सद्गुणाचा पुतळा बनतो विनाशाचा सापळा!
तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त आहात?
तुम्हीं शांत स्वभावाचे आणि मितभाषी आहात?
सालस आणि आज्ञाधारक आहात?
आणि त्यासाठी तुमचे कौतुक होत आहे?
तर मग आजच सावध व्हा!
ते कौतुक यासाठी आहे की तुम्ही तसेच सद्गुणाचे पुतळे राहावे म्हणजे जग तुमचे शोषण करू शकेल!
तुमच्या अंगात ठाण मांडून बसलेला हा सद्गुणाचा पुतळा निर्धाराच्या घट्ट दोरखंडाने बांधा, एका भक्कम लोखंडी पेटीत टाका, पेटीला भलेमोठे इच्छाशक्तीचे लोखंडी कुलूप लावून ती पेटी हेलिकॉप्टरमधून मिसाईलला बांधून समुद्राच्या मध्यभागी खोल तळाशी भिडेल इतक्या जोरात फेकून द्या आणि चाबी वितळवून टाका. आणि मग समुद्राच्या खवळलेल्या लाटांची प्रेरणा घेऊन बिनधास्तपणा, स्पष्टवक्तेपणा, बेफिकिरी, डावपेच आणि निगरगट्टपणाचा यांचा अंगीकार करा.
आजचे घोर कलियुग सद्गुणांच्या पुतळ्यांसाठी बनलेले नाही आणि ते मध्यम मार्ग सुद्धा स्वीकारू देत नाही.
एक तर तुम्ही कुणाचे शोषण करा, नाहीतर मग स्वत: तरी शोषित व्हा.
कुणाचा तरी बळी घ्या, नाहीतर तुमचा बळी जाईल.
कुणालातरी दबावात ठेवा नाहीतर तुम्हाला कुणीतरी दबावात ठेवेल.
कुणालातरी खाली खेचा, नाहीतर दुसरा कुणीतरी तुम्हाला खाली खेचून पाडेल.
योग्य वेळ आली की समोरच्याला खडे बोल सुनावून मोकळे व्हा नाहीतर तुम्हाला गृहीत धरले जाईल, तुमचे मौन ही तुमची मूक संमती मानली जाईल. स्पष्ट बोला नाहीतर कष्ट झेला. प्रत्येक "अरे" ला "कारे" करा!
पाणी गळ्यापर्यंत येण्याची वाट बघू नका नाहीतर ते पुढे नाकातोंडात जाऊन श्वास घेणे मुश्कील करेल.
वाचने
8722
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
आत्मविवंचीत जिल्बी! उर्फ
In reply to आत्मविवंचीत जिल्बी! उर्फ by अत्रुप्त आत्मा
हा हा हा या रे या!
आता फक्त मोजि राहिलेत.
In reply to आता फक्त मोजि राहिलेत. by एस
@आता फक्त मोजि राहिलेत.
अगदी खरे आहे वाक्यनवाक्य बघा
खरंय वाक्य न वाक्य..
हेलिकॉप्टरमधून मिसाईलला बांधून
??
शर्तिया रामबाण इलाज
तुम्ही एखाद्या "स्टेप बाय
In reply to तुम्ही एखाद्या "स्टेप बाय by सतिश गावडे
(No subject)
ब्वॉर . . . . .
तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त
तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त आहात? तुम्हीं शांत स्वभावाचे आणि मितभाषी आहात? सालस आणि आज्ञाधारक आहात? आणि त्यासाठी तुमचे कौतुक होत आहे? तर मग आजच सावध व्हा!हे वाचून अॅमवे किंवा टेलीब्रँड्सची झैरात आहे असे वाटले.In reply to तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त by मोदक
किंवा एक घंटा पहेले छाप वाटला
काही प्रश्णं आहेत ओ नी.सो.जी.
In reply to काही प्रश्णं आहेत ओ नी.सो.जी. by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा हा आहा
है शाब्बास!
एक तर तुम्ही कुणाचे शोषण करा,
तुम्ही यातलं काय काय केलंत?
"अरे" ला "कारे" बरेचदा ,,,
तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त
In reply to तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त by अद्द्या
अच्छा तु 'सालस' का? ह्म्म्म्म
"व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी