अप्रतिम तात्या,
फार सुंदर लेख झालाय. आम्हाला गाण्यातलं फारसं कळत नाही पण पं. फिरोज दस्तूर हे फार मोठे गायक होते असे ऐकून आहोत.
ते किती महान माणूस होते हे तुमचा लेख वाचून कळलं.
पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख.
आपला,
(भारावलेला) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
मुलाची शिकवणी होईस्तोवर त्या माऊलीने सवाईंच्या चपला स्वच्छ धुऊन, तव्यावर वाळवून कोरड्या करून ठेवल्या होत्या!!
क्या बात है! काय गुरुभक्ती ही!!
ही माणसे आतून बाहेरुन सोन्यासारखी तावून सुलाखून निघालेली होती की त्यांना बाहेरच्या कोणत्या दागिन्यांची गरज पडली नाही हेच खरं.
(दस्तूर बुवांची एखादी ध्वनिफीत असेल तर दुवा देऊ शकाल का तात्या?)
चतुरंग
क्या बात है! काय गुरुभक्ती ही!!
ही माणसे आतून बाहेरुन सोन्यासारखी तावून सुलाखून निघालेली होती की त्यांना बाहेरच्या कोणत्या दागिन्यांची गरज पडली नाही हेच खरं.
तात्या,
एका अतिशय प्रतिभावान , प्रेमळ कलाकाराची ओळख करून दिलीत. आम्हाला हि ओळख त्यांच्या जाण्यानंतर व्हावी यासारख दुर्दैव नाही.
असो. लेख अतिशय छान उतरला आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
दस्तूर साहेबांची आठवण तुमच्या लेखनी तून वाचायला मिळाली, फार आवडले तुमचे च्यक्ती चित्रण.
प्रियाली ताई लिहिते तिच्या प्रतिसादात, व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही
अजून मी काय सांगणार.
तात्या भक्त (मिसळ प्रेमी)
सुमीत
व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही
आणखी काय म्हणणार.
खरच, मस्त जमलाय लेख्.अगदि समोर घडणारी गोष्ट सांगितल्यासारखं वाटतयं.
आपलाच,
मनोबा
व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही
आणखी काय म्हणणार.
खरच, मस्त जमलाय लेख्.अगदि समोर घडणारी गोष्ट सांगितल्यासारखं वाटतयं.
आपलाच,
मनोबा
शास्त्रीय संगिताच्या वार्यालाही मी उभा राहात नाही. (हो!आपल्या जांभईने बिचार्या गायकाचा हिरमोड होऊ नये, हा उदात्त हेतू).
पण व्यक्तीचित्रणे आवडतात. कोणी मोठा गायक किंवा एखादा कलाकार माणूस म्हणून कसा असतो हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. तात्या, तुमच्या लेखनातून ही भूक काही अंशी भागते. आवडले तुमचे लेखन. अभिनंदन.
विडी, उंदीर, गुरुंची एक आठवण, मृदू आवाज ....
अतिशय जिवंत व हृद्य तुमच्या आठवणींचे चित्रण शब्दरुपाने आमच्या समोर केलेत.
>आठवण फारच हृद्य आहे, आवडली.
असेच म्हणतो.
तात्या -- मनापासून धन्स .. लेख लिहिल्याबद्दल
सुदैवाने मी पुण्यात लहानाचा मोठा झालो ... कॉलेजमधे असताना आणि नंतरही पुण्यात असेपर्यंत गंगूबाई, दस्तुरजी आणि भीमेसेनजी हा क्रम चुकवला नाही :)
सवाईमध्ये प्रत्यक्ष 'गोपाला...' ऐकणं फारच उत्कट अनुभव असतो ना !
------
अवांतरः माझ्या मनात अण्णांचाही एक 'कोमल रिषभ आसावरी तोडी' अजूनही घुमतोय !!!
-----
सुरेख व्यक्तिचित्र!!
हे दोन बावाजी, पं. फिरोझ दस्तूर भारतीय संगीतात आणि झुबिन मेहता पाश्चात्य,
काय श्रेष्ठ योगदान आहे!
व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही
पूर्णपणे सहमत!!
-पिवळा डांबिस
तात्या,
हे पारशीबाबाचे व्यक्तीचित्र खूपच आवडले. दस्तुरांची आठवण दस्तुरखुद्द तात्यांच्या शब्दात!
आमच्या सारख्यांना माहीती नसलेली बरीच माहीती त्यानिमित्त कळली. त्यांना संगीताची ते ही शास्त्रीय संगीताची आवड कशी लागली? सवाई गंधर्वांची भेट कशी झाली? अधिक वाचायला आवडेल.
अवांतरः बाकी "गोपाला मेरी करूना" असे शिर्षक वाचले आणि क्षणभर समजले नाही की गोपाला बरोबर राधे ऐवजी मेरी काय करतेय? का आता काही नवीन पूर्व पश्चिम वाद! मग तुमचे नाव वाचले आणि आठवले की हे गाणे आहे म्हणून :-)
तात्या ,
तुम्हाला प॑. फिरोज दस्तूर या॑च्या बद्दल वाटणारी आपुलकी, प्रेम हे या लेखातुन छान व्यक्त झाले आहे,
आणि आम्हाला ते गायक म्हणुन जेवढे मोठे होते त्याहुन ही त्याच्यातील देवपणाची आम्हाला आज तुमच्या मुळे ओळख झाली.
धन्यवाद.
>> व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही
१०० % सहमत!!
फारच छान झाला आहे लेख. पं. द्स्तूरांबद्द्ल बरीच माहिती त्यानिमित्त मिळाली. धन्यवाद.
ईश्वरी
फारच छान ले़ख, तात्या....
७-८ वर्षा मागचा प्रसंग... मि तेंव्हा सवाईगंधर्व महोत्सवाची वेबसाईट केली होती, फिरोज जी इतके खुष झाले होते की त्यांनी मला आवर्जुन बोलावुन घेतले आणि प्रोत्साहन दिले, तो सर्व सवाई (३हि दिवस) मी त्यांच्या बरोबर ऐकला आणि फिरोज जी त्यांना जे जे भेटायला येत त्यांना माझी आवर्जुन माझी ओळख करुन देत... लेख वाचुन आठवण जागी झाली.
अनेक वेळा सवाईमध्ये प्रत्यक्ष 'गोपाला...' अनुभवलेला,
अमिगो
अतिशय छान लेख!!
मी लेख वाचून इतका भारावून गेलो, की असं वाटलं.... दस्तुरबुवांची भेट आपल्यालाही घेता आली असती तर!
(पण एक गडबड झाली...! सर्व प्रतिक्रियाकारांनी आपापल्या प्रतिक्रियांमधे
सगळेच चांगले शब्द वापरून घेतले की हो! मला वेगळा शब्द वापरायचा होता....
एकदम निशब्द झालो की हो!!!)
अप्रतिम व्यक्तिचित्र तात्या. मागे एका दस्तुरांच्या एका शिष्यांची कुठे तरी अशीच भेट झाली होती, त्यांनी सुद्धा असेच त्यांच्याबद्दल भरभरून सांगितले होते.
बिपिन.
तात्या, पं. दस्तूर हे एक खूप मोठे पण तसे सर्वसामान्यांसमोर फारसे न आलेले कलावंत. वरती चतुरंग आणि विकास यांनी लिहिल्याप्रमाणे त्यांच्या गाण्याचा एखादा दुवा दिलात आणि त्यांच्या बद्दल अधिक माहिती लिहिता आली तर पहा. मुख्य म्हणजे पारशी समाजात 'आंग्ल' प्रभाव जास्त असून सुद्धा ते अभिजात हिंदुस्तानी संगिता कडे कसे वळले, त्यांना ही आवड कशी लागली, गुरूंची भेट कशी झाली, त्यांची साधना इ. जाणून घ्यायला आवडेल.
बिपिन.
गोपाला मेरी करुना..इथे ऐकता येईल.
फिरोज दस्तुर ह्यांच्याबद्दल मलाही अपार उत्सुकता आहे . उस्ताद अब्दुल करीमखां ह्या त्यांच्या (किराणा)घराण्याच्या अध्वर्युची आठवण व्हावी असेच फिरोजजींचे गायन आहे. डोळे मिटून ऐकले तर त्याची प्रचिती नक्कीच येते.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
esakal/06122008/Mumbai7548B37E8F.htm
मुंबई, ता. ११ - किराणा घराण्याचे गायक पं. फिरोज दस्तूर यांचे ध्वनिमुद्रित गायन ऐकण्याची संधी पु. ल. देशपांडे कला अकादमीने रसिकांसाठी दिली आहे.
हा कार्यक्रम येत्या बुधवारी (ता. १८) सायंकाळी ६.३० वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी सभागृहात होणार आहे. रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे.
किराणा घराण्याचे बुजुर्ग गायक पं. भीमसेन जोशी आणि डॉ. गंगूबाई हनगळ यांचे गुरुबंधू असलेले पं. फिरोज दस्तूर यांचे नुकतेक निधन झाले. त्यांनी गायलेली दुर्मिळ गीते या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत; शिवाय पं. अजय पोहनकर, पं. श्रीकांत देशपांडे, धनश्री पंडित हे पं. दस्तुरांविषयींच्या आठवणी सांगणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरेंद्र धनेश्वर करणार आहेत.
प्रतिक्रिया
अप्रतिम
अप्रतिम
सुंदर आठवणी तात्या!
हेच म्हणते...
आठवण आवडली
आठवण
++१
++१
वाचनिय....
मनापासून
सुरेख
मस्त
ह्रद्य
गोपाला...
मस्त लिहिलंय!
सुंदर
+१_________________________
वाचुन मन भरून आले
छान
वा! तात्या...
सुरेख.....
भावस्पर्शी आठवणी
असेच म्हणतो
>>
सुरेख आठवण !!!
सुरेख....
वा..
निशब्द!
भारून टाकलत
छान व्यक्तीचित्र..
अप्रतिम...
उत्तम व्यक्तिचित्र
आवडले
लेख आवडला.
आभार...
पं. फिरोज दस्तूर
पंडितजीं बद्दल अधिक माहिती?
इथे ऐकता येईल.
ई-सकाळ च्या वृत्तानुसार...
नक्की!