कुछ ना कहो...<3 ;)
बाप्पा जेमतेम पंधरवड्यावर येउन ठेपलेले आहेत. त्यामुळे सद्ध्या साफसफाई, आवराआवरीमधे संध्याकाळ आणि जमेल तेवढा वेळ निघुन जातोय. घर आवरायला एवढा वेळ लागतो का वगैरे छापाचे प्रश्ण विचारु नये. आमच्याकडे घर आवरणे हा कार्यक्रम घर शिफ्ट करणे ह्याच्याएवढाचं किंबहुना त्याहुन मोठा असतो. माळ्यावरच्या फक्त गणपतीमधे/ दिवाळीमधे वगैरे लागणार्या वस्तु काढत असताना आमच्या मातोश्रींच्या नजरांना उंची पुरत नसली तरी त्या तिकडच्या मागच्या कोपर्यामधल्या पोत्यामधली कढई आणि त्यामधे ठेवलेली पंचामृताची पंचपळी किंवा तांब्याची मोठी ताम्हनं बरोबर दिसलेली असतात.
मिसळपाव