Skip to main content

मिपावरील माझे अकाऊंट, लिखाण डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/07/2026 20:24 या दिवशी प्रकाशित केले.

डिसक्लेमर: सदर धागा केवळ मिपावरील संपादकांसाठी आहे. इतरांनी तो वाचू नये. वाचल्यास प्रतिसाद वगैरे तर अजिबात  
देऊ नये.

 

मिपावरील माझे अकाऊंट तसेच लिखाण मला डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

 

भारत विश्वनेता बनला आहे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 14/07/2026 21:56 या दिवशी प्रकाशित केले.

भारत विश्वनेता बनला आहे 

२०१४ साली मा. मोदीजी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. त्यावेळी सर्व भारतीयांचे मन अगदी भरून आले. भारताची वाटचाल आता सुखसमृद्धीच्या वाटेने सुरू झालेली होती. 
भारतात त्यापुर्वी अनेक समस्या होत्या. लोकसंख्या, वाढती बेरोजगारी, अतिरेकी, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या याआधीच्या सरकारांकडून सोडविल्या गेल्या नव्हत्या. मोदीसरकारच्या आगमनापासून या अशा समस्या सुटण्यास प्रारंभ झाला. 

एका चर्चेच्या निमित्ताने माझे २ पैसे

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 21/08/2025 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
एका चर्चेच्या निमित्ताने माझे २ पैसे =================== -राजीव उपाध्ये (निमित्त - अमरेंन्द्र बाहुबली यांचा धागा.) घर भाड्याचे की स्वत:च्या मालकीचे याची अलिकडे वारंवार चर्चा होत असते. योग्य नियोजन केल्यास भाड्याचे घर हा आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर पर्याय असला तरी मानसिक स्वास्थ्य हा निकष असेल तर मात्र स्वत:चे घर केव्हाही योग्य... गेले ~५० वर्षे मी स्वत:च्या मालकीच्या घरात (टु बी प्रिसाईज "बंगल्यात") राहात आहे. हा अनेकांच्या वैषम्याचा विषय आहे. पण स्वत:ची जमीन आणि स्वत:चे आकाश या सुखाबरोबरच काही प्रश्न बरेच गंभीर आहेत.

कंट्या - मराठी कादंबरी अभिप्राय

लेखक राघवेंद्र यांनी शुक्रवार, 27/06/2025 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे ग्रंथालयात फिरत होतो आणि सहज पुस्तकं चाळत होतो. दरवेळी २-४ मराठी पुस्तकं घरी येतात, पण पूर्ण फार कमी वेळा होतं. यावेळी एक वेगळंच पुस्तक नजरेस पडलं – ‘कंट्या’ लेखक गणेश बर्गे. कथाही तितकीच साधी, पण हृदयाला भिडणारी – एका गावात आजी-आजोबांसोबत राहणारा एक मुलगा, ज्याने कधीच आपल्या आईला पाहिलेला नाही आणि वडिलांनी कधीच सांभाळलेलं नाही. सुरुवात होते आनंदी स्वभावाच्या ‘कंट्या’पासून.

निवडणूक: एका मतदान केंद्र व्यवस्थापनाचा पक्षांचा खर्च किती येतो

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 15/01/2025 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणूकीच्या दिवशी मतदाता मत देण्यासाठी मतदान केंद्रावर जातो. मतदात्याने मतदान केन्द्रावर जाऊन आपल्या पक्षासाठी मतदान केले पाहिजे यासाठी प्रत्येक राजनीतिक पक्षाला यंत्रणा राबवावी लागते आणि त्यासाठी मनुष्यबळ ही लागतो आणि त्यासाठी पैसा ही खर्च करावा लागतो. लोकसभा निवडणूकीच्या वेळी दोन्ही पक्षांचे बूथ प्रमुख माझ्या समोरच लहानचे मोठे झाले होते. त्यांच्या कडून मिळालेल्या माहिती आधारावर हा लेख. लेखात बूथ व्यवस्थापकाचे नाव मी सचिन ठेवले आहे. सचिनच्या शब्दांत: सचिन मला म्हणाला, विवेकजी, निवडणूक आयोगाने निवडणूक घोषित केली.

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

लेखक वामन देशमुख यांनी शुक्रवार, 20/12/2024 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.

सहज सुचलं म्हणून

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 20/12/2024 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

ट-२० विश्वचषक अंतिम सामना

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 28/06/2024 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
कालच इग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना ६८ धावांनी जिंकून भा

वार्तालाप: अहल्या शिळा राघवे मुक्त केली

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 11/02/2024 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागतां दिव्य होऊनी गेली. जया वर्णिता सिणली वेदवाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. समर्थ म्हणतात, श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श होताच शिळा रुपी अहल्या मुक्त झाली. हा श्लोक वाचतना, अनेक प्रश्न मनात आले. अहल्या खरोखर शिळा झाली होती का? श्रीरामांच्या चरणाचा स्पर्श होतास ती पुन्हा मूळ स्वरूपात आली, हे कसे संभव आहे? समर्थांच्या या श्लोकाचा भावार्थ वाल्मिकी रामायणातील कथेत शोधण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्प बुध्दीने केला आहे. महर्षि विश्वामित्र, राम, लक्ष्मण आणि अनेक ऋषी मुनीं सोवत मिथिलेत पोहोचले. श्रीरामांना तिथे एक ओसाड निर्जन आश्रम दिसले.

म्युच्युअल फंड गुंतवणूक: माझा अनुभव

लेखक ईंद्रधनु यांनी शुक्रवार, 29/12/2023 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
म्युच्युअल फंड या विषयावर सोशल मिडिया आणि युट्युब यावर खूप माहिती मिळत असते. काहींच्या मते हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे तर काही याला खूप नावं ठेवतात आणि स्वतः शेअर मार्केट मध्ये गुंतवुन त्यात जास्त फायदा कसा आहे ते सांगतात. या सर्व मत-मतान्तरात मी माझा अनुभव सांगतो. मी सुमारे ५ वर्षांपूर्वी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली. अर्थात ५ वर्ष हा काही इक्विटी म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीच्या दृष्टीने फार मोठा कालावधी नाही.