आज पासून पोळ्या तु कर संध्याकाळच्या आईसाहेबांच फर्मान सुटल आणि अचानक का का का ????? काहूर उठल, अर्थात पोळ्या कारण ही फार मोठी बाब नवतीच मुळी ... पण ज्या कारण साठी मला हे काम गळ्यात घ्यायला सांगण्यात येत होत ते कारण जवळपास संतापजनक होत... हो कदाचित चाणाक्ष मिपा वाल्यांनी कारण ओळखल असेलच "जावई शोध " सुरु झाला होता...
अभियांत्रिका चा अभ्यास करताना जी आई कपबशी ला देखील हात लाऊ देत नवती तिने अचानक मला कामाला लावलं होत ... तुला हे आलं पाहिजे , तु हे केल पाहिजे, आता ह्याची सवय करून घे आता त्याची सवय करून घे का?