Skip to main content

महिला राज

लेखक प्रमोद सावंत१ यांनी मंगळवार, 02/11/2010 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याप्रमाणे गुलामगिरी, धूम्रपान व स्त्रियांच्या अधिकारातील कमतरता इतिहासजमा झाल्या आहेत. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार, सरंजामी वृत्ती व भ्रष्ट अकार्यक्षम लोकशाही इतिहासात जमा करणे शक्य आहे. पूर्वी स्रियांना अधिकार कमी होते. इंग्लंड अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाहीतही शंभर वर्षांपूर्वी महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. अमेरिकेत वेतन समानता तर बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर शक्य झाली. भारतात स्वातंत्र्यानंतर स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी लढावे लागले नाही. पंचायत राज आणले तेव्हा ३३% जागा स्त्रियांसाठी आरक्षित ठेवल्या. संसदेतही महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सभापती एक दलित महिला नेत्या आहेत, सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्ष एक महिला आहेत, एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री महिला आहेत व राष्ट्र्पती एक महिला आहेत. संदर्भ -एका दिशेचा शोध; लेखक – संदिप वासलेकर; प्रकाशक – राजहंस प्रकाशन,पुणे २०१० वासलेकरांनी मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे. चूल ते मूल या मर्यादेत सिमीत असणाऱ्या महिला आज सत्ताधीश झाल्या आहेत. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत देखील जनतेने ३५ टक्के महिलांना निवडून यावर शिक्कामोर्तब केले आहे. पुरुषसत्ताक परंपरा असणाऱ्या भारतात आज संसद सभापती, सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री, सर्वात मोठ्य़ा पक्षाची नेत्या व राष्ट्रपती महिला आहेत. ही खरंच एक क्रांती मानली पाहिजे. जर महिलासंदर्भात हा बदल होऊ शकतो तर भ्रष्टाचार, सरंजामशाही वृत्ती इतिहासजमा करणे सहज शक्य आहे. अधिक माहितीसाठी- http://www.facebook.com/home.php?#!/pages/Eka-Dishecha-Shodh/1261040874…
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2211
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

:)

चूल ते मूल या मर्यादेत सिमीत असणाऱ्या महिला आज सत्ताधीश झाल्या आहेत.
सिमीत महिलापण होत्या? शुद्धलेखनाची अगदीच आई-माई नसली तरीही "सिमीत" या शब्दाने माझी फार गडबड उडली. इथे अपेक्षित असलेला शब्द सीमीत का सिमीत? साधारण याच विषयावरचं, कदाचित जास्त व्यापक, करूणा गोखले यांचं ('राजहंस' प्रकाशनच) बाईमाणूस हे वाचनीय पुस्तक आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रिया पाशवी आहेत हे सिद्ध झाल्यानंतर त्या सिमीत असतील तर आश्चर्य काय म्हणते मी? ;)

In reply to by प्रियाली

=))

In reply to by नितिन थत्ते

ते पहिलं वाक्य मी वाचलंच नव्हतं हे आता प्रतिसाद पाहून लक्षात आलं. अचानक सिमीचा उल्लेख दिसला म्हणून तेवढंच काय ते नीट पाहिलं मी!

मी लेखाचे शिर्षक वाचुन, स्त्री राज्य असलेल्या बेटावर सापडलेल्या सुदैवी तरुणाची कथा वगैरे असेल असे समजुन धागा उघडला. घोर फसवणूक आणि निराशा झाली.

In reply to by नितिन थत्ते

..............