Skip to main content

विज्ञान

जीवनगाणे - २

लेखक सुधीर कांदळकर यांनी शुक्रवार, 07/02/2014 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनगाणे - १ ******** डोरोथी क्रोफूट हॉजकिन: DOROTHY CROWFOOT HODGKIN. प्रोटीन क्रिस्टलोग्राफीची (Protein Crystallography) जननी. जन्म: कैरो, इजिप्त येथे १२ मे, १९१०. मृत्यू शिप्स्टन ऑन स्टूर, इंग्लंड इथे २९ जुलै १९९४ रोजी. सामान्यतः शास्त्रीय चरित्रकारांना उत्तम चारित्र्य आणि सखोल विज्ञान यात फारसा परस्परसंबंध आढळत नाही. अर्थात यालाही काही अपवाद आहेतच.

जीवनगाणे - १

लेखक सुधीर कांदळकर यांनी शुक्रवार, 07/02/2014 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर जेनिटीक्स या विज्ञानाला मराठीत काय म्हणावे असा मला प्रश्न पडला होता. सूक्ष्मदर्शकाचा वापर वैज्ञानिक करू लागल्यावर सूक्ष्मजीवविज्ञानाचे एक दालनच उघडले. त्याचबरोबर वनस्पतींच्या, प्राण्यांच्या शरीरातील पेशींचा अभ्यासही सुरू झाला. अनुभवाच्या आधारावर जीवांचे गुणदोष, काही रोग अनुवंशिकतेच्या तत्वानुसार पुढील पिढीत उतरतात हे मानवाला ठाऊक झाले होते. संकर करून दोन जातीतील चांगले गुण एकत्र आणून नवीन उत्कृष्ट सजीवांची पैदास केली जात असे. जास्त तगडे, जास्त चपळ, जास्त वेगवान घोडे, चवीला जास्त चांगली, रोगप्रतिकारक, हेक्टरी जास्त उत्पन्न देणारी धान्ये, वगैरे जीवांची पैदास केली जात होती.

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 24/01/2014 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

लेखक मोदक यांनी बुधवार, 22/01/2014 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
काय..? कुठे..? कधी..? (पुणे) अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर..

स्मार्ट फोन ची निवडनुक

लेखक जोशी 'ले' यांनी बुधवार, 22/01/2014 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो... आज काल सगळ्यांच्याच खिशात स्मार्ट फोन विसावलाय, (विसावलाय कसला :-) ) किंवा ज्यांच्या कडे नाहि ते सुध्दा स्मार्ट फोनच घ्यायचा विचार करतायेत तसेच ज्यांच्या कडे आहे ते त्यांच्या माॅडेल ला कंटाळलेत, मार्केट मधे ईतक्या व्हरायटीज आहेत कि गोंधळुन जायला होतं, नेट वरिल रिव्हयुज पण एका मर्यादे पर्यंत मदत करतात कारण तेहि बर्याचदा पेड असतात, तर या सगळ्यांन वर आपण मिपाकर एक मेकांची मदत करु शकतो BaseMark OS II हे टुल वापरुन, कदाचीत बर्याच जनांना कंम्प्युटर साठी असलेले belark adviser आठवत असेल त्याच धर्तीवर हे टुल काम करते.

गुलाबाचे फळ

लेखक रम्या यांनी रविवार, 12/01/2014 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाब इतके सुंदर असतात कि ती फार वेळ झाडावर राहत नाहीत. लगेच तोडली जातात. पण यामुळेच गुलाबालाही फळं लागतात हे बर्‍याच जणांना ठाऊक नसते. ज्यांना ठाऊक असते त्यांनी ती पाहिलेली नसतात. काही दिवसांपुर्वी मी गावाहून एक गावठी (नेटिव्ह) जातीच्या गुलाबाची काडी मागवून घेतली. या नेटिव्ह जातींना सहज फळे धरतात. असंच एक फूल मी न तोडता झाडावरच राखून ठेवलं. फूल मावळल्यावर त्याच्या बुडाशी एक फळ धरले. पण या फळांना पिकण्यासाठी बरेच महिने जावे लगतात. मला तर सहा महिन्यंपेक्षा जास्त काळ जावा लागला. गुलाबाच्या पक्व फळा मध्ये व्हिटॅमीन सी प्रचंड प्रमाणात असतं अगदी संत्र्यापेक्षाही!

देवाचा हात दिसला !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 10/01/2014 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
२३ जुलै १९९९ साली नासाने अवकाशात पाठवलेली भारतिय वंशाच्या सुब्रम्हण्यम चंद्रशेखर या शात्रज्ञाचे नाव दिलेली "चंद्र एक्स रे वेधशाळा" तिच्यापूर्वीच्या वेधशाळांपेक्षा १०० पट जास्त अंधूक असणार्‍या तारकापूंजांची छायाचित्रे घेऊ शकते. या वेधशाळेने सर्वप्रथम शोध लावलेल्या "देवाच्या हाता"ची (hand of God) अधिकाधिक स्पष्ट छायाचित्रे आता मिळू लागली आहेत.

नरु (नरेन्द्र मोदी) वील बी द विनर: बेजान दारूवाला

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 06/01/2014 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, बेजान दारूवाला यांचे प्रेडीक्षण: १)नरु (नरेन्द्र मोदी) वील बी द विनर २)INR(रुपी) विल बी इन बिटवीन ५९ तो ५५ पर डॉलर मिपाकर ज्योतिषतज्ञ व FINANCIAL ANALYST हो, आपले काय मत आहे? कळावे, लोभ असावा आपला लाडका: आयुर्हीत

ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग ४ अणूपासून ऊर्जा

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 27/12/2013 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग १ - ऊन, वारा, अग्नि आणि वीज ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग २ ऊर्जेचे उगमस्थान ऊर्जास्त्रोतांच्या शोधात- भाग ३ विजेची निर्मिती मागील भागावरून पुढे चालू ... एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीला मादाम मेरी क्यूरीने रेडिओअॅक्टिव्हिटीचा शोध लावला आणि पदार्थविज्ञानात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली.

ऊर्जास्त्रोतांच्या शोधात- भाग ३ विजेची निर्मिती

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 25/12/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
Power Stations मागील भाग ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग १ - ऊन, वारा, अग्नि आणि वीज ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग २ ऊर्जेचे उगमस्थान मागील भागावरून पुढे चालू ... काही विशिष्ट रसायनांमध्ये दोन भिन्न धातूंचे कांब (रॉड किंवा इलेक्ट्रोड्स) बुडवून ठेवले आणि त्या कांबांना तांब्याच्या तारेने जोडले तर त्याम