||श्रीरामसमर्थ ||
||जय जय रघुवीर समर्थ ||
आज रामनवमी :) रामनवमीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा !

घरी नेहमी प्रमाणे रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला ...हा कार्यक्रम म्हणजे एक सोहळाच असतो ... अगदी गल्लीतले लोकही घरी उपस्थिती लावतात ... घरातीलच ७-८ पोरं त्यांचा कल्ला त्यातुन मग गल्लीतली ... दंगाच :)
इतक्या आरत्या असतात तरीही कोणालाच कंटाळा येत नाही जो तो तल्लीन होवुन गात असतो ...
ही आमच्या घरातील रामरायाची मुर्ती ( अंधारात फोटो घेताना चित्र थोडे ब्लर झाले :( असो) ही साक्षात रामदास स्वामींच्या नित्यपुजेतील एक मुर्ती आहे असे आजोबा सांगायचे .... शिवाय ह्या मुर्तीत आणि गडावरील मुर्तीत कमालीचे सार्धम्य आहे ( असे मला वाटते)
उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।लिंगदेह-लंकापुरि विध्वंसूनी ॥
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥
जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ध्रु० ॥
प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।लंका दहन करुनी अखया मारिला ॥
मारिला जंबूमाळी बुवनीं त्राहाटीला । आनंदाची गुढी घेउनियां अला ॥ जय० ॥ २ ॥
निजबळें निजशक्ति सोडविली सीता ।म्हणुनी येणें झालें आयोध्यें रघुनाथा ॥
आनंदें वोसंडे वैराग्य भरता ।आरति घेउनि आली कौसल्या माता ॥ जय० ॥ ३ ॥
अनहत ध्वनि गर्जति अपार ।अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ॥
अयोध्येसी आले दशरथकुमार ।नगरीं होत आहे आनंद थोर ॥ जय० ॥ ४ ॥
सहज सिंहासनीं राजा रघुवीर ।सोSहंभावें तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।माधवदासा स्वामी आठव ना विसर ॥ जय० ॥ ५ ॥
(पाठ आहे पण लिहिण्याचे कष्ट नको म्हणुन अंतर्जालावरुन साभार चोप्य पस्ते :) )
मुळात रामयण हे प्रतिकात्मक आहे असे लहान पणापासुन ऐकत आलो आहे , तदनुषंगाने एक लेखही वाचला होता खुप वर्षांपुर्वी ... पण आता ही आरती ऐकताना आता त्यातले थोडेफार कळते ...उमगते.
श्रीराम हे आत्मा आहेत , सीतामाई महामाया , लक्ष्मण हे विवेकाचे प्रतिक , भरत शत्रुघ्न हे अनन्य भक्तीभावाचे प्रतिक ....तर मारुतीराया आपला मारुतीराया साधनेचे , उपासनेचे प्रतिक आहे (आणि म्हणुनच मारुतीरायाला इतके प्रचंड महत्व आहे स्वरुपसंप्रदायात !! अगदी प्रभु रामही म्हणतात "हे मारुतीराया , माझ्या पंचप्राणांनी तुझी आरती ओवाळली तरी तुझे उपकार फिटणार नाहीत !") ...
लंका ही लिंगदेहाची प्रतिक आहे , सारे राक्षस हे काम क्रोधाधिक विकारांचे तर रावण हा साक्षात देहअहंभाव , देहबुध्दीचे प्रतिक ! हे असे घनघोर युध्द आहे ... आजही चालु आहे !
अनहत ध्वनी गर्जति अपार ... अठरा पद्मे वानर करती भुभु:कार ....अयोध्येसी आले दशरथ कुमार ....नगरी होत आहे आनंद थोर ....
आपला देह ही अयोध्यापुरी , त्यात आता आत्मतत्वाची जाणीव आणि विवेकाचे आगमन झाले आहे , अनहतध्वनी (म्हणजे कोणताही आघात न करता उमटणारे ) उमटत आहेत... अंगावर अगणित रोमांच उभे राहिलेत ... आनंआचे डोही आनंद तरं अशी अवस्था झाली आहे ...
सहज सिंहासनीं राजा रघुवीर | सोSहंभावें तया पूजा उपचार ||... सोSहंभावें...सोSहंभावें...... अहाहा !!
दीपोत्सव
जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागम शोधितां न कळे गुणसीमा ॥ ध्रु० ॥
नाना देही देव एक विराजे । नाना नाटक लीला सुंदर रूप साजे ।
नाना तीर्थी क्षेत्रीं अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंडब्रह्मांडीं गाजे । जय देव० ॥ १ ॥
बहुरूपी बहुगुणी बहुतां काळांचा ।हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा ॥
युगानुयुगीं आत्मराम हा आमुचा । दास म्हणे महिमा न बोलवे वाचा । जय देव० ॥ २ ॥
आज रामनवमी ! रामदासस्वामींचीही जयंती !! त्यांनी लिहिलेल्या अनेक आरत्यां पैकी ही वरील आरती माझी सर्वात आवडती ! दोनच कडव्यात विषय कट !!
दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ... दास म्हणे महिमा न बोलवे वाचा .... याउपर आता काय बोलणार ?
(तसेच सद्गुरुंची ...जय देव जय देव जय करुणाकरा , आरति ओवाळु सद्गुरु माहेरा ही आरतीही अप्रतिम आहे , त्याविषयी नंतर कधीतरी )
राम
आरती रामदासा ।भक्तविरक्त -ईशा ॥
उगवला ज्ञानसूर्य ।उजळोनी प्रकाशा ॥ ध्रु० ॥
साक्षात शंकराचा ।अवतार मारुती ॥
कलिमाजीं तेचि जाली ।रामदासांची मूर्ती ॥ आरती० ॥ १ ॥
वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला ॥
जडजीवां उद्धरीले ।नृप शिवासी तारिलें ॥ आरती० ॥ २ ॥
ब्रह्मचर्य व्रत ज्याचें ।रामरूप सृष्टि पाहे ॥
कल्याण तिहीं लोकीं ।समर्थ सद्गुरु पाहे ॥ आरती० ॥३ ॥

(http://www.samarthramdas400.in ह्या साईट वरुन साभार ... इथे समर्थांचे बरेचसे साहित्य दृकश्राव्य स्वरुपात उपलब्ध आहे !)
आरत्या संपतात ...मंत्रपुष्पांजली होते ...तिर्थप्रसाद वाटला जातो ... मग उपास आणि महाप्रसादाच्या नावाखाली मस्त शाबुदाण्याची खिचडी बटाट्याची भाजी असा तुडुंब बेत होतो ....
दुपारची वेळ ...आता सारे पेंगुळलेत ... काही जण आधीच वामकुक्षी आसनात विराजमान झालेत ...
देवघरात आता फक्त राम आहे आणि मी त्याच्या समोर शांत तेवणारी समई ... मंद उदबत्तीचा धुपाचा रेंगाळणारा सुवास (आणि माझ्या समोर लॅपटॉप :P) ...श्रीराम जय राम जय जय राम च्या ट्युटर शांत स्वरात वाजत आहे ... आणि बागेतल्या कोकिळाचा अधुन मधुन येणारा आवाज सोडले तर बाकी पुर्ण शांतता ...
कदा वोळखीमाजि दूजें दिसेना | मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना |
बहूतां दिसा आपुली भेटि जाली | विदेहीपणें सर्व काया निवाली ||
जय जय रघुवीर समर्थ
_______________________________________________________________________________________
(मलाकाही काडी मात्र अक्कल नाही जे काही मोडके तोडके उमगले ते लिहिले .... अधिकार नसता लिहिले | क्षमा केली पाहिजे || )
तुमची थोडी वेगळी शैली आहे प्रवासवर्णन लिहीण्याची...
In reply to तुमची थोडी वेगळी शैली आहे प्रवासवर्णन लिहीण्याची... by केदार-मिसळपाव
(No subject)
In reply to तुमची थोडी वेगळी शैली आहे प्रवासवर्णन लिहीण्याची... by केदार-मिसळपाव
प्रयत्न चालू आहे
फोटो भरपूर टाकलेत ते छान
In reply to फोटो भरपूर टाकलेत ते छान by कंजूस
प्रयत्न चालू आहे
In reply to फोटो भरपूर टाकलेत ते छान by कंजूस
+२
अथ
अथ
खरच तुम्हाला वेळ मिळेल तसे
In reply to खरच तुम्हाला वेळ मिळेल तसे by त्रिवेणी
प्रयत्न चालू आहे
फोटो छान आलेत
In reply to फोटो छान आलेत by दिपक.कुवेत
प्रयत्न चालू आहे
आमच्या गणेशानं 'वेळात वेळ'
अरे वा एकाच दिवशी २ जिलेब्या
In reply to अरे वा एकाच दिवशी २ जिलेब्या by प्रमोद देर्देकर
प्रयत्न चालू आहे
वेकम अॅबोर्ड! स्वागत आहे.
अहो काय इंटरनेटचा कोटा संपत
सुंदर फोटो. जरा अजून जास्त
कोची, मुन्नार, टॉप स्टेशन, अल्ल्लपुशा...
याई याई यायी चेन्नई एक्स्प्रेस आठवले..
या दिवाळीत केरळ फिक्स!!
In reply to या दिवाळीत केरळ फिक्स!! by किसन शिंदे
मज्जा आहे खरच अप्रतिम आहे
सविस्तर लिहा खरच!
आवडले.