मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता एक लांबचा प्रवास

रामदास ·

पिवळा डांबिस Tue, 06/03/2008 - 03:51
मस्तच लिहिलंय! काही काही लिखाण असं असतं की त्यावर सविस्तर प्रतिक्रिया न देता नुसतं शांत बसून ते संवेदावं असं वाटतं... त्यापैकीच हे एक. चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे जियो! असेच लिहीत रहा!! -पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

प्रास Tue, 11/08/2011 - 22:18
सध्या इतकंच. पिडांकाकांच्या इतकं पर्फेक्ट पीन-पॉईण्ट बोलणं जमणारच नाही मला म्हणून....

मलाही आवडले... तुमची रेंज छान आहे. आधी पिसिजेसि आणि आता हे... दोन्ही प्रकार तुम्ही छान हाताळले आहेत. "बुवा समजत नाही हो गवळण ". बुवा हसले .म्हणाले"राधा व्हावं लागतं हो त्यासाठी'..एवढ्यात कसं जमणार ते?". (लग्न, बोडणं , सत्यनारायण होता होता तोफ फुटायची वेळ आली होती ही एक वेगळीच गोष्ट) एकेका वळणावर कविता भेटत राहीली आणि मनाचा उथळ प्रवाह डोह झाला, खोल झाला पण अंधारत ही गेला. मस्त... बिपिन.

मुक्तसुनीत Tue, 06/03/2008 - 05:48
असे दिवस असतात की कवितेला आपण पारखे होतो. दिवसाला जोडून दिवस निघून जातात ..दिन गेले काव्याविण सारे गेल्यासारखे. आणि कधी "भलत्या वेळी , भलत्या मेळी असता मन भलतीचकडे " असताना "आज अचानक गाठ पडल्या"सारखे होते. तसे हे तुमचे लिखाण. वेड्यासारखे धावणारे आयुष्य नि त्या आयुष्यामागे धावणारे आपण हे विसरतोच की ठायलयीत , संथ प्रवाहात आपल्याला पुन्हा काव्याचा सहवास घडू शकेल ... या सहवासाबद्दल लेखकाचे अनेक आभार . तुमचा हा लेख पुनःपुन्हा वाचला. जेव्हढा वाचला तेव्हढे शांत , तृप्त वाटले.

सन्जोप राव Tue, 06/03/2008 - 07:09
कडकडीत उन्हातून घरात आल्याआल्या वाळा घातलेले माठाचे पाणी घटाघटा पिऊन उरलेले चेहर्‍यावर शिंतोडून तसेच डोळे मिटून पंख्याखाली पडून राहिल्यासारखे वाटले. सगळे शब्द सगळ्या संदर्भांसह समजले पाहिजेत या अट्टाहासाला कवितांच्या राज्यात अर्थ नाही. खानोलकर, रेगे, ग्रेस, रॉय किणीकर यांच्या कवितांचे (a+b)2 = a2+2ab+b2 असे विश्लेषण करता येईलच असे नाही. ते तसे करण्याचे गरजही नाही. एकेक कविता उशाला घेऊन झोपून जावे. हळूहळू स्वतःच्या मनाच्या तळाशी सूर मारायला लावणारा लेख. एक गद्य कविताच. सन्जोप राव

फटू Tue, 06/03/2008 - 07:11
पुन्हा एकदा ज्युनियर कॉलेजमध्ये मराठीच्या तासाला बसल्यासारखं वाटलं... प्राध्यापक एखादा आशयघन ललीत लेख तन्मयतेने शिकवत आहेत... आणि आपणही अगदी त्या लेखामध्ये हरवून गेलो आहोत... अगदी असंच झालं तुमचा हा लेख वाचताना... एक अप्रतीम लेख मिपाकराना देण्याबद्दल धन्यवाद... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अरुण मनोहर Tue, 06/03/2008 - 07:41
>>>>चित्रकला माझा काही हातखंडा विषय नव्हता तुम्ही सादर केलेले अप्रतीम गद्य चित्र पाहून असे वाटत नाही. तुमचा शब्द कुंचला ताकदवान आहे. अरूण मनोहर

विसोबा खेचर Tue, 06/03/2008 - 08:26
रामदासराव, आपल्या लेखाचे कुठल्या शब्दात वर्णन करू? अत्यंत उच्च दर्जा असलेले लेखन इतकंच म्हणेन. वाचून खूप समाधान वाटलं, तृप्त वाटलं..! या लेखामुळे मिपाचा दर्जा अधिकच उंचावला आहे एवढं निश्चित म्हणेन...! कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. क्या बात है! गाण्याचंही अगदी तसंच आहे. एखादा राग, एखादा स्वर आयुष्यभर पुरतो! आयुष्य पुरी पडतं परंतु यमनातला गंधार प्रत्येक वेळेला नव्यानेच भेटत राहतो...! अवांतर - पण कवितेचा पिच्छा सोडला नाही.आणि कवितेनं पण आपला हट्ट सोडला नाही. बागेश्रीच्या आलापासारखी कायम आर्त पण गूढ ओढ लावत राहिली. रागसंगीताचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा, आस्वाद वेगळा! बागेश्रीची ओढ आर्त निश्चितच असू शकते, परंतु त्यात मला तरी कधी गुढत्व जाणवलं नाही. अतिशय प्रसन्न स्वर आहेत बागेश्रीचे. शृंगाररस अगदी काठोकाठ भरला आहे बागेश्रीत! 'आर्त परंतु गुढ ओढ' ही मला प्रामुख्याने मारव्यातच दिसली/नेहमी दिसते. सोहनीतदेखील एक अनाकलनीय गुढत्व बर्‍याचदा अनुभवलं आहे! असो, अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन येऊ द्या एवढीच विनंती... आपला, (तृप्त!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

राजे Tue, 06/03/2008 - 10:36
निशब्द !!!!! तात्या : १००% सहमत. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मानस Tue, 06/03/2008 - 08:43
खरोखरच "नि:शब्द", कविता ही भोगावी असं म्हणतात ...... आम्हीतर अजुन कवितेतला "क" शोधतोय. आज मनापासुन वाटतय, खूप खूप जगावं, जगायचय आणि त्या जगण्याचं प्रयोजन हे असले लेख व त्यामधुन व्यक्त केलेले विचार देत असतात. इंदिरा संतांची "लिहिताना" कविता आठवली, ती इथे द्यायचा मोह आवरत नाही ................. अडखळे लिहिताना हात कधी अवचित आणि निरखून डोळे पहातात अक्षरात कानावेलांटीचा डौल, मोड तशी अक्षराची कधी द्यावी, कधी नाही रेघ अक्षरावरची नकळत उमटली कुणाची ही काय तऱ्हा इवल्याशा रेषेमाजी भावजीवनाचा झरा नव्हेतच अक्षरे ही; स्मृतीसुमनांचे झेले एकाएका अक्षरात भावगंध दरवळे म्हणूनीच लिहिताना अवचित थांबे हात; धुके तसे आसवांचे उभे राही लोचनांत

वाचक Tue, 06/03/2008 - 08:47
प्रत्येक शब्द कसा अगदी एखाद्या लयित बांधून अलगद वार्‍यावर सोडून द्यावा असा... म्हणजे नकळत कधी कानी सूर आलेच तर ओळखीचा निदान भास तरी होउ शकेल. उत्तम. निसर्ग वर्णन सुद्धा अगदी चित्रदर्शी. खानोलकरांची कविता आहे ना 'माझ्या ह्या अजाण कवितेच्या वाटेला जाउ नका, ती ज्या वाटा चालते आहे त्या आहेत तिच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या.... मोडून पडाल " किंवा 'कविता म्हणजे आकाशीची वीज - होरपळून घ्यायची तयारी हवी'

कोलबेर Tue, 06/03/2008 - 08:58
पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत खिळवून ठेवणारा लेख. मानसरावांनी दिलेली कविता देखिल शब्दांच्या पलीकडली..

विजुभाऊ Tue, 06/03/2008 - 10:17
रामदास भौ खूप दिवसानी काहीतरी हातातुन निसटु पहणारे चांगले वाचायला मिळाले एकाएकी टिटवीचा आलेला आवाज मला रेफ्री फायनल शिटी वाजवतो तसा आला. जमिनीवर आणले तुम्ही एका समाधीतुन..... आम्ही दोघही एकाच आरशातून बाहेर आलो. तळं अंधारलं होतं. कमळं मिटली होती.अंधारात आम्हा दोघांनाही असं वाटलं की आपल्या डोळ्यातलं तळं कुणालाच दिसत नाहीये. वाचताना माझ्याही डोळ्यात तळं जमा झाले.

प्राजु Tue, 06/03/2008 - 10:43
काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाहिये. खूप दिवसांनी इतका सुंदर लेख वाचला. त्यातही.. समोर एक सुंदर तळं .त्यात कमळाची फुलं . पांढरी कमळं.मोठाली हिरवीगार पानं.कमळं पण फार मोठी नाहीत. माझ्या तळहाता एव्हढीच.शिंगाड्याचे वेल अधून मधून वळसे घालत होते.तळही फारसं खोल नसावं. हिरव्या-काळ्या रंगाचा तळ अंधूकसा दिसत होता.मधूनच छोटे छोटे अनंत मासे शाळा सुटल्यासारखे धावत होते. निळसर टेकड्या,मध्येच कसलीतरी खूप हिरवी झाडं, नजरेच्या सहज टप्प्यात नारळीची झाडं , त्याच्या आश्रयाला गवताचं ,बांबूचं छोटसं घर.चारी बाजूनी अंधाराची चाहूल पण हळूहळू. या भागात कधी अंधारेल आणि कधी उजाडेल असं काही सांगता येत नाही.आम्ही दोघंही बोलता बोलता गप्प झालो..तळ्याकाठी स्तब्ध उभे राहिलो .आमच्या चाहूलीनी एक मोठा काळा मासा अंगाला हेलकावे देत पुढे निघून गेला. हिचं लक्ष कमळाकडे.माझ्याकडे बघून मंद हसली.आणि हसतच राहिली. आमच्या मुलीला लहानपणी क म्हणता यायचा नाही.एकटा क म्हणायची पण तमळातला क यायचा नाही.मग बराच वेळ आम्ही दोघही एकएकटे हसत राहिलो. हे तर अप्रतिम. चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे खरंतर.... ही लेख म्हणजेच एक सुंदर "गद्य काव्य" आहे असे मी म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू Tue, 06/03/2008 - 11:41
मस्त लिहिले आहे. मुग्ध झालो वाचताना. छान. आवडले. (संतुष्ट)बेसनलाडू

स्वाती दिनेश Tue, 06/03/2008 - 12:06
वरील सर्वांसारखीच माझीही अवस्था झाली आहे.प्रतिक्रिया लिहायला शब्द शोधते आहे पण सापडत नाहीयेत. अप्रतिम गद्यकविता! स्वाती

चतुरंग Tue, 06/03/2008 - 15:31
पहाटे ५.३० वाजता आपल्या प्रतिभेचं बोट पकडून माझं मन कधी लेखात गेलं आणि तळ्याकाठी जाऊन कमळं बघायला लागलं समजलंच नाही! टीटवीच्या शिट्टीनं सुद्धा भानावर यायचं नव्हतं. कवितेच्या शोधाच्या ह्या ललितानं मला आत नेलं. अनुभव इतक्या अकृत्रिम शब्दात मांडण्याची तुमची हातोटी काव्यच आहे. माउलीनं 'एकेक ओवी अनुभवावी' म्हटल्याप्रमाणे तुम्ही कविता अनुभवलीत. असं एक कडवं समजलं धन्य झालात. कुठल्या ओळींचा संदर्भ देऊ? संपूर्ण लेखच एक भरजरी वस्त्र आहे एखाद्या धाग्याला हात घातला तर उसवायची भीती वाटते. असेच शेले विणत रहा. नकळत येऊन आम्ही आनंद घेत राहू. चतुरंग

विवेक काजरेकर Tue, 06/03/2008 - 15:32
रामदासजी, फारच सुंदर लिहिलंय. तुमची लेखणी अगदी चित्रदर्शी आहे. उथळ पाण्यात सैरावैरा पळणारे मासे कैकदा पाहिलेत. पण "मधूनच छोटे छोटे अनंत मासे शाळा सुटल्यासारखे धावत होते" असं काही वाचलं की चित्र कसं स्पष्ट डोळ्यापुढे उभं रहातं. कविता कळायला लागायला मनाची एक अवस्था यावी लागते हे स्वानुभवावरुन सांगू शकतो. एका ठराविक वयापर्यंत गाण्याच्या केवळ सुरावटीत अडकलेल्या मला जेंव्हा त्यातला गर्भितार्थ कळायला लागला तेंव्हा कळलं इतके दिवस आपण कोणत्या आनंदाला मुकत होतो ते. असेच लिहित रहा

रामदास Wed, 06/04/2008 - 07:36
मिपा मुळे लिहावेसे वाटले. संधी उपलब्ध करून दिली. वाचकांचे आभार. आपल्या प्रोत्साहनाची आवश्यकता कायम राहील. अवांतर.. काल फोटो लोड करायला शिकलो.

In reply to by रामदास

मुक्तसुनीत Wed, 06/04/2008 - 08:03
तुमचे हे टिपण म्हणजे तुम्हालाच नव्हे तर मिसळपावलाही गौरवाचीही बाब आहे. तुमच्यासारखे जितके जास्त गुणी लोक मिसळपाववर येतील आणि लिहीतील तितके ते मिसळपावला श्रेयास्पद ठरेल. आतापर्यंत अप्रकाशित राहिलेले तुमच्यासारखे टॅलंट प्रकाशात आणणे हे या स्थळाचे मोठे यश.

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 08:26
तुमच्यासारखे जितके जास्त गुणी लोक मिसळपाववर येतील आणि लिहीतील तितके ते मिसळपावला श्रेयास्पद ठरेल. पूर्ण सहमत आहे! रामदासरावांनी व्यासपिठाचा उल्लेख केला आहे परंतु त्याचं विशेष काही नाही. व्यासपिठं अनेक आहेत, आणि मराठी माणसाच्या वाढत्या आंतरजालीय वावरामुळे, नव्यानव्या तांत्रिक सुविधांमुळे यापुढेही अनेक व्यासपिठं उपलब्ध होऊ शकतील. तेव्हा 'व्यासपिठ मिळवून दिलं!' हे रामदासरावांच वाक्य मिपा केवळ कृतज्ञतेच्या भावनेनेच स्वीकारत आहे! उलटपक्षी, मुक्तरावांनी मांडलेला मुद्दाच अधिक योग्य आहे. मिपावर सभासदांनी केलेल्या लेखनामुळेच मिपाचा गौरव आहे आणि मिपाचे सभासद हेच मिपाचे ऐश्वर्य आहे असेच मिपा मानते! आपला, (कृतज्ञ) तात्या.

यशोधरा Wed, 06/04/2008 - 07:58
कसलं सुरेख लिहिलं आहेत!! खरोखर गद्य कविता केली आहेत!! चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे अतिशय सुरेख!

जयवी Wed, 06/04/2008 - 14:20
रामदास, अहो वाचन तॄप्ती काय असते ते तुमचा हा अतिशय काव्यात्मक लेख वाचताना जाणावलं. अप्रतिम लिहिलंय.... पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख आहे हा. खूप दिवसांनी असं मनाला शांत करणारं , उल्हसित करणारं वाचायला मिळालं.......असेच लिहित रहा.

सुवर्णमयी Wed, 06/04/2008 - 17:16
लेख आवडला. कवितेचे वेड असेच वर्षानुवर्षे तिच्यामागे जावे असे आहे. खूप वाचायला मिळेल असे वाटत असतांना लेख एकदम संपला. त्याची हुरहूर वाटली. (मी कालच प्रतिसाद दिला होता.. पूर्ण टिच़की द्यायची राहिली का? ..)

मनिष Wed, 06/04/2008 - 21:00
काल घाईघाईत वाचला हा लेख आणि मनात रेंगाळत राहिला...आज निवांतपणे वाचला, आणि एक अस्वस्थता दाटून आली. माझे कवितेवर मनापासून प्रेम, गेल्या काही वर्षात मात्र अनेक कटू अनुभवानंतर, खूप ट्क्के-टोणपे खाऊन वाटत होते की आपले कवितेचे हळवे वय संपून गेले, कित्येक दिवसात, खर तर वर्षात उस्फुर्ततेने कविता लिहिताच आली नाही, कधीतरीच वर्षा-दोन वर्षात एखादी. हे वाचल्यावर मात्र आज जखम ओली झाली, बाहेरच्या जगासाठी चढवलेल्या ह्या कठीण अलिप्त वृत्तीच्या कवचामागे, एक हळवे, संवेदनशील मन आहे हे परत जाणवले. थोडे चैतन्य आणि खुपशी अस्वस्थता सळसळून गेली...ज्या जुन्या खडबडीत वाटेवर कवितेचा हळवा हात हळुच सोडला ते आठवले, पण कधी मी माझे हळवे, उत्कट प्रतिसाद विसरून व्यवहारी प्रतिसाद देऊ लागलो ते नाही आठवले. वाटत होते ते उत्कट अनुभवांचे, भावनांचे, उस्फुर्त प्रतिसादाचे कोवळे वय निघून गेले, तो उत्कटपणा आता फक्त आठवणीतच राहिल ... पण तुमच्या पन्नाशीतल्या ह्या तरल, काव्यमय लेखाने जाणवले की अजूनही तो उत्कटपणा अजूनही तीव्र आहे, राखेखालील निखारे अजून धगधगतात आहे...मनाचा तळ ढवळून निघाला, खुप काही हरवले आहे वाटणारे सापडले, एक सर्जनशील, संवेदनशील अस्वस्थता सळसळली...खूप छान वाटले त्या जाणीवेने... रामदास, अजून काय लिहू? एका अप्रतिम, तरल आणि उत्कट अनुभवाबद्द्ल शतशः धन्यवाद!
आम्ही दोघही एकाच आरशातून बाहेर आलो. तळं अंधारलं होतं. कमळं मिटली होती.अंधारात आम्हा दोघांनाही असं वाटलं की आपल्या डोळ्यातलं तळं कुणालाच दिसत नाहीये.
हे वाचले आणि माझ्या डोळ्यातील तळ्यामुळे अक्षरे धुरकट दिसू लागली. माझ्या स्वतःच्या कविता पुन्हा उमलतील की नाही माहित नाही, पण इतर कवितांचा अनुभव पुन्हा उत्कटतेने घेईन, अगदी त्यांच्या त्या हळव्या ओळींचे अर्थ तितक्याच हळूवारपणे मनात उमलेपर्यंत...हया दीर्घ, अंर्तमुख, वेडावणार्‍या, पण जाणिवा समृध्द करणार्‍या प्रवासासाठी मीही उत्सुक झालोय....

लिखाळ गुरुवार, 06/05/2008 - 02:09
नमस्कार ! अतिशय ताकदवान लेख ! अभिनंदन. जिव्हाळी लागणे, घंगाळ आणि बांबू, शाळा सुटलेले मासे, तळ्यापलिकडल्या बाईचे वर्णन, असे आणि बरेच काही अतिशय आवडले. कथेच्या शेवटी कवितेच्या ओळी येतात त्या क्षणी अंगावर सरसरून काटा आला. तो भाग जबरदस्त साधला आहे. पुन्हा पुन्हा वाचावा असा. यावरून मला नंदन यांच्या अनुदिनीवरील 'आता आमोद सुनासि आले।' (http://marathisahitya.blogspot.com/2006/06/blog-post_28.html) हा लेख आठवला. पु. ले. शु. -- लिखाळ.

सर्किट गुरुवार, 07/10/2008 - 02:14
रामदास, तुमचे सर्व जुने लेखन अधाशासारखा वाचत सुटलोय. एकापेक्षा एक सरस लेख. प्रत्येक वेळी, अप्रतीम, सुंदर, जियो, असे प्रतिसाद किती वेळा देणार ? त्यामुळे, अशा उत्कृष्ट लेखनाला "रामदासी" लेख, असे नामाभिधान देतो. आता यापुढे मिपा वर कुठले ही लेखन वाचताना त्याची ग्रेड "सर्किट-ते-रामदास" (१ ते १०) ह्यापैकी कुठली आहे, ह्याचा विचार नकळत होत राहील. - सर्किट

मनीषा गुरुवार, 07/10/2008 - 08:32
तुम्ही तर कवितेचं शब्दचित्रं रेखाटलं आहे. कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. अजून लाखो कविता बाकी आहेत.चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. खरं आहे...

धनंजय गुरुवार, 07/10/2008 - 09:31
मनाला भिडणारे लेखन. आणखी प्रशंसा करून माझेच शब्ददारिद्र्य दाखवत नाही.

अनिल हटेला Fri, 07/11/2008 - 15:02
अप्रतीम !!!! कडकडीत उन्हातून घरात आल्याआल्या वाळा घातलेले माठाचे पाणी घटाघटा पिऊन उरलेले चेहर्‍यावर शिंतोडून तसेच डोळे मिटून पंख्याखाली पडून राहिल्यासारखे वाटले. अगदी अशी अवस्था झाली..... येउ देत अजुन लेख येउ देत..... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मैत्र Wed, 09/28/2011 - 12:44
रामदास काकांचं हे गद्य काव्य निसटून गेलं होतं वाचनातून... वर आणल्याबद्दल शतशः धन्यवाद ! कितीही कोलाहलातून शांत अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य किती वेगवेगळ्या तर्‍हेने विविध विषयांमधून दाखवतात हे रामदासी लेख... एकेका वळणावर कविता भेटत राहीली आणि मनाचा उथळ प्रवाह डोह झाला, खोल झाला पण अंधारत ही गेला. वर्षभर नखाला जिव्हाळी लागावी तसं वाटत होतं. तेव्हाच वाटत होतं की आता गाठी सोडवण्याची वर्षं सुरु झाली. आमची कमळं परत उगवतील की नाही ते कळायला मार्ग नव्हता. हातासह सोन्याची सांज गुंफताना बगळ्यांची शुभ्र फुले मिळून मोजताना कमळापरी मिटत दिवस उमलूनी तळ्यात , बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. ============================================================== कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. अजून लाखो कविता बाकी आहेत.चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे काय लिहावं ... ग्रेस च्या कवितेसारखं त्या अनाहतपणात थोडं हरवून जावं बस्स... दंडवत फक्त..

श्रावण मोडक Wed, 09/28/2011 - 12:58
लेख वर आलाय म्हणून आता लिहितो. हा लेख तेव्हाच वाचला होता. प्रतिक्रिया द्यायला शब्दही सुचत नव्हते. आत्ताही पुन्हा वाचला. शब्दांतून मांडणं शक्य नाही, कारण हा मामला 'एक अधिक एक बरोबर दोन' असा नाही. विशेषणं आहेत, तत्सम उद्गार काढता येतात. पण वर सर्केश्वरानं म्हटलं तेच खरं. :)

In reply to by श्रावण मोडक

स्पंदना गुरुवार, 02/07/2013 - 04:24
नुसत भरुन आलय वाचताना. श्रामो तुमचे शब्द नसते मिळाले तर अशीच परतले असते नि:शब्द! धन्यवाद!

रेवती Tue, 11/08/2011 - 23:01
त्यावेळी प्रतिक्रिया देता आली नव्हती. आताही तशीच अवस्था. तुमच्या लेखनाचा वेगळा विभाग केला तर आम्हाला त्यावर टिचकी मारून हवे तेंव्हा वाचन करता येईल.

प्यारे१ Wed, 11/09/2011 - 14:45
काय प्रतिक्रिया देऊ? झळ्ळकन आलेलं डोळ्यातलं पाणी कसं दाखवू? हंबरडा फोडून रडावंसं वाटतंय. आपलेपणानं जपलेल्या गोष्टी, व्यक्ती बोटांमधून सुटून चाललेल्या वाळूसारख्या निसटताना दिसतात. कधी काही करु शकत असून करता येत नाही, करत नाही. कधी काही करुच शकत नाही..... :( :(

इनिगोय Fri, 08/24/2012 - 17:27
शुचिच्या या धाग्यामुळे इथे पुन्हा एकदा आले, आणि पुन्हा एकदा मन प्रसन्न झालं. का जगावं, या प्रश्नाचं उत्तर कधीकाळी चुकून हरवलंच तर इथे यावं, आणि पुन्हा जगायला लागावं.. ..सप्रेम नमस्कार. (सध्या लेखणीला विश्रांती दिली आहेत का?)

जेनी... गुरुवार, 02/07/2013 - 07:04
कितीतरी ताजंतवानं .... खुप छान वाटलं वाचुन .आयुष्याच्या संध्याकाळला जोडीदाराची साथ असनं .. खरच सुंदर अनुभव असावा . थँक्स काका ...

दीपा माने गुरुवार, 02/07/2013 - 08:27
तुमचं हे लिखाण खोल अंतःकरणातून आलंय त्यामुळे ते सहज सुंदर आणि आपल्या वैदिक धर्मात सांगितलेल्या चार आश्रमांपैकी वानप्रस्थाश्रमी विचारांना धरुन आहे. हे गद्दकाव्य वाचताना नुकताच वाचनात आलेला व लिहुन ठेवलेला एक सुविचार असा, 'आपल्या रोजच्या अनुभवातुन मिळणार्‍या चिरंतर मुल्यांना आपण ओळखू शकलो तर जीवनातील उत्तम गोष्टींचा आनंद आपण लुटू शकू.' आपल्या पुढील लेखनाला शुभेछा.

मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 02/07/2013 - 10:08
काका, हे गद्यकाव्य मी ३०-४० वेळा वाचले असेल, पण अजुनही शब्द शोधतोय प्रतिसादायला. शेवटी सोडून देतो आणि तसाच परत जातो.

अर्धवटराव Wed, 10/02/2013 - 01:41
डोळ्यात अश्रु आहेत. मनात सुखवणारी वेदना आहे. काय म्हणायचय कळत नाहिए. बुवा... आम्हाला तर तुमचं हे एक गद्य आयुष्यभर पुरेल. म्हणुनी ठेवीली पायी डोई. __/\__

संदीप चित्रे गुरुवार, 10/03/2013 - 20:12
हा लेख वाचणं... पुन्हा पुन्हा वाचणं हाच एक नितांत सुंदर अनुभव आहे! लेखकाचं नाव 'रामदास' दिसलं की मी डोळे मिटून लेख वाचायला घेतो.. मनाची कवाडं आपोआप उघडायला लागतात!

सखी Mon, 12/01/2014 - 23:11
वर अर्धवटराव म्हणाले तसं "डोळ्यात अश्रु आहेत. मनात सुखवणारी वेदना आहे. काय म्हणायचय कळत नाहिए." अतिशय सुरेख, वाखु साठवली आहे, दडंवत स्विकारावा. जेपी खोदकामासाठी अतिशय धन्यवाद, हे वाचायचे राहुन गेले होते.

अमृत Tue, 06/02/2015 - 09:40
कित्येकदा वाचूनसुध्हा काय प्रतिसाद द्यावा हेच कळत नाही. रामदास काका पुस्तकाचं तेव्हडं मनावर घ्याच प्लीज.

गुलाम Tue, 06/02/2015 - 14:42
सध्याच्या मिपावरच्या राजकीय धुळवडीत हा लेख म्हणजे ग्रीष्म्यातल्या वळवासारखा वाटला. रामदास, परा, इंद्रराज पवार, आदिती, टारझन, तात्या हे सगळे दिगज्ज मिपापासून दूर का झाले असावेत? त्यावेळच्या मिपाचा दर्जा काही औरच होता. कित्येकवेळा काही सामान्य दर्जाचे लेखदेखील त्यावरच्या इंद्रांच्या प्रतिसादामुळे वाचनीय वाटायचे. गेले ते दिवस!!! ~~~~~~~~~~~~~ नॉस्टॅल्जिक गुलाम ~~~~~~~~~~~~~

मयुरा गुप्ते Tue, 06/30/2015 - 01:14
त्या वेळीही सुचलं नव्हतं...आताही सुचत नाहीये, पण लेख पुनः वाचल्यावर बाकी थंड्,निर्जीव कमळाच्या तळ्यावर कोणीतरी अलगद तरंग उठवावेत आणि त्या लाटांच्या स्पंदनात स्वतःची धुरकट छबी दिसावी असं वाटलं. ती छबी खुदकन हसली...तिला पकडायला गेले तर...छे, जमलंच नाही. रामदास काका, कवितेच्या ह्या लांबच्या प्रवासा साठी शुभेछा. --मयुरा.

एस Tue, 06/30/2015 - 17:04
मात्सुओ बाशोचं हृदय लाभलंय तुम्हांला.

बोका-ए-आझम गुरुवार, 10/01/2015 - 21:37
रामदासकाका __/\__ कोण म्हणतं एक चित्र हजार शब्दांच्या तोडीचं असतं? हे असलं वाचलं की समजतं की एक शब्दसुद्धा हजार चित्रांच्या तोडीचा असू शकतो!

पिशी अबोली गुरुवार, 10/01/2015 - 21:49
तुषारांत बागडणाऱ्या चिमणीसारखं वाटलं. त्या पाण्याचं सौंदर्य तिच्याकडे नसतं आणि तिच्यात ते कळण्याइतकी कुवतही नसते. पण तरी त्यात नाचण्याचा आनंद मात्र तिला अफाट मिळतो. तसं काहिसं..

लेखनविषय:
लेखनप्रकार
कविता वाचता वाचता कमीत कमी तीस एक वर्षं संपली. आधी गाणी आवडायची म्हणून बर्‍याच कविता पाठ केल्या. नंतर लिहिण्याचे प्रयोग करून पाहीले. आवडत्या कवींची पुस्तकं पाठ झाली.हिंदी गाण्याच्या चालीवर बुद्धजयंतीच्या बार्‍यांमधे कविता लिहिल्या.भजनाच्या मंडळींमध्ये बसून शे दिडशे अभंग पाठ झाले. पण "वारीयाने कुंडल हाले" सारखी गवळण दहा वेळा गाउन त्यातल्या कवितेचा थांग मनाशी लागेना. पाटील बुवांना विचारलं "बुवा समजत नाही हो गवळण ". बुवा हसले .म्हणाले"राधा व्हावं लागतं हो त्यासाठी'..एवढ्यात कसं जमणार ते?".पण मग एकचं नाद लागला कवितेला शोधण्याचा.पण प्रत्येक वेळेला हुलकावणी.

सलाम राम राम

मीचजणु ·

फटू Tue, 06/03/2008 - 01:20
अशा कथा 'मेनका' या मासिकामध्ये असतात... पण त्या दीर्घकथा असतात... खरं सांगू का ? कथेचं बीज चांगलं आहे पण तुमच्या या कथेमध्ये कुठलीच सुसंगती नाहिये राव :( मनोहर, आदिती, सात्विक, निशा, सायली कोण कुणाचं कोण आहे सांगा राव आपल्याला... शेवटच्या काही ओळी वाचताना जाणवलं की कथेमध्ये 'फ्लॅशबॅक' तंत्राचा वापर केला आहे. आपलाच, (मंदबुद्धी)सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

In reply to by फटू

मीचजणु गुरुवार, 06/05/2008 - 23:51
मेनका मासिक मी कधी वाचले नाही, चांगले करमणुक करणारे असावे ही आशा कोण कुणाचं कोण ... I was reminded of the family tree in the J.R.R Tolkiens 'The lord of the rings', आज कळाले की त्यांनी family-tree साठी एवढी मेहनत का घेतली... :) मी पण प्रयत्न करीन.. O:)

मन Tue, 06/03/2008 - 02:07
पण नक्की मला समजली तशीच ते आहे का, हे कळलं तर बरं होइल. आपलाच, मनोबा

आनंदयात्री Tue, 06/03/2008 - 12:18
>>मनोहर पाण्यात पुर्ण भिजला. मनोहर मोठेपणा मानायला हवा. छान कथा.

मनस्वी Tue, 06/03/2008 - 14:49
शेवट अवंतिका सारखा कनफ्युझिंग वाटतोय किंवा मी तरी कनफ्युज झाले.
मनोहर ओरडला, " तु काका झालायस, काका! लवकर ये, बाळ वाट बघतय!"
मनोहर अदितीला आणि बाळाला स्विकारतो?
आता तिला ते बाळ हवे होते. तिने संदेशला सांगायला फोन लावला.. पण सर्व ऐकताच तो करार मोडून येईल, त्याचे स्वप्न विसकटेल... नाही, तिने निश्चय केला.
म्हणजे अदिती बाळ घेउन परत संदेशकडे जाते का? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by आनंदयात्री

मनस्वी Tue, 06/03/2008 - 15:02
बहुदा...?? बहुदा काय? नक्की काय ते सांग. हे बहुदाच कनफ्युझिंग आहे ना! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

मनोहरची बाईक मध्य रस्त्यात बंद पडली. रात्रीचा अंधार आता चांगलाच जणवत होता. थंड हवेची लाट अंगावर काटे आणत होती, व तेवढ्यात भिती होती तेच झाले. थेंब थेंब टीपके चेह-यावर जाणवले आणि हा हा म्हणता धो धो पाऊस सुरु झाला. मनोहरने लगबग बाईक झा़डाखाली लावली. रस्त्यावर कुणीच नव्हते, एवढ्या रात्री या अरण्यातील रस्त्यात कोण असणार. एका मोटारीचा प्रकाश दुरुन येताना दिसला, मनोहरने पुढे येऊन हात दाखवला, पण मोटार सर् पाणी उडवत गेली. मनोहर ओला चिंब भिजला. "अरे मनोहर असा पावसात का भिजतोयस?", त्याला ऐकू आले. मागे रिक्षा मधून आदिती बोलावत होती. असे अचानक तीला पाहुन तो क्षणभर गोंधळला.

रायगड

चेतन ·

वरदा Tue, 06/03/2008 - 04:21
मी अजुन पाहिलाच नाहीये रायगड जायचय मला एकदा...

ध्रुव Tue, 06/03/2008 - 11:07
फोटो छान पण एक लेखही येउद्या की... काय काय बघायला विसरू नका, काय करा, आणि काय करू नका. किती वेळ लागेल... ही पण माहिती सांगा म्हणजे पहिल्यांदा जाणार्‍यांना अडचण नाही येणार. -- ध्रुव

मनस्वी Tue, 06/03/2008 - 11:24
ध्रुव म्हणाले तसे अधिक माहिती पुरविल्यास आम्हाला पण योजना आखता येईल. जोगांचा रोप-वे भितीदायक वाटतोय. तुम्ही बसतेलात का? कसा आहे? टकमक टोक जबरदस्तच. स्वामीनिष्ठ कुत्र्याची दंतकथा आहे असे कुठेतरी मधे वाचनात आले होते. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

ऋचा Tue, 06/03/2008 - 11:27
>>>जोगांचा रोप-वे भितीदायक वाटतोय. हो तो भितीदायक आहे. आणि जर पावसाळ्यात गेलीस तर भयानक अनुभव येतो (खुप जोरात वारा असतो आणि आपण अधांतरी त्या रोप वे मधे हालत असतो) @) :O 8| "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चेतन Tue, 06/03/2008 - 12:15
फोटो छान पण एक लेखही येउद्या की लिहीन लवकरचं जोगांचा रोप-वे भितीदायक वाटतोय. तुम्ही बसतेलात का? कसा आहे? मजा आहे पण अजुन बसलो नाही ३०० रु घेतात पर माणशी लिहण्याचा नक्की प्रयत्न करिन छत्रीपती चेतन

ऋचा Tue, 06/03/2008 - 12:23
हो मी गेलेय मी गेलेले तेंव्हा १५० होते माणशी आता वाढले असतील. खुप जब्राट वाट्ट. प्रत्येक मराठी माणसाने हा अनुभव घ्यावा अस वाटतं मला. "शिवाजी महाराज की जय" "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चतुरंग Tue, 06/03/2008 - 15:49
अरे पण लेख दिला असतास तर जास्त मजा आली असती. टकमक टोक एकदम राकट देशा कणखर देशा आलंय! जोगांचा रोप-वे सुद्धा इंटरेस्टिंग वाटतोय. (स्वगत - कधी बरं जाता येईल रायगडाला? :? ) चतुरंग

विकि Tue, 06/03/2008 - 21:25
किल्ले रायगडावर एका दिवसात जाऊन येता येते. मुंबई सेंट्रल एस. टी आगारातून रात्री १२ बाजता एस.टी सुटते .ती पहाटे सहाच्या सुमारास गडाच्या पायथ्याशी पोहोचते. तेथून गड चढायला सुरूवात केल्यास चार ,पाच तास लागतात.रोप वेची ही सोय आहे पण गड चढण्यात जी मजा आहे ती रोपवेत नाही . गडावर राहण्याचीही सोय आहे. अजून काय सांगू प्रत्यक्ष जाऊन या आणि पहा. टकमक पॉईंट वरून निसर्ग न्याहाळता येतो. रायगड किल्ला आणि जिल्हा मला अतिशय आवडता आहे. आपला कॉ.विकि

विसोबा खेचर Tue, 06/03/2008 - 23:50
सगळेच फोटू सुंदर! थोरल्या आबासाहेबांना आमचा दंडवत.. ताक विकणारी मुलगी अतिशय निष्पाप वाटत आहे, तिचा फोटू खूप छान आला आहे! :) आपला, (हळवा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चेतन Wed, 06/04/2008 - 12:17
ताक विकणारी मुलगी अतिशय निष्पाप वाटत आहे, तिचा फोटू खूप छान आला आहे मलाही हाच फोटू सर्वात जास्त आवडला. खरचं खूप निरागस चेहरा आलायं वाइट एव्हढचं वाटतं की खेळण्याच्या वयात एव्हढ्या उन्हात ती आणी तिचा मोठा भाउ (तोही छोटाच होता) ताक, सरबत विकत होते. चेतन

मागच्या महिन्यात रायगडला जायचा योग आला त्याचे काही फोटु http://picasaweb.google.co.in/crdanave/fGgZKD चेतन

मी गेल्यावर

पुष्कराज ·

मिपावरील तुझ्या २-३ कविता मी वाचल्या आणि फॅनच झालो आहे बघ तुझा. तरीही वाटे मनास माझ्या नाव इथे होणार गेल्यानंतर दोन अश्रुही कोण तुला देणार हे कडवे खास. पुण्याचे पेशवे

गिरिजा Mon, 06/02/2008 - 19:44
पुष्कराज,
तरीही वाटे मनास माझ्या नाव इथे होणार गेल्यानंतर दोन अश्रुही कोण तुला देणार
मस्तच.. खूप छान आहे कविता.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

अमोल केळकर Mon, 06/02/2008 - 22:16
मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ एकदम सही

शितल Tue, 06/03/2008 - 02:02
पण मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ मला ही हेच जास्त आवडले .

In reply to by शितल

विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 08:03
सहमत आहे.. मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ मलाही ह्याच ओळी जास्त आवडल्या! छान कविता..! आपला, (क्षणभंगूर) तात्या.

Taxonomy upgrade extras
मी गेल्यावर वि़झुनी जातील रत्नदीप आकाशी मी गेल्यावर थांबून राहील वीज तशी मेघाशी मी गेल्यावर पोर्णिमेसही चंद्र यायचा नाही मी गेल्यावर रवी तळपूनी तेज द्यायचा नाही मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ शूरवीर बलशाली राजे किती जाहले येथे स्मरण तयांचे या जगताला कुठे आज रे होते नररत्नांची ही पहा अवस्था काय आपुले आहे आपुल्यानंतर कशास वेड्या नाव आपुले राहे चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती तरीही वाटे मनास माझ्या नाव इथे होणार गेल्यानंतर दोन अश्रुही कोण तुला देणार - पुष्कराज

हा भास म्हणु की ...

आनंदयात्री ·

राजे Mon, 06/02/2008 - 18:06
छान ! बाकी... काही वर्षाने आपल्याच जुन्या आठवणी मध्ये जाणे व गुंग होणे ..... ही काहीतरी वेगळीच नशा असते. बाकी कविता जी मध्ये मध्ये पेरली आहे... छान आशय व लेखनासोबत धावणारी आहे.. एक म्हणणे ... आवडले :) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

आनंदा, काय मस्त लिहिलं रे , माणसाचं हरवलेपण शोधणं म्हणतात ते हेच. त्यांची ती छोटीमोठी स्वप्ने त्या नंदीला आठवत असतील का ? रोज तिला बबडी म्हणुन हाक मारणारा म्हातारा नंतर कितीतरी दिवस आपल्याला शोधत असेल ! अन मग एका क्षणात वेदनेचा चित्रपट झरझर त्याच्या डोळ्यासमोरुन निघुन गेला हे, मस्त वाटलं....प्रत्येकाला आपापल्या स्वप्नांची आठवण व्हावी, अशाच या दोन ओळी. हळुवार पणे आपल्या डोळ्यासमोर चलचित्र रिव्हर्स ,फॉरवर्ड होतंय असे वाटले. कमी शब्दात अधिक भावना व्यक्त होतात त्या अशाच शब्दातून. अस्सेच लेखन येऊ दे !!! वरील आठवणींवर एका कवीच्या दोन ओळी - आज पुन्हा आसवांची जुनीच धार आली. अश्रुंना तुझीच पुन्हा आठवण फार झाली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मन Mon, 06/02/2008 - 19:21
मनापासुन. भावना अगदि चपखल शब्दात बसवल्यात. त्या कवितेच्या ओळी पण अगदि सूट होतात, त्या स्थितीमध्ये. मस्त लिखाण एकदम. आपलाच, मनोबा

यशोधरा Mon, 06/02/2008 - 22:10
सही लिहिलय, खूप आवडलं. फुलवा, तुमच्या ओळी पण सुरेखच आहेत.

फटू Tue, 06/03/2008 - 01:05
जुन्या आठवणींना उजाळा देताना मनाची होणारी कातर अवस्था खुप छान व्यक्त केली आहे... आणि फुलवाच्या हळूवार काव्याचा वापर तर अगदी सुंदर केला आहे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

धमाल मुलगा Tue, 06/03/2008 - 13:11
आनंदयात्री साहेब..... जियो रे :) अरे फुलवा ह्यांची कविता घेऊन त्यां ओळींवर इतकी छान चपखल बसणारी लघुकथा लिहिलीस, मस्तच.
दुपारी २ वाजता हलका लंच करुन ठरलेल्या शेड्युल प्रमाणे तो मीटिंग रुम कडे वळाला. काही क्षणातच टकटक वाजवुन दार उघडले गेले. पुर्णतः बिझनेस फॉर्मल्स मधली एक साधारण चाळीशीची स्त्री लगबगीने आत शिरली. थक्क होउन तो पहातच राहिला. उठुन अभिवादन वैगेरे करायचे सगळे एटिकेट्स विसरुन तो अवाक होउन बघत होता. वादळात हलते झुम्बर दाही दिशांचे.. ये पाउस होवुनी झिरपत आर्त मनाचे..
:) आवडलं . एकदम भिडलं हे! अजुनही येऊ दे :) पु.ले.शु. -ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे Tue, 06/03/2008 - 16:16
अरे फुलवा ह्यांची कविता घेऊन त्यां ओळींवर इतकी छान चपखल बसणारी लघुकथा लिहिलीस, मस्तच. हेच म्हणतो... आंद्या,लेका. येऊ दे अजून. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्रभाकर पेठकर Tue, 06/03/2008 - 18:23
आनंदयात्री, कथेचा नवा बाज मनापासून आवडला. कथा आणि कविता हातात हात घालून वाटचाल करताहेत ही कल्पनाच रोमँटीक आहे. कथेत भरपूर प्रणय लपलेला असला तरी भावनांची तीव्रता जरा हरवल्या सारखी वाटली. विस वर्षांनंतर होणारी प्रियकर आणि प्रेयसीची भेट भावनिकदृष्ट्या (जरी कॉर्पोरेटच्या वेगळ्या आंगणात असली तरी..) अजून हूरहूर निर्माण करणारी हवी होती, असे वाटते. 'आँधी' चित्रपटाची आठवण झाली. 'तेरे बिना जिंदगीसे कोई, शिकवा तो नही' मधील विरही आर्तता मनाला पिळून काढते. तसेच, 'तुमने मुँछे रखी....' 'हाँऽऽ !.... तुम्हे पसंद नही थी न?' 'इसलिए रखी?' वगैरे संवादातील मिशांचा संदर्भ दुय्यम आहे पण व्यक्तिमत्त्वात होणारे बदल, तरूणपणच्या आठवणी, एकमेकांच्या आवडी-निवडींसंबंधी अजूनही असणारी जाण... अनेक पूर्व गोष्टींना उजाळा देते. त्यात फक्त पोक्त प्रेम दिसते. असो. हा भास म्हणु की आहे तुझाच गाव .. बघ श्वासही घेती माझे तुझेच नाव .. आभास असे की जीव खुळावुन जाई.. मन बासरी होवुनी तुझीच गीते गाई.. वादळात हलते झुम्बर दाही दिशांचे.. ये पाउस होवुनी झिरपत आर्त मनाचे.. वार्‍यावर अवचित उठे धुळीचा लोट.. अन हरवुन जाई तुझ्या गावची वाट.. हा भास म्हणु की आहे तुझाच गाव .. बघ श्वासही घेती माझे तुझेच नाव .. फुलवा ह्यांची कविताही सुंदर, भावपूर्ण आहे. दोघांचेही अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी Tue, 06/03/2008 - 18:29
वगैरे संवादातील मिशांचा संदर्भ दुय्यम आहे पण व्यक्तिमत्त्वात होणारे बदल, तरूणपणच्या आठवणी, एकमेकांच्या आवडी-निवडींसंबंधी अजूनही असणारी जाण... अनेक पूर्व गोष्टींना उजाळा देते.
एकाच वाक्यात किती संदर्भ लपलेत.. सह्हीचे वाक्य पेठकरकाका! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

स्वाती दिनेश Tue, 06/03/2008 - 18:42
पेठकरांसारखीच मलाही आँधीची आठवण झाली, फुलवाची कविताही तरल आहे..दोन्हीचे एकत्रीकरण छान जमले आहे. स्वाती

विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 00:11
त्याकाळातली त्यांची ती छोटीमोठी स्वप्ने त्या नंदीला आठवत असतील का ? रोज तिला बबडी म्हणुन हाक मारणारा म्हातारा नंतर कितीतरी दिवस आपल्याला शोधत असेल ! अन मग एका क्षणात वेदनेचा चित्रपट झरझर त्याच्या डोळ्यासमोरुन निघुन गेला. वा! सुंदर लिहिलं आहेस रे यात्री! तुझं आणि फुलवाचं, दोघांचंही अभिनंदन... औरभी आने दो बॉस! तात्या.

शितल Wed, 06/04/2008 - 00:54
तु फुलवा॑ची कविता योग्य तिथे पेरून छान लिखाण बनवल आहेस, मला फक्त ती ४० व. स्त्री पटकन कळली नाही. पण मा॑डणी आणि आशय छानच. मनाला हळवे करणारे लिखाणात तुझा हातख॑ड आहे बॉ.

माझ्या कवितेचं हे इतकं छान रुप बघुन खुप बर वाटल.. कविते सोबत कथा अगदी हातात हात घालुन जात आहेत.. मला पण हेच मनात होत लिहिताना . तुझ्या कथेत जास्त काय आवडल असेल तर त्यांच्यातील अबोल संवाद्.-"शब्देविण संवादु" यालाच म्हणत अस्तील .. माझी कविता अशी छान , अलंकृत करुन इथे आणल्याबद्दल धन्यवाद. तुला जितकी माझी कविता आवडली आहे, तितकीच मला तुझी कथा आवडली आहे...

In reply to by पद्मश्री चित्रे

आनंदयात्री Wed, 06/04/2008 - 12:05
>>तुझ्या कथेत जास्त काय आवडल असेल तर त्यांच्यातील अबोल संवाद्.-"शब्देविण संवादु" यालाच म्हणत अस्तील .. अगदी हेच अपेक्षित होते मला ... खरे तर निटसे उतरवता आले नाहिये मला पण "शब्देविण संवादु" दाखवायचा प्रयत्न करायचा होता म्हणुन दोघातले संवाद टाळलेत. बघु पुढल्या वेळेस अजुन चांगले लिहण्याचा प्रयत्न करेन. पेठकर काकांनी इथे तसेच व्यक्तिगत माध्यमातुन काही छान टिप्स दिल्यात, लिहतांना वाचकाच्या दृष्टीने विचार करायचोच पण त्या टेक्निकल्स मधे थोडा अजुन सुधारायला हवे असे त्यांच्या मुळे कळाले, शतशः धन्यवाद काका. >>तुला जितकी माझी कविता आवडली आहे, तितकीच मला तुझी कथा आवडली आहे... धन्यवाद फुलवा, दरवेळेस ती कविता वाचतांना अश्या हजार कल्पना येतात, अश्या सतत वाचत रहाव्या वाटणार्‍या कविता विरळाच. असो, सगळ्यांनी दिलेल्या दादेबद्दल, केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. धन्यवाद.

"सर, टु हिंजवडी ऑर टु कोथरुड फस्ट ?" असे ड्रायव्हरने विचारताच मांडीवरचा ल्यापटॉप बाजुला ठेउन त्याने समोर नजर टाकली, जवळ जवळ येणारा वाकडचा फ्लायओव्हर ओळखीचा वाटला पण आजुबाजुचा भाग मात्र आधी होता तसा मोकळा मोकळा अजिबात राहिला नव्हता. चकचकीत इमारती अन सुसाट जाणार्‍या गाड्या त्या फ्लायओव्हरची ओळख पुसट करत होत्या. विसएक वर्षात पुणे बरेच बदलले होते. "लेट्स हॅव ब्रेकफास्ट इन कोथरुड फस्ट !", तो कोरडेपणे उत्तरला.

चटणी

स्वाती दिनेश ·

मनस्वी Mon, 06/02/2008 - 14:26
व्वा स्वातीताई.. एकदम मस्त धागा सुरु केलास! च ट णी म्हणजे माझा एकदम आवडता प्रकार. झणझणीत आणि चविष्ट चटणी जेवणाला नेहेमीच रंगत आणते. मला आवडेल या धाग्यातून नवीन नवीन चटण्यांचे प्रकार शिकायला :) कढीपत्त्याची चटणी साहित्य : १ जुडी कढीपत्ता (साधारण २ मुठी) १ चमचा तेल ४ चिंचेची बुटुकं १/२ चमचा मीठ ४ वाळलेल्या लाल मिरच्या / १ चमचा तिखट २ चमचे तीळ कृती : (१) कढीपत्ता धुवून वाळवा. १ चमचा तेलावर खरपूस परतून घ्या. (२) तीळ भाजून घ्या. (३) कढीपत्ता, तीळ, मीठ, मिरच्या / तिखट, चिंच सर्व मिक्सरमधून काढून घ्या. ही चटणी पोळी / डोसा / उत्तप्पा बरोबर छान लागते. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Mon, 06/02/2008 - 16:21
कढीपत्ता धुवून वाळवा. कढीपत्ता (खरे पाहता कढीलिंबाची पाने) सावलीत वाळवावी. उन्हात वाळवू नये. स्वाद कमी होतो, रंग बदलतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी Mon, 06/02/2008 - 17:04
कढीपत्ता (खरे पाहता कढीलिंबाची पाने)
काका, अहो कढीपत्ता आणि कढीलिंब यात फरक आहे ना. कढीपत्ता - म्हणजे आपण भाज्यात फोडणीत वगैरे टाकतो तो. कढीलिंब - आपण गुढीपाडव्याला गुढीला बांधतो, उंच डेरेदार झाड असते तो. ?? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by स्वाती दिनेश

मनस्वी Mon, 06/02/2008 - 17:18
अस्सं होय! :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

वरदा Mon, 06/02/2008 - 17:11
कढीलिंब - आपण गुढीपाडव्याला गुढीला बांधतो, उंच डेरेदार झाड असते तो. त्याला कडुलिंब म्हणतात आणि कढिलिंब आणि कढिपत्ता सेमच... स्वाती मस्त धागा... आम्ही नुसत्या तीळाचं तीळकूटही करतो...बाकी क्रुती तीच पण लसूण नाही घालत आणि डायरेक्ट लाल तिखट घालतो... नारळाच्या चटणीत फोडणी नंतर थोडं लिंबू साखर घालून पण मस्त चव येते.... बाकी चटण्या खाण्यात सॉलीड मजा येते हे खरं....

In reply to by वरदा

प्राजु Tue, 06/03/2008 - 12:58
कांद्याची चटणी : १ मध्यम आकाराचा कांदा मोठा चिरलेला लाल मिरचीची पावडर १ चहाचा चमचा दाण्याचे कूट १ च. चमचा कोथिंबीर मूठ भर चिंच बोराइतकी गूळ चिंचे इतकाच मिठ.. वरील सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून भरड वाटून घ्यावं गूळ आणि चिंचे सकट. ही तिखट, आंबट गोड चटणी वडे, भजी, पराठे, सँडविच सोबत एकदम फन्डू लागते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा Wed, 06/04/2008 - 23:47
:)) अवांतर : चणीया मणीया बोरं खायला कसली मज्जा येते ना...छे मला अत्ताच खावीशी वाट्टायत...काय आठवण केरुन दिलीत काका....

In reply to by प्रभाकर पेठकर

प्राजु गुरुवार, 06/05/2008 - 12:38
चेन्या मेन्या नाहि हो. फार तर लिंबा इतकी म्हणा... (आता कागदी लिंबू की इड्लिंबू?? असे म्हणू नका) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चटण्यांचा धागा मस्त आहे. शेंगादाणे+ मिरची+मिठ +लसनाची = चटणी लै भारी. हिरव्या मिरच्या मीठ अन् लसनाची चटणी ( पुर्वी गाडग्यात ठेवायचे, वरतून गोडतेल टाकून) काय भारी लागायची :) कढीलिंबाची अन् कडुलिंबाची चर्चा आवडली :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनस्वी Tue, 06/03/2008 - 11:42
मी असा करते : ५-६ हिरव्या मिरच्या ३-४ लसूण पाकळ्या ४ चमचे भाजलेले शेंगदाणे चवीपुरते मीठ - साधार्ण १/२ चमचा ४ चमचे तेल तव्यावर तेल टाकून गरम झाले की त्यावर मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे टाकावेत. जाड वाटीच्या बुडाने तव्यावरच ठेचावे. मीठ टाकून परत एकजीव करावे. खमंग वास आल्यावर गॅस बंद करावा. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

राजे Mon, 06/02/2008 - 18:01
:) छान रेसेपी व खालील उपयुक्त माहीती प्रतिसाद. धन्यवाद चटणी साठी. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

स्वाती राजेश Mon, 06/02/2008 - 18:19
दोडक्याच्या शिरांची चटणी: १ वाटी दोडक्याच्या शिरा १/२ वाटी सुके खोबरे १/४ वाटी तीळ १०-१२ हिरव्या मिरच्या चिरून १ टे.स्पून तेल व फोडणीचे साहित्य दोडक्यची भाजी करताना चिरण्यापूर्वी दोडक्याची साल किसणीवर किसून काढावीत. लोखंडी कढईत १ टे.स्पून तेलाची फोडणी करावी त्यात मिरच्यांचे तुकडे परतावेत. त्यावर कीस घालून परतावे.कीस चांगले परतला गेला कि सुके खोबरे व तीळ घालून खमंग भाजेपर्यंत परतावे. चवीनुसार मीठ साखर घालावी...

वरदा Mon, 06/02/2008 - 23:42
पडवळाच्या बियांची चटणी करायची पडवळाच्या बिया त्यात भिजवलेलं डाळं, मिरची, मीठ, जिरं, तीळ घालून वाटायच्या आणि मग वरुन साधी फोडणी द्यायची...काय झक्कास लागते... भोपळ्याच्या सालीची चटणी पण मस्त लागते....

In reply to by वरदा

नितिन थत्ते Tue, 05/05/2009 - 15:00
या दोन चटण्यांचा उल्लेख आमचे देशस्थ मित्र आम्हा कोकणस्थांच्या कंजूषपणाची टिंगल करण्यासाठी करीत. =)) खराटा (रंग माझा वेगळा)

ईश्वरी Tue, 06/03/2008 - 08:10
छान धागा आहे ग स्वाती. शेंगदाणा कूटाची दह्यातील चटणी : १ वाटी दही , ६-७ चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट, १-२ हिरव्या मिरच्या (चिरून) , २-३ लसूण पाकळ्या , थोडीशी कोथिंबीर , १ छोटा चमचा साखर , मीठ चवीनुसार. दही खूप घट्ट असेल तर घोटभर पाणी घालून सर्व पदार्थ मिक्सर मधून फिरवून घेणे. इडली , पराठे, पालक पुर्‍या , तिखट मीठाच्या पुर्‍या याबरोबर छान लागते. चटणी आवडीनुसार घट्ट वा पातळ ठेवावी. पुदीना चटणी : १ जुडी पुदीन्याची पाने, पुदीन्याच्या अर्धी कोथिंबीर , २-३ हिरव्या मिरच्या (तुकडे करून), छोट्या आकाराचा कांदा (अर्धाच घेणे -चिरून), ३-४ चमचे लिंबू रस, मीठ चवीनुसार, थोडेसे पाणी (साधारण ५-६ चमचे.). सर्व पदार्थ मिक्सर मधून फिरवून घेणे. चिंच गूळ खजूराची चटणी : १/२ कप चिंचेचा कोळ , १/२ कप मऊ खजूर (तुकडे करून ) , १/४ कप किसलेला गूळ , लाल मिरची पूड / तिखट (आवडीनुसार अर्धा ते १ चमचा) , जिरेपूड १ चमचा , मीठ चवीनुसार , बडीशेप पूड अर्धा चमचा (ऐच्छिक) सर्व पदार्थ मिक्सर मधून फिरवून घेणे. वेगवेगळ्या प्रकारचे चाट, भेळ यासाठी वापरावी. टीप : ख़जूर वाळलेला , कोरडा असेल तर साधारण २० मिनिटे पाण्यात भिजत घालावा व मग वापरावा. हमस : (काबूली चण्यांची चटणी) ४०० ग्रॅम काबूली चणे (रात्रभर पाण्यात भिजवून नंतर उकडून पाणी काढून टाकलेले) , १/२ कप लिंबू रस, १/२ कप पाणी , १/२ कप तिळाची पेस्ट , २-३ लसूण पाकळ्या (ठेचून) ,१ चमचा ऑलीव्ह तेल , मीठ चवीनुसार. तिळाची पेस्ट करण्यासाठी : १/२ कप ती़ळ भाजून पूड करून घेणे. मिक्सर च्या भांड्यात दीड दोन चमचे लिंबू रस, १ चमचा ऑलीव्ह तेल, १/४ कप पाणी घालून एकदा फिरवून घेणे. मग थोडी थोडी तिळाची पूड घालून परत सर्व एकजीव करून घेणे. हे मिश्रण घट्ट क्रीम सारखे दिसले पाहीजे. पातळ वाटल्यास अजून थोडी तिळ पूड घालून मिक्सर मधून फिरवून घेणे. आता हमस करण्यासाठी वरील सर्व पदार्थ मिक्सर मधून फिरवून घेणे. लेबॅनीज , अरेबिक खाण्यात ह्या चटणीचा वापर करतात. पिटा ब्रेड , सँडविचेस यासाठी हमस (स्प्रेड म्हणून) वापरतात तसेच वेगवेगळ्या प्रकरचे चिप्स बुडवून खाण्यासाठी (डिप म्हणून ) पण वापरतात. ग्वाकामोले (Guacamole)- अवोकाडो ची चटणी : अवोकाडो (avocado) हे हिरव्या खडबडीत जाड सालीचे आणि आत मऊ हिरवा गर असलेले मेक्सिकन फळ आहे. पिकलेले अवोकाडो बाहेरून काळपट हिरव्या रंगाचे दिसते. फळात मधोमध एकच तपकिरी रंगाची मोठी बी असते. अवोकाडो चे जे रेलिश वा डीप बनवतात त्याला ग्वाकामोले म्हणतात. आपण रहात असलेल्या ठिकाणी अवोकाडो मिळत असेल तर ग्वाकामोले जरूर करून बघा. झटपट बनते. साहित्यः २ पिकलेले अवोकाडो, १ लिंबू, १ छोटा कांदा बारीक चिरून वा किसून, १ टोमॅटो बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरलेली, १-२ चमचे सावर क्रीम (ऐच्छिक), १ किंवा २ लसूण पाकळी (बारीक ठेचून वा किसून) , मीरपूड व मीठ चवीनुसार कृती: अवोकाडोची साल सोलून आतील बी काढून टाकावे . एका भांड्यात गर काढून घ्यावा. तो चमच्याने वा सरळ हाताने कुस्करून घ्यावा. त्यात एक आख्ख्या लिंबाचा रस घालावा. कांदा, टोमॅटो आणि इतर उरलेले जिन्नस घालून मिक्स करा. ग्वाकामोले मेक्सिकन खाण्यात (टॅको , एनचिलाडा , कसाडिया वगैरें बरोबर) तोंडीलावणे (साईड डिश ) म्हणून असते. ब्रेड वर टॉपींग म्हणून पण वापरतात. अवोकाडोची चव आवडत असेल तर ग्वाकामोले नुसते ही खाल्ल्यास छान लागते. ईश्वरी

वरदा Tue, 06/03/2008 - 02:30
असं करतात होय हमस्..इथे तयार मिळते ती आणून खाते मी नेहेमी.....सह्ही गं इश्वरी..

ईश्वरी Tue, 06/03/2008 - 03:04
पंचामृत : अतिशय चविष्ट आणि करायला सोपा असा हा प्रकार आहे. साहित्य : ७-८ बुटके चिंचेचा कोळ , पाऊण वाटी भाजलेल्या तीळाचा कूट , १/२ वाटीला थोडा कमी असा भाजलेल्या दाण्याचा कूट, ६-७ हि. मिरच्या (तुकडे करून), २-३ चमचे किसलेला गूळ (गूळ मऊच असेल तर किसता येणार नाही..कुस्करून घेणे), १ चमचा काळा मसाला (किंवा गोडा मसाला), मीठ चवीनुसार फोडणीसाठी: २ चमचे तेल , मोहरी , ५-६ कढीलिंबाची पाने , हळद , चिमूटभर हिंग कृती : कढईत तेल गरम करणे. त्यात मोहरी टाकणे. मोहरी तडतडली की हळद, हिंग, कढीलिंबाची पाने घालणे. मिरच्या घालणे. मिरच्या परतून घेणे. मग चिंचेचा कोळ घालणे. मीठ घालणे. १ वाटी पंचामृत करायचे असल्यास साधारण १ वाटी पाणी लागते. चिंचेचे पाणी कमी वाटल्यास थोडेसे साधे पाणी घालावे. पाण्याला उकळी येऊ देणे. उ़कळी आली की त्यात तिळकूट , दाण्याचा कूट घालणे. काळा मसाला घालणे. चांगले हलवणे. खूप घट्ट झाले आहे असे वाटल्यास परत थोडेसे पाणी घालून चांगले हलवून घेणे. गॅस मंद करून २-३ मिनिटे शिजू देणे. जरा घट्टसर झाले की गूळ घालणे. परत चांगले हलवून घेणे. एखाद दुसरा मिनिट अजून शिजू देणे. गॅस वरून भांडे उतरवले की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे. (चिंचेचा कोळ तयार करण्यासाठी ७-८ बुट़के चिंच स्वच्छ धुवून १ वाटीभर गरम पाण्यात भिजत घालावी. साधारण २० मिनिटे भिजू द्यावी. चिंच हाताने कुस्करून, घट्ट पिळून चोथा टाकून द्यावा . वाटीत राहीलेले चिंचेचे पाणी म्हणजे चिंचेचा कोळ. पाण्यात चिंचेचे तंतू वगैरे आल्यास पाणी गाळून घेऊन वापरावे.) ईश्वरी

वरदा Tue, 06/03/2008 - 04:12
माझी मावशी करायची हे लहान असताना खाल्ल्याचं आठवतय्... मस्त गं इश्वरी...धन्यु

मीनल Tue, 06/03/2008 - 07:54
साहित्यः लाल मिरची पावडर,तेल ,मीठ,मोहरी. कृती: तेलात मोहरी घालून फोडणी करावी. गॅस बंद करून जरा वेळ वाफ जाऊ द्यावी. लगेचच ती गरम फोडणी लाल मिरची पावडरीवर घालावी. मीठ घालून एकजीव करावे. झट्पट तिखट तयार होते.गरम फोडणीमुळे लाल मिरची पावडर खरपूस होते .चांगली लागते. आवडत असेल तर लसूण बारीक करून फोडणीत घालावा.तो तळून ब्राऊन झाला की मग गॅस बंद करून ती गरम फोडणी लाल मिरची पावडरीवर घालावी. मीनल.

पिवळा डांबिस Tue, 06/03/2008 - 08:58
ए स्वाती१, स्वाती२, वरदा, ईश्वरी, आणि मनस्वी (?) तायांनो, हसू नका हं! आम्हाला पण एक चटणी माहिती आहे. एकदा काकूने मुळीच करणार नाही असं म्हटल्यावर रागाच्या तिरिमिरीत शिकून घेतली होती....... सोड्याची चटणी एक वाटी सोडे दोन टीस्पून लाल तिखट पावडर चवीसारखं मीठ (सांभाळून, सोड्याला मुळातच थोडं मीठ असतं!) एक टीस्पून हळद कृती: सोडे तव्यावर तेल न घालता चांगले भाजावे. थंड करावे. सोडे थंड झाल्यावर कुरकुरीत होतात. ड्राय ग्राईंडरमध्ये घालून त्यांची कोर्स पावडर करावी. जास्त भुगा करु नये कारण मग तेल सुटते. त्या पावडरीत हळद, तिखट आणि मीठ घालावे व बाटलीत भरून ठेवावे. चटणी खातांना त्यात कांदा बारीक चिरून घालावा. ही चटणी पटणीच्या भाकरीबरोबर वा वालाच्या बिरड्याबरोबर खायला मस्त लागते. बाहेर पाऊस पडत असेल तर मग विचारूच नका.... आपला, डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

मनस्वी Tue, 06/03/2008 - 10:24
मस्तच हो डांबिसकाका.. झकास रेसिपी... तोंडाला चव आली एकदम :) अजून येउदेत सोड्याच्या अन् बोंबलाच्या रेसिपीज तुमच्याकडून! चटणी प्रकारात मोडत नसेल तर वेगळ्या धाग्यात द्या वाटल्यास.. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

ईश्वरी Tue, 06/03/2008 - 11:20
डांबिसकाका मस्तच. छान सांगितली रेसिपी. ह्यावरून मला अजून एक चटणी आठवली. सुकटाची. करायला एकदम सोपी आणि चवीला बेस्ट च. साधारण रेसिपी सोड्याच्या चटणी सारखीच . २ वाट्या स्वच्छ केलेली सुकट , १ मोठा कांदा बारीक चिरून, तेल , लाल मिरची पूड १ ते दीड चमचा..तिखटाच्या आवडीनुसार, मीठ बेताने..चव बघून कढईत तेल गरम करणे . तेलात कांदा परतून घेणे, त्यात सु़कट , लाल मिरची पूड , मीठ घालून परतून घेणे. जरा कुरकुरीत झाली की गॅस वरून खाली उतरवणे. टीपः सुकट कांद्यावर घालताना हाताने थोडी चुरून घालावी. ईश्वरी

ऋचा Tue, 06/03/2008 - 11:30
हा आधी मी दिला होता पण ह्या धाग्यात परत देते. (आंबट-गोड टक्कू) कैर्‍या-३ कांदे-२ साखर-५ चमचे मीठ-३ चमचे (चहाचे असतात ते) कृती- कैरी आणि कांदा कीसून घ्यायचा. एकत्र करुन त्यात साखर आणि मीठ घालायचं . झाला तुमचा टक्कू तय्यार.. पोळी बरोबर किंवा नुसता पण छान लागतो. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

स्वाती दिनेश Tue, 06/03/2008 - 11:38
चटण्यांचे मस्त कलेक्शन होते आहे.. मनस्वी,कढीलिंबाची चटणी+मेतकूट+तूप+भात..काय बिश्शाद तोंडाला चव येणार नाही? डॉ.साहेब,काय आठवण काढलीत हो,गाडग्यातली लसणाची चटणी ,व्वा! स्वाती,दोडक्याच्या शिरांची चटणी लई म्हणजे लईच आवडती ..:) पडवळ बियांची चटणी माहिती नव्हती ग मला वरदा,वा.. आणि ईश्वरी,तू तर ऍवोकाडो चटणी देऊन मजा आणलीस.पंचामृत...अम्म्म..वावा.. सुलेशबाबू,तुम्ही काकू नाही म्हणाल्या म्हणून का असेना सोड्यांची चटणी केलीत आणि ती ह्या धाग्यात गुंफलीत,मजा आ गया.. ऋचा,टक्कू तर ऑलटाईम फेवरिट मध्येच आहे.. मंडळी.. चटण्यांचे संमेलन मस्त आहे,:) आता अजून काही भर.. कांद्याचे तिखट साहित्य- २ मध्यम कांदे,४ते ५ पाकळ्या लसूण,चिंचेचं एक लहान बुटुक,तेल,मीठ,२ ते ३ चहाचे चमचे तिखट कृती- कांदा चौकोनी चिरुन घ्या. लसूण पाकळ्या बारीक चिरा. चिंचेचं बुटुक कुस्करा. तेलावर कांदा गुलाबी परता,तिखट घाला आणि परता.‍लसूण घालून परता.चिंच घाला आणि परता. मीठ घाला आणि परता. हवे असल्यास अजून तिखट घाला आणि थोडे परता. तिखटपणा आपल्याला हवा तसा कमी जास्त करा.झणझणीत केले तर मस्तच लागते.. विशेषतः भाकरीबरोबर,:) स्वाती

स्वाती दिनेश Tue, 06/03/2008 - 12:20
वाटीभर फ्रेश क्रिम मधे थोडे मीठ, एक चमचा साखर घालणे. एक मिरची व मूठभर पुदिना [किंवा अन्य सिमीलर ग्रीन हर्बज] वाटून घालणे आणि चांगले कालवणे. चटणी कम डिप तयार! विशेषत: मुग भजी, कटलेट इ.बरोबर खायला झकासच!

In reply to by स्वाती दिनेश

वरदा Tue, 06/03/2008 - 19:20
सावर क्रीम मधे पालक, किंचीत लसूण आलं पेस्ट, मिरची टाकून स्पिनॅच डिप पण करता येतं...

वेलदोडा Tue, 06/03/2008 - 12:49
ह्या प्रांतात मी ही जरा लूड्बूड करतोय..चालेल ना? >>मनस्वी,कढीलिंबाची चटणी+मेतकूट+तूप+भात..काय बिश्शाद तोंडाला चव येणार नाही? गरम गरम वाफाळता भात , त्यावर तूपाची धार आणि मेतकूट..अहाहा ..झकास कॉम्बीनेशन. मेतकूटात घातले जाणारे पदार्थ साधारण माहीतेय पण प्रमाण नेमके माहित नाही म्हणुन जालावर शोधले. चटण्यांच्या संग्रहात अजून एक भर. मेतकूट साहित्यः हरभरा डाळ - १ कप , उडीद डाळ - १ कप , तांदूळ १/२ कप, गव्हाचे पीठ - १/४ कपाला जरा कमी , मोहरी १/४ कप, जीरे - २ चमचे , धने २ चमचे, हींगः १/२ ते पाऊण चमचा, हळद - अर्धा ते पाऊण चमचा, सूंठ - १ चमचा, सुक्या लाल मिरच्या २-३ एक पसरट भांडे गरम करा. त्यात हींग , हळद , सूंठ हे पदार्थ सोडून इतर सर्व पदार्थ कोरडेच भाजून घ्या. गार झाल्यावर उरलेले पदार्थ मिक्स करा आणि ग्राईंडर मध्ये वाटून घ्या. हवाबंद डब्यात ही पावडर भरून ठेवा. भात , मूग+तांदुळ खिचडी बरोबर मेतकूट खातातच. शिवाय दह्यात मेतकूट, किंचीत साखर , मीठ , बारीक चिरलेली कोथिम्बीर घालून रायत्याप्रमाणे खा. अंड्याची चटणी: हाटेलातील नाव बूर्जी . आमच्याकडे अंड्याची चटणी म्हणतात. ४ अंडी, १ कांदा, हि. मिरच्या २-३ , १ टोमॅटो, मीठ , गरम मसाला अर्धा चमचा, कोथिम्बीर, तेल पसरट भांड्यात तेल गरम करा. हि. मिरच्या चिरून घाला. परता. कांदा बारीक चिरलेला घाला. मीठ घाला. कांदा मऊ झाला की चिरलेला टोमॅटो घाला. गरम मसाला घाला. जरा वाफ आली की अंडी फोडून घाला. (आधीच अंडी फेटून ठेवली असल्यास उत्तम) सर्व मिश्रण भरभर हलवा. भांड्याला चिकटता कामा नये. मिश्रण घट्ट घट्ट होत जाते. फार कोरडे फडफडीत नको पण अंड्याचा ओलावा पूर्णुपणे गेला की कोथिम्बीर घाला व ब्रेड / चपाती बरोबर गरमागरम खा. कांद्याची चटणी : घरात भाजीला काही नसले की आई ही चटणी करायची. गरम गरम भाकरी बरोबर छान लागते. ३-४ कांदे बारीक चिरून घ्या. (हेच ह्यातील अवघड काम), १-२ हि. मिरच्या बारीक चिरून घ्या. पातेलीत ३-४ चमचे तेल गरम करायला ठेवा, त्यात मोहरी टाका, मोहरी तडतडली की मिरच्या परतून घ्या. मग कान्दा घाला. मीठ घाला. हलवून घ्या. कान्दा शिजण्यासाठी पातेली वर झाकण ठेवुन १ वाफ आणा. अधुनमधून झाकण काढून हलवुन घ्या. म्हणजे कांदा जळणार नाही. कांदा मऊ झाला की लाल तिखट घालणे - १ चमचा. काळा मसाला वापरणार असाल तर काळा मसाला अर्धा ते पाऊण चमचा व लाल तिखट अर्धा चमचा असे प्रमाण घ्या. भाजलेल्या दाण्याचा कूट साधारण ३ चमचे घाला. सर्व परत हलवून घ्या. १ वाफ घ्या. कोथिम्बीर घालून सजवा. कांदा छान मऊ झाला पाहीजे पण काळपट , कडक , कुरकुरीत नको. गरम गरम भाकरी / चपाती बरोबर झकास लागते. काही लोक दाण्याचा कूटाऐवजी बेसन पीठ पेरून घालतात. पण दाण्याचा कूट घातलेली कांद्याची चटणी जास्त छान लागते असे माझे मत आहे.

स्वाती दिनेश Tue, 06/03/2008 - 12:58
माळेतला कांदा चौकोनी चिरा. हिरवी मिरची तेल लावून भाजून चुरडून घ्या.कांदा व मिरची दह्यात कालवा. चवीला मीठ घाला,थोडी कोथिंबिर घाला.(माळेतला कांदा नसेल तर साध्या कांद्यावर काम भागवा,:)) मस्त भरीत कम चटणी तांदळाच्या भाकरीशी झक्कास लागते. ही माझ्या आजोबांची रेशिपी बरं का .. स्वाती वेलदोडा,तुम्ही दिलेल्या चटण्याही मस्तच,त्यातली कांद्याची चटणी वाचून तर मला हे आठवले,:)

प्राजु Tue, 06/03/2008 - 13:08
तू ही आता सुगरण या सदरात मोडू म्हणजे शिजवू किंवा (चटण्या) वाटू लागलीस.. :) सह्हीयेत एकेक रेसिपिज.. स्वाती... तुझे किती आभार मानू.... चल या निमित्त मी तुला अमेरिकेला माझ्या घरी निमंत्रण देते.. खास .. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

पक्या Wed, 06/04/2008 - 21:39
मुंग्यांची चटणी खाल्ली आहे का कोणी ? ;) सिंगापूरात मिळते. चव चाखलेली आहे..आम्बटसर लागते.(अर्थात आवडली नाही पण उत्सुकतेपोटी चव बघीतली होती) लाल मुंग्या द्रोणात गोळा केल्या जातात. भाजून की कुटून (?) त्यात मीठ , तिखट पूड , मोहरी तेल वगैरे घालतात. भारतातही कुठलीशी जमात अशी चटणी बनवते असे कधीतरी वाचनात आले होते.

जयवी Wed, 06/04/2008 - 14:39
ए काय मस्त चटण्या दिल्यात गं तुम्ही........ अगदी संग्रही ठेवण्यासाऱखा धागा आहे. तुम्ही डीप्सना पण सुरवात केलीये ना.........त्यातली माझं हे एक डीप. लबनाह्.......म्हणून एक प्रकार इथे आखातात मिळतो......आपला चक्का म्हणूया त्याला पिंक डीप लबनाह -१ वाटी दही- अर्धी वाटी काळी द्राक्षं- ४-५ लसूण- ३-४ पाकळ्या वॉलनट पावडर - १ टेबल्स्पून मीठ- चवीनुसार ह्या सगळ्या गोष्टी मिक्सर मधून पेस्ट करुन घ्याव्यात. नाजूक गुलाबी रंगाचं डीप खूप छान लागतं. डॉरिटोज, नॅचोज, फ्रेश व्हेजीटेबल्स...... ह्या सोबत एकदम झकास लागतं.

प्रभाकर पेठकर Wed, 06/04/2008 - 17:00
पाकिस्तानी चटणी... साहित्यः पुदीना, दही, मीठ, जीरे पावडर, मिरच्या, कोथींबीर (वैकल्पिक) पुदीना,मिरच्या, मीठ, एकत्र वाटून घ्यायचे. त्यात दही, जीरे पावडर आणि (वापरल्यास) कोथिंबीर बारीक चिरुन घालायची. चटणी फार पातळ नाही पण प्रवाही असावी. तंदूर चिकन, कबाब (व्हेज्-नॉन.व्हेज दोन्ही), भज्यांबरोबर मस्त लागते. लेबनीझ चटणी... फ्रेश घट्ट क्रिम, लसूण, मीठ, दूध लसूण किसून, ठेचून पाणी घालून (एक टेबलस्पून) मिसळून, घ्यावा. हे पाणी गाळून घ्यावे. घट्ट क्रिम मध्ये मीठ आणि लसूणाचे पाणी मिसळावे. जरूर भासल्यास थोडे दूध मिसळावे (एक टेबलस्पून). टीपः लसूण अगदी किंचित चव लागेल इतपत असावा. लसूणाने क्रिमवर वरचढपणा करू नये. (तसेच मीठाचेही.) ही क्रिम चटणी चिकन कबाब बरोबर झकास लागते.

चित्रा Sun, 06/08/2008 - 03:10
चटण्या छान! आणि सर्व पाककृती एकत्रित असल्याने मिळण्यासाठी सोप्या. धन्यवाद!

नंदन Sun, 06/08/2008 - 09:51
धागा मस्त आहे. वर दिलेल्या तिसर्‍या क्रमांकाच्या चटणीत (ओल्या खोबर्‍याच्या) लाल मिरच्यांऐवजी कैरी किसून घातली तर त्याचा वेगळा प्रकार होऊ शकेल ना? हल्लीच्या भारतफेरीत आंबोळ्यांसोबत खाल्लेली चटणी तशीच केली असावी असा अंदाज आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

प्रभाकर पेठकर Sun, 06/08/2008 - 10:02
लाल मिरच्यांऐवजी कैरी किसून घातली तर त्याचा वेगळा प्रकार होऊ शकेल ना? वेगळा प्रकार नक्कीच होईल. पण 'तिखटा'ला 'आंबट' पर्याय योग्य वाटत नाही. 'चटणी' म्हणायचे आणि 'तिखट अजिबात नाही' असे काहीतरी होईल.

अभिता Tue, 06/10/2008 - 01:49
बोंबिलाची चटणी साहित्यः-१०० ग्रॅम म्हणजे अंदाजे ७/८ मध्यम आकाराचे सुके बोंबिल,२ टोमॅटो,२कांदे,१च्.तिखट्,१च. कांदा-लसुण मसाला,मीठ कृती:-कांदे टोमॅटो बारीक चिरुन घ्यायचे.बोंबिल पोह्यासारखे धूवुन निथळत ठेवावे.मग बारीक तुकडे करावे.२च.तेल गरम करुन त्यात कांदा,टोंमॅटो मऊ होईपर्यत परतवा.त्यात तिखट्,मसाला,चवीपुरते मीठ घालावे.मग तुकडे केलेले बोंबिल घालुन वाफ येऊ द्यावी.थोडे पाणी घातले तर चालेल्(वाफ येण्यापुरती).वरुन कोथिंबिर पेरावी.

अभिता Tue, 06/10/2008 - 02:00
पावसाळ्यासाठी किंवा बाळंतिणिसाठि केली जाणारी चटणी साहित्यः-१ वाटी सुके खोबरे,लसुण्,मिरी,मीठ कृती:-खोबरे किसुन घ्यायचे.त्यात लसुण्,मिरी मीठ घालुन मिक्सरवर किंवा खलबत्यात कुटावी. लसुण,मिरी, मीठ चवीनुसार

अश्विनीका Tue, 05/05/2009 - 11:56
खूप छान धागा आहे हा. इथे कोणाला टोमॅटो ची दक्षिण भारतीय करतात तशी चटणी माहित आहे का?

साक्षी Tue, 05/05/2009 - 15:56
  1. दाण्याची चटणी
  2. एक वाटी शेंगदाण्यात एक चमचा जिरे, आवडीप्रमाणे तिखट, चवीपुरते मीठ व चिमुटभर साखर घालून भरड वाटावे.
  3. झिठमिठलं
  4. हिरवी मिरची भाजून घ्यावी. त्यात मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, दही घालून व्यवस्थित कालवून घ्यावे.
~साक्षी

वेगवेगळ्या ओल्या,सुक्या चटण्यांचे प्रकार ह्या धाग्यात लिहिले तर हव्या त्या चटणी साठी एकत्र कलेक्शन मिळेल.तुम्हाला काय वाटते? १)शेंगदाणे +तीळ+लसूण चटणी १ वाटी शेंगदाणे,१/२ वाटी तीळ, १०ते १२ सुक्या लाल मिरच्या,१ मध्यम गड्डी लसूण,मीठ शेंगदाणे व तीळ वेगवेगळे खमंग भाजणे.गॅस न लावताच लाल मिरच्या दाणे तीळ भाजलेल्या गरम कढल्यात घालून थोड्या परतणे.कढल्याच्या तेवढा गरमपणा पुरतो. मिक्सर मध्ये तीळ आधी फिरवून घेणे त्यावर दाणे, मग मिरच्या आणि शेवटी लसूण घालणे.

आमेरिकन बिवटी - येक पिक्चर...

फटू ·

मदनबाण Mon, 06/02/2008 - 08:14
सतीश राव लय मस्त लिवल हाय तुम्ही..काय पन बोला पण ही अमेरिकेतील लोक हाय मात्र फारच मोकळी...कोणाच्या बायको बरोबर कोणाचा नवरा !!!!! (बहुतेक ह्यालाच 'आमेरिकन बिवटी ' म्हणत असणार) व्वा र गड्या बाकी ह्या इंग्लिस पिक्चरचा परीक्शन तु लई झ्याक लिवल हायस..आणि ते म्या अगदी शेवट्च्या ओली पर्यंन्त वाचल्,,,नाही म्हणजे पोचलो तिथपर्यंन्त........ (बिवटी बिवटी म्हणतात ती अशी हाय काय) या इचारामंदी हरिवलेला.. मदनबाण.....

मुक्तसुनीत Mon, 06/02/2008 - 08:25
गावडे यांनी आपल्याला परिचित अशा भाषेत चित्रपटाची कथा सांगितली. एका हॉलीवूडपटाची कथा लोकभाषेमधे ऐकण्यात जी मजा असते ती आणि तितकी या लेखामधे आहे खरी. परंतु "गावकर्‍याच्या" दृष्टिकोनातून अत्याधुनिक अमेरिकन मूल्यांवर भाष्य करताना त्यातून काहीतरी चमकदार , चटकदार , खुसखुशीत लिहीण्याची संधी त्यानी गमावली असे वाटले. भाषिक नमुन्याचे प्रदर्शन इतपतच परिणाम त्यानी साधला ; "साध्याभोळ्या नजरेतून अमेरिकन गुंतागुंत" असे काहीतरी केले असते तर त्याचा परिणाम कितीतरी जास्त मनोरंजक झाला असतासे वाटले. रायगड भागातल्या भाषेच्या लडिवाळपणाकरता मात्र हे लिखाण जरूर वाचावे !

यशोधरा Mon, 06/02/2008 - 08:27
वाचलां हां मीनीपन, अगदी शेवटापर्यंत वाचलां!! जल्लां सगलां गोंधलच हाये म्हनायाचा हा पिच्चर म्हंजे!!

विसोबा खेचर Mon, 06/02/2008 - 08:41
वा गावडेशेठ, ष्टोरी बाकी मस्तच लिवली हाय! बोलीभाषेत वाचायला मजा वाटली...! :) अजूनही अशी परिक्शणं येऊ द्या... आपला, (चुम्माचाटीचे शीन चवीचवीने बघणारा!) तात्या.

अनिल हटेला Mon, 06/02/2008 - 10:27
च्या मारी!! असली कथा ,आणी ह्याला सिनेमा म्हणतात व्हय? बाकी सतिश राव लिहीलये ,एक दम झ्याक मधी काय!!!!

In reply to by अनिल हटेला

भडकमकर मास्तर Mon, 06/02/2008 - 16:18
असली कथा ,आणी ह्याला सिनेमा म्हणतात व्हय? एक विनंती....नुसत्या कथेवर जाऊ नका साहेब... (तेसुद्धा अशा स्टाईलने सांगितलेल्या...) आपण स्वतः सिनेमा पहा आणि मग ठरवा... या सिनेमाला १९९९ सालची ( लेखन, दिग्दर्शन, छायालेखन, अभिनेता, आणि बेस्ट फिल्म ) अशी ऑस्कर आहेत... त्याची पटकथा, संवादही वाचून पहा... ... तुम्ही सिनेमा पाहून नंतरही तुमचे असेच मत झाले तर मात्र आमचे काही म्हणणे नाही... तुमच्या मताचा आदर करतो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋचा Mon, 06/02/2008 - 10:39
लै भारी लिवलयं तुमी पण त्ये ष्टोरी म्हंजी येकदम माल हाय बगा :(

आनंदयात्री Mon, 06/02/2008 - 10:49
काय राव गावडेराव ... गोळी घालणारा म्हणजे रिकीचा बाप असतो अन तो का गोळी घालतो ते सांगितलेच नाही राव .. शेवटचे नाट्य अजुन नीट उलगडुन मांडायला हवे होते असे वाटले .. असो चांगला प्रयत्न.

In reply to by आनंदयात्री

भडकमकर मास्तर Mon, 06/02/2008 - 16:11
स्पॉइलर... अटेन्शन... तो गोळी घालणारा रिकीचा बाप होमोफोबिक असतो.... त्याचा गैरसमज असा होतो की आपल्या चांगल्या (!!) मुलाकडून हा शेजारचा लेस्टर काही अनैतिक वगैरे काम करवून घेतो आहे त्यामुळे {जुना ( बहुतेक जर्मन ) सैनिक असणारा }तो तिरीमिरीत जाऊन लेस्टरला गोळी घालतो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चेतन Mon, 06/02/2008 - 10:51
काय बा इस्टोरी! बाकी लिवलास मात्र झकास ! लय बेस आता आमचि भाषा ऐकायला कशी लै भारी च्यायला तिथे जाउन पण असले पिक्चर बघतोस हत तिच्या.... गावरान चेतन

गिरिजा Mon, 06/02/2008 - 10:59
काय पन बोला पण ही अमेरिकेतील लोक हाय मात्र फारच मोकळी...कोणाच्या बायको बरोबर कोणाचा नवरा !!!!! (बहुतेक ह्यालाच 'आमेरिकन बिवटी ' म्हणत असणार)
माझ्या मनातही हेच आल अगदी.. वाचल हो शेवटपर्यन्त.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

मयुरयेलपले Mon, 06/02/2008 - 11:10
आमाला वाचायचा लय याड .. त्यात तुमि लिवलाय म्हटल्यावर मंग काय इचारायचा.. काय ष्टोरि लिवलिय .. काय ती जेन , तिची आईस , अन काय त्या आईशिचा घो (नवरा).. आमेरिकेत हाव ना तुमि संभालुन रा रे पुता (मुला).. वयाचा विचार करुन सगला कर नाय तर तुजि ष्टोरि (इंडियन गाय).. मला ल्यावि लागण.. बाकि सगला मामला बेस जमलाय आपला मयुर

शिन्माची ष्टोरी लै आवडाली. अझून सांग इंग्लीश पीच्चरच्या ष्टो-या. कथा म्हणुन काही ध्येनात नै आलं, म्हंजी गोष्ट अर्धीच सांगली की काय कनु आस्स वाट्लं, हळू हळू उमजन म्हणा तेबी.

वेताळ Mon, 06/02/2008 - 13:13
//......पण त्ये ष्टोरी म्हंजी येकदम माल हाय बगा .....// का तुला असे म्हणायचे होते त्या पिक्चर मध्ये खुप छान 'माल' आहेत. (मालामाल) वेताळ

भडकमकर मास्तर Mon, 06/02/2008 - 15:52
सतीश, गोष्ट छान सागितली आहेस... मजा आली वाचून... तेव्हा २००० सालामध्ये दोन वेळा थिएटरला पाहिला होता... यावर पुन्हा कधीतरी लिहावे असे मनात होते, तेव्हा फारच आवडला होता हा सिनेमा ... या सिनेमाला मिळालेली ऑस्कर्स...Oscars for Best Actor (Kevin Spacey), Best Director (Sam Mendes), Best Picture (Bruce Cohen and Dan Jinks), Best Original Screenplay (Alan Ball), and Best Cinematography (Conrad L. Hall) त्यातले काही फोटो आणि कलाकारांची नावे देतो इथे... लेस्टरबाबा... केव्हिन स्पेसी...आणि कॅरोलिन बाई ..ऍनेट बेनिन्ग रिकी ( वेस बेन्टली) जेन ( थोरा बिर्च ) आणि ऍन्जेला ( मेना सुवारी) केव्हिन स्पेसीने या सिनेमात खरंच अप्रतिम काम केले आहे...मिडलाईफ क्रायसिसमधला वैतागलेला बाप, कंटाळलेला नवरा, ज्याचा त्याची मुलगी प्रचंड तिरस्कार करते, नंतर अँजेला भेटल्यानंतर त्याच्यात झालेले बदल ( तो म्हणतो, " जणू २० वर्षे मी कोमात होतो आणि आत्ताच जागा झालो"..)त्याने फारच छान दाखवलेले आहेत... आयुष्य तो नव्या उत्साहाने आणि आनंदाने जगायला लागतो... केव्हिन स्पेसी ऒस्कर स्वीकारताना (अशा अर्थाचं काही ) म्हणाला होता, " ही व्यक्तीरेखा करताना मला खूप छान वाटलं कारण त्याचं वाईट वागणं,त्याचे सगळे दुर्गुण समजूनसुद्धा लेस्टर एकदम लव्हेबल वाटतो"... ... कॆरोलीनची व्यक्तिरेखा त्यापेक्षा अधिक अवघड होतं साकारणं... , खरं सांगायचं तर लेस्टर आणि कॆरोलीन एकाच वाटेवरचे प्रवासी आहेत पण गोष्ट लेस्टरची असल्याने लेखनात तिला सहानुभूती नाही , तरीही ऎनेट बेनिन्गने फ़ार छान केलं आहे काम... यातले काही आवडते सीन... १.लेस्टर बॉसला ब्लॅकमेल करून जास्ती बेनेफिट्स घेतो ते दृश्य २. लेस्टर करोलिन दोघे प्रेमात आल्यानंतर लेस्टरच्या हातातली बीअर महागड्या सोफ्यावर सांडेल म्हणून कॅरोलीन लेस्टरला दूर ढकलते आणि त्याच्या मूडचा विचका होऊन तो थयथयाट करतो... ३. ( साक्षात्कारानंतर) घरात डिनरच्या वेळेला " आय रूल" असं हात उंचावून तो ( पूर्वी त्याला काडीची किंमत न देणार्‍या) दोघींना बजावून सांगतो .. याच्या दिग्दर्शकाविषयी थोडेसे... स्पीलबर्ग ने सॅम मेंडेस या लंडनमध्ये ब्रिटिश रंगभूमीवर दिग्दर्शन करणार्‍या ( नाटकवाल्या!! बहुतेक ब्लू रूम नावाचे निकोल किडमन अभिनीत नाटक त्याचे होते) दिग्दर्शकाकडे ही कामगिरी सोपवली त्यावेळी बर्‍याच जणांच्या भुवया उंचावल्या होत्या... पण त्याचे या माणसाने चीज केले, आणि ऑस्कर मिळवले...... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर Mon, 06/02/2008 - 16:08
या सिनेमाचा हा एक दुवा.. http://www.dreamworks.com/ab/ या सिनेमाची संपूर्ण पटकथा संवादासहित वाचा इथे... http://www.script-o-rama.com/movie_scripts/a/american-beauty-screenplay-script-final.html ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

(हा लेक म्हंजे 'आमेरिकन बिवटी ' ह्या इंग्लिस पिक्चरचा परीक्शन हाय. ह्ये परीक्शन वरिजनल आमेरिकन पिक्चरवर आदारीत हाय. (मना आसा म्हनायचा हाय का हा परीक्शन भारतीय शेंसॉर बॉर्डाने शेंसॉर केलेल्या 'आमेरिकन बिवटी' चा नाय. असो.) तर सांगायचा मुद्दा हा हाय की पिक्चरमदी काय पन दाकवलेला असला तरी मी लेक लिवताना लय संबालून लिवलाय. तरीपन सरपंचाना किवा कुना आदर्नीय मिपा कराना काय आब्जेक्शन आसला तं मना काय नं सांगता हितना हा लेक काडून टाकला तरी माजा काय म्हनना नाय...) ...गावाकड दुपारच्या टायमाला जोरान हुती येते. हुती म्हनजे वा~याचा भवरा.

आल्यावर असा येशील की...

फटू ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कधी सांज ढळत असताना ह्रदयात उतर तू माझ्या कधी चांदणं फुलत असताना ह्रदयात उतर तू माझ्या आल्यावर असा येशील की तू परत जावू नकोस राजा तू इथे नाहीस तरीही तू सोबत आहेस असंच वाटतं मला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये जणू तूच आहेस रे लपलेला जेव्हापासून तुला ओळखते, आपलं मानलं आहे मी तुला माझं भोवताल, माझा देह सारं काही तूच व्यापून उरलेला आल्यावर असा येशील की तू परत जावू नकोस राजा कधी सांज ढळत असताना ह्रदयात उतर तू माझ्या कधी चांदणं फुलत असताना ह्रदयात उतर तू माझ्या रात्र अन् दिवसाचे श्वास माझे, जणू तुझेच आहेत सारे शपथ आयुष्याची, माझं आयुष्य आहे तुझी देणगी रे या एकाकी वाटचालीमध्ये तूच आहेस र

( आयपीएल चा खेळ रे)

अमोल केळकर ·

हेरंब Sun, 06/01/2008 - 18:03
आयपीएलचा खेळ रे यालाच लोक क्रिकेट समजतात रे खर्‍या तंत्राला विसर रे आतशबाजीलाच सलाम रे |

खेळाडुंची खाण रे, चौकार-षटकार मार रे ! प्राणांचाही प्राण माझा, पैसा तुची एक रे !! आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे ! मस्त !!!!

प्रभाकर पेठकर Sun, 06/01/2008 - 20:11
आयपीएलचा खेळ रे! अरे, अरे, काय रेऽऽ! ह्यालाच क्रिकेट म्हणतात का रे, शरीरविक्रयाचा खेळ रे. कोण माझा, कोण परका, सगळीच सरमिसळ झाली रे, धोनी माझा, युवराजही माझा हार-जीत कोणाची रे! पैसा माझा, खेळ परका, कमरेचेही सोडले रे, ह्यालाच क्रिकेट म्हणतात का रे, शरीरविक्रयाचा खेळ रे.

विसोबा खेचर Mon, 06/02/2008 - 09:20
केळकरसाहेब अणि पेठकरशेठ, दोघांचीही विडंबने झकास... आपला, (सचिनप्रेमी) तात्या.

आयपीएल च्या अंतीम सामन्याच्या पुर्वसंधेला डि.वाय पाटील स्टेडिअमवर जाण्यापुर्वी एक विडंबन चाल प्रसिध्द गाणे ' विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे !! ============================================================== आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे ! आनंदाची शाम त्यांची आनंदाची रात्र रे !! आयपीएल चा खेळ रे,-- खेळाडुंची खाण रे, चौकार-षटकार मार रे ! प्राणांचाही प्राण माझा, पैसा तुची एक रे !! आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !---- सर्वांचा तो देव रे, मोदी स्वयंमेवरे ! सर्वांचा तो देव रे, मोदी स्वयंमेवरे ! प्रिती, शाहरुख, अंबानी , घेती वाटुन संघ रे, !!

आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर - २

पंकज ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
3