पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा
दारास भास आता, हळूवार पावलांचा
गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले
निथळून साचलेले, तळवा भिजेल आता, हळूवार पावलांचा
झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले
जेव्हा भिजून गेले, पंखात नाद त्यांच्या हळूवार पावलांचा
पाऊल वाट सारी, रात्री भिजून गेली
विसरुन तीच गेली, ओला ठसा कुणाच्या हळूवार पावलांचा
गीतः-सौमित्र
================
आज अगदी दुपारपासून ह्या वरच्या गीतातल्या सगळ्या भाव भावना,मानाचा अगदी छळ करत आहेत.
दोन वर्षापूर्वी नविन गाडी घेतल्याची हौस म्हणण्यापेक्षा,पावसातला शांत गझल ऐकत फिरायचा आनंद अता कार मुळे आणखि स्वस्थ चित्तानी लुटता येणार..यासाठी,मन कुठे जाऊ? कुठे जाऊ?
वाचतेय..
लिखाणात अजुन सफाईदारपणा आलाय,
खूप छान वर्णन करताय !!! मीच
तीनही भाग आता एकत्रच वाचून
तीनही भाग वाचले आणि आवडले
कविताताई,
In reply to कविताताई, by सविता००१
मलाही.