#सामुहीक_अध:पात
एक काळ होता साधेपणा, विरक्ती, सभ्य भाषा व उदात्त विचारसरनी ही संतांची लक्षणे समजल्या जायची. आता त्याची जागा भपकेबाजी, पैश्याचे कीळसवाने प्रदर्शन, उग्र भाषा याने घेतली आहे. असे का झाले ? साधी, सरळ राहणी जगणाऱ्या व्यक्तीला पूर्वी समाजात मान होता. आताच्या काळात आपल्या समाजाचे सामुहिक स्खलन झालेले आहे. कुठल्याही मार्गाने धनाढ्य झालेल्या ऐतखाहू माणसाला समाजात जो पर्यन्त डोक्यावर घेतल्या जाईल तोपर्यन्त फक्त 'पैसा' हाच या समाजाचा धर्म राहील. अश्या अध:पात झालेल्या समाजात आदर्श म्हणून स्वीकारावे अशी लोकं अपवादानाचेच निर्माण होतील. आपले आदर्श जर चुकीचे असतील तर ती चूक आपली आहे.