मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विज्ञान

होमो नालेदी : आपल्या पूर्वजांचे चुलत कुटुंब

डॉ सुहास म्हात्रे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

(सूचना : या लेखातली सर्व चित्रे आंतरजालावरील वेगवेगळ्या स्रोतातून साभार घेतलेली आहेत)

या पाच गोष्टी कायम कराव्यात

श्रीगुरुजी ·
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

अन्नदाता सुखी भव भाग २ - डॉ नॉर्मन बोरलॉग, डॉ स्वामिनाथन आणि इतर चेले

शेखरमोघे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अन्नदाता सुखी भव भाग १ - PL 480 (मागील भागाच्या सुरवातीला थोडीशी छपाईची गल्लत झाल्याने "अन्न दाता सुखी भव" या नंतर दिसणारा विसर्ग असा दिला गेला की "भव" हा शब्द "…सुखी भव : भाग १" असा दिसण्याऐवजी "…. सुखी भवः भाग १" असा दिसत होता. त्यांत आता योग्य ती सुधारणा केली आहे. सध्याच्या काळांत संस्कृत भाषेचा असा अजाणता देखील केलेला चुकीचा वापर अक्षम्य ठरेल. तरीही क्षमस्व!) काळाच्या गरजेनुसार लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले. हे उत्सव लोकांना एकत्र जमवून जनजागृती करण्याकरता केंद्र बिंदू ठरावेत हे अपेक्षा होती.

सच्चे वरण

श्रीगुरुजी ·
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

नात्यातले लुकडे जाडे

श्रीगुरुजी ·
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

इस्पिक राजा ·
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस ·
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

आमचाही पाउस.....

ज्ञानोबाचे पैजार ·
मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच. काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले. फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...

खाडीतली खारफुटी दुनिया १

वडापाव ·
खाडीतल्या खारफुटीच्या जंगलात गेलो होतो. एवढी वर्षं ती खाडी दोन लांबलचक पायवाटा घेऊन माझी वाट पाहात बसली होती. त्यातल्या एका वाटेवरून लहान असताना मित्रांसोबत एकदोनदा जाऊन आलो होतो. तिथे लोक सायकली घेऊन जाताना मला दिसायचे. मलाही घेऊन जायची होती. एकदा गेलो घेऊन, एकटाच. पण माझं रस्त्यांचं ज्ञान अगाध असल्यानं मी ती वाटच शोधू शकलो नाही. कुठेतरी खडी साठवलेली दिसली. एका ठिकाणी अमूक एका भूखंडाची जागा खाजगी मालमत्ता असल्याचं सांगणारा बोर्ड दिसला. असं वाटलं, की कदाचित गेली ती जागा कोणत्यातरी बिल्डराच्या घशात. मग फिरकलोच नाही इतक्या वर्षांत. आणि आता गेलो. इतक्या वर्षांनी. दुस-या वाटेने.

हे हृदय कसे बापाचे......!

शिव कन्या ·
(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....) रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत! अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही. पण निसर्गाची किमया आणि माया अगाध! ............. ............. ................ एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल?