हुच्चभ्रू एलिट शिरेल्स
एवढ्यात कुठली TV/वेब सीरिअल पाहिलीत/ पाहत आहात? हा धागा वाचला आणि मला तो न्यून कि काय म्हणतात तो गंड आला ना राव !!
बघणं तर सोडाच वो, कितीयेक शिरेलची नाव बी ऐकलेली न्हाईत.
माझी उडी ज्याच्या मध्ये फारसं काही बघण्यासारखं नसतं अश्या फालतू मराठी शिरेल पासून फार तर हिंदी पर्यंतच किंवा जास्तीतजास्त हुच्च् म्हणजे डब केलेली एखादी ल्युसी. आता आमची अभिरुचीच अशी त्याला काय करणार? आमचा मुख्य प्रॉब्लेम म्हणजे वाघिणीचे दूध. आम्ही ते भीत भीतच पिलेलो त्यामुळे च्यामारी काय बोलतोय काय बी कळंना अशी अवस्था. हरी पुत्तरचं नाव ऐकलेलं ते सिनेमाच्या संदर्भात.
मिसळपाव