मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

.....राजधानी Express.....

कानडाऊ योगेशु ·
लेखनविषय:
राजधानी Express ------------------------------------------- कशी धावते..राजधानी पाहा .. हॉर्न वाजवत..वेगात...सुसाट वार्यालाही मागे टाकणारा. वेग तिचा तो अफाट.. वेगाशी स्पर्धा करता तिच्या.. थकुनि जाती पळती झाडे.. HiTech तिचे इंजिन अवजड.. धुरांच्या रेषाही न हवेत सोडे.. स्टार-पॅंट्रीचा एक खास डबा.. स्टिम राइस..पिझ्झा बर्गर..नाही गावठी भात-वरण.. सुगरण तिथले शेफ..खरोखर.. सॅलाड मिळे..बास झाले आता शिकरण..! राजधानीतुन जातो आता पैसे फेकुन..ऐटित रुबाबात मी .. साहेबासारखा प्रवास करतो.. एकांतात शिंकताना ही म्हणतो..प्लीज एक्स्क्युज मी.. कोट बिल्ला पाहुन उरात भरे धडकी.. T.C इथले बघा कसे तालेवार वाटती...

सत्तेसाठी ता ता थय्या

बाजीगर ·
लेखनविषय:
स्टेजवरची वज्रमूठ, मेजवरती ठरली झूट, मतपेटीतलं भूत, मेले नाही।। सुपारी फुटायच्या आत, बुंदी खायची घाई, मतदारच बाप अन् आई विसरले।। कमळ विकसले, काका आकसले, नाना प्रकाशले, बुध्दिबळे।। भांडे लपवले ताका, बोबडले ते काका, नाही राहीला धाका, पक्ष-फूटी।। सत्तेसाठी ता ता थय्या, भाजप व विरोधक एकशय्या 'समान नागरी' ची नैय्या पार पडो।।

निरोप

चलत मुसाफिर ·
काव्यरस
रस्त्यावरून या तू चालू नकोस आता निक्षून ती म्हणाली हातात हात होता (आला सुवास तोच ती बैसता समीप पण साठवू कसा तो मन क्षुब्ध, हात कंप) हळवे जुने तमाम तू आठवू नको ते कसलाच अर्थ नाही उरला न जीव तेथे नाही मी राहिले ती तूही आता निराळा वेड्या मनास लागे वेडा निरर्थ चाळा मैत्री असेल अपुली भेटू अधूमधून नजरेस मात्र ठेव अपुल्या जरा जपून नजरेत ना दिसू दे ती ओल पावसाची एकांत तो मनस्वी ती रात्र मीलनाची वळुनी न पाहताही तत्काळ ती निघाली मी आर्त, स्तब्ध, सुन्न दाटून रात्र आली --- झाला बराच वेळ आहे इथे बसून तो गंध ओळखीचा आहे इथे अजून (टीप: आम्हाला इतपतच काव्य येते)

एकादशीची पहाट

बाजीगर ·
लेखनविषय:
एकादशीची पहाट विठ्ठलाकडे पाठ फोटोफ्रेम मधे आठ पांडूरंगा ।। दर्शन घडू दे पाऊस पडू दे भक्ती जडू दे चरणाशी ।। वारकरी दहा लाख कोरोना चा ना धाक असेच आम्हा राख विठूराया।। टाळ मृदंग गजर दिंड्या पताका हजर नाचे,गाये, बाजीगर जन्मोजन्मी।।

भोग

अवतार ·
लेखनविषय:
अंतरीचा ठाव माझ्या अजून मी घेतोच आहे अनंत जन्मांचे हे देणे अजून मी देतोच आहे वृक्ष छाया तापलेल्या धरणीला देतोच आहे पोळलेल्या हृदयावर मी ती छाया घेतोच आहे धीर देऊन भ्यालेल्यांना मीही तरी भितोच आहे अमृताच्या प्याल्यातूनही विष मी पितोच आहे इतरांची मी कीवच करतो परंतु मीही तोच आहे आयुष्याची शाई संपली तरीही मी लिहितोच आहे मरणाची मी वाट पाहतो तरीही मी मरतोच आहे जिंकिले जरी षड्रिपू तरी अजून मी हरतोच आहे खेळापासून सावल्यांच्या मैलन मैल पळतोच आहे सावली जरी माझी पडली परंतु मी जळतोच आहे थकलेल्या पाऊलवाटांवर परत मी फ़िरतोच आहे तरीही त्या अंतरात माझ्या अजून मी शिरतोच आहे पुष्कळ झाले पुरे करा अजून म

मातीचे पाय

चांदणे संदीप ·
पायांना स्पर्शून आले ते हात मळाले होते लख्ख उमगले तेव्हा ते पाय मातीचे होते मी केवळ पाहत होतो पायांच्या खालची धूळ ती ललाटास लावावी हे एकच माथी खूळ मी इथवर पाहून आलो पाऊलखुणा विरणाऱ्या आधी खुणावत, मागून कपटी विकट हसणाऱ्या आता, पुन्हा चालावे पुढे, की परत फिरावे? सोस ना-लायक पायांचे पुसून अवघे टाकावे? प्रेमळ शब्दांची ओल मनात झिरपत नाही व्हावे नतमस्तक ऐसे पायही दिसत नाही ते सारेच निघून गेले जे पाय धरावे सुचले मातीचे पाय मातकट मागे माझ्यासह उरले - संदीप भानुदास चांदणे ( रविवार, २५/०६/२०२३)

माया

अवतार ·
लेखनविषय:
काव्यरस
अस्पर्शित संध्याकाळ घनव्याकूळ हे आकाश मेघांना भिडतो वारा तुटती थेंबांचे पाश वाळूत गिरविली स्वप्ने लाटांनी पुसली जाती हलकेच उतरतो चंद्र तिमिराच्या पंखावरती क्षितिजाने सूर्याचा मग हात घेतला हाती अंबरात नक्षत्रांच्या त्या स्निग्ध बावऱ्या ज्योती पाण्यावर येई अलगद ही चंद्रफुलाची छाया मनात आठवते मग आईची प्रेमळ माया

वाट्या..

गवि ·
लेखनविषय:
सगळं कसं थोडं थोडंसंच उरून बसलेलं.. गिळवतही नसलेलं अन फेकवतही नसलेलं.. बळंच सात आठ घास जास्त खाऊन संपवायला हवं.. नाहीतर मग वाट्यांमधे भरून फ्रीजमध्ये ठेवायला हवं.. फ्रीजमध्ये खूप वाट्या आहेत पूर्वीच उरून बसलेल्या.. उद्या फोडणी देऊ म्हणत परवा तेरवाच नासलेल्या.. पोटातलं फेकून सुटकेची ओशट वाट बघणाऱ्या.. आतल्या शिळवड्याला दाबून डिस्पोजेबल वड्या बनवणाऱ्या.. मोकळ्या होऊन क्षणभरच दवबिंदूनी डवरणाऱ्या.. पुन्हा स्वतःत जळकी ताजी उरलेली अर्धी कच्ची स्वप्नं कोंबून.. त्यांना बायोडिग्रेडेबल शिळी निर्माल्यं करणाऱ्या.. पुन्हा पुन्हा फ्रीजमध्ये ठासलेल्या ठरीव आकाराच्या थंड वाट्या.. कर्कश आवाजात ओरखडून तारख