भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ

आजानुकर्ण's picture
आजानुकर्ण in जनातलं, मनातलं
28 May 2008 - 10:18 pm

भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे.

मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले :) म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते. शेवटी आपले लेखन ज्यांच्यासाठी त्या लोकांना ते कितपत समजेल ही शंका आड आली असणार. पण भाषाशुद्धीकरणाची चळवळ थंडावली, तिचे उघड उद्योग संपले, तरी आपल्या स्वातंत्र्यचळवळीच्या भाषेत ती 'भूमिगत' झाली. परिणामी ती कीड लागल्या प्रमाणे पसरली. बर्‍याच लेखनाच्या मुळांना ती कीड लागली. अनेकदा त्या लेखकांच्या नकळत! आणि 'शिष्ट' लेखकांमुळे ती लागण स्वत:ला लेखक न समझणार्‍या वाचकांपर्यंत पोचली. कृत्रिम, अर्थहीन आणि जडजंबाल लेखन त्यांना तसे वाटेनासे झाले. आपल्या भाषेबाबतची संवेदनाच क्षीण झाली आणि ती पुढे नष्ट झाली.

या भाषाशुद्धीचळवळीचे प्रणेते त्या काळी नावामागे बॅ. हा बॅरिस्टर या इंग्रजी पदवीचा संक्षेप लावणारे आणि आता 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी लावले जाणारे वि. दा. सावरकर. या भाषाहोमात भस्म करायचा संकल्प होता तो मराठीत आलेल्या फारसी व इंग्रजी शब्दांचा. या संकल्पामागची चेतना राजकीय होती, तशीच ती धार्मिकही. पण राजकीयपेक्षा मुख्यत्वे धार्मिक. एक तर इंग्रजी शब्द लेखनात येत ते तुलनेने फारच थोडे. फारसी कुळीतलेच फार. आणि इंग्रजी शब्द जेमतेम शतकभरात आलेले तेवढेच. मात्र फारसी शब्द कित्येक शतके ठाण मांडून बसलेले. अगदी शिवशाहीपूर्वीपासून. आणि एवढे एकजीव झालेले की तीक्ष्ण नाकाचे व्युत्पत्तिशोधक सोडल्यास ते शब्द परके आहेत याचा वाचणार्‍यांना, लिहिणार्‍यांना, वापरणार्‍यांना संशयदेखील येऊ नये.

पण ही शुद्धीकरणाची चळवळ जोरात आल्यावर काही घ्राणेंद्रिये (म्हणजे देशी भाषेत नाके) अधिकच तिखट झाली. आणि हाय खाल्लेल्या म्लेंच्छ सैनिकांना जळीस्थळी संताजी व धनाजी दिसू लागले तशी या शुद्धीसैनिकांना म्लेंच्छ व यवनी शब्द दिसू लागले. या सर्वच सैनिकांना भाषाशास्त्राची तालीम (हा देखील एक म्लेंच्छ शब्दच) मिळालेली होती असे नाही. तिची भरपाई करायला भाषाभिमान समर्थ होता!

पुढे आपले एक मोठे कवी माधव जूलियन यामध्ये उतरले. फारसीचा
विटाळ झालेल्या अनेक कविता त्यांनी संस्कृतच्या फवार्‍यांनी सोवळ्या करून घेतल्या. याशिवाय भाषाशुद्धीकरणाचा प्रचारही केला. मात्र पुढे १९१७ मध्ये त्यांनी आपल्या एका पत्रात लिहिले "संस्कृत शब्दांची निष्कारण गर्दी निषेधार्ह आहे. या लोकांना संस्कृत भाषा अवगत असावी. पण स्वत:च्या मराठी भाषेशी नीट परिचय नसावा याची कीव येते! बोलीतील सुलभ शब्दांकडे आपले दुर्लक्ष होते." १९२१ साली त्यांनी "प्रत्येक मराठी शब्दाचे संस्कृतशी नाते जोडण्याचा मूर्खपणाचा प्रयत्न धिक्कारला."

अर्थात हे शुद्धीकरणाचे खूळही संपूर्णत: देशी नाही! साहेबाला त्याने आधी पछाडले होते. पहिल्या महायुद्धानंतर, इंग्रजीतील 'नेटिव' (ऍंग्लो सॅक्सन कुळातले) शब्द कटाक्षाने वापरून फ्रेंचद्वारा आलेल्या लॅटिन कुळीतल्या व तशा शब्दांना नाकारायचे अशी टूम निघाली होती.
भाषा साधी सोपी करावी हा त्यामागचा हेतू. आपले शुद्धीकरण मात्र त्याच्या अगदी उलट जाणारे.

भाषाशुद्धीचा हा आग्रह प्रामुख्याने हिंदीच्या प्रगतीलाही भोवला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय व्यवहाराला सोयीची
म्हणून वापरल्या जाणार्‍या इंग्रजीचा वरचष्मा उतरवण्यासाठी तिच्याजागी कोणती भाषा आणायची असा प्रश्न पडल्यावर संख्याबळाच्या आधारावर हिंदीची वर्णी लागली. पण कोणती हिंदी? गांधीजींचा कौल पडला साध्या सोप्या 'खडीबोली'च्या बाजूने
. मात्र पंडित मालवीयांसारख्या काही पुढार्‍यांच्या हिंदीच्या पुनरुज्जीवनवादी संस्कृतीकरणामुळे, तापलेल्या धर्मनिष्ठेमुळे. भावी सत्तेच्या गाजरामुळे, संस्कृतचे रंगरोगण केलेल्या हिंदीची घोडदौड सुरू झाली. सत्ता आल्यावर हिंदीच्या उद्धारासाठी पैशांची लयलूट झाली. इतर भाषांच्या वाट्याला कंजूष भिक्षा आली.

डॉ. कालेलकर यांच्या 'भाषा आणि संस्कृती' या विद्वत्ता, स्पष्टवक्तेपणा आणि विषयोचित विनोद यांच्या मेळाने फार वाचनीय झालेल्या पुस्तकातील काही वाक्ये इथे देतो. "इंग्रजीपेक्षाही कठीण अशी ही शुद्ध नवमराठी कित्येकदा इतकी दुर्बोध आहे की ती कळण्यासाठी ती ज्या मूळ इंग्रजीचे भाषांतर आहे तिकडे वळल्यावाचून गत्यंतर नसते... लोकांच्या माथी एक अगदी नवी, बोजड भाषा मारण्याचा जो प्रयत्न झाला तो फसला... 'सरकार' हा शब्दच पाहा. कोट्यवधी लोक अगदी सहजपणे हा शब्द वापरतात. मात्र त्याच्या जागी संस्कृतातून आलेला 'शासन' हा शब्द! मग त्याला साथीदार म्हणून 'शासकीय' 'प्रशासनिक' हे शब्द... 'सरकारी छापखाना' असे म्हणताच अंगावर सांडपाणी पडले असे वाटणार्‍या लोकांनी 'शासकीय मुद्रणालय' हा शूचिर्भूत पवित्र प्रयोग चालू केला आणि मराठीपासून सामान्य जनता कशी दुरावेल याची काळजी घेतली.

भाषेच्या बाबतीत शुद्धीकरण ही शास्त्रबाह्य कल्पना आहे. धर्माभिमान, खोटा स्वाभिमान, उच्चनीचतेच्या कल्पना... स्वत:ला श्रेष्ट न समजणार्‍या वर्गाची भावना अशा कारणांमुळे लोक शुद्धीकरणाकडे वळतात. "

याउलट गुजरातेतील बडोदे संस्थानात एके काळी मराठी व इंग्रजी या कारभाराच्या भाषा होत्या. त्याऐवजी लोकांची भाषा गुजराती ही कारभारासाठी वापरण्याचा गायकवाडांनी निर्णय घेतला. आणि त्यातील परभाषिक फारसीसारखे शब्द काढण्याचा अडाणी खटाटोप न करता कारभार व्यवस्थितपणे चालला.

पण सयाजीरावांच्या या विचारावर एका शुद्धीकारक मराठी पंडिताने आक्षेप घेतला म्हणे: "गुजराती ही क्षुद्र भाषा! मराठीत मुखकमल, चरणकमल असे म्हणतात. पण गुजरातीत तसे काही नाही!"

मराठी भाषा 'उच्च' करण्याची केविलवाणी धडपड ज्यांनी आरंभली त्यांनी तिला घसरणीला लावले. उदा हे काही शब्द पहा: रेडिओला सांवहिक. वनस्पतिशास्त्राला: औद्भिदशास्त्र. लंबगोलाला: विवृत्ताकृति. 'अवलंबनपर्णोद्गमसूत्र हा जबडातोड शब्द कशासाठी वापरला आहे कोण जाणे! एका विदुषीने Honeysuckle या शब्दाला मधुचोष्यक हा शब्द सुचवला :D

मराठी भाषेचे मूळः

राजाध्यक्षांच्या मतांनंतर 'मराठी भाषेचे मूळ' आणि 'अडगुलं मडगुलं' या थोर पुस्तकांचे लेखक, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ विश्वनाथ खैरे यांचा मनोगतावर वाचलेला एक प्रतिसाद येथे देतो.

... मराठी व तमिळ या भाषांचा आणि संस्कृतींचा गाढ, प्राचीन संबंध दाखवणं हे या सर्व
लेखनाचं उद्दिष्ट आहे.प्रतीकार्थानं हा संबंध मराठीच्या बाळपणापासून सुरू होतो असं दाखवणारं गाणं म्हणजे बाळाला तीट लावण्याच्या वेळी मराठी आया शतकानुशतके म्हणत
आल्या आहेत ते:
अडगुलं मडगुलं/ सोन्याचं कडगुलं/रुप्याचा वाळा/ तान्ह्या बाळा/
तीट लावू//
तमिळमध्ये अटकु (अडगु) म्हणजे ठेवीची, विनिमयाची किंवा गहाणाची वस्तू. मडक्कू म्हणजे मातीची मोठी थाळी. मट्कलम् म्हणजे मडकं. मण् म्हणजे माती आणि कलम म्हणजे भांडं यावरून तो शब्द आला आहे. 'मडकं मोल म्हणून दिलं किंवा गहाण ठेवलं' असा पहिल्या ओळीचा अर्थ आहे. सोन्नम् म्हणजे सोनं आणि कडगम् म्हणजे कडं. ' मडकं देऊन सोन्याचं कडं घेतलं.' वाळम् म्हणजे गोल किंवा वर्तुळ. इरिप्पु म्हणजे रुपं, 'रुप्याचा वाळा घेतला.' हे दागिने तान्ह्या बाळाला घातले. 'ती' म्हणजे आग, जाळ. तीत्तल म्हणजे करपवणं, काजळणं. तीट्टुतल् म्हणजे अंगाला लावणं. तीत्तु म्हणजे दुष्टावा. 'दृष्ट' लागू नये म्हणून काजळीची तीट लावताना हे सगळे अर्थ एकत्र आले आहेत. तमिळ आणि मराठी समानार्थी शब्द किती सारखे आहेत पाहा.
खैरे विचारतात, "नवतरण्या महाराष्ट्री माउलीने तान्ह्या मराठी बाळाला जी शब्दाभूषणे घातली ती तमिळाईकडून तर घेतली नव्हती?" "होय" असं आत्मविश्वासपूर्ण उत्तर देण्यापर्यंत खैर्‍यांचा प्रवास नजीकच्या काळातच झाला. आणि केवळ शब्दभूषणं नव्हे तर सांकृतिक आभरणंही तामिळाईकडून मिळाली असे पुरावे ते सादर करीत राहिले.ओवी, अंगाई, पोवाडा हे सर्व तमिळमधून आले. ओवीचा चौथा चरण तुटका असतो एवढ्यावरून त्या अर्थाचे संस्कृत शब्द बनवायचे आणि त्याचा अपभ्रंश म्हणून ओवी शब्द सिद्ध झाला हे दाखवायचं असा
खटाटोप प्रस्थापित भाषाशास्त्राला धरून पूर्वीच करण्यात आला होता. प्रा. वेलणकरांनी ती संज्ञा अशी व्युत्पादिली आहे:
'अर्धचतुष्पदी-अठ्ठोठवइ-अड्ढुड्ढवयी-अड्ढूहवई-ढूहवई-हूहवई-होवई-ओवाई-ओवी. डॉ. कत्रे यांनी अपपादिका-अववाइआ-ओवैया-ओवी अशी परंपरा सांगितली."संस्कृतवरून व्युत्पत्ती काढायची म्हटल्यावर असा द्राविडी प्राणायाम करावाच लागतो" अशी यावर खैरे यांची टिप्पणी आहे. सरळ द्रविड भाषेकडे गेलं तर काय दिसतं? ओवीचा चौथा चरण तुटका ना? तमिळ ओऽवाय म्हणजे दात नसलेलं तोंड, तुटक्या काठाचं भांड. शिवाय 'ओवि' म्हणजे ध्वनी, आवाज. बाळ झोपताना ओऽ ओऽ करतं. त्याच तालावर आई त्याला ओऽ ओऽ करीत पटते. आवाहन करणारा हा आईचा मराठी ओऽ आहे. आजही मराठी गुराखी ओढाळ गुरू लांब गेलं तर ओऽ ओऽ करून त्याला ओवई किंवा ववई घालतो. (हे ग्रामीण बोलीचे महत्व. अशी अनेक उदाहरणे पुढे येतात.)छे, इश्श, अय्या हे उद्गार तमिळ.खंडोबा, त्याचा येळकोट, विठ्ठल, गोंधळ, तुळजाई, बोल्हाई, काळूबाई, फिरंगाई हे सर्व तमिळ.शेंडी पासून क्रमाने डोई, डोळा, पापणी, मिशी, ओठ, मोहरा, हात, पोट, स्त्रीयोनीचा मराठी शब्द, गुडघा, नडघी, घोटा, बोट हे सर्व तमिळ. 'तात्पर्य, शरीरवर्णनात आपण मराठी भाषिक नखशिखांत तमिळ आहोत.' शरीरवर्णनाचे शब्द हे भाषेतील प्राथमिक शब्द असतात हे या संदर्भात लक्षात ठेवणं योग्य होईल.चूलमूल, नातीगोती, भाजीपाला, स्वैपाकाचे पदार्थ, शेतीची अवजारे यांच्याशी संबंधित असलेले मराठीतील शब्दही तमिळ.
महाराष्ट्रातील स्थळनामांच्या अर्थाचा उलगडा तमिळवरून होतो हे द्रविड महाराष्ट्र या पुस्तकात दाखवले आहे. मुंबई, परळ, चेंबूर, वसई, वाशी, पुणे, वानवडी, येरवडा, थेऊर, जेजुरी, खंडाळा, जुन्नर, इत्यादी. मुठा, मुळा, उल्हास या नद्याही. उल्हास नदीच्या नावात उल्ह म्हणजे 'पल्ला मासा', जो केवळ याच नदीत सापडायचा. (आता प्रदूषणमुळं सापडत नाही.)मराठी वाचकांसमोर हे पुरावे मांडत असताना, दक्षिणी भाषाभ्यसकांपुढेही त्यांना भावतील असे तमिळ-मराठी संबंधांचे पुरावे इंग्रजी निबंधांतून खैरे सादर करीत आले आहेत. निर्णायक वाटावा असा पुरावा 'टोवर्डस इंडियन फोनॉलजी अँड लिंग्विस्टिक्स' या त्यांच्या निबंधात पहायला मिळतो. दक्षिणी भाषांच्या व्युत्पत्तिकोशाच्या दोघांपैकी एक संपादक एमेनो यांनी १९७० साली द्रविडियन कंपॅरेटिव्ह फोनॉलजी-ए स्केच या नावाच्या प्रबंधात सुमारे २७५ दक्षिणी शब्दावलीच्या वर्णांची तुलना केली आहे. त्यातल्या जवळ जवळ २६० गटांमधे मराठीतल्या एक ना एक शब्दाची ओळख पटते. त्यातल्या अनेकांच्या ज्या संस्कृत व्युत्पत्ती दिलेल्या आहेत त्या नमूद करून त्यांची कृत्रिमताही उघड केली आहे. अस्सल दक्षिणी म्हणवतात त्यांचे समशब्द मराठमोळे म्हणून वावरताहेत हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही.पण अगदी बिनतोड पुरावा हवा असेल तर तो पुढचा आहे. जे आपल्याला 'अस्सल मराठी' वाटतं त्याला आपण 'मराठमोळं' म्हणतो. अस्सल मराठी भाषेला आपण 'मराठमोळी' म्हणतो. तमिळ मर्रा (जो मराठीत मर्‍हा होतो) म्हणजे न झाकलेलं, उघडं किंवा स्पष्ट. 'मर्‍हाटाचि बोलु'! ज्ञानेश्वरीमधे बावीस वेळा हा शब्द आला आहे. आणि त्याचा हाच अर्थ असल्याचे खैर्‍यानी एका निबंधात दाखवून दिलं आहे. मोळि म्हणजे बोली, भाषा...

भाषाव्युत्पत्तीविचारसंदर्भशिफारससल्लाप्रश्नोत्तरेमाहितीवाद

प्रतिक्रिया

विकास's picture

28 May 2008 - 10:28 pm | विकास

मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली.

आपल्याला गेल्या शतकाच्या असे म्हणायचे आहे का? (हे भाषाशुद्धीसाठी सुचवले नाही बरकां! :-) )

आजानुकर्ण's picture

28 May 2008 - 10:30 pm | आजानुकर्ण

मपलं न्हाई ह्ये. ( म्ह. इदं न मम. ;) )

पुस्तकप्रकाशन/लेखन १९९० व्या दशकात. त्यामुळे तुमची दुरुस्ती बरोबर.

(स्पष्टीकरणोत्सुक!) आजानुकर्ण

विकास's picture

28 May 2008 - 10:57 pm | विकास

संदर्भाबद्दल धन्यवाद

बाकी "स्पष्टीकरणोत्सुक" साठी जरा सोपा शब्द सुचवा की!

ह्या लेखाचा.
सही.
पण एक नाही समजलं.भौगोलिक सलगता पाहिल्यास, तामिळ प्रांत कुठे महाराष्ट्राला लागुन आहे?
मुख्यतः त्या काळात तरी, संस्कृती आणि भाषा ह्यांचं आदान-प्रदान व्हायचं ते सलग भु-भागातुन.
त्ये "कानडाउ विट्टलु..." वगैरे ऐकुन होतो. म्हणजे मराठी-कन्नड नातं वगैरे.पण थेट तमिळ म्हंजे कमाल आहे बुवा.
त्या काळात इतका संपर्क तरी कुठं होता एकमेकांशी?
बरं मग संस्कृत्-मराठी-हिंदी ह्यांची एक्मेकांच्या अत्यंत जवळ जाणारी
देवनागरी लिपी तरी कशी शिल्लक राहिली?
मराठी लिहिताना त्या तामिळ लिपीचा वापर का होत नाही?
(जर मराठी-तमिळ भाषा संबंध इतका दृढ असेल तर त्याच लिपीत मराठी लिहिणं जास्त
नैसर्गिक्/सोयीचं राहील. नाही का?)

(स्वगतः- तरिच म्हटलं, त्या चर्चेतुन हिरिरिनं बोलताना अचानक आ'कर्ण राव गायब कुठं झाले?
ह्यांनी तर सरळ नवा लेखच टाकला की राव)

आपलाच,
मनोबा

चतुरंग's picture

28 May 2008 - 11:27 pm | चतुरंग

ह्यातली जवळजवळ सगळीच मला नवीन होती.
मराठी आणि तमिळ ह्या इतक्या मिळून मिसळून असतील असे माहीत नव्हते. ;)
धन्यवाद आ.कर्णा!

चतुरंग

अभिज्ञ's picture

28 May 2008 - 11:51 pm | अभिज्ञ

आजानुकर्ण साहेब,
मनोबांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या लेखाचा आवाका खरोखर खुप मोठा आहे.
त्यावर काहि लिहावे एवढी आमची पात्रताही नाही.तरीहि काही मुलभुत प्रश्न मनात आले,
त्याचे निराकरण आपण केल्यास उत्तम होइल.
खैरे ह्यांनी मराठी-तमिळ संबंधांचा बराच अभ्यास केलेला दिसतोय.परंतु त्यांनी मांडलेले विचार हे
एकांगी वाटतात.अहो गेल्या हजारो वर्षात तमिळ भाषेत काहीच फ़रक पडला नाही काय?
मराठी भाषेचेच पहा ना. ज्ञानेश्वरीच्या काळातील मराठी व आत्ताची मराठी ह्यात केवढा फ़रक जाणवतो.
खुद्द तमिळ भाषेत बरेच संस्क्रृत शब्द आढळ्तात.तमिळ भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल,
तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे.

अहो तमिळच कशाला,
मराठी व बंगाली भाषेत सुध्दा तोंडात बोटे घालावीत (कोणीहि कोणाच्या) अशी साम्य स्थळे आहेत.
उदा.सकाळ,वाटी,भातवाढी,डाव,पाडा,..........
पण माझ्या माहीति प्रमाणे हेच शब्द इतर भाषांत जसेच्या तसे वापरले जात नाहीत.(काहि प्रमाणात ओडिया,व आसामी भाषेत)
किंबहुना,समस्त कोंकण पट्टय़ात बोलल्या जाणा-या भाषेत आणि मराठीत तसेच बंगालीत कमालीचे साम्य आढळते.
ते हि कसे काय?

असे बरेच प्रश्न आहेत.त्यामूळॆ काहि शब्दात साम्य आढळले म्हणुन तेच मराठी भाषेचे मुळ मानणे पटत नाही.
थोडे सविस्तर लिहिल्यास उत्तम.

अभिज्ञ

आजानुकर्ण's picture

29 May 2008 - 7:39 am | आजानुकर्ण

भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल,
तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे.

बहुधा संस्कृत भाषा ही इतकी यमनियमांनी बांधलेली आहे की तिला श्वास घेण्यापुरतीही जागा मिळाली नाही आणि शुद्धाशुद्धतेच्या कल्पनांपायी ती गुदमरून मृतप्राय झाली असे काही लोक म्हणतात ते खरे असावे! याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या.

आपला,
(पिंडावरचा कावळा) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

29 May 2008 - 8:09 am | विसोबा खेचर

याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या.

सहमत आहे... ;)

तात्या.

विसोबा खेचर's picture

28 May 2008 - 11:54 pm | विसोबा खेचर

क्रुपया हे वाचावे!

हे लेखन इथून उडवले जाण्याची शक्यता आहे, हे जाणूनच पुढील प्रतिसाद द्यावेत!

भाषा, भाषा शुद्धी, व्याकरण, शुद्धलेखन, संस्कृत भाषेची सो कॉल्ड महती या विषयावर चर्चा करावयास माझे मित्र शशांक जोशी यांचे उपक्रम हे संस्थळ फार छान आहे!

मिसळपाववर वरील विषय सहसा एन्करेज केले जात नाहीत याची नोंद घ्यावी..!

तात्या.

आजानुकर्ण's picture

29 May 2008 - 7:24 am | आजानुकर्ण

हाती घ्याल ते तडीस न्या असे आमचे गुरूदेव म्हणतात. एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ.

आपला,
(अवलंबनपर्णोद्गमसूत्रोत्सुक!) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

29 May 2008 - 8:09 am | विसोबा खेचर

एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ.

ठीक आहे! मिपावरील एक्स पंचायत समिती सदस्य हा आपला रुतबा ध्यानात घेऊन आम्ही तूर्तास काहीच बोलत नाही. चालू द्यात चर्चा..!

परंतु या पुढे कृपया कुणीही भाषा, भाषेचा विकास, भाषेचं यांव, भाषेचं त्यांव, शुद्धलेखन, व्याकरण या विषयांवरील चर्चा मिपावर करून मिपाचं वातावरण घाण करू नये अशी सर्वांना हात जोडून, नम्र व कळकळीची विनंती!

मिपा जसं आहे तसंच राहू द्या! त्याला विद्वान संकेतस्थळांच्या रांगेत नेऊन बसवायचा प्रयत्न करू नका एवढीच विनंती! :)

तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 May 2008 - 12:07 am | llपुण्याचे पेशवेll

वरील उतार्‍याच्या संदर्भात एक लेख जालावर सापडला आहे. जो खैरे साहेबांच्या दाव्याच्या विरोधी आहे.
http://groups.google.com/group/alt.language.hindi/browse_thread/thread/c...
कदाचित वरील तामिळ शब्द महाराष्ट्री प्राकृतामधून दक्षिणेत गेले असण्याचा संभव आहे. कारण महाराष्ट्री पा़कृताबद्द्ल ख्रिस्तपूर्व ५व्या शतकापासून उल्लेख आढळतात. अधिक माहीती इथे वाचता येईल
http://en.wikipedia.org/wiki/Maharashtri
पुण्याचे पेशवे

आजानुकर्ण's picture

29 May 2008 - 7:36 am | आजानुकर्ण

पुणेकर पेशवेसाहेब,

खैरे साहेबांनी मराठी ही फक्त तमिळकडून आली असा कुठेही दावा केलेला नाही. मात्र शुद्धिकरणचळवळे लोक मराठीचा संबंध फक्त संस्कॄताशी जोडू इच्छितात आणि इतर भाषा अस्पृश्य असल्याप्रमाणे त्यांचा विटाळ मानला जातो. खैरे साहेबांच्या लेखात शास्त्रीय प्रयोग केल्यानंतर मराठी व तमिळचा संबंध कसा आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे. मात्र मराठीचा संबंध फक्त संस्कृताशी आहे अशीएकांगी भूमिका मांडणार्‍यांनी पुन्हा (शक्य असल्यास) विचार करावा यासाठीच तो प्रतिसाद. मराठी ही फक्त तमिळ किंवा फॉर दॅट मॅटर संस्कृताशीच संबंधित आहे व इतर (फारसी, अरबी, इंग्रजी, कन्नड) भाषांचा तिला विटाळ होतो असे मानू नये!

अवांतरः जय महाराज या लेखकाचा 'आवाका' गुगल ग्रुप्सवर वावरणार्‍या अनेकांना माहिती आहे. केवळ भावनिक उद्दीपन करून इतरांच्या नावाखाली भूमिका मांडणे असा त्यांचा खाक्या केवळ ह्याच समुदायावर नसून. या व अशा इतर समुदायांवरही लोकप्रिय आहे.
सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. मात्र त्यांनी दिलेले रामायणाचे पुरावे हास्यास्पद आहेत. हे लेखही वाचा यापेक्षा अधिक काय सांगू शकतो?

दुवा १
दुवा २
दुवा ३

आपला,
(गारदी) आजानुकर्ण

विकास's picture

29 May 2008 - 9:10 am | विकास

सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल.

http://www.gisdevelopment.net/application/archaeology/site/archs0001.htm

http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/2073159.stm

आणि हा विकीचा
http://en.wikipedia.org/wiki/Sarasvati_River

आजानुकर्ण's picture

29 May 2008 - 9:15 am | आजानुकर्ण

सरस्वती नदीचा पुरावा नको. ही नदी आणि भाषा यांचा संबंध जो सुब्रम्हण्यम यांना अपेक्षित आहे त्याबाबतचा पुरावा.

चेतन's picture

29 May 2008 - 10:19 am | चेतन

हा लेख बराचसा एकतर्फी वाटला. संस्कृतावरं टिका करायची म्हणुन कहिहि...

तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे.... (माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.)

असो अधिक माहितिसाठी कदचीत हा दुवा उपयोगी पडेल

http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_India#Classical_languages_of_I...

अजुन एक प्रश्न म.टा.मध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यापैकी बहुतेक बरेच शब्द नेहमीच वापरले जातात. जर एकदा नीट पहावे


http://www.misalpav.com/node/1897

चुकभुल द्यावी घ्यावी (हे कुठल्या भाषेतुन आले बां? कायं करायचयं B)

सुसंस्कृत चेतन

आजानुकर्ण's picture

29 May 2008 - 10:32 am | आजानुकर्ण

माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.)

तुम्हाला खैरे यांच्या तुलनेत बरीच माहिती दिसते (किती तरी पटींनी जास्त) .
तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा.

एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ?

आपला,
(तौलनिक) आजानुकर्ण

चेतन's picture

29 May 2008 - 10:58 am | चेतन

एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ?

तेलुगू-कन्नड या भाषांबद्दल आपण थोडं आधिक वाचावं आणी मगचं हे विचारावं

http://en.wikipedia.org/wiki/Telugu_language

माझ्यामते तुम्हाला ह्या दुव्याची देखिल गरज आहे
http://en.wikipedia.org/wiki/Sanskrit

अवांतरः
तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा.

१५३४३६७ संस्कृत
५३४९ तमिळ
२३८९ कन्नड
१२३४ तेलगु

हा अकबरासारखा प्रश्न झाला राजधानीत कावळे किती? ह. घ्या.

स्वगतः भाषा हा शब्द कोठुन आला बरं?

अमोल केळकर's picture

29 May 2008 - 11:05 am | अमोल केळकर

व्वा काय पुरावा आहे !!

चेतन's picture

29 May 2008 - 12:24 pm | चेतन

जरा हा दुवा पहावा

http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language#cite_note-bhasha-9

येथे एक वाक्य आहे

Marathi has taken words from and given words to Sanskrit, Kannada, Hindi, Urdu, Arabic, Persian, and Portuguese. At least 50% of the words in Marathi are either taken or derived from Sansrit.

हे आणखिन काही

Literature in all Dravidian languages owes a great deal to Sanskrit, the magic wand whose touch raised each of the languages from a level of patois to that of a literary idiom". (Sastri 1955, p309)

सर्वज्ञानी गूगल आणी en.wikipedia.org च्या सहाय्याने अज्ञानी चेतनमार्फत ज्ञानीलोकांकरिता

अवांतरः ज्ञानेश्वर, अम्रुतानुभव हे शब्द कोठुन आले बरं?

अतिअवांतरः महाराष्ट्र हा शब्द कोठुन आला बरं...?

मी मराठीचं पण संस्कृत थोडफार कळणारा चेतन

आजानुकर्ण's picture

29 May 2008 - 1:05 pm | आजानुकर्ण

संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही! मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठीला संस्कृतची झेरॉक्स कॉपी करायची असेल तर करा. मग मराठीही संस्कृताप्रमाणेच चोपड्यांमध्ये बंद राहील.

सुदैवाने आमच्यासारखी सामान्य जनता अशा प्रयत्नांची खिल्ली उडवेल यात शंका नाही.

सोबत हे देखील वाचा.

आपला,
(स्पष्टवक्ता) आजानुकर्ण

चेतन's picture

29 May 2008 - 2:32 pm | चेतन

मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे

सहमत

मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे.

भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे या लेखात मलातरी हा प्रकार थोडासा जाणवला.

आपण दिलेला दुवा वाचनिय आहे पण इथे तुलना कोठेहि नाहि आणी ती होउ नये असे मला वाटते

संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही हे म्हणुनसुद्धा लेखात तरी सुर नाकरण्याचाच दिसतोयं

असो तुम्हि हे नाकारत नाही ह्यातच समाधान.

मी तरी मराठीप्रमाणे संस्कृतलाही आपलीच मानतो त्यामुळे कदाचित माझा सुर कडवटही असेल.

कडवट चेतन

कोलबेर's picture

29 May 2008 - 8:59 pm | कोलबेर

चेतनरावांनी आकडेवारी देऊन संस्कृतातुन किती शब्द आले आणि इतर भाषांमधून किती ह्याची तौलनिक माहिती देऊन अजानुकर्ण ह्यांच्या मुद्द्याचे खंडन केले आहे. श्री.अजानुकर्ण ह्यांनी त्याची कसलीही नोंद न घेता संस्कृत विरोधाचा सुर लावला आहे तो एकांगी वाटतो.

मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे
सहमत
मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे.

ह्या चेतनरावांच्या भुमिकेशी आम्ही देखिल सहमत आहोत. आंधळी भक्ती आणि विरोधासाठी विरोध हे दोन्हीही अयोग्य!

विकास's picture

29 May 2008 - 10:30 pm | विकास

कोलबेर ने योग्य आणि थोडक्यात मांडले असल्याने "+१" व्यतिरीक्त अजून काही नाही!

आजानुकर्ण's picture

30 May 2008 - 7:32 am | आजानुकर्ण

कोलबेरशेठ आणि तुम्ही दोघांनीही मी दिलेला दुवा न वाचताच ही प्रतिक्रिया दिली आहे हे खेदाने म्हणावे लागत आहे.

आपला,
(सखेद) आजानुकर्ण

आजानुकर्ण's picture

30 May 2008 - 7:29 am | आजानुकर्ण

अहो संस्कृतविरोधाचा आणि एकांगी सूर कोणी लावला आहे येथे? चेतनरावांनी दिलेल्या आकडेवारीतील ह.घ्या. हे वाचले का?

समजा चेतनरावांनी गंभीरपणे ती आकडेवारी दिली आहे असे मानू. मग मी दिलेल्या दुव्यावर दाते कर्वे यांच्या कोशानुसार मराठीतील एकूण शब्द 1,12,189 आहेत हे स्पष्ट लिहिले आहे. मग चेतनरावांनी दीड लाखाहून जास्त शब्द संस्कृतातून आलेत याचा पुरावा देणे आवश्यक नाही का?

मी विरोधासाठी विरोध करत असल्याचा एकही पुरावा द्यावा मी सपशेल माफी मागण्यास तयार आहे!

आपला,
(सहसदस्य) आजानुकर्ण

अवांतरः श्री. जनरलपंत डायर यांच्या वटहुकूमाची अंमलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र आमचे मित्र कोलबेर शेठ यांच्या प्रतिसादात 'आजानुकर्ण' या आमच्या नावाचा वैयक्तिक उल्लेख झाल्याने प्रतिसाद देत आहोत याची जनरलपंतांनी नोंद घ्यावी ही विनंती.

आपला,
(स्पष्ट) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

30 May 2008 - 7:37 am | विसोबा खेचर

आता सर्वांनी हा विषय इथेच थांबवावा! काही चर्चा करायची असेल तर ती खरडवहीतून किंवा व्य नि तून करावी. अन्यथा हा संपूर्ण थ्रेडच अप्रकाशित करण्यात येईल..

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2008 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, आणि मराठी तामिळीचे भाषिक नातेसंबध एका माहितीपूर्ण लेखनात वाचायला मिळाले, आणि ते आवडले.

अवांतर : मिसळपाव मराठी संकेतस्थळावर सर्व लेखन संवाद हे मराठी भाषेतून होत असतांना भाषिक लेखांना संस्थळाच्या मालकाचा विरोध होतो, ही गोष्ट मराठी भाषाप्रेमी म्हणुन दुखः देणारी वाटते. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

29 May 2008 - 9:46 am | विसोबा खेचर

मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह,

हा हा हा! हे शब्द वाचूनच करमणूक झाली! :)

नथ नाकानं साजिरवानी,
गला भरून सोन्याचे मनी
कोलीवार्‍याची मी गं रानी
रात पुनवेला नाचून करतंय मौजा!

काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :)

काय रे बाला, हिर्‍याच्या कुडाचे तुज्या कुल्ल्यावर पोकल बांबूचे फटके मारू का दोन? रांडच्या, हिकू का तुला?! :)

काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :)

मराठी भाषा ही अठरापगड जातीजमातीत बोलली जात असताना आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे! :)

आपला,
(आग्र्या-कोळ्यात लहानाचा मोठा झालेला)
दर्याचा राजा -तात्या.

कोलबेर's picture

29 May 2008 - 9:59 am | कोलबेर

तात्या शाळेत असताना तुमचा व्याकरणाचा मास्तर लैच मारकुटा होता का हो? नाही.. भाषाशास्त्र ह्याविषयी कुणीही काहीही बोलले की त्यामधुन 'शुदद्धलेखनाची सक्ती लादली जाते आहे' ह्या एकमेव निष्कर्षावर तुम्ही कायम येताना पाहुन मनात आलेली ही शंका वाढत जाते.

विसोबा खेचर's picture

29 May 2008 - 10:09 am | विसोबा खेचर

हम्म!

कोलबेरा, प्रत्यक्षात भेटू तेव्हा या विषयावर तुझ्याशी बोलीन सवडीने! अगदी नक्की...! :)

तूर्तास,

गोमू संगतीनं माज्या तू येशील काय
आरं संगतीनं तुज्या मी येनार नाय

ह्या ओळी भाषेच्या आणि भाषाशास्त्राच्या दृष्टीनं चूक की अचूक, ह्या विचारात मी अडकलो आहे आणि बाप खपल्यासारखा चेहेरा करून त्यावर गहन विचार करतो आहे! तेव्हा, प्लीज डोन्ट डिष्टर्ब मी! :)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2008 - 4:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे

सोकॊल्ड, भाषा शुद्धीचे आग्रही, शुद्धलेखनाचे पुरस्कर्ते, बोजड भाषेचे महागुरु, संस्कृतप्रेमी, फुगीर सुशिक्षित, म्हणजे आम्ही की काय ? च्यायला आमची प्रतिमा इतकी कशी उंचावली !!! ;)

आपल्याप्रमाणेच, अठरापगड जातीजमातीची बोलल्या जाणारी बोली ही आमची जीव का प्राण आहे, आम्ही त्यावर नुसते प्रेम करत नाही तर, रहाटगाड्यात ती भाषा लिहितो, बोलतो आणि जगतोही !!! :)

-दिलीप बिरुटे
(बोली भाषा लेखनात वापरणारा )

संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली
त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत.
यातच काय ते समजावे. सामान्यांच्या या भाषेला पुन्हा एकदा उच्चेतरांची भाषा बनवण्याचा घाट कशासाठी घालत आहोत? हा पुन्हा द्रावीडी प्राणायामाचा हट्ट कशासाठी.

आजानुकर्ण's picture

29 May 2008 - 1:17 pm | आजानुकर्ण

हेच तर सांगायचा प्रयत्न करून रायलो ना भौ आम्ही

आपला,
(सहमत) आजानुकर्ण

चेतन's picture

29 May 2008 - 3:03 pm | चेतन

संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत.

आता ज्ञानेश्वरीतली बोली भाषा ही कळत नाही म्हणुन आपण त्याचाही अनुवाद करुन वर बोलीला शब्दबंबाळ म्हणणार का? (आपल्याच शब्दात उच्चेतरांची भाषा वगैरे वगैरे ठरवणार का?)

संस्कृतला खाली दाखवण्याचा हा अट्टाहास कशापायी?

कडवट चेतन

अवांतरः अनेक उत्तम साहित्याचे मराठित अनुवाद झाले आहेत म्हणुन मुळ भाषेला नावे ठेवावी का?

संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन (ह. घ्या.)

संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन
चेतन भौ म्या संथ न्हाय पन ज्ञानेश्वरी लिव्हुन बी काही शतके उलटली.
ती बोली बी आता मागं र्‍हायली.
म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय.
फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण.
जिवंत भाषा जिवंत नदी सारखी असते. ती वाहती रहायला तिला छोट्या नद्या/ ओढे/ प्रसंगी नालेही मिळतात.
कल्पना करा उद्या गंगा किंवा कृष्ण नदीच्या सर्व उपनद्या शुद्धीच्या नावाखाली अडवल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल.
उगमाजवळ असेल तेवढेच राहील.
उरल समुद्राबाबतीत असे झाले आणि आता उरल समुद्र आटुन त्याचे आस्तित्व एक मोठे डबके म्हणुन राहीले आहे

सन्स्कृत राहुदे बाजुला, ज्ञानेश्वरी तरी नीट समजते का आपल्याला? (आणि मुळात कितीक जण वाचतात्/वाचणारेत?)
इकडे पुढच्या पिढ्या इन्ग्रजी माध्यमातून शिकवुन "देशी इन्ग्रज" तयार करण्याचे कारखाने सुरू असताना स्वातन्त्रवीरान्नी भाषा शुद्धीबाबत जे केल ते योग्य की अयोग्य हा वाद आता हवाचे कशाला?
कोण बोलणार लिहिणार वाचणार तुमची ती दरिद्री दळभद्री मराठी जिच्यात म्हणे ज्ञानाचे काहीही कण नाहीत म्हणुन तर इन्ग्रजी माध्यमातून लहानग्यान्ना शिक्षाण देतात ना हल्ली?
अन जन्तेच्या पुढल्या पिढ्या जर मराठी शिकणारच नसतील तर हवित कशाला म्हणतो मी ही थेर?
त्यापेक्षा एमटीव्ही बघा, ऐश करा! :D
(जे खानदानी(?), उच्चवर्णीय(?), मराठीप्रेमी असतील ते टिकवतीलच मराठी, ती ही शुद्ध स्वरुपात! नाहीतर शेवटी "पुणे" आहेच!:D )
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

अजानुचा लेख चांगला आहे, बरीच नवी माहिती मिळाली. मराठी भाषा ही जशी फक्त संस्कृतापासून बनली नाही तशी ती फक्त तमिळपासूनही बनलेली नाही. (तसे अजानुने लिहिल्याचा दावाही नाही) संस्कृती आणि भाषा यांच्यात कालानुसार होत जाणारी सरमिसळ जुनी आहे. उद्वेग तेव्हा येतो जेव्हा संस्कृत आम्हाला आवडते (हे म्हणणार्‍या लोकांना संस्कृतात चार वाक्ये लिहिता येतात का देवजाणे! उगीच इथून तिथून पाठ केलेले श्लोक देणे म्हणजे आपल्याला संस्कृत येते अशी काहीजणांची समजूत असावी) म्हणून आम्ही संस्कृतातले शब्द प्रतिशब्द म्हणून घेणार हा पोरकटपणा वाटतो.

संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात.

संस्कृतात सर्व काही आहे हा आणखी एक पोरकट ग्रह लोकांनी काहीही माहित नसताना करून ठेवलेला असतो. जी भाषा एका विशिष्ट गटाच्या बाहेर पडलीच नाही, जिच्यात काळानुसार फारसा (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) बदल झाला नाही तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह.

असाच एक ग्रह की संस्कृतात सर्व उच्चार आहेत. संस्कृत बोलल्याने वाणी शुद्ध होते. यावर अनेक स्थळांवर झालेल्या चर्चांमध्ये हा दावा किती फोल आहे यावर चर्चा झाली आहेच. मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा.

मराठीत संस्कृतातील बरेचसे शब्द रूळल्याने बरेचदा अभियांत्रिकी (अभिवादन, अभिमान, अभिनंदन हे शब्द मराठीत आधीच आहेत) आणि यंत्र हा शब्दही मराठीत रूळलेला आहे तेव्हा अभियांत्रिकी हा शब्द मराठी प्रतिशब्द नसून संस्कृत प्रतिशब्द ठरतो आणि "म्हणजे काय आहेत का तुमच्याकडे पर्याय संस्कृताशिवाय?" असे पोरकट प्रश्न विचारले जातात.

बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? कारण ते उत्तर पोरासोराला आले असते की अभियांत्रिकी= इंजिनिअरींग पण भाषा पोरासोरांना येऊ नये हीच या मंडळींची इच्छा असते का काय कोणास ठाऊक. हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून का द्यावेत तर कोणीतरी उठून भाषाशुद्धीचं खूळ निर्माण करतो. रूळलेल्या शब्दांची भाषाशुद्धी आणि भाषेत येणार्‍या नव्या शब्दाला प्रतिशब्द शोधणे यातला फरक काही श्रेष्ठींना जाणवला नाही याचे सखेद आश्चर्य वाटते.

असो.

विसोबा खेचर's picture

29 May 2008 - 3:53 pm | विसोबा खेचर

असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात.

हा हा हा! :)

तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह.

बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही.

अगदी १०० टक्के सहमत आहे.. ! :)

आपला,
(प्रियालीचा मित्र) तात्या.

आंबोळी's picture

29 May 2008 - 5:16 pm | आंबोळी

संस्कृतचा आग्रह धरणारे जे कोण पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक आहेत त्यापैकी कुणीही हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून द्या आणि संस्कृतोत्भवच शब्द घ्या असा आग्रह धरल्याचे मिसळपाववरील तिनही चर्चेत दिसला नाही. (असल्यास ते मुर्ख आहेत असे माझे वैयक्तीक मत आहे.). जर दुसर्‍याकुठल्या संस्थळावर असा अग्रह त्यानी धरला असेल तर ती धुणी मिसळपाववर का धुतली जात आहेत?

संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हे कस बरोब्बर बोललात प्रियालीताई.... अहो एकदा भाषा वाहत्या नदीसारखी म्हटली की जड धोंडे अपोआपच तळाला जाणार. चांगले आसेल ते तुकारामाच्या गाथेप्रमाणे आपोआप वरती येइल त्यासाठी मुद्दामहून कष्ट घ्यायची सुध्धा गरज पडणार नाही. त्यामुळे ज्याना कोणाला असले जड शब्द वापरायचेत त्याना वापरुदे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाकीचे पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतील.

अवांतर :
मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. कुठल्या चित्रपटात त्या मराठी माणसाची वाणी संस्कृतमुळे शुध्ध होती तरी त्याचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे दाखवले आहे. असली उदाहरणे देउन संस्कृतमुळे मराठी लोकांचे हिंदी-इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे म्हणायचे आहे का तुम्हाला? यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.

प्रियाली's picture

29 May 2008 - 5:48 pm | प्रियाली

दिनांक (तारीख)
मूल्य (किंमत)
उपस्थित (हजर)
वेतन (पगार)
निर्बंध (कायदा)
झरणी(फाउंटनपेन)

मी केवळ काही वेगळी उदाहरणे दिली, मूळ उदाहरणे मटात आणि मिपावर आली आहेतच. माझ्या उदाहरणात वरील उदाहरणेही टाका कारण मी दिलेली उदाहरणे आणि वरील उदाहरणे ही मराठीतील प्रचलीत शब्द आहेत. तेव्हा ज्यांना मूर्ख म्हणालात :SS त्यांचे प्रेमी धावत येतीलच असे मानू. =)) (खरे म्हणजे नाही येणार कारण त्यांना आपला फोलपणा कळला आहे तेव्हा ते सध्या इकडची वाक्ये तिकडच्यांच्या नावावर खपवायच्या मागे आहेत.)

आणि हो! मूळ लेख मटावरचा ना मग ती धुणी चालतात का भौ तुम्हाला की इथे तुमच्या मर्जीची धुणी धुवावी लागतात?

यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.

अजिबात नाही. हास्यास्पद दावे जसे की संस्कृताची भरणा केल्याने आमची वाणी शुद्ध होते असे दावे करणार्‍यांवर ती टिप्पणी आहे, अर्थात ते तुम्हाला मानवेल असे वाटत नाही.

उलट जेव्हा आपली नाणी खोटी ठरू लागतात तेव्हा मग इतरांवर संस्कृत द्वेष्टे असल्याचे, भट-बामनांना बोलणी लावल्याचे दावे केले जातात.

चेतन's picture

29 May 2008 - 4:58 pm | चेतन

गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली?

हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही

बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही.

हाच प्रश्न तुम्हाला...

संस्कृतची ऍलर्जी का?

गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली?

संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का?

म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय.
फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण

त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.

हे मात्र खरे...

असो चुकभुल दयावीघ्यावी

सावरकर आणि संस्कृतप्रेमी मराठी चेतन

हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही

हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे.

मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. संस्कृताचा मराठीवर प्रभाव कोणी नाकारत नाही.

संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का?

हाहाहाहा!!!! नाही याला मी हास्यास्पद विधान म्हणते, माझा प्रतिसाद नीट वाचला असता तर कळले असते. हल्ली सुसंस्कृतांची भाषा इंग्रजी. संस्कृताचा काही संबंध नाही. म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले.

त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की

भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे

. ती खरी मराठी नाहीच.

हे वाक्य माझे नाही. मी असे काही सांगणारे भाष्यही केलेले नाही. संस्कृतही ब्राह्मणांनी आपल्यापुरती मर्यादीत ठेवली होती असे काहीसे म्हटले आहे. तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे!

चेतन's picture

29 May 2008 - 6:07 pm | चेतन

हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे १००%खरं फक्त कोणाबाबतं...... (क्षमस्व)

म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले

मला वाटतं इंजिनिअरींगला अभियांत्रिकी हा प्रतिशब्द दिला होता....

त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की

भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे

ती खरी मराठी नाहीच.

हे वाक्य माझे नाही.

हे मलाही माहीते

तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे!

तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?)

असो राग नसावा...

क्षमोत्सुक चेतन (दुसरा शब्द आठवला नाही)

प्रियाली's picture

29 May 2008 - 6:13 pm | प्रियाली

कारण मूर्खांवर राग धरू नये, त्यांना क्षमा करावी हे सांगण्यासाठी संस्कृत शिकायची गरज नसते.

=))

चेतन's picture

29 May 2008 - 6:32 pm | चेतन

हा "अभिज्ञ " यांचा शेवटचा प्रतिसाद

फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी
मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. )
पाली:- सिप्पस्तथ्य
स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो

हे शब्द दिल्या बद्दल श्री मनोबा व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना धन्यवाद.
हे शब्द "कर्णाला" (कानाला) अवघड वाटतायत की अभियांत्रिकी अवघड वाटतोय?
=))

धन्यवाद क्षमाशील प्रियाली ताई

हे थोडेसे कुठुन तरी forward आलेले

लढत मूर्ख

कोठेही 'खुट्ट' काही | संताप यास येई |
आंदोलनास जाई | तो लढत मूर्ख |

पिळत मूर्ख

तोंडी भिजे न तीळ | मारे अफाट पीळ |
ऐकून 'दातखीळ' | तो पिळत मूर्ख|

मूर्ख चावट (विशेषण चिकटवलेला) चेतन

प्रियाली's picture

30 May 2008 - 3:46 am | प्रियाली

आपल्याला कारण नसताना मूर्ख म्हटल्याबद्दल क्षमस्व!

परंतु, मी न लिहिलेले शब्द दुसर्‍यांच्या प्रतिसादातून उचलून मला चिकटवण्याचा प्रकार पसंत नाही.

तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?)

याला मी हो असे उत्तर देईन परंतु तुम्हाला पटावा असा अट्टहास नाही.

विकास's picture

29 May 2008 - 8:32 pm | विकास

मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे.

हे मी सतत वाचतोय तुमच्याकडून अजानूकर्णाकडून म्हणून हा प्रश्नः

कृपया "फक्त संस्कृत" वापरा असे नक्की या चर्चांमधे कोण म्हणाले? संदर्भ मिळाले तर बरे वाटेल.

वास्तवीक चर्चा सावरकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त चालली होती. त्यात त्यांनी तयार केलेले प्रतिशब्द लिहीले. त्या माझ्या लिहीण्यात मी काही संस्क्रूतचा उल्लेख देखील केला नव्हता. (त्यांच्या हिंदूत्व आणि क्रांतिकार्याबद्दल बरेच बोलले जाते त्यामानाने भाषाशुद्धीबद्दल कमी बोलले जाते. म.टा. मधील या बातमीत सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे ती स्वातंत्र्यवीरांना नम्र अभिवादन करत येथे देत आहे) त्यांनी संस्कृत लिहीले त्यांना तसे वाटले, त्यांना सुचले आणि तुम्हि वापरत असा अथवा नसा पण एक झरणीचा अपवाद सोडल्यास दिनांक, मूल्य, उपस्थित, वेतन, निर्बंध, हे शब्द आजही वापरात आहेत आणि मला नाही वाटत ते कोणी संस्कॄतच्या अभिमानाने वापरतात.

पण मूळ विषय बाजूला जाऊन "मराठीचे अतोनात नुकसान झाले असे म्हणले गेले.." पुढे जेंव्हा "संस्कृत मधले शब्द असले तर काय बिघडले" असे काही जण म्हणायला लागले.

तेंव्हा, त्यात नको इतका ओंकार नी म्हणल्याप्रमाणे हा विषय चघळायला सुरवात झाली आणि जणू काही हे सर्वजण फाक्त संस्कृतचेच शब्द वापरा असे म्हणतात अशी हवा केली गेली. त्यात परत "बहूजन समाज" वगैरे शब्द आणायचे. त्यातून नकळत जातीय चष्मे तयार होतात आणि ते चालू शकतात...

असो. माझ्या पुरते बोलाल तर मी काही फक्त संस्कॄत असा कधी आग्रह धरलेला नाही पण त्याचा अथवा इतर भाषेतून मराठीत रूळलेल्या शब्दांना पण विरोध केलेला नाही. माझा विरोध असेलच तर कुठल्याही पद्धतीने जातीचे चष्मे वापरण्याला आहे. आपल्या देशाचा त्यामुळे आत्तापर्यंत झालेला विचका आपण पाहून त्यावरून या काळात पण काही शिकणार नसलो तर आपल्याला भारत म्हणून आणि जगात कुठेही असलात तरी भारतीय म्हणून काही भविष्य नाही. मुकी बिचारी कुणीही हाका अशी मेंढरेच आपण बनणार कधी राजकीय दास्याने तर कधी वैचारीक....म्हणून अस्ल्या चष्म्यांचा मला तिरस्कार येतो.

नळाच्या पाण्यावर भांडल्यासारख्या या चर्चा चालू आहेत असे वाटायला लागले आहे.

हे सांगण्याचे कारण इतकेच की हा सर्व गहजब (कुठल्या भाषेतला शब्द?) मी चालू केलेल्या लेखातून चालू झाला.

माझ्या पुरता हा विषय मी बंद करतो.

प्रश्न विचारून विषय बंद करताय :) यातच सगळं आलं.

विकास's picture

29 May 2008 - 8:51 pm | विकास

प्रश्न विचारून विषय बंद करताय यातच सगळं आलं.

ह्यात पण आपण उत्तर दिले नाहीत यात पण सगळ आले का? :-(

मी वाद घालण्यासाठी विषय बंद केला आहे. उत्तर मिळाले तर त्याला उत्तर देईन. अजून ही उत्तराची वाट बघत आहे.

प्रियाली's picture

29 May 2008 - 8:54 pm | प्रियाली

त्यामुळे उत्तर व्य. नि. ने पाठवले आहे.

विसोबा खेचर's picture

29 May 2008 - 5:31 pm | विसोबा खेचर

संस्कृतची ऍलर्जी का?

कारण ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे. शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! :)

आजानुकर्ण's picture

29 May 2008 - 5:32 pm | आजानुकर्ण

हेच तर ऐकायचे होते!

आपला,
(ऐकीव) आजानुकर्ण

प्रियाली's picture

29 May 2008 - 5:37 pm | प्रियाली

त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात

मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे. :))

विसोबा खेचर's picture

29 May 2008 - 6:13 pm | विसोबा खेचर

मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे.

अजून मिपावर आणिबाणी सुरू आहे त्यामुळे ह्या संदर्भात लवकरच एक वटहुकूम जारी केला जाईल! :)

तात्या.

प्रियाली's picture

29 May 2008 - 6:15 pm | प्रियाली

जाम उत्सुकतेने वाट पाहते आहे. ;)

ऋषिकेश's picture

29 May 2008 - 6:17 pm | ऋषिकेश

हे ऐकुन आता कसं मोकळं मोकळं वाटतय :)
वाट पाहतोय तात्या!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

मन's picture

29 May 2008 - 6:04 pm | मन


.... शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे!

१००% सहमत.
अहो ते लोक (समोरच्याला संस्कृत फारसे समजत नाही ह्याची खात्री झाली की )तसले उच्चार ऐकवुन समोरच्याला
घाबरवुन टाकतात.

आपलेच,
असल्या विद्वानांना टरकलेले
जन सामान्यांचे मन.

कोलबेर's picture

29 May 2008 - 9:07 pm | कोलबेर

किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे!

ह्यातुन तुम्हाला त्या *** लोकांची ऍलर्जी पाहिजे संस्कृतची कशाला? संस्कृतच्या ऍलर्जीसाठी ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे इतके पुरेसे आहे.
शाणपट्टी करणार्‍या लोकांची लोकांची जगात ददात नाही पण म्हणून कशाकशाची ऍलर्जी लावून घेणार?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2008 - 5:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अट्टाहास, आग्रह आणि संस्कृतप्रेम..........सुरेख प्रतिसाद !!!

(पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल)

खल्लास !!! :)

विजुभाऊ's picture

29 May 2008 - 3:31 pm | विजुभाऊ

बायको सोडुन द्यायची?
ते किमान या जन्मी तरी शक्य नाही. तिच्या बरोबर सात जन्माची नातीचरामी अशी शपथ घेतली आहे
(बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या :) ) )

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2008 - 4:07 pm | प्रभाकर पेठकर

बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या )

काय वाट्टेल ते काय विजुभाऊ? गेला जन्म सातवा होता. हा बोनस जन्म आहे. (सात जन्म बायकोशी नीट वागल्या बद्दल.)

मुक्तसुनीत's picture

29 May 2008 - 3:53 pm | मुक्तसुनीत

एक चांगला गोषवारा दिल्याबद्दल अजानुकर्णाचे अनेक आभार.

एक सामान्य मराठी भाषिक , वाचक नि नागरिक म्हणून मला असे दिसते की, कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत लागू होणारे "अति सर्वत्र वर्जयेत्" हे सूत्र भाषेच्या बाबतीतही लागू पडतेच. भाषाशुद्धीकरणाच्या नावाखाली बोजड संस्कृत शब्द माथी मारणे हे जसे चुकीचे , तसेच ऊर्दु, फारसी, इंग्रजी, या पैकी कुठल्याही भाषेची शिरजोरी/प्राबल्य होऊ देणेही चुकीचेच.

शेवटी भाषेच्या शुद्धीचा प्रश्न दुय्यम ठरतो. महत्त्वाचा प्रश्न हा की लोकशाही व्यवस्थेमधला जो महत्त्वाचा घटक - सामान्य जनता - त्यांना डोळ्यासमोर ठेवून भाषेची धोरणे अमलात यायला हवीत. गावाकडचा शेतकरी , इतर व्यावसायिक या लोकांना सरकारी कागदपत्रे भरायची असतील , शरी असो की ग्रामीण , अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. बस्स. मग त्यात ऊर्दु, फारसी, इंग्रजी, संस्कृत या भाषेतले शब्द येवोत - न येवोत.

एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच.

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2008 - 4:18 pm | प्रभाकर पेठकर

ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी.

....एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच. ....

आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल?

म्हणजे शासकिय वेगळी आणि अशासकिय वेगळी अशा दोन मराठी भाषा प्रत्येकाला आल्या पाहिजेत.

शाळे पासूनच सर्वांना 'खेडवळ' भाषा शिकवावी. त्यात पुन्हा, कोकणातील खेडं वेगळं, विदर्भातील खेडं वेगळं आणि देशावरील खेडं वेगळं. कोळ्या-आगर्‍यांची मराठी वेगळी, बाल्यांची मराठी वेगळी, वसईच्या ख्रिश्चनांची मराठी वेगळी. शाळेपासून ह्या सर्व मराठी भाषा प्रत्येकाने शिकल्या पाहीजेत. त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.

limbutimbu's picture

29 May 2008 - 4:31 pm | limbutimbu

ह ह पु वा झाली प्रभाकरपन्त! अचूक निशाणा!

>>>>> त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे
ग्यानबाची खरी मेख तिथच हे प्रभाकरपन्त! भाषा (शुद्ध वा अशुद्ध) हे केवळ निमित्त!

आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

विकेड बनी's picture

29 May 2008 - 4:36 pm | विकेड बनी

त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.

जळतंय पण वळत नाही!!! =))

मुक्तसुनीत's picture

29 May 2008 - 6:09 pm | मुक्तसुनीत

आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल?

मिसळपाववर लिहीलेले प्रत्येक वाक्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक खेडुताला समजावे असा तुमचा इशारा दिसतोय. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो .

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2008 - 11:27 pm | प्रभाकर पेठकर

अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी.

ह्या तुमच्याच मागणीनुसार सरकारी (शासकिय की शासकीय?) आणि मिपावरील भाषा वेगवेगळी असावी असे सूचित केले आहे.
मला व्यक्तिशः मराठी भाषेत आजपर्यंत रुळलेल्या इतरभाषांतील शब्दांबद्दलही तिव्र आक्षेप नाही आणि संस्कृतातून आलेल्या शब्दाबद्दलही आक्षेप नाही. माझ्याकडून जमेल तेंव्हा जमेल तितके (मला समजणारे)शुद्ध मी लिहीतो/बोलतो. कधी 'मूड' नसला तर इतर भाषिक शब्दही वापरतो. पण तो माझा भाषिक स्वभाव नाही. हे म्हणजे रोज घरी 'सात्विक' जेवण जेवल्यावर कधी कधी कंटाळा येऊन बाहेर हॉटेलातील 'तामसी' जेवणही जेवतो. पण रोजच्या जीवनात 'सात्विक'तेचा आग्रह धरतो, पुरस्कार करतो.

ही सर्व चर्चा मला तरी रुचली नाही. मुद्यांना मुद्यांनी उत्तरे देण्यापेक्षा चर्चा वैयक्तिक पातळीवर भरकटली. संबंधितांनी तशी भरकटवू दिली ह्याचे दु:ख आहे.

इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो .
माझे मराठी १००% शुद्ध आहे असा मी दावा कधीच केलेला नाही. मिपावर 'शुद्धते'चा बाऊ केला जात नाही, शुद्धीचिकित्सक मला सापडला नाही, त्यामुळे र्‍हस्व-दीर्घच्या चुका जशा माझ्या होतात तशा इतरांच्याही होतातच. पण त्यालाही मी आक्षेप घेतलेला नाही. ह्म्म! कोणी मुद्दामहून चुकीचे मराठी लिहून वाचकांच्या वेळेचा अपव्यय करीत असेल तर त्याला जरूर आक्षेप घेतला आहे. मिपावर शुद्धिचिकित्सक सुरू केला तर तो मी आनंदाने आवर्जून वापरेन. माझे लेखन र्‍हर्स्व-दीर्ध चुकांविरहीत असेल तर मला स्वतःलाच वाचायला आवडेल. स्वान्तसुखाय म्हणतात तसे.

मुद्दाम जड-जड संस्कृत शब्द जोडून मराठीला पर्यायी शब्द बनविणारे एक गंमत म्हणून असे शब्द बनवित असतात. सर्वांनी ते वापरावेच असा आग्रह नसतो. जे संस्कृतोद्भव मराठी शब्द आहेत ते समजायला, वापरायला कठीण असतील तर कोणी कितीही जंग जंग पछाडले तरीही ते शब्द वापरात येणार नाहीत. 'शासकीय' भाषेत कॉरिडरला 'छन्न विभाग' असा शब्द आहे. 'लिफ्ट' ला 'उद्वाहक' असा शब्द आहे. कोण वापरतो? पण 'वेतन' हा समजायला, वापरायला सोपा शब्द असेल तर तो फक्त संस्कृतोद्भव शब्द आहे (अस मी वरील चर्चेतून अर्थ काढला आहे) म्हणून वापरायचा नाही का? माझ्या माहिती नुसार, 'पगार' हा शब्द 'आश्रीताला खर्चासाठी दिलेली रक्कम' अशा अर्थी आहे. आपण नोकर्‍या करून वेतन मिळवितो त्याला 'पगार' म्हणून स्वतःला आश्रीत घोषित करायचे का? आपण आश्रीत असतो का? त्या पेक्षा 'वेतन' शब्दात सन्मानही आहे. असो.
भाषा विषयावर माझा अभ्यास तरी बराच उथळ आहे. त्यांमुळे भाषा शास्त्रातले मोठमोठ्या संशोधकांचे दाखले मी देऊ शकत नाही. ह्याहून जास्त वाद मी घालू शकणार नाही, माझी इच्छाही नाही.
लाथाळ्यांपेक्षा चांगले विचार, चांगले साहित्य वाचायला मिळावे म्हणून मी मिपावर येतो. असेच चालणार असेल तर मिपा उघडून बसण्यापेक्षा दुसरे कांही महत्त्वाचे काम करणे मी पसंद करीन.

धन्यवाद.

ऋषिकेश's picture

29 May 2008 - 5:38 pm | ऋषिकेश

त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच

<:P हा हा हा हा :))) =))

-('मिसळ'लेला भट बामन) ऋषिकेश