Skip to main content

प्रेमकाव्य

अन् मलाही!

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 14/01/2016 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
एक सांगू? ऐकशील? ते कंगव्यातून सुटणारे केस राहूदे तसेच, भुरभुरूदे तेवढाच त्यांना विरंगुळा ...अन् मलाही! वाराही कधी लाडात येतो पदराशी सलगी करतो तू तशीच राहा, मला सावरू दे खेळू दे त्या दोघांना ...अन् मलाही! मोकळी छान हसताना इकडे तिकडे पाहताना वेडी डूलं झुलत राहतात झुलू दे त्यांना मजेत ...अन् मलाही! गालावरच्या खळ्यांना लाल ओठ नि चंद्रबिंदीला न्याहाळत बसतो आरसा पाहू दे ग निवांत त्याला ...अन् मलाही! - संदीप चांदणे

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 02/01/2016 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

मध

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 30/12/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी गुलाबी मखमल हवीये , मखमलितला गोड मध हवाय अनानामिका ला नको देउस , जोपर्यंत तो अनामिक मी असेन उचकी लागलिय प्रिये ,मोड्लोय पुरता प्रणयी वात्सल्य हवय , हवय आता तुझ्याबिगर असतो मी जेव्हा , दीन दुबळा असतो मी तेव्हा मला तुझ्या प्रेमाची जरुरी नाही , फक्त तुझ्या प्रेमाची खोली हवी घातकी वाटतो दुरावा तुझा तुझ्याशिवाय श्वाश नाही माझा पर्वा नाही मला कुठ्येस तू , फक्त तुझ्याजवळ हवाय मी अन हवाय तुझ्या प्रेमाचा स्वाद , तू माझ्यात न मी तुझ्यात आत नाही का ओढ्नारेस तू मला , इथेच मी , तुझ परिस दे मला हो , तूच मला जगवलय हो, तुच मला सावरलय.... माझे तुटलेले तुकडे , तूच जूळवलेस तुट
काव्यरस

प्रेमात हे असेच घडते....

लेखक माहीराज यांनी मंगळवार, 29/12/2015 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
हे मन का अधीर होते स्पर्शाने मोहून जाते.. कधी पावलात अडखळते कधी चांदण्यात उलघडते प्रेमात हे असेच घडते प्रेमात हे असेच घडते .....।। हे स्वप्न असे की भास असे तुझी आस लागे मनाला स्वच्छंद नवा सहवास तुझा मग वेड लावी जीवाला असे मन हे माझे भुलते अन् पाखरू होऊन उडते स्वप्नात तुझ्या हे वेडे दूर आभाळाला भिडते.... प्रेमात हे असेच घडते प्रेमात हे असेच घडते .....।। हा दिवस असो वा रात्र असो मी मात्र तुझ्या भोवताली स्वप्नात तुझ्या बैभान असा मी जाण न उरते काही असे रोजच का हे घडते मन तडफडते धडपडते अन् ओल्या याच क्षणाला मन तुझ्याचसाठी झुरते. . प्रेमात हे असेच घडते प्रेमात हे असेच घडते .....।।
काव्यरस

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

लेखक DEADPOOL यांनी रविवार, 27/12/2015 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १

प्रेम तुझे हे बरसणारे

लेखक कविता१९७८ यांनी गुरुवार, 24/12/2015 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम तुझे हे बरसणारे पाण्यावर हलकेच तरंगणारे फुलच जसे काही तोच मंद मंद सुवास दरवळतो मनात खास तोच तो कोमलपणा वेड लावे जीवा तुझाच ध्यास अन् प्रेमाचाच श्र्वास तुझ्याच आठवणींची मनात रास असता जवळ तु हरपतसे भान दुर जाताच हे जीवन माळरान तुझ्यात रमले आणि विरघळले जशी विरघळावी दुधात साखर आणि उरले फक्त प्रेमच प्रेम... प्रेमच प्रेम
काव्यरस

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

लेखक माहितगार यांनी बुधवार, 23/12/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग स्वप्नात झाले होते पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!) पंतप्रधान मोदींचे सचीव !! :) क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग त्यांनी विचारले गेले वर्ष भर काय केले ? ओबामां फोनु आला डू यु नो अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ओह मिपाकरांना आमचा निरोप द्या ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !!

अघळपघळ

लेखक रातराणी यांनी बुधवार, 23/12/2015 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
अघळपघळ बोलता बोलता गंमत सांगून गेला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला खेळत होता तिच्या केसांशी काल उनाड वारा श्वास रोखूनी पहात होता उभा आसमंत सारा वाऱ्याशी मी त्या असा एक करार आहे केला न चुकता माझ्यासोबत घेऊन येणार त्याला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला नाजुक तिच्या हातात फुलला होता पारिजात तिचाच सुगंध जणू भरून घेत होता उरात इवल्याशा फुलासंगे मी एक करार आहे केला लपवून जरासा तिच्याजवळ नेणार आहे मला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला येई मातीस चैतन्य हळुवार पाऊल तिचे थबकता जसे आकाशाच्या तनूवर टिपूर चांदणे पसरता मातीशी मी त्या असा एक करार आहे केला पांघरूण म्हणून घेणार आहे माती
काव्यरस

प्रसन्न सकाळ

लेखक जातवेद यांनी रविवार, 20/12/2015 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ होती वाचत होतो पेपर, हातामध्ये चहाचा कप ग्यालरी माझी चार फुटाची माती भरल्या मडक्यांचे जग एका मडक्यात होती तुळस रांगोळीला केलेला आळस गतलग्नाच्या बांगड्याही तशाच नुकतीच आलेली न्हाउनी उन्हात दुसर्‍या मधील अबोली तर खास खेळवीत होती ओल्या दवास थोडीशी गच्ची बाहेर झुकून रोखवीत होती अगणित श्वास हाय एक होते कोरफड तशात ना रूप सुगंध गणनाही कशात घेतसे कधिमधी आजारी असता औषध म्हणून केवळ लावावयास चौथ्यात असे गोकर्णाची वेल खच्च संपूर्ण गच्चीवर पसरलेली फुले टपोरी दर कोंबानजिक काही परडीत काही राहू दिलेली संपला चहा वाचून झाला पेपर पाण्याचा बंब सोडी गरम हवा उठतच होतो शोधीत कपडा-पंचा आतून आवाज वाजले किती

कोवळं वय

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 19/12/2015 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजक्तांच्या फुलांना इजा होऊ नये म्हणून नाजुकपणे फुले हाताळण्याचे ते वय होते.. . फुलपाखरांच्या पंखावरील उन्मादक रंगात रंगण्याच कोवळं वय होते ते.. . पाकळ्यांवर पडलेले दव नाजुक पणे टिपण्याचे ते दिवस होते.. कॉलेजच्या ग्यादरींग च्या नाटकात तू ज्युलिएट होति अन मी रोमियो होतो.. . भावपुर्ण नजरेने तु संवाद बोलत होतिस.. “My bounty is as boundless as the sea, My love as deep; the more I give to thee, The more I have, for both are infinite.” . त्या व्याकुळ प्रेमकथेतिल तू ज्युलिएट मी रोमिओ रंगभुमीवरील पात्रे होतो. . नाटक संपले ..तू निर्विकार पणे भुमीकेतुन बाहेर आलीस व नॉरमल जीवन जगु लागली.. मला नाहि
काव्यरस