Skip to main content

दिवाळी आणि दिवाळी अंक २०१८

लेखक यशोधरा यांनी शनिवार, 03/11/2018 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी घरांमधून फटाके, फराळ, रांगोळ्या, देवता पूजन, आका़शकंदील, गोडधोड ह्यांसोबत दिवाळी अंक घरात आल्याखेरीज दिवाळी सुफळ संपूर्ण साजरी झाल्यासारखी वाटत नाही. आजच्या जमान्यात नेहमीच्या पारंपारिक अंकसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही उपलब्ध असतील. ह्या वर्षी मात्र मला अजून एकही दिवाळी अंक घेता वा बघता आलेला नाही - अगदी ऑनलाईन अंकही. फारच वाईट! तरी अंकांविषयी उत्सुकता आहेच. जास्तीत जास्त दिवाळी अंक वाचायला मिळावेत म्हणून ग्रंथालयाचे सदस्यत्व घ्यायचाही विचार आहे, म्हणजे घेईनच. जसजसे वाचेन, तसे इथे लिहीन. तुम्ही कोणी पारंपारिक अंक विकत घेतलेत का? किंवा ऑनलाईन अंक पाहिलेत, वाचलेत का?

रंगराव कंपोस्टवाला

लेखक vcdatrange यांनी बुधवार, 17/10/2018 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या रविवारी अस्मादिकांची डॉक्टर असोसिएशनच्या (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.) सचिवपदी निवड झाली. सभेत स्वागत, सत्कार वैग्रे सोपस्कारातही रंगराव कंपोस्टवाला की पारखी नजर होती ती आपल्या कामाच्या कचर्‍याकडे. कार्यक्रम पार पडल्यानंतर पसार्‍यातली ढीगभर पुष्पगुच्छ घरी सोबत आणली. एक एक बुके वेगवेगळे करायला जवळपास तीन तासाचा वेळ गेला. काय काय निघालं, यादी तर पहा - १. हुच्च फुले जरबेरा, कार्नेशन वेगळी काढुन घरभर फ्लावर पॉट सजवले. २. सजावटीचा हिरवा पाला आणि फुले- बारीक कातरुन कंपोस्ट करीता गच्चीवर रवाना ३. बुकेला लपेटलेला पारदर्शक प्लास्टिक पेपर - सुटे करुन गादीखाली.

रफाल - भाग २

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 17/10/2018 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे रफाल भाग १ भाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का. उ१- यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मिळणाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो.

रफाल - भाग १

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 16/10/2018 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
रफाल रफाल करार पार्श्वभूमी रफाल करारा बाबत बऱ्याच लोकांनी लिहिले आहे व त्याच्या बद्दल बरेच बोलले जात आहे. काँग्रेसने त्याला भ्रष्टाचाराचा करार असे म्हणत बोफर्सच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. संरक्षण खरेदी ही नेहमीच महागाची असते. ह्याचे कारण संरक्षणात वापरली जाणारी वेगवेगळी साधने, दारुगोळा, तोफा, विमाने इत्यादीचे तंत्रज्ञान हे अग्रणी असते व ते मिळायला अवघड.

मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 16/09/2018 02:29 या दिवशी प्रकाशित केले.
मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल पुणे-नगर रोडवरील (राज्य महामार्ग क्र. २७) लोणीकंद भागात 'पुष्पानगरी' नामक कालोनीत माझा एक प्लॉट आहे (क्षेत्रफळ ३००० वर्गफूट, ५० गुणिले ६० फूट ). वाघोली पासून अंतर सहा किलोमीटर आहे. हा प्लॉट विकायची माझी इच्छा आहे. तरी याबाबतीत मार्गदर्शन हवे आहे.

गणपती बाप्पा मोरया,थोडे व्रत समजून घेऊ या!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 12/09/2018 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
पार्थिवगणेश म्हणजे पृथ्वीपासून-मातीपासून केलेला गणपती. हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील..जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला! ती वर्तमानकाळचीही गरज असली तर असू दे . आमची तक्रार नाहीच.फक्त गणपती मातीचा असावा की नाही? ही चर्चा या तात्त्विकतेमुळे गैरलागू होऊन बसते, हे ध्यानात घ्यावे. म्हणजेच ज्याला जो हवा तो गणपती हवे तितके दिवस बसवू द्यावा. किती दिवस बसवावा ? असा विचार केला तर धर्मशास्त्रानुसार ते पार्थिवगणेश व्रत असल्याने त्याची मुदत दीड दिवसच आहे.

अशीही एक गोष्ट

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 03/08/2018 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
अशीही एक गोष्ट कॅटीने रोहनकडे वळून बघितले आणि हसली. "Hey! I really mean it. I really love you." त्याने आर्जवी स्वरात तिला सांगितले. "Please Ron! It's over. Don't come after me." तिने त्याच्याकडे पाठ करताना म्हंटले; एक सिगरेट पेटवली आणि आपली बॅग घेऊन निघून गेली. रोहन तिच्या त्या मागे परत वळूनही न बघता तडातडा जाण्याकडे अवाक् होऊन बघत बसला. आणि का कोण जाणे त्याला मिताली आठवली. **** मिताली आणि रोहन एकाच शाळेत आणि मग पुढे बारावी पर्यंत एकाच कॉलेजमध्ये. त्यामुळे जाणे-येणे एकत्र. पक्की दोस्ती दोघांची. मिताली प्रचंड बडबडी. रोहन मात्र तसा कमी बोलणारा.

राजयोग - १३

लेखक रातराणी यांनी सोमवार, 18/06/2018 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
विजयगढचा किल्ला एका महाकाय डोंगरावर आहे. जंगल किल्ल्याच्या जवळपास जाऊन संपतं. अजस्त्र कातळातला, निळ्या आकाशाला खिजवत उभा असलेला तो किल्ला रघुपतीला जंगलातून बाहेर पडल्या पडल्या समोर दिसला. जंगल झाडावेलींनी पूर्णपणे झाकलेलं तर किल्ला चारीबाजूंनी अभेद्य दगडांनी वेढलेला होता. जंगल सावध तर किल्ला जागरूक. जंगल वाघाप्रमाणे पाय जवळ घेऊन दिमाखात बसलेलं तर किल्ला सिंहाप्रमाणे आयाळ फुलवून मान तिरकी करून उभा! जंगल जमिनीला कान लावून प्रत्येक बारीकसारीक आवाज टिपतंय तर किल्ला जणू नजर रोखून क्षितीजाच्या पार पहातोय. रघुपतीला पाहताच टेहेळणी बुरुजावरचे पहारेकरी सावध झाले. शंख वाजू लागले.

अ का पेला - A cappella

लेखक राघवेंद्र यांनी शुक्रवार, 08/06/2018 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
अ का पेला - A cappella हे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत नव्या पद्धतीने हा प्रकार प्रचलित झाले. या मध्ये शाळा -कॉलेजमधील विदयार्थी समुहात गाणी म्हणु लागली. वाद्याऐवजी टाळ्या, पायाचा ठेका याचा वापर सुरु झाला.