Skip to main content

मन

नसूनी तयात

लेखक रोहन जगताप यांनी शुक्रवार, 08/11/2024 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
भिती वाटता जीव काहूर राही न जाणे कसे काय होणार काही विचारात गुंतून डोके सदाही उरी दाटता भाव आभास पाही
खरे काय ते की मनाचाच कावा कुणी ओळखावे कसे सांग देवा जिवाचा मुठीतून आकांत धावा धगत्या मनाला कसे शांत ठेवा
भिताना मनाची मनालाच याही हताश क्षणाची असे होत लाही रडूनी नसे साध्य इच्छाच काही मनी आसवांना जगी अंत नाही
दिसे स्वर्ग बाहेर पाताळ आत अडोसाच नाही उभा वादळात निमूट स्वतः पाहिले मी मनात दिसूनी मला मी नसूनी तयात

पावसाचं वय....

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 16/08/2023 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
मऊ मऊ दुपटं,ऊबदार कुशीत तोंडात अंगठा,गाल लुसलुशीत तड तड ताशा,मोत्याच्या माळा सांगतो का रे पावसा वय माझ्या बाळा? भिरभीर डोळे, संतत धार रस्त्यातले डबके,आईचा मार भिजलेलं डोकं,कागदी होड्या सांग ना रे पावसा वय तुझं गड्या? मनात चुळबुळ,बाहेर भुरभुर मातीला गंध,हिरवळ दूरदूर छत्रीतलं भिजणं,भेटीची सय सांग ना रे पावसा काय तुझं वय? उरात उर्मी,अंगात गर्मी सह्याद्रीची साथ,मित्रांचा हाथ रानं आबादानी,नभात 'मल्हार' लय सांग ना रे पावसा तुझं काय वयं? स्टिलचे पेले,सीलबंद बाटली पाण्याशी गाठ,चकण्याची ताटली आजुन कसा आला नाही (मित्र) खड्डय़ात पडला का काय! सांग ना रे पावसा तुझं वय काय? डोळ्यावर चश्मा,नजर दू
काव्यरस

मातीचे पाय

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 27/06/2023 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
पायांना स्पर्शून आले ते हात मळाले होते लख्ख उमगले तेव्हा ते पाय मातीचे होते मी केवळ पाहत होतो पायांच्या खालची धूळ ती ललाटास लावावी हे एकच माथी खूळ मी इथवर पाहून आलो पाऊलखुणा विरणाऱ्या आधी खुणावत, मागून कपटी विकट हसणाऱ्या आता, पुन्हा चालावे पुढे, की परत फिरावे? सोस ना-लायक पायांचे पुसून अवघे टाकावे? प्रेमळ शब्दांची ओल मनात झिरपत नाही व्हावे नतमस्तक ऐसे पायही दिसत नाही ते सारेच निघून गेले जे पाय धरावे सुचले मातीचे पाय मातकट मागे माझ्यासह उरले - संदीप भानुदास चांदणे ( रविवार, २५/०६/२०२३)

मावळतीची दिशा....

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 12/01/2023 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे निसटल्या क्षणांना पुन्हा धरावे पारंब्या वरती झुलता झुलता पदराखाली पुन्हा लपावे कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे आठवणीतले विस्मृत चेहरे पुन्हा एकदा तरी दिसावे डोळ्या मधले दवबिंदू अन् चेहर्‍यावरले धुके पुसावे हुरहुरत्या त्या कातरवेळी ,कधी कुणाची वाट बघावी दुरून बघता ओंजळीतली, प्राजक्ताची फुले दिसावी किती मिळाली किती गळाली, मनात आता खंत नसावी मात्र मागणे एकच ,मावळतीची दिशा पूर्व असावी!! कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे

आज्जी गेलीय सोडून

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 14/06/2022 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
उशीराने आले ध्यानी एकटे गर्दीत बसून मला अनोळख्या देशी आज्जी गेलीय सोडून घरातून निघताना का बोलली ती नाही? तुला लेकरा घरात जागा उरलीच नाही आई बाबा गेल्यावर आज्जी तूच उरलेली कुणाकुणा पोसशील तूही आता थकलेली माझ्या इवल्या बहिणी आणि भाऊ लहानगे तुला आज्जी, म्हणतील कुठे दादा आमुचा गे? काय सांगशील त्यांना मला सांगशील का ग? आज्जी एवढ्याचसाठी पुन्हा भेटशील का ग? - संदीप चांदणे

नव्हतं ठाऊक

लेखक सरीवर सरी यांनी मंगळवार, 13/04/2021 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
आता मनाच पाखरू घर कुठे बांधणार? नव्हतं ठाऊक आठवणींच झाड तू कधी तोडणार| भाळला होतास अखंड चिवचिवाटावर, नव्हतं ठाऊक ध्वनीसाज बोलीचा तू निष्पर्ण करणार| निराळा पसारा जाणूनही.. आवरणार, नव्हतं ठाऊक झाले​ पसा~याचे जाळं तू शिकारी कोळी असणार|
काव्यरस

फुलपाखरू

लेखक मन्या ऽ यांनी मंगळवार, 09/06/2020 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
फुलपाखरू एक होते रंगेबेरंगी फुलपाखरू .. त्याचे 'मन' ऐसे नाव.. ईवलेसे नाजुक पंख तयाचे त्यावर सुंदर नक्षी संस्कारांची. फुलपाखराच्या पंखावरचे काही रंग लाल-गुलाबी स्वप्नांचे बालपणीच्या आठवणींचे उमलणार्या फुलांचे चांदण्या रातींचे तर काही रंग आहेत.,मात्र निळे-काळे नको त्या कटु आठवणींचे भळभळत्या जखमांचे चुलीतल्या विस्तवाचे.. त्याच कटु आठवणींने बळ तयाच्या पंखास दिले संकटावर मात करुन त्यास नव्या उमेदीने जगण्यास शिकवले!.. -दिप्ती भगत (१३जून, २०१९)