Skip to main content

प्रेमकाव्य

तो आणि ती

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 20/02/2015 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
दोघांनाही पाउस आवडतो; त्याला खिडकीतुन तिला गच्चितुन... दोघांनाही थंडी आवडते; त्याला दुलईतुन... तिला धुक्यातून.... मंद हलके गझलचे सुर... त्याच्या खोलीतुन.... तिच्या गाडीतून... पावसाळी संध्याकाळची गरम भजी... त्याला स्वयंपाकघरातून... तिला टपरीतुन... ठेल्यातुन... मॉल मधल shopping त्याच! रोडसाइडवर प्रेम तिच.... 5star च dinner? चल घेऊ दोघे आपण... पाव भाजी, पाणी पूरी आणि फालूदा घेऊ या आपण? तरीही.... तिच मोहक हसण... आणि त्याच अजूनही... अह... कायमच... घायाळ होण....
काव्यरस

गलित आहे गात्र अजुनी

लेखक चिमिचांगा यांनी शनिवार, 07/02/2015 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर... तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे ? हाय !

तुझ्याशिवाय

लेखक Sanjay Kokare यांनी मंगळवार, 27/01/2015 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
----------------------------------------------------- @@ तुझ्या शिवाय मी जगु शकत नाही @@ ----------------------------------------------------- ----------------------------------------------------- बघितल नाही तुला दिवसातुन एकदातरी, दिवस माझा सुरेख जात नाही!! दिसताच क्षनी तु माझ्या, मनामधील आनंदाला पारा उरत नाही!! येते तु जेव्हा माझ्यासमोर, मुखातुन एकही शब्द निघत नाही!! खुप काही बोलायच असत तुझ्यासोबत, पण तुझ्यासोबत मी काहीच बोलु शकत नाही!! अनेकदा लपुनछपुन पाहतो मी तुला, पण भान असत की तुला मी दिसणार नाही!! माझे मित्र देतात तुझ्यानावाने हाक मला तरीही तुला पाहील्याशिवाय मी राहु शकत नाही!! कळत

गीत तारकांचे

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 06/01/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्राथमिक चाल लावलेले माझे हे भावगीत, इथे शब्द सादर करीत आहे. जसा भास होतो उरी चांदण्यांचा विसावा तसा मी मागतो सांजवेळी ll १ ll मनी गर्द वेळा तुझ्या आठवांच्या उसासा दिलासा रात्र देऊनी जाई ll २ ll तुझा श्वास माझ्या मनातून झरता शब्द बोल ओठी तुझ्या भावनांचे ll ३ ll गंध सोबतीचे मग हवेतून विरता सखे गीत गावे तुझे तारकांचे ll ४ ll - सार्थबोध http://www.saarthbodh.com/2015/01/blog-post.html

बस्स इतकेच..

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 10/12/2014 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यापासून दूर होऊन अमाप काळ लोटला दु:ख हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. ---- आता दारावरचा पारीजात ओसंडून बरसला तरी त्याचा हेवा वाटेनासा झालायं फक्त एक हलकिशी कळ आली काल छातीत जेव्हा त्याचे एक फुल पायाखाली आले बस्स इतकेच.. ---- परवा अलमारी उचकतांना तुझे एक पैंजण हाताला लागले छन्न झालं एकदम आपल्या जोडीदाराअभावी एकाकी,केविलवाणे वाटले बस्स इतकेच.. ---- तिथेच बाजूला आपला एक अल्बम सापडला 'त्या' तस्बिरीतले तुझे डोळे आणि त्या डोळ्यातले ते काजळ.. बघता बघता कां कोण जाणे टचकन डोळ्यात पाणिच तरारले एकदम बस्स इतकेच.. ---- तुझी आठवण आजही येते अगदी नित्यनेमाने काही ठोके चुकतात

नजर

लेखक सुर्या गार्डी यांनी बुधवार, 03/12/2014 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
नजरेला नजर बांधून डोळ्यांनीच नुसतं पाहणं तुझं, न बोलूनही सांगतं सारं काही।। जाता जाता मिश्किल हसून ओठांवर नजर खिळवणं तुझं, प्रीतीचं रोमांच फुलवतात किती।। चालता चालता थबकून मागे वळून पाहणं तुझं, चोरून चोरून पाहण अन् गालातल्या गालात हसणं तुझं ह्रद्याच्या तारा छेडतात किती।। दूरवर जावूनही नजरेनं शोधत राहणं तुझं अन् रोज रात्री स्वप्नात येवून प्रेम गीतं शिकवणं तुझं गीताला सुरांची देतात प्रीती।। तरीही तरीही सांगून टाक् ह्रद्यातलं सारं कारण तू ही अधांतरी राहून मलाही अधांतरी ठेवणार किती?

"अर्थ"

लेखक दिपक विठ्ठल ठुबे यांनी सोमवार, 01/12/2014 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांत गुंफले मी हळुवार जाणिवांना स्पर्शून अर्थ दे तू माझ्या मुक्या भावनांना..||धृ|| मज स्मरणात आज ही रे ती संध्या भारलेली संग लाभला तुझा अन काय माझी मोहरली जणू चैत्र वणवा विझावा वळवाच्या सरींनी भिजताना स्पर्शून अर्थ दे तू माझ्या मुक्या भावनांना.. ||१|| हे बंध जे जगाचे पायात घोळणारे माझी अबोल प्रीती जणू भिन्न दोन्ही किनारे दिसतो तुझाच चेहरा माझे प्रतिबिंब पाहताना स्पर्शून अर्थ दे तू माझ्या मुक्या भावनांना..
काव्यरस

हाबिणंदण

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 01/12/2014 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/29625 "काण्या तू ? वहिनी कुठाय" या तुझ्या टोकदार प्रश्नानं तु माझ्या पोटाचं मी मोठ्या कष्टाने पट्ट्याने बान्धलेलं गाठोडं टचकन फुटून गेलं, आणि मला (त्या ललने समोर) कफल्लक बनवण्यात तू पुन्हा एकदा यशस्वी झालास.. अभिनंदन!!!

तिची साधीशी कविता

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 25/11/2014 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
तिची साधीशी कविता माझा अर्थाचा गोंधळ काळेसावळे ते ढग तिचा सखा घननीळ | तिची साधीशी कविता शोध अंतरीचा घेई खोल विरहाचे दु:ख अलगद वर येई | तिची साधीशी कविता म्हणे तुझी माझी भेट आज वसंत बहर पुढे वैशाखाची वाट | तिची साधीशी कविता थोडे डोळे पाणावती दोन मोतियांचे अश्रु तिच्या गाली ओघळती | तिची साधीशी कविता माझ्या गळा एक मिठी शब्द विरुनिया गेले अर्थ एक दोघा ओठी !! ( पुर्वप्रकाशित )