भाषाशुद्धीबाबतची इथली एकूण जाणीव आणि चर्चेची एकंदर बौद्धिक पातळी
पातळी कुणाची काढतोस रे? जा की मग उच्च पातळी असलेल्यांकडे!
विषय आहे तो तात्यारावांनी इंग्रजी भाषेतल्या काही शब्दांकरता मराठी भाषेत काही शब्द सुचवले आहेत याचा! मूळ विषय काय आहे हे लक्षात न घेता विकासरावांनी म्हटल्याप्रमाणे अवांतर लेखन करणार्यांनी प्रथम स्वत:ची बौद्धिक पातळी पाहावी आणि मग इतरांना पातळीच्या गप्पा शिकवाव्यात!
केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते
हो! काय म्हणणं आहे मग?
तात्या.
मिसळपाव डॉट कॉम जातपातविषयक लेखनाला प्रोत्साहन देउ नये. सावरकरांचे जातपातनिर्मुलन कार्य पण लक्षात घ्यायला हवे.
रत्नगिरीतले 'पतित पावन मंदीर' याची साक्ष देत उभे आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.
त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान,
मराठी तसेच भारतीय तरूणांना क्रांतीकार्यासाठी प्रेरणास्त्रोत निर्माणाचे कार्य,
भारतीय समाजातील जातीपाती निर्मुलनासाठी कार्य,
त्यांचा मुळातच लढवय्या असलेला स्वभाव,
त्याचे लेखन, काव्य आदी क्षेत्रातील वावर,
त्यांना मराठीचा असलेला अभिमान....
या सर्वांचा मी चाहता आहे.
नीलकांत
स्वातंत्र्यवीराला माझे कोटी,कोटी प्रणाम...
म.टा. ऑनलाईन पुरवणीची 'सलाम सावरकर' ही पंचलाईन खटकली.
'प्रणाम सावरकर' असे योग्य दिसले असते. मी संस्कृताळलेला आहे असे समजू नये. सावरकरांना ते अधिक आवडले असते, नाही का? - बस, इतकेच!
सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे
स्तंभ, मूल्य, शुल्क, वेशभूषा, परीक्षक, गतिमान, नेतृत्व हे शब्द 'निर्माण' (तयार?) केलेले वाटत नाहीत. वेतन या शब्दाविषयी नक्की माहीत नाही पण हा शब्द हिंदीतही वापरला जातो. (उदा. वेतन तो हम पूरा लेंगे, दंड चाहे दस बार कर लिजिये - चुपके चुपके) बातमीदाराने कश्याच्या आधाराने हे लिहिले आहे ते नमूद केलेले नाही.
बातमीतील "इतर (फारसी/इंग्रजी) भाषांमधील शब्द म्हणजे आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत" हा विचार काही पटला नाही.
भाषाशुद्धीचा उहापोह पुष्कळच झाला आहे. त्याची मुख्य सुत्रे दोन १. आपल्या भाषेत ज्या अर्थाचे शब्द होते, आहेत किंवा उद्भवणे सुसाध्य आहे, अशा अर्थाचे परकीय शब्द काय ते आपण वापरू नयेत. मग ते जुने असोवत वा नवे. आपले तदर्थक शब्द मारून जे परशब्द रूळतात त्याने काही आपली शब्दसंपत्ती वाढत नाही. २. ज्या अर्थाचे शब्द त्या वस्तू आपल्याकडे नसल्याने मुळातच नाहीत किंवा नवी न पाडणे शक्य नाही, असे परकीय शब्द वापरण्यास आडकाठी नाही. जसे. कोट, बूट आदी.
ही भाषाशुद्धीची दोन सुत्रे नीट वाचून लक्षात ठेवली तर तिच्यावर घेतले जाणारे ९० टक्के आक्षेप आपोआप नाहीसे होतील. याच तत्वाला अनुसरून मी अनेक नवे मराठी शब्द निर्मिले आहेत.
(सावरकर विविध भाषणे पुस्तकातून)
थोर कार्य्,प्रेरणादायक आणि मार्गदर्शक विचार. ह्याशिवाय काय म्हणणार.
बाकी, "भाषा शुद्धी"चा विषय काढुन त्यांचे उणे-दुणे काढणं म्हणजे जरा जास्तिच वाटतयं.
हे म्हणजे, "शिवाजी जर आठ-आठ बायका करुन रामाचा आदर्श मोडणार असतील, तर थोर कसे ठरतात? "
किंवा "जर गौतम बुद्ध आनी त्याचं अहिंसा तत्वज्ञान महान असेल, तर त्याची पायमल्ली करणार्यांना नराधम का म्हणु नये"?
(किंवा हिंसा करणारे महान असतील अतर बुद्धाला कमी का लेखु नये?) असले प्रश्न विचारण्यासारखं आहे.
किंवा आणखी एक उदाहरण म्हणजे:-
"शिवाजीनं थेट युद्ध न करता दगाबाजीनं शाहिस्त्यास हाणला.
आपल्याच आश्रयदात्या पुरंदराच्या किल्लेदारास बंदी करुन किल्ल्यावर कब्जा केला.
कित्येक तह्,वाटाघाटी चुटकीसरशी मोडल्या."
हे कसं वाटतं वाचायला?
हे चुक आहे ह्याचं कारणच मुळी आपण लक्षात घेतो तत्कालीन स्थिती, उप्लब्ध पर्याय आणि कृती मागचा उद्देश.
ह्याच निकषांवर शिवाजी ठरतात छत्रपती,
गौतम बुद्ध ठरतो महात्मा(की भगवान?)
आणि सावरकर ठरतात एक जाज्व्ल्य, अतुलनीय कार्य असणारे स्फुर्तिदायी चारित्र्याचे स्वातंत्र्यवीर.
थोर माणसं, मोठं कार्य हे मोठच असतं.त्यातील वादग्रस्त भागासहित, त्यातील आपल्या असहमतीसहित.
चंद्र सुंदर असतो डागांसहित. (मलिनम् अपि हिमांशु लक्ष्-लक्ष्मीं तनोति| )
आपलेच,
जनसामान्यांचे मन
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
सावरकरांच्या अतुलनीय क्रांतिकारी देशभक्तीबरोबरच त्यांची भाषाशुद्धी, अस्पृश्यता निर्मूलन आणि इतरही कार्ये ही देशप्रेमातूनच उमलली होती.
इतकेच नव्हे तर त्यांची काव्ये, नाटके, पुस्तके इत्यादी सर्व मातृभूमीला केंद्रस्थानी ठेवूनच निर्मिलेले दिसते.
त्यांनी सुचविलेले बहुसंख्य मराठी शब्द हे आज व्यवहारात रुढ झालेले आहेत आणि थोडेफार होऊ शकले नाहीत पण त्यामुळे त्यांचे कार्य अजिबात छोटे ठरत नाही.
मराठी प्रतिशब्द सुचवण्यामागे त्यांचे जाज्वल्ल्य मातृभूमी प्रेमच आहे. ज्या काळात त्यांनी ते केले त्या काळाचे संदर्भ, पारतंत्र्याचे, गुलामगिरीचे संदर्भ सोडून त्याकडे बघितले तर ते अन्यायकारक ठरेल.
काही शब्द जड/अवघड वाटल्याने सामान्य माणसे मराठीकडे वळली नाहीत किंवा बिचकली असे मानण्याचे काही कारण दिसत नाही. उलट अल्पशिक्षित सामान्य माणसांपेक्षा स्वतःला शहाणे समजणारी माणसेच 'कुर्हाडीचा दांडा' ठरली की काय असे मानायला मात्र भरपूर वाव आहे. :)
ते शब्द वापरले गेले नाहीत म्हणजे सूचना टाकाऊ होत्या असे नव्हे.
किंवा त्यांचे भाषाशुद्धीचे कार्य पुढे नेणार्या इतर माणसांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिका (जसे माधव ज्यूलियन) ह्या त्यांच्या वैयक्तिक होत्या त्याचे खापर सावरकरांच्या माथी फोडण्याची गल्लत आपण करता कामा नये.
असो. सावरकर महान होते, द्रष्टे होते आणि राहतील. त्यांच्या कार्यातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळो. त्यांना त्रिवार वंदन.
चतुरंग
सकाळी सारसबागेवरून जाताना मुद्दाम थांबलो अन आपपोआप हात जोडले गेले. ह्या माणसाबद्दल जे काय ऐकलं वाचलं आहे त्यावरून एक कळतं की शंभर नंबरी अस्सल घडीव सोन्याचा माणूस होता. 'ने मजसि ने' वाचताना समजतं की हा 'माझ्या देशावर राज्य करनार्या गोर्यांचा खूनी' नाही तर देशप्रेमान पेटलेला एक धगधगीत लोखंडाचा गोळा होता. 'जयो ऽस्तुते' मधल्या एक एक शब्दाला तलवारीची धार आहे. 'शतजन्म शोधितांना' असो... 'हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा' असो... वा बाजीप्रभूंचा पोवाडा असो.... असं वाटतं की ह्या माणसानं एक हिन्दुस्थानाशिवाय बाकी कशाचा विचारही केला नाही.
सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
- वळू
उच्चाराला सोपे असलेले इतर भाषांतील शब्द वापरणे हा निव्वाळ आळशी पणा आहे असे मला वाटते. कारण आपण सरसकट दुसरी भाषा बोलत नाही. त्यातले फक्त सोयीस्कर शब्दच उचलतो. आणि बर्याच पिढ्यांनी केलेल्या ह्या आळसामुळेच इतर भाषांतील शब्द मराठीत रूढ झालेत. भाषाषुद्धीला संकुचीतपणा म्हणणार्यांची कीव करावीशी वाटते.
अवांतर - अमेरिकेत गेलेली मराठी कुटूंबे आपल्या मुलांना 'प्रॉपर' मराठी यावं ह्याचा अग्रह का धरतात?
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
म्हणुनच मग आपण लोहपथ्-अग्निरथगामिनी-आवक्-जावक -पट्टिका असला का कोणता शब्द तो बिंदास वापरावा
आळस झटकुन. कशाला उगिच सिग्नल्,ट्रेन्,बटन असले "विदेशी" शब्द वापरायचे?
अवांतरः-""लोहपथ्-अग्निरथगामिनी-आवक्-जावक -पट्टिका " येव्हढ्या पट्टिची मर्हाटी मला येत नाय.
शिकवण्या घेण्यास तयार हाय का कोण?
एक शंका:- मर्हाटीचा आग्रह करणारे लोक महाविद्यालयाच्या शेवटल्या वर्षाला म्हणतात"अंतिम वर्ष"
मग पदवी-प्रदान करण्याच्या विधीला काय "अंत्य्-विधी " म्हणणार का?
आणि सकाळच्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यास ऍडमिशन ऐवजी "प्रातर्विधी" म्हणणार का?
ह्.घ्या.
आपलाच,
मनोबा
सावरकरा॑वरचा गुप्त-पोलिसा॑चा पहारा स्वात॑त्र्य मिळाल्यावरही.. अगदी त्या॑च्या मृत्यूपर्य॑त कायम होता हे सावरकरा॑चे अ॑गरक्षक अप्पा कासार ह्या॑च्या मुलाखतीते वाचलेले आठवते आणि काळजाला घरे पडतात.
तसेच मणिश॑कर अय्यर सारख्या निवृत्त आयएएस अधिकार्याने (म्हणजे एका बुद्धीमान माणसाने, इतर बुद्धू म॑त्र्यासारखा नाही) अ॑दमान येथील सावरकर-वचने बेमूर्वतखोरपणे काढलेली आठवतात आणि पुन्हा खूप वाईट वाटते.
काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अ॑दमान बेटावर पाऊल ठेवणार्या सावरकरा॑नी पहिलेच उदगार काढले होते, " उद्या भारत स्वत॑त्र झाल्यावर हेच अ॑दमान भारतीय नाविक दलाचा तळ म्हणून वापरता येईल!" केव्हढे द्रष्टेपण! असा महामानव पुन्हा होणे नाही.. त्या॑ना कोटी कोटी प्रणाम
येथे सावरकरांनी संस्कृतप्रचुर मराठी आणले म्हणुन माधव ज्युलियन यांचे मत देउन बराच घोळ घातला गेलाय. मला १९८३ साली पु.ल.देशपांडे यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग इथे टाकावासा वाटतोय्.पुल स्वतः दिग्गज साहीत्यिक होते त्यामुळे त्यांचे म्हणने लक्षात घेणे जरूरीचे आहे.तर पुल म्हणतात
सावरकरांचे विचार आणि उच्चार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे.मातृभाषाप्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक घटक असतो.सामर्थ्याच्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राजवटीच्या गुलामगिरीतुन ,अवलबिद्वातुन वाचवण हा विवेक सावरकरांच्या भाषाशुध्दीच्या चळवळीमागे होता.वास्तविक इंग्रजीवर त्यांच चांगलच प्रभुत्व होत.मराठी भाषणाच्या ओघात एखादा मुळचा इंग्रजी उतारा ते स्मरणाने घडाघड म्हणायचे.कुठल्याही सोवळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रह्मण्यम मानले नाही.त्यांना अमान्य होत ते दुबळेपणाच्या भावनेने विदेशी भाषेतील शब्दांची घुसखोरी चालू देण.सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजवुन घेतली नाही,त्यांनी त्यांच्या भाषाशुध्दीची चेष्टा केली.हे शब्द रुढच होणे शक्य नाही असे म्हणायला सुरुवात केली.पण ते सरकारी शब्दांच्या टाकसळीत तयार केलेले शब्द नव्हते.एका प्रतिभावंत कवीची ती निर्मिती होती.सरकारात मोले घातले रडाया (का खरडाया) या भावनेने भाषाशुध्दीचे पगारी कर्मचारी जेंव्हा बसतात तेंव्हा 'घे इकडची इंग्रजी डिक्शनरी अन कर त्याचा मराठी शब्दकोष'असा व्यवहार चालतो.सावरकरांना तो शब्द कोशात पडुन रहाणारा नको होता.तो कवितेसारखा लोकांच्या तोंडी रुळायला हवा होता.त्यांनी रीपोर्टरला 'वार्ताहर' हा शब्द निर्माण केला.वार्ता खेचुन आणणारा.इथे इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द असे न होता एक कविनिर्मित प्रतिमा तयार झाली.प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले.हे शब्द सावरकरनिर्मित आहेत याचादेखील लोकांना विसर पडला.आज महाराष्ट्रात लोकांना मेयरपेक्षा महापौरच जास्त परीचित आहे.वृत्तपत्राच्या क्षेत्रात तर संपादकापासुन स्तंभापर्यंत अनेक शब्द त्यांनी दिले आहेत.तीच गोष्ट चित्रपटसृष्टीची. दिग्दर्शक,संकलन्,ध्वनीमुद्रण,पटकथा ही त्यांचीच निर्मिती.मराठीला त्यांच हे स्वत्व जागवण्यासाठी दिलेले एक मोठ देण आहे.शिवाय ते एक उत्तम वक्ते असल्याने शब्दनिर्मिती करताना उच्चारातील सोपेपणाही त्यांनी सांभाळला.पुष्कळदा मला वाटत की भाषेचे सामर्थ्य म्हणजे काय ,ओघवती भाषा म्हणजे काय ह्याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडुन सावरकरांचे 'माणसाचा देव्,विश्वाचा देव',दीन शब्दात संस्कृती हे निबंध मोठ्यानी म्हणुन घ्यावेत.
याप्रकारे सावरकरांच्या भाषाशुध्दीवर टिका करणार्यांना उत्तर पुलंनी दिले आहे. एक नविन प्रकार इथे वाचला तो म्हणजे 'संस्कृतप्रचुर शब्दांमुळे बहुजन समाज मराठीला बिचकुन राहु लागला'. याच भाषणात पुढे पुलंनी एक घटना सांगितलीय ती अशी.
काही वर्षांपुर्वी मी सांगलीमधे म्हैसाळ म्हणुन एक गाव आहे तिथे मधुकरराव देवल यांनी दलितांच्या सहकारी शेती संस्थेचा एक प्रयोग आहे तो पहायला गेलो होतो.भारताच्या उत्तम शेति प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे .एक काळ असा होता की वस्तीतल्या स्त्रीयांच्या अंगावर लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नसायची म्हणुन त्यांच झोपडीच्या बाहेर पडण मुश्किल होतं. त्या समारंभाला आम्ही गेलो तेंव्हा त्या दलित वस्तीतील सर्व स्त्रीपुरुष आपल्याकडे लग्नसमारंभाला जावे तसा पोषाख करुन तिथे जमली होती.सहकारी शेतीने त्यांच्या आयुष्यात आर्थिक परीवर्तन घडवुन आणल होत आणि ते केवळ आर्थिक परीवर्तन नव्हत हे लगेच माझ्या लक्षात आलं.त्या स्त्रीया समारंभाला गाणे म्हणनार होत्या.हल्ली कुठेही सभेला गेलो की गाणी ऐकावी लागतात. ती बहुदा सिनेमातली अथवा प्रसंगाला साजेशी अशी तिथल्याच शाळेतल्या गुरुजींनी कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करुन जुळवलेली स्वागतपर पद्द्य.आणि येथे पेटीवाल्यांनी सुर धरला,तबलजींनी ठेका सुरु केला आणि अस्खलीत वाणित त्या दलित भगिनींनी गाणे सुरु केले ' जयोस्तुते,श्री महन्मंगले श्रीवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवती' . माझ्या अंगावर सर् कन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारण्यासाठी,त्यांना मोकळेपणानी गाता याव ,बागडता याव म्हणुन सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करीत ज्या सावरकरांनी जीवाच रान केल त्या सावरकरांनी रचलेल हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रीया बिनचुकपणे उत्तम सुरतालात गात होत्या.एखाद्याच पुण्य फळाला जाण म्हणजे काय याचा मला त्याक्षणी अनुभव आला.
आता एका छोट्याशा खेड्यातल्या दलित स्त्रीया २५ वर्षांपुर्वी न घाबरता बिनचुकपणे ' जयोस्तुते श्री महन्मंगले' हे गीत गाउ शकतात तर आजचे सुशिक्षीत बहुजन अशा भाषेला का बिचकतात्??आणि ते बिचकतात याला काही तथ्य आहे का?? आम्हाला तर असे बिचकणे काही दिसले नाही. आणि बिचकतात म्हणजे नक्की काय करतात???
आमची ५० शीची अशिक्षित मोलकरीण आमच्या पोराच्या सोबतीनं ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार म्हणते ना तेव्हा असेच शहारे येतात आमच्या अंगावर. गाणं आलं, गाता आलं, म्हणजे भाषा येते का राव?
पण, आमची अडाणी ठकू गाते तेव्हा मजा वाटते आणि कौतुकही. पु. लंना तेच वाटलं.
काय लोक बोलतील सांगता येत नाही. अहो,पुल त्या लोकांमधे गेल्यावर त्यांचाशी बोलले नसतील का???त्या लोकांच्या बोलण्यातुन त्यांना कळले असेलच ना काय ते??????आणि 'जयोस्तुते' हे स्तोत्र तसे अवघड आहे. ट्विंकल ट्विंकली तशी गोष्ट नाही. त्या मोलकरणिला शेक्स्पिअरचे साहीत्य अथवा इतर अवघड कविता म्हणायला सांगा म्हणजे लक्षात येईल काय ते. मुख्य मुद्दा हा आहे की बहुजन जर बिचकत असते तर त्यांनी कुठलही दुसर साध गाण म्हटल असत. त्यांना कोणी सक्ती केली नव्हती तेच गाण म्हणायची. ट्विंकल ट्विंकलची आणि जयोस्तुतेची तुलना करणे म्हणजे माणसाचे बोलणे आणि पोपटाचे बोलणे यांची तुलना करण्यासारखे आहे.
प्रतिक्रिया
जा की मग!
सहमत..!
अरे
विनम्र अभिवादन
अभिवादन
तयार केलेले
येथेही छान माहिती
भाषाशुद्धीबाबत सावरकर म्हणतात...
थोर माणुस,
चांगला प्रतिसाद
स्वातंत्र्यवीरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त
कवी सावरकर
उच्चाराला
हो ना...
सावरकरा॑व
विनम्र अभिवादन !
येथे
बरोबर
काय लोक
अरेच्चा!!!!!!!!