लेखककर्नलतपस्वीयांनी गुरुवार, 15/06/2023 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
सख्या रे...
प्राचीताई यांची तरल,मोरपंखी कविता वाचल्यावर एकांगी वाटली. सखीने शंका उपस्थित केली तर सखा तीचे शंका समाधान कसे करेल हा एक विचार डोक्यात आला.
काही सुचले, लिहून काढले व ताईंची परवानगी काढली.
लेखकप्राची अश्विनीयांनी बुधवार, 14/06/2023 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
न्हाऊ कशी सख्या रे
तनु चंद्र जाहलेली
काया अजून आहे
स्पर्शात माखलेली..
न्हाऊ कशी सख्या रे
आताच फूल झाली,
कळी काल मोग-याची
केसांत माळलेली.
न्हाऊ कशी सख्या रे
अंगांग पेटलेले,
ते तेवतात अजुनी
तू दीप लावलेले.
न्हाऊ कशी सख्या रे
मृद्गंध आसपास,
जो कोसळून गेला
पाऊस काल खास.
न्हाऊ कशी सख्या रे
देही चितारलेले,
जे शब्द जाफरानी
ओठी तुझ्या न आले..
लेखकबाजीगरयांनी मंगळवार, 13/06/2023 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
'बिपोरजाॅय' आशी, ठेवा लक्ष
आमे तैयार छे, गुजरात दक्ष
पाकीस्तानातून भारतात,
बेकायदेशीर! नाही विजा,
आहे ना सोबत गडगडाट,
तेजाळ लखलखाट विजा!!
कडेकडेनेच निघून जा,
हा विनंती अर्ज
पीकपाणी नुकसान नको
फिटलं नाही कर्ज.
करु नको विस्थापीत,
नको उडवू घराचे पत्रे,
हवामान महासंचालक,
कशी वाचवावी लक्तरे?
लेखकबाजीगरयांनी रविवार, 11/06/2023 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
बोलाचा भात
बोलाची कढी
पोरीला दिली
कल्पनेतली गढी
खात्यात पैसे नसता
दिला blank cheque
भरा पोट खाऊन
फोटोतला केक
तू घे पंजाब, महाराष्ट्र
हरीयाणा आणि युवा
साडेतीन जिल्हे-ईलाही !!
खेळतोय कसा जूवा ।
लेखकचक्कर_बंडायांनी गुरुवार, 01/06/2023 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस कसाबसा निघून जाईल
कातरवेळ मात्र अंगावर येईल
तू फक्त माझी सय काढू नको
"ती" आली तशी संपून ही जाईल
मग काही अबोल-अनाथ स्वप्ने
वाऱ्यावर बेवारस फिरत-उडत
रात्रारंभी तुझ्या खिडकीशी येतील
डोळ्यांवाटे आत शिरू पाहतील
त्यांना अजिबात थारा देऊ नकोस
डोळे अगदी घट्ट मिटून घे
हात बाहेर न काढता आतूनच
निग्रहाने "ती" खिडकी बंद कर
मग मऊ केस झटकून जरासे
कुरळ्या बटांना मोकळं कर
सुकलेले ओठ घट्ट करून
पाठीला उशी लावून स्वस्थ बस
पुर दाटून आलाचं पापण्यांमध्ये
तर त्याला तिथेचं थोपवून ठेव
अन् माझा चेहरा आठवलाचं
तर चुकूनसुद्धा झरू नकोस
मी "हरवून" गेलोय कधींचं
मला पुन्हा शोधत बसू नकोस
तुझ्या बाजूला गाढ झोपलेल्याला
लेखकबाजीगरयांनी शनिवार, 13/05/2023 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
नफरत चा बाजारबंद,
म्हणाला तो सोनियानंद,
मोहबत की दुकाने खुली
नाही चालला बजरंगबली
अदानीची मोठी ताकद,
तर गरीबांची छोटा कद,
मोदी-शाह यांची जादू
स्वस्त, फूकट्यांचा बांबू
गरीबांना नको तो विकास
गॅससिलींडरने केला नाश
केरल स्टोरीचा ना असर
भाजप तू विजय विसर
लेखकबाजीगरयांनी गुरुवार, 11/05/2023 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
खोकेबाज धोकेबाज ।
इतरा म्हणत गद्दार!
स्वत: दिला पदभार।
सोडोनिया ।।
ठाकरेंनी जरी घातले,
सर्वोच्च कोर्टा साकडे,
पाऊल पडले वाकडे,
भलतेची।।
अननूभवी कुणी बनला ।
निवडणूकीस न उभारता।
मालमत्ता अर्ज न भरता।
मुख्यमंत्री।।
शाह- नानाने मात दिली।
भाज्यपाल जरी चूकले।
महाविकासआघाडी झूकली।
यामुळेचि।।
आत्मविश्वास अभाव?
अल्पमताची चाहूल?
कि अल्पमतीची हूल।
राजीनामा!!
बंडखोरांची ती सहल।
हाॅटेल डोंगर ती हिरवळ।
16अपात्र म्हणे झिरवळ।
योग्य होते?!
हेटाळले तुम्ही ज्यांना।
अलीबाबा,चाळीस चोर।
ठरले काळीज शिरजोर।
शिंदेशाही।।
आपण लाचारपणे।
केला असंगासी संग।
व सोडला भगवा रंग।
खुर्चीसाठी।।
नाव गेले,चिन्ह गेले।
संपली र
लेखकप्राची अश्विनीयांनी मंगळवार, 09/05/2023 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
||इदं न मम||
भरली ओंजळ पूर्ण अगदी पूर्ण रिकामी करताना,
चार पावलं सोबत चालून पुन्हा मागे येताना,
उचलून घेतलं फूल पुन्हा मातीत ठेवताना,
शब्दांची साथ सोडून समंजस मुकं होताना,
डोळ्यामध्ये उगा कुणी पाणी आणू नये.
मनामध्ये उगा तेव्हा त्रागा करू नये.
हस-या मुखाने, भीष्माच्या अलिप्तपणाने
अनुभवलेली ओल, गंध, स्पर्श वा अर्थ आठवावे.
आणि तृप्तपणे म्हणावं,
इदं न मम|
इदं न मम|