Skip to main content

मत

छपाकसे पेहेचान ले गया...

लेखक शा वि कु यांनी सोमवार, 13/01/2020 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
दीपिकाच्या जेएनयु वारी मुळे मोकळ्या थिएटरची अपेक्षा होती. आणि अपेक्षेप्रमाणे तिकीटघरापाशी तानाजीसाठी हिssss मोठ्ठी रांग, आणि छपाक साठी अगदी तुरळक लोग. पण खुर्च्यांमध्ये स्थानापन्न झाल्यावर हळूहळू गर्दी वाढली. सिनेमाच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये थिएटर सम्पूर्ण भरलं. अगदी बरं वाटलं. हा सिनेमा पाहायचा हे तर सिनेमा जाहीर झाल्यावरच ठरवलेलं, बऱ्याच कारणांमुळे- 1) मेघना गुलजार- मेघना गुलजार ही अगदी आवडती दिग्दर्शिका. तलवार भयानक म्हणजे भयानक आवडला होता. राझी तलवार इतका नाही आवडला, पण तरी दिगदर्शिकेवरचा विश्वास तसाच टिकून राहिला.

प्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 21/12/2019 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागे मिपावर प्रथमोपचार पेटी - First Aid Box असा धागा काढला होता. त्याचा कितपत अन कुणाला उपयोग झाला ते माहीत नाही पण मराठीत असा शब्द शोधतांना किंवा मराठीत चर्चा करतांना याचा उपयोग झाला असावा. होते काय की कायप्पावर लिहीलेले कायमचे राहत नाही. म्हणून कुठेतरी कायमस्वरूपी असण्यासाठी मिपावर लेखन असावे असे वाटते. कायप्पावर झालेल्या चर्चेचा धागा व्हावा असे वाटत असल्याने येथे लिहीतो आहे. तर आपण नेहमी किंवा अधेमधे, सतत किंवा कधीकधी प्रवास करतो. तो प्रवास अगदी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा असू शकतो.

radio ga ga

लेखक क्षितिज जयकर यांनी शुक्रवार, 27/09/2019 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
RADIO GA GA……………… ह्या लेखाचं शीर्षक जरी इंग्लिश मधून असलं तरी ते मराठीत सुद्धा तितकंच सार्थ आहे. रेडिओ गा!!!!! गा!!!!. १९८४ साली QUEEN ह्या ब्रिटिश वाद्यवृंदाने हे गाणं रचनाबद्ध केलं , ते आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्याला रेडिओ वर हमखास ऐकायला मिळतं. मला हा लेख लिहिण्यासाठी जी स्फूर्ती मिळाली ती ह्याच गीतावरून. त्यामुळे सर्वप्रथम ह्या गाण्याबद्दल थोडीशी माहिती देतो. मगाशी लिहिल्याप्रमाणे QUEEN ह्या वाद्यवृंदाचा DRUMMER (त्याला ढोल वादक म्हणणं माझ्या जीवावर येतं) रॉजर टेलर याने ते १९८३ साली प्रथम ते रचनाबद्ध केलं , आणि मग १९८४ साली ते स्वरबद्ध करून सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलं.

पावणेदोन पायांचा माणूस

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 11/09/2019 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
राजकारणात पीए नावाची जमात म्हणजे जरा अवघड जागेचं दुखणं असतं. कारण त्यांना नेत्याच्या सगळ्या भानगडी माहीत असतात. त्याचा पैसा कुठून येतो, कधीपर्यंत टिकणार आहे ते कोणाच्या कोण सोबत त्याची सेटिंग आहे. अनेक ठिकाणी नेत्यांचा अर्धा कारभार हे पीए लोकंच निभावून नेतात. लोकसत्तेतलं दोन फुल एक हाफ किंवा महाराष्ट्र टाइम्स मधलं दिड दमडी मध्ये तंबी दुराई ने राजकारणावर केलेलं खुसखुशीत भाष्य तुम्ही कधी ना कधीतरी वाचलंच असेल, त्याच तंबी दुराई म्हणजे श्रीकांत बोजेवार यांची पावणेदोन पायांचा माणूस हि कादंबरी सुद्धा तशीच चिमटे काढणारी आहे.

आयतं भांडवल आणि बाजारभाव!

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 10/08/2019 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलो! अरे काका कुठायंस? १५ मिनिटं झाली मला येऊन इथे! "आलो आलो.अगदी दारात कॅफेच्या." "हं बोल अमित काय घ्यायचं? मस्त आयरिश कॉफी घेऊया? छान मिळते इथे!" "मागव तुला काय हवं ते.पण आधी इथं का बोलवलंयस ते सांग!आधीच सकाळच्या प्रकरणामुळे माझं डोकं फिरलंय!" "हो हो सांगतो.धीर धर!

श्री. अतिश तसीर यांच्या लेखावर प्रतिसाद

लेखक गामा पैलवान यांनी रविवार, 19/05/2019 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. अतिश तसीर यांनी २० मे २०१९ च्या टाईम नियतकालिकात मोदींना उद्देशून एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. भारतीय जनता आजून पाच वर्षं मोदी शासन सहन करेल काय, असं शीर्षक आहे. उपरोक्त लेखावर प्रतिसाद व काही प्रमाणावर प्रतिवाद म्हणून सदर लेख लिहला आहे.

शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी

लेखक chittmanthan.OOO यांनी शुक्रवार, 05/04/2019 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
काल रद्दी घालण्यासाठी न्यूजपेपर पोत्यमध्ये भरत होतो. त्यावेळी गेल्या वर्षीचा एक पेपर हातात पडला. सहज नजर फिरवली तर काही हेडलाईन्स वाचल्यानंतर वाटलं या बातम्या जर क्रमाने लावल्या तर शेतकरी आत्महत्या, कारणे आणि उपाय सगळेस समजेल पहिल्यांदा बातमी होती ती म्हणजे यंदा ९८% पाऊस!! म्हणजे सगळ्यात पाहिलं गेम निसर्गाने केला..!! लगेच दुसरा हल्ला तो म्हणजे मान्सून कमीपण आणि उशिरापण..!! निसर्गानं शेतकऱ्याच्या नशिबाला हा बेभरवशी पांडू जो पडला तर अगदी मुसळधार आणि नाही तर यंदा काही खरं नाही. मान्सून पण काय त्याच्या मर्जीने चुकत नाहीच.

दुधातील ए -१ व ए -२ घटकांबाबत भ्रामक प्रचार

लेखक vcdatrange यांनी मंगळवार, 08/01/2019 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
पौराणिक कथा, संस्कृती व आहारात भारतामध्ये दुधाला वैशिष्ठपूर्ण स्थान आहे. दुधाला संपूर्ण अन्न मानले गेले असले तरी काही लोकांच्या मते दुध हे प्रोस्ट्रेट ग्रंथी व बीजांडा (ओव्हरी) चा कॅन्सर, टाईप-१ डायबेटीस, मल्टीपल स्क्लीरोसिस, रक्तातील क्लोरेस्टरॉल ची उच्च पातळी, वजन वाढणे व हाडांची ठिसूळपणा इत्यादी विकारांसाठी कारणीभूत आहे. निसर्गोपचारात, अस्थमा व सोरीयासिस च्या रुग्णांना तर दुध सेवन थांबविण्याचा सल्ला दिला जातो.

अच्छे चाचा कच्चे चाचा

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 14/11/2018 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... " तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.

दिवाळी आणि दिवाळी अंक २०१८

लेखक यशोधरा यांनी शनिवार, 03/11/2018 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी घरांमधून फटाके, फराळ, रांगोळ्या, देवता पूजन, आका़शकंदील, गोडधोड ह्यांसोबत दिवाळी अंक घरात आल्याखेरीज दिवाळी सुफळ संपूर्ण साजरी झाल्यासारखी वाटत नाही. आजच्या जमान्यात नेहमीच्या पारंपारिक अंकसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही उपलब्ध असतील. ह्या वर्षी मात्र मला अजून एकही दिवाळी अंक घेता वा बघता आलेला नाही - अगदी ऑनलाईन अंकही. फारच वाईट! तरी अंकांविषयी उत्सुकता आहेच. जास्तीत जास्त दिवाळी अंक वाचायला मिळावेत म्हणून ग्रंथालयाचे सदस्यत्व घ्यायचाही विचार आहे, म्हणजे घेईनच. जसजसे वाचेन, तसे इथे लिहीन. तुम्ही कोणी पारंपारिक अंक विकत घेतलेत का? किंवा ऑनलाईन अंक पाहिलेत, वाचलेत का?