Skip to main content

प्रेमकाव्य

समरस व्हावे ऐसे

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 09/05/2016 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
थांबल्या पळी या प्रेमाच्या क्षण एक तू डोळ्यांत पहा कृत्रीमतेचा उतरवून साज रेशमी मिठीत सजून पहा दे शब्दांना आधार तुझ्या गंधीत मौनाच्या साथीचा दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे थरथरत्या हळव्या अधरांचा शीतल छाया, मी घनदाट तरू तू वळणारी खळखळ सरिता मी एक डोलता प्राण अचल तुज पाहून, अविचल वाहता मी धागा अतूट प्रितीचा तू फूल एक नाजूकसे गुंफता प्रित, गुंतता हृदय प्रेममाला सुरेख शोभतसे परिणीती, धुंद श्वासांची लयदार काव्यात व्हावी सूर जुळता ही तमवसने कोमल स्वरात न्हावी मी स्वत:स विसरून जावे तू असे मला निरखावे डोळ्यांनी तन्मयतेने मग युगल गीत गावे संकोच मनी, भारल्या क्षणी ना स्पर्शे उभय चित्तांशी तू अवघी तुल

..तुला पाहण्याचा मला छंद राणी..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 06/05/2016 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
..तुला पाहण्याचा मला छंद राणी.. दिव्यांना नको तू करु मंद राणी तुला पाहण्याचा मला छंद राणी पुरे सर्व निर्बंध टाळूनि इथले खुली मुक्त हो आज स्वच्छंद राणी मला घे मिठीच्याच कैदेत आणि नको गे करु तू खुले बंध राणी तुला मी मला तू असे प्राशवावे.. पुरी रात व्हावी मधू धुंद राणी.. तुला लागला सावळा रंग माझा तुझ्या मोगर्याचा मला गंध राणी - कानडाऊ योगेशु

तेव्हा मला तू फार म्हणजे फार आवडतोस

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 30/04/2016 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
मार्केटयार्डामधुन आठवड्याची भाजी घेउन येताना अचानक मला सोसायटी मधली मैत्रिण भेटते ती एकटीच आलेली असते भाजी घ्यायला दोन मोठाल्या पिशव्या हतात् घेउन, अवघडून , अर्धातास, निमुट उभा रहात, आमच्या गप्पा ऐकणार्या तुझ्या कडे तिरप्या नजरेने बघत ती म्हणते “आमचे हे काल रात्री उशिरा कामावरुन आले दमुन झोपले आहेत बिचारे.

तेव्हा मला तू फार फार आवडतेस - प्रवास ३

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 30/04/2016 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
वैधानिक इशारा : वरील कवितेतील पात्रांचे विचार्/दृष्टीकोन सर्वस्वी कवीचे आहेत.सदर घटना सत्य आहे का काल्पनिक ह्याबाबतीत कवी मौन बाळगत आहे. ------------------------------------------ गोव्याच्या त्या तत्सम एक्झॉटीक बीच वर उघडाबंब मी.. शार्कच्या नजरेप्रमाणे.. कपड्यांना चिकटलेली.. नितळ शरीरे पाहण्यात बिझी असताना... "अहो जास्त पुढे जाऊ नका. तुम्हाला साडेचार फुटात पोहायची सवय आहे..." असा डायरेक्ट आत्म्याशीच संवाद साधणारा आवाज येतो...! ती तूच असतेस. समुद्राच्या पाण्यात तू अलगद अंदाज घेत उतरतेस.... एक एक पाऊल पुढे टाकत..! अन पावलागणिक ओले होणारे तुझे अंग पाहत... मी स्तब्ध राह्तो...! अन मग हळुहळू त

तेव्हा मला तू फार फार आवडतेस...प्रवास २

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 27/04/2016 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
.. .. रात्रीच्या रेल्वे प्रवासात नेहेमीसारखेच तु लोअर बर्थवर व मी मिडल बर्थवर पडतो.. झोपायच्या आधी मी पुन्हा समोरच्या साईडबर्थवर पहुडलेले सुंदर प्रकरण किलकिल्या डोळ्यांनी बोगीच्या सरकारी मंद प्रकाशात.. न्याहाळण्याचा प्रयत्न करत असतो.. थोडा वेळ जातो आणि अचानक कबरीतुन एखादा खूनी हात वर यावा तसा... (आभार रामसे बंधु) तुझा हात येतो.. अन पाठोपाठ तुझा आवाज... ..अहो... झोपलात का? ...नाही? ...हात द्या हातात...! हे नेहेमीचेच असते!

तेव्हा मला तू फार फार आवडतेस...!

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 24/04/2016 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं म्हणणं.. मी तुम्हाला मुळीच आवडत नाही.. अन माझा मुद्दा.. तु मला कधी आवडत नाहीस ते सांग..! बोलताना असे बोलुन गेलो.. तु जशी घरात आवडतेस.. तशी तू प्रवासातही आवडतेस..! ती मग अडुनच बसली...

तू फूल कुणाचे देखणे?

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 15/04/2016 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा! रुजताना होईल अंत नसेल कोणास खंत तू जीव कुणा मायेचा? जा निघून हलक्या पायाने.... तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू..... -शिवकन्या

चाहुली...(चित्रपट गीत लिहिण्याचा छोटासा प्रयत्न)

लेखक सुमित_सौन्देकर यांनी बुधवार, 13/04/2016 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
काळजी वाटी मजला तुज्याच प्रीतीने-2 चाहुली दाटी भोवती तुझ्याच प्रीतीने-2 तुज्या वीन राहु कसा गीत हे गाऊ कसा स्वप्न हे पाहू कसा तुज्याच प्रीतीचे काळजी वाटी मजला तुज्याच प्रीतीने-2 चाहुली दाटी भोवती तुझ्याच प्रीतीने-2 भास सारे हे छळती भाव मजला न कळती साद का ऐकू येते सांग ना रे...... का कुठे मी हरवतो मीच मजला मिरवतो चाहुली का पुन्हा या सांग ना रे परतुनी ये तू ग पुन्हा... सांग वेडे माझा गुन्हा ये पुन्हा...तू प्रिये...वाट बघते ही मीठी... आज बेधुंद वारा साथीला गार गारा भान नाही मनाला साजणी ग... स्पर्श पुन्हा करुदे हात हाती धरुदे आज मिटूदे अबोला सजणी ग.... जिव माझा आतुरला ध्यान नाही माझे मला... ऐक

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 09/04/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.