मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

नाईन इलेव्हन - Twin To-Worse: प्रस्तावना

टर्मीनेटर ·

मंगळवार दिनांक ११ सप्टेंबर २००१, संध्याकाळी सात-सव्वा सातची वेळ.

रोजच्या प्रमाणे त्या संध्याकाळीही चकाट्या पिटण्यासाठीचा आमचा अड्डा असलेल्या एका मित्राच्या सायबर कॅफेवर आम्ही काही मित्रमंडळी हजर होतो. आतमध्ये अमेरिकेतील आपल्या नातेवाईकाशी याहू मेसेंजरवर चॅट करत बसलेला एक नेहमीचा ग्राहक लगबगीने बाहेर आला आणि त्याने अमेरिकेतील 'वर्ल्ड ट्रेड सेंटरवर' विमान धडकल्याची त्याला नुकतीच समजलेली बातमी आम्हाला सांगितली.

काय आहे 'अज्ञात पानिपत'

कंजूस ·
काय आहे 'अज्ञात पानिपत' गाभा :- अज्ञात पानिपत पुस्तकाच्या निमित्ताने ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन. 'अज्ञात पानिपत' ( मराठी: इतिहास -संशोधन ) लेखक - मनोज दाणी पाने ८३०. (किंमत १३००रु, ) प्रकाशन Merven Technologies.,११ जून २०२३ . पुणे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्था इथून. उपलब्ध : सह्याद्री बुक्स ISBN 978-81956210-4-0 सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की ही ऐतिहासिक कादंबरी नाही. म्हणजे ऐतिहासिक नोंदींवरून वीरश्रीपूर्ण आणि भावनिक कथन असलेले पुस्तक नाही.

वार्तालाप: दुर्जनांचा ही सन्मान करा.

विवेकपटाईत ·
दुर्जन प्राणी समजावे. परी ते प्रगट न करावे. सज्जना परीस आळवावे. महत्त्व देऊनी. समर्थ म्हणतात राजकारण करताना, दुर्जन लोक असतील ते ओळखून ठेवावे पण त्यांचा दुर्जनपणा प्रगट करू नये. इतकेच नव्हे, तर त्यांना सज्जनापेक्षाही अधिक मोठेपण देऊन प्रसन्न ठेवावे. राजकारणात दुर्जन लोक तुम्हाला त्रास देऊ शकता तर त्यांना महत्त्व देऊन संतुष्ट करावे. त्यांच्या उपयोग करून त्यांना आपल्या शत्रू वर सोडावे. योग्य वेळी त्यांना नष्ट ही करून टाकावे.

आशियामधला सर्वात तरुण राजवाडा

पराग१२२६३ ·
उमेद भवन स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर भारतीय उपखंडात उभारल्या गेलेल्या शेवटच्या काही राजवाड्यांपैकी जोधपूरचा उमेद भवन राजवाडा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सगळी संस्थानं भारतीय संघराज्यात विलीन झाल्यामुळं पुढच्या काळात भारतातच नाही, तर संपूर्ण उपखंडात नवीन राजवाडे उभारले गेले नाहीत.

।। 'हिंग' पुराण - अध्याय दुसरा ।।

टर्मीनेटर ·

"अच्छा जल्दी बताओ हिंग को इंग्लिश में क्या बोलते हैं?"

।। 'हिंग' पुराण - अध्याय पहिला ।।

टर्मीनेटर ·

मिसेस पोद्दार ने पेश कि बेसनगट्टे कि सब्जी
मिसेस मोंगा ने बनाई दाल मखनी
मिसेस चॅटर्जी कि बैंगन भाजी
मिसेस नायर का सांबार
मिसेस गुप्ता का राजमा
और मिसेस विरानी का उंधियू

वाह! सबको मिलते है दस में से दस...
अब चिट निकालके हि होगा मिसेस शेफ का फैसला...

इन दस नंबरीयोंने ऐसा क्या डाला कि स्वाद हुवा निराला?

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

किलर्स ऑफ द फ्लॉवर मून

कॉमी ·
"एप्रिल महिन्यात, ओक्लाहोमातील लांब लांब पसरलेल्या कुरणांवर लहान लहान फुलं उगवतात. त्यांच्या पाकळ्या कुरणांना अश्या व्यापून टाकतात की जणू देवाने फुलं उधळली आहेत असे वाटते. मे महिन्यात, अजस्त्र चंद्राखाली कायोटी आरोळ्या मारतात, आणि मोठी रोपं झपाट्याने कुरणं काबीज करतात, लहान फुलांकडून पाणी आणि सूर्यप्रकाश हिसकावून घेतात, आणि बघता बघता फुलं मरतात. त्यामुळे मे महिन्याला तिथले मूलनिवासी ओसेज लोक फुलं मारणाऱ्या चंद्राचा महिना म्हणतात." मार्टिन स्कॉर्सेजी हा जगप्रसिद्ध दिग्दर्शक आहे. आजच्या सर्वोत्तम दिग्दर्शकांच्या यादीत त्याची गणना होते.

पुणे स्टेशन झाले 165 वर्षांचे

पराग१२२६३ ·
pune पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले.

ग्रंथ प्रकाशन सोहोळा - अज्ञात पानिपत

मनो ·
प्रकाशन समारंभाची तारीख ठरविताना एक मोठा योग्य जुळून आला. ज्येष्ठ इतिहास-संशोधक मा. श्री. गणेश हरी उर्फ तात्या खरे यांच्या स्मृतीनिमित्त भारत इतिहास संशोधक मंडळ दर वर्षी काही ना काही कार्यक्रम आयोजित करत असते. यावेळी त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत माझे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मला मिळते आहे, हा एका अर्थाने तात्यांचा आशीर्वादच आहे असे मी समजतो. या पुस्तकात तात्यांच्या संशोधनाचा आधार मी अनेक जागी घेतलेला आहे. विशेषत: त्यांनी दिलेले मोगल दरबारचे अखबार मी पुष्कळ वापरलेले आहेत.