मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करशील ना?

रातराणी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
हातात हात घेऊन चालताना, रुतेल पायात काटा, घाई घाईने काढलास तरी चालेल, पण नंतर हळुवार मारशील ना फुंकर? नव्याची नवलाई संपत असताना, होतील असंख्य प्रश्न उभे, प्रत्येकाचं उत्तर नाही दिलं तरी चालेल, पण नंतर हळुवार घेशील ना कुशीत? अस्तित्वाच्या कल्पना कोलमडून जाताना, जड होईल अपेक्षाच ओझ, प्रत्येकवेळी वाटून घेतलं नाहीस तरी चालेल, पण नंतर हळुवार मन करशील ना हलक? तुला माझी माझी तुला सोबत असताना, येईल एकटेपण आगंतुकासारख, प्रत्येकवेळी डोळ्यांनी शोधलं नाहीस तरी चालेल, पण नंतर हळुवार पाठवशील का कवितेला शोधत?

वाचने 8367 वाचनखूण प्रतिक्रिया 53

सटक Wed, 07/08/2015 - 02:49
पण नंतर हळुवार पाठवशील का कवितेला शोधत? सुन्दर!!

मदनबाण Wed, 07/08/2015 - 12:16
एक मस्त मांसाहारी विडंबन डोक्यात आकार घेत आहे =) हॅहॅहॅ... टाक हो ते विडंबन... संम नी उडवले नाही तर वाचता येउल हो आम्हाला ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M

In reply to by स्वप्नांची राणी

रातराणी Wed, 07/08/2015 - 12:35
_/\_ आधी लक्षातच नव्हतं आलं ; ) आता करशील ना म्हणणार नाही कधीच ; )

In reply to by स्वप्नांची राणी

प्यारे१ Wed, 07/08/2015 - 12:50
अश्लीलता डोक्यात असते. आमचे लाडके संपादक मित्र किसनदेवांची लाडकी 'शब्दांना नसतो अर्थ' वाचावी ही नम्र विनंती.

In reply to by रातराणी

बॅटमॅन Wed, 07/08/2015 - 13:18
माईक्रो मॅनेजिंगपणा
ओह माय ग्वाड (& तिखट), इथे माई कुठून आल्या? त्यांनी कावळादेखील पाळलाय हे नव्यानंच कळालं.

In reply to by बॅटमॅन

रातराणी Wed, 07/08/2015 - 13:28
माई सर्वव्यापी आहेत मूढ बालका. माई मोड ऑन> अरे आमच्या ह्यांना भारी कुतूहल हो कावळ्याच. हुशार पक्षी आहे म्हणतात. म्हणून पाळला. उकाच्या बोक्याने खाल्ला हो पण. दुष्ट मेला. कावळा नाही रे बोका बोका. माई मोड ऑफ>

In reply to by बॅटमॅन

रातराणी गुरुवार, 07/09/2015 - 12:28
घ्या मी काही बोलले राजहंस कोण ते? निरर्थक आत्मकांडाचा भ्रमवाद वगैरे वगैरे. छ्या गुर्जीना मंत्र नीट विचारला पायजे.

In reply to by रातराणी

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/09/2015 - 19:04
@ छ्या गुर्जीना मंत्र नीट विचारला पायजे.>> ख्याक्क! आमच्यापेक्षा बाकिच्यांनाच आता आमचे मंत्र इथे पाठ झालेले आहेत. ;-) अत्ता सूड घेइल बघा कुणीतरी लग्गेच! :P

प्यारे१ गुरुवार, 07/09/2015 - 20:16
'करशील ना?' हा वत्सल प्रश्न नेहमीच माऊलींच्या डोक्यात फेर धरून असतो. बाळाला जेवू घालून आई जेवायला बसायला सुरुवात करतानाच, आssssई शीsssss असा आवाज येतो आणि धावपळ करत आई उठून योग्य जागी योग्य पोजीशन ला बाळाला बसवून वरील वत्सल प्रश्न विचारते. -अर्धशतकासाठी पाणी टाकलेला ;)