&%^$@# !!!

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
24 Feb 2010 - 9:24 pm

दचकायला काय झालं? .... ते शीर्षक तसंच आहे.... &%^$@# !!!

चाणाक्ष लोकांच्या लक्षात आलंच असेल... &%^$@# !!! म्हणजे काय ते. ज्यांच्या आलं नसेल त्यांच्या लवकरच येईल. :)

तर झालं काय... नुकताच सौदी अरेबियामधे जाण्याचा योग आला होता. दिवसभर कस्टमरकडे राबराबून मी माझ्या एक दोन सहकार्‍यांबरोबर गेस्टहाउसकडे परत चाललो होतो. ऑफिसमधून बाहेर आलो आणि टॅक्सीला हात केला. टॅक्सी थांबली. आखाती देशात सहसा टॅक्सीवाले पाकिस्तानी किंवा भारतियच असतात. तसे असले तर गप्पा मारत प्रवास होतो. पण त्या दिवशीचा टॅक्सीवाला नेमका येमेनी होता... टॅक्सी सुरू झाली. गडी भलताच गप्पिष्ट होता. त्याची अखंड बडबड सुरू झाली. त्याचं अस्खलित आणि माझं मोडकं अरबी... पण बोलणे भाग होते. रियाधमधला अगाध ट्रॅफिक... प्रचंड मोठ्या हायवे वरून ताशी १००+ किमीच्या वेगाने खेळलेल्या आट्यापाट्या, खोखो, हुतूतू वगैरे प्रकारांमुळे हार्ट अ‍ॅटॅक येऊ न द्यायचा असेल तर मन असं गुंतवणं भागच असतं.

माझ्या बरोबर माझा आयुष्यात पहिल्यांदाच भारताबाहेर, ते सुद्धा थेट सौदी अरेबियामधे आलेला एक सहकारी होता. तिथल्या एकंदरीत कडक नियम / शिक्षा वगैरे बद्दल त्याचं इंडक्शन भारतातच झालं होतं. तो अगदी गप्प गप्प असायचा... न जाणो आपण हिंदीत का होईना पण काही चुकीचं बोललो तर लफडं व्हायचं उगाच... म्हणून तो कायम गप्प. पण आमच्या गप्पा चालू झाल्यावर त्याला पण मूड आला.

ड्रायव्हरसाहेब अगदी दिलखुलास माणूस निघाले. त्यांचं बोलणं अगदी धबाधबा. रस्त्यावरील इतर ड्रायव्हरांबद्दलचा त्यांचा आदर आणि प्रेमभाव अगदी ओसंडून वाहत होता. तेवढ्यात एका गाडीने आमच्या गाडीला अगदी सराईत कट मारत ओव्हरटेक केले. झाले... पुढची पाच मिनिटे आमच्या टॅक्सीत नुसता कल्ला झाला... मला अरबी फारसे येत नाही पण त्या पाच मिनिटात त्या दुसर्‍या चालकाच्या कोणकोणत्या नातेवाईकांची आणि अवयवांची आठवण निघाली होती हे कळण्याइतपत नक्कीच कळते.

गडबड शांत झाल्यावर माझा सहकारी हळूच विचारता झाला.

'काय झालं?'

'काही नाही रे... घाबरू नकोस. तो अगदी नॉर्मल आहे.'

'पण तो असा अचानक चिडला का?'

'अरे, त्या दुसर्‍या गाडीने आपल्याला ओव्हरटेक केले ना... म्हणून हा जरा स्वतःला मोकळा करत होता.'

'काय बोलला तो?'

'*&^%$@# !!! असं म्हणाला तो'

'म्हणजे? शिव्या दिल्या त्याने? त्या पण असल्या? आणि इतकं चिडून?'

'हो. सहसा शिव्या अशाच देतात. आणि असल्याच देतात.'

माझा मित्र दोन मिनिटं विचारात पडला आणि मग हळूच मला म्हणाला...

'सर, इथे शिव्या देणं अलाऊड आहे?'

'!.!.!.!.!' ... मी स्पीचलेस. अगदी नि:शब्द वगैरे.

शक्य असतं तर मी त्याला 'अलाऊड आहे' हे डेमो देऊन सांगितलं असतं इतका वैतागलो मी. अरे सौदी अरेबिया झालं म्हणून काय झालं? मानवाच्या जन्मसिद्ध अधिकारात मोडणार्‍या 'शिव्या देणे' या प्रकाराबद्दल एवढं अज्ञान? मी त्याला नीट समजवलं... अर्थात शिव्या न देता. खूप कंट्रोल केलं तेव्हा मी स्वतःला.

खरं म्हणजे शिव्या हा मानवतेला लाभलेला आणि पुढे नेणारा एक अनमोल ठेवा आहे. जरा विचार करा...

तुम्ही अश्याच एखाद्या प्रसंगात सापडला आहात. कॉलेज लाईफ मधला पहिलाच रोझ डे... (आपापल्या प्रेफरंसप्रमाणे) आवडती व्यक्ती समोरून येत आहे. तुमच्या हातात गुलाब. ती व्यक्ती जवळ यायची वाट बघत तुम्ही अगदी उत्कंठेच्या टोकावर उभे. ती व्यक्ती जवळ येते... तुम्ही गुलाब पुढे करणार एवढ्यात..... दुसराच कोणी तरी येतो... आख्खा रेडरोझचा गुच्छच्यागुच्छ त्या व्यक्तीला देतो... ती व्यक्तीपण तो गुच्छ अगदी हसून आणि लाजून वगैरे स्वीकारते... तुमचा पत्ता कट झालाय तुमच्या लक्षात येतं... आणि... आता जस्ट विचार करा हं... शिव्या हा प्रकार अस्तित्वातच नसता समजा, तर तुम्ही नक्कीच त्या नको तिथे नको तेव्हा कडमडणार्‍याचा खून केला असता. पण तसं होत नाही (बहुतेक वेळा तरी... टार्‍याची ग्यारंटी नाही... ). तुम्ही चरफडता, हात (एकमेकांवर) चोळता... एक शंभरेक शिव्यांची लड लावता आणि गुलाबासाठी दुसरं एखादं डेस्टिनेशन शोधायला चालू पडता... थोडक्यात काय तर... यु मूव्ह ऑन. खलास. सिंपल. विषय संपला.

हेच नेमकं शिव्यांचं महत्व आहे.

माणसाच्या मनातल्या भावनांचा निचरा न होणं हे मनोविकाराचं एक प्रमुख कारण आहे. प्रत्येक वेळी तो निचरा आपल्याला पाहिजे तसा नाही होऊ शकत. आपण समाजात राहतो. समाजाची काही एक चौकट असते. त्या चौकटी बाहेर पडणं कधी कधी खरंच हितावह नसतं आणि कधी कधी आपल्यात तेवढा दम नसतो. तिथे शिव्या कामी येतात. व्यक्त किंवा अव्यक्त म्हणजेच उघड नाहीतर मनातल्या मनात तरी आपण चार शिव्या हासडतो (हासडलेल्या शिव्या दिलेल्या शिव्यांपेक्षा अधिक फायदेशीर आणि गुणकारी असतात) आणि भावना तुंबू देत नाही. शिव्या अनादी आहेत. शिव्या अनंत आहेत. प्राण्यांना स्वत्वाची भावना नसते असं म्हणतात. पण जेव्हा पासून मानवाला उत्क्रांतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर स्वतःच्या अस्तित्वाची जाणिव झाली तेव्हा पासून 'व्यक्त होणे' ही एक फार मोठी, किंबहुना सगळ्यात मोठी भावनिक गरज बनली. भाषा वगैरे नंतर बनल्या पण शिव्या मात्र त्या आधीही असणारच. शिव्या भाषेवर अवलंबून नाहीत. शिव्यांची एक स्वतंत्र भाषा आहे. मौखिक भाषा त्यात दुय्यम आहे, नसली तरी चालावी अशी. नाही तर एखाद्या मुक्या माणसाची पंचाईत. पण असे असले तरी, शिव्या या कोणत्याही भाषेच्या अगदी मूळ वैशिष्ट्यांपैकी असतात. सर रिचर्ड बर्टनला बर्‍याच भाषा यायच्या. तो जिथे जाईल तिथली भाषा शिकायचा. अगदी पारंगत होत असे तो. तो म्हणतो, "कोणतीही भाषा शिकायची युक्ती म्हणजे सर्वप्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकायच्या. बाकीची भाषा आपोआप येईल."

शिव्या मुख्यत्वे जरी त्या देणार्‍याच्या मानसिक समाधानासाठी असल्या तरी बरेच वेळा त्या ज्याला दिल्या जातात त्याच्यापर्यंत पोचल्या तर त्यातले समाधान द्विगुणित होते. म्हणजे, एखाद्या बाईने लाखो रूपयाचे दागिने घालायचे आणि घरात दारं खिडक्या बंद करून अंधार्‍या खोलीत कोंडून घ्यायचे. मग कशाला घालायचे ते दागिने? तसेच जर का शिव्या दिलेल्या पोचल्या नाहीत तर मजा किरकिरा व्हायचा संभव असतो. यासाठी देहबोली अतिशय आवश्यक असते. शिव्या देतानाचा आवेश / मुद्रा / हातवारे बरोब्बर जमले पाहिजे. शब्दांवरचे आघात जमले पाहिजेत. त्यामुळे, कधी कधी अगदी साध्या साध्या शिव्या पण खूप इफेक्टिव्ह बनतात. अन्यथा अगदी घणाघाती शिवी पण मिळमिळीत होऊ शकते. तो इफेक्टच महत्वाचा असतो. अशी एक नीट दिलेली शिवी कमीतकमी हजारवेळा तरी कानफटवण्याच्या बरोबरीची असते.

शिव्यांचेही बरेच प्रकार असतात. काही शिव्या शारिरीक संदर्भात असतात. यामधे अवयवांचे संदर्भ अथवा एखाद्या शारिरीक व्यंगाचा संदर्भ इत्यादी येते. काही शिव्या नातेसंबंधांवर आधारलेल्या असतात. तर काही शिव्या प्राणीजगताशी संबंधित असतात. धार्मिकतेच्या संदर्भाने पण शिव्या दिल्या जाऊ शकतात. या प्रकारच्या शिव्या जरा जास्तच खोल जखम करतात. कित्येक वेळा शिव्या या केवळ 'दूषण' न राहता 'शाप' या सबकॅटेगरी मधे पोचतात. अशा शिव्या, शिव्या दिल्याजाणार्‍या व्यक्तीच्या भविष्याकाळातील अवस्थेबद्दल अघोरी भाष्य करतात. काहीही असले तरी समोरच्याला व्यथित करणे हा उद्देश सफल करण्याच्या दृष्टीनेच सगळ्या कृती होत असतात.

भारताच्या संदर्भात बोलायचे तर जातीवरून दिलेल्या शिव्या अतिशय तीव्र असतात. इतक्या की केवळ या प्रकारच्या शिव्यांबद्दल एक कायदाच अस्तित्वात आला. भारतातील जातिय व्यवस्थेचा नृशंस इतिहास याला कारणीभूत आहे. एखाद्या माणसाला जातिवाचक शिवी देताना ती शिवी ज्याला दिली जात आहे त्याला त्या शब्दामागे हजारो वर्षांचा अन्याय एकवटल्याची जाणिव होत असते आणि म्हणून तो एखादा शब्द खोल जखम करून जातो. त्या माणसाच्या आत्मसन्मानालाच धक्का देऊन जातो.

सुरूवातीला म्हणलं तसं शिव्या मुख्यत्वेकरून मनातील भावनांना वाट करून देणे याकरिता असतात. सहसा राग आल्यावर जरी शिव्या वापरल्या जात असल्या तरी बरेच वेळा आनंदाच्या वेळीही पटकन आपल्या तोंडात शिव्या येतात. तुमचा एखादा शाळेतला जीवलग मित्र शाळा सुटल्यावर दुरावतो... वर्षानुवर्षे भेट होत नाही. एखाद दिवशी अचानक भेटतो... पूर्वीचे प्रेम, दोस्ती उफाळून येते... दोघेही अगदी मनापासून आनंदित होतात तेव्हा ते म्हणतात.... "भो***... अरे आहेस कुठे? साल्या, किती वर्षांनी भेटतो आहोत आपण!!!" .... आता इथे त्या शिव्यांचा शब्दार्थ पूर्णपणे लुप्त होऊन केवळ भावार्थ तेवढा उरतो. आणि तो एकमेकांना बरोब्बर कळतो. सांगावा लागत नाही. जिथे सांगायची गरज पडावी तिथे असे शब्द येतच नाहीत तोंडातून.

महाराष्ट्र संतभूमी आहे असे म्हणतात. मराठी भाषेच्या जोरदार शिवीवैभवाच्या प्रभावातून इथले संतही सुटले नाहीत. अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थांबद्दल कित्येक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दर्शनाला गेल्यावर त्यांनी शिव्या घातल्या तर तो विशेष कृपाप्रसाद आहे असे समजले जायचे म्हणे. गाडगेबाबा पण रोखठोक आणि शिव्या वापरून बोलण्याबद्दल प्रसिद्ध होते असे कुठे तरी वाचल्याचे आठवते आहे. यादी फार मोठी आहे.

पण मला खरं विचाराल तर सगळ्यात मोठी शिवी कोणती म्हणाल तर मी एकच सांगेन... दुर्लक्ष. होय... दुर्लक्ष करण्यासारखा दुसरा अपमान नाही कोणाचा. शिवीचे उद्दिष्ट्य जे आहे ते समोरच्याचा अपमान करणे हे होय. आणि समोरच्या माणसाची दखलच न घेणे या सारखा अपमान सगळ्यात जास्त झोंबणारा असतो. शिवाय ही शिवी निर्विवादपणे १००% सगळ्या सभ्यतेच्या आणि कायद्याच्या नियमात बसते. ही शिवी दिली म्हणून कोणावर गुन्हा नोंदवला गेला आहे असे ऐकिवात नाही. बिन्धास्त देऊ शकतो. किमान (म्हणजे अगदी शून्य) शब्दात, कमाल अपमान करणारी अशी ही शिवी आहे.

पण दुर्लक्षाच्या बाबतीत एक गंमतीदार विरोधाभास आहे. मूळात शिव्या या मनातील भावनांचा निचरा करण्यासाठी दिल्या जात असल्या तरी, त्याच भावनांवर पूर्णपणे नाही तरी खूपसा ताबा मिळवल्याशिवाय ही शिवी देता येत नाही. याबाबतीत लहानपणी शाळेत शिकलेली महात्मा गांधींची गोष्ट अजूनही लक्षात आहे...

एकदा एका माणसाने गांधीजींना खूप निंदा करणारे पत्र लिहिले. त्यात त्यांना शिव्याही भरपूर घातल्या होत्या. ते पत्र मिळाल्यावर गांधीजींनी त्याला लावलेल्या टाचण्या काढून घेऊन ते पत्र परत पाठवले... त्यासोबत एका कागदावर हे ही लिहिले... "तुमचे पत्र मिळाले. वाचले. त्यातले मला हवे असलेले, उपयोगी असेलेले ठेवून घेतले. नको असलेले तुम्हाला परत करतो आहे."

मला सांगा, त्या पत्रलेखकाला सणसणीत कानाखाली बसल्यासारखं नसेल वाटलं? नक्कीच वाटलं असणार.

तर, अशा या शिव्या. आता या लेखाकडे दुर्लक्ष करून तुम्ही मला शिव्या घलणार नाही अशी अपेक्षा करतो. ;)

संस्कृतीसमाजप्रकटनअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रशु's picture

24 Feb 2010 - 10:33 pm | प्रशु

मनोगत आवडल. पण काहि दिवसांपुर्वी झालेला शिक्षणाच्या आयचा घो चा वाद आठवला.....
........................................................................
तुमच्या शिव्या आमच्या ओव्या............

II विकास II's picture

24 Feb 2010 - 10:44 pm | II विकास II

लेखाचे शिर्षक वाचुन होळीचा लेख आला काय असे वाटुन गेले.
असो.
परदेशातील गमती जमती वाचायला मौज येते. परदेशारतील लोक भारताबद्दल काय म्हणतात, त्याचा एक लेख जमला तर येउद्यात.

पण मला खरं विचाराल तर सगळ्यात मोठी शिवी कोणती म्हणाल तर मी एकच सांगेन... दुर्लक्ष. होय... दुर्लक्ष करण्यासारखा दुसरा अपमान नाही कोणाचा. शिवीचे उद्दिष्ट्य जे आहे ते समोरच्याचा अपमान करणे हे होय. आणि समोरच्या माणसाची दखलच न घेणे या सारखा अपमान सगळ्यात जास्त झोंबणारा असतो.
विचार करण्याजोगा मुद्दा. तुम्ही नेहमी हा मुद्दा मांडता. असो.

शुचि's picture

24 Feb 2010 - 10:58 pm | शुचि

बिका, वेगळ्याच विषयावर काय सुंदर लेख लिहीला आहेत हो. आम्ही बायका या आनंदाला मुकतो खर्‍या.
मला माझ्या एका मैत्रीणीचे शब्द आठवतात ती नवर्‍याविषयी त्राग्याने बोलत होती आणि तो त्रागा इतका अनावर झाला पण पडली बाई मग शिवी कशी देणार?
एवढच म्हणाली - "नवरा म्हणजे शंकराच्या पिंडीवरचा विंचू .... वहाणेनी मारताही येत नाही आणि पूजाही होत रहाते." ......... मनात तिचे शब्द इतके खोल रुतले म्हणून सांगू.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

वेताळ's picture

25 Feb 2010 - 12:03 pm | वेताळ

मग उकळलेल्या पाण्याने अभिषेक घाला :D
बाकी शिव्या देणे ह्या जिव्हाळ्याच्या विषयावर लिहल्याबद्दल आभारी आहोत.
वेताळ

निशा कुलकर्णी's picture

25 Feb 2010 - 3:28 pm | निशा कुलकर्णी

मग उकळलेल्या पाण्याने अभिषेक घाला
बाकी शिव्या देणे ह्या जिव्हाळ्याच्या विषयावर लिहल्याबद्दल आभारी आहोत.

-----अफलातून आयडिया!!!

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2018 - 5:50 pm | टवाळ कार्टा

मग उकळलेल्या पाण्याने अभिषेक घाला

आरारारा....नवर्याची पिंडी अश्याने काम करेनाशी झाली तर? =))

पक्या's picture

25 Feb 2010 - 11:44 pm | पक्या

बायका पण देतात बरं शिव्या . (शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टीने) खालच्या वर्गातील बायकांच्या तोंडच्या शिव्या ऐकून गपगार व्हायला होईल.
बायकांच्या तोंडी 'हलकट मेला' तर अगदी कॉमन शिवी आहे. तसेच बावळट , नालायक .

जय महाराष्ट्र , जय मराठी !

धनंजय's picture

24 Feb 2010 - 10:59 pm | धनंजय

मस्त!

खुसखुशीत आणि वैचारिक असा तोल छान साधला आहे.

स्वाती दिनेश's picture

24 Feb 2010 - 11:15 pm | स्वाती दिनेश

खुसखुशीत आणि वैचारिक असा तोल छान साधला आहे.
धनंजयशी सहमत,
स्वाती

बेसनलाडू's picture

25 Feb 2010 - 11:18 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

शेखर's picture

25 Feb 2010 - 1:48 am | शेखर

सुंदर लेख बिपीनजी....

चला, एका तरी संपादकाला शिव्यांचे वावडे नाही व त्या शिव्या हे भावना मोकळ्या करण्याचे शब्द आहेत हे वाचुन बरे वाटले. :)

टारझन's picture

25 Feb 2010 - 1:55 am | टारझन

आरारारारारारा =)) =)) =)) =)) =)) =))
जबरा रे .... हे एक संपादक आणि खुद्द आपले मालक ... ह्यांच्या साठी शिव्या कशा लक्ष्मिनारायण चिवड्यातल्या काजु सारख्याच ... :)

- (शिव्या प्रेमी) टार्‍या

पिवळा डांबिस's picture

24 Feb 2010 - 11:16 pm | पिवळा डांबिस

बिका, बिका,
अरे बालिष्टर का नाही झालास लेका?
:)

बाकी इथल्या आजवरच्या सर्व "संपादकीयांत" हे सर्वश्रेष्ठ!!!!!
:)

सौरभ.बोंगाळे's picture

25 Feb 2010 - 12:38 am | सौरभ.बोंगाळे

वाह वा!!! आवडलं!!!

मुक्तसुनीत's picture

25 Feb 2010 - 1:20 am | मुक्तसुनीत

लेख खुमासदार झालाय.

नवीन कुठलीही भाषा शिकायची म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच त्यातले लडिवाळ शब्द. माझ्या तेलुगु आणि तमिळ मित्रांनी मला या बाबतीत समृद्ध केलेले आहे.

राजेश घासकडवी's picture

25 Feb 2010 - 1:56 am | राजेश घासकडवी

माणसाच्या मनातल्या भावनांचा निचरा... अस्तित्वाची जाणिव झाली तेव्हा पासून 'व्यक्त होणे' ही एक फार मोठी...भावनिक गरज बनली.

वा. हे म्हणून तुम्ही शिव्यांना कलेच्या पातळीवर नेऊन ठेवलंत. आणि शिव्या या एकाच वेळी अनुभवांचं व्यक्तीकरण आणि दुसऱ्यांच्या 'कलाकृतीला' दिलेली दाद असू शकते...

भाषा वगैरे नंतर बनल्या पण शिव्या मात्र त्या आधीही असणारच.

आपण गुलगुलीत गोड किती वेळा बोलतो, आणि शिव्या किती वेळा देतो याची मोजदाद कोणी केली तर मानवाविषयी एक छान चित्र तयार होईल.

पण शिव्या मानवाच्या उत्क्रांतीत कधी तरी आल्या हे म्हणणं मला पटत नाही. त्या त्याहीआधीपासून असल्या पाहिजेत. प्राणी अतिशय उत्कृष्ट, इरसाल शिव्या देऊ शकतात. माझा अनुभव सांगतो.

मी पूर्वी काम करत असे तिथे कॅफेटेरिया बाहेर मोकळ्या हवेत झाडांखाली टेबलं टाकलेली होती. लंचसाठी आम्ही बऱ्याच वेळा बाहेर बसत असू. तिथे खूप पक्षी आसपास फिरायचे. सांडलेले कण आणि लोकांनी टाकलेले तुकडे खाऊन त्यांचाही लंच व्हायचा. एकदा गंमत म्हणून मी एका पक्ष्याला मिरचीचा तुकडा टाकला. तो त्याने खाल्ला. तो खाऊन त्याची प्रतिक्रिया विलक्षण झाली. तो उडून टेबलावर आला. इतर पाच जणांना सोडून माझ्यासमोर उभा राह्यला. माझ्याकडे रोखून बघितलं. आणि अतिशय जोरजोरात माझ्यावर बराच वेळ केकाटला. मला त्याची भाषा कळली नाही, पण त्या आई-बहिणींवरून दिलेल्या अत्यंत गलिच्छ शिव्या होत्या हे स्पष्ट झालं. मलाच काय, वेगवेगळ्या मातृभाषा असलेल्या इतर पाच जणांनाही ते कळल्यावाचून राहिलं नाही.

सगळ्यात मोठी शिवी कोणती म्हणाल तर मी एकच सांगेन... दुर्लक्ष

निर्विवाद सत्य. एकंदरीतच जग आपल्यावर अशा शिव्या सतत हासडत असतं असं वाटतं.

सुमीत भातखंडे's picture

25 Feb 2010 - 2:06 am | सुमीत भातखंडे

लेख

शाहरुख's picture

25 Feb 2010 - 4:48 am | शाहरुख

तिच्यायला, कडक लिहिलंय एकदम !!

रेवती's picture

25 Feb 2010 - 5:23 am | रेवती

शिवाशिवीचा खेळ आवडला.
दुर्लक्ष करण्यासारखा दुसरा अपमान नाही कोणाचा.
हम्म! चांगलं सांगितलत हो भौ!

रेवती

मदनबाण's picture

25 Feb 2010 - 5:47 am | मदनबाण

दुर्लक्ष करण्यासारखा दुसरा अपमान नाही कोणाचा.
सहमत...

मदनबाण.....

जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

अक्षय पुर्णपात्रे's picture

25 Feb 2010 - 6:01 am | अक्षय पुर्णपात्रे

बिपिन, शिव्यांवर उत्तम निबंध. शिव्यांचे फायदे कळले. आता शिव्यांच्या विविध रुपांवर आणि तोट्यांवर येऊ दे. पुरूषाशी संबंधित शिव्या साधारण व्यवसायांशी (त्यातही देहविक्रयाच्या व्यापारात) संबंधित असतात. स्त्रियांशी संबंधित शिव्या मात्र वेगळ्या (काहीशा एककल्ली) स्वरुपाच्या असतात. त्यातही पुरुष जरा जास्तच शिव्या देतात आणि ज्याला उद्देशून शिव्या आहेत त्याचा उगम कुठे असावा? याविषयी भाष्य करतात. या सगळ्या प्रकारात काहीतरी लैंगिक राजकारण आहे. येऊ द्या त्याच्यावर पण लेख.

(बा*** भां*** मिपा आज उघडतच नव्हते. लई वेळा प्रयत्न केला.)

सन्जोप राव's picture

25 Feb 2010 - 6:19 am | सन्जोप राव

आधीच मिसळपाववर शिव्यांचे उदात्तीकरण झाले आहे, त्यात हा लेख. होळी गाजणार एकंदरीत.
दरम्यान आम्ही 'सेव्हन सी'ज ऑफ कम्युनिकेशनमधला 'कर्टसी' हा कसा महत्वाचा आहे यावर विचार करावा म्हणतो.
अक्कलकोटच्या महाराजांच्या उल्लेखाने हे आठवले....
सन्जोप राव
जो दवा के नाम पे जहर दे
उस चारागर की तलाश है

शुचि's picture

25 Feb 2010 - 7:12 pm | शुचि

"कर्टसी" या अतिप्रिय विषयावरची आणि "ती आणि तो" या जिव्हाळ्याच्या विषयावर असलेली एक अप्रतिम कविता वाचून मी एकदा प्रेमात पडून एक कवितांच पुस्तक विकत घेतलं होतं.... ती कविता पुढे -

एनी हज्बंड ऑर वाइफ

लेट अस बी गेस्ट्स इन वन अनदरस हाउस
विथ ड्रीड्फुल नो अ‍ॅंड कर्टीअस येस
लेट अस टेक केअर टू हाईड अवर फूलीश मूड्स
बिहाईंड अ सरटन शो ऑफ चीअरफुलनेस

लेट अस अव्हॉइड ऑल सलन सायलन्सेस
वी शुड फाईंड फ्रेश अँड स्प्राईट्ली थिंग्स टू से
आय मस्ट बी फीअरफुल लेस्ट यु फाईंड मी डल
अँड यु मस्ट ड्रीड टू बोअर मी एनीवे

लेट अस नॉक जेंटली अ‍ॅट ईच अदेर्स हार्ट्स
ग्लॅड ऑफ चान्स टू लूक विथिन - अँड येट
लेट अस रिमेंबर टू फोर्स वन्स वे
इज द अनपारडनड ब्रीच ऑफ एटीकेट

सो शॅल आय बी होस्ट, यु द होस्टेस
अन्टिल ऑल नीड फॉर एंटरटेनमेंट एंड्स
वी शॅल बी लव्हर्स व्हेन द लास्ट डोअर शट्स
बट व्हॉट इस बेटर स्टील वी शॅल बी फ्रेंड्स!!!

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

चतुरंग's picture

25 Feb 2010 - 7:27 am | चतुरंग

आहे बाकी गोष्टीवेल्हाळ हां!! :)
विषय खोबराचा असू दे नाय तर करवंटीचा, रंगवून सांगणार!!!
बाकी शिव्यांशिवाय गंमत नाही हे खरंच आहे.

चतुरंग

आनंद घारे's picture

25 Feb 2010 - 12:15 pm | आनंद घारे

इंजिनियरिंग कॉलेजमध्ये गेल्यावर परदेशी जाण्याचे वेध लागले होते. भाषेचा प्रोब्लेम सोडवण्यासाठी कॉन्व्हेंटमध्ये शिकून आलेल्या मुलांबरोबर मैत्री केली. तांत्रिक विषयांवरील त्यांची शब्द संपदा माझ्याहून जास्त नव्हतीच, पण बी, एफ आणि एस या अक्षरांपासून सुरू होणारे अपशब्द तोंडात बसल्यानंतर माझा आत्मविश्वास खूप वाढला.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

चतुरंग's picture

25 Feb 2010 - 3:35 pm | चतुरंग

ज ब रा प्रतिक्रिया!! :D

(फार पूर्वीपासून आत्मविश्वास असलेला)चतुरंग

Nile's picture

27 Feb 2010 - 4:02 am | Nile

हे बाकी खरं हो! सुरुवातीला कॉन्वेंटच्या मुलांबरोबर वावरताना त्यांच्या शिव्या (तेव्हा कडक वाटायच्या आता सवय झाल्यावर त्या शिव्यांत काहीच दम नाही हे कळले, ते सोडा) माहित असुनही आत्मविश्वासाने देता येत नव्हत्या. (म्हणुन इंग्रजी कच्ची!) हळु हळु जमले, तेवढ्यात त्यांनाही आमच्या चार इरसाल शिकवल्या, आता भेतल्यावर आमच्याच वापरतो आम्ही. अजुन काय लिहणे? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Feb 2010 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, हा बिका काय घेऊन येईल काय नेम नाही. बरं चतुर म्हणतात त्याप्रमाणे गोष्ट अशी मस्त रंगवतात की बोलायची काय सोय नाही. असो, लेखन आवडले.

शिव्या समाजातून नाहिशाच झाल्या तर खुनाची संख्या वाढेल असे वाटते. शिवी दिल्यामुळे राग जरासा कमी होतो. माणूस प्रचंड रागात असला की, तो शस्त्र शोधायला लागतो. [फेकून मारायला दगड,काठी, कशाची तरी शोधाशोध सुरु होते] त्यापेक्षा शिव्यांचा वापर केला तर राग हळू हळू कमी व्हायला लागतो हे मात्र खरं आहे.

अवांतर : पुर्वी ते ऋषीमुनी भडकल्यावर संतापाच्या भरात शिव्याच देत असावे. पण संस्कृतमधे योग्य शब्दांनी रागाचा निचरा होत नसेल तेव्हा त्याचं भव्य रुप म्हणजे 'शाप' असेल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

25 Feb 2010 - 9:02 pm | चित्रा

लेखाला प्रतिसाद द्यायचा राहिला असता तर दुर्लक्ष केले आहे (आणि अपमान!) असे वाटले असते ना, म्हणून घाबरून प्रतिसाद देते आहे - लेख आवडला.

कृ. ह. घ्या!

लेख खरेच आवडला.

मेघवेडा's picture

25 Feb 2010 - 9:32 pm | मेघवेडा

च्यामारी, विषय किती रंगवून सांगवावा माणसानं!!

फक्कड झालाय लेख मालक! बाकी लेखात शिव्यांचा प्रतिसादांत ऋषिमुनींचा उल्लेख पाहून तो सारखा "भें** नेम चुकला" म्हणणारा शिकारी आणि त्याला शिव्या घालण्यापासून परावृत्त करू पाहणारा साधू यांचा एक 'जोग' आठवला!! बर्‍याच जणांना माहिती असावा, पण तरीही सांगतो.

जंगलात एक शिकारी झाडांवर बसलेल्या कबुतरांच्या टोळक्याकडे मोठ्या आशावादी नजरेने बघत होता. बराच वेळ विचार करून नेम धरून त्यानं शेवटी गोळी झाडलीन. ती दुसरीकडेच गेली. सगळि कबुतरं उडाली.

"गेली चायला.. भें** नेम चुकला.." - शिकारी.

शेजारी एक साधू काही जप करत बसलाय. त्यानं एकदा भयंकर रागीट नजरेनं त्या शिकार्‍याकडे पाहिलं. आणि पुन्हा जप करू लागला.

शिकार्‍याचं लक्ष आता एका सशाकडे होतं.. नेम धरून पुन्हा एक गोळी झाडली.. तीही दुरून गेली.. ससाही पळाला..

"आयघातली .. काय चाललंय.. भें** नेम चुकला परत.."

त्या साधूला शिकार्‍याचं हे बोलणं रुचलं नसावं.. म्हणून तो त्या शिकार्‍याला म्हणाला.. "बाळा .. अरे अशा शिव्या देऊ नये. वाईट गोष्ट आहे ती.."

"अरे ए साधुरड्या.. तू तुझं काम कर मला माझं काम करू दे.." - शिकारी.

साधू गप्गार होऊन पुन्हा जप करू लागला.. "पुन्हा एकदा जर तू शिवी घातलीस ना तर मी तुला शाप देईन.."

आता शिकार्‍याला एक हरीण दिसू लागलं. पुन्हा बराच वेळ वाट पाहून नेम धरून पठ्ठ्यानं गोळी झाडलीन .. तीही भलतीचकडे गेली.. आणि इतक्यांदा प्रयत्न फसल्यानं वैतागलेला तो शिकारी म्हणाला.. " भें** नेम चुकला.. चायचं नशीब फुटकं रांडेचं.. ए साधुरड्या .. बघ भें** नेम चुकला.."

आता मात्र साधूला राहवेनासं झालं .. तो वैतागून उठला आणि म्हणाला.. " हे बघ मी तुला एकदा ताकीद दिली होती तू ऐकला नाहीस.. आता तर तू मलाच शिवी घातलीस .. मी तुला शाप देतो.. आता आकाशातून वीज पडेल आणि तुझी क्षणात
राख राख होईल.." असं म्हणून साधून त्याच्या कमंडलूतून पाणी वगैरे काढून त्या शिकार्‍यावर शिंपडलं.. तसा ढगांचा गडगडाट झाला.. वीजा चमकू लागल्या.. शिकारी घाबरला आणि त्याने डोळे मिटून घेतले.. क्षणात एक जोरदार वीज कडाडली आणि साधूवर येऊन पडली.. साधू क्षणार्धात राख झाला..

तोच आकाशातून जोरदार आवाज आला..

"भें** ... नेम चुकला!!!!!""

-- मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

टारझन's picture

25 Feb 2010 - 9:45 pm | टारझन

=)) =)) =))
हाहाहा !! माहित होता हा जोग ... पण पुन्हा वाचून पुन्हा मजा आली .. धन्यवाद रे मेघवेड्या .. बाकी त्या फुल्या कमी केल्या असत्यास आणि सरळ "भांचोद" अशी भावणांची वाट सुळसुळीत मोकळी केली असतीस तर आनखिन मजा आली असती.
असो !!

- केकवेडा

मेघवेडा's picture

25 Feb 2010 - 10:00 pm | मेघवेडा

भावणांची वाट आता थोडी थोडी सुळसुळीत मोकळी होतिये... थोडं ऑयलिंग चाललंय ;)

होईल.. थोड्या दिवसांत नक्कीच होईल हो टारझनभाव! मग फुल्ल ऑन भज्जि-सायमंड्स खेळू ;)

हॅहॅहॅ

-- हरभझन

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

विकास's picture

26 Feb 2010 - 2:48 am | विकास

मस्त लेख आणि अनुभव! (राजेश यांचा अनुभव तर जबराच!)

सध्याच्या नागरी जगात शिव्या देणे हे असंसदीय / असभ्य मानले जाते. त्यामुळे एकदा एका मित्रावर मी, "परसेंट, पाऊंड्साईन, अ‍ॅट, अ‍ॅपर्सँड" असे ओरडलो. बिचार्‍याला काहीच कळले नाही. मग त्याला लिहून दाखवले, "%&@&"... मग लगेच समजले :-)

बाकी अजून असतो का ते माहीत नाही, पण पुर्वी सरकारी हापिसात "सौजन्य सप्ताह" असायचा. (एरव्ही कसेही वागा). त्याचा वापर करत सई परांजपे यांनी "टूरटूर" मधे केलेली शाब्दीक मजा यामुळे आठवली. ;)

बायका शिव्या देतात का नाही हा जरा वादग्रस्त मुद्दा आहे (विशेष करून अमेरिकेत!) तरी मंगळागौरीतील काही गाणी/खेळ तसेच भोंडल्याच्या गाण्यात तोंडाची वाफ जरा मोकळी करायला विशेष जागा करून ठेवली आहे असे वाटते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

II विकास II's picture

26 Feb 2010 - 8:29 am | II विकास II

मला शिव्या द्यायला आवडत आणि कोणी मला दिलेल्यासुद्धा आवडत नाही. ह्यावरुन महाविद्यालयात असताना खुप भांडणे झाली होती. माझी मजल मुर्ख, बावळट इथपर्यंतच आहे.

--
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

संदीप चित्रे's picture

26 Feb 2010 - 5:52 am | संदीप चित्रे

काय बेष्ट विषय निवडलायस लिहायला !
वाक्यावाक्याला दाद दिलीये रे भा**** !!

II विकास II's picture

26 Feb 2010 - 8:25 am | II विकास II

विषय चांगला टवा़ळ आहे, व्यासंगी लोकांनी शिव्यांची शब्दकोडी घालायला हरकत नाही, तेवढाच काही लोकांचा शिव्यासंग्रह वाढेल.

---

२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

प्रकाश घाटपांडे's picture

26 Feb 2010 - 9:31 am | प्रकाश घाटपांडे

श्रीनिवास हेमाडे यांचा लोकसत्तेतील जुन्या लेखाचा संदर्भ आठवला . संस्कृती वरच असलेला तो लेख
दुवा
सर्वांनी वाचलाच पाहिजे असा लेख आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

भोचक's picture

3 Mar 2010 - 8:04 pm | भोचक

पकाकाका, मलाही त्याच लेखाची आठवण झाली. शिवाय या रविवारच्या लोकसत्तेतही सुबोध जावडेकरांनी त्यावरच लेख लिहिलाय. ईथे वाचा. बाकी बिकांचा लेख खुसखुशीत.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

मितभाषी's picture

28 Feb 2010 - 12:06 pm | मितभाषी

शिव्या देता आल्याच पाहीजेत. शिव्या अशा खरमरीत असाव्यात की समोरच्याची झांज उतरली पाहीजे. आता पुण्याचाच एक किस्सा सांगतो. पुण्याच्या शाळेत दोन मुलांचे भांडण झाले. त्यातील एक सदाशीवपेठी तर दुसरा घाटी. त्यांच्यातील (वि)संवाद.
स. पे. = ऐ माझी खोड काढु नकोस हं. मला फार राग येतो तुझा.
घा. = काढील खोड चल. काय करशील?
स. पे. = ये चुप बैस. नाहीतर मी तुला शिवी देइल हं.
घा. = हा दे तर शिवी. बघतोच तुझ्याकडे.
स. पे. = बघ हं, मी फार घाण शिवी देइल.
घा. = हा दे तर बघु.
स. पे. = बघ हं, मागावुन चिडशील तु.
घा. = हा तु शिवी तर दे. मग बघु पुढे काय करायच ते.
स. पे. = बघ हं.
घा. = हा दे....
स. पे.= तुझं ..... ढुंगन.
घा. = =)) =)) =)) =)) =)) च्यायला ही काय शिवी झाली भोसडीच्या.....

असो. तात्पर्य हे की चांभाराच्या देवाला खेटराचीच पुजा पाहीजे, तिथे गुळ्-पोळीचा नैवेद्य कसा चालेल.

----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\

जयवी's picture

26 Feb 2010 - 6:44 pm | जयवी

:) सही !!
खुसखुशीत झालाय बरं का लेख :)

अनिल हटेला's picture

26 Feb 2010 - 10:37 pm | अनिल हटेला

आवडत्या विष्यावरील लेख आवडला....:)

>>>दुर्लक्ष करण्यासारखा दुसरा अपमान नाही कोणाचा.

--->अगदी सहमत...

बैलोबा चायनीजकर !!!
© Copyrights 2008-2010. All rights reserved.

बेसनलाडू's picture

28 Feb 2010 - 6:03 am | बेसनलाडू

आपण शिव्या का देतो याचे जैव-वैज्ञानिक (?) विश्लेषण आजच्या लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीत सुबोध जावडेकरांनी केले आहे. येथे वाचता येईल.
(वाचक)बेसनलाडू

आनंदयात्री's picture

28 Feb 2010 - 9:50 am | आनंदयात्री

एक नंबर !!
बराच दिवस परागांदा (;)) असुनही पहिला लेख !!
उत्तम जमलाय हेवेसांनल.

विसोबा खेचर's picture

28 Feb 2010 - 10:35 am | विसोबा खेचर

बिप्पिनशेठ,

क्लासिक लेख! लैच भारी... :)

जियो..!

आपला,
(शिवराळ) तात्या.

इंटरनेटस्नेही's picture

7 Aug 2010 - 5:36 pm | इंटरनेटस्नेही

पण मला खरं विचाराल तर सगळ्यात मोठी शिवी कोणती म्हणाल तर मी एकच सांगेन... दुर्लक्ष. होय... दुर्लक्ष करण्यासारखा दुसरा अपमान नाही कोणाचा. शिवीचे उद्दिष्ट्य जे आहे ते समोरच्याचा अपमान करणे हे होय. आणि समोरच्या माणसाची दखलच न घेणे या सारखा अपमान सगळ्यात जास्त झोंबणारा असतो. शिवाय ही शिवी निर्विवादपणे १००% सगळ्या सभ्यतेच्या आणि कायद्याच्या नियमात बसते. ही शिवी दिली म्हणून कोणावर गुन्हा नोंदवला गेला आहे असे ऐकिवात नाही. बिन्धास्त देऊ शकतो. किमान (म्हणजे अगदी शून्य) शब्दात, कमाल अपमान करणारी अशी ही शिवी आहे.

एकदम सहमत. चांगला लेख!

पर्ण's picture

25 Dec 2015 - 7:24 pm | पर्ण

वाह!! मस्तच :D