Skip to main content

लय भारी !

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 02/08/2014 12:23 या दिवशी प्रकाशित केले.

लय भारी !

.

.... वर्तमानपत्रातल्या चर्चेमुळे उत्सुकता वाढली होती म्हणून लय भारी पाहीला.
हा चित्रपट पाहताना एक गोष्ट सतत जाणवत राहते. येताना प्रेक्षक फार गंभीर असतो. काहीतरी छान पहायला मिळणार ही अपेक्षा असते. तितके निर्माते दिग्दर्शक गंभीर वाटत नाहीत. स्टोरी यथातथाच. डायलॉगदेखील जाता जाता लिहील्यासारखे. जेवणाची ताटं लावली आहेत. जेवण लागलेलं दिसतय. असे परभाषिक संवाद ऐकायला मिळतात. कोणत्याही प्रकारे क्वालिटीची काळजी घेतलेली दिसत नाही. एक छोटा मुलगा मोठ मोठ्या पहिलवानांना एका चुटकीसरशी हवेत भिरकवताना दिसतो. जमिनीवर आपटले जाताना हे पहीलवान पेप्सी, कोकची चूळ टाकतात. त्याला रक्त समजावे हे प्रेक्षकांकडून अपेक्षा. पुढे पुढे या दृष्यांचा कंटाळा येतो. इतक्या वेळा ही दृष्ये दाखवली आहेत.

कुणीतरी खूप चांगला, कुणीतरी खूप वाइट. त्यातून मारामार्‍या अशी सगळी हिंदी स्टाइल. पण नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते.

इथे एकाच नाहीतर अनेक चित्रपटांची नक्कल करण्याचा प्रयत्न झाला आहे. अमिताभचा अँथनी गोन्सालविस आहे, त्याचं कन्फेशन आहे. अग्निपथमधला गरीबांच्या जमिनी लाटणं आहे. खाकीमधलं मालकाकडून नोकराची सेवा किंवा नोकराकडून मालकाला थोबाडीत(मालक किंवा नोकरीतला बॉस). थोडा परींदा, गाण्यामधे ओह माय गॉडची नक्कल आहे.

या सगळ्या मारामार्‍यांमधे विठ्ठलाचा काय संबंध ? असा प्रश्न पडतो. वारीनिमित्त विठ्ठलावरचा चित्रपट असंही वर्णन करता येत नाही.

मागे 'मात्र रात्र' नावाच्या नाटकात देशमुख नावाच्याच एका अभिनेत्याबरोबर राधिका आपटेचा लाइव्ह अभिनय पाहीला होता. सई ताम्हणकर, बिपाशा यांच्या मार्गावरचा तिचा प्रवास फार पूर्वीच चालू झाला होता. पण अद्याप... असो....

तिचा अभिनय सतत दिसत राहतो... सध्या 1/cos C पणासाठी स्त्री पात्रांच्या तोंडी पुरुषी शिव्या टाकण्याच्या मार्गाचा अवलंब केला जातोय. तो इथेही आहे...

आपण पाहू तो प्रत्येक चित्रपट उत्तम असे नाही. शोध घेत रहावा. कधीतरी काहीतरी चांगलं हाती लागल्याशिवाय राहत नाही. हा विश्वास आहे...


वाचने 19514
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

काही प्रसंगांचा क्रम चुकल्यामुळे सस्पेन्स राखता आलेला नाही.

आणखी एक नक्कल कहो ना प्यार है... हृतिकचा पुनर्जन्म आणि त्याचे लहान मुलाबरोबरचे नाते...

आशू शू शू *secret* ... आपला फिल्लम परिचय लय भारी... *ok*

'लय भारी' ह्या नांवापासुन, 'तंटा नाय तर घंटा नाय' हे घोषवाक्य आणि टिव्हीवरच्या जाहिराती पाहिल्यावर 'हा चित्रपट खूप छान आहे' असे परिक्षण आले असते तर मला, सौम्य तरी, हृदयविकाराचा झटकाच आला असता.

अहो लोकांनी फेबुवर काय काय कमेंटस केल्या होत्या... वाटलं खरं असेल श्वासपासून मराठीने कात टाकलीये म्हणे असेल...

मस्तच जमलय परिक्षण...! जरा त्यातल्या गाण्यानविषयी पण लिहायचे होते सगळीकडे फरच ऐकायला मिळतात...:) मला तर हा एखादा साउथचा डब सिनेमा पहतोय असेच वाटले.....!

प्रोमोज बघुनच सिनेमाचा दर्जा कळला होता.. मराठीतला तद्दन गल्लाभरु चित्रपट.. ही कॅटेगरी खरं तर बॉलीवुड मधल्या सलमान, अक्षय, रोहित शेट्टी यांची... त्यामुळे सिनेमा बघायची हिंमत नाही.. आज अस्तु बघणार..

खरेच मराठीला निव्वळ गल्लाभरु चित्रपट हवे आहेत का? यावर मी मागे मिपावर लिहीले होते. http://www.misalpav.com/node/28410 दुसरा प्रश्न असा आहे की चित्रपट आजही चालतोय. थेयटरात टिकून होता. तेंव्हा त्याला नावे ठेवणारे फक्त इंटरनेटवरच आहेत का? त्याच मुळे मी याला एक यशस्वी प्रयोग असेच म्हणेल. पण प्रयोग, फॉर्मुला नाही. -मित्रहो

मी पाहिला हा चित्रपट. तद्दन मसालापट आहे. आपण सलमान चे मसालापट डोकं घरी ठेवून बघतोच कि. मग मराठमोळ्या रितेश चा मराठी चित्रपट बघायला काय हरकत आहे.

In reply to by खटपट्या

त्या सलमानचे जवळ जवळ सगळे चित्रपट नुसते गल्लाभरु आहेत पण ता चित्रपटांना काहीही अर्थ नसतो. तसले चित्रपट हिंदीत सगळेच बघतात मग एखादेवेळी मराठीत असला मसालापट सिनेमा आला तर बघायला काय हरकत आहे. मी चित्रपट बघीतला , अगदी खूप आवडला वगैरे असे नाही म्हणणार पण वाईट, टुकार असा ही वाटला नाही, ठिकचं होता.

सिनेमा फुकटात बघायला मिळाला तर जितका वेळ बघवेल तितका वेळ बघेन. सलमान किंवा अक्षयकुमार, पूर्वी मिथुन यांचे बिनडोक पण ओरिजिनल सिनेमे टैमपास म्हणून आवडतात/आवडायचे. मात्र नक्कल बघणे फारसे सुसह्य होत नाही. एकेकाळी मराठी सिनेमावरून हिंदीत रिमेक्स यायचे. उदा. पाठलागचा मेरा साया. मात्र आता हिंदी सिनेमे हेच बहुतेकवेळा कुठूनतरी उचललेले असतात. त्यावरून मराठी नक्कल म्हणजे ती झेरॉक्सची झेरॉक्स मारल्यासारखे होणार.

In reply to by आशु जोग

बरा आहे रमामाधव ...अजुन एका कारणासाठी नक्की बघा ...प्रसाद ओक कधी नव्हे ते रघुनाथरावाच्या भुमिकेत एकदम फिट्ट बसलाय ....

रिता याचा अर्थ रिकामा

मला तर ते "तंटा नाय तर घंटा नाय" हे वाक्य कोणत्या भाषेत आहे हेच घंटा कळले नाही. अर्थ वगैरे तर बातच सोडा.

पण लय भारी पिडीतांना आरक्षण द्यायला हरकत नाही