✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

महाराष्ट्राची जिवनरेखा........

अ
अमोल केळकर यांनी
Wed, 05/28/2008 - 12:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9279 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Wed, 05/28/2008 - 12:40 नवीन

एस्.टी चिरायु होवो

एस्.टी चिरायु होवो ! एस्.टी चिरायु होवो !
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 05/28/2008 - 12:49 नवीन

माझ्याही सदिच्छा!!

Image removed. ६० वर्षांच्या एस्. टी. ला वाढदिवसाच्या शुभेच्छा! एस्. टी. चिरायु होवो तसेच अधिक कार्यक्षम बनो, स्वच्छ-टापटीप राहो आणि खेडोपाडी पोहोचो. ज्या खेडी-वस्त्यांनी अजून एस्. टी. चे तोंडही पाहिले नाही तिथे एस्. टी. पोहोचो. जिथे गावातून शहरांना दिवसातून फक्त एकदाच एस्. टी. जाते तिथे तिची फ्रीक्वेन्सी वाढो. एस्. टी. कामगारांची वेतनश्रेणी वाढो आणि कामातील हेक्टीकपणा कमी होवो. जय एस्. टी. महामंडळ. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 05/28/2008 - 12:52 नवीन

व्वा

फोटु कुठला म्हणायचा तो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मनस्वी Wed, 05/28/2008 - 12:54 नवीन

ताम्हीणी घाट

ताम्हीणी घाटातील एस्. टी... गुगलवर मिळाला! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
व
विदुषक Wed, 05/28/2008 - 13:05 नवीन

ह्या वर्शी

ह्या वर्शी एस्. टी ला चक्क नफा झाला आहे मजेदार विदुषक
  • Log in or register to post comments
क
कुंदन Wed, 05/28/2008 - 13:19 नवीन

जय एस्. टी. महामंडळ.....

असेच म्हणतो ... >> ह्या वर्शी एस्. टी ला चक्क नफा झाला आहे राजकारणी लोक जर महामंडळापासून दूर राहिले तर नफा होत राहिल. तोट्याला कारणीभूत आहे ती राजकारणी लोकांची ढवळा ढवळ.... ( येष्टी प्रेमी...) ...कुंदन
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 05/28/2008 - 13:23 नवीन

बरोबर ...

आहे असेच म्हणतो ... अवांतर : ह्या वर्षी एस्. टी ला चक्क नफा झाला आहे ह्याबद्दल आमच्या भागाचे "आमदार व एस टी महमंडळाचे अध्यक्ष श्री. सुधाकरपंत परिचारक " यांचे अभिनंदन छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
भ
भडकमकर मास्तर Wed, 05/28/2008 - 14:29 नवीन

जय एसटी

जय एसटी महामंडळ... ... फायद्यात आले पाहून आनंद वाटला... आणि मनस्वी, फोटो अप्रतिम... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/28/2008 - 17:39 नवीन

गाव तिथ रस्ता...रस्ता तिथ एस.टी.....

जियो एस.टी जियो...... या एस.टी तुन प्रवास करण्याची मजा काही औरच..... (एस.टी प्रवासी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
आ
आर्य Wed, 05/28/2008 - 18:24 नवीन

जय एसटी- गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी

मी पायी, सायकल, बस, रेल्वे अगदी विमान प्रवासही केलेत. पण हे सगळे दुरवर नेतात च्यायला. पण एस.टी नेच माणसे खर्‍या अर्थाने जवळ येतात. हात दखवा बस थांबवा =; एसटी चा प्रवासी (आर्य)
  • Log in or register to post comments
आ
आर्य Wed, 05/28/2008 - 18:26 नवीन

.

.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 05/29/2008 - 00:21 नवीन

प्रवाशांच्या सेवेसाठी...

प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी हे ब्रिदवाक्य बर्‍यापैकी पाळलेली ही एक संस्था आहे. लहानपणापासून अनेकदा अनुभव घेतला आहे. प्रत्येक ठिकाणचे एसटी स्टँड हा एक बघणीय प्रकार असतो. प्रत्येक ठिकाणचे विविध अनुभव. रात्रीच्या एस्ट्यांना रातराणि हा शब्द पाहून खूप गंमत वाटायची! ड्रायव्हर-कंडक्टरचे पण बर्‍याचदा चांगले अनुभव आले आहेत. बाकी एसटीतील प्रवास वर्णन म्हणल्यावर हमखास आठवते ती पुलंची म्हैस आणि महाराष्ट्रातील एसटी नसेल, पण -बाँबे टू गोवा मधील एस टी आणि त्यातील अमिताभ, केस्टो, ललीता पवार इत्यादी...
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 05/29/2008 - 16:40 नवीन

रस्ता तिथे एसटी

हे बव्हंशी खरे आहे. महाराष्ट्रात कानाकोपर्‍यात एसटि जाते. खाजगी वहतुक हि फक्त जिथे पैसा आहे तिथेच चालवलि जाते . चालकसाठी मात्र काहितरी शीस्ती चे बंधन असावे. कारण आपल्या खाजगी गाडी ने एका गावाहुन दुसर्‍या गावि जाताना एसटी पासुन सावध रहावे लागते. ओव्हरटेक करताना ते काहि बघत नाहित , तुंबलेल्या रहदारीत बस तशिच दामटुन पुढे नेउन अधिक अडथळा निर्माण करतात.
  • Log in or register to post comments
भ
भोचक गुरुवार, 05/29/2008 - 17:37 नवीन

ड्या आपली यष्टी बरी

एरवी महाराष्ट्रातल्या एसटी ला लोक नावं ठेवतात. तिच्या खाजगीकरणाची आरोळी ठोकतात. पण आपली 'यष्टी' किती चांगली आहे हे इतर राज्यांत गेल्याशिवाय कळत नाही. मध्य प्रदेशात रहाताना येणारा इथल्या 'ट्रेवल्स'चा अनुभव नक्की वाचा. मग तुम्हाला 'गड्या आपली यष्टीच बरी असे वाटल्याशिवाय रहाणार नाही. http://www.misalpav.com/node/1542
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Fri, 05/30/2008 - 11:14 नवीन

एस टी चिरायु होवो

आम्हा दुर्ग प्रेमींना महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात नेणारी एस टी चिरायु होवो!!!
  • Log in or register to post comments
अ
अवन Sat, 05/31/2008 - 10:48 नवीन

एस टी चिरायु होवो!

आज एस टी साठाव्या वर्षात गेली , हे कळले तेव्हा वाट्ले, आपल्याच कुटुंबातल्या कोणीतरी साठी गाठली आहे. लहानपणापासून केलेल्या एस टी प्रवासामुळे, मला तर महाराष्ट्राची ओळख झाली. कोणत्याही एस टी स्टँडवर गेल्यावर येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांच्या पाट्या वाचणे हे शिक्षण फार मोठे. पुणे-भोर, मुंबई-आटपाडी (पुणे, सातारा, कराड, विटा, भिवघाट मार्गे), परळ-भूम. त्यातून सर्वात इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे पाटीवरचे व्हायामार्गे. किंवा एकाच नावाची दोन-दोन गावे कळणे. कर्जत एक रायगडात, एक अहमदनगरात. हे शिक्षण पुस्तकातलं नाही, एस टी स्टँडवरचं. कोणत्याही गावात आज एस टी पोचलीये. आजही खेडोपाडी मुलांना मोठ्या गावातल्या शाळांच्या वेळा सांभाळता येतील अशा एस टी च्या फेर्‍या आखल्या आहेत. (पूर्वी आठवडाबाजाराची जादा गाडी असायची.) "गाव तिथे एसटी", "हात दाखवा गाडी थांबवा", "जनता गाडी" यातूनच एस टी ची सामान्य लोकांशी जवळीक जपतं, एस टी SMS वर वेळापत्रक देण्याची उडी मारतेय. आज व्यावसायिक गणितात, एस टी नफा दाखवतेयं, याचे श्रेय एस टी च्या कर्मचार्‍यांचेसुध्दा आहे. एकीकडे शहरांमधून स्पर्धात्मक व्यावसायिक सेवा देणे आणि दुसरीकडे सामाजिक बांधिलकीतून सेवा देणे, या तारेवरच्या कसरतीत एस टी ची आगेकूच चालू राहो. अधिक http://msrtc.maharashtra.gov.in/ http://www.loksatta.com/daily/20080531/rajay.htm
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 18:39 नवीन

लाख शुभेच्छा!

आज एस टी साठाव्या वर्षात गेली , हे कळले तेव्हा वाट्ले, आपल्याच कुटुंबातल्या कोणीतरी साठी गाठली आहे. अगदी खरं! आम्हा को़कणवासीयांचं आणि यष्टीचं फार जिव्हाळ्याचं नातं आहे. गेली अनेक वर्ष यष्टीबाई आमची सेवा करते आहे! :) माझ्याही यष्टी महामंडळास लाख लाख शुभेच्छा! आपला, (परळहून सुटणार्‍या 'मुंबई-देवगड' लाल डब्याचा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवन
अ
अमोल केळकर Sat, 05/31/2008 - 11:00 नवीन

काही ठिकाणी

आजही खेडोपाडी मुलांना मोठ्या गावातल्या शाळांच्या वेळा सांभाळता येतील अशा एस टी च्या फेर्‍या आखल्या आहेत. काही ठिकाणी ( मुख्यतः कोकणात) गावात येणार्‍या एस टी वरुन वेळेचा अंदाज बांधला जातो.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 06/02/2008 - 18:45 नवीन

एस्.टी. ने

पूर्वी भरपूर प्रवास केलाय. माणसे - माणसे आणि गावे-गावे जोडणार्‍या यश्टीला आमचा सलाम आणि शंभरीच्या वाटचालीला शुभेच्छा! एक आठवण - माझा एक शाळूसोबती झक्कपैकी कंडक्टर (वाहक - काय छान शब्द आहे ना!) झाला तेव्हा आम्ही अचंबित झालो होतो (कारण वर्गमित्रांपैकी कोणी कंडक्टर वगैरे होऊ शकतो असे वाटलेच नव्हते. आपली नोकरीबाबत विचार करण्याची परिमिती किती सीमित असते हे कळून नंतर हसू आले!). नंतर तो वाहक असलेल्या गाडीतून ३-४ वेळा प्रवासाचा योग आला. गप्पा मारताना विचारले की ह्या नोकरीकडे कसा वळलास तेव्हा म्हणाला "मला माणसांची आवड. सतत लोकसंपर्कात रहायला इतकं चांगलं दुसरं ठिकाण कुठलं? शिवाय बोलायला फार कोणी नसलं तर तिकिटे वाटून झाली पुस्तकं वाचत बसतो." त्यानं त्याच्या पेटीतून चांगली चांगली मराठी पुस्तके काढून दाखवली. चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा