मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्यक्तिचित्र

साडेपाच इंच !

माम्लेदारचा पन्खा ·
माझं मन कायम ह्या साडेपाच इंची चौकटीत वावरणारं . . . . आजूबाजूला काय चाललंय हे पाहूनही न पाहिल्यासारखं करणारं . . . काही वेगळं दिसलंच तर डोळे असूनही ह्या स्मार्ट खेळण्यातूनच बघतो. . . मग समोर खाद्यजत्रा असो की प्रेतयात्रा . . तोच निर्विकारपणा असतो ! कधीकधी मरणही टिपतो मी दुसऱ्याचं कारण असं चित्र वारंवार कुठे दिसतं ? कासावीस होतो फक्त तेंव्हाच जेव्हा बॅटरी उतरते किंवा इंटरनेट नसतं ! जगात असूनही जगाशी परत जोडण्यासाठी जपतो मी पासवर्ड. . . . . आपण आणि आपला अंडा "सेल", कोणी माणुसकी करता का फॉरवर्ड ?

उध्दु . . तुला माह्यावर भरोसा नाय काय ?

माम्लेदारचा पन्खा ·
उद्धुचे वडील किती मोठे . . मोठे . . त्यांचे पण नशीब करंटे . . . . करंटे . . त्यांच्या पोटी आला हा गोटा गोल . . गोटा गोल . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा मुलगा आदू . . . आदू . . . आहे तो पक्का लडदु . . . लडदु . . . पेंग्विनचा खर्च करतंय कोण . . करतंय कोण उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा पेपर सामना . . . सामना . . . संपादकाला काही येईना . . येईना . . . गुहेचा झाला पांजरपोळ . . . . पांजरपोळ . . . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुची पार्टी आहे सत्तेत . . . सत्तेत . . . तरी मनाने विरोधकातच बसलेत . . बसलेत . .

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

सांजाव

पिशी अबोली ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज 'सांजाव' चा उत्सव गोव्यात साजरा होतोय. एक वेगळाच खास गोवन ख्रिस्ती उत्सव. 'सेंट जॉन' चा अपभ्रंश सांजाव. घरोघर सांजाव सांजाव ओरडत पैसे/दारू मागायची, डोक्यावर पावसाळी वनस्पतींचे मुकुट घालून माडाचे 'पिराडे' (झावळीला माडाशी जोडणारा भाग) ठोकत फिरायचं, आणि शेवटी विहिरीत, तळ्यात नाहीतर चिखलात उड्या घेऊन मनसोक्त भिजून/बरबटून. घ्यायचं. असा हा पावसाळी उत्सव. आमच्या घरी एकदाच एक माणूस सांजाव ओरडत आला होता. खास गोवन काळी तुकतुकीत त्वचा, डोक्यावर चक्क काटेरी शतावरी गुंडाळलेली, असं ते ध्यान आलं. मुळात तर्र होऊन आला होता.

भारताचा एक खरा पण अप्रसिद्ध नायक (अनसंग हिरो) : माथुन्नी मॅथ्यूज

डॉ सुहास म्हात्रे ·
लेखनप्रकार
काही माणसे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, स्वतःच्या सुरक्षेची पर्वा न करता, जगावेगळे धैर्य दाखवून, आपल्याशी तसा काही तडक संबंध नसलेल्या लोकांना वाचविण्यासाठी असामान्य कार्य करतात. अश्या माणसांना बर्‍याचदा पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही आणि थोडीबहूत मिळाली तरी, यातली बरीच माणसे प्रसिद्धिपराङमुख असल्याने, जनतेच्या आठवणीतून सहज निघून जातात. मात्र, अशी माणसे खर्‍या अर्थाने नायक (हिरो) असतात. असाच एक, मुथुन्नी मॅथ्युज नावाचा, भारतिय सुपुत्र आणि नायक काल (२० मे २०१७ रोजी) आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. आज हे नाव कोणाला सहजपणे आठवणार नाही.

बाबाची चप्पल

मूखदूर्बळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाबाची चप्पल फार तर पन्धरा सोळा वर्षान्चा असेन नसेन. बाबाची चप्पल माझ्या पायाला यायला लागली. मग कधी तरी बाबा घरी असताना बाबाची नजर चुकवून त्यान्ची चप्पल मुद्दाम घालून जाण हा स्वभाव बनला. बाबा चिडायचा म्हणायचे तुझी चप्पल घालून जा म्हणून. पण त्या चिडण्यात ही गम्मत वाटायची. का कोण जाणे पण त्या चपलेच्या स्पर्शात खुप खुप आपले पणा वाटायचा. बाबा सदोदित बरोबर असल्याचा भास व्ह्यायचा. बाबाने रागावून मग स्वताच्या चपले सारखी चप्पल आणून दिली. पण तरीही बाबान्ची चप्पल घालून घेण्यात जी गम्मत होती ती ह्या नव्या चपलेत नव्हती. बाबाला आवडायचे नाही आणि तेच मला आवडायच.

द अंडरटेकर रिटायर्स

वेल्लाभट ·
आज सकाळी एकीकडे किशोरी ताईंच्या निधनाची बातमी वाचली आणि दुसरीकडे अंडरटेकर पुन्हा कधीच रिंगमधे येणार नसल्याची. किशोरी ताई निवर्तल्या, अंडरटेकर निवृत्त झाला. एकीकडे सूर, तर दुसरीकडे WWE मधला असुर. इकडे सम, तर तिकडे दम. दोनही गोष्टी 'आता पुन्हा नाहीत' हे मात्र साम्य होतं. कदाचित बरेच जण रेस्लिंग किंवा WWE बघणारे नसतील, पण अंडरटेकर हे नाव तरीही त्यांनी ऐकलेलं असेल. कारण त्याचा करिश्माच तसा होता.

त्यांना हे जमत कसं..?

Pradeep Phule ·
लेखनप्रकार
मिपावरचा माझा हा पहिला लेख. पण विषय कोणता निवडावा हा यक्षप्रश्न माझ्यासमोर आं वासून उभा होता. कारण मिपावर सर्व विषयांवर भरपूर प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. शेवटी विषय मिळालाच. ज्यांच्या कविता वाचून मी मोठा झालो, त्यांनाच निवडावं असं ठरवलं. यांच्या शिवाय मराठी साहित्य संस्कृती अपूर्ण आहे, असं म्हंटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्या म्हणजे "बहिणाबाई चौधरी". लिहायला सुरवात तर केली, पण शब्द मात्र ययातीतल्या अलका सारखे गट्टी फु करून बसलेत. माझं प्रत्येक वेळी असचं होतं, कोरा कागद समोर आला कि डोकं कसं अगदी बधिर होऊन जातं. आणि त्यांच्या बद्दल मी काय लिहावं. त्या म्हणजे शब्दांच्या पलीकडे आहेत.

रावणमामा

चंद्रकांत ·
लेखनप्रकार
रावणमामा रावण नावाभोवती अनुकूल प्रतिकूल अर्थाच्या वलयांनी एक अभेद्य भिंत शेकडोवर्षापासून उभी केली आहे. संदेहाच्या प्रतलावरून प्रवाहित असणारे हे नाव कधी होकाराचा, तर कधी नकाराचा आशय घेऊन संस्कृतीच्या पात्रातून वाहते आहे. काहींना या नावात नकाराच्या सुस्पष्ट रेषा दिसतात, तर काहींना विद्वत्तेची वलये. शेकडो वर्षे उलटूनही त्याभोवती असणारे संदेहाचे धुके काही विरळ होत नसल्याने नकार-होकाराच्या कृष्णधवल छटांमध्ये ते आपला चेहरा शोधते आहे. म्हणूनच असेल की काय, या नावाला आपलं अभिधान म्हणून मिरवणारे आसपास अपवादानेच आढळतात. राम नाव धारण करून अभिमानाने मिरवणारे लाखोने आहेत.

शंकरकाका

चुकलामाकला ·
लेखनप्रकार
तशी शंकरकाकांची आठवण हल्ली क्वचीतच निघते. पण पितळी समई दिसली की हटकून शंकरकाका आठवतात. शंकरकाका आजोबांचे मित्र. रंगानं सावळे.अंगात भोका भोकांचं फाटकं गंजीफ्रॉक, गुडघ्याच्या वर गुंडाळलेलं मळकट पांढर धोतर, कानापाशी तेव्हढे पांढरे तुरळक केस. बाकी गुळगुळीत टक्कल. पांढऱ्या मिशीखाली जाड काळे ओठ, मान खाली झुकलेली. ते कधीच चपला वापरत नसत. अनवाणी फिरत. घरी आले की "तात्यानु" अशी घशात काहीतरी अडकल्यासारखी हाक मारत. ती ऐकल्यावर हे खाकरून का नाही घेत असं सारखं वाटत राही. पण त्यांचा आवाजच तसा होता. त्यांना खरूज होती. त्यामुळं ते घरात आलेले आज्जीला फारसं आवडत नसे.