Skip to main content

विज्ञान

मेंदुतला माणुस- ग्रंथ परिचय

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 17/03/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
हे पुस्तक माणसातल्या मेंदुवरच नाही तर मेंदुतल्या माणसावरच आहे. म्हणजे पुस्तकाच स्वरुप हे रोजच्या व्यवहारातल मेंदुविज्ञान अस आहे. रंजकता व सुलभीकरण हे वैज्ञानिक आशयाला बाधा आणणारे असते असा गैरसमज जो असतो तो या पुस्तकाने नक्की दूर होतो. पुस्तकाची शैली ही वाचकाभिमुख आहे. चांगले नातेसंबंध जपण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी विज्ञान हे एक साधन आहे अशी लेखकद्वयांची धारणा आहे. को॓हम्‍ हा प्रश्न अध्यात्मात जेव्हढा गहन आहे तेवढाच विज्ञानात. माझ्या जगण्याचे प्रयोजन काय? जाणीव म्हणजे काय? आकलन म्हणजे काय? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपापल्या परीने वैज्ञानिक व तत्वज्ञ करीत आलेले आहेत.

सोलार इंपल्स २ (Solar Impulse 2) : केवळ सौरउर्जेवर पृथ्वीप्रदक्षिणेस निघालेले विमान

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 10/03/2015 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
"सोलार इंपल्स" हा बर्ट्रांड पिकार्ड (मनोरोगतज्ज्ञ व अवकाशवीर) आणि आंद्रे बोर्षबेर्ग (व्यावसायिक) या स्विस जोडगोळीचा प्रकल्प आहे. "सोलार इंपल्स २" नावाचे केवळ सौरऊर्जेवर चालणारे (आणीबाणीकरताही इतर कोणत्याही प्रकारचे इंधन न वापरणारे; झिरो फ्युएल स्टेटस) विमान घेऊन ही जोडी पृथ्वीप्रदक्षिणा करायला निघाली आहे.

गुटेनबर्ग

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 07/03/2015 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
. पुस्तकं वाचायला सर्वांनाच आवडतात पण आपल्याला ही पुस्तके कोणामुळे वाचता येणे शक्य झाले आहे हे मात्र बर्याच जणांना माहित नसते. त्याच कलंदर अवलियाची ही ओळख! १५व्या शतकाचा सुरुवातीचा काळ! र्‍हाइन आणि माइन नद्यांच्या संगमावर वसलेलं छोटंसं टुमदार गाव, 'माइन्झ'! फ्रिडरिश ( फ्रिलं) ग्लेन्सफ्लाइश आणि एल्स वायरीश हे सोनारकाम करणारे दांपत्य तिथं सुखानं नांदत होते. त्यांना तीन मुले फ्रिलं (ज्यु), एल्स (ज्यु) आणि सगळ्यात धाकटा योहानेस (योहान)!

विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत ?

लेखक खटासि खट यांनी शुक्रवार, 06/03/2015 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या मनात अनेक विचार येत असतात ( हे कशाचे लक्षण असावे ?) इथे येऊन शंका विचारून ज्ञानात भर पडावी यासाठी आम्ही मिपावर आलो. पण इथे आल्यानंतर आम्हालाही वाटू लागले आहे की आम्हाला सुद्धा चार लोकांनी विद्वान म्हणावे. संतुलित प्रतिसाद देणारा सेन्सीबल आयडी अशी आमची ओळख व्हावी असे आम्हालाही वाटू लागले आहे. त्यासाठी अनेक शंका विचारण्याचे धागे ( दारू पिण्यास सुरूवात कशी करावी, जुगारात यशस्वी कसे व्हावे, बनियनला किती भोकं पडेपर्यंत ते वापरावे, अंडरवेअरच्या इलॅस्टीकचे नंतर काय करावे इ. इ. ) पेंडिंग ठेवून हा विषय प्राधान्याने घ्यावा असे योजले. तरी विद्वान म्हणवून घेण्यासाठी काय करावे ?

तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 15/01/2015 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्‍या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.

आयला लाईन चुकली राव!!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 06/12/2014 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच एक पुस्तक हाती आले.आजकाल पुस्तके घरी येत असतात, पण वाचायला वेळ मिळेलच असे नाही. मिळाला तरी सलग पुस्तक वाचुन होत नाही. रोज थोडे थोडे वाचुन लिंक लागतेच असे नाही.तरी वाचायची हौस काही जात नाही. जित्याची खोड.... तर ह्या पुस्तकाचे नाव निसर्गपूर्ण. कोणी एक लेखक नाही पण दोन संपादक. पुस्तकाची टॅगलाईनच सांगते की निसर्गाच्या विशिष्ट पैलूंचे अभ्यास आणि जतन करणार्‍या निसर्गप्रेमींचे आत्मकथन.पुस्तक हाती आले आणि एकामागुन एक प्रकरणे वाचत गेलो. प्रत्येक प्रकरणाचा लेखक त्याच्या विषयात मास्टर.

भगवद गीतेतील ११४ वा श्लोक; श्रद्धा आणि अंधश्रद्धेचे महात्म्य

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 14/11/2014 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या पाल्याच्या शाळेत अलिकडे परि़क्षेचे का कशाचे फॉर्म भरून घेताना विद्यार्थ्यांनी आपले वय वर्षे बरोबर काऊंट करावेत म्हणून एक छान शक्कल लढवली, भगवद गीतेचा श्लोकांमधील ११४ वा श्लोक कसा जादुई आहे पहा, ११४ मधून तुम्ही तुमच्या जन्मवर्षाची शेवटचे दोन आकडे मायनस केले की तुमचे वय वर्षे अचूक कॅल्क्यूलेट करता येतात. हा भगवद गीतेचा प्रसार केलेल्या वर्गातील विद्यार्थी, इ.स. २००० पुर्वीच जन्मलेले असणार होते. बर्‍याच विद्यार्थी विद्यार्थीनींनी आपली आपल्या आई वडलांची मित्र मैत्रिणींची वय वर्षे मोजून पाहिली आणि चकीत झाली.

वॉरेन अँडरसनचा मृत्यू आणि आमेरीकेची रासायनीक गोपनीयता

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 13/11/2014 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
भोपाळ गॅस दुर्घटनेची (कदाचित) जबाबदारी असू शकणार्‍या वॉरेन अँडरसनला भारतीय आणि आमेरिकी राजकीय वरदहस्तामुळे न्यायालयापुढे उभे टाकावे लागले नाही. अखेर २९ सप्टे २०१४ ला त्याला काळानेच वर नेले. त्याच्या मृत्यूची बातमीही काही आठवडे लपवून मग दिली गेली. आम्ही आजकालचे पांढरपेशे भौतीक प्रगतीच्या मीठाला एवढे जागतो की कशाचेच काही वाटत नाही. न्यायालयापुढे त्या माणसाने उभ टाकण्याची गरज नाही हे आमेरीकन लोकांपेक्षा भारतीय लोकांनाच अधीक पटलेल असतं. अर्थात अमेरीकन लोक फक्त परकीयांशीच असे वागतो समजून वागतात पण इतरांसाठी खोदलेले स्वतःसाठीच कामाला येते असे काहीसे आमेरीकेचे झाले.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

पुस्तकाची ओळख - "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing "

लेखक शुचि यांनी बुधवार, 23/04/2014 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी ऐसीवरती एका धाग्यात एका पुस्तकाची ओळख करुन दिली होती. बालमानसशास्त्रावरील हे पुस्तक अतिशय अ‍ॅबनॉर्मल केसेस हाताळणारे व हृदयद्रावकच वाटले. इथे तो प्रतिसादात्मक लेख टाकते आहे. हळव्या लोकांनी वाचू नये. - काल "बार्न्स अँड नोबल्स" मध्ये , "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing " पुस्तक चाळता चाळता एक पूर्ण कथा वाचली. एका बालमानसोपचारतज्ञाच्या, पेशंटच्या हृदयद्रावक केसेस यात आहेत. पैकी मी "Cold Heart" नावाची केस वाचली. सुरुवात केल्यावर खालती ठेवताच येईना.