Skip to main content

प्रेमकाव्य

नकळत …

लेखक अनामिक२४१० यांनी गुरुवार, 23/04/2015 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम …. ??? खरंच हे प्रेम असतं …. ? एक अनामिक हुरहूर दाटलेली केवळ तिच्या ओढीसाठी नकळत … आपल्याच नकळत मी तिला Follow करू पाहतो मी तिच्याच गोष्टी Follow करू लागतो ह्याला काय म्हणावे …. जितका मी दूर जाईन जाईल तितकंच माझ्या विचारे गुंती तिचं मन तिच्यातच का अडकत जातो मी … ??? नकळत माझाच मी …… समोर काय होणारय हे माहीत असूनही परत माझ मन तिच्यातच नकळत हळूहळू गुंतत जातं … असं कसं असतं हे प्रेम … नकळत … झालेलं … तिच्याच आठवणीचा साठा असलेलं ..... पुन्हा एकदा प्रेमात मी … नकळत … ... प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आपलाच अनामिक …

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

हरवला जीव तो …

लेखक अनामिक२४१० यांनी सोमवार, 13/04/2015 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
हरवला जीव तो … कुठे शोधू समजता समजता सापडेना.....!!! जीव लागला मागं त्याचं त्यालाच समजेना हरवून पण गवसला तो जीव थांबता थांबता थांबेना.....!!! वेडाच जीव तो आस लागलीया माग हरवलेल्या उत्तराची … स्वत:च धावूनिया लागे त्या वेड्या उत्तरासाठी गुंतून गेला जीव तो वाट पाहता पाहता थांबेना … !!! विचाऱ्याच्या गराड्यात अडकलेला तो जीव बाहेर येईना अजिचेयी .... कसं हे जीवनाच कोडं त्यालाच उत्तर मिळेना तरीसुद्धा जीव तो प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत धावायचं … … थांबता थांबता थांबेना.…...!!!

स्मायली जीवन माझे

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 12/04/2015 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
स्मायली जीवन माझे http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy004.gif ताजे...स्मायली जीवन माझे! http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif धागा असो प्रति साद असू दे सावकाश किंवा घाई असू दे कुणी हसो अथवा तो रुसु दे, देत पुढे मज जाणे ! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-312.gif स्मायली...

लागला मला छंद

लेखक शशिका॑त गराडे यांनी मंगळवार, 24/03/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
सखे लागलाय मला छंद तुला तु़झ्या नजरे आड तुला पहाण्याचा तु़झ्या हास्यात माझे हास्य पहाण्यचा तुझ्या डोळ्यांत माझे जग पहाण्याचा

मंतरलेली रात्र

लेखक सुमित_सौन्देकर यांनी मंगळवार, 24/03/2015 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
तूज भेटिची ती रात्र, उशीरानेच जरा उगवली आेढीच्या आतूरतेप्रमाणेच, लवकर मावळलीही युगां प्रमाणे जाणवला, वाट बघण्याचा काळ तो त्यातील गंमत काही औरच, असहाय्य तरीही सुखद तो ठरली वेळ, ठरला काळ, ठरले बाकी सारे काही पण ठरतच न्हवते बोलायचे कोणी आणि काय ते माहीत नाही लाटांच्या सानिध्यात, सुरुवात काहीशी अंधुक झाली संगीतमय त्या प्रसंगी मज पूनवेची भरती आली शर्करेसम तूझे ते आेठ, प्रश्नार्थक गुरफटलेले अन नाजूक तूझ्या त्या देही, जणू चंदन पांघरलेले बोलक्या डोळ्यांस तूझ्या पाहूनी, मी मुका बापूडा मुकलो शब्दसखे सोडूनी गेले, अन मी एकटा पडलो तूझ्या चेहरयावरचे, भाव टिपण्यास मी तत्पर जणू चातक मी आकाशी, पावसाच्या
काव्यरस

वेड तिच्या प्रीतीचे……

लेखक निनाद जोशी यांनी गुरुवार, 05/03/2015 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
आता जरी का त्यागिले तिने मजला भेटणे रोज माझ्या स्वप्नी येते घेऊन सोबत चांदणे बैसतो काठी नदीच्या घेउनि हातात हात पाहतो डोळे भरुनी साठवतो तिजला मनात चाहूल त्या सूर्योदयाची लागते जेव्हा तिला विरुनी जाते दवामध्ये सोडून मजला एकला का कळेना सुर्य का इतक्या सकाळी उगवतो का कळेना मी सुद्धा असा अचानक उठतो पाहतो तिजला मनी अन स्वप्न हि पाहतो तिचे म्हणून वाटे लागले मज वेड तिच्या प्रीतीचे……

तुझा प्रवास सुखाचा होवो

लेखक निनाद जोशी यांनी सोमवार, 02/03/2015 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
माझे घरंगळणारे अश्रू तुझ्या पायापाशी पोहोचले ....... तुझा स्पर्ष होताच थोडेसे गालात हसले...... म्हणाले तुझा सहवास फारच मोजका झालाय..... सावलीत बसूनही माझा जीव उन्हाने त्रासालय.... हवीये तुझी भेट काही क्षण तुझे हवे आहेत .... आठवणीचा प्रकाश उजळवायला थोडे भास तुझे हवे आहेत .... जाताजाता तुझी छोटी भेट दे मला .... तू नाही तर तुझा आभास दे मला .... किमान आठवण ठेव माझी हृदयाच्या एका कोपऱ्यात.... अडगळीत का होईना पण राहण्याचे समाधान असेल त्यात.... चाल आता मी धरतो परतीची दिशा.... तुझा प्रवास सुखाचा होवो हीच माझी आशा.... चल आता मी धरतो परतीची दिशा.... तुझा प्रवास सुखाचा होवो हीच माझी आशा....
काव्यरस

घर घर की काहानी

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 25/02/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
'Don't take me for granted'; तिने दम दिला 'अग? पण मी कुठे?' त्याने केविलवाणा प्रयत्न केला 'माहिती आहे मला तुझा स्वभाव... मला न विचारता... द्यायचा इतरांना भाव; एक गोष्ट लक्षात राहील तुझ्या... तर शपथ..' चिडून गेली ती आत तणतणत! कस सांगू हिला.. surprise आहे! तिचा वाढदिवस... माझ्या लक्षात आहे! एक गजरा... एक नाटक... नंतर long drive चा plan आहे... तिच्या आवडीच्या restorent मधे टेबलसुद्धा booked आहे... खरच आवडतेस ग मनापासून; विसरभोळा आहे घे सांभाळुन; संसार तुझ्याशिवाय अपुरा आहे... अस आपल् म्हणायच... खर तर मीच तुझ्याशिवाय अधूरा आहे.... ---------------

तो आणि ती

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 20/02/2015 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
दोघांनाही पाउस आवडतो; त्याला खिडकीतुन तिला गच्चितुन... दोघांनाही थंडी आवडते; त्याला दुलईतुन... तिला धुक्यातून.... मंद हलके गझलचे सुर... त्याच्या खोलीतुन.... तिच्या गाडीतून... पावसाळी संध्याकाळची गरम भजी... त्याला स्वयंपाकघरातून... तिला टपरीतुन... ठेल्यातुन... मॉल मधल shopping त्याच! रोडसाइडवर प्रेम तिच.... 5star च dinner? चल घेऊ दोघे आपण... पाव भाजी, पाणी पूरी आणि फालूदा घेऊ या आपण? तरीही.... तिच मोहक हसण... आणि त्याच अजूनही... अह... कायमच... घायाळ होण....
काव्यरस