मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

2. महागात पडले बॉससाठी पीक कॅपची धावाधाव करणे! - हरवले ते गवसले का?

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हरवले ते गवसले का? व कसे? प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से...

संतापजनक भाऊबंदकी

हुप्प्या ·
गेले अनेक दिवस ठाकरे बंधुंंमधे कलगीतुरा झडतो आहे. कुणी कुणाला सूप पाठवले, कुणी कुणाला फोन करायला हवा होता , बाळासाहेबांचे स्मारक कधी, कसे, किती पैशात वगैरे वगैरे अनेक निरर्थक मुद्दे उगाळले गेले. नेहमीची राडेबाजी, मारामार्‍या वगैरे "विधायक" कार्यक्रमही उत्साहात पार पडले. ह्या कुठल्याही मुद्द्यांत जनतेचे भले करण्याची भाषा नाही. निव्वळ वारसाहक्कावरून भाऊबंदकी.

दानत

वेल्लाभट ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्या दिवशी ऑफिसला उशीर होणार अशी कल्पना होतीच. संध्याकाळचे सात वाजून गेले तरी काम चालू होतं. एरवी मिळणारी लिफ्ट आज मिळणार नव्हती त्यामुळे कसं जायचं याचे आडाखे मनात बांधले होते. कामाच्या व्यापात १० कसे वाजले कळलंच नाही. ट्रेन ने सगळ्यात पटकन प्रवास होईल असं म्हणून कांजूरमार्ग स्टेशन वर पोहोचलो. रात्रीचे सव्वा दहा वाजले होते. सीएसटी च्या बाजूकडील सर्व तिकिट खिडक्या बंद होत्या. एटीव्हीएम व कूपन मशीन्स चालू होती, पण नेहमीचा ट्रेन प्रवास नसल्याने माझ्याकडे स्मार्टकार्ड किंवा कूपन यापैकी काही नव्हतं त्यामुळे पंचाईत होती.

डु आयडी !

इरसाल ·
यदाकदाचित ह्यालेखाचे नाव व लेखकाचे नाव वाचुन लोकांना(कु)शंका वाटेल की माझा सध्या वेळ जात नसावा. तसे काही नाही फक्त मिपावर सध्या काही प्रतिसादांतुन जुन्याच असलेल्या सदस्यांनी काही नवे रुप घेवुन मिपावर पुनरावतार धारण केलेला असे जाणवते. त्यात तसे करण्याचा हा त्यांचा हेतु काय असावा, १. खोडसाळपणा २. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे. ३. उगाच दंगा करणे ४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे. ५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे. ६. संपादकांना त्रास देणे. असो.

'पर्समधील गणूचे लॉकेट शाबूत मिळाले' - हरवले ते गवसले का? व कसे? - १

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हरवले ते गवसले का? व कसे? प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से...

चर्चा भाग ३: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थीत मराठी :मान्यताप्राप्त नकाशातज्ञ तसेच कॉपीराईट क्षेत्रातील कायदेततज्ञांची अनुपलब्धता

माहितगार ·
मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थीत मराठी चर्चा मालिका: भाग १- भाग २ १) कार्टोग्राफर मान्यताप्राप्त नकाशांतज्ञच्या बाबतीत म्हणजे कार्टोग्राफरच्या बाबतीत खरेतर अनुपस्थित मराठी म्हणण्या पेक्षा आंतरजालावर अनुपस्थित भारतीय म्हणणे या धाग्याकरता अधिक उचीत ठरते. शासकीय यंत्रणे कडून जे काही (चुभूदेघे) कॉपीराईट नकाशे आंतरजालावर आहेत ते टेक्नीकली कॉपीराईटेड आहेत. मान्यताप्राप्त तज्ञ नसलेल्या इतरांनी बनवलेले नकाशे अचूकतेचा विश्वास देऊ शकत नाहीत.

डोंबिवली कट्टा वृत्तांत

भाते ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कट्टा ऊत्त्सवमुर्ती निनादने सुचवल्याप्रमाणे दरवेळी एकानेच संपुर्ण वृत्तांत लिहिण्याच्या प्रथेला छेद देऊन कोणीतरी एकाने सुरुवात करून बाकीच्यांनी त्या वृत्तांतांत प्रतिसादांमधुन भर घालायची असे ठरल्याने वृत्तांतांची सुरुवात करण्याचे काम माझ्यावर ढकलण्यात आले. साडेसातच्या सुमारास नंदी पॅलेस येथे जमायचे ठरले असल्याने मी हॉटेलसमोर जाऊन इतरांची वाट पहात ऊभा होतो. माझ्या समोरच आणखी एक गृहस्थ इतर कोणाचीतरी वाट पहात ऊभे होते. निनाद आल्यावर एकमेकांची ओळख करून घेऊन आम्ही दोघे आतमध्ये शिरलो.

अनाम वीरा...

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अनाम वीरा.... एखादे शब्द मनावर गारुड का करून जातात? जेंव्हा जीवनाची ठराविक एक अशी काहिही समज आलेली नसते,तेंव्हाही.आणि जेंव्हा ती आलेली आहे,असा भास होत असतो,तेंव्हांही!!! हे गाणं मी पूर्विही ऐकलय...आज घरी येता येता सहज ऐकलं. आणि ते तितक्याच सहजतेनी विसरलंही गेलं! आणि अत्ता कानात परत वाजू लागलं? का??? ही रात्रीची वेळ शांत असते म्हणून? की अणखि काही? मृत्यु..हा जिवनातला अविभाज्य भाग किंवा त्याचा शेवटचा परिणाम असला,तरी तो सहज/नैसर्गिक असेल तर नकोसा(च) वाटतो!

नरसोबाची वाडी

जातवेद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वांग्याच्या लेखावरून वाडीचा उल्लेख आला आणि आमचा पौर्णिमाक्रम आठवला. बरेच लोक वाडीला नरसोबाची वाडी म्हणतात पण इकडे सगळे नुस्त वाडीच म्हणतात. म्हैसूर डोसाला म्हैसूर मधे नुस्ताच डोसा म्हणतात त्यातला प्रकार. दर पौर्णिमेला वाडीला जाउन यायचे हा बर्‍याच जणांचा क्रम. मीही वडिलांच्या बरोबर म्हणून बर्‍याचदा जात असे. अगदी लहानपणीची वाडी आठवते ती म्हणजे खेळणी, ताजे पेढे आणि कवठाच्या बर्फी साठी. बरेच धार्मिक कार्यक्रम वाडीलाच व्हायचे, मग वाडीच्या पुजार्‍यांची मोठी मोठी थोड्या जुन्या प्रकाराची घरे, त्यांच्याकडच्या त्या तृप्त जेवणावळी आणि कृष्णेत मनसोक्त मारलेल्या डुबक्या.

पडघम २०१४- भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश

क्लिंटन ·
यापूर्वीचे लेखन भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक भाग २: क्रिटिकल मास या भागापासून मी विविध राज्यांमधील माझे अंदाज प्रसिध्द करत आहे. सुरवात मध्य प्रदेशपासून करत आहे.