||श्रीरामसमर्थ ||
||जय जय रघुवीर समर्थ ||
आज रामनवमी :) रामनवमीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा !
घरी नेहमी प्रमाणे रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला ...हा कार्यक्रम म्हणजे एक सोहळाच असतो ... अगदी गल्लीतले लोकही घरी उपस्थिती लावतात ... घरातीलच ७-८ पोरं त्यांचा कल्ला त्यातुन मग गल्लीतली ... दंगाच :)
इतक्या आरत्या असतात तरीही कोणालाच कंटाळा येत नाही जो तो तल्लीन होवुन गात असतो ...
ही आमच्या घरातील रामरायाची मुर्ती ( अंधारात फोटो घेताना चित्र थोडे ब्लर झाले :( असो) ही साक्षात रामदास स्वामींच्या नित्यपुजेतील एक मुर्ती आहे असे आजोबा सांगायचे .... शिवाय ह्या मुर्तीत आणि गडावरील मुर्तीत कमालीचे सार्धम्य आहे ( असे मला वाटते)
उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।लिंगदेह-लंकापुरि विध्वंसूनी ॥ कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥ जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ध्रु० ॥ प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।लंका दहन करुनी अखया मारिला ॥ मारिला जंबूमाळी बुवनीं त्राहाटीला । आनंदाची गुढी घेउनियां अला ॥ जय० ॥ २ ॥ निजबळें निजशक्ति सोडविली सीता ।म्हणुनी येणें झालें आयोध्यें रघुनाथा ॥ आनंदें वोसंडे वैराग्य भरता ।आरति घेउनि आली कौसल्या माता ॥ जय० ॥ ३ ॥ अनहत ध्वनि गर्जति अपार ।अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ॥ अयोध्येसी आले दशरथकुमार ।नगरीं होत आहे आनंद थोर ॥ जय० ॥ ४ ॥ सहज सिंहासनीं राजा रघुवीर ।सोSहंभावें तया पूजा उपचार । सहजांची आरती वाद्यांचा गजर ।माधवदासा स्वामी आठव ना विसर ॥ जय० ॥ ५ ॥(पाठ आहे पण लिहिण्याचे कष्ट नको म्हणुन अंतर्जालावरुन साभार चोप्य पस्ते :) ) मुळात रामयण हे प्रतिकात्मक आहे असे लहान पणापासुन ऐकत आलो आहे , तदनुषंगाने एक लेखही वाचला होता खुप वर्षांपुर्वी ... पण आता ही आरती ऐकताना आता त्यातले थोडेफार कळते ...उमगते. श्रीराम हे आत्मा आहेत , सीतामाई महामाया , लक्ष्मण हे विवेकाचे प्रतिक , भरत शत्रुघ्न हे अनन्य भक्तीभावाचे प्रतिक ....तर मारुतीराया आपला मारुतीराया साधनेचे , उपासनेचे प्रतिक आहे (आणि म्हणुनच मारुतीरायाला इतके प्रचंड महत्व आहे स्वरुपसंप्रदायात !! अगदी प्रभु रामही म्हणतात "हे मारुतीराया , माझ्या पंचप्राणांनी तुझी आरती ओवाळली तरी तुझे उपकार फिटणार नाहीत !") ... लंका ही लिंगदेहाची प्रतिक आहे , सारे राक्षस हे काम क्रोधाधिक विकारांचे तर रावण हा साक्षात देहअहंभाव , देहबुध्दीचे प्रतिक ! हे असे घनघोर युध्द आहे ... आजही चालु आहे ! अनहत ध्वनी गर्जति अपार ... अठरा पद्मे वानर करती भुभु:कार ....अयोध्येसी आले दशरथ कुमार ....नगरी होत आहे आनंद थोर .... आपला देह ही अयोध्यापुरी , त्यात आता आत्मतत्वाची जाणीव आणि विवेकाचे आगमन झाले आहे , अनहतध्वनी (म्हणजे कोणताही आघात न करता उमटणारे ) उमटत आहेत... अंगावर अगणित रोमांच उभे राहिलेत ... आनंआचे डोही आनंद तरं अशी अवस्था झाली आहे ... सहज सिंहासनीं राजा रघुवीर | सोSहंभावें तया पूजा उपचार ||... सोSहंभावें...सोSहंभावें...... अहाहा !! दीपोत्सव
जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागम शोधितां न कळे गुणसीमा ॥ ध्रु० ॥ नाना देही देव एक विराजे । नाना नाटक लीला सुंदर रूप साजे । नाना तीर्थी क्षेत्रीं अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंडब्रह्मांडीं गाजे । जय देव० ॥ १ ॥ बहुरूपी बहुगुणी बहुतां काळांचा ।हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा ॥ युगानुयुगीं आत्मराम हा आमुचा । दास म्हणे महिमा न बोलवे वाचा । जय देव० ॥ २ ॥आज रामनवमी ! रामदासस्वामींचीही जयंती !! त्यांनी लिहिलेल्या अनेक आरत्यां पैकी ही वरील आरती माझी सर्वात आवडती ! दोनच कडव्यात विषय कट !! दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ... दास म्हणे महिमा न बोलवे वाचा .... याउपर आता काय बोलणार ? (तसेच सद्गुरुंची ...जय देव जय देव जय करुणाकरा , आरति ओवाळु सद्गुरु माहेरा ही आरतीही अप्रतिम आहे , त्याविषयी नंतर कधीतरी ) राम
आरती रामदासा ।भक्तविरक्त -ईशा ॥ उगवला ज्ञानसूर्य ।उजळोनी प्रकाशा ॥ ध्रु० ॥ साक्षात शंकराचा ।अवतार मारुती ॥ कलिमाजीं तेचि जाली ।रामदासांची मूर्ती ॥ आरती० ॥ १ ॥ वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला ॥ जडजीवां उद्धरीले ।नृप शिवासी तारिलें ॥ आरती० ॥ २ ॥ ब्रह्मचर्य व्रत ज्याचें ।रामरूप सृष्टि पाहे ॥ कल्याण तिहीं लोकीं ।समर्थ सद्गुरु पाहे ॥ आरती० ॥३ ॥
(http://www.samarthramdas400.in ह्या साईट वरुन साभार ... इथे समर्थांचे बरेचसे साहित्य दृकश्राव्य स्वरुपात उपलब्ध आहे !)
आरत्या संपतात ...मंत्रपुष्पांजली होते ...तिर्थप्रसाद वाटला जातो ... मग उपास आणि महाप्रसादाच्या नावाखाली मस्त शाबुदाण्याची खिचडी बटाट्याची भाजी असा तुडुंब बेत होतो ....
दुपारची वेळ ...आता सारे पेंगुळलेत ... काही जण आधीच वामकुक्षी आसनात विराजमान झालेत ...
देवघरात आता फक्त राम आहे आणि मी त्याच्या समोर शांत तेवणारी समई ... मंद उदबत्तीचा धुपाचा रेंगाळणारा सुवास (आणि माझ्या समोर लॅपटॉप :P) ...श्रीराम जय राम जय जय राम च्या ट्युटर शांत स्वरात वाजत आहे ... आणि बागेतल्या कोकिळाचा अधुन मधुन येणारा आवाज सोडले तर बाकी पुर्ण शांतता ...
कदा वोळखीमाजि दूजें दिसेना | मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना |
बहूतां दिसा आपुली भेटि जाली | विदेहीपणें सर्व काया निवाली ||
जय जय रघुवीर समर्थ
_______________________________________________________________________________________
(मलाकाही काडी मात्र अक्कल नाही जे काही मोडके तोडके उमगले ते लिहिले .... अधिकार नसता लिहिले | क्षमा केली पाहिजे || )
||तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ||
||इदं न मम् ||
वाचने
9780
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
|| श्रीराम जयराम जयजयराम ||
फारच छान
तुमचे देवघर पाहुन खुप छान
मस्त !!!
वैयक्तिक परसेप्शनला सरसकट
In reply to मस्त !!! by धन्या
वैयक्तिक परसेप्शनला सरसकट
In reply to वैयक्तिक परसेप्शनला सरसकट by प्यारे१
देव/ ईश्वर नाही हे नि असे
In reply to वैयक्तिक परसेप्शनला सरसकट by धन्या
देव/ ईश्वर नाही हे नि असे
In reply to देव/ ईश्वर नाही हे नि असे by प्यारे१
ठंड रखो...!
In reply to देव/ ईश्वर नाही हे नि असे by प्यारे१
जैसन हुकूम सरकार.
In reply to ठंड रखो...! by अर्धवटराव
प्रतिसाद देणार नव्हतो तरी
In reply to जैसन हुकूम सरकार. by प्यारे१
>>>बाकी आपण सुज्ञ आहात !!
In reply to प्रतिसाद देणार नव्हतो तरी by सूड
आवडला प्रतिसाद.
In reply to प्रतिसाद देणार नव्हतो तरी by सूड
सुड यांचा प्रतिसाद आवडला.
In reply to आवडला प्रतिसाद. by अजया
सुड बोलत आहे म्हणजे मार्मीकच.
In reply to प्रतिसाद देणार नव्हतो तरी by सूड
ह्याबरोबरच ईश्वर स्वीकारणारे
In reply to सुड बोलत आहे म्हणजे मार्मीकच. by आत्मशून्य
@पण दुसरं काही खात नाही हो
In reply to ह्याबरोबरच ईश्वर स्वीकारणारे by प्यारे१
वरती अर्धवटराव यांनी
In reply to @पण दुसरं काही खात नाही हो by अत्रुप्त आत्मा
मुद्दे वेगळे आहेत.
In reply to @पण दुसरं काही खात नाही हो by अत्रुप्त आत्मा
मुद्यातच चुकलात बघा!
In reply to मुद्दे वेगळे आहेत. by प्यारे१
आत्मुसशी सहमत.
In reply to मुद्यातच चुकलात बघा! by अत्रुप्त आत्मा
जल्ला म्होरां तोऽऽऽऽ
In reply to मुद्दे वेगळे आहेत. by प्यारे१
मियां इलंय
In reply to जल्ला म्होरां तोऽऽऽऽ by सूड
प्रत्येकाची गांजा ओढायची
In reply to ठंड रखो...! by अर्धवटराव
देव/ ईश्वर नाही हे नि असे
In reply to देव/ ईश्वर नाही हे नि असे by प्यारे१
अरारारारा!
In reply to देव/ ईश्वर नाही हे नि असे by धन्या
तुम्ही सोयीचे अर्थ काढत आहात.
In reply to अरारारारा! by प्यारे१
संतांच्या वाङ्मयाचा मुख्य
In reply to देव/ ईश्वर नाही हे नि असे by प्यारे१
पूर्ण दासबोध नको. पहिल्या
In reply to संतांच्या वाङ्मयाचा मुख्य by धन्या
@खुप काही उरतं. मात्र ते
In reply to वैयक्तिक परसेप्शनला सरसकट by धन्या
ओ ओ धन्याकाका,
In reply to मस्त !!! by धन्या
@' नसे राम ते धाम सोडोनि
In reply to ओ ओ धन्याकाका, by कवितानागेश
ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर |
In reply to ओ ओ धन्याकाका, by कवितानागेश
समर्थांसारखी लोकं लै विषयांवर
In reply to ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर | by बॅटमॅन
हे मात्र खरं.
In reply to समर्थांसारखी लोकं लै विषयांवर by कवितानागेश
तुमच्या मताचा आदर आहे.
In reply to हे मात्र खरं. by प्रचेतस
तुमच्या मताशी सहमत आहेच.
In reply to तुमच्या मताचा आदर आहे. by धन्या
समर्थ रामदास, त्यांचे लेखन
In reply to तुमच्या मताचा आदर आहे. by धन्या
इ
In reply to समर्थांसारखी लोकं लै विषयांवर by कवितानागेश
तिकडे लक्ष वेधले तर लोक इतके
In reply to इ by बॅटमॅन
अहो ताई, मी माझ्या प्रतिसादात
In reply to समर्थांसारखी लोकं लै विषयांवर by कवितानागेश
असो!
In reply to अहो ताई, मी माझ्या प्रतिसादात by धन्या
व्वा..
+१
In reply to व्वा.. by अनुप ढेरे
लईच झ्याक लिवलंय की
दीपोत्सव
In reply to लईच झ्याक लिवलंय की by सूड
मूर्ती बाकी सुबक आहे हो!! आणि
In reply to दीपोत्सव by प्रसाद गोडबोले
मुर्ती पाहुन शांत शांत वाट्ले
चालेल की ...
In reply to मुर्ती पाहुन शांत शांत वाट्ले by स्मिता श्रीपाद
समयोचित सुंदर लेख!!
जय श्रीराम.
रामजन्मोत्सवाचा धागा पाहून
छान लिहिलंय!
माझ्यामते शेषनाग असावा. राम
In reply to छान लिहिलंय! by पैसा
रामराया किती सुरेख गोजिरा
सुंदर लेख
समर्थ
+++१११
In reply to समर्थ by पिवळा डांबिस
राम नवमीच्या शुभेच्छा. जय
लेखन व चित्रे आवडली हो
हो! मलापण फार आवडली
In reply to लेखन व चित्रे आवडली हो by रेवती
असेच म्हणतो.. बाकी वादविवाद
In reply to हो! मलापण फार आवडली by स्पंदना
राम दर्शन
मूर्ती फारच लोभस आहे.
उत्तम लेख