मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मयत (२) --- करीअर गायडंस वर्ग

आंबोळी ·

विजुभाऊ 26/05/2008 - 12:20
'अजुन ५ मिनिट तिरडी अशीच ठेवली आसती तर तो मुडदा उठुन चालायला लागला असता........... :)) तुमचा कन्दील काय कामाचा मग.कंदीलातली पावर कमी झालीकी काय? अरे हो लोकांच्या सोयीसाठी खास अरण्यारुदन करणार्‍या लोकांचे खास पथक तयार केले जात आहे जालावर इतरत्र लिहिणार्‍या समिक्षकांच्या गायडन्स खाली. ते नसतील तर त्यांचे रे़कॉर्डेड ध्वनीफीती उपलब्ध आहेत. बाकी तुमचा अनिभव दांडगा दिसतो हो.....अनुभवी लोक असले की सगळे कसे यथासांग होते अवांतर : तुमच्या कंदीलाच्या दुकानाशेजारच्या इनोबाच्या मयताच्या सामानाच्या दुकानाशेजारच्या धमु च्या भजन मंडळाशेजारी मी " येथे कावळे भाड्याने मिळतील " अशी पाटी लावतोय. जरा प्रचार करा हो. "तीन कावळे बूक करणारास एक कोलम तांदळाचा पिंड फ्री " अशी स्कीम पण राबतोय

बराच अभ्यास दिसतोय ह्या विषयातला. चांगले निरिक्षण आहे. पण अशा 'अतिउत्साही' माणसाला हेरून कामाला लावणारे महाभागही असतात. 'तुम्ही स्वतः काम न करता इतरांकडून कामे करून घ्यावीत' असा आपला सल्ला असला तरी इतरांची कोंडी करण्याच्या पद्धतीने तुमचीही कोंडी होऊ शकते. एखादा माणूस तुम्हालाच 'बळीचा बकरा' बनवतो. तुम्हाला ही एखादे काम 'नाही' म्हणणे शक्य नसते. असो. आमच्या गावात असे एक प्रसिद्ध (ह्या कामासाठी) गृहस्थ होते. मैलोंनमैल दूरून गिधाडांना मुडद्याचा वास येतो तसे त्यांना गावात कोणाचा मृत्यू झाला की बातमी लागायची. लगेच स्वखर्चाने पावशेर 'देशी' मारून ते घटना स्थळी हजर व्हायचे. त्यांच्या आधी कोणी पोहोचून तिरडी बांधायला घेतली असेल तर, 'चला, चला, बाजूला व्हा. तुम्हाला काय येणार तिरडी बांधायला' असे म्हणून तिरडी 'ताब्यात' घ्यायचे. लग्न कार्यात भडजी जसे मुहूर्त जवळ आला की 'कन्येला घेऊन या' असे म्हणतात त्या प्रमाणे तिरडी बांधून झाली की 'प्रेत घेऊन या' असे फर्मवायचे. नातेवाईक प्रेत तिरडीवर ठेवू लागले की, 'थांबा. गाठी सोडल्या का?' असा मौलीक प्रश्न करायचे. श्रोत्यांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह दिसले की 'अरे! प्रेताच्या लेंघ्याच्या नाड्या सोडा. वस्त्राला कुठे गाठी असतील तर त्या सोडा. सगळ्यातून मुक्त करा त्याला' असा उपदेश करायचे. मधे मधे मोठ्या मुलाला सांत्वनपर बोलताना 'मी करतो सगळं, तू काही काळजी करू नकोस' असे सांगायचे. त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ओळखिच्या अनोळखी माणसास ' काय आहे, ही आपली माणसं आहेत. आम्ही गावातले जुने. एकमेकांच्या उपयोगी पडले पाहिजे. त्यामुळे मी काही जास्त चार्ज घेत नाही. '(म्हणजे 'मी चार्ज घेतो' हे सांगून टाकायचे).असे करत थेट स्मशानभूमी पर्यंत 'साथ' द्यायला पुढे. स्मशानात, ह्या पुर्वी येऊन इथे आणलेल्या प्रेतांच्या कथा मिठमसाला लावून उपस्थितांना ऐकवायच्या. कोणाची भूते झाली, कोणाला मुक्ती मिळाली वगैरे उपकथानके जोडायची. 'कवटी फुटल्याशिवाय कोणी घरी जाऊ नका' असा खणखणीत दम मृताच्या मोठ्या मुलादेखत सर्वांना द्यायचा, असा त्यांचा खाक्या. सर्व उरकल्यावर कोणी निकटचा नातेवाईक त्यांना त्याची फी विचारतो. त्यावर लाचार हसून 'द्या तुमच्या मर्जीनुसार' असे म्हणून लगेच त्याच्या पुढेच 'तुमच्याच गल्लीतल्या कुळकर्ण्यांनी त्यांचे आजोबा गेले तेव्हा ३०० दिले होते' अशी पुस्ती जोडून रक्कम सुचविण्याचे कामही ते करतात. पण ५०रु. पासून जे मिळेल ते स्विकारण्याचा व्यावसायिक लवचिकपणा त्यांच्यात आहे. संध्याकाळी ते 'फुल्ल' असतात.

ऋचा 26/05/2008 - 16:53
'अजुन ५ मिनिट तिरडी अशीच ठेवली आसती तर तो मुडदा उठुन चालायला लागला असता.काय राव तुमची अक्कल...' लै भारी राव!!!!

धमाल मुलगा 27/05/2008 - 15:42
च्यामारी... आम्बोळ्या, तू आता 'मृत्यू' हा विषय घेऊन पी.एच.डी. करच. बाकी पेठकरकाकांशी सहमत... तेव्हढं क्लासमध्ये शिकवून घ्या बुवा...समोरच्यानं आपल्या गळ्यात तंगडी अडकवली तर त्याला कसा उलटा करायचा ते :)
अवांतर : तुमच्या कंदीलाच्या दुकानाशेजारच्या इनोबाच्या मयताच्या सामानाच्या दुकानाशेजारच्या धमु च्या भजन मंडळाशेजारी मी " येथे कावळे भाड्याने मिळतील " अशी पाटी लावतोय. जरा प्रचार करा हो. "तीन कावळे बूक करणारास एक कोलम तांदळाचा पिंड फ्री " अशी स्कीम पण राबतोय
विजुभाऊ, वेलकम टू पार्टनरशीप :) येऊद्या अजुनही... स्वगतः त्या नचिकेतापेक्षा ह्या आम्बोळ्यालाच मृत्यू जास्त चांगला समजलेला दिसतोय. :?

लेखनविषय:
लेखनप्रकार
हल्ली एखादा प्रकार हीट झाला की लगेच त्याच्या आवृत्त्या काढायची फ्याशन येते. एखादा पिक्चर हीट झाला की लगेच त्या थीमच्या 3-4 आवृत्या निघतात. हा प्रकार इथे मिसळपाववर नवीन नाही. एक खायाली पुलाव फेमस झाल्यावर लगेच तो प्रकार 5-6 जणानी वापरला. एक रेखाटन प्रसिध्ध झाल्याझाल्या लोकानी लगीच आपापली बरीच वर्ष कपाटात असलेली, घड्या, डाग पडलेली रेखाटने काढून मिपावर डकवली. सांगायचा उद्देश एवढाच की एखाद्या प्रकाराला प्रसिध्धी मिळती आहे म्हणल्यावर वाहत्या गंगेत बरेच जण हात धुवून घेताना दिसतात. भडकमकरांचे गायडंस वर्ग तुफान चालतायत बघून आम्हीही या गंगेत हात धुवायचे ठरवले.

मुंबई ते मैसूर

आनंद घारे ·

आंबोळी 26/05/2008 - 13:20
वाचतोय् ,पुढील भाग येउ द्यात. अर्थातच छान लिहिलेय हे वे.सां.न.ल. सहमत

वरदा 29/05/2008 - 00:23
मग काय झाल !!!!! पुढील भागाच्या प्रतीक्षेत !!!!!

आंबोळी 26/05/2008 - 13:20
वाचतोय् ,पुढील भाग येउ द्यात. अर्थातच छान लिहिलेय हे वे.सां.न.ल. सहमत

वरदा 29/05/2008 - 00:23
मग काय झाल !!!!! पुढील भागाच्या प्रतीक्षेत !!!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वतः हे सुंदर शहर पाहण्यासाठी किंवा दुस-या कुणाला दाखवायच्या निमित्याने ते पुनः पाहण्यासाठी मी पूर्वी तीन चार वेळा मैसूरला एक पर्यटक म्हणून येऊन गेलो होतो. त्यातल्या प्रत्येक वेळी इथली प्रेक्षणीय स्थळे एकामागून एक पाहून पुढचे ठिकाण गांठण्यात थोडी घाईगर्दीच झाली होती. त्यासाठी इकडून तिकडे फिरतांना शहराचा जेवढा भाग दिसला होता तेवढा पाहूनच हे गांव माझ्या मनात भरले होते. कधी काळी आपण इथे रहायला येऊ शकू अशी शक्यता त्या वेळेस स्वप्नातसुध्दा दिसत नव्हती त्यामुळे इथल्या रहिवाशांचा थोडा हेवाच वाटला होता.

हिमेश बाबाच्या सौजन्याने...

फटू ·

In reply to by विसोबा खेचर

फटू 26/05/2008 - 06:22
वरील चारोळी हिमेश बाबाच्या एका गीताच्या बोलाचे भाषान्तर आहे... तेरी यादोंने तनहा ना छोड़ा कही मैं तनहाइमें भी तनहा नही..... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चेतन 26/05/2008 - 12:39
अनुवाद चांगला आहे. सध्या विरह आणि तत्सम गोष्टिंवरच लिहण्याची शपथ घेतलि कि काय? स्वगतः च्यायला एकेकजणं इथे पी.एच्.डी. करतोयं कि काय?ह. घ्या. सतिश: विरह आंबोळि: मयत आणी कंदिल यादी बरीच मोठी दिसते .... .. . तनहा चेतन

अरुण मनोहर 28/05/2008 - 06:45
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... हिमेश बाबाच्या सौजन्याने... हे नाकातून किंचाळून गायले की अर्थ कळेल बहुतेक.

Taxonomy upgrade extras
तुझ्या आठवणींनी मला कधी एकटं सोडलं नाही एकटं असूनही मला कधी तसं एकटं वाटलं नाही

बोगदा

हेरंब ·

योग्य वाक्य! ८० की.मी. वेगाने गाडी चालवताना क्षणार्धात वाचता येइल अशीच वाक्य रचना हवी. केवळ बोगदा या शब्दावरुन नजर फिरली तरी पुढे बोगदा आहे हे कळते आणी चालक सावध होतो. मुंबई - पुणे महा मार्गावर अनेक अपघात बोगद्याच्या असपास अथवा बोगद्यात होतात. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

योग्य वाक्य! ८० की.मी. वेगाने गाडी चालवताना क्षणार्धात वाचता येइल अशीच वाक्य रचना हवी. असहमत. मग नुसते मोट्या अक्षरात 'बोगदा' एवढेच लिहावे. ८० किमी वेगाने जाताना वाचण्यासाठी कमीतकमी शब्द असावेत. मुळात 'बोगदा पुढे आहे' हा 'Tunnel Ahed' ह्या इंग्रजी सुचनेचे शब्दशः मराठी भाषांतर आहे. अनुवाद नाही. 'बोगदा पुढे आहे' ह्यातून 'उगीच इथे शोधू नका' असा अर्थ निघतो. 'पुढे बोगदा आहे' हा अनुवाद योग्य वाटतो. पुढे काय आहे? किंवा पुढे काय धोका आहे? हे सूचीत करणारे अर्थपूर्ण वाक्य होते, 'पुढे बोगदा आहे'.

हर्षद बर्वे 26/05/2008 - 16:41
"बोगदा" १०० मीटर.. अशा प्रकार्चि पाटी असण्याची जास्त आवश्यकता आहे.त्यातून अनेक गोष्टी साध्य होतील. १) बोगदा पूढे १०० ंमी. अंतरावर आहे हे चालकाला समजेल.म्हण्जे नक्की बोगदा कुठे आहे. हा संभ्रम राहणार नाही. २)१०० मी. वर बोगदा असल्यामूळे चालक कितीही वेगात असला तरी त्याल वेग कमी करणे, आणि दिवस असल्यास हेड्लाईट्स चालू करणे इत्यादी गोष्टी करण्यास योग्य तेवढा अवधी मिळेल. ३)वेग्वेगळ्या तर्हेवाईक पाट्यां वाचण्याचा शौक असणार्या चालकांमूळे रस्त्यावरचे लक्ष जाउन होणारे संभाव्य अपघात टळतील. :) आपला... हर्षद...

बोगदा आणि दादा कोंदके वाचुन वाटल की तु त्यांचा तो किस्सा सांगतोस. "बोगदा" शब्दाला सेंसॉरने आक्षेप घेतला दादा म्हणाले द्या पर्यायी शब्द पण ते शक्य झाल नाही आणि अर्थातच तो शब्द तसाच राहीला.

परवा पुण्याहून मुंबईला येत होतो. बरेचवेळा वाचलेली पाटीच परत वाचली. ' बोगदा पुढे आहे.' नेहमीप्रमाणेच खटकले, असं का लिहिलाय ? 'पुढे बोगदा आहे' असं का नाही ? मग आठवलं, दादांच्या 'पांडू हवालदार' च्या टायटल्स् दाखवताना अशीच मजा केली होती. पांडू हलवादार - दांडू हलवापार वगैरे वगैरे. म्हणून या वाक्याचं पण असेच करुन पहावे असं मनांत आलं. बोगदा पुढे आहे. बोगदा आहे पुढे. पुढे बोगदा आहे . पुढे आहे बोगदा. आहे पुढे ,बोगदा! आहे बोगदा पुढे. सरकारी खात्यातल्या लोकांना कुठला पर्याय योग्य वाटेल ?

कधी सांज ढळत असताना...

फटू ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
डॉ. करणिकांचं फिजीओलॉजीचं शेवटचं लेकचर संपलं. सेकंड एम बी बी एस च्या वर्गातून पांढरा शुभ्र एप्रन घातलेली भावी डॉक्टर मंडळी भराभर बाहेर पडली. अविनाशसुद्धा घाई करत वाचनालयाच्या दिशेने निघाला. आज काहीही करून ग्रे चं anatomy चं पुस्तक मिळायला हवं याच विचारात तो चालला होता. तो जिना चढून दुस~या मजल्यावर आला. त्याच्या मागोमाग मोठ्याने चपलांचा आवाज करत कुणीतरी येत असल्याचं त्याला जाणवलं. ''असेल कुणी सीनियर किंवा स्टाफ मेम्बर", तो स्वताशीच पुट पुटला. "ए स्कॉलर", मागून आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं.

गावित मास्तर

पिवळा डांबिस ·

बेसनलाडू 24/05/2008 - 09:02
अतिशय जिवंत मास्तर. व्वा पिडांकाका. फार जिवंत व्यक्तिचित्रण. मास्तर साक्षात डोळ्यांसमोर उभे ठाकले आणि आम्हीही तुमच्याबरोबर त्यांच्यासंगे शाळेत वावरलो मिनिट-दोनमिनिट. दूरदर्शनवरील माझ्या लाडक्या 'संस्कार' मालिकेतल्या देव सरांची आठवण झाली पुसटशी. (स्मरणशील वाचक)बेसनलाडू

मदनबाण 24/05/2008 - 09:25
काका, लई जबराट लिवता तुम्ही..... एकदम शाळेत जाऊन आलो बघा..... मनात तासाची घंटा देखील वाजली..... जर गावित सरांचे शब्द खरे ठरले असते तर......... तर आपल्या या हरामखोर राजकारण्यांना जाती-पाती चे राजकारण करता आले नसते..... (मास्तरांनी फेकुन मारलेले डस्टर बर्‍याच वेळा चुकवण्यात यशस्वी झालेला) मदनबाण>>>>>

सन्जोप राव 24/05/2008 - 10:03
देव कला बोटात देतांना काय जात बघुन देतो का? सरांचे डोळे अगदी टचकन अश्रूंनी भरले.... "अरे देव असं समजत नाही, तुम्ही पोरं असं मानत नाही, मग आमच्या पिढीलाच काय धाड भरलीय रं....." आता अगदी भटा-बामनाचा पोरगा तू! पन तुझे विचार वेगळे हायेत, पुढारलेले हायेत!!! चांगलं हाय! आमी एक भोगलं ते भोगलं, पन तुझ्यासारखा विचार करणारी पुढची पिढी असंल तं आमाला जे भोगावं लागलं ते आमच्या मुला-नातवंडांना तरी नाई भोगावं लागनार!" कधी गावंढळ तर अचानकच मध्ये शहरी भाषेत बोलणारे मास्तर - त्यांचे त्यातल्या त्यात घेतलेले कलंदर बेअरिंग - चुटकीसरशी डोळ्यात पाणीबिणी आणि शेवटी निरगाठ - उकल या तंत्राबरहुकूम 'जाळुनि टाका या भिंती' असा एक फडके खांडेकर संदेश - तंतोतंत व.पुं. चा लार्ज पेग साने गुरुजींच्या सोड्याने पातळ केल्यासारखा. अर्थात हे चलनी नाणे आहे म्हणा... सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

सहज 24/05/2008 - 10:47
कदाचित एक-दोन वेगळ्या नावाने तंतोतंत हाच लेख लिहला असता तर बिनाशर्त किंवा बहुतेक निदान लेखी/तोंडदेखली प्रशंसा मिळाली असती एका माणसाची!! हेच जर अत्यंत सकस लिखाण असेल तर हा लेख निव्वळ "मसाला मिक्स" कसा काय? असो आपापले मत, ज्याची त्याची आवड!! मला लेख आवडला. व्यक्तीचित्र, भेदभाव, आठवणी सगळे छान गुंफले आहे

In reply to by सहज

कदाचित एक-दोन वेगळ्या नावाने तंतोतंत हाच लेख लिहला असता तर बिनाशर्त किंवा बहुतेक निदान लेखी/तोंडदेखली प्रशंसा मिळाली असती एका माणसाची!! कोणत्या लेखकाने हेच लेखन केले असते म्हणजे या पेक्षा सरस लेखन किंवा दर्जेदार कथा होऊच शकत नाही, असे कोणी कोणास म्हटले असते ? ;) अवांतर : सहजराव, उत्तम निरिक्षण !!! चालू दे, चालू दे !!! कधी कधी आपले विचार काय जूळतात राव !!! :)

In reply to by सहज

सन्जोप राव 24/05/2008 - 16:08
कुणी लिहिले आहे यापेक्षा काय लिहिले आहे हे बघून त्यावर मत देणे असे वस्तुनिष्ठ रहाणे कठीण आहे. ते जमले नाही, तर त्यात शल्य मानून घेऊ नये. ज्याची त्याची आवड हे तर आहेच. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

सहज 24/05/2008 - 16:46
असेच लेखन [आय मीन प्रतिसाद] वाचुन तर कळले हे असे वस्तुनिष्ठ रहाणे खरचं कठीण आहे. अगदी भले भले देखील भ्रमात असतात व गंमत ही की आपण फसलो गेलो हे देखील त्यांना कळत नाही. :-)

In reply to by सन्जोप राव

ऋषिकेश 24/05/2008 - 17:48
तू माझ्याकडे चित्रासाठी का आला? त्या राजकन्येकडे गेला असतास तर तुला अगदी पेस्टल किंवा आइलपेंट मिळालं आसतं की!!"
संजोपराव आपली प्रतिक्रिया वाचून हे वाक्य उद्धृत करावसं वाटलं :)
अर्थात हे चलनी नाणे आहे
कोणतेही नाणे उगाच चलनी होऊ शकते पण ते हमखास चालण्यासाठी त्यात काहितरी खास असावेच लागते. बाकी, डांबिसराव, मला हा लेख फार फार आवडला. मास्तर आणि शाळा डोळ्यासमोर अतिशय ताकदिने जिवंत उभे केलेत -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

विकेड बनी 24/05/2008 - 23:15
अहो प्रत्येकाची आपली निष्ठा असते. दैवतं असतात. त्यांना आपापल्या चष्म्याबाहेरचं काहीच दिसत नसतं. त्यांना माफ करा. दोष त्यांचा नाही, नजरेचा आहे. लेख आवडला. शैली सुरेख आहे. पु.ले.शु तुमचा न चालणारा (खोटा पैसा) तेज

बकुळफुले 24/05/2008 - 10:32
डोक्यावर केसांची चहासाखर झालेली............मस्त शब्द निवडलेत हो काका.:) तंतोतंत व.पुं. चा लार्ज पेग साने गुरुजींच्या सोड्याने पातळ केल्यासारखा. अर्थात हे चलनी नाणे आहे म्हणा... :( सन्जोप काका तुम्ही भडकमकर मास्तरांच्या वर्गातुन बाहेर पडलेले समिक्षक आहत का हो.? बाकी म्हणा तुम्हाला तिथे प्राचार्यशिपच असेल. आमच्या डाम्बीस काकाचा लेख उगाच त्या चश्म्यातून पाहु नका. "सोड्याने पातळ" वगैरे असली फडकी त्या ला गुंडाळु नका. हे म्हणजे उगाच आमरस चाखत असताना त्यात हिंगाचे खडे आल्यासारखे वाटते. :::::::डाम्बीस काकांचा लेख वाचुन आनन्दीत झालेली बकुळफुले

In reply to by बकुळफुले

सन्जोप राव 24/05/2008 - 16:13
आमरस कुठला आणि हिंगाचे खडे कुठले हाच प्रश्न आहे. 'आपली करडी नजर रोखून माधवराव गरजले, "आता एकच सांगा बापू, की महादेव कोण आणि नंदी कोण?" हा उलगडा जोवर होत नाही तोवर आपण सुहास शिरवळकर जरुर वाचत रहा. आमची काहीही हरकत नाही... सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 24/05/2008 - 17:17
'आपली करडी नजर रोखून माधवराव गरजले, "आता एकच सांगा बापू, की महादेव कोण आणि नंदी कोण?" एक लहानशी सुधारणा..! वरील वाक्य हे माधवरावांनी बापूंना उद्देशून म्हटलेले नसून रामशास्त्र्यांनी गंगोबातात्यांना उद्देशून म्हटले होते असे आठवते! बाकी चालू द्या! :) आपला, तात्या देसाई.

मुक्तसुनीत 24/05/2008 - 11:11
डांबिसखान हे व्यक्तिचित्रे लिहीण्यात खरोखरच चँपियन आहेत हे वाचताना पटले. एखाद्या व्यक्तिचे काने-कंगोरे टिपणे , त्याचे चित्रदर्शी वर्णन करणे , आणि या सार्‍याला एका कथानकाच्या एका धाग्यात बांधणे याचे १०० गुण सुलेशबाबूना द्यायलाच हवे. उस्ताद डांबिसखां , आप यूंही अगर ऐसे लिखते रहें, देखिये एक दिन दिवान्-ए-डांबिस बन जायेगा ! :) अवांतर : संजोपरावांच्या मताचा एक वाचक म्हणून मला आदर वाटतो. प्रस्तुत लेखाला प्रतिक्रिया देताना त्यांनी वक्रोक्तीचा आधार घेतला आहे ही गोष्ट खरी. माझी सदर लेखकाला अशी विनंती राहील की त्यांनी या उक्तीमधले काटे बाजूला काढून त्यातील वर्माकडे लक्ष द्यावे. माझी खात्री आहे की डांबिसखानाना त्यात स्वत:च्या गुणवत्ता असणार्‍या लिखाणाला अजून कलादृष्ट्या चांगले बनविण्याबद्दलशी सूचना दिसेल.

फटू 24/05/2008 - 11:16
गावित मास्तरान्चा आणि तुमचा संवाद अगदी नजरेसमोर घडतोय असंच वाटतं... आपल्याला अगदी शाळेच्या दिवसांची आठवण झाली... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

राजे 24/05/2008 - 12:12
वा ! छान व्यक्तीचित्रण ! आवडले ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

फार सुंदर लिहीले आहे. आवडले. अभिनंदन. "आरे काय उपयोग! कला काय जाळायची? शेवटी आम्ही गावकुसाबाहेरचे!! हिते तरी मुंबईत आम्हाला बरोबरीची वागनूक मिळतेय काय! अरे किती सोसायचं या जातीपायी!!' "असं कसं म्हणता सर! देव कला बोटात देतांना काय जात बघुन देतो का?" हृदयाला भिडणारे शब्द आहेत. कैलास लेणे अजिंठ्याला आहे की वेरूळला याचे बरोबर उत्तर देता न आल्याने त्यांनी चिडून जाऊन आम्हा सातवीतल्या सगळ्या मुलांना सटासट छड्या मारल्या होत्या. शेवटी खरे उत्तर देण्याचे शिताफीने टाळलेत. ते दिले असतेत तर निदान आमच्या ज्ञानात तरी भर पडली असती. ह्हा:.... ह्हा:...ह्हा:..

आवडलं व्यक्तिचित्र ... आमचे शाळेतले चित्रकलेचे मास्तर आठवले... ... मात्र शेवटचा सोसल मेसेज थोडा अपेक्षित / पठडीतला वाटला... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

झकासराव 24/05/2008 - 16:41
माझी तर त्याकाळी समजूत मराठवाडा म्हणजे शिवाजीचा कुठलातरी बंगला असावा अशीच होती>>>> =)) चांगल जमलय व्यक्तीचित्रण. :)

विसोबा खेचर 24/05/2008 - 17:11
गावित मास्तरांचं व्यक्तिचित्रं ठीक वाटलं रे डांबिसा. परंतु फारशी पकड घेतली नाही असं माझं व्यक्तिगत मत... कोई बात नही, औरभी जरूर लिख्खो... पुलेशु.. आपला, (व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.

वाचक 26/05/2008 - 06:07
चर्चा करायची संधी मिळेल अशा अपेक्षेत श्री राव आपला रोख नेमका कुठल्या मुद्द्यावर आहे ते स्पष्ट झालेले नाही. आपण आपल्या प्रतिसादात 'एक फॉर्म्युला' दिला आहे तो बर्‍याच प्रमाणात ह्या लेखनाला लागू पडू शकतो पण तेवढाच जर आक्षेप असेल तर बहुतेक सर्व लेखन हे ह्याच गटात मोडते असे आपल्याला आढळून येइल. वेगळी वाट चोखाळणारेही अर्थातच आहेतच पण अल्पसंख्य आणि 'चलनी' असतीलच असेही नाही. मग नेमका आक्षेप कशावर ? ह्याच बरोबर जर आपण काही 'सकारात्मक मार्गदर्शन' केले असतेत तर आमच्याही ज्ञानात थोडी भर पडली असती. शिवाय मला असेही वाटते की 'पिडा' नेही ती 'टीका' 'विधायक सवरुपातच स्वीकारली असती. आपल्या लेखांचा मी चाहता आहे आणि ते विविध ठिकाणी वाचून त्यांचा आनंदही मिळवला आहे पण ह्या ठिकाणी थोड्या अधिक खुलाशाच्या अपेक्षेत... आणि जाता जाता - सु. शि बद्दल आपले मत काहीही असो - आम्हाला तो आवडतो - आवडत राहील. अहो 'क्लासेस' आणि 'मासेस' मधे तेवढातरी फरक शिल्लक राहू द्या की. :)

सन्जोप राव 26/05/2008 - 07:15
गावित मास्तरांवर मी लिहिलेली प्रतिक्रिया हे माझे वैयक्तिक मत आहे. मास्तरांचा शीघ्रकोपीपणा, त्यांचे इतर सहकार्‍यांविषयीचे मत (मॅडम, देशमुख मास्तर) यावरुन हे पात्र मला मुद्दाम चितारलेले - उबवलेले वाटले. त्यांच्या भाषेत सलगता नाही. लेखकाने 'कठीन, आनुन, शेन्या' वगैरे शब्द जाणीवपूर्वक मास्तरांच्या तोंडी - त्यांचा ग्राम्यपणा अधोरेखित करण्यासाठी घातले आहेत. पण हेच गावठी मास्तर मधूनच खांडेकरांच्या पात्रांच्या तोंडी शोभावी अशी भाषा बोलून जातात, हे खटकण्यासारखे आहे. शेवटचा जातीयवादाचा उल्लेख तर अगदी प्लॅस्टीकसारखा आहे. या व्यक्तीचित्राचा शेवट कसा करावा याबाबत खुद्द लेखकच गोंधळल्यासारखा वाटतो. पण व्यक्तीचित्रे, त्यातले डोळ्यात पाण्याबिण्याचे उल्लेख आणि एकंदरीतच सानेगुरुजी स्टाईल नोस्टाल्जिया हे वरवरच्या वाचकाला आवडणारे प्रकरण आहे - म्हणून तो चलनी नाण्याचा उल्लेख. व्यक्तिचित्रे ही प्रत्यक्षातली माणसे असलीच पाहिजेत असे नाही. पण ती प्रत्यक्षातल्या माणसांसारखी वाटली पाहिजेत. 'व्यक्ती आणि वल्ली' मधील पात्रे जर तुम्हाला प्रत्यक्षात भेटली तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न पु.लंना विचारला तेंव्हा ते म्हणाले की 'मी त्यांना कडकडून भेटेन!' (यावर 'कुठे पु.लं आणि कुठे आम्ही सामान्य लेखक... कशाला चिकित्सा करताय दादा..आम्हाला चार घटका इथे मजा करु द्या की राव... का डोकं पिकवताय ...असे म्हणणार्‍यांनी खुशाल म्हणत रहावे) 'नंदा प्रधान' पासून 'रावसाहेब' पर्यंत प्रत्येक व्यक्तिचित्रात पु.लंनी आपला मसाला घातला आहेच, पण तो त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ' बांगड्याचा आब राखून तिरफळाने झणझणावे' असा. गाबित मास्तरांच्या बाबतीत मला मसाला फार आणि आत बांगडाच नाही- दाढी हातभर आणि आत बुवाच नाही - असे वाटले. हेच सगळे मी माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत - थोड्याशा सांकेतिक भाषेत लिहिले होते. ( मला जे म्हणायचे होते, ते फक्त मुक्तसुनीतांना समजल्यासारखे वाटते) सुहास शिरवळकरांचा उल्लेखही असाच होता. इथे 'क्लासेस-मासेस' असे वर्गीकरण करण्याचा प्रश्नच नाही. प्रश्न असा आहे, की हे सगळे का लिहावे? किंवा इतका विचार तरी का करावा? तर यात लेखकाच्या लेखनकष्टाला मान देण्याचा भाग आहे. लेखक ज्या गंभीरपणे लिहितो, त्याच गंभीरपणे वाचकाने ते वाचले पाहिजे. आणि आपल्याला जे वाटते, ते स्वतंत्रपणे लिहिले पाहिजे. एकंदरीत संकेतस्थळांवरील लिखाणाचा शब्दढाळ पहाता प्रत्येक लेखकाच्या बाबतीत हे शक्य आहे असे नाही, पण 'पिडां' सारख्या लेखकाचे लेख, अगदी त्यांच्या प्रतिक्रिया, मुद्दाम वाचण्यासारख्या असतात - आवडणे , न आवडणे हा वेगळा भाग झाला - म्हणून इतका खटाटोप. नाहीतर उथळ व्यक्तीचित्रांची आणि त्यांना फेटे, रुमाल उडवत 'माशाल्ला, सुभानल्ला' म्हणणार्‍यांची वानवा नाही. त्यांनी - शिरवळकर वाचणार्‍यांप्रमाणे - तसे करत रहावे. ते तसे करत असतातच. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 26/05/2008 - 11:01
पण व्यक्तीचित्रे, त्यातले डोळ्यात पाण्याबिण्याचे उल्लेख आणि एकंदरीतच सानेगुरुजी स्टाईल नोस्टाल्जिया हे वरवरच्या वाचकाला आवडणारे प्रकरण आहे - वरवरचा वाचक? हा काय नवीन प्रकार आहे हो राव साहेब? :) आपला, (खालखालचा वाचक) तात्या साने.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 26/05/2008 - 11:19
नविन प्रकार नाही तात्या. मागे कधीतरी सर्किट काकांनी ह्यावर संशोधन केलेले होते बघा.. लेख प्रकाशित झाल्यावर अर्ध्या मिनिटाच्या आत लेंड्यासारखे वा!वा! प्रतिसाद टाकणारे म्हणजेच 'वरवरचे वाचक' बहुदा! -कोलबेर वरकरणी :)

विजुभाऊ 26/05/2008 - 10:43
शिरवळकर वाचणार्‍यांप्रमाणे =)) जी ए चा जसा वाचक वर्ग आहे तसाचह तो सु शीं चा ही आहे. जी ए वाचणारे हे सु शी वाचणारांपेक्षा जास्त साहित्यीक पुढारलेले आणि सु शी वाचणारे मागासलेले अस लोकंचा एक दांभीक समज आहे. कोणी चांगल्याला चांगले म्हंटले तर त्यात वाईट काय. सौंदर्य हे सौंदर्य असते . त्यात जात पात आणु नये क्लासेस आणि मासेस या जाती निदान मासेसच्या तरी डोक्यात नाहीत मासेस ना जे आवडते ते क्लासिक नसते हा आणखी एक प्रचलीत समज. सु शी वाचणारे निदान त्या वाचनाचा आनन्द लगेच घेऊ शकतात.

In reply to by विजुभाऊ

कोलबेर 26/05/2008 - 11:23
खरं आहे.. डेव्हिड धवनचे चित्रपट पाहणारे म्हणजे मागासलेले आणि सत्यजित रे ह्यांचे चित्रपट बघणारे म्हणजे पुढारलेले असला एक दांभिक समज देखिल आहे. सरकायलो खटीया बघताना जो लगेच आनंद मिळतो त्याचे काय?

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 26/05/2008 - 11:48
डेव्हिड धवनचे चित्रपट पाहणारे म्हणजे मागासलेले आणि सत्यजित रे ह्यांचे चित्रपट बघणारे म्हणजे पुढारलेले असला एक दांभिक समज देखिल आहे. वरील वाक्य वाचून एक विचार मनात आला तो इथे मांडत आहे - मी पुढारलेला की मागासलेला, तसेच क्लासेस मधला की मासेस मधला हे मला माहीत नाही आणि माहीत करून घ्यायची गरजही नाही, परंतु सत्यजित रे चे एकापेक्षा एक बोअर अन् कंटाळवाणे सिनेमे पाहण्यापेक्षा डेव्हिड धवनचे सिनेमे कितीतरी चांगले वाटतात आणि छान टाईमपास करणारे असतात असं माझं व्यक्तिगत मत आहे! सरकायलो खटीया बघताना जो लगेच आनंद मिळतो त्याचे काय? त्या उत्तान गाण्यातील करिश्माच्या कामूक हालचाली पाहून साली वासना अंमळ चाळवते एवढं मात्र खरं! उगीच खोटं कशाला बोला?! अर्थात, हेही माझं व्यक्तिगत मत! :) आपला, तात्या धवन..

In reply to by विजुभाऊ

जाउ द्या ना पाटील, कशाला मनावर घेऊन राह्यले, चालायचच. :) कोणाला एखांदा लेखक लै भारी वाटतो, अन् एखांदा लेखक लै फालतू लिव्हतो अस्स बी वाटू शकतं. खरं म्हण्जी काही लोकायले वाटते, आपून जे वाचतो ते सा-यात भारी वाचतो, अशा भ्रमामधी फिरत राहत्यात ती लोकं . खरं म्हण्जी अशाच समीक्षकायनी मराठीत काही लिहू पाहण्या-या, लिव्हणा-या लेखकाची पीढीच बर्बाद केली, अस्स वाटून जातं. नवं काही लिव्हण्याची हिम्मत गमावून बसलेत लेकाचे. खरं म्हण्जी इथं हाटेल म्हणल्यावर लै येगयेगळ्या गुणाचं लोक येत राहतीन, काही लोकांमधी गूण जसे राहतेत तसे दोष बी अस्तेन का नाय. खरं म्हणजी तुम्ही लोकं अस्सं दांगडू घालतेत म्हुन मिसळपाववरुन माणसाचं मन उडून जातं अशी तक्रार दुस-या गावात वाचाला मिळते ना भो !!! मिसळपाव खेडूत (रोहिण्या बरसल्या नै म्हणुन नाराज मिसळगावचा शेतकरी )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर 26/05/2008 - 11:57
खरं म्हण्जी अशाच समीक्षकायनी मराठीत काही लिहू पाहण्या-या, लिव्हणा-या लेखकाची पीढीच बर्बाद केली, अस्स वाटून जातं. नवं काही लिव्हण्याची हिम्मत गमावून बसलेत लेकाचे
. डागदर सायेब असल्या समीसक्षकांच्या समीक्षा वाचुन शान हिम्मत गमावुन बसलेली पुचाट पीढी बरबाद झालेलीच बरी की राव!

In reply to by कोलबेर

डागदर सायेब असल्या समीसक्षकांच्या समीक्षा वाचुन शान हिम्मत गमावुन बसलेली पुचाट पीढी बरबाद झालेलीच बरी की राव! काही का इशय असेना पण लिव्हणा-याची पीढी बर्बाद झाली तर चालते, पण समिक्षा जीवंत राह्यला पाहिजे, असे म्हणाचे का आपल्याला. मंग काय बोलु भौ आता !!! -पुचाट लेखक डागदर बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर 26/05/2008 - 19:55
व्ह्यय! असलं पन्नास समीक्षक आन त्यांची समीक्षा पचवायची हिंमत असेल तरच लिवनार्‍यांची पीढी बरबाद न होता फुडं जाईल.. समीक्षा जिवंत राहीलीच पाहिजे...पण प्रसंगी मुक्तसुनित ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे त्यातले वक्रोक्तीचे काटे बाजुला करुन आपले वर्म ओळखुन पुढे जाता आले पाहिजे.. बरबाद होणे सोपे आहे!

In reply to by कोलबेर

असलं पन्नास समीक्षक आन त्यांची समीक्षा पचवायची हिंमत असेल तरच लिवनार्‍यांची पीढी बरबाद न होता फुडं जाईल.. हा, हे बाकी खरच बोलला की राव, पण अशी हिम्मत किती लोकामधी हाये हे आधी सांगा !!! साहेब, तुम्ही इशय काढला म्हुन सांगतो, आमच्या गावाकडं ग्रामीण साहित्यातला एक लै मोठा लेखक त्याचं नाव 'बंकट पाटील' त्याची दहा, बारा पुस्तकं प्रसिद्ध हायेत. एकापेक्षा एक जोमदार लिव्हले. पण तुमच्या या समिक्षकायनी त्यायच्या लेखनाकडे पार डोळेझाक केली. आता कुठं कुठं ऐकतो आम्ही त्यायचे नाव ग्रामीण साहित्याचा आढावा घेतांना. पर ते जीवंत असतांना अस्स सूख नाय मिळालं तेन्ला. तरी बी ते लिव्हीत गेलेच, लोकायनी तेन्ला मोठं केलं !!! जाउ द्या, आधीच ह्यो इषय लै पांगला बोला दुसरं काही तरी !!! :)

सन्जोप राव 26/05/2008 - 10:58
जी ए चा जसा वाचक वर्ग आहे तसाचह तो सु शीं चा ही आहे. जी ए वाचणारे हे सु शी वाचणारांपेक्षा जास्त साहित्यीक पुढारलेले आणि सु शी वाचणारे मागासलेले अस लोकंचा एक दांभीक समज आहे. इथे जी.एं. चा उल्लेख करण्याचे प्रयोजन स्पष्ट आहे. पण हे 'पुढारलेले' व 'मागासलेले' हे वर्गीकरण कुणी केले हे स्पष्ट झाले तर बरे होईल. हा दांभिक समज असणारे 'अस लोकं'- पक्षी असे लोक - कोण हेही कळाल्यास बरे. 'क्लासेस आणि मासेस' हा मुद्दा श्री. वाचक यांनी उपस्थित केला आहे, त्यामुळे तेच त्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील, असे वाटते. मासेस ना जे आवडते ते क्लासिक नसते हा आणखी एक प्रचलीत समज. असहमत. मराठी साहित्यात ढीगभर उदाहरणे आहेत. इंग्रजीत ताबडतोब आठवणारा वुडहाऊस आहे. हिंदीत प्रेमचंद, बच्चन, महादेवी वर्मा, हरीशंकर परसाई आहेत. अमोल पालेकर, जब्बार पटेलांचे सिनेमे आहेत, वळू आहे, टिंग्या आहे, बिमल रॉय, गुलजार, हृषीदा आहेत... ही न संपणारी यादी. त्यामुळे हा असलाच तर गैरसमज आहे. सु शी वाचणारे निदान त्या वाचनाचा आनन्द लगेच घेऊ शकतात. खरे आहे. सु.शि. सोडून इतर वाचणारेही त्या त्या वाचनाचा लगेच - लगेच म्हणजे काय कुणास ठाऊक- आनंद घेऊ शकतातच. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 26/05/2008 - 11:08
लगेच म्हणजे काय कुणास ठाऊक अहो राव साहेब, लगेच म्हणजे शब्दश: लगेच! जी ए वाचून समजायला, आनंद व्हायला जसा बराच वेळ लागतो तसा न लागता लगेच आनंद मिळतो अश्या अर्थाने बहुधा विजूभाऊंना 'लगेच' असं म्हणायचं असावं! ;) बाय द वे, सुशी आणि चंका या नावांची निदान मला तरी ऍलर्जी आहे हे या निमित्ताने नमूद करू इच्छितो. बाकी चालू द्या... :) आपला, तात्या कुलकर्णी.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 26/05/2008 - 11:15
जी ए वाचून समजायला, आनंद व्हायला जसा बराच वेळ लागतो तसा न लागता लगेच आनंद मिळतो अश्या अर्थाने बहुधा विजूभाऊंना 'लगेच' असं म्हणायचं असावं!
हे कुणी सांगीतलं? जी एं च्या कथांमधील काही काही वाक्य इतका आनंद देऊन जातात की अक्षरशः पुस्तक बंद करुन सावकाश पणे मनात ती वाक्ये घोळवुन पुढे जावेसे वाटते. आणि तात्या, तसेही असल्या इन्सटंट आनंदाचे तुम्ही कधी पासुन पुरस्कर्ते झालात? अहो गाण्यात आणि खाण्यात (लिखाणातही?) काहीही इन्स्टंट नसते हो!

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 26/05/2008 - 11:30
कोलबेरराव, हे कुणी सांगीतलं? कुणीच नाही! कदाचित विजूभाऊंना तसं वाटत असावं असा आपला माझा अंदाज! तेव्हा चूभूदेघे! :) आणि तात्या, तसेही असल्या इन्सटंट आनंदाचे तुम्ही कधी पासुन पुरस्कर्ते झालात? इन्सटंट आनंदाचा मी पुरस्कर्ता झालोय असं मी कुठे म्हटलंय? मी फक्त विजूभाऊंना काय वाटत असावं याचा अंदाज बांधून रावसाहेबांना उत्तर दिलं आहे. कदाचित, विजूभाऊंना तसं वाटत नसेलही! तेव्हा पुन्हा चूभूदेघे! :) अहो गाण्यात आणि खाण्यात (लिखाणातही?) काहीही इन्स्टंट नसते हो! मला याची पूर्ण कल्पना आहे, तरीही माहितीबद्दल धन्यवाद! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 26/05/2008 - 11:46
मला याची पूर्ण कल्पना आहे, तरीही माहितीबद्दल धन्यवाद!
अर्थातच!! तुमचेच वाक्य आहे ते :) (लिखाणातही?) ही फक्त माझी ऍडीशन.. ;)

In reply to by विसोबा खेचर

:P अहो गाण्यात आणि खाण्यात (लिखाणातही?) काहीही इन्स्टंट नसते हो! मला याची पूर्ण कल्पना आहे, तरीही माहितीबद्दल धन्यवाद! खाण्यात तर इंस्टंट आनंद असतोच की. :) आता बघा तिखटजाळ सँपलमधे नुसता पावाचा तुकडा बुडवून नुसता बघा. त्या पावावर अशी काही लाली चढलेली असते, आहाहाहा. अगदी गालावरच्या गुलाबी लालीएवढीच ही पण लाली आकर्षक असते. इंस्टंट आनंद आहे की त्यात. कदाचित रस्सा आणि मिसळ बनवण्यात कष्ट असतील पण खाण्यातला आनंद किंवा दु:ख आहे की इंस्टंट. राहीला गाण्यातला इंस्टंट आनंद. 'इंद्रायणी काठी', 'रम्य ही स्वर्गाहून लंका', 'बगळ्यांची माळ' ,गीत रामायणातील हरएक गाणे. आहेत की इंस्टंट आनंद देणारी. (गाण्यातले काही न कळणारा खादाड) पुण्याचे पेशवे

कोलबेर 26/05/2008 - 11:29
व्यक्तिचित्र आवडले. खास शैलीत कथेतील इतर पात्रं आणि सुत्रधार रंगवायची हातोटी वखाणण्याजोगी. पण शेवट मात्र थोडास ऍब्रप्ट आणि कृत्रिम वाटला. तरीही दुरावा पेक्षा हे कथानक जास्त आवडले हे नक्की. अब्दुल खान > गावित मास्तर > दुरावा. अवांतर : उद्गारवाचक चिन्हांचा थोडासा अतिरेक झाल्यासाराखा वाटतो!!!!!

विजुभाऊ 26/05/2008 - 12:08
मला लेख आणि त्यासंदर्भात नसलेली वरील चर्चा वाचुन अधुनमधुन लगेच आनन्द मिळाला

सुमीत 26/05/2008 - 16:10
गावित मास्तर आवडले, जर हा लेखाचा काळ मागील १५ ते २० वर्षे गृहित धरला तरी आता सुद्धा समाजातील जातीं मधला उच्च आणि नीच वर्गीकरण बदललेले नाही.

वाचक 26/05/2008 - 17:51
सर्व साधारण पणे साहित्यिक क्षेत्रात एकमेकांच्या साहित्यावर स्तुती / टीका होताना दिसते. ते साहजिकच आणि अपेक्षितही आहे. पण 'रहस्य कथा' लिहिणार्‍यांकडे तसे उपेक्षेनेच बघितले जाते ही वस्तुस्थिती आहे. अर्थात ह्याला बर्‍याच प्रमाणात रहस्य्कथा लेखकच कारणिभूत आहेतच पण ओल्याबरोबर 'सुकेही' जळते ह्या न्यायाने ' त्या उडिदात जे काही गोरे' होते त्यांच्या कडे दुर्लक्ष झाले (किंवा मुद्दाम केले गेले). सर्व सामान्य वाचकाचे मागणे लई नसते. थोडी फार करमणू़क, विरंगुळा एवढाच माफक हेतू असतो. आणि 'रहस्य कथेत' ही मागणी अगदी चोख पुरवायचा प्रयत्न केलेला दिसतो (अगदी ढापून सुद्धा). त्यामुळे 'समिक्षकही' ह्या साहित्याची दखल घेण्याच्या सुद्धा भानगडीत पडत नाहीत. पण त्याच्यातच जर कोणी धाडस दाखवून वेगळे प्रयोग जर केले असतील तर त्याची मात्र उपेक्षा (क्वचित टिंगलच) होते. सु. शि. ने अनेक वेगळे प्रयोग केले आहेत - बरेच फसले - काही जमले - पण जेव्हा जमले तेव्हा त्याच्या पाठीवर कुठलीही कौतुकाची थाप पडली नाही - कारण का - तर तो सर्व सामान्यांना आवडेल असे 'रहस्य कथा लेखन' करतो. कितिही नाकारले तरी कुठल्याही प्रस्थापित साहित्यिकाने 'ह्या प्रकारच्या' लेखकांबद्दल कुठलीही आपुलकी, (साधा उल्लेख) केल्याचेही आढळात नाही. नाही म्हणायला पु. लं नी बाबुराव अर्नाळकरांवर एक लेख लिहिला होता. मी म्हणतो तो क्लासेस आणि मासेस मधला तथाकथित फरक तो हाच - बहुसंख्य जनतेला आवडते ना - मग करा त्याची उपेक्षा - अपवाद आहेतच वरती दिल्या प्रमाणे - पण जे अपवाद वरती नोंदवले गेले आहेत त्यांच्या समिक्षकांनी त्यांच्या त्यांच्या काळात त्यांना झोडपलेच होते - नंतर त्यांचे विचार बदलले असतीलही - आणि जनतेने सु. शि ल कधीच स्वीकारले आहे, समिक्षक किंवा तथाकथित साहित्यिक कधी स्वीकारणार का हाच प्रश्न आहे.

In reply to by वाचक

धमाल मुलगा 26/05/2008 - 18:10
वाचकराव, जियो! अगदी खरं बोललात. रहस्यकथा लेखकांबद्द्ल..पर्यायाने आमच्या सु.शि.बद्द्ल इतकं छान पहिल्यांदाच वाचलं. बरं वाटलं :)

धमाल मुलगा 26/05/2008 - 18:07
गावित मास्तर भारीच हो !
"अरे गाढवा! मला ते वाचून बघितलं पायजेल ना! त्याशिवाय चित्रासाठी विषय कसा निवडनार? का हेमामालिनीचं चित्रं काढून हवेय तुला?" मास्तर वैतागले...
:))
एक होती पवाडा गाण्यार्‍या शाहिराची!! अगदी मर्‍हाट्मोळा पोशाख! डफ आणि फेट्यासकट!! आणि चेहर्‍यावर अगदी बाबासाहेब पुरंदर्‍यांचा आवेश!!! दुसरी होती नऊवारी नेसलेल्या, बोटांत पदर उंचावलेल्या मराठमोळ्या तमाशा नर्तिकेची!! चेहरा वेगळा होता पण भाव अगदी जयश्री गडकरच्या "बुगडी माझी सांडली ग!" मधला!!!!
आय हाय!!!!! दोन पुर्णतः वेगवेगळ्या भावमुद्रा श्रवणभक्तिच्या धुंदीत एकाच वेळी साकारणारे गावित मास्तर भारीच की. आणि चित्राचं वर्णनही अप्रतिम. :) आवडल बॉ आपल्याला. अवांतरः काही क्षण विचार केला, वरची चर्चा वाचून भांबावून गेलो. लेख तर आवडलाय. प्रतिक्रिया काय द्यावी कळेना. लेखाला 'नाही आवडला' म्हणून विद्वानांच्या पंक्तित बसावं (स्वत:ची ती काडीमात्र लायकी आणि अभ्यास नसताना) की मनमोकळेपणानं दाद द्यावी? .......शेवटी आमच्या सर्वसामान्यपणानं उचल खाल्ली आणि मनाच्या गाभ्यानं दिलेला कौल आम्ही आचरणात आणला. :) अति अवांतरः सु.शि. आमचा आवडता लेखक. लाख त्यानं इंग्रजी कथांची भाषांतरं केली असतील, पण त्याच्याइतक्या ताकदीनं मराठीत रहस्यकथा सादर करणं अजुनतरी कोणाला जमलं असेल असं वाटत नाही. असल्यास मला माहित नाही. हे आपलं स्वतःचं वैयक्तिक मत. कोणाला पटावं असा अट्टाहास मुळीच नाही :)

विजुभाऊ 26/05/2008 - 19:13
रहस्य कथा लेखकांत पेरी मॅसन , आर्थर कोनन डॉइल. यांचेलेखन खरेच चांगले आहेत. गुरुनाथ नाईक ष्टाईल बाज आहेत. सु शी ची दुनियादारी ज्याने वाचली त्याला त्यंचे वेगळेपण जाणवते. जी ए चा एक विवक्षीत वाचक वर्ग आहे. तो वर्ग जी एंच्या गाभुळलेल्या लेखन शैलीतुन कधी बाहेरच येत नाही. जी ए नी जर एखादी श्रुंगारीक कथा लिहिली तरी ते तिचा शेवाळी हिरवा स्पर्ष आणि आणि रीकाम्या गडग्यात किणकिणार्‍या खडयांसारख्या वाजणार्‍या बांगड्या त्याला एक वेगळीच जाणीव करुन देत होत्या . त्याच्यातील श्वापद हळुहळु जागे होऊ लागले. त्याने जड हातानेच तिचा हात हातात घेतला. तिच्या सर्वांगातुन कसलीशी शहारलेली जाणीव धावत गेली. मणामणाचे ओझे उचलावे तसा तिचा श्वास तिलाच जड झाला. घशातुन कसलासा खरवडलेला आवज उमटवुन तिने त्याच्या कडे पाहीले. मांजर फिस्कारावे तसा तो तोंडभर हसला असे लिहितील ही त्यांची ष्टाइल चाहत्याना आवडुन जाते. मला पिंजरा चित्रपतातील एक वाक्य आठवते "मास्तर तुमी ज्याला यौवन म्हणता त्याला आमी ज्वानी म्हणतो " आणि कुठल्याशा हिंदी पिक्चर मधले हे वाक्य ही " तुम्हारे बडे होने से मै छोता नही हो जाता" प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे उगाच सुपारी ची तुलन पेढ्याशी करु नका

In reply to by विजुभाऊ

कोलबेर 26/05/2008 - 19:59
प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे उगाच सुपारी ची तुलन पेढ्याशी करु नका
धन्यवाद! हेच जर १५-२० प्रतिसादांपूर्वी तुम्हाला माहित असते तर इथे जीए आणि सुशी आलेच नसते. असो लेखाशी संबधीत नसलेल्या ह्या चर्चेने तुम्हाला 'लगेच आनंद' तरी मिळाला...तसा आम्हीही घेतला;) )

In reply to by कोलबेर

विकेड बनी 26/05/2008 - 21:47
हेच जर १५-२० प्रतिसादांपूर्वी तुम्हाला माहित असते तर इथे जीए आणि सुशी आलेच नसते
आरं माज्या! येकाद्याची बाजू घिऊन ब्वालायला हरकत नस्ती रं पन आपन बरुबर ब्वालतोय का त्ये तरी पगावं. आरं, साने गुर्जी, वपु आलं म्हनून जीए आलं, जीए आलं म्हनून सुशी आलं. काय हाय की काई लोकांना सवय जाली हाय... दिसली जागा की काड वपु भायीर, दिसली जागा की काड साने गुर्जी भायीर मग लोक पन जीए भायीर काडतात.

In reply to by विकेड बनी

कोलबेर 26/05/2008 - 21:54
आरं, साने गुर्जी, वपु आलं म्हनून जीए आलं, जीए आलं म्हनून सुशी आलं.
त्येच तर म्हनतोय राजा मी ..१५-२० प्रतिसादांपूर्वी सानेगुर्जी/ वपु आलं तेव्हाच म्हणायच ना पेढ्याची तुलना सुपारीशी कशापायी? का आपलं जीए सुशी काडायचं? तू पन ल्येका 'सबसे तेज' वाल्यांसारखाच दिसतोस!! :) आरं, साने गुर्जी, वपु आलं म्हनून जीए आलं, जीए आलं म्हनून सुशी आलं....आणि शेवटी सगळंच अंगावर आलं, म्हणून पेढा आणि सुपारी पण आले हा हा हा!!!

In reply to by कोलबेर

आता असे बघा. ही भरकटलेली चर्चा सुरू झाली ती वरील लेखावर समिक्षकी पद्धतीने टिका करून चलनी नाणे वगैरे म्हणल्यामुळे, पुढे ती भरकटली. जशी काही समिक्षकाना ती आवडली नाही तशी काहीना ती आवडली. त्यामुळे टिकेला प्रत्युत्तर आणि प्रतुत्तराला प्रत्युत्तर अशा प्रवासातून चर्चा भरकटली. कदाचित प्रत्येकाची असते आवड निरनिराळी. एखाद्याला पेढ्यापेक्षा असेल सुपारी जास्त आवडत पण एखादे मत जाहीर व्यक्त झाले की चर्चा सुरू होणारच. आता तुम्ही म्हणता त्येच तर म्हनतोय राजा मी ..१५-२० प्रतिसादांपूर्वी सानेगुर्जी/ वपु आलं तेव्हाच म्हणायच ना पेढ्याची तुलना सुपारीशी कशापायी? का आपलं जीए सुशी काडायचं? तू पन ल्येका 'सबसे तेज' वाल्यांसारखाच त्याऐवजी पेढा आणि सुपारीत तुलना न करता जर समिक्षकी मत जर प्रस्तुत लेखकाला पोष्टकार्ड पाठवून सांगता आले असते. आता मी या डांबिसकाकाच्या लेखनाचा पंखा आहे ,त्यामुळे जर कोणी जाहीर टीका केली डांबिसकाकाच्या लेखनावर तर त्याला माझ्या परीने मी उत्तर देईनच ना! मग हा पेढा आणि सुपारीतला फरक प्रस्तुत टिकाकार स्वतः जाणत नव्हते का? आणि तो त्याना आणि त्यांच्या बाजूने चर्चा करणार्‍याना नव्हता का कळत? असाल तुम्ही पेढेवाले. सोडूने द्यायचे होते हे लेखन सुपारीवाल्याचे आहे म्हणून. दुसर्‍याला नुसते डोस पाजायचे, अगदी उच्च अभिरुचिचे रसिक म्हणून मिरवायचे, आचरणात आणा ना आधी एखादी गोष्ट. पुण्याचे पेशवे

शितल 27/05/2008 - 18:24
गवीत मास्तर छान उतरवले आहेत, आणि त्याच्या मनातील भावना ही छान मा॑डली आहे.

धनंजय 27/05/2008 - 18:29
कथेचा आशय आवडला. काही प्रमाणात साचेबद्ध होती, हे वरील काही प्रतिसादांतले मत पटते. चित्रकलेच्या बाई अनावश्यकपणे एकसुरी भडक वाटल्या, पण लघुकथेत कधीकधी असे सुलभीकरण चालायचेच. कोणाच्याही विशेष बोलीची ढब (म्हणजे त्या बोलीतली शुद्धताच ती!) काटेकोरपणे पाळण्यात कसब महत्त्वाचे. नाहीतर सत्याचा आभास भंगतो, हे म्हणणे खरेच आहे. पण या कथेत अशी उदाहरणे थोडीच दिसतात. असले बारीकसारीक दोष पुढच्या आवृत्तीत सहज सुधारण्यासारखे आहेत. सारांश : कथेचा आशय मला आवडण्यासारखा आहे.

वरदा 27/05/2008 - 18:55
आवडला हा लेख काका..मस्त लिहिलाय्...दोन वेगळी रुपं एकाच माणसाची..सुरेख वर्णन केलयत....

चतुरंग 27/05/2008 - 19:57
मतमतांतरांचा उडालेला धुरळा डोळ्यात जाऊन सुरुवातीला मूळ कथा नीट दिसेना त्यामुळे आज निवांत वाचून प्रतिक्रिया देतोय. :) कथा चांगली आहे. पात्र रंगवण्याची हातोटी तुम्हाला साधली आहे. कथेचा गाभा चंगला असला तरी बांधणी थोडी विसविशीत वाटली कारण कथेची सुरुवात करताना शेवट कसा करणार हे नक्की नसावे असे एकूण लिखाणावरुन वाटले. शेवट काही वेगळा, अधिक नाट्यपूर्ण, करता आला असता तर कथा ठरीव साचाच्या बाहेर पाऊल ठेवणारी आणि अधिक कसदार होऊ शकली असती असे वाटते. थोडी अधिक मेहनत तुमच्यातला उत्तम लघुकथा लेखक आकाराला आणेल असे वाटते. पु.ले.शु. (स्वगत - असं भडकमकर मास्तरांच्या क्लासमधून शिकून आल्यासारखं परीक्षण कधीपासून लिहायला लागलास रे तू रंगा? ;) ) चतुरंग

मी-सौरभ 06/04/2012 - 09:57
पिडां काकांच एक सुरेख व्यक्तिचित्र नविन वाचकांसाठी वर काढतोय :)

"आपलं हस्तलिखित आता चांगलं तयार होत आलंय! तू बरेच श्रम घेतलेले दिसताहेत" आमचे मराठीचे देशमुख सर मला म्हणत होते... "होय सर! कथा, लेख, कविता सगळं जमलंय. आता मुखपृष्ठ ठरलं की झालं" "आणि तुझं संपादकीय?" "ते सुद्धा पुरं होत आलंय" "बरं, मुखपृष्ठाचं काय करणार?" "गावित मास्तरांनी काढलेलं एखादं चित्र टाकावं म्हणतोय" मी "तुला वाटतं तो चित्र काढून देईल?" "विचारायला तर काय हरकत आहे" "असं म्हणतोस? ठीक आहे, बघ विचारून! पण सांभाळून हो, दुर्वास आहे तो साक्षात!!" मला हसू आलं. देशमुख सरांनीही स्मित केलं आणि मला प्रेमळपणे म्हणाले, "तुला अगदीच मारायला उठला तर माझं नांव सांग!

"वर्जेश ईश्वरलाल सोलंकीच्या कविता"

मुक्तसुनीत ·

विसोबा खेचर 24/05/2008 - 06:57
वाटलं आता ओढला जाईन की काय ? फोलपटासारखा फरशीवरल्या धुळीबरोबर. ओहोहो! खल्लास...! पण त्यात टिपलेली विसंगती , आपल्या आयुष्यातील साध्यासुध्या गोष्टींमधे माणसांपेक्षा वस्तूंना आलेले महत्त्व या गोष्टी नजरेआड कशा होतील. सहमत..! मुख्य म्हणजे अगदी नेहमीच्या आयुष्यातल्या संवादांसारखी कविता. ना त्यात कसला अभिनिवेश ना प्रतिमा-उपमांचा सोस. अगदी खरं! की आपलं लिहीणं म्हणजे बापाच्या शब्दात एकंदर भिकारचोटगिरीची प्राथमिक लक्षणं की कपाटामागं उंदरानं सोडलेल्या लेंड्या की उगाच आतलाबितला आवाज/हुक्की / उत्कटता की शब्दांचा उभाआडवा कीस/फापटपसारा की फलाणा-ढिकाणा. हा हा हा! सह्हीच करून टाकली आहे! अगदी जोड्यानेच मारलं आहे म्हणा ना! :) 'भिकारचोटगिरीची प्राथमिक लक्षणं' आणि 'कपाटामागं उंदरानं सोडलेल्या लेंड्या' हे तर खासच! :) आमचा वर्जेश सोलंकी साहेबांना सलाम! अवांतर - १ 'भिकारचोट' ह्या आमच्या अत्यंत लाडक्या शिवीचा कवीने फार सुरेख वापर केला आहे! :) अवांतर - २ खरं तर मिपावर मिपाबाह्य व्यक्तिंच्या साहित्याला बंदी आहे. मिपाबाह्य व्यक्तिंचे साहित्य मिपावर जर द्यायचेच असेल तर त्यात स्वत:चीही काही चांगल्या दर्जाची आस्वादात्मक भर हवी, अशी मिपाची अट आहे. सोलंकी साहेबांच्या कविता येथे देऊन मुक्तरावांनी स्वत:ही त्यावर काही उत्तम आस्वादपर भाष्य करून ही अट पाळली आहे याचे विशेष कौतुक वाटते! अवांतर - ३ 'भिकारचोटगिरीची प्राथमिक लक्षणं' हे शब्द आठवून अजूनही हसतो आहे! =)) आपला, (शब्दांचा उभाआडवा कीस/फापटपसारा मांडणारा एक भिकारचोट नवकवी!) तात्या. :)

चतुरंग 24/05/2008 - 09:00
दरवाजा सताड उघडून बाहेर जावं आणि तुफान येणारे थेंब तोंडावर घेऊन एकदम फ्रेश व्हावं तसं वाटलं! नेहेमीच्याच आयुष्यातल्या कल्पना पण वेगळ्या जाणिवेनं मांडल्या त्यामुळेच असावं. ही ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद मुक्तसुनीत! चतुरंग

सन्जोप राव 24/05/2008 - 10:27
'अंतर्नाद' च्या एप्रिल २००८ च्या अंकात वर्जेश सोलंकींच्या काही सुंदर कविता आहेत. त्यातली एकच इथे देतो: आपल्या खिशातल्या पाकिटात आपल्या खिशातल्या पाकिटात काय असतं उदाहरणार्थः संपत आलेला रेल्वेपास कामाची व बिनकामाची व्हिजिटिंग कार्डस, रेव्हेन्यू स्टँपस, रबर बँडस बँकेचा हप्ता भरल्याची रसीद साईबाबाचं कवरेज असलेलं चालू वर्षाचं छोटेखानी कॅलेंडर कालौघात गेलेलें पाच पैशाचं नाणं बसतिकिट आणि त्यामागं घाईघाईनं लिहून घेतलेला मित्राचा फोन कॉल व इ मेल ऍड्रेस आईनं श्रद्धेनं ठेवायला लावलेली भस्माची पूड लोकलच्या गर्दीतही सुचलेल्या कवितांचे काही चिटकोर कॉलेजच्या जमान्यातला गालफडं आत गेलेला स्वतःचा पासपोर्ट साईजचा पिवळा पडलेला स्वतःचा फोटो अन पाकिटाच्या एका कोपर्‍यात निपचिप पडून असतं नियतीशी उन्नीसबीस करीत घालवलेलं सडकछाप आयुष्य नव्याकोर्‍या शर्टवर पडलेल्या डाळीच्या डागासारखं या कवितेतल्या काही प्रतिमा - नियतीशी उन्नीसबीस, शर्टावरचा डाळीचा डाग - मला फार मजेशीर वाटल्या. याच अंकात या कवीच्या काही जाहीरातींच्या कविता आहेत. त्यात फक्त वेगवेगळ्या जाहिराती एकमेकासमोर मांडल्या आहेत. पण ती मांडणी फार आकर्षक आहे. अरुण कोलटकरांच्या कवितांची आठवण करुन देणारी. सन्जोप राव

दंभकुठार 24/05/2008 - 11:29
माझ्या मते , हे सर्व कवी आपल्या मुळांपासून भरकटलेले असून ,केवळ गटबाजीच्या जोरावर या टोळक्यातल्या कवींची दुकाने सुरू आहेत्. स्वतःच्याच मासिकांतून स्वतःच्याच मुलाखती छापणे,विविध फाऊंडेशनांची बक्षीसे मिळवणे ई .प्रकारांमध्ये तरबेज असणार्‍या शब्दजुळारर्‍यांचा हा एक गट आहे...साठोत्तरी पिढीतील साहित्यिक राजकारणात तरबेज असलेल्या काही कवींच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व ढोंग सुरू आहे...

In reply to by दंभकुठार

मुक्तसुनीत 24/05/2008 - 11:56
दंभकुठार यानी मूळा कवितेबद्दल कसलेही भाष्य न करता काही मते वर मांडली आहेत. कविबेद्दल बरे वाईट बोलणे न बोलणे हा शेवटी त्यांचा व्यक्तिगत प्रश्न ठरतो (मूळ विषयाबद्दल काहीही न बोलणे हे जरी विपर्यस्त असले तरी.) बाकी त्यांच्या मतांचा निश्चितपणे उहापोह करता येईल. एखाद्या गोष्टीवर इतक्या तीव्रतेने टीका करायची तर मग त्याबाजूने मुद्दे मांडणे आवश्यक ठरते. नाहीतर मग ते अरण्यरुदन ठरते. त्यांच्या टीकेमधे मला खालील मुद्दे दिसतात : १. वर्जेश सोलंकी हे एक व्यक्तिगत काम करत नसून , कवींच्या एका "गटाचा" भाग म्हणून काम करतात. - हा "गट" कुठला, काय याबद्दल दंकु यानी लिहिल्यास उत्तम. २. हे सर्व कवी आपल्या मुळांपासून भरकटलेले आहेत. - म्हणजे नक्की काय ? कशापासून भरकटले आहेत ? ३.केवळ गटबाजीच्या जोरावर या टोळक्यातल्या कवींची दुकाने सुरू आहेत्. - कृपया आणखी प्रकाश टाकावा. ४. स्वतःच्याच मासिकांतून स्वतःच्याच मुलाखती छापणे,विविध फाऊंडेशनांची बक्षीसे मिळवणे ई .प्रकारांमध्ये तरबेज असणार्‍या शब्दजुळारर्‍यांचा हा एक गट आहे... - विविध फाउंडेशनची बक्षिसे ही दाऊद इब्राहिम सारखी खंडणी वसूल केल्यासारखी त्यानी केली नसावीत असा माझा प्राथमिक अंदाज आहे. अधिक-उणे दंकु याना ठावे. प्रत्येक कवी शब्द जुळवतोच नि प्रत्येक संगीतकार स्वर-मेळ करतो (स्वर जुळवतो) . याहून अधिक-उणे दंकु याना ठावे. ५. साठोत्तरी पिढीतील साहित्यिक राजकारणात तरबेज असलेल्या काही कवींच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व ढोंग सुरू आहे... -बापरे. केव्हढे तरी गुंतागुंतीचे विधान. माझी अशी प्रार्थना आहे की दंकुसाहेबानी आम्हाला समजेल अशा भाषेत , काहीशा सोप्या पायर्‍यांमधे मुद्दे मांडावेत. त्यांचा यथायोग्य परामर्श घेणाचा प्रयत्न केला जाऊ शकेल. घाऊक भावाने केलेली सरसकट विधाने शेवटी "बाराच्या भावात" जाण्याची शक्यता असते म्हणून हा प्रतिसादाचा प्रपंच.

आम्हाला तर दोनही कविता आवडल्या. वर्जेश सोलंकी यांच्या कवितांचा परिचय करुन दिल्याबद्द्ल आपले आभार !!! रावसाहेबांनी दिलेली कविताही छान आहे. ( नवकविता लिहिणा-या ब-याच कवींच्या कविता याच अंगाने जात आहेत असे वाटते. उदा. दासु वैद्य यांचे तुर्तास )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बकुळफुले 24/05/2008 - 13:05
यातल्या कोणत्याच कविता ; कविता या व्याख्येत बसत नाहीत. उगाच र ला ट जुळवला नाही हे एकमेव चांगले लक्षण आहे. आता ही अशीच आणखी एक कविता पहा............ एकदा मी माझाच स्वतःला आरशात पहात होतो मनावर चढलेल्या धूळीच्या पुटाआडुन फुटक्या चेहेर्‍याने स्वतःवरची नव्हाळी न्याहळत..... एक कवडसा माझ्यावर पडला दुपारच्या पिवळ्या उन्हाचा प्रकाशात भयाण भासला स्वतःचाच चेहेरा.. फिक्कट रोगट उदास ऍनिमिक विचारांचा स्वतःचंच अस्तित्व लपवणारा. खरकट्याच्या ढिगार्‍यात केसराचे धागे शोधणारा..... .................................................... हे असले लिहिणारे कवी क दर्जाची वीण प्रसवत असतात आणि तसल्याच समिक्षकांची डोकी बिघडवत असतात रोगट मनस्थिती आणि नैराश्य हा असल्या कवितांचा स्थायीभाव असतो. कोणत्याही क्षणात स्वतः आनन्द मानायचा नाही...इतर कोणी आयुष्याचा आनन्द घेत असतील तर त्याना तो घेउ द्यायचा नाही. ही असल्या कविंची काही व्यवच्छेदक लक्षणे.... असल्या कविता वाचुन सुकलेली बकुळफुले.....

In reply to by बकुळफुले

सन्जोप राव 24/05/2008 - 16:04
कवितेची व्याख्या काय? 'उत्कट भावनांचा लयबद्ध उद्गार' - आता हेच असेही लिहिता येईल ' एखादे दृष्य पाहून कवीला मळमळू लागते, आणि तो जे ओकतो, त्याला कविता म्हणतात. आता प्रत्येक कवीचा उद्गार वेगळा - किंवा प्रत्येकाची... जाऊ दे. आता यातल्या कुठल्या कविता अ दर्जाच्या, कुठल्या ब च्या हे कोण ठरवणार? अर्थात आपल्याला जे कळत नाही त्याला रोगट मनस्थिती, नैराश्य अशी लेबले लावणे हे अगदी सोपे. आणि कवी कविता लिहून इतरांना आनंद घेण्यापासून वंचित करतात या शोधाबद्दल तर अभिनंदनच. खरकट्याच्या ढिगातले धागे आणि वर्जेश सोलंकीच्या कविता यातला फरक कळत नसेल तर काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका दिवाळी अंकातील 'माणसाने शेंबूड व्हावे, मासिक पाळी व्हावे, ज्यानेत्याने आपापली आयमाय **न टाकावी ' ही नवकविता किंवा 'परवाच पाहिला गांधी रस्त्यावर हेमामालिनीच्या नावाने मुठ्ठी मारताना' ही अतिजहाल क्रांतिकारी कविता वाचून पहावी. सुकलेल्या मनस्थितीत फरक पडेल. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

इतर कोणी आयुष्याचा आनन्द घेत असतील तर त्याना तो घेउ द्यायचा नाही हे कसे काय बुवा? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 24/05/2008 - 17:24
खरकट्याच्या ढिगातले धागे आणि वर्जेश सोलंकीच्या कविता यातला फरक कळत नसेल तर काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका दिवाळी अंकातील 'माणसाने शेंबूड व्हावे, मासिक पाळी व्हावे, ज्यानेत्याने आपापली आयमाय **न टाकावी ' ही नवकविता किंवा 'परवाच पाहिला गांधी रस्त्यावर हेमामालिनीच्या नावाने मुठ्ठी मारताना' ही अतिजहाल क्रांतिकारी कविता वाचून पहावी. हा हा हा! आपला, तात्या गांधी.

In reply to by बकुळफुले

मुक्तसुनीत 25/05/2008 - 10:15
यातल्या कोणत्याच कविता ; कविता या व्याख्येत बसत नाहीत. इंग्रजीमधे एक वचन आहे : "अ पोएम इज अ पोएम इज अ पोएम." यामागचा अर्थ असा की, कवितेची कुठली एक अशी व्याख्या अस्तित्वात नाही. "वाक्यं रसात्मकम् काव्यम्" अशी एक व्याख्या प्राचीन काळात होती. रससिद्धांताचे नेमनियम पाळणारे तेच एक काव्य. या आणि अशा नेमनियमांना कवितेने कितीतरी वेळा उल्लंघिलेले आहे. परंपरा छेदल्या जातात, नवीन संकेत बनत रहातात आणि तेही मागे पडतात. काव्य केवळ छंदात नाही , ते निव्वळ मीटर मधे नाही , ते केवळ रससिद्धांतामधे नाही , निव्वळ मुक्तछंदात नाही, आक्रस्तळेपणामधे तर नाहीच ; पण साचेबंद कल्पना आणि रचनांमधेही ते बद्ध नाही. थोडे आपले क्षितीज रुंदावू द्या , थोडे नवीन युगजाणीवांची स्पंदने ओळखा, थोडे पूर्वग्रहांना बाजूला सारा. कदाचित नवीन कविता तुम्हाला दिसेल.

In reply to by मुक्तसुनीत

विजुभाऊ 26/05/2008 - 11:42
रससिद्धांताचे नेमनियम पाळणारे तेच एक काव्य. काव्य जेवढे आत्मकेंद्रीत होते तेवढेच ते दुर्बोध होत जाते. आपल्या भावना जर व्यक्त करायच्या असतील तर त्या ज्यांच्यापुढे ज्यांच्यासाठी व्यक्त करायच्या त्याना कळाव्या. अन्यथा ते अरण्यरुदन असते. दुर्बोध/ अगम्य असणे हा एक अलंकार/रस आहे. पण तोच रस जपणे म्हणजे जेवणात फक्त मीठच खाण्यासारखे आहे. नवरसात बीभत्स हा ही एक रस आहे. पण म्हणुन केवळ बीभत्स रस वापरुन वाङ्मय होत नसते. आपले क्षितीज रुंदावू द्या हे मान्य ...पण म्हणुन सौंदर्य ज्या निकषावरठरते ते कितीही बदलले तरी नाकीडोळी निटस असणारी स्त्रीच सुंदर ठरते. कुब्जा , खुरटलेली , रुक्ष , तोंडाला दुर्गंध असणारी भिकारीण स्त्री सुंदर होऊ शकणार नाही नवीन युगजाणीवांची स्पंदने ओळखा, थोडे पूर्वग्रहांना बाजूला सारा हे कितिही केले तरी पंडुरोगाने फिक्कट झालेल्या रोगट व्यक्तीला नितळ सौंदर्याचा अविष्कार म्हणणे अवघड आहे

In reply to by विजुभाऊ

कोलबेर 26/05/2008 - 11:50
आपल्या भावना जर व्यक्त करायच्या असतील तर त्या ज्यांच्यापुढे ज्यांच्यासाठी व्यक्त करायच्या त्याना कळाव्या.
बरोबर! ज्यांच्यापुढे ज्यांच्यासाठी व्यक्त करायच्या त्याना कळाले म्हणजे झाले. बाकिच्यांना कळण्याची सक्ती नसावी. आणि बाकिच्यांनीही त्याला दुर्बोध/अगम्य असे शिक्के मारुन आपण 'बाकिचे' आहोत हे दाखवण्याचा हट्ट आवरता घ्यावा!

बकुळफुले 24/05/2008 - 17:29
=)) हा हा हा हा अतिजहाल क्रांतिकारी कविता ..आणि सर्वोत्तम सभ्य भाषा =)) टीका सहन न होणारी माणसे समिक्षक झाली की कसे होते याचे उत्तम उदाहरण =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

ऋषिकेश 24/05/2008 - 18:21
वा! मुक्तसुनीतराव इतक्या सुंदर कवितांचा नेटक्या शब्दात परिचय करून दिल्याबद्दल अनेक आभार. तुम्हाला हा कवि जालावर मिळाला असे लिहिले आहे. यांच्या इतरही कविता जालावर वाचता येतील का कुठे? बाकी दोन्ही कविता पुन्हा पुन्हा वाचण्यासारख्या आहेत हे नक्की!! काहितरी आहे खास! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

मुक्तसुनीत 25/05/2008 - 08:07
संजोपरावानी उल्लेखिलेल्या "जाहिरातीच्या" कविता : http://india.poetryinternationalweb.org/piw_cms/cms/cms_module/index.php?obj_id=3019&x=1

In reply to by मुक्तसुनीत

ऋषिकेश 25/05/2008 - 10:41
मानलं बॉ!! या जाहिरातींच्या कविता म्हणजे कल्पनाशक्तीचा सुंदर अविष्कार! वा वा! सोलकींच्या कविता कुठे सिदल्या की आता वाचून टाकल्या पाहिजेत.. अतिशय आभार मुक्तसुनीत राव! अजून दूवे असतील/मिळाले तर जरूर कळवा! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by दंभकुठार

विजुभाऊ 26/05/2008 - 11:19
बर्रोबर मी सहमत आहे. फक्त एक सुधारणा त्या कोणत्या प्रकाराने कविता ठरतात ( कदाचित क दर्जाची वीण या अर्थाने कवीता असाव्यात)

In reply to by दंभकुठार

मुक्तसुनीत 26/05/2008 - 19:47
दंभकुठार यांना उद्देशून लिहीलेले माझे वरचे पोस्ट त्यानी जरूर वाचावे. मी त्याना (त्यांच्याच टिपणाबद्दल) काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यानी या विषयावर थोडा उहापोह करावा.

विकेड बनी 25/05/2008 - 21:07
बोटात गेलेलं कूस काढावं का की न काढावं काढावं म्हटलं का गाढवं का आठवावी? कूसा सोबत गावकुसाची आठवण यावी शर्टाला लागलेला शाईचा निळा डाग नि़ळ्या काचेचं पेन टाकून दिलं तरी तिथेच चिकटून राहिला आहे थूत एरियलच्या जाहिरातीवर ब्लीचला अद्यापही पर्याय नाही कवितेतून गरळ किती ओकू बोलू का की न बोलू बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात घाबरतो काय बोलन् की आपला, तेर्जेश बोलन्की

भोचक 26/05/2008 - 12:18
कविता हा ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीचा भाग आहे. कुसुमाग्रजांनी छंदातही सुंदर लिहिलं आणि मुक्तछंदातही परिणामकारक लिहिलं. बाय द वे. खरकट्याच्या ढिगातले धागे आणि वर्जेश सोलंकीच्या कविता यातला फरक कळत नसेल तर काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका दिवाळी अंकातील 'माणसाने शेंबूड व्हावे, मासिक पाळी व्हावे, ज्यानेत्याने आपापली आयमाय **न टाकावी ' ही नवकविता किंवा 'परवाच पाहिला गांधी रस्त्यावर हेमामालिनीच्या नावाने मुठ्ठी मारताना' ही अतिजहाल क्रांतिकारी कविता वाचून पहावी. हे भारीच आवडलं. च्यायला अशा कवींची पैदास प्रचंड आहे. नाशिकमध्ये एकदा एका विभागीय आयुक्ताने (आता हे सचिव आहेत.) एक कविता वाचली होती. 'निरोधचा फुगा फुटला नि माझा जन्म झाला.' एका विद्रोही कवीने 'तो लालगांड्या सूर्य.... अशी सुरवात करून जी कविता म्हटली की त्यानंतरचा थरार अजूनही गेलेला नाही. क्रांतीबिंतीला घाबरणारा (भोचक)

विजुभाऊ 26/05/2008 - 12:25
विभागीय आयुक्ताने (आता हे सचिव आहेत.) हा उल्लेख विनोदाने केला वाटते =))

फस्स... कसलासा कडवट स्प्रे हिरड्यांवर आणि वर आश्वासन " हे तर दुखणारच नाहीये".. ... मग डोळ्यांसमोर ती सुई नाचवत गोड हसणारा तो माझा दु:खहर्ता... गप्कन डोळेच मिटताना एक थंड सुईचा स्पर्श गाल आणि हिरडीच्या मध्ये ... मग खच्चून बोंबलताना पुन्हा एकदा अनुभूती... " साली झक मारली आणि इथे आलो"... ...आलेल्या मुंग्या , फुगलेला गाल, आणि ड्रिलची घरघर... ...देवा हे कधी संपणार ?...मला जीभ आहे का? ... घरघर घरघर पुन्हा पुन्हा घरघर.....विचित्र..डोकं बधीर... छोट्या सुया, मोठ्या सुया..सतत खरवड आणि सारखं "आ करा आ करा .." ... बरोबर ...मग सुया घालून एक्स रे... फिल्म आत ..डोकं वर, मान खाली.... बीईईईईईप..... एक्स रे... ..मग पुन्हा घरघर आणि खरवड... "झालंच हां आता" चा जप.. कशाला खोटं बोलतो साल्या?..हे मनात... मग कसल्याशा मशीनची बीपबीप... ऍडव्हान्स्ड डेन्टिस्ट्रीच्या नानाची टांग... फस्स... एक कडवट औषधाचा फवारा दातात, मग त्याच त्या गुळण्या... .."हळू..."... एवढ्या जोरात थुंकायला काय घरचं बेसिन वाटलं का? असा एक लूक... ..झक मारली आणि आलो. ...हे कितव्यांदा... मग एक पांढरं मातीसारखं ढेकूळ ... दातात थापलेलं... "झालं..." छान.... ... डोकं हलकं एकदम ... अन खिसाही... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

कविता बीभत्स नाही... :/ वेदनाहरण करणार्‍याकडूनसुद्धा ( वेदना घालवताना ) वेदना होणे आणि त्याची रग्गड भीती वाटणे हीच तर मुख्य विसंगती ... डेंटिस्टकडे जाण्यासारख्या आयुष्यातील साध्या साध्या घटनेवर आधारित संवादासारखी कविता...ना त्यात कसला अभिनिवेश ना प्रतिमा-उपमांचा सोस... :)) :)) :)) रूट कॅनाल करून घेतलेल्याला हे फारच जाणवेल... विशेषतः शेवटचा खिसा हलका करणारा संदर्भ..... जाताजाता... वर्जेशभाउंच्या जहिरातींच्या ओळी ओळी त्यांच्याच वरच्या कवितांपेक्षा भलत्याच सुमार वाटल्या... ( रेडिओ स्टेशन बदलल्यानंतर होणारे विनोद किंवा नाटकाच्या नावापुढं बिछान्यात वगैरे लावून तयार होणार्‍या विनोदांइतपत मस्त...) असो... नवकवितेचे रसग्रहण करणार्‍यांइतपत आपण सुशिक्षित नाही...किंवा नवकवींचे पाय खेचण्याइतपत धीट नाही वर्जेशभाऊला वाटेल ते लिहायचा अधिकार आहे...आणि वाचकांनाही त्यांना वाटेल तेच वाचायचा अधिकार आहे... उत्तम तेवढे टिकेल आणि बाकीचे वाहून जाईल... ( कवीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता) भडकमकर ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विजुभाऊ 26/05/2008 - 18:47
मी आणि रस्ता एकमेकाना क्रॉस करत होतो कर्र् किच्च @#!$ *ड्या.........** निजला होता का असा रस्त्यात पोटात काळोख्............आणि गाभुळलेली जाणीव गर्भपात ९० रुपये..........सरकारमान्य पाणी गाळा नारु टाळा हिवताप आणि स्वस्त धान्य दुकान ऊष्ण कटीबंध थंड उसासे... वितळलेलं डांबर .....भिणभिणलेलं डोके शेंबुड ,बेडखा आणि सिगरेटचे थोटुक उसवलेला खिसा विरलेले पाकीट १२० ३०० चटणी मारके. मेरेकु जैन सुपारी चुना मारके एक संभाजी भीकुसा यामासा ए फडका मार रे. सामनेवाले टेबल पर एक चाय आन दो बश्या दिवाल पर *** मत करो सुभीक्षा मोबाइल्... यामाहा बाइक डॉमिनोज ;कोका कोला आणि फाटकी चड्डी सूर्य पहातोय स्वतःचेच प्रतिबिम्ब.. मिटल्या डोळ्याने.......

मुक्तसुनीत 26/05/2008 - 19:45
कुठलीही वाईट कविता ही "वाईट कविता"च असते. नवे-जुने असला भेद करण्यात काही अर्थ नाही. बालकवी थोर ; म्हणून मर्ढेकर लहान किंवा वाईट ठरत नाहीत. नवकवितेतील व्यंग दाखविण्याकरता उधृत केल्या गेलेल्या (आणि येथे काही लोकांनी लिहीलेल्या ) कविता या वाईट कविता होत. यात नवे-जुने असे काहीच नाही. मर्ढेकरांची कविता येऊन आता सुमारे ६० वर्षे उलटून गेली आहेत. त्यावेळचा गदारोळ आणि आताचा येथे उडत असलेला धुरळा यात फार फरक नाही. या कवितेवर टीका करताना तिच्यातील वर्मावर बोट ठेवायच्यऐवजी अतिशय वाईट, प्रसंगी बीभत्स (आणि प्रसंगी स्वरचित ) कवितांची उदाहरणे दिल्याने नवीन कविताना विरोध करणार्‍यांची बाजू थोडी कमजोर होते असे मला वाटते. असो. नवनवीन कवितांचा प्रवास पुढे चालूच रहाणार. आणि या कवितांना विरोधही होणारच. जेव्हा जेव्हा मला एखादा नवोदित कवी सशक्त, दर्जेदार काम करताना दिसेल तेव्हा तेव्हा मी मिपावर येऊन वाचकांना त्याचा परिचय करून देण्याचे काम करेनच. विरोध झाल्याशिवाय अशा गोष्टी करण्यात मझा येत नाही खरा :-)

मन 27/05/2008 - 17:52
आहे मुक्त सुनीत रावांनी दिलेली मूळ कविता. आणि त्यानंतर उल्लेख केलेल्या "निरोधचा फुगा...","आय माय **न टाकावी" आणि इतरही सगळ्याच. अगदि भन्नाट. तुमचे(मूळ /नव कवितेची टर उडवणार्‍यांचे) विचार पटले नाहित, पण दुसर्‍याची कशी खेचायची याचा जो वस्तुपाठ घालुन दिलाय्,त्याला सलाम. आपलाच, मनोबा

दंभकुठार 01/06/2008 - 10:23
नवकविता ही अगदीच व्हेग संज्ञा आहे...शिवाय साठोत्तरी कवींच्या कवींच्या फसलेल्या कवितांच्या या नव्वदोत्तरी आवृत्त्या लिहून खाजगी फाऊंडेशनांचे किंवा टुकार सरकारी अकादम्यांचे पुरस्कार मिळण्या व्यतिरिक्त फार काही होईल असे वाटत नाही.. साठोत्तर्‍यांनी किती कोलांटउड्या मारल्या ..वाटेल ते लिहून पाहिलं..पण अद्याप ' हाऊल ' किंवा वेस्ट्ल्यांड सारखी एकही कविता मराठीत आलेली नाही...तुकारामाचा अनुवाद करून किंवा विठ्ठल -रखुमाई वर एखादी लांबलचक कविता लिहून काय हासिल ???? एकंदरीत काय ? चार दशकांचा गदारोळ ,पाच पन्नास भरकटलेले कवी... कवितेचे काय ?

In reply to by दंभकुठार

मुक्तसुनीत 02/06/2008 - 01:01
मला नव्वदोत्तरी कवितांची वकिली करायची नाही आहे. शेवटी एकेक कविता हाच एकेक अनुभव असतो. एखाद्या चळवळीचा भाग म्हणून काही आपण तिचा आस्वाद घेत नाही. सोलंकींच्या कविता मला आवडल्या. त्यामागे "ते कुठल्या चळवळीची निगडीत आहेत " असा विचार नव्हता. कुठल्याही कवितेकडे पहायचे तर आधी चष्मे उतरवायला हवेत. ("कविता कशी भोगावी ? तर कपडे काढून भोगावी !" असे करंदीकरांनी म्हणूनच म्हण्टले आहे. ) त्यामुळे साठोत्तरी/नव्वदोत्तरींनी कमावले काय नि गमावले काय याचा ताळेबंद माझ्या मनाशी नव्हता. दंभकुठार यांच्यासारख्यांसमोर गेल्या ५० वर्षांतल्या मराठी कवितेचा विशाल पट असेल तर त्यांच्या मतप्रदर्शनाच्या झलकीवरून त्याची फार कल्पना येते असे मला वाटले नाही. गिन्सबर्ग आणि इलियट यांच्या कवितांशी ते गेल्या ५० वर्षांतल्या मराठी कवितेची तुलना करतात असे दिसते. ठीक. अशी तुलना थोडी बालीश आहे ही गोष्ट अलाहिदा. परंतु टीका करताना या नव्या कवितांमधे कमीत कमी नक्की काय कमी आहे किंवा नक्की काय वाईट आहे असे त्यांनी सांगावे अशी त्याना विनंती आहे. "कोलांटउड्या" मारणे म्हणजे काय या सारख्या गोष्टींच्या बाबतीत थोडे विस्ताराने लिहावे. केवळ निंदाव्यंजक मतांच्या पिंकानी फारसे काही साध्य होत नाही.

ॐकार 02/06/2008 - 23:41
कविता किंवा कवितेच्या काही ओळीदेखील मनात घर करून राहणार नसतील तर असल्या कवितांची भलावण करणे व्यर्थ आहे.

अलिकडे काही नवीन कवींच्या आंतरजालावर वाचत होतो. एका कवितेपाशी आलो नि वाटले , काहीही झाले तरी या माणसाच्या कविता वाचल्याच पाहिजेत. कवीचे नाव : वर्जेश सोलंकी. सुदैवाने यांचा काव्यसंग्रह हाताशी लागला. कवितासंग्रहाच्या बाबतीत असे क्वचितच घडते की पहिली कविता वाचायला सुरवात करावी नि शेवटची कधी आली ते कळूच नये. प्रस्तुत संग्रहच निव्वळ ६०-६५ पानांचा आहे म्हणून असेल; पण एका बैठकीत वाचून झाला सुद्धा. १९९० च्या दशकात भारताची व्यवस्था कूस पालटत होती. येणार्‍या नव्या युगाबरोबर नवे प्रश्नही आलेच.

शिवमानसपूजा - आदि शंकराचार्य!

चतुरंग ·

चतुरंगराव आपण सांगितल्या प्रमाणे उत्तमच आहे स्तोत्र. म्हणायला पण सोपे वाटले. आपण इतके छान स्तोत्र संपूर्ण उतरवून दिल्याबद्दल आपले शतशः धन्यवाद. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर 24/05/2008 - 04:37
हिमजलाच्या तुझ्या स्नानानंतर तुला दिव्यवस्त्र आणि कल्पनेतलेच रत्नांचे आसन अर्पण करतो आहे वा! हिमजलाचं स्नान! लै भारी...! नवरत्नांच्या गंधाने आभूषित केलेल्या सुवर्णपात्रातून मी तुला तूप, भाताची खीर नैवेद्य म्हणून अर्पण करतो आहे दही-दूध यांनी बनवलेली, फलरसांनी, भाज्यांनी युक्त रंभाफलादि पंचपक्वान्ने मी तुला अर्पण करतो आहे माझ्या पायांनी केलेला संचार ह्या तुला घातलेल्या प्रदक्षिणा आणि मुखातून बाहेर पडणारे शब्द ह्या प्रार्थना आहेत त्याचप्रमाणे जे जे कर्म मी करतो आहे ते ते कर्म हे शिवशंभो तुझीच आराधना आहे, तिचा स्वीकार कर! वा रंगा! सुंदर लिहिलं आहेस. आपल्याला संस्कृत काहीच कळत नाही, परंतु तुझं मराठी काव्य मात्र वाचायला छानच वाटलं! एकंदरीतच काव्य हा तुझा श्रद्धेचा भाग दिसतो आहे त्यामुळे इथे तू मांडलेली काव्याची मानसपूजा आम्हाला आवडली! :) आपला, (शंकरभक्त) तात्या.

मदनबाण 24/05/2008 - 04:47
हे सुंदर संस्कृत स्तोत्र मराठीत अनुवादित केल्याबद्दल धन्यवाद..... (जय भोलेनाथ) मदनबाण.....

कलंत्री 25/05/2008 - 11:24
अनुवाद चांगलाच जमला आहे. याला गद्याऐवजी पद्यस्वरुप दिले तर अजून बरे होईल. ( गद्य = लेखस्वरुप आणि पद्य = कवितास्वरुप). बरेच दिवसानंतर हे शब्द वापरत असल्यामूळे माझाच गोंधळ झाला आहे.)

In reply to by कलंत्री

पुष्कर 25/05/2008 - 17:28
असेच म्हणतो. (असेच म्हणजे "बरेच दिवसानंतर हे शब्द वापरत असल्यामूळे माझाच गोंधळ झाला आहे" सोडून उरलेले.... भावनाओं को समझो.) -पुष्कर

In reply to by कलंत्री

चतुरंग 27/05/2008 - 21:52
सुरुवातीला पद्य अनुवाद करण्याचाच विचार होता. थोड्या प्रयत्नानंतर शंकराचार्यांच्या विलक्षण प्रतिभेच्या शब्दांसमोर माझे क्षीण काव्य दुबळे वाटू लागले त्यामुळे नाद सोडून दिला. ;) मी पुन्हा कधीतरी प्रयत्न करुन पाहीनही पण तूर्तास हे स्तोत्र माहीत करुन देण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देईना म्हणून गद्य का होईना अनुवाद केला. चतुरंग

वा, चतुरंगजी!! एका सुंदर स्तोत्राचा तितकाच सुंदर अनुवाद!! मस्त जमून आलंय!! हे स्तोत्र वाचतांना ते स्वतःच कधी पुट्पुटू लागलो ते समजलंच नाही. आज जवळ जवळ वीस वर्षांनी हे स्तोत्र म्हटलं..... डोळ्यापुढे माझे शिवभक्त आजोबा आले.... त्यांना प्रसन्न करण्यासाठी लहानपणी मुद्दाम हे आणि शिवमहिम्न स्तोत्र पाठ केलं होतं..... लहानपणी आजोळी गेल्यावर पहाटेच्या अंधारात देवघरातून येणारा तो निरांजनाचा मंद उजेड (तेंव्हा आजोळी वीज नव्हती)..... अगरबत्ती आणि फुलांचा येणारा मंद सुगंध.... देवघरात सोवळं नेसलेले, पूजेत मग्न झालेले प्रेमळ आजोबा.... त्यांचे खर्जातल्या स्वरातले, स्वच्छ शब्दांतले बोल.... करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्वं जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ओम नमः शिवाय! ओम् नमः शिवाय!! ओम् नमः शिवाय!!! ते माणूस आता राहिलं नाही पण तुम्ही आठवण मात्र ताजी करून दिलीत.... खूप खूप आभारी आहे.... कधीकाळी कुणाचातरी नातू असलेला, डांबिसकाका

अजय जोशी 26/05/2008 - 10:35
करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्वं जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो हा श्लोक पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी त्रिकालसंध्या म्हणून रात्री झोपण्यापूर्वी म्हणावयास सांगितला आहे. दिवसभरात कळत नकळत होणारे अपराध देवाने क्षमा करावेत असा अर्थ आहे. लिहितं अलिहितं वा सर्वमेतत्क्षमस्वं (आपला पुणेरी) अ. अ. जोशी

In reply to by अजय जोशी

विसोबा खेचर 26/05/2008 - 10:47
दिवसभरात कळत नकळत होणारे अपराध देवाने क्षमा करावेत असा अर्थ आहे. नकळत अपराध झाल्यास एक वेळ ठीक आहे, परंतु कळत किंवा जाणूनबुजून अपराध झाल्यास त्याला देवाने क्षमा करावी असे म्हणणे हा भिकारचोटपणा आहे. अपराधास क्षमा नाही! भारतीय दंड विधान संहितेनुसार जी शिक्षा असेल ती भोगायची तयारी हवी! संध्याबिंध्या करून देवाकडे क्षमा मागण्यात काही अर्थ नाही. लेको, जाणूनबुजून अपराध केलात ते काय देवाने सांगितलं म्हणून? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 26/05/2008 - 19:34
चोरी मारी असे नव्हे. तसले अपराध करुन क्षमा मागणे दरवेळी क्षम्य असेलच असे नाही. एक उदाहरण देऊन मुद्दा अधिक स्पष्ट होईल. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे|| पर्वत हे जणू स्तनमंडल आहेत अशा समुद्रवस्त्रांकित, विष्णुपत्नी (पृथ्वी), तुला पाय लावतो आहे त्याबद्दल क्षमा असूदे! हा श्लोक पृथ्वीला उद्देशून आहे. सकाळी झोपेतून उठून जमिनीला पाय लावून उभे राहण्यापूर्वी पृथ्वीची क्षमा मागितली आहे. तू पवित्र आहेस, विष्णुपत्नी असे तुझं स्थान आहे पण चालण्यासाठी तुला पाय लावणे आवश्यक आहे त्यासाठी मला क्षमा कर. निसर्गाशी आपले ऋषि किती एकरुप होते ह्याचा असे श्लोक हा पुरावा आहे. निसर्ग हा महान आहे त्याला नतमस्तक होऊन सामोरे जा हा विनम्र भाव ह्यात दिसतो. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 26/05/2008 - 22:05
चोरी मारी असे नव्हे. तसले अपराध करुन क्षमा मागणे दरवेळी क्षम्य असेलच असे नाही. हो पण आठवले शास्त्र्यांनी 'असले अपराध', 'तसले अपराध' अशी कुठलीही वर्गवारी केलेली नाही. त्यांनी सरसकट अपराध असे म्हटले आहे, त्यात भारतीय दंड संविधान मध्ये अंतर्गत अपराधही आले. आठवले शास्त्र्यांनी लिहितांना नीट काळजी घेऊन शब्द जपून वापरायला हवे होते! ते म्हणतात त्याप्रमाणे कुठली ती त्रिकाल संध्या करून भा दं संविधानाखाली येणार्‍या अपराधाबद्दलही देवाकडे क्षमा मागितली पाहिजे असे म्हणायचे आहे का? उलटपक्षी भा दं संविधानाखाली येणार्‍या अपराधाबद्दल कुठली संध्याबिंध्या करून देवाकडे क्षमा न मागता जी काही असेल ती सजा भोगली पाहिजे या अर्थाचा श्लोक त्यांनी लिहिला असता तर ते ठीक होतं! तू पवित्र आहेस, विष्णुपत्नी असे तुझं स्थान आहे पण चालण्यासाठी तुला पाय लावणे आवश्यक आहे त्यासाठी मला क्षमा कर. यात क्षमा कसली मागायची ते कळलं नाही रे रंगा! च्यामारी, माणूस जन्माला आल्यावर तो पृथ्वीवर नाही उभा राहणार तर कुठे? :) असो... या बाबतीत आपले विचार पटतील असे वाटत नाही! :) आपला, तात्याशास्त्री आठवले.

अजय जोशी 26/05/2008 - 11:08
नकळत अपराध झाल्यास एक वेळ ठीक आहे, परंतु कळत किंवा जाणूनबुजून अपराध झाल्यास त्याला देवाने क्षमा करावी असे म्हणणे हा भिकारचोटपणा आहे. आपण ज्याला अपराध म्हणत नाही (जसे राग येवून थोबडीत मारणे. अर्धवट ज्ञानाने आरोप करणे, ढेकूण, उंदीर, झुरळे मारणे इ. कोणत्याही प्राण्यास मारण्याचा कोणेलाही अधिकार नाही.), परंतु नाईलाजाने करावे लागणा-या अनेक गोष्टी निसर्गाचा अपराध ठरू शकतात. म्हणून कळत नकळत. संध्याबिंध्या करून देवाकडे क्षमा मागण्यात काही अर्थ नाही. संध्या देवाकडे क्षमा मागण्यासाठी करीत नाहीत. असे कोणी समजत असेल तर त्याबद्दल लवकरच मी निवेदन देईन. ऋषींनी दिलेली त्रिकालसंध्या समजून घ्या. (आपला पुणेरी) अ. अ. जोशी

शशांक 28/05/2008 - 13:22
अनुवादाचा प्रयत्न चांगला जमला आहे.
त्याची गेयता, नादमधुरता, त्यातल्या रमणीय कल्पना ऐकून ते आदि शंकराचार्यांचे असावे असा अंदाज बांधला, तो खरा निघाला.
शंकराचार्यांचे महिषासुरमर्दिनिस्तोत्रम् बर्‍याच ठिकाणी आरतीच्या वेळी म्हणतात तेही काव्य रचनेच्या दृष्टीने पाहिले तर अतिशय सुंदर आहे. इथे पाहा. हे स्तोत्र आवेशपूर्ण चालीत म्हटले जाते त्यामुळे ऐकताना अधिकच प्रभावी वाटते. ध्वनिमुद्रण कुठे मिळाले तर पाहतो.

वरदा 28/05/2008 - 17:30
माझी आजी म्हणायची हे स्तोत्र मी तेव्हा शिकलेही होते आणि विसरलेही....अर्थ मात्र अजिबात माहित नव्हता जेव्हा संस्क्रुत शिकले तोपर्यंत विसरले होते स्तोत्र्....खूप छान शिकायला मिळालं आता अर्थ समजून पाठ करता येईल...धन्यु!

विकास 29/05/2008 - 00:30
स्तोत्र आणि अनुवाद आज शांतपणे वाचला. अनुवाद पण चांगला आहे. पद्य अवश्य करा वाचायला आवडेल. शंकराचार्यांचे शंकराचार्यांपाशी आणि रंगाचार्यांचे रंगाचार्यांपाशी - थोडक्यात तुलना करण्याची गरज नाही! बाकी आधी मला वाटले की आपण पद्यच केलेत त्यामुळे पहीले संस्कॄत कडवे ठेक्यात वाचले आणि तसाच अनुवाद वाचायचा प्रयत्न केला :-)

नुकतेच एक स्तोत्र ऐकण्यात आले. त्याची गेयता, नादमधुरता, त्यातल्या रमणीय कल्पना ऐकून ते आदि शंकराचार्यांचे असावे असा अंदाज बांधला, तो खरा निघाला. त्यांचेच हे स्तोत्र 'शिवमानसपूजा' ह्या नावाने ओळखले जाते. प्रत्यक्ष खरोखरीच पूजा करणे जरी शक्य नसेल तरी ह्या स्तोत्राच्या पठणाने खर्‍या पूजेचे पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. तो भाग जरी क्षणभर सोडून दिला तरी ऐकताक्षणीच मनाचा कबजा घेणारे हे सुंदर संस्कृत स्तोत्र मराठीत अनुवादित करायचेच असा चंग बांधला. माझा संस्कृतचा अभ्यास वगैरे नाही अंदाजाने अर्थ लागू शकतो इतपतच समजते.

त्या गुर्जरनगरी: ओळख

ऋषिकेश ·

विसोबा खेचर 24/05/2008 - 16:50
पण खरंच ही ट्रीप कशी झाली?.. काय काय अनुभव आले?.. तिथली माणसं.. समाज.. प्राणी.. पक्षी.. शहर मला कसे भेटत गेले हे सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न.. त्या गुर्जरदेशी मी फार काळ नसलो तरी शांत तरीही शहरी जीवनाचा आनंद त्या शहराने मला दिला. तिथल्या मजा, किस्से, प्रसंग, आनंद, आश्चर्य यांत मिसळप्रेमींना सहभागी करायच्या निमित्ताने हा ४-५ भागांचा प्रपंच! येऊ द्यात साहेब, आम्ही वाचायला उत्सुक आहोत...:) आपला, तात्या पटेल.

उत्तम इंट्रो.... मस्त ...आता दिसला भाग की वाचणार... येउंद्यात लवकर... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋषिकेश, सुरुवात झकास झाली आहे,गुर्जरनगरीतले अनुभव ऐकायला उत्सुक! स्वाती

ऋषिकेश 28/05/2008 - 09:33
प्रकट-खरडींतून-व्यनीतून अभिप्राय पोहोचवणार्‍या सगळ्यांचे प्रोत्साहनाबद्दल अनेक आभार! जमेल तितक्या लवकर पुढील भाग टाकेनच.. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

नुकताच कुठे अमेरिकायण संपवून मायदेशी परतलो होतो. बर्‍याच दिवसांनी आईच्या हातचं रुचकर जेवण नशिबी येत होतं. त्याशिवाय मित्रांबरोबरचं पूर्ववत फिरणं (खरंतर भटकणं- अगदीच खरं सांगायचं तर उंडारणं), विकेंडला १-२ चित्रपट, हळूहळू येऊ लागलेले आंबे वगैरे गोष्टींचा आनंद मनापासून घेत होतो. अमेरिकेत राहून ज्या स्थळांच - व्यक्तींचं - प्रसंगांचं महत्त्व नव्याने कळलं होतं त्या सार्‍या स्थळांना-व्यक्तींना-क्षणांना नव्याने भेटत होतो. लोकलची गर्दी , धूळ, कचरा या गोष्टीही माझ्या आयुष्याचा भाग मोठ्या सहजतेने बनू लागल्या होत्या. थोडक्यात सारं काही आलबेल होतं.

वडाप (पुर्ण)

शैलेन्द्र ·

याच्या वाड वडिलानी गुरांवरुन सामान वाहीलं, हा जीपमधुन माणसांना गुरासारख वाहतो. हे मस्त... कचरूच्या वैयक्तिक गोष्टी, (घर आई बाप,त्याची स्वभाववैशिष्ट्ये )...( गावच्या, घरच्या गोष्टी सांगायला लागतो. शेति, धन्दा यावरुन गाडि राजकारणाकडे येते. पाठीमागे बसलेल्या पाहुन्यांचा अन्दाज घेत कचरु दबक्या आवाजात त्याचि रोकठोक मतं मांड्तो) हेच डीटेलमध्ये अजून आले असते तर मजा आली असती.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

याच्या वाड वडिलानी गुरांवरुन सामान वाहीलं, हा जीपमधुन माणसांना गुरासारख वाहतो. वा.. प्रकटन आवडले. स्वाती

शैलेन्द्र 24/05/2008 - 00:51
नक्किच सर, पुढच्या वेळि जरुर प्रयत्न करु, पण ह्या लेखाचा उद्देश " कचरु" हा नसुन, त्याच्या आणि सामान्य माणसाच्या आयुष्यातली ओढातान, त्या पायी येणारि लाचारि, आणि, उत्तुन्गतेकडे होणारे दुर्लक्ष हा होता...

धमाल मुलगा 26/05/2008 - 17:39
खिडकीतुन पळ्णार्‍या शाहिस्तेखानाच्या चपलतेने ऊडी मारुन एक कन्या रस्त्य्याच्या कडेला झेप घेते.
:) काय डोकं चालतं राव ! जबरा.
शरिर आनि गाडी साथ देते तो पर्यन्त... आयुष्याचा शेवटचा वडाप काहि न करता घालवता येइल इतके शिट आत्ताच ओढायचे.. गप गुमान.. मान खालि घालुन..
खलास! काय वाक्य आहे :) शैलेंद्र, एव्हढंसच का हो लिहिलंत? पुढच्यावेळी मोठा लेख लिहा हो. हे म्हणजे जेवायला येऊन बसलो पाटावर आणि नुसतीच बडीशेपेची वाटी पुढ्यात आल्यासारखं होतं बॉ. येऊद्या अजुनही :) पु.ले.शु.

वडाप.. सेन्ट्रल लाईनवरच शेवटच स्टेशन... कसारा.... लोकल मधुन ऊतरलेली गर्दी, उताराकडे वाहणारया पाण्यासारखी एकाच दिशेने वाहते आणि ऊभ्या आड्व्या लावलेल्या बस आणि जीप वर आदळत तिथेच जिरते. घाट माथ्यावर असलेल्या या गावाच हेच प्रयोजन आहे.. या गावात उतरलेली सगळी गर्दी पोटात घेवून महामन्ड्ळाचे लाल डबे आणि खाजगी जीप्स फुर्फुरत घाट चढायला लागतात.. नाशिकच्या दिशेने.. तिथेच तो ऊभा असयचा, कचरू , कचरूच नाव होत त्याच बहुदा.. बहुतेक सगळ्या गाड्या नाशिककडे जायच्या.