मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिरंजीव चिंटू

डावखुरा ·
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

नेटकर्‍यांचे साहित्य संमेलन

अनुप्रिया ·

विकास 09/11/2010 - 22:59
अरे वा! चांगला उपक्रम आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा! कार्यक्रम पार पडल्यावर येथे वृत्तांत सांगावात ही विनंती.

14 November 2010 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या वर्षी दिनांक २५ ते २७ डिसेंबर या काळात ठाणे येथे होत आहे. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनात असलेला तरूणांचा सहभाग. ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळा कॉलेजांमधील विद्यार्थी आणि तरूण साहित्यिक हे संमेलन गाजवतील अशी अपेक्षा आहे. या संमेलनात एक पूर्ण दिवस युवा साहित्य संमेलन असणार आहे. आणि हे संमेलन जोरदार व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी चालू आहे. दहाहजारांहून अधिक तरूण मंडळी या संमेलनात सामिल होतील.

महिला राज

प्रमोद सावंत१ ·

चूल ते मूल या मर्यादेत सिमीत असणाऱ्या महिला आज सत्ताधीश झाल्या आहेत.
सिमीत महिलापण होत्या? शुद्धलेखनाची अगदीच आई-माई नसली तरीही "सिमीत" या शब्दाने माझी फार गडबड उडली. इथे अपेक्षित असलेला शब्द सीमीत का सिमीत? साधारण याच विषयावरचं, कदाचित जास्त व्यापक, करूणा गोखले यांचं ('राजहंस' प्रकाशनच) बाईमाणूस हे वाचनीय पुस्तक आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 02/11/2010 - 17:49
स्त्रिया पाशवी आहेत हे सिद्ध झाल्यानंतर त्या सिमीत असतील तर आश्चर्य काय म्हणते मी? ;)

In reply to by नितिन थत्ते

ते पहिलं वाक्य मी वाचलंच नव्हतं हे आता प्रतिसाद पाहून लक्षात आलं. अचानक सिमीचा उल्लेख दिसला म्हणून तेवढंच काय ते नीट पाहिलं मी!

मी लेखाचे शिर्षक वाचुन, स्त्री राज्य असलेल्या बेटावर सापडलेल्या सुदैवी तरुणाची कथा वगैरे असेल असे समजुन धागा उघडला. घोर फसवणूक आणि निराशा झाली.

ज्याप्रमाणे गुलामगिरी, धूम्रपान व स्त्रियांच्या अधिकारातील कमतरता इतिहासजमा झाल्या आहेत. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार, सरंजामी वृत्ती व भ्रष्ट अकार्यक्षम लोकशाही इतिहासात जमा करणे शक्य आहे. पूर्वी स्रियांना अधिकार कमी होते. इंग्लंड अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाहीतही शंभर वर्षांपूर्वी महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. अमेरिकेत वेतन समानता तर बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर शक्य झाली. भारतात स्वातंत्र्यानंतर स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी लढावे लागले नाही. पंचायत राज आणले तेव्हा ३३% जागा स्त्रियांसाठी आरक्षित ठेवल्या. संसदेतही महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन

गंगाधर मुटे ·

धमाल मुलगा 01/11/2010 - 18:02
गंगाधरराव, हार्दिक अभिनंदन. आणि रानमेव्याची चटक नागरजनांनाही खुप खुप लागो ही सदिच्छा.

‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन नमस्कार मित्रांनो, माझा ‘रानमेवा’ हा पहिलावहिला काव्यसंग्रह बुधवार दिनांक, १० नोव्हेंबर २०१० ला शेगाव (जि.बुलढाणा) येथे मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात लाखो शेतकर्‍यांच्या साक्षीने मा.शरद जोशी यांचे शुभहस्ते प्रकाशित होत आहे. आपणही उपस्थित राहून आपले आशिर्वाद द्यावेत, यास्तव हे आग्रहाचे निमंत्रण. ११२ पृष्ठे असलेल्या या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ.

भाषिक संपत्ती

मृत्युन्जय ·

In reply to by मितान

बेसनलाडू 26/10/2010 - 22:44
मस्त, खुसखुशीत लेख. खूप मजा आली वाचताना. (वाचक)बेसनलाडू अवांतर - कंसातील वाक्ये सूचक कोपरखळ्यांसारखी असली, तरी एकंदर लेखाच्या संदर्भात विचार करता अनावश्यक वाटली. (अवांतर)बेसनलाडू

सूड 26/10/2010 - 17:45
मिपावर वाचलेल्या एका (शिवी/ अपशब्द काय म्हणू ?) शब्दासाठी मी मिलिंद बोकिलांचं 'शाळा' वाचल्याचं आठवलं. :)

हा हा भाषासौंदर्य आवडुन गेले रे एकदम. मस्त फटाके वाजवले आहेस :) हे लेखन वाचता वाचता बिकांच्या ह्या लेखाची खास आठवण येउन गेली.

sagarparadkar 26/10/2010 - 17:49
>> पण आपण संस्कृती संस्कृती जी म्हणतो ती आपल्याला पुलं, शिरवाडकर, कुसुमाग्रज यांचे साहित्य वाचुन आठवेल की या शिव्या ऐकुन? काय म्हणता? पु. लं. चे 'रावसाहेब' वाचून पण आठवेल की संस्कृती ... ते (पक्षी रावसाहेब) काय असंस्कृत होते का?

sagarparadkar 26/10/2010 - 17:55
व. पुं. चा 'भांडणारा जोशी' पण एके ठिकाणी चिंता व्यक्त करतो की मराठीतल्या शिव्या आता फारच जुन्या झाल्यात, आणि नवीन शिव्या काही तयार होत नाहीत, कोण हे काम करणारेय काही कळत नाही ... :) ते ऐकून माझ्या काही 'पेठेतल्या' मित्रवर्यांनी हे काम स्वीकारले होते पण उदर्निर्वाहाची कामे इतकी वाढली कि त्यांपुढे ह्या कामाकडे मग पारच दुर्लक्ष झाले ... :-)

In reply to by sagarparadkar

मृत्युन्जय 26/10/2010 - 17:58
काही हरकत नाही. आजही भावे हायस्कूल किंवा नूमवि किंवा सेंट विमलीज च्या बाहेर रोज एक तास उभे राहिलात तर ज्ञानात प्रचंड भर पडेल. ते वयच तसे असते. आणि त्या वयातले सगळे मित्रही आठवणीत तसेच भ च्या बाराखडीतलेच असतात.

In reply to by मृत्युन्जय

एक 26/10/2010 - 22:11
आमची शाळा आहेच तशी!! आजही मित्राशी बोलताना त्याने पहिल्या ४-५ शब्दात "प्रेमळ" पणे विचारपूस केली नाही तर शंका येते कि याला काय झालं? चिडला वगैरे कि काय? वय वाढलं तसं तोंडावर मान बरेच जण द्यायला लागतात त्यावेळी जमिनीवर येण्यासाठी मित्रांचे हेच ४ "प्रेमळ" शब्द कामी येतात.. --सेंट भावियन्स..

"अच्चीत गच्ची......" ही शिवी तर फार फार पॉप्युलर अशीच एक म्हणजे "आली घुली..." शाळा फक्त मुलांची.. मुतारीमध्ये अशा काही शिव्या असायच्या की त्यावर एक पुस्तक निघेल. आणि हो काही सदस्यांच्या माहीतीसाठी ह्या शिव्यांना (देणार्‍याना आणि खाणार्‍याना) जातीचे बंधन नव्हते! बाकी लेख मस्त...

पैसा 26/10/2010 - 19:37
शीर्षक वाचून धागा उघडला आणि भलतीच संपत्ती निघाली. पण मस्त खुसखुशीत लेख आहे. बरोबरच, बिकांच्या लेखाची लिंक दिल्याबद्दल पराला धन्यवाद!

धमाल मुलगा 26/10/2010 - 19:45
भेटीअंती आपल्या चरणि शिंगलमाल्टचा अभिषेक करणेत येईल असे आम्ही जाहीर करतो. अरे, काय माणूस आहेस का मजा? कं लिवलंय...कं लिवलंय!

तिमा 26/10/2010 - 20:19
लेख आवडला. आम्ही वापरत असलेल्या शिव्या व प्रसिध्द गाण्यांची विडंबने आठवून डोळे पाणावले.

प्रदीप 26/10/2010 - 20:38
आवडला. भाषिक संपत्तिवरून मला माझ्या एका ऑस्ट्रेलियन सहकार्‍याने एकदा 'आपण पहाटे उठलो' हे 'I woke up at sparrow-fart' असे सांगितले होते, ते आठवले!

नगरीनिरंजन 26/10/2010 - 20:47
च्यामायला! येकदम ध्वज फडकाव लेखन की रे भावा! उगंच एकमेकाला शिव्या घालून याराना दाखवायच्या वयातले दिवस आठवले. (अवांतरः ओ पुपे, तुमच्या त्या 'परायी बात खच्ची सोळा आणेच सच्ची' ला दुसरी ओळ 'अच्चीत गुच्ची...' बसतंय का बघा जरा. )

In reply to by नगरीनिरंजन

अहो ते त्यावरूनच लिहीले होते. ;) समझनेवाले को इशारा काफी है असं काहीतरी म्हणतात म्हणे. ;)

मिसळपाव 26/10/2010 - 21:51
...मित्रांशी सलगी दाखवत त्याला घातलेल्या ४ शिव्या आणि भर रस्त्यात मांडलेला भाषेचा हा बाजार यात फरक आहे. आपला मुद्दा सहजपणे, सुसंस्कृतपणे, शिव्या न वापरता समोरच्याला पटवुन देण्यात खरे कसब आहे. सगळे मुद्दे संपल्यावर गुद्दे सुरु करण्यापुर्वी वापरायची भाषा म्हणजे शिव्या. ... १०००% सहमत! हॉस्टेलच्या आपल्या खोलीबाहेर मित्रांचं टोळकं नाहि तर प्रिन्सिपल पु.ल. ना घेउन आलेले आहेत हे लक्षात न येउन एकाने 'भडव्यो, जरा थांबाल तर काय मराल?' असं लडिवाळपणे विचारल्यावर खुद्द पु.ल.नी सुद्धा त्याला 'तो पहिला शब्द कधी विसरू नको बरं का' असं सांगितलं होतं !!

सुहास.. 26/10/2010 - 22:05
_/\_ _/\_ _/\_ बाकी का माहीती माझ्या तोंडुन निघण जरा अवघडच हाय (न पिता..पण पिलोतरी मित्र,स्नेही, ओळखी-पाळखींच्या साठी साध हलकट निघत॑ नाय तोंडातनं (एक टिंग्या सोडुन) )

आयला, इना तू ... निरागस नव्हतास! नाटक मात्र चांगलं करायचास हो!! लिखाण एकदम ए१! म्हणजे नक्की काय ते चारचौघांत नको, उगाच मुलीच्या आयडीतून शिव्या पाहून तुझ्या 'निरागस' मनाला कष्ट व्हायचे!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मृत्युन्जय 26/10/2010 - 22:40
अगं मी तर शिव्या देताना माझे स्वतःचे कान पण बंद करुन घेतो. (शिव्या लिहिताना डोळे बंद करुन घेतो). इतका निरागस आहे मी. (हा निरागस शब्द शाळेतल्या अर्थाने घ्यावा). पण तु बोल बिन्धास्त. काय आहे की भाषिक ज्ञानात जितकी भर पडेल तितकी चांगलीच आहे.

विशेषतः जुना विस्वण (सॉरी, सॉरी, विषय!!) ताज्या सद्यवर्तमानपत्रात गुंडाळल्यामुळे वाचायला अधिक मजा आली!! अभिनंदन!! पण बिकाचा मूळ प्रश्न शिल्लक रहातोच... "सर, इथे शिव्या देणं अलाऊड आहे?" ;) निरागस बामण, पिडां

रन्गराव 27/10/2010 - 07:59
जमलं गडया! काम फत्ते! अवांतर: जमल तर कि बोर्डवर आणि धाग्यावर गोमुत्र शिंपडून घे थोडं! ;)

In reply to by रन्गराव

मृत्युन्जय 27/10/2010 - 10:07
जे शिंपडायचे होते ते शिंपडुन झाले रन्गराव. आख्ख्या महाराष्ट्रातल्या शिव्या कोळुन प्यायलो आहे मी. सगळ्या शिव्या इथे दिल्या असत्या तर तुम्हाला फेफरे आले असते. आणि आमचे मान्यवर सुहृद श्री. परा राजवाडे म्हणतात त्याप्रमाणे एक वेगळे सेंसोर बॉर्ड उघडायला लागले असते शिव्यांच्या स्क्रीनिंगसाठी. आता कुठे गोमुत्र शिंपडायचे आणि कुठे शिवांबु ते तुमचे तुम्ही बघुन घ्या.

In reply to by मृत्युन्जय

रन्गराव 27/10/2010 - 11:10
पण आयला कॉम्पलिमेंट होती ती. असो आणि कोळून पिण्याबाबतचा आपला दावा बरोबर का चुक हे ठरवायला स्पर्धा ठेवावी लागेल एक ;) मग अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राला फेफरे येतील. :) सांगायचा उद्देश असा की नवीन शोध लागणे कधीही थांबत नाही आणि ज्ञान नेहमी अपूर्णच असत, तस तुम्ही लेखात म्हंटलय सुद्धा बहुतेक. असो बाकी लिहिताय मात्र मजेशीर :)

In reply to by रन्गराव

मितभाषी 27/10/2010 - 11:22
जमल तर कि बोर्डवर आणि धाग्यावर गोमुत्र शिंपडून घे थोडंआयला खपलो. =)) =)) आणि अजुन एक मनातील जागे झालेले विकार जाण्यासाठी शांती करा अथवा खिशात उडीद घेवुन उंबराला तांबड्यात गरके(पक्षी : प्रदक्षिणा) घाला. ;) बाकी लेख रापचिक.

शहराजाद 27/10/2010 - 09:05
शिव्या मायभाषेची जवळीक साधुन देतात, त्या मर्दानगीचे लक्षण आहे, ते मित्रत्वाचे प्रतीक आहे वगैरे वगैरे झूट आहे हे कळुन चुकले. गाडी चालवताना चुकुन समोरचा रिक्षावाला मध्ये घुसला की अल्लदपणे त्याच्या आइची विचारपूस होउ शकते. पण हा सुसंस्कृतपणा नाही. हा सभ्यपणा नाही. मित्रांशी सलगी दाखवत त्याला घातलेल्या ४ शिव्या आणि भर रस्त्यात मांडलेला भाषेचा हा बाजार यात फरक आहे.
अगदी नेमक्या शब्दांत मांडलेत. मात्र, मला तरी अगदी कचकावून, ह्रूदयापासून निघणारी शिवी मायबोलीतूनच घालता येते. एरवी भावना पुरेशा शुध्द स्वरूपात प्रकटल्याचे समाधान मिळत नाही.

शिल्पा ब 27/10/2010 - 10:49
मस्त खुसखुशीत लेख...पण मुलीसुद्धा शिव्या देतात याचे आश्चर्य का वाटले तुम्हाला हे काही कळले नाही बॉ !! आम्ही जवळीक करु नये की काय? ;)

In reply to by शिल्पा ब

मृत्युन्जय 27/10/2010 - 10:58
पहिल्यांदा ऐकले तेव्हा कदाचित काहीतरी वेगळे वाटले असेल. पण धक्का मात्र नव्हता बसला. एका मुलीला सिगारेट फुंकताना बघुन मात्र पहिल्यांदा मला धक्का बसला होता. खुपच वेगळे वाटले होते. नंतर सवय झाली. असे बघा जेव्हा पहिल्यांदा माझ्या खुपच जवळच्या मित्राने सिगारेट ओढली तेव्हासुद्धा मला आश्चर्य वाटले होते. मुलींनी हे करावे किंवा हे करु नये अश्या अर्थाने बसलेला धक्का नव्हता तो.

धागाकर्ते श्री.मृत्युंजय याना माहितच असेल की, कोल्हापुरी भाषा आणि शिव्या यात तसा जास्त भेदाभेद नाही. किंबहुना एखादा कोल्हापुरी पाटील्/पवार शुध्द बोलायला लागला की, गावातील थोर्र सहकारी मित्र लगेच टोमणा (आमच्या भाषेत मंडळाची किक) मारतात, 'च्यायला, हे ब्येनं पुन्याला क्काय शिकायला गेलं, पार मात्रंच झालं की...!" "ढापण्या" आणि "बॅटरी" ही त्यातल्यात्यात 'बर्‍यापैकी' लिहिता येण्यासारखी विशेषणे आहेत. मी पंजाबच्या ग्रामीण भागात फिरलो आहे. दिल्लीत असताना काही पंजाबी मित्रही झाले होते/आहेत, त्यांच्यासमवेत एकदा गुरुदासपूरमध्ये कट्ट्याचा योग आला होता. त्यावेळी तेथील दोघांचौघांची ओळख झाल्यावर त्यातील एकाने माझ्याशी हस्तांदोलन तर केलेच पण दिल्लीच्या मित्राकडे पाहून म्हणाला, "ये इंदर पुत्तर तो हलकट दिखता भला ! क्यूं?" मी हादरलोच. मी 'हलकट'? कशामुळे? मी दिल्लीवाल्याकडे पाहिले तर तो गुरदासपूरवाल्याला सांगत होता....'नही, इंदरतुस्सी कुछ दिनसे बिमार होना !". मी त्याला बाजूला घेवून विचारले की, तो मला 'हलकट' का म्हणतोय....? तर हा बिच्चू हसला आणि म्हणाला...."अरे ऐसी कोई बात नही....पंजाबीमें हलकट का मतलब होता है "लाईट वेट". तू वजनाने थोडा कमी दिसतोस ना म्हणून तो तसे म्हणाला..." ~ मी मनी म्हणालो, 'वाहे गुरू !" पंजाबी टर्म "चक दे फट्टे...." अलिकडे इकडे फार फेमस झालेली आपण पाहतो, ऐकतो ('चक दे इंडिया' मुळे)....पण प्रत्यक्षात तिथल्या ग्रामीण भाषेत, "अरे भाड्या/अगं भवाने आवर कामं पटापट"... या अर्थानेच आई/सासूबाई वापरतात...(चक दे = उचल.... फट्टे = लाकूडसामान.... म्हणून, 'आवर आवर जेवणाची वेळ झालीय'...या अर्थाने). पंजाबी शिव्यांची फार गंमत सांगता येईल.....(पण इथे ते अवांतर होईल.) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

>>पंजाबी शिव्यांची फार गंमत सांगता येईल.....(पण इथे ते अवांतर होईल.) इथे कसे काय अवांतर होईल बुवा ?? इथेच ते मुद्द्याला धरून होईल. त्यामुळे तुम्ही इथे त्या गमती सांगाव्यात असा प्रस्ताव मी मांडतो. इथे सांगायच्या नसतील तर वेगळा लेख लिहा. पण लिहा.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रदीप 27/10/2010 - 13:08
म्हणतो. इंदर, लिहाच तुम्ही ते येथे. बाय द वे, वरील 'हलकट' हे [हलका -हलकट-(हलकेस्ट?)] असे काहीसे असावे असे वाटते. त्यावरून (अवांतर) आठवले, आमच्या कॉलेजसमोर एक अगदी खास मराठी 'मिल्क बार' होते. ते तीन बंधू मिळून चालवायचे. मराठी रेस्टॉरंटात नेहमी होते तसे हे मालक लोक विरूद्ध नोकरचाकर असा नेहमीचा थाट तेथे असायचा. काही कारणांमुळे नोकर सदैव मालकांशी फटकून असायचे, त्याचा फायदा घेऊन कॉलेजातील टारगट मुले जे खात त्यापेक्षा कमी बिल देऊन जात असत. मालक नेहमी नोकरांवर गल्ल्यावरून ओरडत असायचे. त्या तीन भावांपैकी मधल्याने अगदी हिटलर छाप मिशा ठेवलेल्या. त्याच्या नोकरांवर डाफरणे व ह्या मिशा हे मिळून पोरांनी त्याचे नाव ठेवले- हिटलर. अर्थात धाकटा झाला 'हिट' व सर्वात मोठा झाला 'हिटलेस्ट'!

मस्तं लेख रे मित्रा. बाकी मायझंव हा शब्द कोकणातल्या बायका देखील अगदी सहज बोलून जातात. हे मी स्वतः ऐकलं आहे. विशेषतः म्हातार्‍या किंवा जुन्या पिढीतल्या बायका. गंमत वाटली होती पहील्यांदा ऐकून.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धमाल मुलगा 27/10/2010 - 18:15
एक एकांकिका करायला घेतली होती कालेजात असताना (हा 'मी कॉलेजात जात होतो हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न नाही, एकांकिका करत होतो हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न आहे.' ;) ), पण त्यात पावलापावलावर "अक्करमाश्या मांयझया' असे शब्द होते. आमचे गुर्जी पडले देशावरचे, त्यांना लाख समजाऊन सांगितलं, की अहो, आपल्याकडं च्यायला किंवा ए रत्ताळ्या... वगैरेसारखं अगदी सर्रास वापरले जाणारे कोकणातले शब्द आहेत ते...बाकी काही नाही झालं, आमची आयकार्डं जप्त करुन घेतली मास्तरानं. :(

शाहरुख 27/10/2010 - 23:28
कोल्हापूर आणि शिव्यावरुन एक फार जुनी गोष्ट आठवली.. मी एका शिवाजी पेठेतल्या मित्राकडे गेलो होतो..त्याच्या घरुन दोघे कुठेतरी जायला निघालो..घराबाहेर २-३ वर्षांचा एक मुलगा खेळत होता..मित्राने सहज त्याच्या डोक्यात टपली मारली..तर मुलगा म्हणाला "ए लवल्या, मालतोस का" माफ करा, शिवीत फुली घातल्यास गोष्ट कळाली नसती :-)

अडगळ 28/10/2010 - 04:42
अवांतर : ज्ञानेश्वरीतील एका मजेदार शिवीसाठी "एक महान शिवी" हा म्.वा.धोंडांचा लेख जरूर वाचावा.(ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी) ------------------------------------------ अंगावर ट्रक घालून ड्रायव्हर म्हणाला दिखता नही मादरचोद , दिखता नही ? किर्‍यानिष्ट क्लीनर (अडगळ)

सन्जोप राव 28/10/2010 - 04:24
शिव्यांबाबतचा हा झणझणीत लेख वाचून तोंडाची बाबळी गेली. (कोल्लापूरकरांना हे कळावे. इतरांनी माडगूळकरांचा 'हॅलो, मिस्टर डेथ' आठवून 'तोंडाची अळशी गेली' असे वाचावे). 'रांडेच्या' किंवा 'रांड्या' हा शब्द कोल्हापुरात 'अरे' या अर्थाने वापरतात. 'रांड' हा शब्द तर अतीवापराने आपला तिखटपणा हरवूनच बसला आहे. बायकोला फक्त याच शब्दाने संबोधणारा दळवींचा 'प्रवासी' आठवावा. 'उंडगी' या शिवीचेही तसेच. 'तुमचे पत्र मिळाले आणि मला चार दिवस कुठेतरी उंडगेपणाने फिरुन आल्यासारखे वाटले' असे जी.ए.कुलकर्णींनी अनंतराव कुलकर्णींना लिहीले आहे. (दोघेही कुलकर्णी हा फक्त योगायोग म्हणावा. ब्राह्मण-ब्राह्मणेतर असे काही यात शोधू नये) . 'गवतात उंडगेपणाने चरत जाणार्‍या ढोरासारखे माझे वाचन आहे' यात तर 'उंडगा' या शब्द शिवी म्हणून न येता सभ्य क्रियविशेषण म्हणूनच येतो. बाकी कोल्हापूर हे महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर असल्याने खास कानडी ढंगाच्या म्हणून ज्या मराठी शिव्या आहेत, त्या अगदी रसरशीत आहेत. 'व्हयमाले', 'हादरगित्तीच्या', 'खज्जाळीच्या', सुक्काळीच्च्या' या शिव्या या लेखामुळे अगदी सकाळी सकाळी आठवल्या आणि गुरुचरित्राचे पारायण केल्यासारखे वाटले.

स्पंदना 28/10/2010 - 08:39
माझ्या एका मामाला त्याच्या आत्त्या कडुन 'शिव्यांचा पाढा ' म्हटला तरच गोळ्या( तेंव्हा चोकलेट नव्हती) मिळायच्या. कोल्हापुरी असल्यान शिव्या माहिती आहेत पण बहुतेक शिव्या आई किम्वा बहिण अश्या स्त्री नातेवाइकांवर असल्याने थोडासा निषेध. बाकी लेखा बद्दल ' च्यामारी तुम्ही तर फर्स्टक्लास लिहिलय राव'

भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

टॉनिक..

प्राजु ·

आनन्दा 25/10/2010 - 09:57
आमच्या सौ. ना आणायचा प्लॅन आहे... पण तो याच कारणामुळे हेलकावे खातोय!

असं टॉनिक आवश्यक असतं हे खरं! पण जर नोकरी करणं शक्य नसेल तर परदेशात राहून व्हॉलेंटीअर काम करता येइल..त्या निमित्ताने नविन ओळखी होतील..परदेशातल्या समाज-जीवनामधे मिसळ्ण्याची संधी मिळेल. व्हॉलेंटीअर काम आपल्या इतर सर्व बाबी अ‍ॅडजेस्ट करुन आपल्या सोयीस्कर वेळेनुसारही करत येते! एका नव्या वेगळ्या आयुष्याची ओळख करुन घेता येइल!

स्पंदना 25/10/2010 - 10:36
प्राजु अगदी सह्ही लिहिल आहेस . नोकरी सोडुन फक्त नवर्‍याचा सपोर्ट म्हणुन रहाण फार अवघड जात. अन बर्‍याच नवर्‍यांना याची जाणिव ही असते. माझ्यामुळे तुला काहिही करता येत नाही हे माझ्या ओलखिच्या बर्‍याच जणिंचे नवरे त्यांना बोलुन दाखवतात. नवीन ओळख करुन देताना तर अगदी आवर्जुन ती आधी कुठे अन कशी काम करत होती ते सांगितल जात.

चित्रा 25/10/2010 - 18:18
बॉलीवूड डान्सिंगचे क्लासेस आमच्या इथे प्रचंड जोमात चालत आहेत. सुरुवातीला मला असे वाटायचे की हे काय चालले आहे? पण आता त्यात बिनधास्तपणे भाग घेणार्‍या स्त्रियांचे कौतुक वाटते. निदान आपल्याला अह्वे ते करण्याचे धाडस आले आहे असे नक्की जाणवते. आणि त्याचा फायदा शरीराला, आणि मनःस्वास्थ्य सुधारल्यामुळे घराला होतो हेही जाणवले. लेख छान प्राजु. धन्यवाद!

In reply to by चित्रा

रेवती 25/10/2010 - 18:52
बॉलिवूड डान्सच्या लेसन्सबद्दल सहमत! काही दिवसांपूर्वी मैत्रिणीने विचारले होते कि माझा मुलगा तिच्या मुलीबरोबर नाचायला पार्टनर म्हणून येइल का. 'आय हेट लव्हस्टोरी' अश्या की काहीतरी नावाचा सिनेमा होता. दिवाळीच्या मेळ्यात नाचायचे होते. तेंव्हापासून माझ्या मुलाने त्या मुलीशी बोलणेच बंद केले आहे. इथले आसपासचे बॉलिवूड नाचाचे क्लास भरून वाहत असतात. मलाही त्या आयांचं कौतुक वाटतं कि मनात आलं तर नाचून घेतात. मला बरेच दिवस मनाची तयारी करावी लागेल.;) वाय एम सी ए च्या झुंबा डान्सच्या क्लासमध्ये बर्‍याचदा पंजाबी गाण्यांचे संगीत वापरतात.

रेवती 25/10/2010 - 18:44
लेखन मनापासून केलय म्हणूनच छान वाटतय. परदेशी गेल्यावर एकटेपणा हा भरपूर प्रमाणात सगळ्यांनाच सहन करावा लागतो, निदान काही काळापुरता तरी. मी इथं आल्यावर भरपूर कामात असतानाही कधीकधी एकटेपणा अगदी घेरून येत असे त्याची आठवण झाली. फॉल सुरु झाल्यावर तर नक्कीच! असो. प्रत्येकाला त्यावर उपाय मिळू दे ही इच्छा!

काय म्हणताय, प्राजू तै! CTMM मध्ये आतापर्यंत तुमच्या गाण्यांची धूम असते असं सगळ्यांकडून ऐकायला मिळायचं आता नृत्याविष्कार सुद्धा पहायला मिळणार तर! आम्ही "सह कुटुंब" हजेरी लावावी म्हणतोय. आमच्या मराठी मंडळात पण असाच काही प्रयोग करायचा विचार असल्याचे कुटुंबाकडून ऐकून आहे. तुम्ही काय "अखिल भारतीय महिला मंडळ" एकाच वेळी एकाच प्रकारे विचार करता काय? ;) जियो

प्रियाली 25/10/2010 - 19:35
मनापासून लिहिलं आहे हे कळतं आहे. :) मोठ्या पगाराची आणि पदाची नोकरी सोडून घरी बसणे आणि त्याचे सर्व साईड इफेक्ट्स मी अनुभवले आहेत. जेव्हा इथे नोकरी लागली तेव्हा माझ्या मनातला पहिला विचार असा होता की 'यापुढे एम्प्लॉयरने घालवून दिल्याशिवाय नोकरी सोडणार नाही.' ;) अगदी मनातलं सांगायचं तर नोकरी करताना जो भाव मला हापिसात मिळे तो देणारे नोकरी सोडल्यावर कोणी राहिले नव्हते. ;) कधीतरी घरी असणार्‍या स्त्रियांचं वैषम्य वाटतं. शनिवार-रविवार हे सुट्टीचे दिवस नसून काबाडकष्ट करण्याचे दिवस असतात माझ्यासाठी. मुलीला एक्स्ट्रा अ‍ॅक्टिविटीजना पाठवता येत नाही. पाठवले तर सतत वेळेचा विचार करावा लागतो. वैयक्तिक कामे, डॉक्टरच्या अपॉइंट्मेंट्स वगैरे सांभाळताना नाकी नऊ येतात. :( पण नोकरीचं पारडं फार जड आहे हे मान्य करते. असो. नाचासाठी शुभेच्छा! तुम्ही बायकांनी असा ग्रुप करून व्यायामासाठी सुद्धा नाचलात तर भेटी होतील, वेळ जाईल, शरीर सुडौल होईल आणि वेळप्रसंगी कार्यक्रमांमध्येही भाग घेता येईल. कायम ग्रुप बनवा.

मितान 25/10/2010 - 21:36
छान लिहिलंयस प्राजु :) रेवतीतै अगदी खरं बोललीस ! फॉल सुरू झाल्यावर खरंच तसं वाटतं ! मी माझ्यापुरते बरेच उद्योग शोधते. इथल्या डच मित्रमैत्रिणींचं एक वर्तुळ तयार झालं आहे. रोजच्या मंडळींपेक्षा वेगळ्या लोकांना भेटणं हे एक उत्तम टॉनिक असतं असा माझा अनुभव आहे.

'आयुष्य' या शब्दाचा अर्थ जर वर वर विचार केला तर जन्मापासून मृत्यूपर्यंत जो काही काळ असतो त्याला आयुष्य म्हणतात असाच असेल. पण हा जो काही काळ असतो तो आपण कसा घालवतो याला कदचीत 'जीवन जगणे' असे म्हणत असावेत. मी कधीही या दोन्ही गोष्टींचे अर्थ लावण्याचा अथवा समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला.. किंवा इथून पुढे करेन असेही नाही . मात्र गेल्या काही दिवसांत जे काही बदल मला जवळून पहायला मिळाले त्यातून कदाचीत थोडंफार यालाच 'जीवन' म्हणत असावेत असं वाटू लागलं. आयुष्यात थोडासा जरी 'बदल' झाला तरी तो बाकी इतर किती 'बदल' घडवू शकतो याचं उदाहरणच पाहण्यात आलंय.

पुस्तक परिक्षण : "पार्टनर" व.पु. काळे

सागर ·

In reply to by गांधीवादी

गणेशा 10/10/2010 - 19:59
छान परिक्षण -- मी ही जेव्हद्या कादंबरी वाचल्या आहेत त्याबद्दल लिहिलेले आहे. व्.पु हे माझे आवदते लेखक या कादंबरी बद्दल माझे काही मत -- पार्टनर (व.पु.काळे): पार्टनर ही फ़क्त कादंबरी नाहिये तर आपल्यासारख्या सामन्य मानसाचा जिवन प्रवास आहे. त्या मध्ये प्रेम, विरह या बरोबरच स्वताच्या मनात येणारे विचार आणि फिलोसॉफ़ी उत्कृष्ट पणे मांडलेली आहे. वपुंनी या पुस्तकात सामन्य मान्साचे जे दुसरे मन असते .. त्यास एक चित्ररुप व्यक्तिरेखेचे स्वरुप दिले आहे.. आणि त्यास नाव आहे पार्टनर ... दुसरे मन म्हणजे बघा .. आपण बर्याच दा वागताना विचार करतो की मी असे केले फाइजे होते पण जाउद्या समाज आहे म्हणुन गप्प बसतो .. तेंव्हा हा जो दुसरा विचार येतो आहे ना मनात ..त्या विचाराचा एक मानुस च त्यांनी या पुस्तकात दिला आहे.. पण त्याच बरोबर स्वप्नवत न रहाता आहे ते सुख आनंदाने उपोभोगायचे ही त्या पार्टनर ने येथे सांगितले आहे. ek sandhrbh : समुद्राची ताकद टिटवीला समजत नाही. आकाशाची व्याप्ती गरुडाला समजत नाही. सुगंधाचं कोडं फ़ुलाला उमलत नाही. एवढासा तू, त्याहुन एवढासा मी मला जिवनाचा अर्थ कसला विचारतोस?आणी त्याहीपेक्षा संभोगाचा अर्थ लावायचा असतो, हे तुला कोणी सांगितले? पाणी म्हणजे एच टू ओ.इथचं सगळे थांबलेले आहेत.मुर्ख म्हणुन नव्हे तर जाणकार म्हणुन थांबले. पृथ:करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही हे त्यांना समजलं म्हणुन. कोणता आनंद क्षणजीवी नाही? दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो तोवर चव. खाली उतरला की घास. सुगंधाचं नातं नाकाशी.घशातुन आत गेल्यावर ति फ़क्त हवा. खरं तर सगळ्या पंचेंद्रियांचं नातं रसिकतेशी नसुन तृप्तीशी असतं. तो क्षण संपला की रसीकता संपली. इतर अनेक गरजांप्रमाणे "तृप्ती" जी एक गरज आहे. जो गरजु आहे त्याला व्यवहार सांभाळावा लागतो.व्यवहार नेहमी साधतोच असं नाही.तो सत्यासारखा कटू असतो. ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटूता निर्माण होते. सध्या एकच वर्तमान्काळ सांभाळ. Present tense is only tense, It takes care of past and future, If we look at it correct persepective. [सुचना : येथे दिलेला हा अर्थ हा मी वाचताना घेतलेला आहे .. तुम्ही जर वेगल्या अर्थाने वाचले असेल तर येथे द्या.. त्या मुळे आपल्याला वेगवेगळ्या कोणातून पहाता येईल पुस्तकांकडे] [ पार्टनर या पुस्तकातील आनखीन वाक्य वाचण्यासाठी मी माझ्या ब्लोग ची लिन्क येथे देत आहे] http://vapurvai.blogspot.com/2007/10/as-you-write-more-and-more-personal-it.html

In reply to by गणेशा

सागर 11/10/2010 - 15:08
गणेशा, पार्टनर ही फ़क्त कादंबरी नाहिये तर आपल्यासारख्या सामन्य मानसाचा जिवन प्रवास आहे. हे अगदी अगदी खरे आहे. पार्टनर इज पार्टनर असेच म्हणतो अवांतरः ब्लॉग पाहिला. अप्रतिम आहे. फेवरिट मधे अ‍ॅड केला आहे. धन्यवाद :)

सागर 10/10/2010 - 12:39
नवरा या प्राण्याचा फुटबॉल कसा होतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण पार्टनर च्या निमित्ताने यातील एखादा प्रसंग तरी थोड्याफार फरकाने आपल्या आयुष्यात घडलेला असल्याचे जाणवते. पार्टनर म्हणतो त्याप्रमाणे जेवढे तुम्ही वैयक्तीक लिहिता तेवढे ते वैश्विक होते. :)

आशिष सुर्वे 10/10/2010 - 17:36
परत वाचली पाहिजे. (म्हणजे परीक्षण वाचून कादंबरी परत वाचायची इच्छा झाली आहे.)
.. अगदी अगदी.. ह्या पुस्तकाचा एवढा परिणाम झाला होता की मी आणि माझा जिवलग मित्र, आम्ही एकमेकांना 'पार्टनर' असेच संबोधन करायचो..

उपास 14/10/2010 - 02:48
दरम्यान, याहू वा तत्सम मेसेंजर anonymous राहून चॅटींग करत (एक छंद म्हणून आणि सुरक्षितता म्हणूनही) लोकांना मानसिक मदत करण्यार्‍या माणसाची एक गोष्ट वाचली.. अगदी पार्टनर ची आठवण झाली.. आयुष्याच्या वेगवेगळ्या ट्प्प्यावर वेगवेगळे अर्थ देणारं, वेड करणार हे पुस्तक!

एवढ्यातच वपुं चे 'पार्टनर' सुन्न मनाने वाचून काढले. भन्नाट पुस्तक आहे. मी खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या शालेय जीवनात वाचली होती. तेव्हाही 'पार्टनर' मस्त वाटली होती. पण त्यातील दाहकता जाणवली नव्हती. काही संदर्भ, अर्थ व भूमिका कळण्यासाठी लग्नाचा अनुभव गाठीशी (किंवा किमान तेवढी मॅच्युरिटी) असल्याशिवाय 'पार्टनर'मधील दाहकता जाणवणे शक्य नाही. पहिल्या ११ पानांतच मी 'पार्टनर' मध्ये गुरफटलो. कुठे मनसोक्त हसलो ... तर कुठे मनसोक्त रडलोही... होय खोटे कशाला सांगू? 'पार्टनर' वाचल्यामुळे असेल कदाचित पण त्यातील रोखठोक पार्टनर चे विचार जळजळीत असले तरी प्रामाणिकपणे पटले.

कोहम! कोहम!

मराठमोळा ·

गांधीवादी 09/10/2010 - 14:54
>>मन विचार करणं थांबवत नाही.. दिवस रात्र, वेळ, काळ त्याला काही माहित नसतं.. अहोरात्र हे विचारचक्र अखंड चालु असते.. आमचे पण असेच काहीतरी होते. अवांतर : कमल हसनचा "हे राम" हा सिनेमा चांगला आहे, मला पण आवडला,

आपण सरावाचे होउन जातो, कळत न कळत
माय फेअर लेडीमधलं आय अॅम अॅकस्टम्ड टु हर फेस... हे आठवलं. कितीही स्वतःशी निर्धार केला, तरी केवळ सवयीने, संपर्काने नाती जुळतात.

दहावीत असताना टायटॅनिक पाहिला होता, ईंग्रजी अ‍ॅक्सेंट तेव्हा तेवढा कळत नव्हता, पण आज पुन्हा अचानक पाहिला. मनात अनेक विचार उठले, कल्लोळ जाहला... माजला.... डोकं काम करेनासं झालं... का? कुणास ठाउक... काही काही वाक्ये मनाला स्पर्शुन नाही तर घासुन गेली.. ओरखडली.. इतके विचार कल्लोळ माजवुन गेले.. त्यातलाच एक विचार. (he exists in my memories).. अप्रतिम. त्यावरुन सुचलेलं काहीसं. माणसं... एखादी कुत्री मांजरी मेली तर कदाचित दुख: होणार नाही, पण एखादा रोज दिसणारा भिकारी अचानक गेला तर मनाला हुरहुर लागते. का? कितीही वाईट असो, मित्र, नातेवाईक कोणीही, पण एक नातं असतं जे ओढतं, जवळीक साधतं ते का?

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग चार

यशवंतकुलकर्णी ·

पैसा 08/10/2010 - 18:15
पुढे महेश भट यांनीच, युजींच्या शिव्या खाऊन का होईना पण युजींचे आत्मचरित्र लिहीलेय
Ghost writing आहे का? की "चरित्र " असे हवे तिथे?

हे राहूनच गेलं होतं वाचायचं. बरीच गर्दी झाल्यामुळे लेख सापडत नाहीयेत. मी तर चौथा भाग कधी लिहिणार असं विचारणार होतो! (पाचवा लिहिलाय काय ते आत्ताच सांगा!) या भागात युजी कमी आणि रजनीश जास्त होते. रजनीशांसारखे नव्हते ते युजी असं म्हणायचं असेल, तर या लेखात युजी आहेत असं म्हणता येईल. रजनीश हा मापदंड का ठरवला बरे? महेश भटांमुळे? महेश भट आणि रजनीश वजा केले तर युजी उरत नाहीत की काय असं हा लेख वाचून वाटलं.

3

रारंग ढांग पोरका झाला..

डॉ.प्रसाद दाढे ·

सहज 08/10/2010 - 10:37
'रारंग ढांग' वाचलेच पाहीजे अशी ओळख. श्री. प्रभाकर पेंढारकर यांना श्रद्धांजली!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रभो 08/10/2010 - 19:11
प्रभाकर पेंढारकरांना श्रद्धांजली.

श्रध्दांजली!!! रारंग ढांग ही एक मनावर गारूड करून बसलेली अप्रतिम कलाकृती आहे. चार उत्तम अनुभूतीचे क्षण दिल्याबद्दल पेंढारकर नेहमीच लक्षात राहतील.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

+ सहमत. शिवाय मराठी चित्रपट निर्मितीच्या टप्प्यातील दोन महत्वाची ठिकाणे म्हणजे भालजींचा 'जयप्रभा' तर शांतारामबापुंचा 'शालिनी.....(नंतरचा शांतकिरण)' हे कोल्हापुरातील दोन स्टुडिओज्.....मोठ्या माळरानावर वसवलेले एका इतिहासाचे हे दोन महत्वाचे साक्षीदार आज खर्‍या अर्थाने इतिहासजमा झाले आहेत. स्टुडिओजच्या ठिकाणी मल्टिकॉम्प्लेक्स अपार्टमेंट्स.....किरण शांताराम यांनी तर वडिलांची जागाच विकून टाकली..... तर त्या त्या जागांशी भावनीक संबंध ठेवणारे प्रभाकर पेंढारकर आज काळाच्या पडद्याआड...... 'चित्रमय' रूप उलगडून दाखविणारे प्रभाकरपंतांचे पुस्तक 'एका स्टुडिओचे आत्मवृत्त' संग्रही ठेवण्यासारखेच आहे....'रारंग ढांग' सारखेच. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो. इन्द्रा

बबलु 08/10/2010 - 10:56
श्री. प्रभाकर पेंढारकरांनी रारंग ढांग लिहून अनंत उपकार केलेत आपल्यावर. master piece म्हणतात तो असाच. विनम्र श्रध्दांजली !!

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

मस्त कलंदर 08/10/2010 - 13:57
खरेच अमूल्य ठेवा आहे हा. रारंगढांग बद्दल काय बोलावे? खरेच तो मास्टरपीस आहे. माझीही पेंढारकरांना श्रद्धांजली!!!

दिपक 08/10/2010 - 12:58
’रारंग ढांग’ तीन वेळा वाचली आहे. अजुन कितीही वेळा वाचु शकतो.. पेंढारकरांच्या काही आठवणी इथे वाचा. पेंढारकरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

ज्ञानेश... 08/10/2010 - 12:59
'रारंग ढांग' वाचायचे कधीपासून ठरवले होते, पण योग येत नव्हता. गेल्या आठवड्यात दि. २ आणि ३ ऑक्टोबरला मी पुण्यात होतो. ३ तारखेला काही पुस्तके घेण्यासाठी अ.ब. चौकात गेलो. रविवार असल्याने 'रसिक साहित्य' आणि इतरही काही दुकाने बंद होती. म्हणून मिपाकर पराला फोन केला. त्याने काही दुकानांचे पत्ते दिले. काही पुस्तके घेतली- त्यात रारंगढांग होते. सर्वप्रथम तेच वाचायला घेतले. आज (दि. ८) रोजी- आत्ता काही मिनिटापुर्वीच पुस्तकाचे शेवटचे पान वाचून संपले. लेफ्टनंट विश्वनाथला मनोमन एक कडक सॅल्युट ठोकून आणि कादंबरीचा खुमार मनात घोळत असतांनाचा मिपावर लॉगिन झालो, आणि पहिलाच धागा दिसला- "रारंग ढांग पोरका झाला..." फार वाईट वाटते आहे.

गणेशा 08/10/2010 - 13:27
कालच बातमी ऐकुन वाईट वाटले. रारंग ढांग कादंबरी बद्दल लिहावे तितके ठोडेच आहे. प्रभाकर पेंढारकरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सन्जोप राव 08/10/2010 - 15:14
किती वेळा वाचली असेल ते सांगता येणार नाही. विश्वनाथ मेहेंदळेइतकाच मिनू खंबाटाही ध्यानात राहिला आहे. पेंढारकरांना आदरांजली.

sneharani 08/10/2010 - 15:17
वाचायला हव पुस्तकं! श्री. प्रभाकर पेंढारकर यांना श्रद्धांजली!

मिहिर 08/10/2010 - 16:43
प्रभाकर पेंढारकरांना श्रद्धांजली. रारंग ढांग या उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचले. वाचून अक्षरशः वेडा झालो. अगदी मस्त कादंबरी आहे.

प्रदीप 08/10/2010 - 19:28
रारंग ढांग तर अप्रतिम होतेच, पण सुमारे चार-पाच वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात पेंढारकरांनी एक सुंदर लेख लिहीला होता त्याची आठवणही माझ्या मनात कायम राहील. मुंबईच्या ताज ग्रूपने, ताज हॉटेलच्या कामकाज(ऑपरेशन्स)सुधारणेच्या निमीत्ताने, ऑपरेशन्स मॅनेजमेंटच्या एका विख्यात जपानी तज्ञास (नाव विसरलो) पाचारण केले होते. पाच-सहा दिवस तो तज्ञ तिथे राहून, तेथील पाहणी करून, मग त्या व्यवथापनातील संबंधित मॅनेजरांचे वर्कशॉप घेणार, असा काहीस तो प्रोग्रॅम होता. त्याच्या ह्या सर्व कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याचे कंत्राट ताज ग्रूपतर्फे पेंढारकरांना देण्यात आले होते. पेंढारकरांचा लेख ह्या जपानी तज्ञाच्या तेथील वास्तव्याविषयी होता, ज्यात त्यांनी अगदी साध्या भाषेत त्या तज्ञाचा तेथील सहज वावर, त्याची निरीक्षणे, त्याची अनुमाने , सुचवणूका व त्यांची प्रात्यक्षिके ह्यांचे सुंदर दर्शन वाचकांना घडवले होते. पेंढारकर वास्तविक फिल्म्स डिव्हीजनमधील एक डॉक्युमेंटरी निर्माते होते; ह्या सगळ्या विषयाचा त्यांचा तसा काही संबंध नसावा, पण तरीही त्यांनी त्या जपानी तज्ञाकडून तिथे जे काही सांगितले जात होते त्यातील मर्म आत्मसात केलेले दिसत होते, त्याचे कौतुक वाटले.

In reply to by प्रदीप

मस्त कलंदर 08/10/2010 - 20:12
तेच ना, गेम्बा कैझन वाले??? मला कुणीतरी त्यांच्या त्या प्रोग्रॅमबद्दल असलेल्या लेखाची पीडीएफ पाठवली होती. शोधायला हवी मेलबॉक्स मध्ये. छोट्या छोट्या प्रसंगांतून त्यांनी छान शिकवण दिली होती.

अडगळ 08/10/2010 - 19:35
नायकाला त्याच्या वडिलांनी पाठवलेले एक पत्र आहे. अप्रतिम आहे . बाप्-लेकातलं अंतर , अवघडलेपण , बापाची जीवनमूल्यं आणि हे सगळं पोटात घेणारी , त्या बापाला पोराविषयी वाटणारी माया , हे सगळं त्या मात्र एक्-दीड पानाच्या पत्रात आहे. पेंढारकरांच्या समर्थ लेखणीला मुजरा.

सुनील 08/10/2010 - 19:42
पेंढारकरांना विनम्र श्रद्धांजली. कुणीतरी रारंग ढांगचे विस्तृत परीक्षण लिहावे.

मस्तानी 08/10/2010 - 19:45
दाढे साहेब ... परवा बातमी वाचली, मनात बराच काही आलं ... धड काही लिहिताही येत नव्हत, पण वाईट मात्र नक्कीच वाटल. व्यक्तीशः पेंढारकर यांच्या 'रारंग ढांग' वगळता इतर निर्मिती बद्दल फारसं माहित नव्हत. आता ती पुस्तके वाचण्याचा प्रयत्न जरूर करेन. श्री. प्रभाकर पेंढारकर यांना श्रद्धांजली!

रारंग ढांग दर चार पाच वर्षांनी पुन्हा पुन्हा वाचले.. दर वेळी वेगळाच अनुभव देत गेले... आता परत वाचायला हवे... आठवणींचा छान लेख... यावर सिनेमा खूप छान झाला असता... ( पण लष्कर परवानगी कशाला देईल अशा विषयाला? असो..) अवांतर : या निमित्ताने दिवाळी अन्कातले त्यांचे काही लेख आठवले...पेंढारकरांचाच एका " डॉक्युमेन्टरीला हिन्दी कॉमेन्ट्री लिहिणारे एक त्या खात्यातले ज्येष्ठ लेखक / अधिकारी होते,( नाव विसरलो) त्यांच्यावरचा लेख गेल्या दिवाळी अन्कात वाचला होता..अन्दमानच्या डॉक्यूमेन्ट्रीची कॉमेन्ट्री, शिवाजी महाराजांच्या डॉक्युमेन्ट्रीची सुरुवातीची कॉमेन्ट्री त्यांना कशी सुचत गेली ती फार छान आठवण आहे...

ज्येष्ठ चित्रपट निर्माते- दिग्दर्शक व श्रेष्ठ साहित्यिक श्री. प्रभाकर पेंढारकर यांचे पुण्यात काल दि. ७ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. चित्रपट महर्षी भालजी पेंढारकरांचे ते सुपुत्र होते त्यामुळे कलेचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले होते. 'बाल शिवाजी' , 'शाबास सुनबाई' इ चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. 'बालशिवाजीचे' कथा-पटकथा-संवादही त्यांनी लिहिले होते.