मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाटलाची मुलगी.. – भाग १

दिपक लोखंडे · · जनातलं, मनातलं
संकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा.. मयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव... राघव : मी कशाला गप्प बसू?.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला... संकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे.. राघव : तुला म्हणतोय तुला.. मयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा.. संकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा.. राघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा... मयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत.. संकेत : मी काय म्हणतो राघव : काय म्हणतोस तु?? संकेत : हेच्या आयलां... मयुरी : संक्या शांत हो.. राघव निघ इथुन.. राघव : काय बोल्ली? मयुरी : अरे तु जा ना बाबा दोन मिनीट कुठंतरी.. राघव : अरे पण?? मयुरी : राघव प्लीस.. राघव : बरं.. पण आल्यावर या सुकड्याचा सगळा प्लॅन सांगायचा हा मला.. मयुरी : हो हो.. नक्की.. तु ये अता.. मयुरी : संकेत.. तो गेला.. सांग लवकर आता.. संकेत : सुकडा?? मयुरी : असुदेत.. म्हटल्याने कोनी होत नाही.. संकेत : पण.. मी सुकडा?? मयुरी : ए.. आता गप ना बाबा.. तो यायच्या आत बोलना पट्कन.. संकेत : मयुरी.. मी काय म्हणतो.. मयुरी : संक्या.. आता डायरेक्ट मुद्याचं बोल.. संकेत : आपणाला तिच्या घरच्यांशी भेटाव लागेल? मयुरी : कोणाच्या? संकेत : माझ्या गर्लफ्रेंडच्या.. मयुरी : मग आम्ही कशाला मधे? राघव : काय मग.. झालं का डिस्कशन? मयुरी : आलास बाबा.. टायमिंग लावूनच बसलेलास वाटतं? राघव : मग काय.. वेळेचा पक्का हाय आपण.. मग.. काय म्हणतोय सूकडा?? संकेत : परत सुकडां.. मयुरी : शांतबस संक्या.. हेच्यां गर्लफ्रेंड च्या घरी बोलवतोय आपल्याला.. राघव : का? गर्लफ्रेंडचं लग्न ठरलं का याच्या? संकेत : त्यासाठीच जायचंय.. राघव : ए.. सरळ बोल ना काय लोचा हाय ते? संकेत : तिचा बाबा स्थळ बघतोय तिच्यासाठी.. मयुरी : मग तुझ्या दादाला घेऊन जाना तीच्याघरी.. संकेत : तो नाही म्हणतोय.. मयुरी : का? संकेत : काय माहित.. राघव : टरकली असेल साल्याची.. मयुरी : रघू काय बोलतोयस.. राघव : अबे.. पण तुझी आयटम आहे तरी कोण? संकेत : मुलगी आहे.. राघव : सुकड्या.. कॉमेडी करतो काय माझ्याशी? अबे कोणाची मुलगी ते सांग ना.. संकेत : पाटलाची.. मयुरी : काय?... संक्या डोकं जाग्यावर आहे ना? संकेत : का? मयुरी : का म्हणून काय विचारतो वर तोंड करून.. पाटील कोण आहे माहित आहे ना.. परवाच सुटलाय तो तुरुंगातून.. संकेत : सुटला नाय.. पळून आला.. राघव : काय? तुझ्यात इतकी हिम्मत कुठून आली बे साल्या? मयुरी : गाढवा तुकडे करून टाकील तुझे तो.. राघव : अनी पार्सल करून पाठवेल... HOME DELIVERY.. हा हा हा... मयुरी : पाटलाला तुझ्याबद्दल कळाल तर नाही ना? संकेत : कळालय.. मयुरी : छान.. चांगलाच अडकलायस.. आता यातून बाहेर कसं निघणार तु? संकेत : मी नाही.. आम्ही? मयुरी : म्हणजे? संकेत : पाटलाला तुमच्याबद्दल सुद्धा कळलंय.. त्याने बोलावलंय... तिघांनाही.. मयुरी : काय? मेंटल झालायस का साल्या सूकड्या.. आमच्याबद्दल का सांगितलंस त्याला? संकेत : अग मी कशाला सांगेन? मंजु ने सांगितलंय सगळं.. मयुरी : आता ही कोण? संकेत : पाटलाची मुलगी.. राघव : संक्या.. कधी बोलावलय पाटलानं? मयुरी : राघव, काय बोलतोयस तु? संकेत : मयुरी शांत हो.. संक्या आपला मित्र आहे, आपला यार आहे.. आणी त्याला सध्या आपली गरज आहे.. मयुरी : पण राघव राघव : पण वगैरे काही नाही.. संक्या बोल.. कधी बोलावलंय? संकेत : उद्या सकाळी.. मयुरी : आणि तु आम्हाला आत्ता सांगतोयस?? राघव : मयुरी शांत हो.. उद्या सकाळी ९:०५ ला सगळी इथ भेटूया.. मग इथुन जावू पाटलाकडे.. ओके? संकेत : ओके.. मयुरी : पण? राघव : मयुरी प्लीज... मयुरी : बरं ओके.. ...............................................................

वाचने 5665 वाचनखूण प्रतिक्रिया 4