मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ए टी एम मशीन !

तुमचा अभिषेक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माणसाची किंमत जिथे पैश्यात मोजली जाते तो हा जमाना. तिथे एटीएम मशीन म्हणजे वजन काटा. त्यातून खडखड आवाज करत बाहेर पडणार्‍या कोर्‍या करकरीत नोटा तुमचे आजचे वजन. पाठोपाठ तुमची समाजातील पत लिहून येणारी बॅंकबॅलन्स स्लीप. आठ हजार रुपये मी काढले होते आणि शिल्लक जमा तिच्यावर दाखवत होती तब्बल चार लाख, चौसष्ट हजार, आठशे सतरा रुपये. आजची तारीख तेवीस. पगाराला आठवडा बाकी. तो झाला की हा आकडा सव्वापाचच्या घरात. महिन्याभरात मोठा खर्च न आल्यास पुढच्या महिन्याअखेरीस मी पाच लाखाच्या क्लबमध्ये हक्काने विराजमान होणार होतो. हा हिशोब लावतच मी बाहेर पडलो तर समोर तोच तो मगासचा रखवालदार. "क्या टाईम हुआ साहबजी?" ......

निवडणुकीचा बिगुल . . .

संचित प्रमोद कुलकर्णी ·
लेखनविषय:
निवडणुकीचा बिगुल देशभर वाजला कालचा तो 'आम आदमी', आज एकदम खास झाला कॉलर पकडणारे हात, नमन करू लागले ओळख विसरलेल्या चेहेऱ्यावरती, भुलवणारे हसू खुलू लागले झोपड्यातलं ते फाटक पातळ, नव्या साडीत बदलून गेलं व्हरांड्यातल्या गांजलेल्या नळांना, ५ वर्षांनी परत पाणी आलं रस्त्यामधले काल परवाचे खड्डे, अचानकच हरवून गेले पल्याड गावच्या दुष्काळग्रस्तांना, एका रात्रीत अनुदान मिळाले शेकडो पोकळ आश्वासनांचा, रोजचा रतीब चालू झाला सफेद सदरेवाल्यांचा घोळका, दारोदारी फिरू लागला चार महिन्यांचा सारा खेळ, पुन्हा सगळं तसंच घडणार पुन्हा पदरी तीच निराशा, आमचा शेतकरी पुन्हा रडणार रस्त्यांवरती तसेच खड्डे, पुन्हा रस्

शेअर-बाजार : वेळ साधणे (timing) नव्हे, वेळ देणे (time) महत्वाचे

प्रसाद भागवत ·
सहा एक महिन्यापुर्वीची गोष्ट, "साहेबा, दुपारी आहेस का रे ऑफिसांत? चक्कर टाकुन जावी म्हणतो---" वडिलांचे स्नेही श्री. गोखले काकांचा फोन वाजला. आवाजावरुन बहुधा काही तरी गडबड आहे असे वाटल्याने मी "हो, हो नक्की आहे.सहजच येताय ना? की काही काम?? असे विचारले, त्यावर काकांनी "अरे, श्रीरंगने अमेरिकेला जाण्यापुर्वी काही पैसे त्याच्या ओळखीच्या बॅकरकडे दिले होते त्याचा फोलियो सांभाळायला, पण बोंब आहे हो सगळी, XXXच्या फक्त जाहिराती बघुन घ्या--- अशी मध्यमातली सुरवात करुन लवकरच षड्ज लावला. दुपारी काका माझ्या ऑफिसमध्ये येते झाले.

भारतीय क्रिकेट नियामक मंड्ळाच्या अध्यक्षपदी गावस्कर यांची नियुक्ती

प्रसाद भागवत ·
एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणुन गावस्कर हे अद्वितिय आहेत, त्यांची कारकिर्द दैदिप्यमान आणि अभिमानास्पद आहे आणि ते आजही आमच्या पिढीचे हिरो आहेत ही वस्तुस्थिती असुनही मा.

काँग्रेसचे नक्षलवाद्यांशी संधान?

मंदार दिलीप जोशी ·
सत्तापिपासू काँग्रेसने आता देशद्रोहाचा मार्ग अवलंबला आहे की काय अशी शंका घेणारी एक बातमी. काँग्रेसचे नक्षलवाद्यांशी संधान? राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविण्याची घाई झालेल्या काँग्रेसने लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी नक्षलवाद्यांची मदत मागितली असल्याची धक्कादायक माहिती 'लोकसत्ता'च्या हाती आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह हे यासाठी नक्षलवाद्यांच्या संपर्कात होते.

रूमानी

अनाम ·
लेखनविषय:
देवांचे देव्हारे नेहमीच गच्च असतात अन तुझा हट्ट दूरवर वसलेल्या सिद्धेश्वराचा. दुर वळणावळणाच्या रस्त्यावर वाहत जातो मीच माझ्या गाण्याबरोबर थोडा उथळ होतो. सिद्धेश्वरही तस तसा उदास  होत जातो.

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ७

स्पार्टाकस ·
के २ वर यशस्वी चढाई करून उतरणा-या गिर्यारोहकांपुढे काय वाढून ठेवलेलं होतं ? रात्री ८.०० मार्को कन्फर्टोला शिखरावर काही मिनीटंच थांबून ताबडतोब परत फिरला होता. त्याच्या बरोबर कॅस वॅन डी गॅवेल होता. डच मोहीमेतील इतर गिर्यारोहक अगोदरच परतीच्या वाटेला लागलेले होते. लार्स नेसाच्या पाठोपाठ खाली उतरत असलेल्या सेसील स्कॉगला रॉल्फ बेई आपली वाट पाहत थांबला असेल याची कल्पना होती. काही अंतर उतरून आल्यावर तिने त्याला हाका मारण्याचा सपाटा लावला, मात्र एकाही हाकेला ओ येईना !

अदलाबदल

शुचि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वीणा, आनंद दोघांनीही घाईघाईनी नाश्ता उरकला अन पायात कसेबसे बूट्/सँडल्स चढवून दोघेही आपापल्या वाटांनी कचेरीकडे पळाले. वीणा बसमध्ये चढली तरी डोक्यात विचारांच चक्र अव्याहत चालूच होते. - हं पांघ्रुणांच्या घड्या तर केल्यात पण रचून ठेवायला विसरले.- जाऊ देत संध्याकाळी पाहीन. - बरं आज भाजीही भेंडीची, आनंदच्या नावडीची आहे : ( - प्रयत्न तर केला आहे मसालेदार बनवायचा पण त्याला नेहमीप्रमाणे नाहीच आवडणार. - हे अस्सं आहे - कुठे कुठे मी एकटी पुरी पडणार? - उन्नीस्-बीस होणारच पण आपण जरा कमी पडलो की मन कुरतडत रहातं. मनाला कोण समजावणार?

मागोवा लोकसभा निवडणुकांचा..३ दुस-या लोकसभा निवडणुका- १९५७

लाल टोपी ·
मागोवा लोकसभा निवडणुकांचा..१ पहिल्या लोकसभा निवडणुकीचे आव्हान मागोवा लोकसभा निवडणुकांचा..२ पहिल्या लोकसभा निवडणुका- १९५१-५२ पहिल्या निवडणुकांचे अविश्वसनीय वाटणारे शिवधनुष्य सहजपणे पेलल्यानंतर खरोखरीच भारताला लोकशाहीचा प्रयोग कितपत यशस्वीपणे राबवता येईल याबाबत असणा-या शंका ब-याच प्रमाणात मिटल्या.

एकटा जगी मी उरलो

निलरंजन ·
लेखनविषय:
काव्यरस
ज्या नात्यांच्या भरवश्यावर स्वप्नांचे मी बांधले इमले त्या नात्यांचे बंध अलगदच सुटले धरूनी कराशी जयांना जपले मी उराशी माझ्या प्रेमापेक्षा त्यांनी पैश्यांनाच धरिले उराशी ज्यांची होती आस त्यानींच केले जीवन उदास उबदार माझे घरटे आता का रे झाले भकास आधार ज्यांचा धरूनी उठावे ते दोर आधाराचे उठण्या आधीच विरले आपले विश्व तू एकट्या ने विसरावे नातं तुझे माझे एवढ्यातच तोडले विश्वास ठेवावा तरी कुणावर जगी माझे कुणीच नाही उरले आपलेसे केले ज्यांना तेच माझ्या जीवावर उठले जळते निखारे पदरी टाकून हृदय पेटवून ते गेले काडी टाकून अविश्वासाची अपकार कराया न विसरले संपली आशा उद्याची नयनांचेही बांध फुटले खंज