✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाऊस दाटलेला..माझ्या 'मनामधे' हा..

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Fri, 08/01/2014 - 21:59  ·  लेख
लेख
पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा दारास भास आता, हळूवार पावलांचा गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले निथळून साचलेले, तळवा भिजेल आता, हळूवार पावलांचा झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले जेव्हा भिजून गेले, पंखात नाद त्यांच्या हळूवार पावलांचा पाऊल वाट सारी, रात्री भिजून गेली विसरुन तीच गेली, ओला ठसा कुणाच्या हळूवार पावलांचा गीतः-सौमित्र ================ आज अगदी दुपारपासून ह्या वरच्या गीतातल्या सगळ्या भाव भावना,मानाचा अगदी छळ करत आहेत. दोन वर्षापूर्वी नविन गाडी घेतल्याची हौस म्हणण्यापेक्षा,पावसातला शांत गझल ऐकत फिरायचा आनंद अता कार मुळे आणखि स्वस्थ चित्तानी लुटता येणार..यासाठी,मन कुठे जाऊ? कुठे जाऊ? करत होतं. पण मी पहिली नवी बाइक घेतली तेंव्हाही प्रथम गेलो,ते माझं जिवापाड प्रेम असलेल्या गावी,म्हणजे माझ्या अजोळीच.हरिहरेश्वरला! तेच मनात आलं आणि आषाढात सुरवातीलाच प्रचंड कोसळत असलेल्या पावसात,नवी गाडी आणि काही महिन्यांपूर्वीच घेतलेला नवा कॅमेरा,आवडत्या मराठी/हिंदी/ऊर्दू गीत गझलांनी भरलेला पेनड्राइव्ह...आणि आतल्या व बाहेरच्या पावसाची भेट घडवायला आसुसलेलं मन घेऊन..एका सकाळी निघालो. ताम्हाणिचा घाट नेहमीप्रमाणे चिंब होताच.. https://lh3.googleusercontent.com/-hobLpAGN7SQ/U9JbafOc49I/AAAAAAAAF5Y/j2QtdaAIdUo/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B300.jpg पण मला का कोण जाणे त्या ट्रीपमधे ताम्हिणीतलं आकर्षण फार वाटलं नाही. कारण मन कोकणातली लालमातिची भिजून चिंब झालेली घरं..कौलांपुढे लावलेल्या झावळ्यांवरून टपटपणारे पावसाचे चमकदार आणि टप्पोरे थेंब.. https://fbcdn-sphotos-h-a.akamaihd.net/hphotos-ak-xaf1/t1.0-9/q77/s720x720/999429_498477163571908_762122072_n.jpg दाट भिजलेली नारळी/पोफळीची झाडं... https://lh6.googleusercontent.com/-YsJXTIRVGXY/U9umzOXaNKI/AAAAAAAAGN4/T_HIMq8HT1U/w436-h581-no/IMG_20130818_103205.jpg आणि नारळी पोफळीच्या नाकावर टिच्चून भिजलेली आणि पहिल्यापासून मला मनमोहक वाटणारी ही केळ...! https://lh6.googleusercontent.com/-Br26kRAUaBY/U9JkwloEdpI/AAAAAAAAF9E/MBoT87c6la8/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B453.jpg आणि काहिशी गूढ वाटणारी कोकमाची झाडं! ही पुढची स्वप्न पहात होतं. या आषाढातही हाच सगळा बेत मनात होता,पण...यावेळी त्याच्यासह सारच हुकलं!..आणि अत्ता तो तसाच बरसून माझ्या मनाची वाट लावतोय.म्हणजे मी इथे आहे तो शरिरानी.मनानी गेला अठवडाभर तिकडेच जगतोय! अत्ता अतिबेचैन व्हायला लागलं आणि मग मनात ठरवलं ..हा सगळा पाऊस इथे सगळ्यां बरोबर वाटुन टाकू...आज आभाळ अगदी स्वच्छ झालं पाहिजे.कोरडेपणा येण्यापेक्षा ते बरं अगदी! कोकणातला पाऊस ..मुरतो..उरतो..आणि सर्वत्र यथेच्छ दिसत रहातो अगदी! १) https://lh5.googleusercontent.com/-Cm3U2CBu5IU/U9uonTxQMhI/AAAAAAAAGOI/Fl7ST6BAoig/w436-h581-no/IMG_20130818_103510.jpg https://lh3.googleusercontent.com/-Zpr2Wwnh-eM/U9uxdl470SI/AAAAAAAAGRg/yJtUpeCmaks/w436-h581-no/IMG_20130818_063105.jpg https://lh4.googleusercontent.com/-U1p4m3N4i7A/U9upZm38uII/AAAAAAAAGOQ/bkpoTFvwN0M/w436-h581-no/IMG_20130818_103543.jpg २)ही पावसानी निवळलेली वाडी..मंजे आमच्या रायगडी बोलीनुसार- "पावसानी मंजे यंदा शाप धुऊन टाकलान् अग्दी! https://lh3.googleusercontent.com/-GqXLpD-V_90/U9urYd1CzuI/AAAAAAAAGOw/CVI0ECqEPqE/w436-h581-no/IMG_20130818_103300.jpg https://lh6.googleusercontent.com/-wzo9GYTlpJ4/U9uvW36ZQ9I/AAAAAAAAGQ8/H1RiAeE2wUs/w436-h581-no/IMG_20130818_103234.jpg ३)रस्ता सुद्धा तीच साक्ष देतो! https://lh6.googleusercontent.com/-ffvfMThVVnY/U9Jefl2geCI/AAAAAAAAF6w/UKACOurCQng/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B305.jpg ४)आणि विहिरी...त्या काय मागे रहाणार होय!? अंतर्बाह्य खूण पटवतात अगदी! https://lh3.googleusercontent.com/-jkjjmnmUpdc/U9JcCgmVAmI/AAAAAAAAF54/HrnMcYFgr-k/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B301.jpg https://lh3.googleusercontent.com/-qXdJWI_Q0VI/U9utM90EtQI/AAAAAAAAGQs/uqKwBYbHc00/w436-h581-no/IMG_20130818_103530.jpg https://lh3.googleusercontent.com/-f6cqJQybbdA/U9ukKR0FuVI/AAAAAAAAGNg/Tocm_thPNqQ/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B434.jpg https://lh4.googleusercontent.com/-YDPdgq7-fSg/U9uhUUNWhWI/AAAAAAAAGNU/vik-gCREEI4/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B460.jpg https://lh6.googleusercontent.com/G2rWUvp4HNHbaJQlLVEOmytvKLpK11AqhSbVJCXOfHk=w774-h581-no https://lh4.googleusercontent.com/GskwShwvGiIMmwtCoUu3_Btrne5F14qENJxM-UkH1-s=w774-h581-no ५) ही फुलं ही पावसाळी..? की पावसानी फुललेली..? माहित नाही. पण मन अगदी गा.........र करुन टाकतात. https://lh3.googleusercontent.com/-2zWc-t6wgYs/U9uv4jyb-mI/AAAAAAAAGRE/9_RLEKNa3mA/w436-h581-no/IMG_20130818_101312.jpg https://lh3.googleusercontent.com/-lL4n7rziJtQ/U9uwhuJ1J8I/AAAAAAAAGRU/c_vDcv9nTnA/s512/IMG_20130818_083521.jpg https://lh3.googleusercontent.com/-yuF1eB_sCcE/U9uwJ76ahvI/AAAAAAAAGRM/ySfyLcU5qpc/w436-h581-no/IMG_20130806_134034.jpg ६) अगदी शेतांच्या मधून जाणारी पायवाट सुद्धा ओहोळाचं रूप घेते.. https://lh3.googleusercontent.com/-23H3PUN3yE4/U9JckHv1pnI/AAAAAAAAF6A/ALWU6VC4V3E/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B302.jpg ७) भातशेतं आणि डांबरी रस्त्याच्या मधले हे खळगे..छोट्या मोहक तळ्यात बदलून जातात. https://lh4.googleusercontent.com/bpYZjoC6o5L4Xl2IHgtgTPgf6nWSA8mEBaIivVFoldA=w774-h581-no ८) आणि नदीबाय तर भलतीच फुगते! एरवी आमच्या इकडे नदी..मंजे.."छ्छे..मेल्या ओहोळ सुद्दा नाय हो तो बारका..सा! https://lh4.googleusercontent.com/3xil66Izu3PktjLBL85yG4UMtoDq-22Tzyrz5KBJDls=w774-h581-no https://lh5.googleusercontent.com/3cto8y1xdssVJKcOD0lZPECEti819MuIZFBxKZwEHC4=w774-h581-no या नदी तळ्यांसह..नारळपोफळी....आणि माज्या लाडक्या केळीबाय सह वाडीविहिरीबरोबरचा..घराच्या कौलांवरून सरळ मनात ओघळणारा तो पाऊस.. मी एकट्यानी भरपूर म्हणजे अगदी भरपूर अंगावर घेतला.. २/३ दिवस चिंब होऊन..नंतर माझ्या लाडक्या मामाच्या घराचा आणि विशेषतः माझ्या मनाचा भाग असलेल्या त्या सार्‍या परिसराचा काहिश्या सुखद आणि जड मनानी निरोप घेऊन मी निघालो...ते पुन्हा माझ्या मूळपदावर.. पुण्याला यायला.. https://lh3.googleusercontent.com/-Ao2-YDsW2Jg/U9up-CJZYaI/AAAAAAAAGOY/fFZaeyEJk6Q/w436-h581-no/IMG_20130818_103729.jpg https://lh6.googleusercontent.com/-6xzEBlPsRow/U9u6Va0RhPI/AAAAAAAAGSE/xm8rEjC2N0w/w436-h581-no/IMG_20130818_103652.jpg https://lh3.googleusercontent.com/-HAqv8MFB8f0/U9u6J94s_tI/AAAAAAAAGR8/c-a__GRIWyw/w436-h581-no/IMG_20130818_083559.jpg https://lh4.googleusercontent.com/-BLCLDiTNJf4/U9uykGYnp2I/AAAAAAAAGRs/0Cwbklzr3gs/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B342.jpg =======================०००००००००००००००००००००००००००००००००=======================
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
13472 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

सुंदर !!!

धन्या
Fri, 08/01/2014 - 22:05 नवीन
सुंदर !!! माझं कोकणातील बालपण नजरेसमोर उभं राहीलं.
  • Log in or register to post comments

माझं

चौकटराजा
Sat, 08/02/2014 - 10:28 नवीन
माझं आणि इथल्या मिपावरच्या न भागलेल्या इतर काकांचं म्हातार पण नजरेसमोर आलं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मस्तच आत्माराव, नेलेत पार

तुमचा अभिषेक
Fri, 08/01/2014 - 22:15 नवीन
मस्तच आत्माराव, नेलेत पार कोकणात, डोळे हिरवेगार आणि जीव थंडगार करून टाकलात. कोकणातल्या हिरवळीतील टवटवीतपणा आणखी कुठे नाही. कुठल्याही दिशेने चौफेर कॅमेरा फिरवा डोळ्यांना लुभावणारेच त्यात टिपले जाणार. आपण मात्र छानच टिपलेय आणि अंगणातल्या तुळशीशिवाय सेट पुर्ण होणार नव्हताच.
  • Log in or register to post comments

मस्त...

मुक्त विहारि
Fri, 08/01/2014 - 22:15 नवीन
पुढचा कट्टा बुवांच्या आजोळी (हरिहरेश्वरला) करू या का?
  • Log in or register to post comments

मी ही भिजतोय.

प्रचेतस
Fri, 08/01/2014 - 22:20 नवीन
मी ही भिजतोय. घाटमाथ्यावरचा पाऊस कित्येकदा झेललाय. गणतीच नाही. पण कोकणात एकदाही भर पावसाळ्यात कधी जाणं झालंच नाही.
  • Log in or register to post comments

@पण कोकणात एकदाही भर

अत्रुप्त आत्मा
Fri, 08/01/2014 - 23:56 नवीन
@पण कोकणात एकदाही भर पावसाळ्यात कधी जाणं झालंच नाही.>>> आता यंदा नवरात्र झालं ,की पाऊस असला नसला तरिही आपली १ ट्रीप नक्की...भटकू फिरु..मु.वि.म्हणतात तो कट्टाही करु. मु.वि.- याल ना हो!? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आता भारतात आलो,,,

मुक्त विहारि
Sat, 08/02/2014 - 00:59 नवीन
की बुवांच्या बरोबर फेरफटका नक्की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सुरेख आहेत फोटू आणि लेखन.

रेवती
Fri, 08/01/2014 - 22:29 नवीन
सुरेख आहेत फोटू आणि लेखन. अनन्याची आठवण आली. मनात आलं की कोकणात जाता आलं पाहिजे.
  • Log in or register to post comments

सुंदर.

मधुरा देशपांडे
Fri, 08/01/2014 - 22:34 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

भिंगरी
Sat, 08/02/2014 - 00:11 नवीन
अगदी स्वतः पावसात, कोंकणात जाऊन आल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments

मस्तच

सखी
Sat, 08/02/2014 - 00:20 नवीन
सगळेच फोटो छान आलेत, कोकणातली हिरवाई मस्तच, नशिबवान आहात.
  • Log in or register to post comments

मस्त फोटो

बहुगुणी
Sat, 08/02/2014 - 00:47 नवीन
(नवीन गाडीबद्दल अभिनंदन!)
  • Log in or register to post comments

@(नवीन गाडीबद्दल अभिनंदन!) >>

अत्रुप्त आत्मा
Sat, 08/02/2014 - 00:57 नवीन
@(नवीन गाडीबद्दल अभिनंदन!) >>> अहो..ते आत्त्ता नाय..२ वर्षापूर्वीचं सांगताना सांगितलय. गाडी झाली आता २ वर्षाची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

गाडी दोन वर्षाची झाल्याबद्दल

आनन्दिता
Sat, 08/02/2014 - 01:47 नवीन
गाडी दोन वर्षाची झाल्याबद्दल अभिनंदन! *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अहो हो,

बहुगुणी
Sat, 08/02/2014 - 03:56 नवीन
अहो हो, ते वाचलं धाग्यात, पण इथे तुम्ही आता सांगितलं ना, म्हणून आता अभिनंदन. आणि तसंही अभिनंदन काय केंव्हाही स्वीकारता येतं, आता आनन्दिता म्हणतात तसं दोन वर्षांचं म्हणून माना, हाकानाका :-) बाकी फोटो बाकी मस्त आलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

@गाडी दोन वर्षाची झाल्याबद्दल

अत्रुप्त आत्मा
Sat, 08/02/2014 - 07:02 नवीन
@गाडी दोन वर्षाची झाल्याबद्दल अभिनंदन! >>> दुष्ष्ष्ष्ट! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

हरित कोकणाची हाक

शशिकांत ओक
Sat, 08/02/2014 - 15:27 नवीन
कोकणचाराजा अतृप्त का ते या चित्रकथीच्या काव्याच्या अविश्कारातून साकार झाले आहे.... जाता जाता... दोन वरिसं गाडी बाळगुन आहात हे विवाहोत्सुक स्थळांना कळवावे हा अंतस्थ हेतु साध्य व्हावा ही शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सर्व फोटो छान !

खटपट्या
Sat, 08/02/2014 - 02:15 नवीन
सर्व फोटो छान ! तीन नंबर ची विहीर खूप आवडली !! पण कोकमाचं झाड? झाड रातांब्याचे असते मग त्याचे कोकम बनवतात.
  • Log in or register to post comments

सुरेख! हिरवाई बघुन डोळे निवले

अजया
Sat, 08/02/2014 - 07:21 नवीन
सुरेख! हिरवाई बघुन डोळे निवले.आहेच आमचा भाग हिरवागार,त्यात पावसाळ्यात तर अधिकच देखणा!!
  • Log in or register to post comments

ते मंदिर आणि पुष्करिणीचे फोटो

प्रचेतस
Sat, 08/02/2014 - 08:52 नवीन
ते मंदिर आणि पुष्करिणीचे फोटो आहेत ते दिवेआगरच्या आमच्या लाडक्या रूपनारायण मंदिराच्या नुकत्याच झालेल्या जीर्णोद्धाराचे आहेत ना. :)
  • Log in or register to post comments

वल्ली

अत्रुप्त आत्मा
Sun, 08/03/2014 - 01:06 नवीन
वल्ली @लाडक्या रूपनारायण मंदिराच्या नुकत्याच झालेल्या जीर्णोद्धाराचे आहेत ना.>>> होय. तेच ते. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

फार सुंदर फोटो आहेत हो बुवा

किसन शिंदे
Sat, 08/02/2014 - 09:01 नवीन
फार सुंदर फोटो आहेत हो बुवा सगळे. यंदाच्या श्रावणात जातोय कोकणात....तिथला पाऊस अनुभवायला! :)
  • Log in or register to post comments

मस्त मस्त मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 08/02/2014 - 10:38 नवीन
सुंदरच फोटो आहेत सगळे, आपल कोकण आहेच मुळी देखण पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आत्मुबाबा एकदम भारी वृत्तांत

नानासाहेब नेफळे
Sat, 08/02/2014 - 10:39 नवीन
आत्मुबाबा एकदम भारी वृत्तांत आणि फोटो. रायगडची कोस्टल लाईन रत्नागिरी सिंधुदुर्गपेक्षा 'प्रेक्षणीय' आहे असे माझे वैयक्तीक मत आहे.
  • Log in or register to post comments

मस्तच...!

रुमानी
Sat, 08/02/2014 - 10:43 नवीन
पाउस म्हणटल कि अलगद ओठावर येते हे गान...:) गीत, फोटो , कोकणातली हिरवाई व पाउस....सगळेच अप्रतिम...!
  • Log in or register to post comments

मस्तच

कविता१९७८
Sat, 08/02/2014 - 10:44 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

मस्तच

psajid
Sat, 08/02/2014 - 10:48 नवीन
सगळेच फोटो छान आलेत, कोकणातली हिरवाई मस्तच
  • Log in or register to post comments

मस्त !!!

फिझा
Sat, 08/02/2014 - 10:54 नवीन
फ़ोटो सगळे अगदी मस्त !!! पोफळी म्हणजे काय हो....सुपारी ची झाड़े का ?
  • Log in or register to post comments

सुरेख !

सस्नेह
Sat, 08/02/2014 - 12:08 नवीन
'ओल्या हळुवार ' कोकण दर्शनाने ड्वाले भिजून चिंब झाले..
  • Log in or register to post comments

मस्त !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/02/2014 - 12:44 नवीन
कोकण, धो धो पाउस आणि हिरवागार परिसर ! मनाने कोकणाची एक मस्त सफर घडवलीत !! त्यात हरिहरेश्वर सारखे आवडते ठिकाण... म्हणजे सोन्याहून पिवळे !!! पहिला, दुसरा आणि "३)रस्ता सुद्धा तीच साक्ष देतो!" ही छायाचित्रे खास आवडली !
  • Log in or register to post comments

कविता आणि फोटो दोन्ही सुंदर!

अनुप ढेरे
Sat, 08/02/2014 - 12:59 नवीन
कविता आणि फोटो दोन्ही सुंदर!
  • Log in or register to post comments

मस्त...

माधुरी विनायक
Sat, 08/02/2014 - 13:15 नवीन
पाऊस कोसळू लागला की मन कोकणाकडे धाव घेऊ लागतं. आम्हीही लवकरच पोहोचू कोकणात प्रत्यक्ष... तोपर्यंत मात्र तुम्ही टिपलेलं कोकण पुन्ह-पुन्हा बघत राहणार...
  • Log in or register to post comments

बुवा, जणू हरिहरेश्वरला गेलोत असा आनंद झाला.

संजय क्षीरसागर
Sat, 08/02/2014 - 13:19 नवीन
उबदार वातावरणात, पाऊस फक्त पाहायला आणि ऐकायला आवडतो, तुमच्यामुळे ती संधी मिळाली. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

अप्रतीम फोटो

स्पा
Sat, 08/02/2014 - 16:45 नवीन
अप्रतीम फोटो एकच नंबर. __/\__ घर, विहिर ,कुंड,शेतं कचकाउन आलेत फोटो, क्या बात
  • Log in or register to post comments

नखशिखांत चिंब भिजलो. ___/\___

प्यारे१
Sat, 08/02/2014 - 17:30 नवीन
नखशिखांत चिंब भिजलो. ___/\___ धन्यवाद बुवा!
  • Log in or register to post comments

सुंदर कोकण....

प्रभाकर पेठकर
Sat, 08/02/2014 - 19:38 नवीन
मस्त छायाचित्र आणि मनःकथन. पुढच्या महिन्यात एखादी भारतभेट घडवून आणावी असा विचार आहे. पाहूया स्वप्नपूर्ती होते का.
  • Log in or register to post comments

भारी!!

पद्मश्री चित्रे
Sat, 08/02/2014 - 19:57 नवीन
सुंदर फोटो आणि मन:पूर्वक केलेली भटकंती आवडली. मन आणि डोळे तृप्त झाले....
  • Log in or register to post comments

सुंदर!

सुधीर
Sat, 08/02/2014 - 22:10 नवीन
सुंदर फोटो आणि वर्णन! कोकणातला पाऊस ..मुरतो..उरतो..आणि सर्वत्र यथेच्छ दिसत रहातो अगदी! मस्तच!
  • Log in or register to post comments

मस्त फोटो!

पैसा
Sat, 08/02/2014 - 22:40 नवीन
छान लिहिलंत आणि फोटोतही सगळीकडे हिरवा रंग बघून शांत वाटलं. हा पाऊस जरासा थांबला तर काहीतरी दिसेल आता!
  • Log in or register to post comments

पुन्हा चित्रे बघून गेले.

रेवती
Sat, 08/02/2014 - 23:18 नवीन
पुन्हा चित्रे बघून गेले.
  • Log in or register to post comments

१)शशिकांत ओक

अत्रुप्त आत्मा
Sun, 08/03/2014 - 00:56 नवीन
१)शशिकांत ओक @कोकणचाराजा अतृप्त का ते या चित्रकथीच्या काव्याच्या अविश्कारातून साकार झाले आहे....>>> ही अतृप्ती गोड आहे..कारण, ती मूळची ओढ आहे! :) @दोन वरिसं गाडी बाळगुन आहात हे विवाहोत्सुक स्थळांना कळवावे हा अंतस्थ हेतु साध्य व्हावा ही शुभेच्छा.>>> अरेच्चा! असंही असतं होय यातलं अंत-स्थ साध्य...!? कळ्ळच नै आधी मला. *blum3* नैतर वडगाव परिसरातल्या माझ्या स्वतःच्या एकट्यानीच रहात असलेल्या रहात्या घरातनं को'कणात जायला निघालो ...असं म्याटर वाढवलं असतं. ;) ============= २)खटपट्या @पण कोकमाचं झाड? झाड रातांब्याचे असते मग त्याचे कोकम बनवतात.>>> क्रमवारीत बरोबर आहे. पण आमच्याकडे (रायगड जिल्ह्यात तरी) मी रातांब्याचं झाड असं कधिही ऐकलेलं नाही. कोकमाचं झाड-असच म्हणतात. ती मांजर गेली..ब..कोकमावर यंदा..कोकमं उतरली का नाय अजून!? असं उल्लेखातून आणि इतर प्रकारेही "कोकमाचं झाड" असच ऐकलेलं आहे. ================= ३)फिझा @पोफळी म्हणजे काय हो....सुपारी ची झाड़े का ?>>> होय. सुपारिचीच. ================== ४)पैसा @हा पाऊस जरासा थांबला तर काहीतरी दिसेल आता!>>> येस्स!!!
  • Log in or register to post comments

लग्नाची बेडी...

शशिकांत ओक
Sun, 08/03/2014 - 12:16 नवीन
प्रिय आत्मन्
"कळ्ळच नै आधी मला. Blum 3 नैतर वडगाव परिसरातल्या माझ्या स्वतःच्या एकट्यानीच रहात असलेल्या रहात्या घरातनं को'कणात जायला निघालो ...असं म्याटर वाढवलं असतं. Wink"
*angel* असे म्हणतात - विवाहोत्तर काली फक्त राजाराणीचे फोटो काढले जातात... तोवर मिपा कट्टेकरींबरोबर किंवा रम्य ठिकाणांचे फोटो काढत बसायची वेळ म्हणून आली नाsssss... पटकन सिंहगड रस्त्यावरील वडगाव उपनगरीय क्षेत्रातील आपल्या स्वतःच्या मालकीच्या भव्य फ्लॅटमधील गिटारसम वाद्यासह वा पेंटींग काढताना असे स्टाईलिश कपड्यातील ग़ॉगलवाले स्नॅप्स, नंतर सराईपणे हीरो होंडा वरून जातानचा फक्कड फोटू टाका... *nea* *fool* म्हणतात... अहो मग पहा सत्यनारायण कथेप्रमाणे घटना घडून येतील... *man_in_love* ...'लग्नाच्या बेडी' मधील 5 विवाह केलेल्या गोकर्ण अन् अविवाहित घोड नवऱ्या अवधूतांच्या नाटकीय संवादाचा 'स्वप्नीय' संदर्भ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@म्हणतात... अहो मग पहा

अत्रुप्त आत्मा
Sun, 08/03/2014 - 13:05 नवीन
@म्हणतात... अहो मग पहा सत्यनारायण कथेप्रमाणे घटना घडून येतील>>>. पैसा/प्रतिष्ठा/पद यांचे काळाप्रमाणे बदललेले संदर्भ लक्षात आलेले दिसत नाहित अजून तुंम्हाला! असो! ;) ...'लग्नाच्या बाजारातील'' ५० नकार पचविलेल्या आत्मू अँड आत्मू आत्म लिमिटेड कंपनीच्या प्रत्यक्ष संवादांचा 'खरा' संदर्भ... :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

आई शप्पथ!!!!!!!!!!!!!

बॅटमॅन
Sun, 08/03/2014 - 01:18 नवीन
आई शप्पथ!!!!!!!!!!!!! लयच हिरवेगार अन ओले मस्त फटू. बघतानाच चिंब भिजून गेलो. काञ मस्त आलेत सगळे, व्वा!!!
  • Log in or register to post comments

मस्त...

मदनबाण
Sun, 08/03/2014 - 17:01 नवीन
मस्त... :) ते कुंड कसल आहे ? त्या फुलांमधले दुसरे फुल बहुधा तेरड्याचे आहे. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }
  • Log in or register to post comments

@ते कुंड कसल आहे ? >>>

अत्रुप्त आत्मा
Sun, 08/03/2014 - 20:53 नवीन
@ते कुंड कसल आहे ? >>> दिवेआगर>>> रुपनारायण मंदिर>>> समोरची उघड विहिर(बारव) @त्या फुलांमधले दुसरे फुल बहुधा तेरड्याचे आहे. >>> असावं. आमाले रानफुलातलं कै बी कळत न्हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तेरडाच आहे तो.

धन्या
Sun, 08/03/2014 - 20:57 नवीन
तेरडाच आहे तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

होय. तो "तेरड्याचा रंग तीन

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/03/2014 - 20:56 नवीन
होय. तो "तेरड्याचा रंग तीन दिवस" मधला तेरडाच आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मस्त.

चित्रगुप्त
Sun, 08/03/2014 - 17:31 नवीन
हिरवाई बघून डोळे निमाले. मस्त.
  • Log in or register to post comments

देवळातल्या पुष्करिणीचा फोटो

यशोधरा
Sun, 08/03/2014 - 21:08 नवीन
देवळातल्या पुष्करिणीचा फोटो जाम आवडलाय :) ऋतू बरवा, ऋतू हिरवा ची आठवण झाली..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा