गेले अनेक दिवस ठाकरे बंधुंंमधे कलगीतुरा झडतो आहे. कुणी कुणाला सूप पाठवले, कुणी कुणाला फोन करायला हवा होता , बाळासाहेबांचे स्मारक कधी, कसे, किती पैशात वगैरे वगैरे अनेक निरर्थक मुद्दे उगाळले गेले. नेहमीची राडेबाजी, मारामार्या वगैरे "विधायक" कार्यक्रमही उत्साहात पार पडले.
ह्या कुठल्याही मुद्द्यांत जनतेचे भले करण्याची भाषा नाही. निव्वळ वारसाहक्कावरून भाऊबंदकी.