मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साहित्यिक

मुख्यमंत्री आणि रावण..

चिगो ·
ढीस्क्लेमर : धमुने "नागपुरी खाक्या" दाखवणारे काहीतरी लिहायला सांगितलं होतं. पण मला लिहीताही येत नाही आणि कधी दाखवला नसल्याने नागपुरी खाक्या पण माहीत नाही... ही कविता प्रा. ज्ञानेश वाकुडकरांची आहे. त्यांचे "सखी साजणी" हा काव्यसंग्रह आणि "फक्त तुझ्यासाठी" हा चारोळीसंग्रह प्रसिद्ध आहे..

मिपाची हालहवाल..

परिकथेतील राजकुमार ·
काव्यरस
चाललंय काय चाललंय काय.. मिपावर सध्या चाललंय काय.. बिका शेख, रंगा शेठ रजेवर आहेत VRS ची चाचपणी करत आहेत.. कमी हजेरीबद्दल प्राजुतैला शिक्षा होणार आहे तिला आता कोदाच्या सायटीवर संपादक करणार आहेत.. कोदा आमचा ज्ञानेश्वर आहे शुचि मुक्ताईची जागा घेतच आहे... गवि आणि हर्षद पाठीशी आहेत निवृत्ती सोपान शोभत आहेत.. अदिती आजकाल विस्थापितांवर लिहिते विस्थापिताचे दु:ख विस्थापितांनाच जाणवते.. मकी आजकाल गायब असते फक्त व्यनीत रममाण असते.. टार्‍या पुन्हा अन-आवरेबल झाला आहे आता कुठे मिपाला रंग चढायला लागला आहे.. अवलियाचा आयडी हॅक झालाय दूषित वातावरण निरोगी करायला लागलाय... डान्राव म्हणे प्रतिमा सुधारणार आहेत

डेफिनेशन बदललेला मित्र

विनायक पाचलग ·
लेखनप्रकार
मला अत्यंत जीवाभावाचा असा मित्र नाही. म्हणजे मित्र आहेत बरेच, पण ते सगळे नेहमीच्या भाषेत दुसऱ्या वर्तुळातले. जय-वीरू टाईप किंवा दो हंसो का जोडा टाईप मित्र आजपर्यंत तरी मला नाही. निकोप नसलेली स्पर्धा, शालेय राजकारण, संशयी वातावरण आणि या सगळयातुन हरवलेली निखळता अशी अनेक कारणे त्याला आहेत, आणि त्याची जाणीवही मला आहे. पण, तरीही असा कोणीतरी मित्र नसल्याची खंत कुठे ना कुठे तरी मला आहे, आणि का असु नये?

डास ढेकुण झुरळ

विजुभाऊ ·
मित्रानो आपण ज्याना अगदी क्षुल्लक मानत असतो ते खरेतर खूप काही करत असतात. त्यांचे कर्तृत्व वादातीत असते. त्यांचे आपण त्यांचेकडे नीट पहात नाही. मूर्ती लहान पण कीर्ति महान असेच म्हणावं लागेल यांचे कर्तृत्व पाहून. 1 नाना पाटेकरसारख्या बुलन्द अभिनेत्याला सुद्धा याची दखल घ्यावी लागली. आणि एखादा क्षुद्र जीव प्रबळ माणसाला सुद्धा हिजडा बनवतो असे म्हणावे लागले.

'पानिपत' पुस्तकाच्या आठवणी आणि श्री. विश्वास पाटील यांची मुलाखत

अप्पा जोगळेकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
'रामायण'कार वाल्मिकी ऋषी आणि 'महाभारत'कार व्यास मुनी यांचे भारताच्या इतिहासामध्ये जे स्थान आहे तेच स्थान महाराष्ट्रीय इतिहासाच्या संदर्भात श्री. विश्वास पाटील यांना दिले पाहिजे. असे मराठी घर नसेल, असा मराठी उंबरा नसेल, असे मराठी मन नसेल की जे पानिपतच्या पराभवाच्या आठवणीने कातर होणार नाही. अर्थातच या महायुद्धाच्या इतिहासाला ही जी उंची लाभली आहे ती प्राप्त करुन देण्याच्या श्रेयाचे हक्कदार नि:संशयपणे श्री. पाटील हेच आहेत. मनामध्ये भावनांचा कल्लोळ माजवून देणारे त्यांचे लिखाण कुठेही वास्तवातले तपशील सोडत नाही आणि अतिरंजित सुद्धा वाटत नाही हे विशेष.

वनराणी..२

प्राजु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वनराणी १ आज.. काहीतरी विपरीत घडलं. मला उशिर झाला की मातंग ऋषी लवकर आले ध्यान धारणेसाठी?? .. आज झाडलोट करून कुटीमध्ये आले.. तर पाठोपाठ हे ऋषी!!! प्रसन्न चेहरा.. धारदार नाक.. आश्वासक डोळे, जटा पाठीवर सोडलेल्या... विलक्षण तेजस्वी रूप!! माझी कुटी उजळून निघाली. एका भिल्लिणीच्या घरी असा योगी!!! हा योगायोग होता की नशिबाचा भाग? ********************** पुढे.. मी नुसतीच बघत राहिले त्यांच्याकडे. असं वाटतंय की मला माझा मार्ग मिळाला आहे. ती अज्ञात शक्ती म्हणजे हे मुनी तर नव्हेत!! आज.. हो आज..

व्याख्याच व्याख्या

स्पा ·
काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का? अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर

शाळा

मृत्युन्जय ·
शाळा हा विषयच असा आहे की कितीही लिहा कमीच पडेल. पेनातली शाई संपेल (किंवा कळफलक दाबु दाबुन बोटे दुखतील) पण शाळेच्या आठवणी संपणार नाहीत. प्रत्येकाच्या हृदयात शाळेच्या आठवणींसाठी एक वेगळ कप्पा राखुन ठेवलेला असतो. त्या १०-१२ वर्षांच्या आठवणी नेहेमीच सोनेरी रुपेरी असतात असे नाही पण अटळ, अचल, अविनाशी नक्की असतात. माझ्या आठवणीत एक नाही अनेक शाळा आहेत. पण शाळेशी खर्‍या अर्थाने बंध जुळण्याच्या काळात म्हणजे ५ वी नंतर मी ठाण्याच्या सरस्वती मध्ये होतो.

आजी-माजी संमेलनाध्यक्षांची ग्रंथनगरीकडे पाठ..

अजय जोशी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजपर्यंत मराठी साहित्यिकाच्याच बाबतीत जे विधान केले जात होते ते आता संमेलनाध्यक्षांच्या बाबतीतही करावेसे वाटते. दिनांक २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६:३०वाजता ग्रंथदिंडी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये वेळेवर पोहोचली. त्यावेळी सपट परिवार लोकमानसचा चर्चेचा कार्यक्रम मुख्य मंडपात नुकताच संपला होता. चर्चेत डॉ. द.भि. कुलकर्णी हेही सहभागी होते. त्यामुळे ते त्याच मंडपात होते. ते ग्रंथप्रदर्शनासाठी येणार आहेत काय हे पहायला मी गेलो. तोपर्यंत त्यांना कोणी चहा दिला नव्हता. म्हणून चहाची ऑर्डर द्यायला मी मंडपाच्या बाहेर आलो खरा...! पण त्याचवेळेस श्री. उत्तम कांबळेसाहेब ग्रंथदिंडी घेऊन पोहोचले सुद्धा. द.भि.