Skip to main content

<< हिशेब-ठिशेब>>

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 02/09/2016 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : ओळखली ना ? ( डॉक खरेकाका ह घ्या..) मागच्या रविवारी संध्याकाळी नवऱ्या बरोबर फिरायला गेले होते.. (मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमचा एक पुतण्या रमेश तिथे फिरताना दिसला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याला विचारले एकटाच इकडे कुठे फिरतो आहेस. त्यावर तो म्हणाला आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. समीरा ( त्याची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते.

कुणाचेही काहीच चुकलं नाही?

लेखक vcdatrange यांनी सोमवार, 29/08/2016 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करत असताना अनुभवलेली ही घटना प्रत्येक टप्प्यावर विचार करायला भाग पाडतेयं. वय वर्षे २० असलेली आदिवासी समाजातील मंजुळा फार दूर नाही, नाशिकपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावरल्या एका गावात राहणारी. दुस-या बाळंतपणा दरम्यान तिचा मृत्यू झाला. ना पेपरात बातमी छापून आली, ना कुठे त्यावर चर्चा झाली. पण या प्रातिनिधीक घटनेमागे बरचं काही घडलेलं आहे. शेजारच्या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यावर माहेर असलेल्या मंजुळाचं वयाच्या १४व्या वर्षी लग्न झालं. अक्षर ओळख नसण्याइतपत शिकलेली मंजुळा सासरी आल्यावर दोन वर्षात पहिल्यांदा गरोदर राहिली.

१४ ऑगस्ट २०१६

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 14/08/2016 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
८३ वर्षाचा झालो.आज मनात आलं.... सुचलं तेव्हडं लिहावं दिसलं त्तेव्हडं वाचावं रुचलं तेव्हडं ऐकावं आवडलं तेव्हडं बोलावं विचारलं तेव्हडं सांगावं दिलं तेव्हडं घ्यावं पचलं तेव्हडं खावं जमलं तेव्हडं चालावं जीवन तृप्त असावं आणि कुणी म्हटलं तसं "ह्या जन्मावरं ह्या जगण्यावरं शतदा प्रेम करावं" शुभेच्छा देण्यार्‍यांचे आणि न देण्यार्‍यांचेही आभार. श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

मी आयफोन-कर

लेखक विश्वेश यांनी रविवार, 14/08/2016 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला कोण व्हायचे आहे आयफोन-कर, एनड्रोइड-कर कि विंडोज-कर ... आता तुम्हाला आयफोन-कर व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही. पण मुख्य सल्ला असा, की पुन्हा विचार करा अगदी आग्रहच असेल, तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे, आणि एकदा तयारी झाली, की त्या सारखी मजा नाही ,तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक फोन च्या फिचर वरून मतभेद करायला शिका. म्हणजे आपल्या फोन मध्ये आहे का, आपल्या फोनमधील फिचरचा दर्जा काय, एकूण उपयोग काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं.

रूस्तम

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 13/08/2016 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही गोष्टींनी तत्कालीन समाजाला हादरवून टाकलं होतं, यात कावस मानेकशॉ नानावटी खटल्याचा समावेश होता, या खटल्याने समाजाच्या निष्टाना मुळापासून हादरवून सोडले होते आणि ज्युरी पद्धत या खटल्यानंतर बंद करण्यात आली त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या इतिहासात या खटल्याला फार महत्व आहे. या सत्यकथेवर आधारित असलेला 'रुस्तम' सुद्धा असाच देश भक्तीमध्ये गुंडाळलेला एक ड्रामा. युद्धात नाव कमावलेला नेव्हीचा अधिकारी रुस्तम पावरी आयएनएस म्हैसूर या जहाजावर कमांडर म्हणून तैनात असतो.

दीर्घकालीन रोगांचे उपचार : समज-गैरसमजातून जाणारी निर्णयप्रक्रिया

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 25/07/2016 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
"दुर्धर" आणि/अथवा "दीर्घकालीन" आणि/अथवा "असाध्य" रोग हे केवळ रुग्णाच्या शरिरावरच नाही तर मनावर व जीवनशैलीवर जोरदार आघात करतात. याशिवाय ते रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांच्यावरही शारिरीक, मानसिक व भावनिक प्रभाव टाकतात. अर्थातच, अश्या रोगांचे उपचार ठरविताना रुग्णाच्या शरिरीक व मानसिक ताकद-कमजोरीबरोबर त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या शरिरीक व मानसिक ताकद-कमजोरीचा विचार अत्यावश्यक ठरतो. हा एक फार मोठा व गुंतागुंतीचा विषय आहे. याबाबतीत, फार खोलात न जाता, पण तरीही शास्त्रिय पद्धतिने, निर्णयप्रक्रिया करता यावी यासाठी खालील काही विचार उपयोगी ठरावेत.

कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 19/07/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख बालपणीच रेडिओशी संपर्क आला - रेडिओ हेच मनोरंजन आणि माहितीचे साधन असल्यामुळे खूप रेडिओ ऐकत असे. गाण्यांसाठी बिनाका गीतमाला अन विविध भारती, तर क्रिकेटवेडापायी सुशील दोशी यांचे धावते वर्णन वेळी अवेळी तासनतास ऐकले असेल. पुढे इलेक्ट्रॉनिक्स शिकतांना स्वतःचा इवलासा प्रक्षेपक तयार केला होता. पण फक्त प्रयोगच. गुरुजींनी तो प्रयोगाव्यतिरिक्त वापरणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्यातला उत्साह मावळला होता. पण रेडिओ नेहेमीच जवळचा सोबती राहिला. आजही दूरचित्रवाणीपेक्षा विविध भारती किंवा इंटरनेट रेडिओ जास्त ऐकतो.

स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी शुक्रवार, 24/06/2016 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण? अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी स्वतः पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर ! पण इतकं सरळ नाही ते. कारण ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. प्रत्येक जणच म्हणतो की "या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत." वगैरे.

कांचीवरम

लेखक किसन शिंदे यांनी मंगळवार, 21/06/2016 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
कांचीवरम! रेशीम धाग्यापासून साडी विणण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले नगर! 'फुलांमधे जति, पुरूषांमधे विष्णू, स्त्रियांमधे रंभा आणि नगरांमध्ये कांची' असे महाकवी कालिदासही संस्कृतामध्ये ज्या नगराचे वर्णन करतो ते कांचीवरम. भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं आहे, पण तरीही सामान्याना ब्रिटीशांपासून मिळालेलं स्वातंत्र्य खर्‍या अर्थाने उपभोगता येत नाहीच. याचं मुख्य कारण म्हणजे सावकार-जमीनदारांनी सामान्य लोकांची चालवलेली पिळवणूक. व्यापारी लोकं स्वतःचा नफा वाढवण्यासाठी मजूरांना अगदी कमी मजूरीत प्रचंड काम करवून घेत आहेत.

मी, किशोर कुमार आणि कराओके……

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 28/05/2016 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आणि इतर जगातही प्रथितयश, नामांकित गायक आतापर्यंत अनेक होऊन गेले… अजूनही आहेत….गाण्यात किंवा एकंदरीत सगळ्या प्रकारच्या संगीतातच मनाला उभारी देण्याची प्रचंड ताकद आहे.नैराश्यासारख्या मानसिक अवस्थेत संगीतच मनाला नवी संजीवनी देतं.अनेकांना अनेक प्रकारचे संगीत आवडतं.मला स्वतःला विशेष शास्त्रीय किंवा सुगम संगीत वगैरे प्रकार कळत नाहीत.माझ्या कानाचा ठाव घेणारा एकमेव आवाज म्हणजे किशोर कुमार….कॉलेजमध्ये असल्यापासून जर कोणाची गाणी आवडत असतील तर ती फक्त ह्याच मनुष्याची ….ती आवड अजूनही कायम आहे आणि आयुष्यभर राहील.