिती किती सीमित असते हे कळून नंतर हसू आले!). नंतर तो वाहक असलेल्या गाडीतून ३-४ वेळा प्रवासाचा योग आला. गप्पा मारताना विचारले की ह्या नोकरीकडे कसा वळलास तेव्हा म्हणाला "मला माणसांची आवड. सतत लोकसंपर्कात रहायला इतकं चांगलं दुसरं ठिकाण कुठलं? शिवाय बोलायला फार कोणी नसलं तर तिकिटे वाटून झाली पुस्तकं वाचत बसतो." त्यानं त्याच्या पेटीतून चांगली चांगली मराठी पुस्तके काढून दाखवली. चतुरंग

महाराष्ट्राची जिवनरेखा........ नाही पणती नाही चिरा !! कालच्या लोकसत्ता मधील या बातमीने लक्ष वेधुन घेतले. याचा घोषवारा असा होता की ३१ मे ला आपल्या एस्.टी ला ६० वर्षे पुर्ण होणार आहेत. मात्र म.रा.प.म. आणी राज्य शासन यांना याचे अजिबात सोयर सुतक नाही. वाईट वाटले ही बातमी वाचुन. १ जुन १९४८ ला पुणे - अहमदनगर मार्गावर एस्.टी ची पहिली बस धावली. तेव्हापासुन आजपर्यंत आपल्या असंख्य बसेसद्वारे महाराष्ट्राच्या काना़कोपर्‍यात पोहचलेले एस्.टी चे जाळे अचंबीत करणारे आहे. लहाणपणी एस्.टी शी माझे जिव्हाळ्याचे नाते होते.

आमची संगीता

आनंद घारे ·

विसोबा खेचर Wed, 05/28/2008 - 09:54
हल्ली सगळं 'महा' असतं! 'महा'गायक, 'महा'गायिका, 'महा'अंतीम फेरी! :) स्वगत - 'महा'गायक, 'महा'गायिका म्हणजे काय असतं कुणास ठाऊक! एकदा आमच्या अण्णांना विचारलं पाहिजे! :) असो, संगीताला पुढील वाटचालीकरता 'महा'शुभेच्छा! अवांतर - मतांचा जोगवा मागण्याची ही पध्दत मला मनापासून आवडत नसली तरी या वेळेला मात्र 'आमच्या संगीता'ला भरभरून एसेमेस आणि फोनद्वारा मते मिळावीत मतांचा जोगवा नव्हे! मी त्याला मतांची 'भीक' असं म्हणेन!! (असो, प्रत्येकाची मतं!) अवांतर - या संदर्भात मी ही कविता लिहिली होती! तात्या.

अमोल केळकर Wed, 05/28/2008 - 11:38
त्यांचा आवाज चांगला आहे. त्यांनी गायलेली सर्व गाणी आवडली. संगीता चितळे तसेच श्री. यज्ञेश्वर लिंबेकर यांचे अभिनंदन आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा !! केळकर

प्रभाकर पेठकर Wed, 05/28/2008 - 14:06
त्यांचा आवाज चांगला आहे. त्यांनी गायलेली सर्व गाणी आवडली. संगीता चितळे तसेच श्री. यज्ञेश्वर लिंबेकर यांचे अभिनंदन आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा !! ......................डिट्टो.................................

मनस्वी Wed, 05/28/2008 - 14:13
संगीता चितळे तसेच श्री. यज्ञेश्वर लिंबेकर यांचे अभिनंदन. अवांतर : संगीता चितळे मुळ्ळी म्हणजे मुळ्ळीच ४० वर्षांच्या वाटत नाहीत. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Wed, 05/28/2008 - 14:19
संगीता चितळे मुळ्ळी म्हणजे मुळ्ळीच ४० वर्षांच्या वाटत नाहीत. हेच आम्ही म्हंटले असते तर लगेच 'गाणे ऐकता की गायिकेला बघत बसता. डर्टी माइंड..!' असे कोणीतरी ऐकवले असते.

वरदा Wed, 05/28/2008 - 17:43
पाहिलं नाही सारेगम..त्यांच्या गाण्याची यू ट्यूब वरची एखादी लिंक देईल का कुणी प्लीज?

चकली गुरुवार, 05/29/2008 - 00:02
इथे आहेत सा रे गा मा चे भाग अवांतर : इथे थोडेफार recipe videos पण आहेत. दुवा चकली http://chakali.blogspot.com

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 00:10
आता घरी जाऊन ऐकतेच नक्की.... बाकी संगीता ताईंना माझ्याही शुभेच्छा!

अणुशक्तीनगरातली वसाहत वसवायला नुकतीच सुरुवात झाली होती त्या सुमारासच आम्ही तिथे रहायला गेलो. त्या काळात वाहतूकीची आणि संपर्काची फारशी साधने उपलब्ध नव्हती. सगळेच रहिवासी नव्याने आलेले असल्यामुळे विशेष ओळखी नव्हत्या. त्यामुळे आपण आपल्या माणसांपासून दूर कुठल्या आडरानांत रहात असल्यासारखे वाटायचे. त्या कॉस्मोपॉलिटन वस्तीत आपल्या लोकांसारखी दिसणारी, बोलणारी आणि वागणारी माणसे भेटली की जरा चांगले वाटत असे. त्या काळात तिथे लिमये कुटुंबाची अशीच भेट झाली आणि स्नेह जमला. श्रीयुत त्यांच्या कामात मग्न असायचे तसेच त्यांना ब्रिज, बॅडमिंटन वगैरे खेळांची आवड होती. सौ. गृहकृत्यदक्ष गृहिणी होत्या.

अनादि मी अनंत मी...

विकास ·

धनंजय Wed, 05/28/2008 - 07:43
यातले अनेक शब्द रोजवापरात आलेले आहेत. ही असामान्य प्रतिभा म्हणावी.

आजानुकर्ण Wed, 05/28/2008 - 08:06
सावरकरांना वंदन त्यांच्या निष्ठांबद्दल शंका घेणे अगदी त्यांच्या शत्रूलाही शक्य नाही. (नम्र) आजानुकर्ण मात्र, भाषाशुद्धी ही भंपक कल्पना आहे असे माझे सध्या मत झाले आहे. :B एखाद्या शब्दाला पर्यायी म्हणून प्रतिशब्द सुचवणे योग्य. मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. #o अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. उदा. दूध, मासा, डुक्कर, कोंबडा असे रोजच्या वापरातले शब्द सोडून भाषाशुद्धी करून सोवळे केलेले दुग्ध, मत्स्य, वराह, कुक्कुट असे शब्द वापरण्याचा आग्रह भाषाशुद्धी करणारे सफाईकामगार करतात. #:S अशा''बदनामकोशांप्रीत्यर्थ' बनवलेल्या सरकारी (की शासकीय ;)) मराठी पासून जनता दूर राहणार नाही तर काय? (|: आपला, (स्पष्ट) आजानुकर्ण अवांतरः सावरकरांनी निर्माण केलेल्या शब्दांमधील किती शब्द मटामध्ये वापरले जातात याचा अभ्यास करायला हवा. ~X( आपला, (तौलनिक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Wed, 05/28/2008 - 08:32
अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. माधवरावांनी देशाकरता अवघा एक दिवस जरी कोलू पिसला असता तरी मूळव्याध कशी होते हे त्यांना लगेच समजले असते! कोलू राहिला दूर, आधी एक सबंध दिवस नारळ तरी सोलून दाखव, किंवा बिनधास्त भर समुद्रात उडी मारून दाखव, किंवा बेरीसायबाला त्याच्याच कैदेत असतांना निडरपणे, 'पण ब्रिटिश राजवट या देशात ५० वर्षे टिकेल काय?' हा प्रश्न विचारून दाखव आणि मग अगदी हव्वी तेवढी मतं मांड म्हणावं तात्यारावांबद्दल! आला मोठा मतं मांडणारा फोकलिचा!! =)) असो, बाकी चालू द्या! आपला, (कट्टर सावरकरभक्त!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन Wed, 05/28/2008 - 08:48
अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. माधवरावांनी देशाकरता अवघा एक दिवस जरी कोलू पिसला असता तरी मूळव्याध कशी होते हे त्यांना लगेच समजले असते!
सहमत आहे ... बाकी सावरकरांचे कर्तुत्व पहायचे सोडून असल्या फालतू गोष्टीकडे आवर्जून लक्ष देणे ह्यालाच कदाचीत "काँग्रेसी मानसीकता" म्हणत असावेत ... असो. विषयांतर नको ... "न घेतले हे व्रत अंधतेने " अशी भुमीका असणार्‍या "स्वातंत्रसुर्य तात्याराव सावरकरांच्या " स्मॄतीस आमचे अभिवादन ... (कट्टर सावरकरभक्त!) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण Wed, 05/28/2008 - 10:17
कोलू पिसण्याचा आणि भाषाविषयक धोरणांचा काही संबंध म्या अडाण्याला स्पष्ट कराल का तात्यासाहेब. (वरच्या आळीतला) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आंबोळी Wed, 05/28/2008 - 11:15
अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. सावरकरानी जेवढे म्हणुन प्रती शब्द दिलेत ते शक्यतो मराठी शब्दच दिले आहेत. जिथे शक्य नाही तिथे आई (संस्कृत ही मराठीची आईच)कडून काही शब्द घेतले तर काय बिघडले? का त्यानी फारसी वा अरबी भाषेतील शब्द घ्यायला पाहिजे होते? इंग्रजी, फारसी,उर्दू,अरबी शब्द काढून संस्कृतप्रचूर शब्द दिल्याने मराठीचे अत्यंत नुकसान कसे काय झाले? अंदमानात कोलू पिसत असतानाही मातृभूमी आणि मातृभाषे बद्दल विचार करणार्‍या महामानवाला वंदन!

In reply to by आंबोळी

आजानुकर्ण Wed, 05/28/2008 - 11:34
दिनांक क्रमांक उपस्थित प्रतिवृत्त नगरपालिका महापालिका महापौर पर्यवेक्षक विश्वस्त त्वर्य/त्वरित गणसंख्या स्तंभ मूल्य शुल्क हुतात्मा निर्बंध शिरगणती विशेषांक सार्वमत झरणी नभोवाणी दूरदर्शन चित्रपट मध्यंतर अर्थसंकल्प क्रीडांगण प्राचार्य विधिमंडळ क्रमांक बोलपट नेपथ्य वेशभूषा दिग्दर्शक प्राध्यापक मुख्याध्यापक शस्त्रसंधी टपाल दूरध्वनी ध्वनिक्षेपक परीक्षक तारण संचलन गतिमान नेतृत्व सेवानिवृत्त वेतन यापैकी कोणते शब्द संस्कृतशी संबंध नसलेले पण तरीही मराठी आहेत हे सांगू शकता का? संस्कृत ही मराठीची आई आहे. मग फारसी आणि अरबी काय पूतना मावश्या आहेत का? ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? याउलट त्वर्य, हुतात्मा, मूल्य या अवघड शब्दांमुळे सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते. आपला (पूतनामामा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आंबोळी Wed, 05/28/2008 - 13:14
मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? इथे प्रश्न नुकसान भरून निघण्याचा नसून तुम्ही उपस्थीत केलेल्या मराठीचे अत्यंत नुकसान झाले याचा आहे. या शब्दांमुळे असे काय नुकसान झाले हो मराठीचे? आणि पुतनामावशी अरबी/फारसी शब्द वापरुन असा काय फायदा होणार होता मराठीचा? त्वर्य, हुतात्मा, मूल्य हे शब्द जर अवघड आहेत तर प्लेबिसाइट,अर्जंट,शहीद वगैरे शब्द सोप्पे कसे ते ही सांगा. सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते. आयला..... मग मराठीला बिचकून ते कुठली भाषा वापरतात? अरबी , फारसी की इंग्रजी?

In reply to by आंबोळी

प्रियाली Wed, 05/28/2008 - 18:06
मराठीचे नुकसान असे झाले की संस्कृताशी नाळ नसणारा बहुजन समाज मराठीपासून बिचकून राहू लागला. हे विधान खोटं वाटत असेल तर बिरूटेसरांनी येथे येऊन हे खोटे आहे हे सांगावे - मी बिरूटे सरांना मनोगतावर फक्त आवडले, बरे वाटले असे मोजके प्रतिसाद देताना पाहिले आहे. मला तर एकदा ती कोणाची तरी खुशमस्करी ओळख असावी असे वाटले होते. हळू हळू उपक्रमावर आणि मिपावर - मराठीच्या बोजडीकरणावर ताशेरे ओढले जाऊ लागले तेव्हा सरांची प्रतिभा आम्हाला कळू लागली.

In reply to by प्रियाली

आंबोळी Wed, 05/28/2008 - 18:22
मराठीचे नुकसान असे झाले की संस्कृताशी नाळ नसणारा बहुजन समाज मराठीपासून बिचकून राहू लागला. यात संस्कृतच्या नाळेचा काय संबंध? आणि संस्कृताशी नाळ नसल्याने मराठीपासून बिचकून रहाणारा बहुजन समाज अरबी फारसी इंग्रजी शब्दाला का बिचकत नाही ? का त्याची नाळ या भाषांशी जोडली गेली आहे?

In reply to by आंबोळी

प्रियाली Wed, 05/28/2008 - 18:29
का कळून घ्यायचं नाहीये...म्हणजे कळून घ्यायचं नसेलच तर हा शेवटचा प्रतिसाद.
आणि संस्कृताशी नाळ नसल्याने मराठीपासून बिचकून रहाणारा बहुजन समाज अरबी फारसी इंग्रजी शब्दाला का बिचकत नाही ? का त्याची नाळ या भाषांशी जोडली गेली आहे?
संस्कृतातून आणलेले नवे शब्द नकोत म्हणजे अरबी, फारसीतील हवे असे कोणी म्हटले आहे? जरा दाखवाल का? तसे नसल्यास हा उगीच शब्दच्छल कशाला? इंग्रजी भाषा भारतात वापरली जाते. तिची परिस्थिती संस्कृत, अरबी किंवा फारसीप्रमाणे नाही तेव्हा तिला एकाच तागडीत का तोलताय?

In reply to by प्रियाली

आंबोळी Wed, 05/28/2008 - 18:49
संस्कृतातून आणलेले नवे शब्द नकोत म्हणजे अरबी, फारसीतील हवे असे कोणी म्हटले आहे? जरा दाखवाल का? भाषाशुद्धी ही भंपक कल्पना आहे असे माझे सध्या मत झाले आहे.ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? हे मामासाहेबांचे(कर्ण) वाक्य काय सुचवते? संस्कृतातून नवे शब्द आणा आणि अत्ता प्रचलित मराठी शब्दांच्या ऐवजी वापरा असेही कोणी म्हणत नाही (उदा.डुक्कराला वराह्,कोंबड्याला कुक्कुट). पण जे अरबी, फारसीतील शब्द मराठीत होते त्याला सावरकरानी संस्कृतप्रचूर शब्द (जे अरबी फारसी पेक्षा मराठीला नक्किच जवळचे आहेत)दिले तर काय बिघडले? वाद सुरु झाला तो सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे (हे मी परत परत सांगतोय) या वाक्या वरुन. सावरकरानी जे फारसी/अरबी/इंग्रजी शब्दांच्या ऐवजी संस्कृतप्रचूर शब्द मराठी भाषेत आणले त्याने मराठीचे असे काय नुकसान झाले?

In reply to by आंबोळी

प्रियाली Wed, 05/28/2008 - 18:59
पण जे अरबी, फारसीतील शब्द मराठीत होते त्याला सावरकरानी संस्कृतप्रचूर शब्द (जे अरबी फारसी पेक्षा मराठीला नक्किच जवळचे आहेत)दिले तर काय बिघडले?
हे तुम्हाला वाटते, अनेकांना तसे वाटत नसेल ही कल्पना सहन होत नाही का पटत नाही? मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. उदाहरण बाजूच्या चर्चेत दिलेले आहे.
वाद सुरु झाला तो सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे (हे मी परत परत सांगतोय) या वाक्या वरुन. सावरकरानी जे फारसी/अरबी/इंग्रजी शब्दांच्या ऐवजी संस्कृतप्रचूर शब्द मराठी भाषेत आणले त्याने मराठीचे असे काय नुकसान झाले?
या वाक्यावरून वाद सुरू झाला म्हणून वाद वाढवण्यासाठी टॉल क्लेम्स करावेत असे आहे काय?

In reply to by प्रियाली

आंबोळी Wed, 05/28/2008 - 19:13
मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. अहो प्रियाली ताई हेच तर सांगतोय मी..... तुम्हाला अरबी-फारसी शब्द जवळचे वाटतायत तर तुम्ही ते वापरा. सावरकराना संस्कृत शब्द जवळचे वाटले म्हणुन त्यानी ते आणले.... दोघांच्याही मराठीप्रेमाविषयी शंका घेण्याचा प्रश्नच असु नये... पण सावरकरानी मराठीचे नुकसान केले अश्या दुगाण्या लोक का झाडातायत ?

In reply to by प्रियाली

मराठी भाषेचा स्वतंत्र असा प्रवास होईपर्यंत संस्कृत शब्दांनी, रचनांनी, मराठीची दुर्दशाच झाली असे वाटायला लागते. प्रमाण संस्कृत जेव्हा बोलल्या जात असावी तेव्हा बहुजनांना इतर भाषेकडे वळवले असले तरी प्रारंभीच्या मराठीला संस्कृत शब्दांच्या भरणांमुळे बीचकावे लागेल अशी अवस्था नक्कीच असेल, तसे नसते तर प्राकृत बरोबरचा मराठी भाषेचा प्रवास अधिक जोमदारपणे झाला असता असे म्हणन्यास हरकत नसावी असे वाटते. मी बिरूटे सरांना मनोगतावर फक्त आवडले, बरे वाटले असे मोजके प्रतिसाद देताना पाहिले आहे. मला तर एकदा ती कोणाची तरी खुशमस्करी ओळख असावी असे वाटले होते. हळू हळू उपक्रमावर आणि मिपावर - मराठीच्या बोजडीकरणावर ताशेरे ओढले जाऊ लागले तेव्हा सरांची प्रतिभा आम्हाला कळू लागली. इतिहासाच्या एका जाणकार अभ्यासकांने, सतत ज्यांचे प्रतिसाद अभ्यासपूर्ण असतात, अनेक ऐतिहासिक संदर्भासहीत लेखन असते, अशा लेखन करणा-या एका लेखकाने केलेले कौतुक अभ्यासाचे बळ देते. आपले मनापासून आभार !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by आंबोळी

प्रियाली Wed, 05/28/2008 - 15:13
तर मग महाराष्ट्री, फारसी, मागधी, पाली, पैशाची कोण बॉ? बाप का काय? तसे असल्यास एक आई आणि इतके बाप असणार्‍या पोरास काय म्हणतात हे सांगणे न लगे. तेव्हा उगीच टॉल क्लेम्स नकोत. बाकी, सावरकरांना प्रणाम. त्यांनी आपल्या परीने कार्य केले. त्यांनी दिलेले सर्व शब्द स्वीकारावे असे तर नाही. जे शब्द रूजू होतात ते आपोआप स्वीकारले जातात, जे होत नाहीत ते मागे पडतात. भाषा ही मारून मुटकून तयार करता येत नाही. ती प्रवाही राहून वाहताना शब्द स्वीकारत-नाकारत जाते.

In reply to by अभिज्ञ

प्रियाली Wed, 05/28/2008 - 15:52
"अभियांत्रिकी" ह्या शब्दाला "फारसी,मागधी,पाली भाषेतील पर्यायी शब्द सांगाल का.
या भाषांत विशेषतः फारसीत असे शब्द नसावेत का? आणि नसतील तर का नाहीत याचा जरा विचार करा. संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. मला फारसी, मागधी, पाली भाषा येत असत्या तर शब्द जरूर सांगितला होता. दुर्दैवाने, शाळेत संस्कृतच शिकवली, तरीही एखाद्या मराठी शब्दाला संस्कृत शब्द सुचवा असे सांगितले तर तेही मला जमायचे नाही. असो, तुमची शंका हास्यास्पद आहे.

In reply to by प्रियाली

अभिज्ञ Wed, 05/28/2008 - 16:48
या भाषांत विशेषतः फारसीत असे शब्द नसावेत का? आणि नसतील तर का नाहीत याचा जरा विचार करा. फारसीत एखादा शब्द नाही तर का नाही याची चिंता मराठी लोकानी कशाला करावी? हे कळत नाही... आणि मग फारसीच का? हिब्रु, स्वाहीली, सिंहली झालेच तर आफ्रिकेतील भाषा यांचा विचार का नाही करायचा? असो. विषय फारच भरकटत चाललाय.... आक्षेप फक्त सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे या वाक्याला आहे. असे शब्द वापरुन मराठीचे अत्यंत नुकसान काय झाले? अवांतरः यातून फक्त मिसळ्पाववर वाद चालू करणे या पलिकडे मला तरी काहिच उद्देश दिसत नाही. अतिअवांतर :१) संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. म्हणजे संस्कृत येत असणार्‍यानी मारुन मुटकून बाकीच्या भाषांची गळचेपी केली. २)भाषा ही मारून मुटकून तयार करता येत नाही. ती प्रवाही राहून वाहताना शब्द स्वीकारत-नाकारत जाते. ही परस्पर विरोधी वाक्ये टाकण्यामागचे प्रयोजन कळाले नाही. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

आंबोळी Wed, 05/28/2008 - 17:01
आक्षेप फक्त सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे या वाक्याला आहे. असे शब्द वापरुन मराठीचे अत्यंत नुकसान काय झाले? अवांतरः यातून फक्त मिसळ्पाववर वाद चालू करणे या पलिकडे मला तरी काहिच उद्देश दिसत नाही. सहमत. प्रशासकीय सेवेतील लोकाना जाज्वल्य देशा/भाषाभिमानापेक्षा सेवा महत्वाची असते.

In reply to by अभिज्ञ

प्रियाली Wed, 05/28/2008 - 18:43
फारसीत एखादा शब्द नाही तर का नाही याची चिंता मराठी लोकानी कशाला करावी?
मग संस्कृतात तरी का करावी? मजेशीरच दिसताय.
ही परस्पर विरोधी वाक्ये टाकण्यामागचे प्रयोजन कळाले नाही.
आणि चष्मे उतरवल्याशिवाय कळणारही नाही. मारून मुटकून भाषेची गळचेपी करणे आणि मारून मुटकून भाषा तयार करणे या एकच गोष्टी आहेत काय? हाहा!!

In reply to by प्रियाली

कदाचित तुम्हाला नसेल अभिमान संस्कृतचा, तुम्हाला वाटत असतील फारसी आणि काय त्या भाषा मराठीच्या जनन्या. पण काही लोकाना संस्कृत जवळची वाटते त्यात तात्याराव पण आलेच, त्याना तुम्ही संस्कृताचे चष्मे चढवलेले लोक म्हणता. मग मला तर तुम्ही फारसीचे आणि काय त्या भाषांचे चष्मे चढवून स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या वाटता. तुम्ही एखाद्याला चष्मा काढायला सांगत असाल तर तो तुम्हीदेखील स्वतः सर्वप्रथम काढला पाहीजे. दुसर्‍याला उपदेश करणे सोपे असते पण स्वतः ते आचरणात आणणे अवघड असते. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रियाली Wed, 05/28/2008 - 20:25
कदाचित तुम्हाला नसेल अभिमान संस्कृतचा, तुम्हाला वाटत असतील फारसी आणि काय त्या भाषा मराठीच्या जनन्या.
हे कशाला माझ्या नावावर थोपवताय? मी कोणालाच कोणाची जननी म्हटल्याचे आठवत नाही.
पण काही लोकाना संस्कृत जवळची वाटते त्यात तात्याराव पण आलेच, त्याना तुम्ही संस्कृताचे चष्मे चढवलेले लोक म्हणता. मग मला तर तुम्ही फारसीचे आणि काय त्या भाषांचे चष्मे चढवून स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या वाटता. तुम्ही एखाद्याला चष्मा काढायला सांगत असाल तर तो तुम्हीदेखील स्वतः सर्वप्रथम काढला पाहीजे.
संस्कृताचा चष्मा!!! हे कधी म्हटले? चष्मे कसले हे आधी कळून घ्या आचरटपणाची धन्य आहे. :=)) पेशव्यांकडून आणि काय अपेक्षा असणार म्हणा.

In reply to by प्रियाली

तर मग महाराष्ट्री, फारसी, मागधी, पाली, पैशाची कोण बॉ? बाप का काय? तसे असल्यास एक आई आणि इतके बाप असणार्‍या पोरास काय म्हणतात हे सांगणे न लगे. तेव्हा उगीच टॉल क्लेम्स नकोत. हे कशाला माझ्या नावावर थोपवताय? मी कोणालाच कोणाची जननी म्हटल्याचे आठवत नाही. वरील विधाने आपल्याच वेगवेगळ्या प्रतिसादातून निवडली आहेत. आता ठरवा बुवा आचरट कोण ते. संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. संस्कृताचा चष्मा नाही का? मग कोणता बरे??? संस्कृत मराठीची आई हा संस्कृताचा चष्मा नाही होत का? वा! मला चष्मे कळत नाहीत का ! असेल बॉ.. आम्ही नाही ना तुमच्यासारखे भाषातज्ञ. संस्कृताचा चष्मा!!! हे कधी म्हटले? चष्मे कसले हे आधी कळून घ्या आचरटपणाची धन्य आहे. : पेशव्यांकडून आणि काय अपेक्षा असणार म्हणा. आपण हसे लोकाला आणि *** आपल्या नाकाला. अशी सध्या गत तुमची मला वाटत आहे. हे तुम्हाला वाटते, अनेकांना तसे वाटत नसेल ही कल्पना सहन होत नाही का पटत नाही? मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. उदाहरण बाजूच्या चर्चेत दिलेले आहे. अहो आता 'संस्कृताला मराठीची जननी' म्हटलेले तुम्हाला नाही ना सहन होत तसेच आहे इतरांचे. त्याना उगाच पाली का फारसी काय त्या भाषा मराठीच्या जनन्या का काय ते म्हटलेले नाही सहन होत. (आचरट) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मन Wed, 05/28/2008 - 20:28
बर्‍याच अंशी सहमत. आजही जर मराठीतील मूळ शब्द काढुन पाहिले, तर संस्कृत शब्दांचा किंवा संस्कृत मधुइन आलेल्या शब्दांचा भरणा जास्त असावा असं वाटतं. अगदि लेखन शैली पासुन. मराठी डाविकडुन उजवीकडे लिहितात (संस्कृत प्रमाणे) अरबी उजवीकडुन डावीकडे. मराठित अरबी शब्द आले, त्या काळात आख्ख्या भारतावर इस्लामिक पगडा चढला होता. खुद्द मोठ मोठ्या मराठा सरदारांची नावं पीर्-जी, शेखु-जी,शहा-जी,मौला-जी अशी ठेवली जात होती. (मग इथल्या भाषेमध्ये या शब्दांचा प्रवेश झाला त्यात नवीन काय?) आता ती/तशी नावं सुद्धा अगदि मराठी संस्कृतीला धरुन आहे का? तशी नावं तुम्ही आज ठेवाल का? आपलाच, मनोबा

In reply to by अभिज्ञ

"अभियांत्रिकी" ह्या शब्दाला "फारसी,मागधी,पाली भाषेतील पर्यायी शब्द सांगाल का. अभियांत्रिकी, या शद्बाला पाली भाषेत ' सिप्पस्तथ्य' असा शब्द आहे. सिप्प = शिल्प स्तथ्य = शास्त्र शिल्पशास्त्र . बाकी भाषेचे जाणकार भेटल्यावर 'अभियांत्रिकी' शब्दास पर्यायी शब्द असल्यास इथे नक्कीच टंकेन :) चुभुदेघे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by अभिज्ञ

मन Wed, 05/28/2008 - 17:58
"अभियांत्रिकी"चे पर्यायी शब्द या भाषांत आहेत ते:- फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- बिरुटे सरांनी दिलेला शब्द स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हां मिळाले? आता सांगा,हे शब्द कशासाठी हवे आहेत? मला तरी ह्या "अभियांत्रिकी"साठी पर्यायी शब्द शोधत बसायचं प्रयोजन कळलं नाही. आपण स्पष्ट केलत, तर खरच बर होइल. आपलाच, मनोबा

In reply to by मन

अभिज्ञ Wed, 05/28/2008 - 18:13
फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- सिप्पस्तथ्य स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हे शब्द दिल्या बद्दल श्री मनोबा व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना धन्यवाद. हे शब्द "कर्णाला" (कानाला) अवघड वाटतायत की अभियांत्रिकी अवघड वाटतोय? अभिज्ञ

In reply to by आजानुकर्ण

सहज Wed, 05/28/2008 - 09:03
>>सावरकरांना वंदन त्यांच्या निष्ठांबद्दल शंका घेणे अगदी त्यांच्या शत्रूलाही शक्य नाही. धन्यवाद (नम्र) आजानुकर्ण साहेब!! वरच्या निष्कर्षाप्रत यायला तुम्हाला एकदा तरी तुमचा "शंकाचिकित्सक" सुरु करण्याचा त्रास झाला त्याबद्दल मात्र क्षमस्व.

In reply to by सहज

विसोबा खेचर Wed, 05/28/2008 - 09:16
धन्यवाद (नम्र) आजानुकर्ण साहेब!! वरच्या निष्कर्षाप्रत यायला तुम्हाला एकदा तरी तुमचा "शंकाचिकित्सक" सुरु करण्याचा त्रास झाला त्याबद्दल मात्र क्षमस्व. हा हा हा! हे मस्त! :))

In reply to by आजानुकर्ण

विकास Wed, 05/28/2008 - 09:26
सावरकरांनी सुचवलेली भाषाशुद्धी ही परभाषेतील शब्दांना मराठी भाषेत प्रतिशब्द तयार करण्यासंदर्भात होती. त्यात त्यांना जे वाटले तसे शब्द त्यांनी तयार केले. प्राकृत भाषेतील शब्दांना संस्कृतप्रचूर केल्याचे ऐकलेले नाही. आपण म्हणलेल्या शब्दांबद्दल (दूध, मासा, डुक्कर, कोंबडा इत्यादी) आणि त्यांच्या नेहेमीच्या वापराबद्दल त्यांना काही पडले असेल असे वाटत नाही. अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. म्हणजे इतर भाषातज्ञ आणि भाषावैज्ञानिकांनी म्हणलेले बरोबर ... बरं मग अशा भाषातज्ञांचे नक्की योगदान तरी काय? माधवरावांच्या मराठी भाषेतील योगदानाबद्दल शंका नाही, पण जी व्यक्ती टोपणनाव पण "जुलीयन" असे घेते त्यांना सावरकरांची भाषा कशी आवडणार हा एक प्रश्न येतोच. बाकी सरकारने शासकीय मराठी भाषा तयार करताना काय केले हा वेगळाच मुद्दा आहे. त्यांच्या हयातीत तर तमाम काँग्रेसची सरकारे होती - ज्यांना सावरकरांबद्दल फार प्रेम होते अशातला भाग नाही... म्हणून आपण म्हणत असलेला मुद्दा योग्य जरी वाटला तरी सावरकरांसंदर्भात (आणि या लेखा/चर्चेसंदर्भात) थोडाफार अवांतर वाटला. अवांतरः सावरकरांनी निर्माण केलेल्या शब्दांमधील किती शब्द मटामध्ये वापरले जातात याचा अभ्यास करायला हवा. हे बाकी बरोबर. त्यासाठी मूळ बातमीतील खालील परीच्छेद वाचल्यावर त्यांच्या इतर लेखात/बातम्यात काय अवस्था असते असा विचार माझ्याही डोक्यात आला होता...
आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. ‘ यू नो ’ , ‘ यू सी ’ हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं.

In reply to by विकास

आजानुकर्ण Wed, 05/28/2008 - 10:21
धन्यवाद विकासराव, तुमचा प्रतिसाद जरा संयमित आणि भक्तीच्या नशेखाली दिलेला नाही असे दिसते पण
पण जी व्यक्ती टोपणनाव पण "जुलीयन" असे घेते त्यांना सावरकरांची भाषा कशी आवडणार
हे वाचून आश्चर्य वाटले. एका सावरकरभक्ताला दुसरा सावरकरभक्त माहिती नसावा. अरेरे! अहो सावरकरांचाच वारसा अनेक वर्षे त्यांनी पुढे चालवला आणि उतारवयात आपले भाषाविषयक धोरण चुकीचे आहे ही जाणीव झाल्यावर भाषाशुद्धीवर सडकून टीका केली आणि पुन्हा म्लेंच्छ आणि यवनांचे फारसी-अरबी शब्द जोमाने वापरले. (चकित) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास Wed, 05/28/2008 - 19:46
हे वाचून आश्चर्य वाटले. एका सावरकरभक्ताला दुसरा सावरकरभक्त माहिती नसावा. अरेरे! सर्वप्रथम मी माधव ज्युलीयनना सावरकरांचे शत्रू अथवा विरोधक वगैरे म्हणले असे मला तरी वाटत नाही. माझा मुद्दा सरळ होता, जो माणूस स्वतःच्या टोपण नाव म्हणून "ज्युलीयन" हा शब्द वापरतो त्याचे भाषा विषयी सावरकरांशी मतभेद असले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. शिवाय माझे तेथे असेही म्हणणे होते की जे कोणी भाषाततज्ञ वगैरे आहेत (ज्यांचे सावरकरांशी त्या संदर्भात मतभेद होते, असे) त्यांचे नक्की भाषेच्या बाबतीत एक तज्ञ म्हणून योगदान काय होते? पण, आपण ह्या मूळ मुद्यांना बुद्धीवादीपणा दाखवण्याच्या नशेत बगल मारलीत. सावरकरांना वाटले की मराठी भाषेत परभाषेतील शब्दांना समान तयार शब्द होऊ शकतात आणि त्यामुळे मराठी भाषा समृद्ध होऊ शकते, त्यांनी तसे केले. त्यावर आपला आक्षेप काय, तर, "यापैकी कोणते शब्द संस्कृतशी संबंध नसलेले पण तरीही मराठी आहेत हे सांगू शकता का? ... ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? याउलट त्वर्य, हुतात्मा, मूल्य या अवघड शब्दांमुळे सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते." म्हणजे आपला मुद्दा हा संस्कृत भाषेवर आणि संस्कृत प्रचुर शब्द वापरले यावर आहे. बाकी त्वर्य हा शब्द मला माहीत नाही पण हुतात्मा आणि मूल्य हे शब्द नक्की कोणाला वापरताना बिचकायला होते ते माहीत नाही.... तसे म्हणाल तर "अजानु" आणि "कर्ण" असे दोन संस्कृतप्रचूर शब्द वापरून केलेले नाव देखील आम्हाला वापरताना बिचकायला होते (ह.घ्या.) तेंव्हा एखादे फार्सी नाव कसे सुचले नाही याचे पण आश्चर्य वाटते. तुम्हाला आवडो अथवा न आवडो, पण मराठी भाषेतील संस्कृतोद्भव शब्द हे वजा केल्यास ना धड तुम्हाला लिहीता येईल ना धड तुम्हाला आवडणारे अधुनीक अथवा संतसाहीत्य पुरे होऊ शकेल. "न लगे मुक्ती आणि संपदा" असे म्हणत तुकारामाने संस्कृत शब्द का वापरले, त्यामुळे सामान्य "हे ची दान देगा देवा" असे म्हणताना बिचकून जातात असे उद्या म्हणाल... (ह. घ्या.) थोडक्यात तुम्ही संस्कृतशी नाळ आहे असे माना अथवा मानू नका, तो केवळ शब्दच्छल आहे, पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. हे आपल्याला समजत नसेल तरच आश्चर्य आहे. आता थोडेफार भक्ती आणि नशेबद्दल मी काही कुणाएका भक्तसंप्रदायतील नाही ज्याचे जे आवडते/भावते त्याला तेथे हार घालायला मला कमी वाटत नाही. थोडक्यात ज्याच्यात जे चांगले दिसते त्याचे तेव्हढ्यापुरते गुणगान करतो. नाहीतर, "गुणगाईन आवडे हेची माझी सर्व जोडी" असे म्हणायचा मला अधिकार कसा राहील? आणि राहता राहीली नशा - त्यात काही फक्त भक्तीचाच सहभाग नसतो तर एखादी गोष्ट एकेरी पद्धतीने पाहत, मनात वेगवेगळी ओझी बाळगत आकसाने बघणार्‍या वृत्तीचापण सहभाग असतो, इतकेच म्हणावेसे वाटते.

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर Wed, 05/28/2008 - 21:46
ब्रिटीशांच्या राजवटी मध्ये इंग्रजीचा नको इतका पुरस्कार होणार आणि अनावश्यक इंग्रजी शब्द घुसडले जाणार हे निश्चितच आहे. हे 'अनावश्यक' शब्द काढून टाकून त्याला पर्यायी सुटसुटीत मराठी शब्द रुळवणे हे गरजेचे होते/आहे. त्यासाठी सावरकरांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. पण काही ठीकाणी हा आग्रह जेव्हा 'हट्ट' बनतो तेव्हा वाद उत्पन्न होतो. उदा. वरील यादीतील काही शब्द - झरणी - हा शब्द मी आयुष्यत कधीही वापरला नाही. 'शाईचे पेन' हा सुटसुटीत प्रकार शाळेत असल्यापासून वापारला. वेतन - 'पगार' हा रुळलेला (कोणत्या का भाषेतला असेना!) शब्द उपलब्ध असताना 'वेतन' हा (आणखी दुसरर्‍या भाषेतुन उधार आणलेला) शब्द लादण्याचे काय कारण? सावरकरांची राष्ट्रभक्ती/देशप्रेम वादातीत आहे (अजानुकर्ण ह्यांच्या प्रतिसादतील पहिले वाक्य देखिल असेच आहे) त्याची गल्लत भाषाशुध्दी प्रकल्पाशी का घातली ते समजले नाही.

In reply to by कोलबेर

विकास Wed, 05/28/2008 - 22:10
सावरकरांची राष्ट्रभक्ती/देशप्रेम वादातीत आहे (अजानुकर्ण ह्यांच्या प्रतिसादतील पहिले वाक्य देखिल असेच आहे) त्याची गल्लत भाषाशुध्दी प्रकल्पाशी का घातली ते समजले नाही. कारण सोप्पे आहे! लेख लिहीताना केवळ त्यांची १२५ वी जयंती आहे त्यानिमित्ताने नुसते अभिवादन लिहीण्याऐवजी आणि दरवेळेस त्यांची उडी अथवा अंदमान लिहीण्याऐवजी म.टा. मधे आयती शब्दांची यादी लिहीली होती ती येथे दिली आणि त्यांची एक वेगळीच ओळख दिली. पण झाले भलतेच. रामेश्वरची चर्चा सोमेश्वर जाऊन आदळली... सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना आणि त्यांना सक्रीयराजकारणात येण्याची बंदी असताना भाषाशुद्धि आणि इतर सामाजीक कामाने लोकजागृती सुरू केली. थोडक्यात जे काही शस्त्र हातात होते त्याचा उपयोग प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ब्रिटीशांच्या विरोधातील धार वाढवायला करणे हा उद्देश. झरणी हा शब्द आपण दाखवल्यावर वाचला आणि "व्हॉट अ पेन!" असे उद्गार डोक्यात आले :-) थोडक्यात प्रत्येक शब्द पटला पाहीजे असे कोण म्हणते? पण उद्देश समजणे महत्वाचे. पण त्या ऐवजी संस्कृत आणि इतर असला वाद चालू झाला. "रत्नागिरीला असताना सावरकरांकडे गुप्तपणे इतिहासकार र.गो.सरदेसाई त्यांना भेटायला गेले. तेंव्हा सावरकर त्यांना म्हणाले की लोकं मला भेटायला घाबरतात कारण असा एक समज आहे की माझ्याशी संबंध आला तर काही तरी त्रासच होणार, तेंव्हा तुम्ही कसे आलात? " बिचारे सावरकर पाचवीला पुजलेले वाद त्यांच्या १२५ व्या जयंतीला एका चर्चेत पण सुटू शकत नाहीत!

In reply to by विकास

मन Wed, 05/28/2008 - 23:02
>> बिचारे सावरकर पाचवीला पुजलेले वाद त्यांच्या १२५ व्या जयंतीला एका चर्चेत पण सुटू शकत नाहीत! +१. आपलाच, मनोबा

स्वातंत्र्यवीराला माझे शतशः प्रणाम. तात्यांचा भाषाशुद्धीचा प्रयत्न खरोखरच फार उत्तम आहे असे वाटते. एखाद्या शब्दाला पर्यायी म्हणून प्रतिशब्द सुचवणे योग्य. मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. मुळात मग नवीन शब्द सुचवण्याचे प्रयोजनच काय जर तो वापरायचा नसेल तर? मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. आणि वरील मते ही फक्त आपल्यालाच भाषेतले काहीतरी कळते असा पुरोगामी अहंकार जोपासणार्‍याची असतात असे मला वाटते. अशा''बदनामकोशांप्रीत्यर्थ' बनवलेल्या सरकारी (की शासकीय ) मराठी पासून जनता दूर राहणार नाही तर काय? असाच एक बदनाम कोष शिवाजी महाराजानी 'राज्यव्यवहारकोष'या नावाने मराठी भाषा फारसीच्या प्रभावापासून मुक्त करण्यासाठी तयार करवून घेतला होता. त्यामुळे भाषाशुद्धीचा प्रयत्न मला मुळीच भंपक वाटत नाही. (सनातनी) पुण्याचे पेशवे

प्रमोद देव Wed, 05/28/2008 - 08:57
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी केलेल्या महान कार्याच्या १लक्षांश जरी कार्य आपल्या सारख्यांना करता आले तरी आपण कृतकृत्य होऊ. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. काही क्षुद्र जंतुंनी त्यांच्याविरुद्ध काहीही अकलेचे तारे तोडले तरी सावरकरांची थोरवी यत्किंचतही कमी होत नाही . अर्थात असे करण्यात त्या संबंधित लोकांनी मात्र "मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. :) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर Wed, 05/28/2008 - 09:14
काही क्षुद्र जंतुंनी त्यांच्याविरुद्ध काहीही अकलेचे तारे तोडले तरी सावरकरांची थोरवी यत्किंचतही कमी होत नाही . सहमत आहे! अर्थात असे करण्यात त्या संबंधित लोकांनी मात्र "मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. अवांतर - फडके, टिळक, चाफेकर, सावरकर, कान्हेरे, या मंडळींनीही मधल्या आळीला अभिमान वाटावा असे कर्य केले आहे! :) असो, आपण विषय काढलात म्हणून चोख उत्तर द्यावं लागलं, नाहीतर आम्हाला कोणत्याही आळीत शिरण्याची काहीही आवश्यकता नव्हती! मिसळपाव डॉट कॉम जातपातविषयक लेखन एन्करेज करत नाही! तात्या.

राजे Wed, 05/28/2008 - 09:00
स्वातंत्र्यवीराला माझे शतशः प्रणाम. !!!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रमोद देव Wed, 05/28/2008 - 09:54
"मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. हे पुलंचे वाक्य आहे आणि ते कोणत्या संदर्भातले आहे हे मी तात्यासारख्या भाईकाका भक्ताला सांगावे लागतेय हे काही बरे नाही. मधल्या आळीतल्या लोकांच्या गुणांना नव्हे तर अवगुणांना उद्देशून हे वाक्य आहे.(हिणकस शेरा मारण्याची वृत्ती) बाकी वैयक्तिक रित्या मी जातीपातींचा समर्थक मुळीच नाही हेही इथे नमूद करतो. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

आजानुकर्ण Wed, 05/28/2008 - 10:12
भाषाशुद्धीच्या नावाने गावगोंधळ घालणार्‍यांना माधव जूलियन हे स्वतः भाषाशुद्धिसाठी झटणारे होते हे माहिती नसावे हे दुर्दैव व त्यांच्या अडाणीपणाचे प्रदर्शन करणारे आहे. सावरकरांपासून प्रेरणा घेऊन माधवरावांनी भाषाशुद्धीची चळवळ चालवली आणि स्वतःच्या चांगल्या कवितांची वाट लावली. भाषाशुद्धीबाबतची इथली एकूण जाणीव आणि चर्चेची एकंदर बौद्धिक पातळी आता आमच्या लक्षात आली आहे. केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते आपला, (समजूतदार) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Wed, 05/28/2008 - 10:31
भाषाशुद्धीबाबतची इथली एकूण जाणीव आणि चर्चेची एकंदर बौद्धिक पातळी पातळी कुणाची काढतोस रे? जा की मग उच्च पातळी असलेल्यांकडे! विषय आहे तो तात्यारावांनी इंग्रजी भाषेतल्या काही शब्दांकरता मराठी भाषेत काही शब्द सुचवले आहेत याचा! मूळ विषय काय आहे हे लक्षात न घेता विकासरावांनी म्हटल्याप्रमाणे अवांतर लेखन करणार्‍यांनी प्रथम स्वत:ची बौद्धिक पातळी पाहावी आणि मग इतरांना पातळीच्या गप्पा शिकवाव्यात! केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते हो! काय म्हणणं आहे मग? तात्या.

गणा मास्तर Wed, 05/28/2008 - 10:20
मिसळपाव डॉट कॉम जातपातविषयक लेखनाला प्रोत्साहन देउ नये. सावरकरांचे जातपातनिर्मुलन कार्य पण लक्षात घ्यायला हवे. रत्नगिरीतले 'पतित पावन मंदीर' याची साक्ष देत उभे आहे.

आजानुकर्ण Wed, 05/28/2008 - 10:49
आमचे काही प्रतिसाद उडालेले दिसताहेत :) आपला, (संशोधक) आजानुकर्ण

नीलकांत Wed, 05/28/2008 - 10:55
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, मराठी तसेच भारतीय तरूणांना क्रांतीकार्यासाठी प्रेरणास्त्रोत निर्माणाचे कार्य, भारतीय समाजातील जातीपाती निर्मुलनासाठी कार्य, त्यांचा मुळातच लढवय्या असलेला स्वभाव, त्याचे लेखन, काव्य आदी क्षेत्रातील वावर, त्यांना मराठीचा असलेला अभिमान.... या सर्वांचा मी चाहता आहे. नीलकांत

विसुनाना Wed, 05/28/2008 - 14:19
स्वातंत्र्यवीराला माझे कोटी,कोटी प्रणाम... म.टा. ऑनलाईन पुरवणीची 'सलाम सावरकर' ही पंचलाईन खटकली. 'प्रणाम सावरकर' असे योग्य दिसले असते. मी संस्कृताळलेला आहे असे समजू नये. सावरकरांना ते अधिक आवडले असते, नाही का? - बस, इतकेच!

शशांक Wed, 05/28/2008 - 14:19
सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे
स्तंभ, मूल्य, शुल्क, वेशभूषा, परीक्षक, गतिमान, नेतृत्व हे शब्द 'निर्माण' (तयार?) केलेले वाटत नाहीत. वेतन या शब्दाविषयी नक्की माहीत नाही पण हा शब्द हिंदीतही वापरला जातो. (उदा. वेतन तो हम पूरा लेंगे, दंड चाहे दस बार कर लिजिये - चुपके चुपके) बातमीदाराने कश्याच्या आधाराने हे लिहिले आहे ते नमूद केलेले नाही. बातमीतील "इतर (फारसी/इंग्रजी) भाषांमधील शब्द म्हणजे आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत" हा विचार काही पटला नाही.

भोचक Wed, 05/28/2008 - 15:15
भाषाशुद्धीचा उहापोह पुष्कळच झाला आहे. त्याची मुख्य सुत्रे दोन १. आपल्या भाषेत ज्या अर्थाचे शब्द होते, आहेत किंवा उद्भवणे सुसाध्य आहे, अशा अर्थाचे परकीय शब्द काय ते आपण वापरू नयेत. मग ते जुने असोवत वा नवे. आपले तदर्थक शब्द मारून जे परशब्द रूळतात त्याने काही आपली शब्दसंपत्ती वाढत नाही. २. ज्या अर्थाचे शब्द त्या वस्तू आपल्याकडे नसल्याने मुळातच नाहीत किंवा नवी न पाडणे शक्य नाही, असे परकीय शब्द वापरण्यास आडकाठी नाही. जसे. कोट, बूट आदी. ही भाषाशुद्धीची दोन सुत्रे नीट वाचून लक्षात ठेवली तर तिच्यावर घेतले जाणारे ९० टक्के आक्षेप आपोआप नाहीसे होतील. याच तत्वाला अनुसरून मी अनेक नवे मराठी शब्द निर्मिले आहेत. (सावरकर विविध भाषणे पुस्तकातून)

मन Wed, 05/28/2008 - 16:07
थोर कार्य्,प्रेरणादायक आणि मार्गदर्शक विचार. ह्याशिवाय काय म्हणणार. बाकी, "भाषा शुद्धी"चा विषय काढुन त्यांचे उणे-दुणे काढणं म्हणजे जरा जास्तिच वाटतयं. हे म्हणजे, "शिवाजी जर आठ-आठ बायका करुन रामाचा आदर्श मोडणार असतील, तर थोर कसे ठरतात? " किंवा "जर गौतम बुद्ध आनी त्याचं अहिंसा तत्वज्ञान महान असेल, तर त्याची पायमल्ली करणार्‍यांना नराधम का म्हणु नये"? (किंवा हिंसा करणारे महान असतील अतर बुद्धाला कमी का लेखु नये?) असले प्रश्न विचारण्यासारखं आहे. किंवा आणखी एक उदाहरण म्हणजे:- "शिवाजीनं थेट युद्ध न करता दगाबाजीनं शाहिस्त्यास हाणला. आपल्याच आश्रयदात्या पुरंदराच्या किल्लेदारास बंदी करुन किल्ल्यावर कब्जा केला. कित्येक तह्,वाटाघाटी चुटकीसरशी मोडल्या." हे कसं वाटतं वाचायला? हे चुक आहे ह्याचं कारणच मुळी आपण लक्षात घेतो तत्कालीन स्थिती, उप्लब्ध पर्याय आणि कृती मागचा उद्देश. ह्याच निकषांवर शिवाजी ठरतात छत्रपती, गौतम बुद्ध ठरतो महात्मा(की भगवान?) आणि सावरकर ठरतात एक जाज्व्ल्य, अतुलनीय कार्य असणारे स्फुर्तिदायी चारित्र्याचे स्वातंत्र्यवीर. थोर माणसं, मोठं कार्य हे मोठच असतं.त्यातील वादग्रस्त भागासहित, त्यातील आपल्या असहमतीसहित. चंद्र सुंदर असतो डागांसहित. (मलिनम् अपि हिमांशु लक्ष्-लक्ष्मीं तनोति| ) आपलेच, जनसामान्यांचे मन

चतुरंग Wed, 05/28/2008 - 19:05
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! सावरकरांच्या अतुलनीय क्रांतिकारी देशभक्तीबरोबरच त्यांची भाषाशुद्धी, अस्पृश्यता निर्मूलन आणि इतरही कार्ये ही देशप्रेमातूनच उमलली होती. इतकेच नव्हे तर त्यांची काव्ये, नाटके, पुस्तके इत्यादी सर्व मातृभूमीला केंद्रस्थानी ठेवूनच निर्मिलेले दिसते. त्यांनी सुचविलेले बहुसंख्य मराठी शब्द हे आज व्यवहारात रुढ झालेले आहेत आणि थोडेफार होऊ शकले नाहीत पण त्यामुळे त्यांचे कार्य अजिबात छोटे ठरत नाही. मराठी प्रतिशब्द सुचवण्यामागे त्यांचे जाज्वल्ल्य मातृभूमी प्रेमच आहे. ज्या काळात त्यांनी ते केले त्या काळाचे संदर्भ, पारतंत्र्याचे, गुलामगिरीचे संदर्भ सोडून त्याकडे बघितले तर ते अन्यायकारक ठरेल. काही शब्द जड/अवघड वाटल्याने सामान्य माणसे मराठीकडे वळली नाहीत किंवा बिचकली असे मानण्याचे काही कारण दिसत नाही. उलट अल्पशिक्षित सामान्य माणसांपेक्षा स्वतःला शहाणे समजणारी माणसेच 'कुर्‍हाडीचा दांडा' ठरली की काय असे मानायला मात्र भरपूर वाव आहे. :) ते शब्द वापरले गेले नाहीत म्हणजे सूचना टाकाऊ होत्या असे नव्हे. किंवा त्यांचे भाषाशुद्धीचे कार्य पुढे नेणार्‍या इतर माणसांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिका (जसे माधव ज्यूलियन) ह्या त्यांच्या वैयक्तिक होत्या त्याचे खापर सावरकरांच्या माथी फोडण्याची गल्लत आपण करता कामा नये. असो. सावरकर महान होते, द्रष्टे होते आणि राहतील. त्यांच्या कार्यातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळो. त्यांना त्रिवार वंदन. चतुरंग

वळू Wed, 05/28/2008 - 19:06
सकाळी सारसबागेवरून जाताना मुद्दाम थांबलो अन आपपोआप हात जोडले गेले. ह्या माणसाबद्दल जे काय ऐकलं वाचलं आहे त्यावरून एक कळतं की शंभर नंबरी अस्सल घडीव सोन्याचा माणूस होता. 'ने मजसि ने' वाचताना समजतं की हा 'माझ्या देशावर राज्य करनार्‍या गोर्‍यांचा खूनी' नाही तर देशप्रेमान पेटलेला एक धगधगीत लोखंडाचा गोळा होता. 'जयो ऽस्तुते' मधल्या एक एक शब्दाला तलवारीची धार आहे. 'शतजन्म शोधितांना' असो... 'हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा' असो... वा बाजीप्रभूंचा पोवाडा असो.... असं वाटतं की ह्या माणसानं एक हिन्दुस्थानाशिवाय बाकी कशाचा विचारही केला नाही. सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! - वळू

ऍडीजोशी Wed, 05/28/2008 - 19:33
उच्चाराला सोपे असलेले इतर भाषांतील शब्द वापरणे हा निव्वाळ आळशी पणा आहे असे मला वाटते. कारण आपण सरसकट दुसरी भाषा बोलत नाही. त्यातले फक्त सोयीस्कर शब्दच उचलतो. आणि बर्‍याच पिढ्यांनी केलेल्या ह्या आळसामुळेच इतर भाषांतील शब्द मराठीत रूढ झालेत. भाषाषुद्धीला संकुचीतपणा म्हणणार्‍यांची कीव करावीशी वाटते. अवांतर - अमेरिकेत गेलेली मराठी कुटूंबे आपल्या मुलांना 'प्रॉपर' मराठी यावं ह्याचा अग्रह का धरतात? आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

मन Wed, 05/28/2008 - 19:46
म्हणुनच मग आपण लोहपथ्-अग्निरथगामिनी-आवक्-जावक -पट्टिका असला का कोणता शब्द तो बिंदास वापरावा आळस झटकुन. कशाला उगिच सिग्नल्,ट्रेन्,बटन असले "विदेशी" शब्द वापरायचे? अवांतरः-""लोहपथ्-अग्निरथगामिनी-आवक्-जावक -पट्टिका " येव्हढ्या पट्टिची मर्‍हाटी मला येत नाय. शिकवण्या घेण्यास तयार हाय का कोण? एक शंका:- मर्‍हाटीचा आग्रह करणारे लोक महाविद्यालयाच्या शेवटल्या वर्षाला म्हणतात"अंतिम वर्ष" मग पदवी-प्रदान करण्याच्या विधीला काय "अंत्य्-विधी " म्हणणार का? आणि सकाळच्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यास ऍडमिशन ऐवजी "प्रातर्विधी" म्हणणार का? ह्.घ्या. आपलाच, मनोबा

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 05/29/2008 - 10:37
सावरकरा॑वरचा गुप्त-पोलिसा॑चा पहारा स्वात॑त्र्य मिळाल्यावरही.. अगदी त्या॑च्या मृत्यूपर्य॑त कायम होता हे सावरकरा॑चे अ॑गरक्षक अप्पा कासार ह्या॑च्या मुलाखतीते वाचलेले आठवते आणि काळजाला घरे पडतात. तसेच मणिश॑कर अय्यर सारख्या निवृत्त आयएएस अधिकार्‍याने (म्हणजे एका बुद्धीमान माणसाने, इतर बुद्धू म॑त्र्यासारखा नाही) अ॑दमान येथील सावरकर-वचने बेमूर्वतखोरपणे काढलेली आठवतात आणि पुन्हा खूप वाईट वाटते. काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अ॑दमान बेटावर पाऊल ठेवणार्‍या सावरकरा॑नी पहिलेच उदगार काढले होते, " उद्या भारत स्वत॑त्र झाल्यावर हेच अ॑दमान भारतीय नाविक दलाचा तळ म्हणून वापरता येईल!" केव्हढे द्रष्टेपण! असा महामानव पुन्हा होणे नाही.. त्या॑ना कोटी कोटी प्रणाम

चिन्या१९८५ Mon, 06/02/2008 - 00:34
येथे सावरकरांनी संस्कृतप्रचुर मराठी आणले म्हणुन माधव ज्युलियन यांचे मत देउन बराच घोळ घातला गेलाय. मला १९८३ साली पु.ल.देशपांडे यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग इथे टाकावासा वाटतोय्.पुल स्वतः दिग्गज साहीत्यिक होते त्यामुळे त्यांचे म्हणने लक्षात घेणे जरूरीचे आहे.तर पुल म्हणतात सावरकरांचे विचार आणि उच्चार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे.मातृभाषाप्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक घटक असतो.सामर्थ्याच्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राजवटीच्या गुलामगिरीतुन ,अवलबिद्वातुन वाचवण हा विवेक सावरकरांच्या भाषाशुध्दीच्या चळवळीमागे होता.वास्तविक इंग्रजीवर त्यांच चांगलच प्रभुत्व होत.मराठी भाषणाच्या ओघात एखादा मुळचा इंग्रजी उतारा ते स्मरणाने घडाघड म्हणायचे.कुठल्याही सोवळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रह्मण्यम मानले नाही.त्यांना अमान्य होत ते दुबळेपणाच्या भावनेने विदेशी भाषेतील शब्दांची घुसखोरी चालू देण.सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजवुन घेतली नाही,त्यांनी त्यांच्या भाषाशुध्दीची चेष्टा केली.हे शब्द रुढच होणे शक्य नाही असे म्हणायला सुरुवात केली.पण ते सरकारी शब्दांच्या टाकसळीत तयार केलेले शब्द नव्हते.एका प्रतिभावंत कवीची ती निर्मिती होती.सरकारात मोले घातले रडाया (का खरडाया) या भावनेने भाषाशुध्दीचे पगारी कर्मचारी जेंव्हा बसतात तेंव्हा 'घे इकडची इंग्रजी डिक्शनरी अन कर त्याचा मराठी शब्दकोष'असा व्यवहार चालतो.सावरकरांना तो शब्द कोशात पडुन रहाणारा नको होता.तो कवितेसारखा लोकांच्या तोंडी रुळायला हवा होता.त्यांनी रीपोर्टरला 'वार्ताहर' हा शब्द निर्माण केला.वार्ता खेचुन आणणारा.इथे इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द असे न होता एक कविनिर्मित प्रतिमा तयार झाली.प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले.हे शब्द सावरकरनिर्मित आहेत याचादेखील लोकांना विसर पडला.आज महाराष्ट्रात लोकांना मेयरपेक्षा महापौरच जास्त परीचित आहे.वृत्तपत्राच्या क्षेत्रात तर संपादकापासुन स्तंभापर्यंत अनेक शब्द त्यांनी दिले आहेत.तीच गोष्ट चित्रपटसृष्टीची. दिग्दर्शक,संकलन्,ध्वनीमुद्रण,पटकथा ही त्यांचीच निर्मिती.मराठीला त्यांच हे स्वत्व जागवण्यासाठी दिलेले एक मोठ देण आहे.शिवाय ते एक उत्तम वक्ते असल्याने शब्दनिर्मिती करताना उच्चारातील सोपेपणाही त्यांनी सांभाळला.पुष्कळदा मला वाटत की भाषेचे सामर्थ्य म्हणजे काय ,ओघवती भाषा म्हणजे काय ह्याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडुन सावरकरांचे 'माणसाचा देव्,विश्वाचा देव',दीन शब्दात संस्कृती हे निबंध मोठ्यानी म्हणुन घ्यावेत. याप्रकारे सावरकरांच्या भाषाशुध्दीवर टिका करणार्‍यांना उत्तर पुलंनी दिले आहे. एक नविन प्रकार इथे वाचला तो म्हणजे 'संस्कृतप्रचुर शब्दांमुळे बहुजन समाज मराठीला बिचकुन राहु लागला'. याच भाषणात पुढे पुलंनी एक घटना सांगितलीय ती अशी. काही वर्षांपुर्वी मी सांगलीमधे म्हैसाळ म्हणुन एक गाव आहे तिथे मधुकरराव देवल यांनी दलितांच्या सहकारी शेती संस्थेचा एक प्रयोग आहे तो पहायला गेलो होतो.भारताच्या उत्तम शेति प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे .एक काळ असा होता की वस्तीतल्या स्त्रीयांच्या अंगावर लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नसायची म्हणुन त्यांच झोपडीच्या बाहेर पडण मुश्किल होतं. त्या समारंभाला आम्ही गेलो तेंव्हा त्या दलित वस्तीतील सर्व स्त्रीपुरुष आपल्याकडे लग्नसमारंभाला जावे तसा पोषाख करुन तिथे जमली होती.सहकारी शेतीने त्यांच्या आयुष्यात आर्थिक परीवर्तन घडवुन आणल होत आणि ते केवळ आर्थिक परीवर्तन नव्हत हे लगेच माझ्या लक्षात आलं.त्या स्त्रीया समारंभाला गाणे म्हणनार होत्या.हल्ली कुठेही सभेला गेलो की गाणी ऐकावी लागतात. ती बहुदा सिनेमातली अथवा प्रसंगाला साजेशी अशी तिथल्याच शाळेतल्या गुरुजींनी कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करुन जुळवलेली स्वागतपर पद्द्य.आणि येथे पेटीवाल्यांनी सुर धरला,तबलजींनी ठेका सुरु केला आणि अस्खलीत वाणित त्या दलित भगिनींनी गाणे सुरु केले ' जयोस्तुते,श्री महन्मंगले श्रीवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवती' . माझ्या अंगावर सर् कन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारण्यासाठी,त्यांना मोकळेपणानी गाता याव ,बागडता याव म्हणुन सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करीत ज्या सावरकरांनी जीवाच रान केल त्या सावरकरांनी रचलेल हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रीया बिनचुकपणे उत्तम सुरतालात गात होत्या.एखाद्याच पुण्य फळाला जाण म्हणजे काय याचा मला त्याक्षणी अनुभव आला. आता एका छोट्याशा खेड्यातल्या दलित स्त्रीया २५ वर्षांपुर्वी न घाबरता बिनचुकपणे ' जयोस्तुते श्री महन्मंगले' हे गीत गाउ शकतात तर आजचे सुशिक्षीत बहुजन अशा भाषेला का बिचकतात्??आणि ते बिचकतात याला काही तथ्य आहे का?? आम्हाला तर असे बिचकणे काही दिसले नाही. आणि बिचकतात म्हणजे नक्की काय करतात???

In reply to by चिन्या१९८५

विकेड बनी Mon, 06/02/2008 - 02:24
आमची ५० शीची अशिक्षित मोलकरीण आमच्या पोराच्या सोबतीनं ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार म्हणते ना तेव्हा असेच शहारे येतात आमच्या अंगावर. गाणं आलं, गाता आलं, म्हणजे भाषा येते का राव? पण, आमची अडाणी ठकू गाते तेव्हा मजा वाटते आणि कौतुकही. पु. लंना तेच वाटलं.

चिन्या१९८५ Mon, 06/02/2008 - 02:40
काय लोक बोलतील सांगता येत नाही. अहो,पुल त्या लोकांमधे गेल्यावर त्यांचाशी बोलले नसतील का???त्या लोकांच्या बोलण्यातुन त्यांना कळले असेलच ना काय ते??????आणि 'जयोस्तुते' हे स्तोत्र तसे अवघड आहे. ट्विंकल ट्विंकली तशी गोष्ट नाही. त्या मोलकरणिला शेक्स्पिअरचे साहीत्य अथवा इतर अवघड कविता म्हणायला सांगा म्हणजे लक्षात येईल काय ते. मुख्य मुद्दा हा आहे की बहुजन जर बिचकत असते तर त्यांनी कुठलही दुसर साध गाण म्हटल असत. त्यांना कोणी सक्ती केली नव्हती तेच गाण म्हणायची. ट्विंकल ट्विंकलची आणि जयोस्तुतेची तुलना करणे म्हणजे माणसाचे बोलणे आणि पोपटाचे बोलणे यांची तुलना करण्यासारखे आहे.

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला... असे म्हणणार्‍या आणि लहानपणीच शिवाजीच्या थाटात "देशाच्या स्वातंत्र्याकरता मारीता मारीता मरेतो झुंझेन" अशी शपथ घेणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज म्हणजे २८ मे ला, १२५ वी जयंती आहे. आज म.टा. मधे त्यांच्यावर विशेष ऑनलाईन पुरवणी काढण्यात आली आहे. त्यातील श्री. भारतकुमार राउत यांचा "तात्यांच्या सहवासात" हा लेख वेगळ्याच अनुभवावर आधारीत असल्याने वाचनीय वाटला.

सहज

चेतन ·

अरुण मनोहर Wed, 05/28/2008 - 06:42
सहजपणे जे मनात येते सच्च्या मनाने कागदावर उतरते सहज प्रतिक्रीया व्यक्त करवते फसलेले अथवा यशस्वी लिखाण ते! लगे रहो चेतनभाई......

चेतन Wed, 05/28/2008 - 12:22
धन्यवाद अरुणजी... सहजासहजी प्रतिक्रिया न मिळणारा (सहज चेतन) #:S अवांतरः किती सहजपणे प्रतिक्रिया दिलेय

In reply to by सहज

चेतन Wed, 05/28/2008 - 12:43
"सहज" मिसळपाववर टंकल्यावर हे लक्षात आलं ! माफी असावी महाराज (असा काही आमचा इरादा नव्हता) कॉपीराइटमध्ये सहजपणे अडकलेला (नुसताच् चेतन) 8} अवांतरः आता गातो एक वर्ल्ड फेमस गीत - "हे काय नशीबी आले" एव्हढही काही निराश नाहि केलं (हे आपलं सहज मनात आलं म्हणुन हो)

In reply to by चेतन

सहज Wed, 05/28/2008 - 14:18
चेतनसाहेब गंमत केली. माफी कसली. मिपावर सगळे हसत खेळत असते.. मुख्य सांगायचेच विसरलो. कविता मस्त "सहज" जमल्यात. अजुन येऊ देत.

विसोबा खेचर Wed, 05/28/2008 - 13:21
कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा | सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा || हेच सर्वात महत्वाचे! :) वा चेतनराव, छोटेखानी परंतु सुंदर कविता...! तात्या.

सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी |
शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी ||
कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा |
सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा ||
चेतन,

कविता कशी असावी असा अर्थ सांगणारी कविता आवडली.
लिहित राहा, र्‍ह्दयास भिडणार्‍या कविता अशाच जन्मल्या आहेत.

अवातंर : सहज, नावाच्या सदस्यावर काव्य आहे की काय असेच वाटले, नसेल तर आमचे हे काव्य :)
'' सहज चालतो, सहज बोलतो
 संस्थळावर सहज असतो, सहज गस्त घालतो.
सहज येतो, सहज जातो, 
सहज वाचतो, सहज चावतो
तयाला 'सहज' असे म्हणतो''
( सहजराव,(  ह. घ्या. ))

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे Wed, 05/28/2008 - 16:52
'' सहज चालतो, सहज बोलतो संस्थळावर सहज असतो, सहज गस्त घालतो. सहज येतो, सहज जातो, सहज वाचतो, सहज चावतो तयाला 'सहज' असे म्हणतो'' जबरा !!!!!!!! :)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 19:29
धन्यवाद तात्या, बिरुटे सर, अरुणजी , सहजराव, सतिश अवातंर : सहज, नावाच्या सदस्यावर काव्य आहे की काय असेच वाटले, नसेल तर आमचे हे काव्य बिरुटे सर मस्त लिहलयं अशिच काही व्यक्तिचित्रं लिहा मजा येइल वाचायला (तात्यांना स्पर्धा) तुर्त दि:गमुढ चेतन :T

सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी | शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी || कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा | सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा || ~X( सहज सहज करताकरता हे काय झाले? शब्द कसे वाढले? हे सहजच् नाही कळाले सहजच् मनातुन ते, कागदावर (जालावर) उतरले वाचुन बघितल्यावर हे, हात सहजच् कपाळाकडे वळाले... :T सहज चेतन