महाराष्ट्राची जिवनरेखा........
महाराष्ट्राची जिवनरेखा........ नाही पणती नाही चिरा !!
कालच्या लोकसत्ता मधील या बातमीने लक्ष वेधुन घेतले. याचा घोषवारा असा होता की ३१ मे ला आपल्या एस्.टी ला ६० वर्षे पुर्ण होणार आहेत. मात्र म.रा.प.म. आणी राज्य शासन यांना याचे अजिबात सोयर सुतक नाही. वाईट वाटले ही बातमी वाचुन.
१ जुन १९४८ ला पुणे - अहमदनगर मार्गावर एस्.टी ची पहिली बस धावली. तेव्हापासुन आजपर्यंत आपल्या असंख्य बसेसद्वारे महाराष्ट्राच्या काना़कोपर्यात पोहचलेले एस्.टी चे जाळे अचंबीत करणारे आहे.
लहाणपणी एस्.टी शी माझे जिव्हाळ्याचे नाते होते. सांगली मध्यवर्ती बसस्थानक ही अतीशय आवडीची जागा. घरी येणार्या नातेवाईकांना आणायला आणी परत सोडायला बाबां बरोबर नियमीत जायचो. त्यावेळी पुणे, मुंबई येथुन येणार्या बसेसचे विशेष आकर्षण असायचे.
लहाणपणापासुन केलेले एस्.टी चे वेगवेगळे प्रवास खुप एन्जॉय केले. त्यात शाळेच्या ट्रिप्स, लग्नाला जाण्यासाठी केलेली वेगळी बस, कोकणातील अशोक लेलँडच्या बसेस नंतर आलेल्या एशियाड, डिलक्स बसेस ते आजच्या शिवनेरी , महाबस यातुन केलेला प्रवास इ.
आज व्यवसायाने मार्केटींग मधे आहे. हे क्षेत्र निवडण्याचे महत्त्वाचे कारण प्रवासाची आवड. आज जरी खाजगी बसेस, रेल्वे अगदी विमान प्रवास करत असलो तरी मला वाटते ही आवड निर्माण होण्यास लहानपणी केलेल्या एस्.टी प्रवासाचा नक्कीच मोठा वाटा आहे. आणी या बद्दल एस्.टी चा कायम ॠणी राहीन.
अशी ही आपल्या सर्वांची लाडकी एस्.टी चिरायु होवो हीच सदिच्छा !!
वाचने
9290
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
एस्.टी चिरायु होवो
माझ्याही सदिच्छा!!
In reply to माझ्याही सदिच्छा!! by मनस्वी
व्वा
In reply to व्वा by आनंदयात्री
ताम्हीणी घाट
ह्या वर्शी
जय एस्. टी. महामंडळ.....
In reply to जय एस्. टी. महामंडळ..... by कुंदन
बरोबर ...
जय एसटी
गाव तिथ रस्ता...रस्ता तिथ एस.टी.....
जय एसटी- गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी
.
प्रवाशांच्या सेवेसाठी...
रस्ता तिथे एसटी
ड्या आपली यष्टी बरी
एस टी चिरायु होवो
एस टी चिरायु होवो!
In reply to एस टी चिरायु होवो! by अवन
लाख शुभेच्छा!
काही ठिकाणी
एस्.टी. ने