मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

भल्याभल्यांसाठी आव्हान ठरणारं रोलँ गॅरोस

पराग१२२६३ ·
लेखनविषय:
पॅरीसमधील रोलँ गॅरोस टेनिस संकुलात (Roland Garros Tennis Complex) यंदाच्या टेनिस हंगामातील दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा सुरू झालेली आहे. क्ले कोर्टवर खेळवली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा. इथल्या लाल मातीची कोर्ट्स अग्रमानांकितापासून बिगरमानांकित खेळाडूंची कायमच शारीरिक, मानसिक कसोटी पाहत आलेली आहेत. त्यामुळे रोलँ गॅरोस संकुलातील मध्यवर्ती कोर्ट असलेल्या फिलीप चॅर्टिएर कोर्टावर (Philippe Chartier) आजवर अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळालेले आहेत.

पाकिस्तान- १२

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
युद्धात शस्त्रापेक्षा शस्त्र कोण चालवत आहे हे महत्त्वाचे असते. जेव्हा पाकिस्तानी लष्कराने लाहोर आघाडीवर हल्ला करायला सुरुवात केली तेव्हा भारतीय लष्कराकडे कोणता पर्याय होता? त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले होते, तसेच रस्तेही बंद करण्यात आले होते. त्याचवेळी त्यांना अखनूर (काश्मीर) वाचल्याची बातमी मिळत होती. पाकिस्तानी वायुसेना लाहोर आघाडीवर जोरदार हल्ला करत होती, त्यामुळे भारतीय लष्कर आपली पोझिशन बदलत होते. पाकिस्तानच्या युद्ध इतिहासात मेजर जनरल निरंजन प्रसाद यांच्या पलायनाचे चित्रण मोठ्या चवीने केले जाते.

कबूतरावरचं असंही एक पुस्तक

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. माझ्या मुलीचं पाचवीचं हिंदी पुस्तक वाचताना एका पुस्तकाची माहिती मिळाली. उत्सुकता वाटली म्हणून हे पुस्तक विकत घेतलं आणि लवकरच वाचूनही झालं. अमेरिकन बाल साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळालेलं आजवरचं एकमेव भारतीय लेखकाचं पुस्तक! धान गोपाल मुकर्जींनी लिहीलेलं 'गे-नेक: द स्टोरी ऑफ अ पिजन!' 'गे-नेक' पिजन म्हणजे रंगीत मानेचं कबूतर आणि हे पुस्तक म्हणजे ह्या कबुतराची कहाणी! १९२५ मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या समृद्ध भावविश्वामधील प्रत्यक्षातील अनुभवांचं वर्णन आहे. आज आपण "त्या काळापासून" खूप दूर आलो आहोत.

गाढ झोपेतलं माझं स्वप्नं.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला आठवतं,शेतात काम करताना सर्वात जास्त मेहनत घेतली जाते ती म्हणजे शेत नांगरणं. माझ्या आजोबांच्या शेतात अनेक कामगार कामं करत असायचे.शेत नांगरण्या सारखी कामं अर्थातच कामगारांना दिली जायची. पण त्या दिवशी मी स्वतः एक कुणगा अट्टाहासाने नांगरायचं असं ठरवलं. आणि व्हायचं तेच झालं. सूर्यास्त होई पर्यंत माझं अंग चोळामोळा झालं. रात्री घरी येऊन कसाबसा दोन घांस गिळून अंथरूणावर पडलो. आणि सूर्योदय केव्हा झाला हे कळलंच नाही. असं म्हणतात जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा मेंदूत येणारे विचार स्वपनाद्वारे हयदोस घालतात. त्या दिवशी माझं अगदी तसंच झालं.

न्यूत की द्यूत?

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आकाश गेडाम आणि मोहिनी गजाभिये या नागपूरस्थीत अभ्यासकांचा Study of Vanished South Asian Board Game 'Nyout गेल्या वर्षात प्रकाशित झालेल्या छोट्याशा शोध निबंधात त्यांना वाघोरी टेकड्यांच्या पायथ्याशी चंद्रपूर जिल्ह्यातील एरवा झरी गावाच्या परिसरात (N20’38’53, E79’35’23) एका प्राचीन खेळाच्या खूणा आढळल्याचा उल्लेख आहे.

पुन्हा एकदा कोकणातला पाऊस

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुन्हा एकदा कोकणातला पाऊस. मी पावसाला माझ्या जीवनाचा एक भाग केला आहे.

वय निघून गेले

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
परवा प्रो.देसाईंचा ७४ वा जन्म दिवस.वय जसं निघून जातं तसं आयुष्यात होणाऱ्या चमत्कारांचा आणि सत्यतेचा अर्थ पटायला लागतो.स्पष्ट विचार प्रदर्शीत करताना संकोच आड येत नाही.प्रत्येकाच्या आठवणीतल्या यादीत फरक असणं स्वाभावीक आहे. भाऊसाहेब मला म्हणाले “माझ्या काही आठवणी आहेत.त्या मी तुम्हाला सांगतो.तुम्ही त्या कवितेत उतारा.गद्या पेक्षा पद्यात ऐकाला मला बरं वाटेल” असं म्हणून त्यानी मला आपल्या आठवणी सांगितल्या.त्या मी खलील कवितेत लिहिल्या.

सेपियन्स-(ऐसी अक्षरे -१७)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ट युवल नोव्हल हरारी हे नाव आता कोणाला माहित नाही हे फार कमी आहे. आपण कोण आहोत? आपण इथपर्यंत कसे आलो? येताना काय काय मागे सुटले आहे ?काय काय गाठोड घेऊन इथे आलो आहोत? ते गाठोड आहे का ते ओझं आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा माणूस एका झटक्यात (ह्या पुस्तकात) देतो.

एखाद्या ठिकाणाची आठवण करून देण्याची शक्ती वासात,गंधात, असते.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तो दिवस मला आठवतो.शेतात कामकरणाऱ्या माझ्या सकट इतर कामगारांना एक दुर्गंध येत होता.शोधता शोधता एका पिंपळाच्या झाडाखाली एका झुडपात दुर्गंध तिव्र झाला. झुडूप विस्कटून पाहिल्यानंतर एक रान-मांजर मेलेलं आढळलं. रात्री घरी गेल्यावरही तो दुर्गंध माझ्या नाकात “वास” करून राहिला होता. निसर्गाने पृथ्वीवरच्या बहुतेक जीवांना वास अनुभवण्याची दिलेली क्षमता पाहून मला निसर्गाचं कौतुक करावसं वाटतं. मी,अगदी साध्या गंधाच्या सामर्थ्याचंही कौतुक करतो. हा एक विलक्षण प्रकार अनुभवता येतो. वास सौम्य ही असतो तसाच तो जहरी असतो. काही गंध क्षणभंगुर असतात आणि काही वर्षानुवर्षे टिकून राहतात.

पाकिस्तान - ११

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लाहोर भारतासाठी विशेष महत्त्वाचे नव्हते. लाहोर जिंकणे हा ना कधी अजेंडा होता ना सैन्याने कधी प्रयत्न केले. सीमेपासून लाहोरपर्यंतचे अंतर तेवढेच आहे जेवढे कॅनॉट प्लेस ते नोएडा. असही नाही की रस्त्यात रणगाड्यांची रांग लागलेली असते नी सैन्य त्याला ओलांडून जाऊ शकत नाही. ग्रँड ट्रंक रोडसारखा उत्कृष्ट रस्ता बनलेला आहे. पाकिस्तानने लाहोरच्या वेशीवर जुन्या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था केली होती. जसे किल्ल्याच्या बाहेर एक कालवा खणणे, जेणेकरून इतर सैन्य तेथवरच थांबू शकेल.